Wednesday, December 10, 2025
Home Blog Page 28

Mumbai Local Mega Block : वाशी- पनवेल लोकल ‘या’ तारखेपर्यंत बंद!! रेल्वेचा मोठा निर्णय

Mumbai Local Mega Block

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Mega Block । मुंबईकरांनो, हार्बर रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून हार्बर रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक वाशी स्थानकात घेण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे कामामुळं ब्लॉक घेण्यात आला असल्याचे रेल्वे विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार आहे.

बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन रात्रीसाठी रात्री १०.४५ ते पहाटे ३.४५ पर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकनिमित्त अनेक लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या कालावधीत वाशी ते पनवेलदरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच या ब्लॉकदरम्यान काही लोकल सेवा ठरावीक स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. बेलापूरहून रात्री 8.54 वाजता सुटणारी बेलापूर-सीएसएमटी लोकल वाशीपर्यंतच धावेल, तर रात्री 9.16ची बेलापूर-सीएसएमटी लोकल वडाळा रोडपर्यंतच धावणार आहे. वांद्रे-सीएसएमटी लोकल रात्री 10 वाजता सुरू होऊन वडाळा रोडवरच थांबवण्यात येणार आहे. पनवेलहून रात्री 10.55 आणि 11.32 वाजता सुटणाऱ्या पनवेल- वाशी लोकल सेवा नेरूळपर्यंतच धावतील.

हार्बर रेल्वे ब्लॉकमुळे कोणत्या लोकल सेवामध्ये बदल होणार- Mumbai Local Mega Block

  • वाशी ते पनवेल: या दरम्यान सर्व लोकल सेवा पूर्णपणे बंद राहील.
  • बेलापूर-सीएसएमटी: रात्री 8:54 वाजता सुटणारी लोकल वाशीपर्यंतच धावेल. नंतरची रात्री 9:16 वाजता सुटणारी लोकल वडाळा रोडपर्यंत धावेल.
  • वांद्रे-सीएसएमटी: रात्री 10:00 वाजता सुटणारी लोकल वडाळा रोडवर थांबवली जाईल.
  • पनवेल-वाशी: रात्री 10:50 आणि 11:32 वाजता सुटणाऱ्या लोकल नेरूळपर्यंतच धावेल. .
  • वाशीहून सुटणाऱ्या अप लोकल रेल्वे हि : 5 आणि 6 ऑगस्ट रोजी पहाटे 4:03, 4:15, 4:25, 4:37, 4:50 आणि 5:04 वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील.
  • 7 आणि 8 ऑगस्ट रोजी फक्त पहाटे 4:03 आणि 4:25 वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द होईल.
  • सीएसएमटीहून वाशीकडे जाणाऱ्या डाउन लोकल रेल्वे हि रात्री 9:50, 10:14 आणि 10:30 वाजता सुटणाऱ्या लोकल सर्व चार रात्री ह्या रद्द केल्या आहेत.

प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊनच घराबाहेर पडावं आणि प्रवास करावा… शक्यतो मेगाब्लॉकच्या काळात प्रवास करणे टाळावे… कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Repo Rate RBI : रेपो रेट बाबत RBI चा मोठा निर्णय!! तुमचा EMI वाढणार की कमी होणार?

Repo Rate RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Repo Rate RBI । रेपो रेट बाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. झर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीने रेपो रेट मध्ये कोणताही बदल केलेला नाही. आधीप्रमाणेच तो ५.५० टक्के इतका असणार आहे. त्यामुळे तुमच्या EMI वर कोणताही परिणाम होणार आहे. सध्या जो EMI तुम्ही भरत आहात तो तसाच कायम असणार आहे. यापूर्वी आरबीआयने सलग ३ वेळा रेपो दर कमी केला होता, मात्र यावेळी मात्र रेपो रेट मध्ये कोणतीही कपात न करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.

गृहकर्ज आणि वाहन कर्जधारकांच्यादृष्टीने रेपो रेट (Repo Rate RBI ) महत्वाचा असतो. त्यामुळे अनेकांचं लक्ष्य या रेपो रेट कडे असते. आरबीआयने यापूर्वी फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये रेपो रेट मध्ये कपात केली होती. जून महिन्यात तर तब्बल रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५० टक्के करण्यात आला होता. आताही रेपो रेट आणखी कमी होईल असा अंदाजज बांधला जात होता. मात्र आरबीआयने रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. अलीकडच्या काळातील महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले.

जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 टक्के- Repo Rate RBI

संजय मल्होत्रा यांनी म्हंटल कि, ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) इन्फ्लेशन (किरकोळ महागाई) २०२६ च्या आर्थिक वर्षात ३.१% इतकी राहील तर किरकोळ महागाई आर्थिक वर्ष २७ साठी ४.९% असा अंदाज आहे. तसेच आर्थिक वर्ष 2026 मध्ये जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 टक्के ठेवण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीसाठी तो 6.5 टक्के ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या तिमाहीसाठी तो 6.7 टक्के, तिसऱ्या तिमाहीसाठी 6.6 टक्के आणि चौथ्या तिमाहीसाठी 6.3 टक्के ठेवण्यात आला आहे.

Bachhu Kadu Meet Raj Thackeray : बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट!! टाकला मोठा प्रस्ताव

Bachhu Kadu Meet Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bachhu Kadu Meet Raj Thackeray । प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन बच्चू कडू यांनी हि भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरेंना यवतमाळमध्ये होणाऱ्या यात्रेला येण्याचे आवाहन केले. तसेच आम्ही अनेकदा मुंबई बंद झाल्याचे बघितलं, परंतु एकदा शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद व्हावी असं बच्चू कडू यांनी म्हंटल. या भेटीवेळी बाळा नांदगावकर यांच्यासह इतर नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे सोबत आली तर नक्कीच बळ मिळेल- Bachhu Kadu Meet Raj Thackeray

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर (Bachhu Kadu Meet Raj Thackeray) बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. त्यांनी म्हंटल कि, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच आज राज ठाकरेंची भेट घेतली. मराठवाड्यात जी आमची शेतकऱ्यांसाठी यात्रा निघणार आहे त्या यात्रेला राज ठाकरेंनी यावं आणि शेतकरी म्हणून संभोधित करावं. तसेच मुंबई अनेकदा आम्ही बंद होताना बघितलं, आता शेतकऱ्यांसाठी ती एक दिवस बंद व्हायला पाहिजे. किमान अर्धा तास, एक तास मुंबई शेतकऱ्यांच्या पाठीशी अभीर राहावी असं बच्चू कडू यांनी म्हंटल. शेतकरी हा कोणत्या एका पक्षाचा विषय नाही.. कोणत्याही एका जाती-धर्माचा नाही… त्यामुळे मनसे आमच्या सोबत आली तर नक्कीच शेतकऱ्याला बळ मिळेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, सरकार जे शेतकऱ्यांची टिंगल करत आहे ते काय योग्य नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात की दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करु. त्यामुळे आता दुष्काळ पडण्याची वाटच पाहिली जात आहे का, असा प्रश्न आता पडला आहे. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला भाव दिला जात नाही, भाव भेटत नसल्याने शेतकरी मरत आहे हे दुष्काळापेक्षा भयंकर असल्याचे बच्चू कडू म्हणाले

Municipal Elections Date : महापालिका निवडणुका कधी होणार? आयुक्तांनी दिली मोठी बातमी

Municipal Elections Date

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Municipal Elections Date । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत मागच्या काही दिवसापासून चर्चा सुरु आहेत. जवळपास सर्वच महापालिकेत मागच्या २०३ वर्षांपासून प्रशासक असल्याने अनेक कामे मार्गी लावण्यात अडथळे येत आहेत. अशावेळी सर्वच राजकीय पक्ष निवडणूका कधी जाहीर होणार याकडे डोळे लावून बसले होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत.

आज राज्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आढावा बैठक पार पडली. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीविषयी माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मनपा, जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुका टप्पाटप्प्याने होणार आहेत असं दिनेश वाघमारे यांनी म्हंटल. कारण सर्व निवडणुका एकत्रित करण्यासाठी तेवढं मनुष्यबळ राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. पण तरीही पहिली कोणती निवडणूक घेतली जाईल ते अद्याप निश्चित नाही, अशी महिती दिनेश वाघमारे यांनी दिली.

