Friday, January 2, 2026
Home Blog Page 320

New Year Celebration In pune | पुणेकऱ्यांचे नवीन वर्ष होणार जल्लोषात साजरे; हॉटेल, रेस्टॉरंट पहाटे 5 पर्यंत सुरू

New Year Celebration In pune

New Year Celebration In pune | 2025 च्या स्वागतासाठी सगळेजण तयारीत आहे. 31 डिसेंबरच्या रात्री नक्की काय करायचे? याचे प्लॅनिंग देखील झालेले असेल. परंतु आता पुण्यातील थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता पहाटे 5 वाजेपर्यंत रेस्टॉरंट, बार, हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच दारूच्या दुकानांना देखील मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे पुणेकरांचा या वर्षीचा 31 डिसेंबर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. कारण रात्री उशिरापर्यंत त्यांना पार्टी देखील करता येणार आहे. पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी परवानगी दिलेली आहे.

पुण्यामध्ये (New Year Celebration In pune) अनेक लोकप्रिय ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी अनेक लोक एकत्र येऊन नवीन वर्षाचे स्वागत करत असतात. यामध्ये खास करून डेक्कन परिसरात खूप जास्त गर्दी असते. येथे 31 डिसेंबरच्या रात्री नेहमीच गर्दी पाहायला मिळते. फुगे, फटाके या सगळ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत करतात. यासोबत कोरेगाव पार्क, जंगली महाराज रोड, कॅम्प, विमान नगर, हिंजवडी बावधन, फर्ग्युसन कॉलेज रोड, खराडी, विमान नगर, कोथरूड, औंध या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे नियोजन असते. यासोबतच पवनानगर, पानशेत, भुगाव, मुळशी, लोणावळा या ठिकाणी हॉटेल्स आणि रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात बुक असतात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक लोक पर्यावरणामध्ये जात असतात. आता तुम्हाला यावर्षी या सगळ्या गोष्टींचा चांगल्या प्रकारे आनंद घेता येणार आहे.

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्याला दंड | New Year Celebration In pune

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जरी पुण्यातील लोकांना मोठा सूट दिली असती, तरी तुम्ही मद्यपा करून गाडी चालवू नका. कारण पुणे शहरांमधील अनेक चौकांमध्ये पोलीस असणार आहेत. दारू पिऊन ड्रायव्हिंग केली तर त्याला दंड बसणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना प्रत्येकाने काळजी घ्या. याबाबतचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेले आहे . नवीन वर्षामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पुण्यातील तीन शहरांमध्ये जवळपास 500 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे.

स्पॅडेक्स मोहिमेद्वारे भारताने केला चमत्कार; गगनयान आणि चांद्रयानला होणार फायदा

Spadex

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्पॅडेक्स मिशनद्वारे भारताने पुन्हा एकदा चमत्कार केले आहेत. 44.5 मीटर लांब ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV)-C60 रॉकेटने सोमवारी रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दोन लहान अंतराळयान, चेझर आणि टार्गेटसह यशस्वीरित्या उड्डाण केले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ने सांगितले की, “दोन्ही अंतराळयान यशस्वीरित्या वेगळे झाले आहेत. चेझर आणि लक्ष्य कक्षेत ठेवण्यात आले आहेत.”

अवकाशयान गोलाकार कक्षेत ठेवण्यात आले होते

मोहीम यशस्वी झाल्याचे मिशनचे संचालक एम.जयकुमार यांनी सांगितले. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले, “रॉकेटने 15 मिनिटांच्या उड्डाणानंतर अंतराळयान 475 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत ठेवले आहे. डॉकिंगची प्रक्रिया पुढील एका आठवड्यात, शक्यतो 7 जानेवारीला पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.”

डॉकिंग आणि अनडॉकिंग क्षमता प्रदर्शित करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. स्पॅडेक्स मिशनसह, भारत डॉकिंग आणि अनडॉकिंग क्षमता प्रदर्शित करणारा चौथा देश बनेल. सध्या जगातील केवळ तीनच देश – अमेरिका, रशिया आणि चीन हे अंतराळ यानाला अवकाशात डॉक करण्यास सक्षम आहेत. एखादे अंतराळ यान दुसऱ्या अंतराळ यानाला जोडणे याला डॉकिंग म्हणतात आणि अंतराळात जोडलेले दोन अंतराळ यान वेगळे होण्याला अनडॉकिंग म्हणतात.

