Thursday, December 11, 2025
Home Blog Page 29

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीसंदर्भात मोठा निर्णय; फडणवीस कोल्हापूरकरांना खुश करणार?

Mahadevi Elephant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mahadevi Elephant। मागच्या काही दिवसापासून कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीची जोरदार चर्चा सुरु आहे. महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवल्यानंतर कोल्हापूरकर भावुक झाल्याचे बघायला मिळालं.. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.. संतप्त कोल्हापूरकरांनी अंबानींचा निषेध म्हणून जिओ कार्ड वर बंदी घातली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात हत्तीणीवरून वातावरण तापले आहे. मात्र आता महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार ऍक्शन मोड मध्ये आलं आहे. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार आणि मठ पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकप्रतिनिधी व संबंधितांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरकराना लवकरच गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.

आज महादेव हत्तीणीसंदर्भात (Mahadevi Elephant) मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. महादेवी हत्तीणीला वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय सरकारचा नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय आहे आणि त्याचे पालन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. तरीही जनभावनेचा आदर करत आता आपण महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) परत आणण्यासंदर्भात मध्यस्थी करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या बैठकीला अजित पवार, चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, हसन मुश्रीफ, गणेश नाईक, धैर्यशील माने, गिरीश महाजन, प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, सदाभाऊ खोतआणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आमची हत्तीण परत नांदणी मठात येईल – Mahadevi Elephant

34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी तिच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल, आणि याबाबत सुप्रीम कोर्टात माहिती दिली जाईल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्र्वस्त्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत असेल म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत आणि सरकारची बाजू मांडणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल. वनतारात जशी व्यवस्था आहे तशी सुविधा महाराष्ट्राचे वनखाते आणि शासन उभी करणार आहे. आमची हत्तीण परत नांदणी मठात येईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला

Pune Nagpur Vande Bharat Express : पुणे- नागपूर वंदे भारत ट्रेन!! याच महिन्यात धावण्याची शक्यता

Pune Nagpur Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nagpur Vande Bharat Express । मागच्या काही महिन्यात महाराष्ट्रातून अनेक नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे लौंचिंग झालं आहे. वेगवेगळ्या मार्गावर या ट्रेन धावत असल्याने लोकांचा प्रवास सोपा आणि आरामदायी झाला आहे. आता याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट मध्ये आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार असल्याचीच माहिती समोर येत आहे. हि वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन पुणे ते नागपूर (अजनी) दरम्यान धावेल.

पुणे आणि नागपूर हि दोन्ही शहरे महाराष्ट्रातील महत्वाची शहरे मानली जातात. पुणे हि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते तर नागपूर हि महाराष्ट्राची उपराजधानी आहे. दोन्ही शहरे हे इंडस्ट्रियल हब म्हणून गणले जातात. नागपूर मधून पुण्यात स्थायिक झालेल्या लोकांची संख्याही जास्त आहे. परंतु मर्यादित रेल्वेचं नेटवर्क, महागडी विमानसेवा आणि खर्चात पाडणाऱ्या ट्रॅव्हल्स यामुळे पुणे ते नागपूर वंदे भारत ट्रेन (Pune Nagpur Vande Bharat Express) सुरु व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत होती. अखेर रेल्वेकडून आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

सध्या नागपूर ते पुणे रेल्वे प्रवास करायचं म्हंटल तर काही मोजक्याच ट्रेन आहेत. त्यातही प्रवाशांचा १२- १३ तासांचा वेळ जातो. मात्र एकदा का पुण्याहून नागपूरला वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली तर हाच प्रवास १० तासांवर येणार आहे. म्हणजेच प्रवाशांचा २-३ तासांचा वेळ वाचणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नागपूर (अजनी), बेळगाव-बंगळूर आणि कटरा-अमृतसर या तीन नवीन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. ऑगस्ट महिनाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्‍घाटन होण्याची शक्यता आहे. Pune Nagpur Vande Bharat Express

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा – Pune Nagpur Vande Bharat Express

पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबा मिळेल. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल. गर्दीच्या प्रवासाच्या हंगामात किंवा उत्सवांच्या काळात अजनी-पुणे वंदे भारत ही परवडणारी वंदे भारत ट्रेन प्रवाशांसाठी गेम-चेंजर ठरू शकते.