आरक्षण कस असेल- Municipal Elections Date

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत माहिती देताना दिनेश वाघमारे म्हणाले की, SC-ST आरक्षण निश्चित असते, परंतु OBC आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार आहे ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमचे काम थोडे सोपे झाले आहे असं त्यांनी म्हंटल. तसेच या निवडणुकांमध्ये VV-PAT यंत्रे वापरण्यात येणार नाहीत, कारण एकापेक्षा जास्त प्रभाग पद्धत असते. त्यामुळे एका पेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतात. तसेच त्यांची मतमोजणी करायची असते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या निवडणुकीत होणार नाही असं वाघमारे यांनी स्पष्ट केलं .

Uttarkashi Cloudburst : उत्तरकाशीत ढगफुटी!! गंगेचं रौद्ररूप, घरे उध्वस्त; Video पाहून अंग कापेल

Uttarkashi Cloudburst

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Uttarkashi Cloudburst । उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाली. धाराली भागात ढगफुटीची घटना घडली. यामुळे खिरगंगा नदीला मोठा महापूर आला. या पुरात अनेक घरे वाहून गेली.. उध्वस्त झाली.. याबाबतचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. नदीने रौद्ररूप पाहून तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० ते १२ कामगार गाडले गेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

60 जण बेपत्ता असल्याचा दावा – Uttarkashi Cloudburst

धराली गावाला लागून असलेल्या नदीतून पाण्याचा प्रचंड लोंढा मातीच्या मलब्यासह गावात घुसला. बघता बघता सगळं वाहून गेलं .. अवघ्या २० ते ३० सेकंदात होत्याच नव्हतं झालं आणि लोकांची घरे अक्षरशः वाहून गेली… या महापुरात 60 जण बेपत्ता असल्याचा दावा करण्यात येत आहे तर 12 लोक मलब्या खाली गाडल्या गेल्याची भीती आहे. तरलोकांच्या किंचाळ्या आणि वेदना व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने या नैसर्गिक संकटाची पुष्टी केली आहे. तातडीने याठिकाणी मदत आणि पुनर्वसनची टीम दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. पुरामुळे धाराली बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले आहे. आजूबाजूला फक्त कचरा दिसत आहे. लोक आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. खीर गंगेच्या काठावर असलेले प्राचीन कल्प केदार मंदिरही ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे वृत्त आहे.

या महापुराच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, उत्तराखंडमधील धाराली भागात ढगफुटीची घटना (Uttarkashi Cloudburst) घडली आहे, जिथे पाण्याची पातळी वाढल्याने मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासन, भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांच्या पथके बचाव आणि मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहेत. आम्ही लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. बाधितांना सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Satya Pal Malik Passed Away : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

Satya Pal Malik Passed Away

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Satya Pal Malik Passed Away जम्मू कश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज ५ ऑगस्ट रोजी आरएमएल रुग्णालयात त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षांचे होते. जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना पुलवामा हल्ल्याबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या शंकेमुळे ते सर्वात जास्त चर्चेत आले होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

सत्यपाल मलिक यांच्या स्वतःच्या ट्वीटर हॅन्डल वरूनच त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली. माजी राज्यपाल चौधरी सत्यपाल सिंह मलिक यांचे निधन, असे ट्वीट आज दुपारी १.२२ च्या दरम्यान सत्यपाल मलिक यांच्या अकाउंट वरून करण्यात आले. यानंतर संपूर्ण देशात मलिक यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मूत्रमार्गाच्या गंभीर संसर्गामुळे मे महिन्यातच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तरीही मृत्यूशी झुंज देत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. Satya Pal Malik Passed Away

कोण होते सत्यपाल मलिक – Satya Pal Malik Passed Away

सत्यपाल मलिक यांचा जन्म २४ जुलै १९४६ रोजी झाला. त्यांचा जन्म एका जाट कुटुंबात झाला. त्यांनी मेरठ कॉलेजमधून विज्ञान शाखेत पदवी आणि एलएलबी पदवी प्राप्त केली. त्यांनी १९६८-६९ मध्ये मेरठ कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्द सुरू केली. ते १९७४-७७ पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते आणि १९८० ते १९८९ पर्यंत राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. १९८९ ते १९९१ पर्यंत ते जनता दलाचे सदस्य म्हणून अलिगड येथून नवव्या लोकसभेचे खासदार होते.

काय होती शेवटची पोस्ट ?