इस्रोने या वर्षी अंतराळातील क्ष-किरणांचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसेट या मोहिमेची सुरुवात केली. काही दिवसांनंतर, त्याने आपल्या पहिल्या सूर्य मोहिमेतील ‘आदित्य’मध्ये यश मिळवले. आता भारताने अशा मिशनच्या प्रक्षेपणाने वर्ष संपले जे स्वतःहून अंतराळात देशाची महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

या ध्येयांमध्ये चंद्रावरून नमुने आणणे, भारतीय अंतराळ स्थानकाचे (BSS) बांधकाम यांचा समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, समान गती आणि अंतराने प्रवास केल्यानंतर, दोन्ही अंतराळ यान सुमारे 470 किमी उंचीवर एकत्र येतील. येत्या काही दिवसांत दोन्ही अंतराळ यानांमधले अंतर कमी करून विलीन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे उल्लेखनीय आहे की प्रक्षेपण आधी रात्री 9.58 वाजता नियोजित होते. प्रक्षेपण दोन मिनिटांसाठी का पुढे ढकलण्यात आले याची माहिती देण्यात आलेली नाही. रविवारी रात्री 9 वाजता प्रक्षेपणासाठी 25 तासांचे काउंटडाउन सुरू झाले.

हे मिशन खूप महत्वाचे आहे

भविष्यातील मानवी अंतराळ उड्डाणासाठी हे महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे – अंतराळात उतरण्यासाठी हे एक परवडणारे तंत्रज्ञान आहे प्रात्यक्षिक मोहिमा – चंद्रावर मानव पाठवण्यासाठी आवश्यक आहे, चंद्रावरून नमुने आणणे आवश्यक आहे – भारतीय अंतराळ स्थानकही बांधकाम आणि ऑपरेशनमध्ये स्वावलंबी होईल – 2035 पर्यंत स्वत:चे स्पेस स्टेशन उभारण्याची इस्रोची योजना – एका मोहिमेसाठी एकापेक्षा जास्त रॉकेट सोडले तरी या तंत्रज्ञानाची गरज भासेल.

या मोहिमेसोबतच शास्त्रज्ञ POEM-4 म्हणजेच PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल-4 अंतर्गत प्रयोगही करतील. भारताने यापूर्वीही तीनवेळा अशा प्रकारचा प्रयोग केला आहे. या प्रयोगांसाठी, PSLV-C60 24 पेलोड वाहून नेत आहे, ज्यात 14 वेगवेगळ्या इस्रो प्रयोगशाळांमधून आणि 10 खाजगी विद्यापीठे आणि स्टार्ट-अप्सचे आहेत. अंतराळ वातावरणात पालकाच्या वाढीचा अभ्यास करण्याची योजना आहे. डेब्रिस कॅप्चर रोबोटिक मॅनिप्युलेटर अवकाशातील वातावरणात मोडतोड कॅप्चर करण्याची क्षमता प्रदर्शित करेल. इस्रोने यापूर्वी PSLV C-58 रॉकेटचा वापर करून POEM-3 आणि PSLV-C55 मिशनमध्ये POEM-2 चा वापर करून असेच यशस्वी प्रयोग केले होते.

ISRO च्या POEM मिशनमुळे अंतराळातील कचऱ्याच्या समस्येला तोंड देण्यासही मदत होईल. POEM हे इस्रोचे एक प्रायोगिक अभियान आहे, ज्या अंतर्गत PS4 स्टेजचा वापर करून कक्षामध्ये वैज्ञानिक प्रयोग केले जातात. PSLV हे चार टप्प्यातील रॉकेट आहे. त्याचे पहिले तीन टप्पे वापरल्यानंतर समुद्रात पडतात आणि उपग्रह कक्षेत सोडल्यानंतर शेवटचा टप्पा अवकाशात जंक होतो. POEM अंतर्गत, रॉकेटच्या या चौथ्या टप्प्याचा वापर वैज्ञानिक प्रयोगांसाठी केला जाईल.