Maharashtra Railway Projects : महाराष्ट्रात 89780 कोटींचे 38 रेल्वे प्रकल्प; रेल्वेमंत्र्यांची माहिती

Maharashtra Railway Projects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Railway Projects । महाराष्ट्रात सध्या रस्त्याची आणि रेल्वेची कामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. मागच्या काही वर्षात रेल्वे विभागाचा खास करून मोठा कायापालट झाला आहे. अनेक मार्गावर रेल्वेसेवा सुरु झाली आहे. नवनवीन शहरे रेल्वेने जोडण्यात आली आहेत. महाराष्ट्रतील रेल्वे हि, मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या चार रेल्वे विभागांच्या अखत्यारीत येते. या विभागांसाठी 2025–26 आर्थिक वर्षासाठी 3,751 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी आतापर्यंत 813 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.

१ एप्रिल २०२५ पर्यंत महाराष्ट्रात पूर्णपणे/अंशतः ८९,७८० कोटी रुपये खर्चाचे एकूण ५,०९८ किमी लांबीचे ३८ प्रकल्प (११ नवीन लाईन्स, ०२ गेज रूपांतरण आणि २५ दुहेरीकरण) मंजूर करण्यात आले आहेत, (Maharashtra Railway Projects) त्यापैकी २,३६० किमी लांबीचे काम सुरू झाले आहे आणि मार्च २०२५ पर्यंत ३९,४०७ कोटी रुपये खर्च झाला आहे,” असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. २००९ ते २०१४ दरम्यान, दरवर्षी सरासरी फक्त ५८.४ किमी नवीन रेल्वे ट्रॅक सुरू करण्यात आले होते मात्र अलीकडच्या काळात रेल्वे कामाची गती लक्षणीयरीत्या वाढली असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

मुंबई शहरातील रेल्वे प्रकल्प – Maharashtra Railway Projects

मुंबई उपनगरीय क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी, 8,087 कोटी रुपये खर्चाचा मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी )-II, 10,947 कोटी रुपये खर्चाचा एमयूटीपी -III आणि 33,690 कोटी रुपये खर्चाचा एमयूटीपी -IIIA मंजूर करण्यात आला असून, या प्रकल्पांमध्ये मुंबई उपनगरीय क्षेत्रातील कामांचा समावेश आहे.

मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावी मार्गिका (30 किमी) – 919 कोटी रुपये
गोरेगाव-बोरिवली हार्बर मार्गाचा विस्तार (7 किमी) – 826 कोटी रुपये
विरार-डहाणू रोड तिसरी आणि चौथी मार्गिका (64 किमी) – 3587 कोटी रुपये
सीएसटीएम-कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका (17.5 किमी) – 891 कोटी रुपये
पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर (29.6 किमी) – 2782 कोटी रुपये
ऐरोली-कळवा (उन्नत) उपनगरीय कॉरिडॉर लिंक (3.3 किमी) – 476 कोटी रुपये
बोरिवली-विरार पाचवी आणि सहावी मार्गिका (26 किमी) – 2184 कोटी रुपये
कल्याण-आसनगाव दरम्यान चौथी मार्गिका (32 किमी) – 1759 कोटी रुपये
कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका (14.05 किमी) – 1510 कोटी रुपये
कल्याण यार्ड-मेन लाइन आणि उपनगरीय मार्गीकेचे विलगीकरण – 866 कोटी रुपये
नायगाव ते जुचंद्र दरम्यान (दुहेरी मार्ग) वसई बायपास लाइन (5.73 किमी) – 176 कोटी रुपये

महाराष्ट्रातील पूर्ण झालेले किवा अंतिम टप्प्यात असणाऱ्या प्रकल्पाची यादी

जबलपूर-गोंदिया गेज रूपांतरण (300 किमी) – 2005 कोटी रुपये
छिंदवाडा-नागपूर गेज रूपांतरण (150 किमी) – 1512 कोटी रुपये
पनवेल-पेण दुहेरीकरण (35 किमी) – 263 कोटी रुपये
पनवेल-रोहा दुहेरीकरण (75 किमी) – 31 कोटी रुपये
पेण-रोहा दुहेरीकरण (40 किमी) – 330 कोटी रुपये
उधना-जळगाव दुहेरीकरण (307 किमी) – 2448 कोटी रुपये
मुदखेड-परभणी दुहेरीकरण (81 किमी) – 673 कोटी रुपये
भुसावळ – जळगाव तिसरी मार्गिका (24 किमी) – 325 कोटी रुपये
जळगाव-भुसावळ चौथी मार्गिका (24 किमी) – 261 कोटी रुपये
दौंड-गुलबर्गा दुहेरीकरण (225 किमी) – 3182 कोटी रुपये

