Friday, January 2, 2026
Home Blog Page 319

क्रीडा प्रेमींसाठी खुशखबर ; 2025 मध्ये या स्पर्धा मैदान गाजवणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षात क्रीडा (sports) क्षेत्रात विविध महत्त्वाच्या स्पर्धा आणि मालिकांचा थरार अनुभवता येणार आहे. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो यांसारख्या लोकप्रिय खेळांपासून ते बॅडमिंटन, टेनिस, नेमबाजी, कुस्तीपर्यंत अनेक खेळांच्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्पर्धा क्रीडारसिकांना व्यस्त ठेवणार आहेत. तर चला या स्पर्धांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

क्रिकेट स्पर्धा –

क्रिकेट जगतात 2025 वर्षाचा क्रिकेट कॅलेंडर विशेष असणार आहे. या वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सात वर्षांनंतर पुन्हा सुरू होईल, जी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तान आणि दुबईमध्ये रंगेल. महिलांच्या क्रिकेटसाठी महिला एकदिवसीय विश्वकरंडक, सप्टेंबर महिन्यात भारतात आयोजित केला जाईल. आयपीएल 2025 देखील 14 मार्च ते 25 मे दरम्यान रंगणार आहे, ज्याची क्रिकेटप्रेमींनी आतुरतेने वाट पाहिली आहे. तसेच, इंग्लंडविरुद्ध भारताची टी-20 आणि एकदिवसीय मालिका जानेवारी, तसेच पाच कसोटी सामन्यांची मालिका या वर्षीच्या जून – जुलै क्रिकेट कॅलेंडरमध्ये आकर्षण ठरणार आहे.

हॉकी स्पर्धा –

2024-25 सीझनमध्ये हॉकीच्या विविध प्रमुख स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुषांसाठी हॉकी इंडिया लीग 28 डिसेंबर 2024 ते 1 फेब्रुवारी 2025 दरम्यान होईल, तर महिलांसाठी ही स्पर्धा 12 ते 26 जानेवारी दरम्यान खेळली जाईल. त्यानंतर, हॉकी प्रो लीगचा पुरुष स्पर्धा 15 फेब्रुवारी ते 22 जून दरम्यान, आणि महिला स्पर्धा 15 फेब्रुवारी ते 29 जून पर्यंत होईल. यासोबतच, राष्ट्रीय हॉकी स्पर्धा 4 ते 15 एप्रिल दरम्यान आयोजित केली जाईल. तसेच, भारतामध्ये होणाऱ्या हॉकी ज्युनियर विश्वकरंडकाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. या सर्व स्पर्धा भारतीय हॉकीचा दर्जा आणि विकास आणखी एक पाऊल पुढे नेतील.

कबड्डी आणि खो-खो –

खो-खोमध्ये, पहिला विश्वकरंडक स्पर्धा 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे होईल, ज्यामध्ये पुरुषांच्या स्पर्धेत 21 आणि महिलांच्या स्पर्धेत 20 संघ सहभागी होतील. कबड्डीच्या बाबतीत, पुरुषांच्या विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होईल, तर महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धा मार्चमध्ये पाटणामध्ये होतील. प्रो कबड्डी लीग जुलै महिन्यात अपेक्षित आहे. महाराष्ट्राची कबड्डी लीग मे महिन्याच्या अखेरीस होईल. मॅरेथॉनच्या बाबतीत, मुंबई मॅरेथॉन 19 जानेवारीला आयोजित होईल, लंडन मॅरेथॉन 27 एप्रिलला आणि बजाज अलियान्स पुणे अर्थ मॅरेथॉन डिसेंबरच्या मध्यावर होईल.

फुटबॉल स्पर्धा –

इंग्लिश प्रीमीयर लीग आणि स्पॅनिश लीग (ला लीगा) यांचा रोमांचक सीझन सुरू राहील. याशिवाय, 14 जून ते 23 जुलै दरम्यान अमेरिका येथे क्लब विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये 32 क्लब सहभागी होतील. तसेच, विश्वकरंडक पात्रता सामने देखील महत्त्वपूर्ण असतील. महिलांच्या युरो स्पर्धेचे आयोजन 2 ते 27 जुलै दरम्यान होईल. त्याचप्रमाणे, फिफा 20 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा 27 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान होईल, या सर्व स्पर्धांमुळे फुटबॉलप्रेमींसाठी 2025 एक अविस्मरणीय वर्ष ठरेल.

