Friday, January 2, 2026
Home Blog Page 317

Helmet Rule : RTO चा आदेश जारी ; पुण्यात दोन हेल्मेट बंधनकारक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रस्त्यावर अपघाताच्या समस्या प्रचंड वाढल्या असून, यातील कित्येक अपघात हे हेल्मेट न वापरल्यामुळे होतात. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) शोरुम मालकांना पत्राद्वारे एक आदेश जारी केला आहे. पुण्यात आता दुचाकी खरेदी करताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे शोरुम्ससाठी बंधनकारक करण्यात आले आहे. हा महत्वाचा निर्णय रस्त्यावर होणाऱ्या जीवितहानी रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. तर चला याबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

RTO कार्यालयाकडून आदेश जारी –

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, नव्याने दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना शोरुमकडून दोन हेल्मेट (helmets) देण्यात यावी. केंद्र सरकारच्या मोटार वाहन नियम 1989 अंतर्गत, हा नियम लागू केला आहे. रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. जर वाहनचालक व त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर केला तर या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे नव्या दुचाकी खरेदीवेळी वितरकाने ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे, असे आरटीओच्या आदेशात सांगण्यात आले आहे.

काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा –

हेल्मेट खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रथम, नेहमी ISI ( Indian Standards Institute) मार्क असलेले ब्रँडेड हेल्मेटच निवडा. अशा हेल्मेट्समध्ये गुणवत्ता आणि सुरक्षा याची खात्री असते, जे स्वस्त आणि नॉन-ब्रँडेड हेल्मेट्समध्ये नसते. दुसरे म्हणजे, हेल्मेटचा आकार योग्य निवडणे महत्त्वाचे आहे. डोक्याच्या आकारानुसार आणि आरामदायक फिटिंगसाठी हलके आणि मजबूत हेल्मेट निवडावे. त्याने वापरणाऱ्याला अधिक आरामदायक वाटेल आणि सुरक्षा देखील वाढेल. तसेच हेल्मेटची नियमित देखभाल करा. वायजरवर कॅक किंवा ओरखडे पडले असल्यास ते बदलणे आवश्यक आहे. खराब वायजरमुळे स्पष्टता कमी होते, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. या सर्व गोष्टींचा विचार करूनच हेल्मेट खरेदी करा आणि सुरक्षित राहा.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; पगारात होणार मोठी वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच आनंदाची गुड न्यूज मिळणार आहे. नवीन वर्ष 2025 मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात (DA) वाढ मिळण्याची शक्यता आहे. सरकार लवकरच याबाबत घोषणा करू शकते, या घोषणेची अनेक कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांचा मोठा फायदा होणार आहे. तर चला या DA ची गणना कशी केली जाते आणि याची घोषणा कधी होणार आहे, याबदल सविस्तर माहिती आणून घेऊयात .

DA ची गणना –

7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत DA ची गणना AICPI (All India Consumer Price Index) च्या आधारे केली जाते. यावेळी जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंतच्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरून DA किती वाढवायचा हे ठरवले जाणार आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, जानेवारी 2025 मध्ये DA मध्ये 3% वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्या वेळी AICPI निर्देशांक 144.5 वर होता. जर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात हा निर्देशांक 145 च्या आसपास राहिला, तर जानेवारी 2025 मध्ये DA 56% पर्यंत पोहोचेल.

पेन्शनधारकांनाही वाढीचा फायदा –

DA मध्ये 3% वाढ झाल्यास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगार मोठ्या प्रमाणावर वाढेल. सध्या DA 53% आहे. जर सरकारने 3% वाढ जाहीर केली, तर हा 56% होईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात चांगला फरक दिसून येईल. पेन्शनधारकांनाही या वाढीचा फायदा होईल. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 असेल, तर सध्याचा DA 9,540 आहे. 3% वाढ झाल्यास हा DA 10,080 होईल. म्हणजेच, 540 ची मासिक वाढ होईल.