महाराष्ट्रात पूर्णतः किवा अंशतः येणारे काही मोठे प्रकल्प पुढील प्रमाणे

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन मार्गिका (261 किमी.) – 4,957 कोटी रुपये
बारामती-लोणंद नवीन मार्गिका (64 किमी.) – 1,844 कोटी रुपये
वर्धा-नांदेड नवीन मार्गिका (284 किमी.) – 3,445 कोटी रुपये
धुळे (बोरविहीर)-नरडाणा नवीन मार्गिका (51 किमी.) – 1,171 कोटी रुपये
मनमाड-इंदूर नवीन मार्गिका (309 किमी.) – 16,321 कोटी रुपये
वडसा-गडचिरोली नवीन मार्गिका (52 किमी.) – 1,886 कोटी रुपये
जालना-जळगाव नवीन मार्गिका (174 किमी.) – 5,804 कोटी रुपये
पुणे-मिरज-लोंडा दुहेरीकरण (466 किमी.) – 6,463 कोटी रुपये
दौंड मनमाड दुहेरीकरण (236 किमी.) – 30,376 कोटी रुपये
मुदखेड – मेडचाळ आणि महबूबनगर – ढोणे विभाग दुहेरीकरण (417 किमी.) – 4,686 कोटी रुपये
होटगी-कुडगी-गदग दुहेरीकरण (284 किमी.) – 2,459 कोटी रुपये
कल्याण-कसारा – तिसरी मार्गिका (68 किमी.) – 1,433 कोटी रुपये
वर्धा-नागपूर तिसरी मार्गिका (76 किमी.) – 698 कोटी रुपये
वर्धा-बल्लारशाह तिसरी मार्गिका (132 किमी.) – 1,385 कोटी रुपये
इटारसी-नागपूर तिसरी मार्गिका (280 किमी.) – 2,450 कोटी रुपये
मनमाड जळगाव तिसरी मार्गिका (160 किमी.) – 1,677 कोटी रुपये
काझीपेट-बल्लारशाह – तिसरी मार्गिका (202 किमी.) – 3,183 कोटी रुपये
राजनांदगाव-नागपूर तिसरी मार्गिका (228 किमी.) – 3,545 कोटी रुपये
वर्धा-नागपूर चौथी मार्गिका (79 किमी.) – 1,137 कोटी रुपये
जळगाव-मनमाड चौथी मार्गिका (160 किमी.)

मागील तीन आर्थिक वर्षांपासून , महाराष्ट्रातील पूर्णतः किंवा अंशतः एकूण 7979 किमी लांबीच्या (26 नवीन मार्ग, 2 गेज परिवर्तन आणि 66 दुहेरीकरण) प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याअंतर्गत प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली (Maharashtra Railway Projects) आहे. यामध्ये मराठवाडा विभागातील प्रकल्पांचाही समावेश आहे. काही महत्त्वाची प्रकल्पाची नावे

उस्मानाबाद-बीड-छत्रपती संभाजीनगर नवीन मार्ग – 240 किलोमीटर
छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव नवीन मार्ग – 93 किलोमीटर
बोधन-लातूर नवीन मार्ग – 135 किलोमीटर
कलबुर्गी-लातूर नवीन मार्ग – 139 किलोमीटर
लातूर-नांदेड नवीन मार्ग – 104 किलोमीटर
जालना-खामगाव नवीन मार्ग – 155 किलोमीटर
छत्रपती संभाजीनगर-परभणी दुहेरीकरण – 177 किलोमीटर

Maharashtra Expressways : महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यांतून जाणार नवीन एक्सप्रेसवे

Maharashtra Expressways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Expressways । मागील काही वर्षांपासून आपल्या भारतात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून अनेक रस्त्यांची आणि महामार्गाची निर्मिती झाली आहे. अगदी महाराष्ट्राबाबत सांगायचं झाल्यास, मुंबई ते नागपूर असा समृद्धी एक्सप्रेस वे तयार झाला आहे. उत्तर भारताला मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई- दिल्ली एक्सप्रेस वेचे कामही प्रगतीपथावर आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यातच आता आणखी एक नवीन प्रकल्प समोर येत आहे ज्याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे असं या प्रकल्पाचे नाव असून हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा महामार्ग म्हणून ओळखला जाईल. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना जोडणारा हा 1,271 किलोमीटर लांबीचा महामार्ग महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमधून जाणार आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश ? Maharashtra Expressways

सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील नाशिक,अहमदनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधून जाणार आहे. या ५ जिल्ह्यातील तब्बल ३७१ गावांमधून हा नवा एक्सप्रेसवे तयार होत आहे. यामुळे या जिल्ह्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. तसेच या भागातील दळणवळण, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग (Maharashtra Expressways) पूर्ण झाल्यास या गावांना थेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडले जाईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.