अॅथलेटिक्स ( Athletics ) –

2025 मध्ये अॅथलेटिक्स क्षेत्रातही मोठ्या स्पर्धांचा भरगच्च कार्यक्रम आहे. जागतिक अॅथलेटिक्स रिले स्पर्धेचे आयोजन 10-11 मे दरम्यान चीनमध्ये होईल. त्यानंतर, एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियन्सशीप 27 ते 31 मे दरम्यान आयोजित केली जाईल. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा जपानमध्ये 13 ते 21 सप्टेंबर दरम्यान होईल, याशिवाय, डायमंड लीग 26 एप्रिल ते 28 ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी होईल, ज्यामध्ये जगभरातील अॅथलीट्स आपला सर्वोत्तम प्रदर्शन करतील. या सर्व स्पर्धा अॅथलेटिक्सच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठे प्रतिस्पर्धा आणि रोमांचक क्षण निर्माण करतील. तसेच भारतात प्रथमच पैरा अॅथलेटिक्स अदिक्यपद स्पर्धा 26 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत नवी दिल्लीत होणार आहे.

बॅडमिंटन स्पर्धा –

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा नवी दिल्लीमध्ये 14 ते 19 जानेवारी दरम्यान होईल. विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा 13 ते 19 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली जाईल. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा लखनौमध्ये 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान होईल. त्यानंतर, विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पॅरीसमध्ये आयोजित केली जाईल, आणि ऑल इंग्लंड चॅम्पियन्सशीप लंडनमध्ये 11 ते 16 मार्च दरम्यान होईल.

इतर स्पोर्ट्स –

ऑस्ट्रेलियन ओपन मेलबर्नमध्ये 12 ते 26 जानेवारी दरम्यान होईल. त्यानंतर फ्रेंच ओपन पॅरिसमध्ये 25 मे ते 7 जून दरम्यान आयोजित केला जाईल. विम्बल्डन लंडनमध्ये 30 जून ते 13 जुलै दरम्यान होईल. शेवटी, युएस ओपन न्यूयॉर्कमध्ये 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान होईल. नेमबाजीमध्ये, जागतिक अजिंक्यपद (पिस्तूल आणि रायफल) 6 ते 16 नोव्हेंबर दरम्यान कैरो, इजिप्तमध्ये होईल, ज्यातून 2028 लॉस एंजेलिस ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवली जाईल. टेबल टेनिसचे विश्व अजिंक्यपद 17 ते 25 मे दरम्यान कतारमध्ये होईल. तिरंदाजीचे विश्व अजिंक्यपद 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान दक्षिण कोरियामध्ये होईल. जिम्मॅस्टिकचे विश्व आर्टिस्टिक स्पर्धा 11 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होईल. वेटलिफ्टिंगची विश्व स्पर्धा 1 ते 10 ऑक्टोबर नॉर्वेमध्ये होईल. कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी जानेवारीत होईल, आणि जागतिक कुस्ती स्पर्धा 13 ते 21 सप्टेंबर दरम्यान क्रोएशियामध्ये होईल. बुद्धिबळचे विश्व अजिंक्यपद 23 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान माँटेग्रोमध्ये आणि महिला विश्वकरंडक 5 ते 21 जुलै दरम्यान जॉर्जियामध्ये होईल.

अक्कलकोटमध्ये भाविकांच्या कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

accident news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळी भाविकांची मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिर, शेगावमध्ये गजानन महाराज मंदिर, पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे भाविकांच्या दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला अक्कलकोटमध्ये (Akkalkot) काही भाविकांवर काळाने घाला घातला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन पुन्हा घरी निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातामध्ये एकूण चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सातपेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सध्या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी अक्कलकोटमध्ये स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या कारचा मैंदर्गी येथे भीषण अपघात झाला. प्रवासादरम्यानच स्कोर्पिओ कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेमध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले, तर 4 जणांनी आपला जीव गमावला.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर त्यांनी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. तसेच, जखमींना उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले.