महागाई भत्त्याची प्रक्रिया –

7 व्या वेतन आयोगाच्या नियमानुसार, महागाई भत्त्याची (DA) प्रक्रिया वर्षातून दोन वेळा केली जाते , ती म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात. जानेवारी 2025 साठी DA वाढीचा निर्णय जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीतल्या AICPI (All India Consumer Price Index) निर्देशांकाच्या सरासरीवर आधारित असणार आहे. सरकार मार्च 2025 मध्ये या वाढीची अधिकृत घोषणा करू शकते, आणि ही घोषणा होळीच्या आधी होण्याची शक्यता आहे. जर हि वाढ झाली तर DA वाढीचा पैसा कर्मचाऱ्यांच्या मार्च किंवा एप्रिलच्या पगारात समाविष्ट होऊ शकतो.

आता चुकीच्या खात्यात पैसे पाठवण्याचे प्रकार थांबणार ; RBI चा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) RTGS आणि NEFT व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांना RTGS आणि NEFT द्वारे पैसे पाठवताना लाभार्थ्याचे नाव स्क्रीनवर दिसणार आहे. यामुळे चुकीच्या खात्यात पैसे पाठवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे चुकीच्या कामांना आळा बसणार असून , गैरप्रकार टाळले जाणार आहेत. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

RTGS आणि NEFT –

RTGS (Real-Time Gross Settlement) आणि NEFT (National Electronic Funds Transfer) या दोन प्रमुख पेमेंट सिस्टिम्स भारतातील बँकांद्वारे निधी हस्तांतरणासाठी वापरल्या जातात. या दोन्ही प्रणाली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली कार्य करतात. RBI ने सर्व बँकांना सांगितले आहे कि , 1 एप्रिल 2025 पर्यंत ही नवी प्रणाली लागू करावी. सध्या यूपीआय आणि आयएमपीएस व्यवहारांमध्ये लाभार्थ्याचे नाव पडताळण्याची सुविधा उपलब्ध आहे. आता तीच सुविधा RTGS आणि NEFT साठीही देण्यात येणार आहे.

नवीन प्रणालीमुळे अनेक फायदे –

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही नवी प्रणाली विकसित करणार आहे . यानंतर सर्व बँका ती प्रणाली त्यांच्या इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्मवर लागू करतील. बँकेच्या शाखेत जाऊन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनाही ही सुविधा मिळणार आहे. ग्राहकांना या नवीन प्रणालीमुळे अनेक फायदे होणार आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे चुकीच्या खात्यात पैसे जाण्याचे प्रकार कमी होतील. ग्राहक जेव्हा लाभार्थ्याचे नाव स्क्रीनवर दिसेल, तेव्हा ते खात्री करून योग्य लाभार्थ्याला पैसे पाठवू शकतील. यामुळे पैसे चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याचा धोका कमी होईल. त्याचसोबत , फसवणुकीचे प्रकार थांबतील, कारण ग्राहकांना पैसे पाठवण्याआधी प्रत्येक तपशीलाची तपासणी करता येईल, ज्यामुळे फसवणुकीची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे . यामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षा आणि विश्वास मिळेल.

रेल्वेकडून प्रवाशांना मिळतात या मोफत सुविधा; जाणून घेतल्यास होईल फायदा

railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपल्यातील कित्येक लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. लांबचा पल्ला गाठायचा असला तरी आपल्याला रेल्वेच सर्वात सोपा मार्ग वाटते. हीच रेल्वे आपल्या प्रवाशांना अनेक मोफत सुविधा पुरवते. या सुविधा प्रवाशांना माहीत नसल्यामुळे त्यांना याचा लाभ घेता येत नाही. या सुविधा नेमक्या कोणत्या आहेत आपण जाणून घेऊया.

मोफत प्राथमिक उपचार

एखाद्या प्रवाशाची प्रवासादरम्यान तब्येत बिघडल्यास रेल्वेकडून मोफत प्राथमिक उपचार दिले जातात. यासाठी तुम्ही तिकीट कलेक्टर, ट्रेन अधीक्षक किंवा अन्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकता. प्रवाशाची प्रकृती अधिक गंभीर असल्यास पुढील थांब्यावर वैद्यकीय उपचार सेवा ही दिली जाते.