सुरत ते चेन्नई एक्सप्रेसवेचा मुख्य फायदा-

सुरत ते चेन्नई एक्सप्रेसवेची लांबी 1,271 किलोमीटर असून, रुंद १०० मीटर आहे. महामार्ग सहा पदरी (six-lane) असून, भविष्यात तो आठ पदरी करण्याचा विचार आहे. या एक्सप्रेसवे मुळे सुरत आणि चेन्नई आर्थिक सेंटर असलेली शहरे जोडली जातील. सुरतला कापडाची मोठी बाजारपेठ आहेत तर चेन्नईला माहिती तंत्रज्ञान उद्योग आहे. त्यामुळे या एक्सप्रेसवे मुळे उद्योग आणि रोजगाराच्या मोठ्या संधी तयार होतील.सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वेच्या (Maharashtra Expressways) बांधकामादरम्यान आणि त्यानंतरही अनेक नवीन रोजगार उपलब्ध होतील, ज्यामुळे स्थानिक तरुणांना काम मिळेल. अनेक नव्या उद्योगांना चालना मिळणार असून,स्थानिक लोकांचे जीवनमान नक्कीच सुधारू शकते.

Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता? यंदा भद्राचं संकट आहे का?

Raksha Bandhan 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Raksha Bandhan 2025 । रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या नात्यातील अतिशय महत्त्वाचा सण.. रक्षाबंधन हा शब्द दोन भागांनी बनलेला आहे – रक्षा आणि बंधन, ज्याचा अर्थ संरक्षणाचे बंधन आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात. यावेळी बहीण आपल्या भावासाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो यामुळे या सणाचे हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे. रक्षाबंधनाचा सण फक्त रेशमी धाग्यापुरता मर्यादित नसतो तर वचन, स्नेह आणि विश्वासाचा उत्सव मानला जातो.

यंदा रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी आहे? Raksha Bandhan 2025

पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरी केली जाते.यावर्षी पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 21 मिनिटांपर्यंत ही तिथी समाप्त होणार आहे. मात्र, उदय तिथीनुसार, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन (Raksha Bandhan 2025) साजरी करता येणार आहे…

यंदा भद्राचं सावट आहे का?

शास्त्रानुसार, भद्रा काळात रक्षाबंधन (Raksha Bandhan 2025) साजरा करणं शुभ मानलं जात नाही. त्यामुळे या काळात भावाला राखी बांधू नये. मात्र, या वर्षी श्रावण पौर्णिमेला, भद्रा सूर्योदयापूर्वी संपेल त्यामुळे यंदा रक्षाबंधन काळात भद्राचं सावट अजिबात नाही.

भद्राकाळात राखी का बांधू नये?

भद्रा (भद्राकाल) हा राक्षसी काळ मानला जातो. त्यात कोणतेही शुभ कार्य करणे योग्य मानले जात नाही. पौराणिक कथेनुसार , भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे. तसेच, शनीदेवाची बहीण आहे.त्यामुळे भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे. मान्यतेनुसार, भद्राचा जन्म गाढवाच्या चेहऱ्याने, लांब शेपटीने आणि तीन पायांनी झाला होता ज्यामुळे राक्षसांना मारले गेले. ज्योतिषशास्त्रानुसार, भद्राचा स्वभावही शनिसारखाच आहे. भद्राचा जन्म होताच, भद्रा यज्ञांमध्ये अडथळे निर्माण करू लागली आणि शुभ कार्यांमध्ये अडचणी निर्माण करू लागली आणि संपूर्ण जगाला दुःख देऊ लागली. तिचा स्वभाव पाहून सूर्यदेव तिच्या लग्नाची चिंता करू लागला आणि विचार करू लागला की तिचे लग्न कसे होईल? सर्वांनी सूर्यदेवाचा विवाह प्रस्ताव नाकारला. सूर्यदेवांनी ब्रह्माजींकडून योग्य सल्ला मागितला. तेव्हा ब्रह्माजींनी विशिष्टीला सांगितले की- ‘भद्रे! तुम्ही बाव, बलव, कौलव इत्यादी करणांच्या शेवटी राहावे आणि जर तुमच्या काळात कोणी गृहप्रवेश किंवा इतर कोणतेही शुभ कार्य केले तर तुम्ही त्यात अडथळे निर्माण करावेत. जे तुझा आदर करत नाहीत त्यांचे काम तुम्ही बिघडवावे.’ हा सल्ला दिल्यानंतर ब्रह्माजी आपल्या जगात गेले. तेव्हापासून भद्रा तिच्याच काळात फिरू लागली, सर्व प्राणी, देव, राक्षस आणि मानवांना त्रास देऊ लागली.

