Friday, January 2, 2026
Home Blog Page 321

अखेर मुहूर्त ठरला ! या तारखेपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी होणार सुरु

Navi Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल अनेक चर्चा चालू झालेल्या आहेत. परंतु आता या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम शेवटच्या टप्प्यात आलेले, असून 29 डिसेंबर 2024 रोजी पहिल्या व्यवसायिक विमानाचे लँडिंग देखील यशस्वीरित्या झालेले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर वायू दलाचे 295 आणि सुखोई 30 या विमानांचे यशस्वी लँडिंग झाले होते.

हाती आलेल्या माहितीनुसार नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम हे येत्या 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. आणि त्यानंतर विमानतळ चालू होणार आहे. या विमानातून एका वर्षाला जवळपास 9 कोटींपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतील असे सांगण्यात आलेले आहे. हे विमानतळ सुमारे 5945 एकर जागेवर उभारण्यात आलेले आहे. या विमानतळाचा रनवे 3. 7 किलोमीटर इतका असून एकाच वेळी 350 विमाने या ठिकाणी उभे राहू शकतात. हे विमानतळ 17 एप्रिल 2025 पासून चालू होऊ शकते, अशी ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

नवी मुंबईतील या विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा यांसारखी महत्त्वाची कामे देखील पूर्ण झालेली आहेत. महिन्याभरापूर्वी लष्कराच्या विमानाचे यशस्वी लँडिंग या ठिकाणी करण्यात आलेले होते. यावेळी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी व्यावसायिक देखील विमानात उपस्थित होते. त्या विमानाचे यशस्वी लँडिंग झाल्याने सगळ्यांना आनंद झाला होता.

New Year : न्यू इयर पार्टीसाठी महाराष्ट्रातील 5 ठिकाणे; घ्या मनसोक्त आनंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकांची नवीन वर्षाच्या ( New Year ) स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु झाली असेल. या नववर्षानिमित्त सर्व हॉटेल, रिसॉर्ट्स, आणि खासगी फार्महाऊसेसची आकर्षक सजावट पाहायला मिळते. मुंबईतील न्यू इयर पार्टीज विशेष प्रसिद्ध असल्या तरीही शांततेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रातील काही अप्रतिम ठिकाणं आहेत. जी ठिकाणे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी उत्तम पर्याय ठरतील. तर चला ती कोणती ठिकाणे आहेत हे पाहुयात.

मिनी गोवा अलिबाग –

मुंबईपासून अवघ्या 96 किमी अंतरावर असलेला अलिबाग समुद्रकिनारा आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य किनाऱ्यावर रिसॉर्ट्स किंवा फार्महाऊस बुक करून तुमचं नवीन वर्ष खास बनवू शकता. तसेच नवघर बीच हा समुद्र किनारा देखील अलिबागच्या आसपास आहे आणि इथे सफेद वाळू, आणि शांत वातावरण असल्यामुळे , या बीचवर देखील तुम्ही तुमचा प्लॅन करू शकता. येथे पोहोचण्यासाठी आपण कार, बस किंवा फेरीचा वापर करू शकता.

निसर्गरम्य हिल स्टेशन लोणावळा –

पुणे जिल्ह्यातील लोणावळा हे हिवाळ्यात स्वर्गसुखाचा अनुभव देणारं ठिकाण आहे. येथे बुशी डॅम, पवना तलाव, कार्ला लेणी यांसारखी ठिकाणे भेट देण्यासारखी आहेत. अनेक रिसॉर्ट्स आणि व्हिलामध्ये नववर्षासाठी खास पार्ट्या आयोजित केल्या जातात. त्यामुळे हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. लोणावळा हे एक अत्यंत लोकप्रिय हिल स्टेशन आहे, आणि नवीन वर्षाच्या वेळी इथे खूप पर्यटक येतात. हिवाळ्यात इथे थंड हवामान आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेता येतो. नवीन वर्षाच्या सणाच्या वेळी, लोणावळ्यात विशेष कार्यक्रम, कॅम्पिंग आणि रिसॉर्ट्समध्ये साजरे होणारे इव्हेंट्स असू शकतात. तसेच लोणावळा परिसरात ट्रेकिंग, बोटिंग, कॅम्पिंग, आणि इतर साहसी क्रियाकलापांचीही विशेष संधी आहे, ज्यामुळे तुमचा अनुभव आणखी खास होईल.