वाल्मिक कराडचं New Year थेट तुरुंगात; अशी झाली नवीन वर्षाची सुरुवात…

Walmik karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एकीकडे संपुर्ण जगभरात नवीन वर्षाचा जल्लोष साजरी होत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याकांडाबाबत आक्रोश व्यक्त केला जात आहे. अशातच, मंगळवारी या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड (Walmik Karad) याने पुण्यात सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे. मुख्य म्हणजे, सीआयडीने वाल्मिक कराडला हत्याऐवजी खंडणी प्रकरणासाठी अटक केल्यामुळे न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

१:४५ वाजता तुरुंगात रवानगी

न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेनंतर पोलिसांसह आक्रोश जनता देखील वाल्मिक कराडच्या बारीक हालचालींवर आणि त्याच्या संबंधित घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढे, काही तासांमध्येच त्याला न्यायालयासमोर देखील हजर करण्यात आले. न्यायालयाने वाल्मिक कराडला कोठडीची शिक्षा सुनावल्यानंतर रात्री ठीक १:४५ वाजता त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

यानंतर रात्री वाल्मिक कराडला तुरुंगात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीनंतर तो रात्रभर ऑक्सिजन लावून झोपला होता. आज सकाळी बरोबर ८:३० वाजता वाल्मिक कराडला चहा देण्यात आला. मात्र त्याने तो घेतला नाही. पुढे ११:४५ दरम्यान त्याला जेवण देण्यात आले. परंतु त्याने फक्त अर्धी पोळी खाल्ली आणि 4 वाजता थोडा भात खाईल हे सांगितले.

महत्वाचे म्हणजे, मध्यरात्री डॉक्टरांनी वाल्मीक कराडची तपासणी केल्यानंतर त्याला प्रकृतीची कोणतीही समस्या नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आता पुढील सुनावणी पर्यंत म्हणजेच पुढचे 14 दिवस वाल्मीक कराड तुरुंगात शिक्षा भोगणार आहे.

MHADA ची बंपर लॉटरी ; मुंबईत मिळणार स्वस्तात घरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे तिथे अनेक क्षेत्रातील लोक काम करताना दिसतात. कित्येक वर्ष या शहराच्या ठिकाणी राहिल्यानंतर आपल स्वतःच एक घर असावं , अस वाटत असत. पण घराच्या वाढत्या किंमती तसेच पगारातील तफावत यामुळे घर घेणं शक्य होत नाही. अशा लोकांसाठीच 2025 या नवीन वर्षाची हि बातमी महत्त्वाची ठरणार आहे. म्हाडा (MHADA) या वर्षी जवळपास 2500 ते 3000 घरांचे वाटप करणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण होणार आहेत. तर चला जाणून घेऊयात याबदल सविस्तर माहिती.

मोक्याच्या जाग्यावर कमी किंमतीत घर –

म्हाडा या शहराच्या ठिकाणी इमारती उभारणार असून , मोक्याच्या जाग्यावर तुम्हाला कमी किंमतीत घर घेता येणार आहे. ही घरे सायन, पवई, ताडदेव, विक्रोळी, घाटकोपर , बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, जुहू , अंधेरी या ठिकाणी असणार आहेत. तसेच गोरेगाव इथ बांधल्या जाणाऱ्या घराचाही यामध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे लोकांना मोक्याच्या जाग्यावर घर घेता येणार आहे.

घराची किंमत –

म्हाडाकडून ( Maharashtra Housing and Area Development Authority) वाटप केल्या जाणाऱ्या घराची सुरुवातीची किंमत 34 लाखापासून सुरू होणार आहे. पण काही दिवसांपासून ही किंमत 27 लाख करावी , अशी मागणी सर्वसामान्य लोक करताना दिसत आहेत. या मागणीवर सरकार कोणता निर्णय घेणार आहे , याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. लोकांची आशा आहे कि , सरकार यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेईल.