मोफत जेवण

प्रीमियम ट्रेन (राजधानी, दुरांतो, शताब्दी) 2 तासांपेक्षा अधिक उशीर झाल्यास रेल्वेकडून प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते. याशिवाय, रेल्वे ई-कॅटरिंग सर्व्हिसच्या माध्यमातूनही ट्रेनमध्ये तुमच्या पसंतीचं जेवण ऑर्डर करता येतं.

लॉकर रूमची सुविधा

काही महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर क्लोकरूम आणि लॉकर रूम उपलब्ध असते. येथे आपल्याला एका महिन्यापर्यंत सामान सुरक्षित ठेवता येते.

वेटिंग हॉल

रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी वेटिंग हॉलची सुविधा देखील पुरवते. प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरील AC व नॉन-AC वेटिंग हॉल मोफत वापरता येतात. यासाठी फक्त रेल्वेचे तिकीट दाखवावे लागते.

‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 1500 रूपये; सरकारने दिली ‘ही’ 6 कारणे

ladaki bahin yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य करण्यावर भर देत आहे. सध्या या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून 1500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत. म्हणजेच या डिसेंबर महिन्यापर्यंत सहा हफ्ते सरकारने महिलांच्या खात्यावर जमा केले आहेत. परंतु अशातच सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांना मोठी चाळणी लावली आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लाडकी बहिण योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता केशरी आणि पिवळे रेशन कार्ड वगळता इतर सर्वच अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांची नावे या योजनेच्या लिस्टमधून कमी होतील.

महत्वाचे म्हणजे या योजनेबाबत वर्धा, पालघर, लातूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातून अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे योजनेसाठी जमा करण्यात आलेल्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्यात येत आहे. या पडताळणीमध्ये अर्जामध्ये कोणतीही चुकीची माहिती आढळली तर ते अर्ज फेटाळले जाणार आहेत. म्हणजेच अनेक महिलांना या योजनेचे पैसे येणे बंद होतील.

दरम्यान, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर चारचाकी वाहन, शासकीय नोकरी, सरकारी योजनेचा लाभ, ऑनलाइन ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज भरणे, अशा कित्येक कारणांमुळे महिलांचे अर्ज बाद होणार आहेत.

वाल्मीक कराडच्या जीवाला धोका; न्यायालयाकडे केली मोठी मागणी

walmik karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यामध्ये संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे आक्रोशाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड हा कोठडीत शिक्षा भोगत आहे. परंतु वाल्मीक कराडला (Walmik Karad) कोठडीत अनेक चांगल्या सुविधा पुरवल्या जात असल्याचा गंभीर आरोप विरोधांकडून केला जात आहे. अशातच, कराडने आपल्याला गंभीर असल्याचे सांगत मदतनीसची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मीक कराडने सांगितले आहे की आपल्याला स्लिप एपनिया नावाचा आजार आहे. त्यामुळे ऑटो सीपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून त्याला देण्यात आला आहे. म्हणूनच ही मशीन चालवण्यासाठी आपल्याला कोठडीमध्ये 24 तास मदतनीस देण्यात यावी, अशी मागणी वाल्मिक कराडने केली आहे. याबाबत त्याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

इतकेच नव्हे तर, ही मशीन चालवण्याचे प्रशिक्षण रोहित कांबळेने घेतले असून मशीन जर चुकीच्या पद्धतीने चालवण्यात आली तर जीवाला धोका होऊ शकतो असे वाल्मीक कराडने आपल्या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळेच आता या याचिकेवर न्यायालय कोणता निर्णय घेईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

स्वस्तात मिळणार Vivo T3x 5G मोबाईल; कंपनीने घेतला मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे ग्राहक कमी किंमतीत चांगला फोन खरेदी करण्यास इच्छुक आहेत , त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Vivo या कंपनीने आपल्या Vivo T3x 5G स्मार्टफोनच्या किमती कमी केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन फक्त 12,499 रुपयांना मिळणार आहे. तसेच कंपनीने या स्मार्टफोनच्या विविध व्हेरियंट्सवर 1,000 रुपयांची घट केली आहे. म्हणजेच आता ग्राहकांना फोन खरेदी करतांना विविध पर्याय उपलब्ध होणार असून , त्या फोनला द्यावी लागणारी रक्कम हि कमी असणार आहे. तर चला या फोनबद्दल अधिक माहिती जाणून घेउयात.