यापूर्वी ७ जून रोजी त्यांनी आपल्या प्रकृती विषयी माहिती देताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. त्यांनी त्यावेळी ट्विट करत म्हंटल होते, नमस्कार मित्रांनो, मी गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल आहे आणि मला किडनीचा त्रास आहे. (Satya Pal Malik Passed Away) मी काल सकाळपासून ठीक होतो पण आज पुन्हा मला आयसीयूमध्ये हलवावे लागले. माझी प्रकृती खूप गंभीर होत चालली आहे. मी जगलो किंवा नाही जगलो तरी माझ्या देशवासियांना सत्य सांगू इच्छितो, मी राज्यपालपदावर असताना मला १५०-१५० कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती, पण मी माझे राजकीय गुरू, शेतकरी मसीहा दिवंगत चौधरी चरण सिंह जी यांच्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहिलो आणि ते माझा विश्वास कधीही डळमळीत करू शकले नाहीत.

मी राज्यपाल असताना शेतकरी चळवळही सुरू होती, मी कोणत्याही राजकीय लोभाशिवाय पदावर असताना शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. मग महिला कुस्तीगीरांच्या चळवळीत, मी जंतर-मंतरपासून इंडिया गेटपर्यंतच्या प्रत्येक लढाईत त्यांच्यासोबत उभा राहिलो. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सैनिकांचा मुद्दा मी उपस्थित केला, ज्याची आजपर्यंत या सरकारने चौकशी केलेली नाही. सरकार सीबीआयला धमकी देऊन खोट्या आरोपपत्रात अडकवण्यासाठी निमित्त शोधत आहे. ज्या निविदामध्ये ते मला अडकवू इच्छितात त्या मी स्वतः रद्द केल्या होत्या. मी स्वतः पंतप्रधानांना सांगितले होते की या प्रकरणात भ्रष्टाचार आहे आणि त्यांना सांगितल्यानंतर मी स्वतः ते निविदा रद्द केले. माझ्या बदलीनंतर, हे निविदा दुसऱ्याच्या स्वाक्षरीने करण्यात आले. मी सरकार आणि सरकारी संस्थांना सांगू इच्छितो की मी शेतकरी समुदायाचा आहे, मी घाबरणार नाही आणि झुकणार नाही.सरकारने माझी बदनामी करण्यासाठी सर्व शक्ती वापरली आहे. शेवटी, मी सरकार आणि सरकारी संस्थांना विनंती करतो की त्यांनी माझ्या प्रिय देशातील जनतेला तपासादरम्यान माझ्यात काय आढळले याबद्दल सत्य निश्चितपणे सांगावे.

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीसंदर्भात मोठा निर्णय; फडणवीस कोल्हापूरकरांना खुश करणार?

Mahadevi Elephant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mahadevi Elephant। मागच्या काही दिवसापासून कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीची जोरदार चर्चा सुरु आहे. महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवल्यानंतर कोल्हापूरकर भावुक झाल्याचे बघायला मिळालं.. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.. संतप्त कोल्हापूरकरांनी अंबानींचा निषेध म्हणून जिओ कार्ड वर बंदी घातली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात हत्तीणीवरून वातावरण तापले आहे. मात्र आता महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार ऍक्शन मोड मध्ये आलं आहे. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार आणि मठ पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकप्रतिनिधी व संबंधितांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरकराना लवकरच गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.

आज महादेव हत्तीणीसंदर्भात (Mahadevi Elephant) मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. महादेवी हत्तीणीला वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय सरकारचा नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय आहे आणि त्याचे पालन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. तरीही जनभावनेचा आदर करत आता आपण महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) परत आणण्यासंदर्भात मध्यस्थी करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या बैठकीला अजित पवार, चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, हसन मुश्रीफ, गणेश नाईक, धैर्यशील माने, गिरीश महाजन, प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, सदाभाऊ खोतआणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आमची हत्तीण परत नांदणी मठात येईल – Mahadevi Elephant

34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी तिच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल, आणि याबाबत सुप्रीम कोर्टात माहिती दिली जाईल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्र्वस्त्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत असेल म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत आणि सरकारची बाजू मांडणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल. वनतारात जशी व्यवस्था आहे तशी सुविधा महाराष्ट्राचे वनखाते आणि शासन उभी करणार आहे. आमची हत्तीण परत नांदणी मठात येईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला

Pune Nagpur Vande Bharat Express : पुणे- नागपूर वंदे भारत ट्रेन!! याच महिन्यात धावण्याची शक्यता

Pune Nagpur Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nagpur Vande Bharat Express । मागच्या काही महिन्यात महाराष्ट्रातून अनेक नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे लौंचिंग झालं आहे. वेगवेगळ्या मार्गावर या ट्रेन धावत असल्याने लोकांचा प्रवास सोपा आणि आरामदायी झाला आहे. आता याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट मध्ये आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार असल्याचीच माहिती समोर येत आहे. हि वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन पुणे ते नागपूर (अजनी) दरम्यान धावेल.