संगणकीय लॉटरीच्या माध्यमातून निवड –

म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण प्राधिकरणांकडून परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज मागवले जातात. त्यानंतर संगणकीय लॉटरीच्या माध्यमातून पात्र अर्जदारांची निवड केली जाते. या प्रक्रियेत विशिष्ट उत्पन्न गटांसाठी, जसे की अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गट, घरे राखीव ठेवली जातात. सोडत ही प्रक्रिया पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देणारी असल्यामुळे ती खूप महत्त्वाची मानली जाते. सोडत म्हणजे घरांच्या उपलब्ध जागेसाठी अर्जदारांची निवड करण्याची लॉटरी पद्धत होय .

LPG Gas Cylinder Price : LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खुशखबर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लोकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (Indian Oil Corporation Limited) व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे नवीन वर्ष लोकांसाठी गिफ्ट मानले जाऊ लागले आहे. यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, आणि ढाबा मालकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. या किंमती कमी करण्याच्या निर्णयामुळे लोकांना सिलेंडर घेताना कमी पैसे मोजावे लागणार आहेत. याचाच परिणाम म्हणजे आर्थिक बचत होण्यास मदत होईल. तर चला या किमती किती कमी झाल्या आहेत हे पाहुयात.

एलपीजी सिलेंडरच्या किंमती –

दिल्लीमध्ये आता 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी (liquefied petroleum gas) सिलेंडर 1804 रुपयांना उपलब्ध असून, त्याच्या किंमतीत 16 रुपयांची घट झाली आहे. मुंबईतही सिलेंडर 1756 रुपयांना मिळत असून, याआधी तो 1771 रुपयांना मिळत होता. ही सवलत फक्त व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरवर लागू असून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

निर्णयामुळे मोठा आधार –

किंमती कमी झाल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खाण्याच्या बिलांवर भार कमी होण्याची शक्यता आहे. तसेच ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवांवरही याचा परिणाम दिसून येईल. गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG cylinder) किंमती वाढत होत्या, त्यामुळे व्यवसायिकांवर मोठा आर्थिक दबाव निर्माण झाला होता. पण या निर्णयामुळे त्यांना मोठा आधार मिळाला आहे. घरगुती वापरासाठीच्या 14 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमती अजून स्थिर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना घरगुती गॅसच्या दरात सवलत मिळालेली नाही.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच नागरिकांना गिफ्ट –

सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुधारणा करतात. डिसेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच घट करून सामान्यांना थोडासा दिलासा देण्यात आला आहे. या किमती कमी झाल्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात चांगले परिमाण होताना दिसणार आहेत .

World Population | 2025 मध्ये जागतिक लोकसंख्या 8.09 अब्जांपर्यंत पोहचणार, भारत पहिल्या क्रमांकावर

World Population

World Population | भारताच्या लोकसंख्येमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून अनेक नियम देखील करण्यात आलेले आहे. 2024 मध्ये जवळपास 71 दशलक्ष लोकसंख्येची वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे 1 जानेवारी 2025 रोजी आपल्या जगाची लोकसंख्या (World Population) ही 8.9 अब्जापर्यंत पोहोचण्याचा देखील अंदाज व्यक्त केलेला आहे. 1.14 अब्ज लोकसंख्येसह भारत हा सध्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनलेला आहे. 1 जानेवारी 2025 रोजी जगाची लोकसंख्या 8,092,034,511 एवढी आहे. जी 2024 या वर्षाच्या तुलनेत 71, 178, 087 एवढी जास्त आहे युएस सेन्सेस ब्युरोने हा अंदाज व्यक्त केला आहे.

दिलेल्या माहितीनुसार 2025 मध्ये जगभरात दर सेकंदाला सुमारे 4.2 लोकांचा जन्म आणि 2.0 लोकांचा मृत्यू होणे अपेक्षित आहे. 2023 मध्ये जगभरात मानवी लोकसंख्या ही 75 दशलक्षाने वाढली होती. जनगणना ब्यूरोच्या आकडेवारीनुसार युनायटेड स्टेटमध्ये पुढील महिन्यामध्ये दर 9 सेकंदाला एक जन्म होईल आणि दर 9.4 सेकंदाला एक मृत्यू होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतराने देशाच्या लोकसंख्येमध्ये दर 23.2 सेकंदाला एक व्यक्ती जोडपे अपेक्षित आहे.

सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश | World Population

जुलै 2024 पर्यंत भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होता. भारताची लोकसंख्या जवळपास 141 कोटी एवढी होती. भारताच्या खालोखाल चीन दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होतो. चीनमध्ये 140.8 कोटी एवढी लोकसंख्या आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला युनायटेड स्टेट आहे. युनायटेड स्टेटची लोकसंख्या 341, 145, 670 एवढी आहे. 2020 मध्ये यूएसए लोकसंख्या सुमारे 9.7 दशलक्ष लोकांनी वाढलेली आहे. यामध्ये 2.9 हा एवढा वाढीचा दर आहे. 2010 मध्ये देशाची लोकसंख्या 7.4 टक्क्यांनी वाढली होती. 1930 नंतरचा हा सर्वात कमी दर असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

Success Story | दोन भावांनी केली यशस्वी केळीची लागवड; योग्य व्यवस्थापन करून इराकला केली निर्यात

Success Story

Success Story | आजकाल अनेक तरुण हे शेती क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पदार्पण करत आहेत. जर तुम्ही पिकाचे योग्य व्यवस्थापन केले आणि नियोजन केले तर तुम्हाला योग्यरीत्या शेती करता येते. आज कल शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे उत्पन्न देखील चांगले होते आणि कमी खर्चात जास्त उत्पादन शेतकरी करू लागलेले आहेत. या तंत्रज्ञानाचा आणि योग्य नियोजनाचा वापर करून अनेक शेतकरी अधिक यशस्वी होताना दिसत आहेत. आणि शेतीमधून ते लाखो रुपये कमवत आहेत.आज आपण अशाच यशस्वी भावांची कथा जाणून घेणार आहे. त्यांनी रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा वापर करून केळीचे चांगले उत्पादन घेतलेले आहे. त्यांची ही केळी इराकला देखील निर्यात करण्यात आलेली आहे. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळालेले आहे. आता आपण त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

माढा तालुक्यातील अतुल आणि अभिजीत चव्हाण या दोन भावांनी हा प्रयोग केलेला आहे. ते दोघेही सुशिक्षित आहेत. तसेच त्यांनी शेतीत पहिल्यांदाच हा प्रयोग केलेला आहे. त्यांच्याकडे 13 एकर वडिलोपार्जित शेती आहे. या आधी त्यांच्या शेतामध्ये केवळ हंगामी स्वरूपाच्या पिकांचे उत्पादन घेतले जात होते. तसेच त्यांचा दूध व्यवसाय होता. परंतु अतुल आणि अभिजीत यांनी नोकरी न करता पुढे शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी पिकांची लागवड केली. त्यांनी बोरच्या पाण्यावर द्राक्ष बागांची लागवड केली, तसेच ट्रॅक्टर व्यवसाय देखील सुरू केला.

हळूहळू त्यांनी विहीर खोदली आणि द्राक्षांच्या बागांची शेती वाढवली. द्राक्षाचे उत्पादन घेत असताना. त्यांनी केळीच्या पिकाकडे वळण्याचा देखील निर्णय घेतला. त्यांनी तीन एकर क्षेत्रावर त्यांनी केळीची लागवड केली. त्यांनी जी 9 या जातीच्या केळीची लागवड बेड पद्धतीने केली. 2024 ला लागवड केलेल्या तीन एकर क्षेत्रामध्ये त्यांना 16 ट्रॉली शेणखत लागले. तसेच दोन पिशवी कोंबडी खत टाकून याप्रमाणे तीन एकर क्षेत्रावर 3000 केळीच्या रूपांची लागवड केली. उन्हाळ्यामध्ये पिकाला पाणी कमी पडू लागले त्यानंतर त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला.

त्यांनी रासायनिक खतांचा वापर अत्यंत कमी प्रमाणात केला. जैविक खते घरच्या घरीच तयार केली. आणि पिकांना दिली चांगल्या प्रकारे नियोजन केल्याने योग्य दहा महिन्यांमध्ये त्यांची केळी विक्रीसाठी तयार झाली. एका घडाला जवळपास 12 फण्या ठेवत, खताच्या मात्रा वेळेवर देण्यावर भर दिला. उत्तम व्यवस्थापनामुळे 30 ते 35 किलोचा एका केळीचा घड तयार केला. इराकला देखील त्यांच्या केळी निर्यात करण्यात आलेली आहे.यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळालेले आहे.