Vivo T3x 5G फीचर्स –

या फोनमध्ये 6.72 इंचाचा फुल एचडी 1080×2408 पिक्सल LCD डिस्प्ले आहे, जो 1000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेटसह एक स्मूथ व्हिज्युअल अनुभव देतो. हा फोन Android 14 आधारित Funtouch OS 14 वर चालतो, जो वापरकर्त्याला उत्कृष्ट सॉफ्टवेअर अनुभव प्रदान करतो. 4nm Snapdragon 6 Gen 1 चिपसेट आणि 8GB रॅम 8GB वर्चुअल रॅम सपोर्ट सोबत हा फोन आधुनिक वापरासाठी तयार केला आहे. स्टोरेजसाठी 128GB ची इनबिल्ट क्षमता आहे, आणि मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत विस्तार करण्याचा पर्याय आहे. तसेच 6000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह हा फोन दीर्घकालीन वापरासाठी चांगला आहे. कॅमेऱ्या बदल सांगायचं झालं तर , 50MP प्रायमरी कॅमेरा आणि त्याला 2MP सेन्सरची जोड आहे, तसेच 8MP फ्रंट कॅमेरा सेल्फी प्रेमींना आकर्षित करतो. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP64 रेटिंगसह हा फोन धूळ आणि पाणीपासून संरक्षण मिळवतो. ब्लूटूथ, GPS, आणि Wi-Fi कनेक्टिव्हिटीसह Vivo T3x 5G एक चांगला पर्याय ठरतो.

नो-कॉस्ट ईएमआय पर्यायाचा लाभ –

Vivo T3x 5G स्मार्टफोन Vivo India ई-स्टोअर, Flipkart आणि रिटेल स्टोअर्सवरून खरेदी करता येईल. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 1,500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. ग्राहकांना 4,167 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायाचा लाभही घेता येईल.

फोनची किंमत –

Vivo T3x 5G च्या विविध व्हेरियंट्सची किंमत आता कमी करण्यात आली आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या फोनची नवीन किंमत 12,499 रुपये आहे. 6GB रॅम + 128GB स्टोरेजचा फोन 13,999 रुपयांत उपलब्ध होईल, तर 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 15,499 रुपये आहे. यापूर्वी, या स्मार्टफोनचे व्हेरियंट्स 13,499 रुपये, 14,999 रुपये आणि 16,499 रुपये यांमध्ये उपलब्ध होते. तसेच हा फोन ग्राहकांना तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.

PM किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार ? शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा 19 वा हप्ता लवकरच येण्याची शक्यता आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करते. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 थेट बँक खात्यात दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत होते. तर या योजनेचा 19 वा हप्ता कधी येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

19 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये –

19 वा हप्ता (19th instalment) फेब्रुवारी 2025 मध्ये मिळण्याची अपेक्षा आहे. पण याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच या योजनेतून काही विशिष्ट प्रकारच्या लोकांना वगळण्यात आले आहेत. त्यामध्ये जर शेतकरी कुटुंबातील कोणताही सदस्य करदाता असेल तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्याकडे स्वतःच्या नावावर शेतीयोग्य जमीन नाही, त्यांनाही योजना लागू होत नाही. जर पती-पत्नींपैकी कोणाला एकाला या योजनेचा लाभ मिळत असेल तर दुसऱ्याला लाभ मिळणार नाही. तसेच शासकीय नोकरी करणारे शेतकरी, डॉक्टर, अभियंते, वकील आणि सीए यांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे. या सर्वासोबतच ज्यांना दरवर्षी 10,000 पेन्शन मिळते, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येत नाही.