Sahyadri Tiger Reserve : सह्याद्रीत वाढतेय वाघांची संख्या!! SKT02 वाघीण ठरतेय वंशवाढीची जननी

Sahyadri Tiger Reserve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sahyadri Tiger Reserve। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प…. महाराष्ट्रातील चांदोली, कोयना अभयारण्यापासून ते दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत पसरलेला हा व्याघ्र प्रकल्प म्हणजे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र… याच सह्याद्रीच्या कुशीत वाघांचे अस्तित्व आहे… वन विभागाच्या मदतीने हा अधिवास अभ्यासण्याचे काम ‘वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’चे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी आणि त्यांचे सहकारी करत आहेत. मागच्या काही वर्षात या ठिकाणच्या वाघांची संख्या कमी होत असल्याचं बोललं जात असलं तरी आता सह्याद्रीत वाघांचा वंश वाढताना दिसतोय… आणि या वंशवाढीची जननी ठरत आहे ती म्हणजे SKT02 वाघीण…. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील SKT02 वाघिणीने दशकभरात तीनवेळा पिल्लांना दिला जन्म आहे. तिच्या पिल्लानीही नवीन बछड्याना जन्म दिल्याने सह्याद्रीतील वाघांची संख्या ११ ते १२ झाली आहे. तर एकूण व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या हि तब्बल ३२ वर पोहचली आहे. वन्यजीव संरक्षणाचं हे एक मोठं फलित म्हणावं लागेल.

SKT02 वाघीण हि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील (Sahyadri Tiger Reserve) अत्यंत महत्वाची अशी वाघीण ठरली. अंदाजे 15 वर्षाची असणारी ही वाघीण आजही जंगलात मनसोक्त फिरत असते. SK म्हणजे सह्याद्री-कोकण, T म्हणजे टायगर आणि 02 म्हणजे क्रमांक….गेल्या दशकभरात सह्याद्री-कोकण पट्ट्यातील वाघांच्या वंशवृद्धीचा पाया या वाघिणीने रचला. तिच्या पिल्लानीही मधल्या काळात नवनवीन बछड्याना जन्म दिल्याने SKT02 वाघीण आता आज्जी झाली आहे. SKT02 वाघिणीने २०१३ ते २०२५ या काळात ३ वेळा पिल्लांना जन्म दिल्याची नोंद आहे. SKT02 वाघिणीने २०१३, २०१५ आणि २०१७ अशा ३ वेळा बछड्याना जन्म दिला. तिच्या पिल्लांपैकी SKT04 मादीने नंतरच्या काळात ३ पिल्लाना जन्म दिला.

वाघांची संख्या कशी वाढली ? Sahyadri Tiger Reserve

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा तिलारी, राधानगरी, चांदोली, कोयना आणि कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या संचार मार्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. सह्याद्रीत वाघांची संख्या वाढण्यामागे वनविभागाने सुद्धा मोठे कष्ट घेतलं आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची संपूर्ण क्रियावाली हि भारतीय वन्यजीव संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जात आहे. हा भाग दुर्गम, डोंगराळ आणि घनदाट जंगल आहे. या भागात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो.. त्यामुळे गवत उगवण्याचे प्रमाण जास्त आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अनेक धबधबे, झरे, पाणलोट क्षेत्र आहेत. कोयना, शिवसागर जलाशय, वसंत सागर, चांदोली सारखी धरणे आहेत. अनेक प्रकारच्या प्रजातीच्या वनस्पती आहेत. त्यामुळे हरीण, काळवीट, गवा, रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांची संख्या जास्त आहे. साहजिकच वाघांना हवं असणार भक्ष्य सुद्धा त्यामुळे लागेचच सापडतात… जिथे भक्ष्य आहे तिथेच वाघ जातो आणि राहतो. त्यामुळे संपूर्ण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढताना दिसत आहे. सध्या याठिकाणी सुमारे 32 वाघ असून, त्यापैकी ११ ते १२ वाघ हे महाराष्ट्रात आहेत.

Man Will Become Immortal : 2030 नंतर माणूस मरणारच नाही; कोणत्या तंत्रज्ञानाने मनुष्य अमर होणार?

Man Will Become Immortal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Man Will Become Immortal। पृथ्वीवरील कोणताही मनुष्य हा कधी ना कधी मरणारच आहे. आज ना उद्या प्रत्येकाला हे जग सोडून जायचं आहेच… आयुष्याचा हा नियमच आहे असं म्हंटल जाते. मग तो गरीब असो वा श्रीमंत, मरण हे कोणालाही चुकलेलं नाही. परंतु आता लवकरच माणूस अमर होणार आहे. २०३० पासून माणूस मरणारच नाही…. वाचून तुम्हालाही खरं वाटलं नसेल. पण माजी गुगल अभियंता आणि प्रसिद्ध भविष्यवेत्ता रे कुर्झवेल यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. मनुष्याला मरण का येणार नाही? तो अमर कसा होऊ शकतो? यामागे कोणती तंत्रज्ञान आहे हे आज आपण जाणून घेऊयात.

