हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Trump Tariff On India । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगात सध्या टॅरिफ युद्ध चालू केले आहे. जगभरातील अनेक देशांमधील वस्तूंना मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या संकटात आल्या आहेत. नुकतंच त्यांनी भारताला 25% टॅरिफ अतिरिक्त कर लावून पुन्हा दणका दिला आहे.अमेरिकेने हा निर्णय घेताना म्हटलं आहे की, भारताने रशियन तेलाची सतत खरेदी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून याआधी अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावला होता. त्यामुळे आता अमेरिकेचा एकूण कर 50 % झाला आहे. भारतासाठी हो मोठी चिंतेची बाब आहे. ट्रम्प यांच्या या दणक्यामुळे भारतातील कृषी क्षेत्राला आणि जनेरिक औषध क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. आता ऑर्गेनिक केमिकल्सवर ५४% पर्यंत, कार्पेटवर ५२.९%, विणलेल्या कपड्यांवर ६३.९%, दागिने आणि हिऱ्यांवर ५२.१% आणि यंत्रसामग्रीवर ५१.३% शुल्क आकारलं जाईल.
कृषी क्षेत्रातील व्यापाराला सर्वाधिक फटका – Trump Tariff On India
आपला भारत हा देश कृषिप्रधान देश आहे. भारतातून अमेरिकेला प्रामुख्याने साखर, प्रक्रिया केलेलं खाद्य, तूप, बटर, दूध पावडर तांदूळ, कोळंबी, मध, वनस्पती अर्क, एरंडेल तेल आणि काळी मिरी या वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात होते. कृषी क्षेत्रातील वस्तू पुरवठा करणारा अमेरिकेचा मोठा निर्यातदार म्हणून भारत ओळखला जातो. त्यामुळे भारताच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा होत आला आहे.पण आता अमेरिकेने टॅरिफ लावल्याने (Trump Tariff On India) भारताला याचा जबर फटका बसणार आहे. याशिवाय, भारत हा अमेरिकेत 2.58 अब्ज डॉलर किमतीचं समुद्री खाद्य पाठवतो. टॅरिफमुळे त्याची निर्यात कमी झाली तर भारतात या गोष्टी स्वस्त दरात उपलब्ध होतील. त्यामुळे या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांचं आर्थिक उत्पन्न कमी होईल. मोठ्या प्रमाणात रोजगारावर परिणाम या निर्णयाने होणार आहे.
कोळंबीच्याही किमतीवर परिणाम होणार–
भारत जगातला आठवा मोठा कृषी उत्पादनं निर्यात करणारा देश आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिवच्या म्हणण्यानुसार भारत अमेरिकेतून आलेल्या कृषी उत्पादनांवर सरकारी 37.7 टक्के टॅरिफ लावतो.
कापड उधोग अडचणीत येणार–
भारतातून अमेरिकत मोठ्या प्रमाणत कापडांची निर्यात होते. भारत हा कापडाच्या बाबतीत अमेरिकेचा तिसरा मोठा निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो. अमेरिकेत दरवर्षी 4.93 अब्ज डॉलर्स किमतीचे कपडे आयात केले जातात. त्यामुळे या व्यापारालाही टॅरिफचा तडाखा (Trump Tariff On India) बसणार आहे.देशात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादित केला जातो.जर भारतातील कापड उधोगावर संकट आल तर त्याचा थेट परिणाम हा देशातील शेतकऱ्यावर होईल. कापसाच्या बाजारातील भाव पडतील अशी भीती या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
टॅरिफचे अमेरिकेवर काय परिणाम होणार?
टॅरिफमुळे अमेरिकेचा मोठा फायदा होत असल्याचा बोलले जात आहे. अमेरिकेच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल आणि स्थानिकांच्या नोकऱ्या वाचतील. तसेच, कर महसूल आणि आर्थिक वाढही होईल असे बोलले जात आहे. टॅरिफमुळे विदेशी कंपन्या अमेरिकेमध्ये उत्पादन सुरू करतील आणि त्यामुळे अमेरिकन सरकारचं उत्पन्न वाढेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी असे धोरण का राबवत आहेत?
डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या आर्थिक राष्ट्रवाद म्हणजेच अमेरिका फर्स्ट धोरणाचा भाग असून, यामुळं अमेरिकेत देशांतर्गत उद्योगाला फायदा मिळू शकतो. मात्र, हा जागतिक व्यापार आणि पर्यावरण संतुलनासाठी धोक्याचं संकेत ठरु शकतात.