स्वतःच्या मर्जीने योजना सोडू शकतो –

जर एखादा शेतकरी पीएम किसान योजनाचा लाभ अनियंत्रितपणे घेत असेल, तर तो त्याच्या मर्जीने योजना सोडू शकतो. यासाठी शेतकऱ्याने सर्वप्रथम पीएम किसान वेबसाइटवर जाऊन Voluntary Surrender of PM Kisan Benefits या टॅबवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तिथे आपला नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून ओटीपी मिळवावा. ओटीपी नंतर, त्याला त्याने घेतलेल्या सर्व हप्त्यांची माहिती दिसेल. Do you wish to Surrender your PM-Kisan Benefit? या पर्यायावर Yes क्लिक करून ओटीपी टाकावा. यानंतर, शेतकऱ्याच्या खात्यात पैसे ट्रांसफर होणे बंद होईल.

Honda Elevate Black Edition लवकरच भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध जपानी ऑटोमोबाईल कंपनी होंडा लवकरच आपल्या होंडा एलेव्हेट एसयूव्ही चा ब्लॅक एडिशन (Honda Elevate Black Edition) भारतीय बाजारात सादर करू शकते, अशी चर्चा सगळीकडे होत आहे. भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन होंडा हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे हि बातमी होंडा प्रेमींसाठी महत्वाची ठरणार आहे. तर चला होंडा एलिव्हेट ब्लॅक एडिशन गाडीची सर्व माहिती या बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

होंडा एलिव्हेट ब्लॅक एडिशनची वैशिष्ट्ये –

ब्लॅक एडिशनमध्ये गाडीचा बाहेरचा रंग पूर्णपणे काळा ठेवण्यात आला आहे. तसेच, अलॉय व्हील्स, पेंट स्कीम, आणि बाहेरील डिझाईनमध्ये ब्लॅक थीमचा समावेश आहे. गाडीच्या मागील बाजूस लिफ्टच्या खाली एक नवीन बॅजही दिसतो. तसेच डिझाईनमध्ये इतर कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. गाडीच्या इंजिन बदल सांगायचं झालं तर , इंजिनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. होंडा एलिव्हेटमध्ये आधीपासून उपलब्ध असलेले 1.5 लिटर इंजिनच वापरले जाणार आहे, जे 121 पीएसची पॉवर आणि 145 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. या एसयूव्हीमध्ये मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनचा पर्याय देखील उपलब्ध असतील .

लाँच आणि किंमत –

होंडा (Honda) एलिव्हेट ब्लॅक एडिशन कधी लाँच (launch) होईल याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. पण ही गाडी 17 ते 22 जानेवारी दरम्यान होणाऱ्या भारत मोबिलिटी 2025 कार्यक्रमात सादर केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नियमित होंडा एलिव्हेटची किंमत 11.69 लाख ते 16.43 लाख रुपये आहे. पण या नवीन ब्लॅक एडिशनमुळे किंमतीत काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. हि गाडी लाँच झाल्यास, तिची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा नाईट एडिशन आणि एमजी हेक्टर ब्लॅक एडिशन सारख्या गाड्यांशी होईल.

लाडकी बहीण योजनेत हे अर्ज बाद होणार; महिलांचं टेन्शन वाढलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिला व बालविकास विभागाची महत्वाची योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे (ladki bahin yojana) पाहिले जाते. पण सध्या यावर मोठ्या चर्चा होताना दिसत आहेत. अनेक अर्जांची छाननी होऊन काही अर्ज बाद होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या परिस्थितीमुळे आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या अनेक महिलांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक महिलांचे टेन्शन वाढले आहे. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

अर्ज सरसकट बाद होणार –

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कॅबिनेट बैठकीनंतर यावर सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, अर्ज सरसकट बाद होणार नाहीत. पण, अर्जांची तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे. योजनेंतर्गत अर्जदारांची माहिती पडताळूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ज्या अर्जदारांच्या घरात दुचाकी असेल, त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय आधारकार्डवरील माहिती जुळत नसेल किंवा अर्जदार नोकरीत कार्यरत असेल, तर त्यांनाही लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे सरकारच्या प्रक्रियेबाबत पारदर्शकता वाढल्यास मदत होणार आहे.

अर्जाची पूर्ण तपासणी –

राज्यातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे .पण या छाननीमुळे काही महिलांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. योजनेतील अर्जदार पात्रता निकष पाळत आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. या छाननी प्रक्रियेमुळे योजनेत होणारे गैरप्रकार रोखले जाणार आहेत.