शांततेचं ठिकाण भंडारदरा –

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे हिल स्टेशन निसर्गप्रेमींसाठी उत्तम आहे. येथील रिसॉर्ट्समध्ये नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं जातं. भंडारदऱ्याच्या सुंदर वातावरणात, पर्यटकांना रिसॉर्ट्समध्ये विशेष कार्यक्रम आणि कॅम्पिंगचा आनंद घेता येईल. येथील रतनगड किल्ला, अंब्रेला फॉल्स, आणि विल्सन डॅम ही ठिकाणं नक्कीच भेट देण्याजोगी आहेत. शांती, निसर्ग आणि साहस यांचा अनोखा संगम भंडारदऱ्यात मिळतो. नवीन वर्षाच्या सणाच्या वेळी इथे एक खास अनुभव मिळेल.

महाबळेश्वर –

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय हिल स्टेशन आहे, जे आपल्या आल्हाददायक हवामान आणि स्ट्रॉबेरी शेतीसाठी प्रसिद्ध आहे. नववर्षाच्या सणासाठी महाबळेश्वरमध्ये अनेक उत्तम पार्टी ऑप्शन्स उपलब्ध आहेत. हिवाळ्यातील थंड वातावरणात निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत आपल्याला येथे खास अनुभव मिळू शकतो. महाबळेश्वरचे प्रसिद्ध पॉइंट्स, प्रकृतिक सौंदर्य आणि स्ट्रॉबेरी फार्म्स येथे भेट देण्यासारखी ठिकाणं आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या सणाच्या स्वागतासाठी हा पर्याय तुमच्यासाठी एक आदर्श ठिकाण ठरू शकतो.

नाशिक –

नाशिकमधील वाईनयार्ड्समध्ये नववर्षाच्या रात्रीचा आनंद घ्यायला अनेक पर्यटक येतात. येथे शांत आणि अनोख्या वातावरणात नवीन वर्षाचं स्वागत करता येतं. येथील सुंदर निसर्ग, शांत वातावरण आणि वाईन चाखण्याचा अनुभव एक अनोखा अनुभव देतो. त्यामुळे, जर तुम्हाला नवीन वर्ष शांत आणि आल्हाददायक वातावरणात साजरं करायचं असेल, तर नाशिक तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्यात नवीन वर्षाचा आनंद घ्यायचा असेल, तर वरील ठिकाणं तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतील.

मल्याळम अभिनेते दिलीप शंकर यांचे निधन; हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला अभिनेता

Dilip Shankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मल्याळम अभिनेता दिलीप शंकर यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिलीप शंकर येथील हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली’चप्पा कुरीशु’ आणि ‘उत्तर 24 कथा’ सारख्या चित्रपटांमध्ये आणि अनेक मालिकांमध्ये काम केलेले अभिनेते दिलीप शंकर यांनी साकारलेल्या विविध भूमिकांसाठी ओळखले जात होते. एका मालिकेच्या शूटिंगसाठी 19 डिसेंबरला तो तिरुअनंतपुरममधील एका हॉटेलमध्ये थांबले होते, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी काय सांगितले?

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी शंकरला त्याच्या खोलीत शेवटचे पाहिले होते. हॉटेल कर्मचारी आणि मालिकेच्या टीमने वारंवार केलेल्या कॉलला (50) अभिनेत्याने प्रतिसाद दिला नाही, त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

अभिनेत्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता

पोलिसांनी सांगितले की, खोली आतून बंद होती. आम्ही दरवाजा तोडला तेव्हा आम्हाला तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला.” दोन दिवसांपूर्वी शंकरचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, शंकरच्या शवविच्छेदनाच्या अहवालात खाली पडल्यानंतर डोक्याला दुखापत झाल्यानंतर अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला असावा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला यकृताशी संबंधित समस्या देखील होत्या. शंकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मल्याळम चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. पंचाग्नी या मालिकेत अखेरचा अभिनेता दिसला होता. यामध्ये त्यांनी चंद्रसेननची भूमिका साकारली होती. अलीकडेच ‘अम्मयारियाते’ या टीव्ही मालिकेत त्यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी त्यांना दाद मिळाली.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा निर्णय; या लोकांना देणार 2 लाख रुपये