पुणे आणि नागपूर हि दोन्ही शहरे महाराष्ट्रातील महत्वाची शहरे मानली जातात. पुणे हि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते तर नागपूर हि महाराष्ट्राची उपराजधानी आहे. दोन्ही शहरे हे इंडस्ट्रियल हब म्हणून गणले जातात. नागपूर मधून पुण्यात स्थायिक झालेल्या लोकांची संख्याही जास्त आहे. परंतु मर्यादित रेल्वेचं नेटवर्क, महागडी विमानसेवा आणि खर्चात पाडणाऱ्या ट्रॅव्हल्स यामुळे पुणे ते नागपूर वंदे भारत ट्रेन (Pune Nagpur Vande Bharat Express) सुरु व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत होती. अखेर रेल्वेकडून आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

सध्या नागपूर ते पुणे रेल्वे प्रवास करायचं म्हंटल तर काही मोजक्याच ट्रेन आहेत. त्यातही प्रवाशांचा १२- १३ तासांचा वेळ जातो. मात्र एकदा का पुण्याहून नागपूरला वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली तर हाच प्रवास १० तासांवर येणार आहे. म्हणजेच प्रवाशांचा २-३ तासांचा वेळ वाचणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नागपूर (अजनी), बेळगाव-बंगळूर आणि कटरा-अमृतसर या तीन नवीन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. ऑगस्ट महिनाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्‍घाटन होण्याची शक्यता आहे. Pune Nagpur Vande Bharat Express

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा – Pune Nagpur Vande Bharat Express

पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबा मिळेल. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल. गर्दीच्या प्रवासाच्या हंगामात किंवा उत्सवांच्या काळात अजनी-पुणे वंदे भारत ही परवडणारी वंदे भारत ट्रेन प्रवाशांसाठी गेम-चेंजर ठरू शकते.

Maharashtra Railway Projects : महाराष्ट्रात 89780 कोटींचे 38 रेल्वे प्रकल्प; रेल्वेमंत्र्यांची माहिती

Maharashtra Railway Projects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Railway Projects । महाराष्ट्रात सध्या रस्त्याची आणि रेल्वेची कामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. मागच्या काही वर्षात रेल्वे विभागाचा खास करून मोठा कायापालट झाला आहे. अनेक मार्गावर रेल्वेसेवा सुरु झाली आहे. नवनवीन शहरे रेल्वेने जोडण्यात आली आहेत. महाराष्ट्रतील रेल्वे हि, मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या चार रेल्वे विभागांच्या अखत्यारीत येते. या विभागांसाठी 2025–26 आर्थिक वर्षासाठी 3,751 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी आतापर्यंत 813 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.

१ एप्रिल २०२५ पर्यंत महाराष्ट्रात पूर्णपणे/अंशतः ८९,७८० कोटी रुपये खर्चाचे एकूण ५,०९८ किमी लांबीचे ३८ प्रकल्प (११ नवीन लाईन्स, ०२ गेज रूपांतरण आणि २५ दुहेरीकरण) मंजूर करण्यात आले आहेत, (Maharashtra Railway Projects) त्यापैकी २,३६० किमी लांबीचे काम सुरू झाले आहे आणि मार्च २०२५ पर्यंत ३९,४०७ कोटी रुपये खर्च झाला आहे,” असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. २००९ ते २०१४ दरम्यान, दरवर्षी सरासरी फक्त ५८.४ किमी नवीन रेल्वे ट्रॅक सुरू करण्यात आले होते मात्र अलीकडच्या काळात रेल्वे कामाची गती लक्षणीयरीत्या वाढली असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

मुंबई शहरातील रेल्वे प्रकल्प – Maharashtra Railway Projects

मुंबई उपनगरीय क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी, 8,087 कोटी रुपये खर्चाचा मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी )-II, 10,947 कोटी रुपये खर्चाचा एमयूटीपी -III आणि 33,690 कोटी रुपये खर्चाचा एमयूटीपी -IIIA मंजूर करण्यात आला असून, या प्रकल्पांमध्ये मुंबई उपनगरीय क्षेत्रातील कामांचा समावेश आहे.

मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावी मार्गिका (30 किमी) – 919 कोटी रुपये
गोरेगाव-बोरिवली हार्बर मार्गाचा विस्तार (7 किमी) – 826 कोटी रुपये
विरार-डहाणू रोड तिसरी आणि चौथी मार्गिका (64 किमी) – 3587 कोटी रुपये
सीएसटीएम-कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका (17.5 किमी) – 891 कोटी रुपये
पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर (29.6 किमी) – 2782 कोटी रुपये
ऐरोली-कळवा (उन्नत) उपनगरीय कॉरिडॉर लिंक (3.3 किमी) – 476 कोटी रुपये
बोरिवली-विरार पाचवी आणि सहावी मार्गिका (26 किमी) – 2184 कोटी रुपये
कल्याण-आसनगाव दरम्यान चौथी मार्गिका (32 किमी) – 1759 कोटी रुपये
कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका (14.05 किमी) – 1510 कोटी रुपये
कल्याण यार्ड-मेन लाइन आणि उपनगरीय मार्गीकेचे विलगीकरण – 866 कोटी रुपये
नायगाव ते जुचंद्र दरम्यान (दुहेरी मार्ग) वसई बायपास लाइन (5.73 किमी) – 176 कोटी रुपये

महाराष्ट्रातील पूर्ण झालेले किवा अंतिम टप्प्यात असणाऱ्या प्रकल्पाची यादी

जबलपूर-गोंदिया गेज रूपांतरण (300 किमी) – 2005 कोटी रुपये
छिंदवाडा-नागपूर गेज रूपांतरण (150 किमी) – 1512 कोटी रुपये
पनवेल-पेण दुहेरीकरण (35 किमी) – 263 कोटी रुपये
पनवेल-रोहा दुहेरीकरण (75 किमी) – 31 कोटी रुपये
पेण-रोहा दुहेरीकरण (40 किमी) – 330 कोटी रुपये
उधना-जळगाव दुहेरीकरण (307 किमी) – 2448 कोटी रुपये
मुदखेड-परभणी दुहेरीकरण (81 किमी) – 673 कोटी रुपये
भुसावळ – जळगाव तिसरी मार्गिका (24 किमी) – 325 कोटी रुपये
जळगाव-भुसावळ चौथी मार्गिका (24 किमी) – 261 कोटी रुपये
दौंड-गुलबर्गा दुहेरीकरण (225 किमी) – 3182 कोटी रुपये

महाराष्ट्रात पूर्णतः किवा अंशतः येणारे काही मोठे प्रकल्प पुढील प्रमाणे

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन मार्गिका (261 किमी.) – 4,957 कोटी रुपये
बारामती-लोणंद नवीन मार्गिका (64 किमी.) – 1,844 कोटी रुपये
वर्धा-नांदेड नवीन मार्गिका (284 किमी.) – 3,445 कोटी रुपये
धुळे (बोरविहीर)-नरडाणा नवीन मार्गिका (51 किमी.) – 1,171 कोटी रुपये
मनमाड-इंदूर नवीन मार्गिका (309 किमी.) – 16,321 कोटी रुपये
वडसा-गडचिरोली नवीन मार्गिका (52 किमी.) – 1,886 कोटी रुपये
जालना-जळगाव नवीन मार्गिका (174 किमी.) – 5,804 कोटी रुपये
पुणे-मिरज-लोंडा दुहेरीकरण (466 किमी.) – 6,463 कोटी रुपये
दौंड मनमाड दुहेरीकरण (236 किमी.) – 30,376 कोटी रुपये
मुदखेड – मेडचाळ आणि महबूबनगर – ढोणे विभाग दुहेरीकरण (417 किमी.) – 4,686 कोटी रुपये
होटगी-कुडगी-गदग दुहेरीकरण (284 किमी.) – 2,459 कोटी रुपये
कल्याण-कसारा – तिसरी मार्गिका (68 किमी.) – 1,433 कोटी रुपये
वर्धा-नागपूर तिसरी मार्गिका (76 किमी.) – 698 कोटी रुपये
वर्धा-बल्लारशाह तिसरी मार्गिका (132 किमी.) – 1,385 कोटी रुपये
इटारसी-नागपूर तिसरी मार्गिका (280 किमी.) – 2,450 कोटी रुपये
मनमाड जळगाव तिसरी मार्गिका (160 किमी.) – 1,677 कोटी रुपये
काझीपेट-बल्लारशाह – तिसरी मार्गिका (202 किमी.) – 3,183 कोटी रुपये
राजनांदगाव-नागपूर तिसरी मार्गिका (228 किमी.) – 3,545 कोटी रुपये
वर्धा-नागपूर चौथी मार्गिका (79 किमी.) – 1,137 कोटी रुपये
जळगाव-मनमाड चौथी मार्गिका (160 किमी.)