Santosh Deshmukh Murder Case | ‘तर मला शिक्षा द्या…’ CID ला शरण जात वाल्मिक कराडने केला मोठा गौप्यस्फोट

Santosh Deshmukh Murder Case

Santosh Deshmukh Murder Case | बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेले आहे. आता याच प्रकरणाबाबत एक अतिशय महत्त्वाची घटना समोर आलेली आहे. ती म्हणजे आता या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकी कराड हा सीआयडीला शरण आलेला आहे. पुण्यात त्याने स्वतः सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी देखील त्याची कसून चौकशी करत आहेत. आणि त्याला लवकरच कोर्टात देखील हजर करणार आहेत. सीआयडीला शरण जाण्यापूर्वी वाल्मिकी याने एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यात एक मोठा दावा केलेला आहे. बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आत्ता 22 दिवस झालेले आहेत. या प्रकरणात अजूनही वाल्मिकी कराड याच नाव घेतलं जात होतं आणि त्यानुसारच आता त्याची चौकशी देखील करण्यात येणार आहे.

आरोपी वाल्मिकी कराड याच्यावर खंडणीचे आरोप लावण्यात आलेले आहे. तसेच इतरही काही गंभीर आरोप त्याच्यावर लावण्यात आलेले आहेत. यासाठी सीआयडीने 9 पथके तयार केलेली आहेत. आणि महाराष्ट्र तसेच कर्नाटकमध्ये देखील या प्रकरणाचा मोठ्या प्रमाणात शोध घेत होता. त्याने स्वतःहून पोलिसांसमोर येऊन शरणागतीबद्दल आहे. हाती आलेल्या माहितीनुसार वाल्मिकी हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा आणि मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. आणि त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात यावा अशी मागणी अनेक लोकांनी केली होती. परंतु आता सीआयडी खरंच वाल्मिकी कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिलेला आहे.

पोलिसांना शरण जाण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडिओ शेअर करून संतोष देशमुख यांच्या हत्येशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे सांगितलेले आहे. “मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी समोर हजर होत आहे. परंतु संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, फाशी द्यावी. केवळ राजकारणासाठी माझे नाव घेऊ नये. परंतु तरीही जर या प्रकरणात मी दोषी असेल, तर मला फाशी द्यावी,” असे वाल्मिकी कराड यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. वाल्मिकी कराड यांनी स्वतः शरणागती पत्करून असे वक्तव्य केल्याने आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांसमोर तसेच सीआयडी समोर अनेक नवीन प्रश्न उभी राहिलेले आहेत. आता हे प्रकरण नक्की कोणत्या दिशेला वळण घेईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Bank Adhar Link | अशाप्रकारे चेक करा आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे; फॉलो करा या स्टेप्स

Bank Adhar Link

Bank Adhar Link | अनेक वेळा राज्यशासन किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेतून जर आपल्याला पैसे येणार असेल, तर नेहमीच आपल्याला बँकेला आधार कार्ड लिंक करायला सांगतात. परंतु जर तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर अनेक अडचणी निर्माण होतात. आणि ते पैसे तुमच्या खात्यापर्यंत पोहोचत नाही. कारण आपला आधार नंबर (Bank Adhar Link) हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले आधार कार्ड हे आपल्या ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. आणि आपल्या आधार नंबरवरून आपली ओळख पटते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आधार नंबर हा त्यांच्या बँक खात्याला लिंक असणे खूप गरजेचे असतात.