मुंबईत थर्टी फस्टसाठी पोलिसांच्या टीममध्ये वाढ; अनुचित प्रकारांना बसणार आळा

Mumbai Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2024 या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सर्वांमध्ये उत्साह आहे. थर्टी फर्स्ट कसा साजरा करायचा? याची प्लॅनिंग आधीपासूनच झाले असेल. परंतु सामान्य माणूस थर्टी फर्स्ट एकदम आनंदाने साजरे करतात. तिथे पोलिसांची जबाबदारी आणि आव्हाने मात्र खूप वाढत असतात. कारण या सेलिब्रेशनच्या उत्साहात अनेक वेळा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाते. आणि अनेक अनुचित घटना देखील घडतात. या थर्टी फर्स्टच्या रात्री दारू पिऊन गाडी चालण्याचे प्रमाण देखील जास्त होते. आणि यामुळे अपघात देखील घडत असतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आता मुंबई पोलीस देखील चोक बंदोबस्त ठेवणार आहेत. याबद्दलची माहिती जॉईन कमिशनर सत्यनारायण चौधरी यांनी दिलेली आहे.

मुंबईमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच तगडा बंदोबस्त केला जाणार आहे. यासाठी 8 ऑडिशनल सीपी 30 डीसीपी 2011 अधिकारी 12000 पेक्षा जास्त कॉन्स्टेबल आणि या व्यतिरिक्त स्पेशलिस्ट तैनात करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी गर्दी असणार आहे, त्या ठिकाणी पोलिसांची चांगली नजर असणार आहे. चौपाटी हॉटेल यांसारख्या ठिकाणी देखील पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे 8000 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे नव्याने लावण्यात आलेले आहे. आणि गर्दीच्या ठिकाणांवर ठेवण्यात येणार आहे. पोस्टल एरिया पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणाचीही कुठल्याही ठिकाणी गरज लागली, तर त्या ठिकाणी तातडीने पोलिसांची टीम पाठवली जाणार आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री जे काही अनुचित प्रकार घडतात त्या सगळ्या प्रकारांना आळा घालता येईल. जेवढे रेकॉर्ड वरील आरोपी आहेत. त्यांची चेकिंग सिस्टीम आणि घेण्यात येणार आहे. पोलिसांसोबत ट्राफिक पोलिसांनी देखील तयारी केली आहे. नागरिकांना कुठे गरज लागली तर पोलिसांशी संपर्क साधावा.

त्याचप्रमाणे ज्या भागांमध्ये जास्त अंधार आहे. त्या ठिकाणी बीएमसीला सांगून लाईटची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलिसांना तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मोठा बंदबस्त असणार आहे

2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्ष 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) वाढीच्या संदर्भात मोठ्या बातमीची समोर आली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 56 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा महागाई भत्त्याचा लाभ दिला जातो. यामध्ये जानेवारी आणि जुलै महिन्यात सुधारणा केली जाते. 2024 च्या जुलै महिन्यात महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला होता. पण यावेळी अपेक्षित चार टक्क्यांच्या तुलनेत केवळ तीन टक्क्यांची वाढ झाली.

जानेवारी 2025 मध्ये वाढ –

आतापर्यंत जुलै ते ऑक्टोबर 2024 पर्यंतच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) आकडेवारीनुसार जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. बाकी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांची आकडेवारी आल्यानंतरच ही वाढ निश्चित होईल. तसे पाहता महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून लागू होईल, मात्र सरकारचा अंतिम निर्णय मार्च 2025 मध्ये अपेक्षित आहे. ही वाढ मागील महिन्यांपासून लागू राहील, त्यामुळे कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा फरक देखील मिळेल.