तर मित्रानो, रे कुर्झवेल यांच्या दाव्यानुसार, 2030 पर्यंत नॅनोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स आणि रोबोटिक्सच्या साह्याने मानव अमर होऊ शकतो. त्यांच्या मते, नॅनोबॉट्स शरीरातील खराब पेशी दुरुस्त करून वृद्धत्व रोखतील. ज्यामुळे मनुष्य हा नेहमीच तरुण राहील आणि अमर (Man Will Become Immortal) होईल. खरं तर रे कुर्झवेल यांनी आतापर्यंत 147 भाकिते केली आहेत, त्यापैकी 86 टक्क्यांपेक्षा जास्त भाकितं हि खरी ठरली आहेत. त्यामुळे त्यांच्या या भविष्यवाणीखूपच कडेही गांभीर्याने बघितलं जात आहे.

दाव्याचा अधिकृत सोर्स काय आहे– Man Will Become Immortal

रे कुर्झवेल यांच्या The Singularity is Near या पुस्तकात पहिल्यांदा उलेख केला आहे कि येत्या काळात तंत्रज्ञान इतके विकसित होईल की मानव कधीही न मरणारी प्रजाती बनू शकेल. या पुस्तकात त्यांनी विशेषतः जेनेटिक्स (Genetics), नॅनोटेक्नॉलॉजी (Nanotechnology) आणि रोबोटिक्सचा (Robotics) उल्लेख केला आहे. ज्यांना ते अमरत्वाची गुरुकिल्ली मानतात. कुर्झवेल यांच्या मते, तांत्रिक विकासाचा वेग हा इतका वेगवान झाला आहे की लवकरच नॅनोबॉट्स, म्हणजेच सूक्ष्म रोबोट्स तयार करू शकू, जे मानवी शरीरात राहून काम करतील.

म्हणजेच काय तर ते शरीरातील खराब झालेल्या पेशी दुरुस्त करेल, वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावेल आणि रोगांशी लढेल, अगदी कर्करोगासारख्या गंभीर आजारांशीही लढतील. हे काम छोटे रोबोट शरीरात तरंगतील आणि सतत त्याची दुरुस्ती करत राहतील. त्यामुळे अशा प्रकारे आपलं शरीर म्हातारं होणार नाही आणि माणूस कायमचा जगू (Man Will Become Immortal) शकेल. असा दावा या तंत्रज्ञानाच्या जोरावर रे कुर्झवेल यांनी केला.

Shirdi To Tirupati Train : शिर्डी ते तिरुपती रेल्वेसेवा!! या स्थानकांवर थांबा मिळणार

Shirdi To Tirupati Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shirdi To Tirupati Train। शिर्डीचे साईबाबा आणि तिरुपतीचा बालाजी हि २ देवस्थाने देशातील सर्वात प्रसिद्ध देवस्थाने मानली जातात. दररोज हजारो भाविक या दोन्ही देवस्थानांना भेट देतात आणि आशीर्वाद घेतात. आता मात्र ही २ देवस्थानेच रेल्वेने एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी भारतीय रेल्वेने एक स्पेशल साप्ताहिक ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ०७६३७/०७६३८ तिरुपती (TPTY) – साईनगर शिर्डी (SNSI) – तिरुपती (TPTY) असं या नव्या रेल्वेचं नाव आहे. हि ट्रेन कोणत्या दिवशी धावणार? कोणकोणत्या स्थानकांवर तिचा थांबा असेल याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात… .

कसे असेल वेळापत्रक – Shirdi To Tirupati Train

ट्रेन क्रमांक ०७६३७ तिरुपती – साईनगर शिर्डी ही गाडी ३ ऑगस्ट २०२५ ते २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत दर रविवारी तिरुपतीहून पहाटे ४:०० वाजता सुटेल आणि एकूण ९ फेऱ्या करेल. ती सोमवारी सकाळी १०:४५ वाजता साईनगर शिर्डीला पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०७६३८ साईनगर शिर्डी – तिरुपती साईनगर शिर्डी येथून दर सोमवारी १९:३५ वाजता सुटेल, ४ ऑगस्ट २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत एकूण ०९ सहलींसाठी धावेल. बुधवारी (तिसऱ्या दिवशी) 01:30 वाजता तिरुपतीला पोहोचेल.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा –

शिर्डी ते तिरुपती ट्रेन (Shirdi To Tirupati Train) रेनिगुंटा जंक्शन, गुडूर जंक्शन, नेल्लोर, ओंगोले, चिराळा, तेनाली जंक्शन, गुंटूर जंक्शन, सत्तेनापल्ले, पिदुगुरल्ला, नाडीकुडे जंक्शन, मिर्यालागुडा, नलगोंडा, पागिडीपल्ली, सिकंदराबाद, लिंगमपल्ली, विकदराबाद, भविराबाद जंक्शन, बिकराबाद जंक्शन, उडीदराबाद, उडीराबाद, परळी वैजनाथ, गंगाखेर, परभणी जंक्शन, सेलू, जालना, औरंगाबाद, नगरसोल, अंकाई, मनमाड जंक्शन, आणि कोपरगाव या रेल्वे स्थानकांवर थांबेल. (Shirdi To Tirupati Train)

रेल्वे डब्बाची अशी असेल रचना

या रेल्वेगाडीची रचना 2 वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबे, 4 वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, 6 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी डबे, 1 द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन अशी असणार आहे. या विशेष रेल्वेगाडीच्या आरक्षणाची सुविधा 1 ऑगस्टपासून ऑनलाइन आणि बुकिंग तिकीट केंद्रावर तसंच, IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

Electric Scooter Under 60000 : 60 हजारांत इलेक्ट्रिक स्कुटर; Hero ची ग्राहकांना खास भेट

Electric Scooter Under 60000

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Electric Scooter Under 60000 । तुम्हीही जर स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किमतीत इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणार असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज आम्ही तुम्हला अशा एका इलेक्ट्रिक स्कुटरबाबत सांगणार आहोत जी तुम्ही अवघ्या 59,490 रुपयांत खरेदी करू शकता. होय, Vida VX2 असं या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव असून देशातील आघाडीची दुचाकी वाहन निर्माता कंपनी Hero ने ती तयार केली आहे. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि रेंज याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तर मित्रानो, सध्या इलेक्ट्रीक वाहनांना ग्राहकांकडून मिळणारी पसंती पाहता वाहन निर्माण कंपन्यांही आपल्या नवनवीन गाड्या बाजारात उतरवत आहेत. मात्र इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती जास्त असल्याने अनेकजण इच्छा असूनही ती खरेदी करू शकत नाहीत. म्हणूनच हिरोने खास योजना राबवत Vida VX2 स्कुटर लाँच केली आहे. या स्कूटरला नवीन सब्सक्रिप्शन मॉडेल, Battery-as-a-Service (BaaS) सोबत लाँच केलं आहे. Battery-as-a-Service (BaaS) मॉडेल एक अशी सिस्टीम आहे, ज्यामध्ये ग्राहक स्कूटरची बॅटरी खरेदी करण्याऐवजी भाड्याने घेऊ शकतात. हे मोबाईल डेटा किंवा गॅस सिलेंडर रिफिल करण्यासारखे आहे. या मॉडेलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यामुळे Vida VX2 स्कूटरची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. (Electric Scooter Under 60000)

Hero Vida VX2 चे वैशिठ्य.. Electric Scooter Under 60000

VX2 Go आणि VX2 Plus अशा २ व्हेरियंट मध्ये हि स्कुटर लाँच करण्यात आली आहे. Hero Vida VX2 चं संपूर्ण डिझाईन आणि त्याचे सर्व फिचर Vida Z संकल्पनेवर आधारित असून, ही स्कूटर पहिल्यांदा EICMA मध्ये सादर करण्यात आली होती. Vida V2 च्या तुलनेत कंपनीची VX2 कमी दरात उपलब्ध आहे. किमान खर्चात एखादी चांगली स्कूटर घेण्याचा बेत आखणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. मिनी TFT डिस्प्लेमुळं या स्कूटरला एक स्मार्ट टच मिळत आहे.

Vida VX2 Go मध्ये 2.2kWh ची बॅटरी बसवण्यात आली असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ती 92 किमी पर्यंत अंतर पार करू शकते, तर VX2 Plus मध्ये, कंपनीने 3.4 kWh क्षमतेचा मोठा बॅटरी पॅक दिला आहे. एकदा का हि बॅटरी पूर्णपणे चार्ज केली कि मग तुम्ही V १४२ किलोमीटर पर्यंत प्रवास आरामात करू शकाल. दोन्ही स्कूटरना रिमूव्हेबल बॅटरी दिल्या जात आहेत, ज्या बाहेर काढता येतात आणि घरगुती सॉकेटशी कनेक्ट करून चार्ज करता येतात. कंपनीचा दावा आहे कि या दोन्ही बॅटरी 60 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होऊ शकतात. या इलेक्ट्रिक स्कुटर ला लांब आणि आरामदायी सीट मिळतेय ज्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला कम्फर्ट फील मिळेल. २ लोक आरामात या सीटवर बसू शकतात.