Mukesh And neeta Ambani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि त्याच्या पत्नी नितेश अंबानी यांचे कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच लाईमलाईट मध्ये येत असते. मागील वर्षभरात अनंत अंबानी यांनी राधिका मर्चंट यांच्या लग्नामुळे अंबानी कुटुंब चर्चेत आले होते. अनेकदा अंबानी कुटुंब सामाजिक कार्यासाठी देखील त्यांचे हात पुढे करत असतात. नीता आणि मुकेश अंबानी हे त्यांच्या रिलायन्स समूहाकडून सामाजिक कार्य देखील करत असतात.

नीता अंबानी या रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्या गरजू मुलांसाठी, महिलांसाठी त्याचप्रमाणे रुग्णांसाठी वेगवेगळ्या घटकांपर्यंत काम करत असतात. त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या उपक्रमांमधून अनेक लोकांना मदत केलेली आहे. यामध्ये रिलायन्स फाउंडेशनने शिष्यवृत्तीचा देखील समावेश केलेला आहे. आता जे हुशार विद्यार्थी आहेत, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. यासाठी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही शिष्यवृत्ती चालू केलेली आहे. आता या शिष्यवृत्तीचा अर्ज कुठे आणि कसा भरावा हे अनेक लोकांना माहीत नसेल त्याबद्दलच आपण माहिती जाणून घेणार आहोत.

शिष्यवृत्ती अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे. आणि त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे. हा मुख्य उद्देश आहे. यासाठी उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते. रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमोटर धीरूभाई अंबानी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त रिलायन्स फाउंडेशन कडून 5 हजार पदवीधर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. 2024- 25 या वर्षासाठी जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे.

शिष्यवृत्तीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दोन लाख रुपये दिले जातात. देशातील जवळपास एक लाखा पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेले आहेत. आता शिष्यवृत्तीसाठी अर्ज कोणत्या विद्यार्थी करू शकतात. हे आपण जाणून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांच्या घरातील एकूण वार्षिक कमाई 15 लाखांपेक्षा कमी आहे.आणि जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पदवीच्या पहिल्या वर्षात आहेत. ते लोक या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. कोणत्याही शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येतो. या शिष्यवृत्तीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष कोठा राखीव ठेवण्यात आलेला आहे.

राज्यातील तापमानात होणार घट; गुलाबी थंडीने होणार नवीन वर्षाची सुरुवात

weather Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण दिसत आहे. आणि थंडी देखील कमी झालेली आहे. अरबी समुद्रात आद्रता वाढलेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. आणि गारपिटीमुळे अनेकांचे नुकसान देखील झाले आहे. परंतु उत्तर प्रदेशात धुके पसरलेले आहे. आणि काही ठिकाणी बर्फवृष्टी देखील होत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. येत्या 24 तासात विदर्भाचा तापमानाचा पारा हा 4ते 5 अंशांनी कमी होणार आहे. तसेच कोकण मध्य महाराष्ट्रातील तापमान 2 ते 4 अंश तापमान कमी होणार आहे. आणि येत्या 4 दिवसात राज्यात पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.

त्यामुळे 2025 हे नवीन वा वर्षाची सुरुवात गुलाबी थंडीने होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरडे हवामान राहणार असल्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा यासारख्या ठिकाणी आहे. आणि महाराष्ट्रातील हवामान देखील कोरडे राहणार आहे.