2025 मध्ये महागाई भत्ता 56% –

दरवर्षी मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारणा होतात. त्यानुसार मार्च 2025 मध्ये महागाई भत्ता 56% होईल असे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने (central government) महागाई भत्त्यात तीन टक्क्यांऐवजी चार टक्क्यांची वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, सध्याच्या आकडेवारीनुसार, महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनीच वाढणार असल्याचे चित्र आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ महत्त्वाची ठरणार असली तरी महागाईच्या पार्श्वभूमीवर अधिक लाभ मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. आता याबाबत केंद्र सरकारचा निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सिगारेटच्या सेवनाने पुरुषांचे आयुष्य 17 आणि महिलांचे आयुष्य 22 मिनिटांनी होते कमी; संशोधनात मोठा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीमध्ये अल्कोहोल तसेच सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. नुकतेच या सिगारेटवर एक मोठे संशोधन करण्यात आले. यामध्ये असे आढळून आले आहे की, प्रत्येक पुरुष सिगारेटचे सेवन केल्याने 17 मिनिटे आयुष्य कमी जगतात, तर स्त्रिया या 22 मिनिटांनी त्यांचे आयुष्य कमी जगतात. 2025 सुरू होण्याआधी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन मधील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. यामध्ये आरोग्य आणि सामाजिक काळजी विभागातर्फे असे सांगण्यात आले आहे की, जे लोक धूम्रपान करतात, त्यांनी ही सवय लवकरच सोडून द्यावी. धूम्रपान करणाऱ्यांचे आयुष्य निरोगी तर जातच नाही. परंतु त्यासोबत आयुष्यातील काही काळ देखील कमी होतो. तसेच सातत्याने धूम्रपान केल्याने दीर्घ आजार किंवा अपंगत्व येण्याचे संकेत देखील असतात.

या संशोधनात असे आढळून आले आहे की, सिगारेटचे सेवन केल्याने एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सरासरी 20 मिनिटांनी कमी होते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने 20 सिगारेटचे पॅक घेतले तर सुमारे 7 तासांनी त्याचे आयुष्य कमी होते. याचाच अर्थ धूम्रपान करणे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. जे लोक आयुष्यभर सिगारेट पीत असतात. ते लोक जवळपास 10 वर्ष कमी जगतात. आपल्याला टीव्ही जाहिरातींमधून देखील धूम्रपानाच्या आपल्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम बद्दल सांगितले जाते परंतु तरीही कुणीही या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाहीत.

आरोग्य आणि आयुर्मानाचा संपूर्ण लाभ मिळविण्यासाठी, धूम्रपान करणाऱ्यांनी ही सवय पूर्णपणे सोडली पाहिजे, असे अभ्यासात सांगण्यात आले आहे. मागील संशोधनात असे दिसून आले आहे की धूम्रपानाची कोणतीही सुरक्षित पातळी नसून हृदयविकाराचा धोका आणि स्ट्रोकचा धोका दिवसातून 20 वेळा जळणाऱ्या लोकांच्या तुलनेत दिवसातून एक सिगारेट ओढणाऱ्यांसाठी 50 टक्के कमी आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, तंबाखूचा महामारी हा जगाला भेडसावणारा सर्वात मोठा सार्वजनिक आरोग्य धोक्यांपैकी एक आहे. यामुळे दरवर्षी 8 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो, ज्यात अंदाजे 1.3 दशलक्ष गैर-धूम्रपान करणाऱ्या लोकांचा समावेश आहे जे दुसऱ्या हाताच्या धुराच्या संपर्कात आहेत. जगभरातील 1.3 अब्ज तंबाखू वापरकर्त्यांपैकी सुमारे 80% लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात, जेथे तंबाखूशी संबंधित आजार आणि मृत्यूचे ओझे सर्वात जास्त आहे.

3433 KM नवीन ट्रॅक, 21500 विशेष गाड्या; भारतीय रेल्वेने 2024 मध्ये गाठला नवा माईलस्टोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रवाशांचा अनुभव वाढवण्यासाठी आणि देशाच्या दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सतत काम करत आहे. 2024 मध्ये, राष्ट्रीय वाहतूक कंपनीने विविध प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. त्यामध्ये USBRL प्रकल्प पूर्ण करणे, 6000 पेक्षा जास्त ट्रॅक किमी रेल्वेचे नूतनीकरण करणे, विभागीय गती वाढवणे, विद्युतीकरण, स्टेशन पुनर्विकास, कवच, मालवाहतूक कॉरिडॉर आणि वंदे भारत एक्सप्रेस, नमो भारत रॅपिड रेलसह नवीन गाड्या सुरु करण्यापर्यंत प्रगती साध्य केली आहे. तर चला भारतीय रेल्वेने 2024 मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अधिक माहित जाणून घेऊयात.