किंमत किती?

Hero Vida VX2 Go च्या या नवीन स्कूटरची किंमत 99,490 रुपये (एक्स-शोरूम) आहे. मात्र हि स्कुटर बॅटरी-अ‍ॅज-ए-सर्व्हिस (BaaS) सबस्क्रिप्शन प्लॅन अंतर्गत लाँच करण्यात आल्याने या स्कूटरची किंमत फक्त 59,490 रुपये (Electric Scooter Under 60000) असेल. तर Hero Vida VX2 Plus ची किंमत १०९९९० रुपये असून BaaS अंतर्गत हि इलेक्ट्रिक स्कुटर 64,990 रुपयांत खरेदी करता येईल. BaaS पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतील. यामध्ये, तुम्हाला बॅटरी खरेदी करण्याची गरज नाही, तर तुम्ही ती भाड्याने घेऊ शकता आणि ही सेवा फक्त ९६ पैसे प्रति किलोमीटरपासून सुरू होईल. BaaS पॅकेजच्या इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, जर बॅटरी ७०% पेक्षा कमी काम करत असेल तर ती फ्री मध्ये बदलली सुद्धा जाईल.

Eastern Railway Recruitment 2025 : रेल्वे विभागात 3115 पदांची भरती; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

Eastern Railway Recruitment 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Eastern Railway Recruitment 2025। देशात सर्वाधिक रोजगार देणारी संस्था म्हणून भारतीय रेल्वेला ओळखले जाते. रेल्वेमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जाते. रेल्वेचं जाळं मोठं असल्याने ती अपेक्षितही आहे. नुकतंच पूर्व रेल्वेने ३११५ पदांची भरती जाहीर केली आहे. हि भरती अप्रेंटिस या पदासाठी होणार असून येत्या १४ ऑगस्टपासून यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. या भरती साठी पात्रता काय असेल? कोणत्या विभागात किती जागा भरल्या जातील? अर्ज शुल्क किती लागेल? आणि कोणकोणती कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे याबाबतची A To Z माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

एकूण पदांची संख्या – ३११५

कोणकोणती पदे भरली जाणार – या भरतीअंतर्गत फिटर, वेल्डर, सुतार, रंगारी, टर्नर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, मशिनिस्ट पूर्व रेल्वे, अशा विविध ट्रेडमध्ये भरती केली जाणार आहे.

विभागवार भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या –

1) हावडा विभाग ६५९
२) लिलुजा कार्यशाळा ६१२
३) सेल्डा विभाग ४४०
४) कांचरपारा कार्यशाळा १८७
५) मालदा विभाग १३८
६) आसनसोल विभाग ४१२
७) जमालपूर कार्यशाळा ६६७

शैक्षणिक पात्रता- Eastern Railway Recruitment 2025

रेल्वे अप्रेंटिस पदासाठी उमेदवार हा किमान ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण असला पाहिजे. तसेच NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून ITI पदवी उतीर्ण असला पाहिजे.

वयोमर्यादा

रेल्वे अप्रेंटिस या पदासाठी किमान १५ वर्षे तर कमाल २४ वर्षाचा उमेदवार पात्र ठरेल.

शुल्क:

पूर्व रेल्वेच्या अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवाराला सामाजिक आरक्षणानुषार शुल्क लावले आहे. (Eastern Railway Recruitment 2025)

ओपन आणि ओबीसी: १०० रुपये

अनुसूचित जाती, जमाती, अपंगत्व, महिला : मोफत

उमेदवाराची निवड प्रक्रिया:

गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड
दहावीची गुणपत्रिका
१२वीची गुणपत्रिका
पदवी गुणपत्रिका
पदानुसार पदवी/डिप्लोमा आवश्यक
जात प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
स्वाक्षरी आणि डाव्या अंगठ्याचा ठसा

अर्ज कसा करावा

अधिकृत वेबसाइट www.rrcer.org ला भेट द्या. Eastern Railway Recruitment 2025
त्यानंतर अप्रेंटिस भरती २०२४ साठी “ऑनलाइन अर्ज करा” या लिंकवर क्लिक करा.
पुढे ऑनलाइन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
भरतीच्या फॉर्मवरती विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा
आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर online फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.