मागील तीन आर्थिक वर्षांपासून , महाराष्ट्रातील पूर्णतः किंवा अंशतः एकूण 7979 किमी लांबीच्या (26 नवीन मार्ग, 2 गेज परिवर्तन आणि 66 दुहेरीकरण) प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याअंतर्गत प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली (Maharashtra Railway Projects) आहे. यामध्ये मराठवाडा विभागातील प्रकल्पांचाही समावेश आहे. काही महत्त्वाची प्रकल्पाची नावे

उस्मानाबाद-बीड-छत्रपती संभाजीनगर नवीन मार्ग – 240 किलोमीटर
छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव नवीन मार्ग – 93 किलोमीटर
बोधन-लातूर नवीन मार्ग – 135 किलोमीटर
कलबुर्गी-लातूर नवीन मार्ग – 139 किलोमीटर
लातूर-नांदेड नवीन मार्ग – 104 किलोमीटर
जालना-खामगाव नवीन मार्ग – 155 किलोमीटर
छत्रपती संभाजीनगर-परभणी दुहेरीकरण – 177 किलोमीटर

Maharashtra Expressways : महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यांतून जाणार नवीन एक्सप्रेसवे

Maharashtra Expressways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Expressways । मागील काही वर्षांपासून आपल्या भारतात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून अनेक रस्त्यांची आणि महामार्गाची निर्मिती झाली आहे. अगदी महाराष्ट्राबाबत सांगायचं झाल्यास, मुंबई ते नागपूर असा समृद्धी एक्सप्रेस वे तयार झाला आहे. उत्तर भारताला मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई- दिल्ली एक्सप्रेस वेचे कामही प्रगतीपथावर आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यातच आता आणखी एक नवीन प्रकल्प समोर येत आहे ज्याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे असं या प्रकल्पाचे नाव असून हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा महामार्ग म्हणून ओळखला जाईल. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना जोडणारा हा 1,271 किलोमीटर लांबीचा महामार्ग महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमधून जाणार आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश ? Maharashtra Expressways

सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील नाशिक,अहमदनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधून जाणार आहे. या ५ जिल्ह्यातील तब्बल ३७१ गावांमधून हा नवा एक्सप्रेसवे तयार होत आहे. यामुळे या जिल्ह्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. तसेच या भागातील दळणवळण, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग (Maharashtra Expressways) पूर्ण झाल्यास या गावांना थेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडले जाईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.

सुरत ते चेन्नई एक्सप्रेसवेचा मुख्य फायदा-

सुरत ते चेन्नई एक्सप्रेसवेची लांबी 1,271 किलोमीटर असून, रुंद १०० मीटर आहे. महामार्ग सहा पदरी (six-lane) असून, भविष्यात तो आठ पदरी करण्याचा विचार आहे. या एक्सप्रेसवे मुळे सुरत आणि चेन्नई आर्थिक सेंटर असलेली शहरे जोडली जातील. सुरतला कापडाची मोठी बाजारपेठ आहेत तर चेन्नईला माहिती तंत्रज्ञान उद्योग आहे. त्यामुळे या एक्सप्रेसवे मुळे उद्योग आणि रोजगाराच्या मोठ्या संधी तयार होतील.सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वेच्या (Maharashtra Expressways) बांधकामादरम्यान आणि त्यानंतरही अनेक नवीन रोजगार उपलब्ध होतील, ज्यामुळे स्थानिक तरुणांना काम मिळेल. अनेक नव्या उद्योगांना चालना मिळणार असून,स्थानिक लोकांचे जीवनमान नक्कीच सुधारू शकते.