2024 मधील उल्लेखनीय कामगिरी –

भारतीय रेल्वेने बहुप्रतिक्षित यूएसबीआरएल प्रकल्प पूर्ण केला आहे. आता, राष्ट्रीय वाहतूकदार काश्मीर ते देशाच्या इतर भागांशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी पूर्ण झाली आहे. तसेच भारतीय रेल्वेने 6450 किलोमीटर मार्गांचे नूतनीकरण केले, 6200 किलोमीटर रुळ बदलले, तर 8550 सेट टर्नआउट्सचे पुनर्बांधणी काम पूर्ण केले. यासोबतच गाड्यांच्या गतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यात 2000 किलोमीटर रेल्वेमार्गावर गाड्यांची गती 130 किमी प्रतितास करण्यात आली आहे. तसेच, 7200 किलोमीटर मार्गावर गती 110 किमी प्रतितासपर्यंत वाढवण्यात आली आहे. नव्या रेलवेमार्गामध्ये या वर्षी 1158 किलोमीटर नवीन रेल्वेमार्ग बांधण्यात आले, 259 किलोमीटर मार्गाचे गेज रूपांतर झाले, तर 2016 किलोमीटर दुहेरी मार्ग तयार करण्यात आला. तसेच 3210 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. यामुळे भारतीय रेल्वेच्या ब्रॉड गेज नेटवर्कचे 97 % विद्युतीकरण झाले आहे.

रेल्वेची सेवा अधिक आधुनिक –

रेल्वे क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम आणि सेवांची सुरुवात झाली आहे. अमृत भारत स्थानक योजना अंतर्गत 1337 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे, ज्यामध्ये 1198 स्थानकांवर काम सुरू झाले आहे. यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक आणि आधुनिक सुविधा मिळवता येतील. तसेच, वंदे भारत एक्सप्रेसच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे 2024 मध्ये 62 नवीन वंदे भारत गाड्या सुरू करण्यात आल्या, आणि सध्या देशभरात 136 वंदे भारत गाड्या धावत आहेत. 17 सप्टेंबर 2024 रोजी अहमदाबाद-भुज या मार्गावर पहिल्या नामो भारत रेल्वेसेवेची सुरूवात झाली, ज्यामुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायक प्रवास अनुभवता येईल. याचप्रमाणे, अमृत भारत एक्सप्रेस सेवा देखील यंदा सुरू करण्यात आली असून, यामध्ये गैर-एसी प्रवाशांसाठी उच्च दर्जाच्या सुविधांचा समावेश आहे. हे सर्व उपक्रम भारतीय रेल्वेची सेवा अधिक आधुनिक, आरामदायक आणि प्रवाशांना उपयुक्त बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

विशेष गाड्यांचे उद्दिष्ट –

2024 या वर्षात रेल्वे प्रशासनाने 21500 हून अधिक विशेष गाड्यांचे उद्दिष्ट गाठले आहे.. होळी, दिवाळी, छट यांसारख्या सणांसाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणात विशेष सेवा पुरवल्या. त्यामुळे लोकांचा प्रवास सुखद होण्यास मदत झाली. भारतीय रेल्वेच्या या उल्लेखनीय यशामुळे देशातील प्रवास सोयीस्कर आणि वेगवान बनला आहे.