परंतु अनेक वेळा लोकांना त्यांच्या आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे. हे समजत नाही. तर आता आपण तुमचा आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहेत हे जाणून घेणार आहोत

या स्टेप्स फॉलो करा | Bank Adhar Link

  • तुमचा आधार नंबर कोणत्या बँकेला लिंक आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • या वेबसाईटवर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यावर तुम्हाला कन्झ्युमर या पर्यायावर लिंक क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्यानंतर इंटर फेसवर डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये ज्या रेषा दिसतील त्यावर क्लिक करा
  • या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, यामध्ये तुम्ही आधार मॅप स्टेटस निवडायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर या तिन्ही बॉक्समध्ये टाकायचा आहे.
  • तसेच खाली दिलेल्या कॅपच्या कोड देखील टाकायचा आहे.
  • यानंतर तुम्ही चेक स्टेटस या पर्यायावर क्लिक करा.
  • आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावर ओटीपी येईल.
  • तो ओटीपी टाकून सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमच्यासमोर मॅपिंग स्टेटस दिसत असेल, आणि सर्वात शेवटी बँकेची माहिती दिसेल.
  • बँकेचे काही अपडेट दिसत नसेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडू शकता.

New Rules From 1 January 2025 | 1 जानेवारी 2025 पासून बदलणार हे नियम; तुमच्या खिशाला लागू शकते कात्री

New Rules From 1 January 2025

New Rules From 1 January 2025 | 2025 ची सुरुवात पहिला अगदी एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे. नवीन वर्ष सुरू झाले की, अनेक लोक नवीन संकल्प करत असतात. तसेच त्यांच्या सवयीमध्ये तसेच आयुष्यामध्ये अनेक बदल करत असतात ल. ज्याचा चांगला वाईट परिणाम त्यांच्या आयुष्यावर होत असतो. परंतु आता 1 जानेवारी 2025 पासून देशात अनेक नियम (New Rules From 1 January 2025) बदलणार आहे. आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या बँक खात्यावर होणार आहे. आता हे नक्की कोणते बदल होणार आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

एलपीजी गॅस सिलेंडरचे दर | New Rules From 1 January 2025

दर महिन्याच्या एक तारखेला सरकार एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल करत असतात. 19 किलोचा व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत अनेक बदल करण्यात आलेले आहेत. 2025 मध्ये एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये वाढ होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आलेले आहे. सध्या देशांतर्गत सिलेंडरची किंमत काही काळापासून स्थिर आहे. मुंबईमध्ये ही किंमत सध्या 803 रुपये एवढी आहे.

पीएफ

पीएफ खातेधारकांना 2025 च्या सुरुवातीला काही नवीन गोष्टी मिळू शकतात. त्यांच्यासाठी एक सोयीस्कर गोष्ट असणार आहे. ती म्हणजे 2025 पासून त्यांचे पीएफचे पैसे त्यांना एटीएम मशीन मधून काढता येणार आहे. यासाठी कामगार मंत्रालयाचे काम देखील सुरू आहे. याबाबत कामगार सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, श्रम आणि आरोग्य मंत्रालय करण्यासाठी आणि सेवा सुधारण्यासाठी आयोजित IT प्रणाली अपग्रेड करत आहेत.

यूपीआय पेमेंट

RBI ने अलीकडेच फीचर फोन युजरसाठी एक बातमी दिली आहे. ती म्हणजे आता UPI 123 पे वापरून 10 हजार रुपयांपर्यंतचे यूपीआय पेमेंट केले जाऊ शकते. ही नवीन सुविधा 1 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे. या आधी या पेमेंटची मर्यादा 5000 रुपये एवढी होती. परंतु आता वाढवून ती 10 हजार रुपये पर्यंत करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना फायदा

रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी दिली. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना हमी शिवाय कर्जाची मर्यादा 2 लाख रुपये केली आहे. हा नियम देखील 1 जानेवारी 2019 पासून लागू करण्यात येईल. यापूर्वी मर्यादा 1.6 लाख रुपये एवढी होती.

जीएसटीच्या नियमात बदल

करदात्यांना आता 1 जानेवारी 2025 पासून जीएसटीच्या कठोर नियमांना सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय बदलण्यात आलेला आहे. तो म्हणजे आता अनिवार्य मल्टी फॅक्टर ऑथेंटीकेशन जीएसटी पोर्टलला भेट देणाऱ्या सर्व त्यांना ते लागू केले जाणार आहेत. यामुळे सुरक्षा देखील वाढणार आहे.