Pune Crime : देवाच्या नावावर बलात्कार!! पुण्यातील घटनेनं खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लहान गावापासून ते मोठ्या शहरापर्यंत महिलांवरील अत्याचाराची संख्या प्रचंड वाढली आहे. या अत्याचाराला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नेहमी विविध योजनांची अंमलबाजवणी करत असतात. पण कठोर कायदे आणि उपाययोजनांनंतरही या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले नाही. एका पाठोपाठ बलात्काराच्या बातम्या समोर येत आहेत. अशीच एक बलात्काराची बातमी पुण्यातून समोर आली असून, यामध्ये आरोपीने माझ्या अंगात देव येतो असं बोलून एका महिलेवर बलात्कार केला आहे. तर हि नक्की घटना काय आहे , आणि कुठे घडली आहे हे आपण पाहणार आहोत.

माझ्या अंगात देव येतो असं सांगून बलात्कार –

राजगुरुनगरच्या घटनेच्या धक्क्यातून पुणे सावरत असतानाच, बिबवेवाडी भागात एका महिलेसोबत बलात्काराची घटना घडली आहे. आरोपीने माझ्या अंगात देव येतो असं सांगून चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला. या पीडित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या घटनेबद्दल सर्व माहिती समोर येईल.

काही महिन्यांपूर्वीच्या घटना –

काही महिन्यांपूर्वी बोपदेव घाटातही अशाच स्वरूपाचा गुन्हा घडला होता. रात्री फिरायला गेलेल्या एका तरुणीसोबत तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली, त्याचे हातपाय बांधून ठेवले. परराज्यातून आलेल्या या तरुणीवर झालेल्या घटनेनेही पुण्यात संतापाचा आवाज उठला होता. तसेच दुसरी घटना म्हणजे 54 वर्षीय आरोपीने दोन मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या केली . या घटनांमुळे पुण्यात तसेच इतर भागातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.

2025 मध्ये इंधनावरील किंमती कमी होणार ? मध्यमवर्गीय लोकांना मोठा दिलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी ही बातमी दिलासादायक ठरणार आहे . पेट्रोल (Petrol), डिझेल(Diesel) आणि गॅस यांच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम महागाईवर होतो. सामान्य कुटुंबांच्या मासिक खर्चात इंधनाचा मोठा वाटा असतो. एक्साइज़ शुल्क कमी झाल्यास पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होतील, ज्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. यासाठीच 2025 च्या अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII) ने काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी इंधनावरील अप्रत्यक्ष शुल्क कमी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामुळे देशातील नागरिकांच्या खरेदी क्षमतेत वाढ होऊन, GDP वाढण्यास साहाय्य मिळेल.

टॅक्स कमी करण्याचा विचार –

सीआयआयचे असेही मत आहे की, 20 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कर दर कमी करण्याचा विचार अर्थमंत्री करू शकतात. यामुळे खरेदी-विक्री वाढेल, महसूलात वाढ होईल आणि GDP ग्रोथला चालना मिळेल. सध्या अर्थव्यवस्थेतील मंदी सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत GDP ग्रोथ 5.4% पर्यंत खाली आली आहे , जी 7 ते 8% च्या टप्प्यावर ठेवणे भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे.

मध्यमवर्गीय लोकांना दिलासा –

सध्या व्यक्तिगत करदात्यांवर 42.74% पर्यंत कर लागू आहे, तर कंपन्यांवर हा कर फक्त 25.17% आहे. या मोठ्या फरकामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. म्हणूनच, कर दरात घट करून मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांना दिलासा देण्याची गरज आहे.

अप्रत्यक्ष शुल्काचा वाटा –

पेट्रोलच्या किमतीत अप्रत्यक्ष शुल्काचा वाटा 21%, तर डिझेलमध्ये 18% आहे. पण , मे 2022 पासून क्रूड ऑइलच्या जागतिक किमतींनुसार या शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या क्रूड ऑइलच्या किमती 40% कमी झाल्या आहेत. त्यामुळे इंधनावरील शुल्क कमी केल्यास महागाई कमी होईल आणि लोकांच्या खरेदी क्षमतेत वाढ होईल.

BSNL देणार मोफत इंटरनेट सुविधा, ‘या’ दिवसापर्यंत ऑफर मर्यादित

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | परवडणाऱ्या किमतींचा विचार केला असता, पहिले नाव येते ते म्हणजे BSNL (भारत संचार निगम लिमिटेड). बीएसएनएल दूरसंचार क्षेत्रात, विशेषतः ब्रॉडबँड मार्केटमध्ये आघाडीवर आहे. ही सरकारी दूरसंचार कंपनी आकर्षक ऑफर प्रदान करते, जी जिओ, एअरटेल आणि व्ही ला कठीण स्पर्धा देऊ शकते. BSNL आता आपल्या ग्राहकांना दोन परवडणाऱ्या ब्रॉडबँड प्लॅनसह एक महिना (३० दिवस) मोफत इंटरनेट सेवा देत आहे. हे युजर्सला बजेटमध्ये हाय-स्पीड इंटरनेटचा आनंद घेण्याची संधी देते.

BSNL ची ही सणाची ऑफर अशा ग्राहकांसाठी आहे जे त्याच्या बजेट-फ्रेंडली ब्रॉडबँड प्लॅनचे 3 महिने सदस्यत्व घेतात. ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे आणि या प्लॅनची ​​किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यामुळे उच्च डेटाची गरज असलेल्या वापरकर्त्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

BSNL फायबर बेसिक निओ प्लॅन

  • BSNL फायबर बेसिक निओ प्लानची किंमत फक्त 449 रुपये आहे. हा प्लॅन दरमहा 3.3TB (3300GB) डेटा ऑफर करतो.
  • वापरकर्ते 30Mbps हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतात, जे सामान्य मोबाइल इंटरनेट स्पीडपेक्षा खूप चांगले आहे.
  • 3300GB डेटा मर्यादा ओलांडल्यानंतर, वेग 4Mbps पर्यंत कमी होतो.
  • या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर मोफत अमर्यादित कॉलिंगचाही समावेश आहे.
  • ग्राहकांना 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन घेतल्यावर 50 रुपयांची सूट मिळेल.

BSNL फायबर बेसिक प्लॅन

  • BSNL फायबर बेसिक प्लॅनची ​​किंमत 499 रुपये आहे. हा प्लॅन 3.3TB डेटासह 50Mbps वेगवान गती प्रदान करतो.
  • डेटा मर्यादा गाठल्यानंतर, वेग 4Mbps पर्यंत कमी होतो.
  • यात मोफत अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधाही आहे.
  • 3 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनवर ग्राहकांना 100 रुपयांची सूट मिळेल.

ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत आहे

ही विशेष ऑफर केवळ 31 डिसेंबर 2024 पर्यंत उपलब्ध आहे. मोफत एक महिना इंटरनेट आणि सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांना 3 महिन्यांचा प्लॅन एकत्र खरेदी करावा लागेल. तुम्ही परवडणारे हाय-स्पीड इंटरनेट किंवा अमर्यादित कॉलिंग शोधत असाल, तर BSNL ची ही सणाची ऑफर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ; सरकारने केला 163 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Anganwadi sevika

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आम्ही आज आलेलो आहोत. ती म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता आणि मानधन या महिन्यात वाढणार आहे. राज्य सरकारने यासाठी तब्बल 163.43 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतनीस यांना लवकरच त्यांचे पैसे देखील मिळणार आहे.

नवी मुंबई मधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून वेळेवर निधी प्राप्त होत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना वेळेवर मानधन मिळत नाही. यावेळी एक बैठक झाली आणि या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम देण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला. आता या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतीनीस यांना देण्यासाठी एकूण 163.43 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने मंजुरी देखील दिली आहे. अंगणवाडी सेविकांचे राहिलेले मानधन देखील त्यांना लवकरच मिळणार आहे.

या आधीच महायुती सरकार सरकारने अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीस यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता येत्या काळात त्यांना जास्त पैसे मिळणार आहे. आत्ता अंगणवाडी सेविकांना 10 हजार रुपये आणि मदतनीस यांना 5 हजार रुपये एवढे मानधन दिले जाते. परंतु आता अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 5000 रुपयांनी आणि मदत 3000 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा महायुती सरकारने केलेली आहे. त्यामुळे येथे काळात अंगणवाडी सेविकांना 15000 रुपये आणि मदतनीस यांना 8000 रुपये मिळणार आहे.