मागील दोन दिवस राज्यातील विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. तसेच गारपिटीने देखील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. परंतु आज म्हणजेच 30 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसणार आहे. आणि किमान तापमानमध्ये चढ-उतार होणार आहे. याबद्दलची माहिती भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

सर्जरीला जाताना डॉक्टर नेहमी हिरव्या रंगाचे कपडे का घालतात? जाणून घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांचे अनेक नियम असतात. आपण नेहमीच पाहिले आहे की हॉस्पिटलमध्ये कोणतीही शस्त्रक्रिया असल्यावर डॉक्टर हिरव्या रंगाचे कपडे घालतात. कधीकधी ते निळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करतात. परंतु कधीही त्यांना आपण निळ्या, लाल किंवा इतर कोणत्याही रंगाच्या कपड्यांमध्ये ऑपरेशनला जाताना पाहिली नाही. ऑपरेशनला जाताना हिरव्या रंगाचे कपडे घालण्यामागे काही शास्त्र आहे. जे अनेकांना माहित नाही. आज आपण त्या मागचे खरे कारण जाणून घेणार आहोत.

सर्जरीला जाताना हिरवे रंगाचे कपडे घालण्याची सुरुवात 1914 साली सुरू झाली होती. तेव्हापासून हा ट्रेंड सुरू झाला. परंतु अजूनही अनेक डॉक्टर शस्त्रक्रियेला जाताना पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालतात. परंतु हिरव्या रंगाचे कपडे घालण्या मागे एक कारण आहे. तुम्हाला अनेकांना माहीतच असेल, जेव्हा आपण भर उन्हातून घरात जातो त्यावेळी काही काळ आपल्याला डोळ्यांसमोर अंधार येतो. परंतु जर आपल्या डोळ्यासमोर अचानक हिरवा किंवा निळा रंग आला, तर आपल्याला लगेच दिसतो. ऑपरेशन थेएटरमध्ये डॉक्टरांच्या बाबतीतही असेच होते. हिरव्या आणि निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये डॉक्टर गोष्टी चांगल्या प्रकारे पाहू शकतात.

हिरव्या रंगाच्या कपड्यांवर रक्ताचे डाग पडले तरी ते तपकिरी दिसतात. त्याचप्रमाणे हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने डोळ्यांवर त्रास होत नाही. आणि शस्त्रक्रिया दरम्यान बारीकसारीक गोष्टी देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसू शकतात. यामागे मानसिक शांततेसाठी हिरव्या रंगाचे कपडे घातले जातात.

गर्भवती महिलांसाठी नवी योजना; सिझेरिअन झाल्यावर मिळतात एवढे पैसे

Janani Surksha Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत 2005 -06 या वर्षी एक नवीन योजना चालू झालेली आहे. या योजनेचे नाव जननी सुरक्षा योजना असे आहे. या योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू गर्भवती महिलांना लाभ होत आहे. अनेक महिलांना सिजेरियन ऑपरेशनचा खर्च परवडत नसतो. परंतु ही योजना त्यांच्यासाठी अत्यंत फायद्याची योजना ठरलेली आहे. ही योजना केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित होती. परंतु आता शहरी भागातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे . आता या योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना पैसे दिले जातात. ग्रामीण भागातील महिलांना डिलिव्हरीसाठी 700 रुपये दिले जातात. तर शहरी भागातील महिलांना 600 रुपये दिले. जातात त्याचप्रमाणे जर सिझेरियन डिलिव्हरी झाली तर 1500 रुपये तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळतात. शासकीय रुग्णालयासह घरी प्रसूती झालेल्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो. तसेच या योजनेअंतर्गत मातांसह बाळांची काळजी देखील योग्य पद्धतीने घेतली जाते.

अशाप्रकारे लाभ मिळतो

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही कागदपत्रासह अर्ज करावा लागतो. यामध्ये तुमच्या आधार कार्ड, बँक खात्याची माहिती दिली जाते. नंतर डीबीटी प्रणाली द्वारे महिलेच्या खात्यात पैसे जमा केले जातात. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना आर्थिक संरक्षण प्रदान करणे हा मुख्य उद्देश आहे. यामुळे बाल आणि माता मृत्यू दर देखील कमी होतो. शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिलांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात.

योजनेचा लाभ पण घेऊ शकते

दारिद्र्य रेषेखाली महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि समाधी महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो. परंतु या योजनेसाठी नोंदणी करतात गर्भवतीचे वय हे कमीत कमी 19 वर्ष असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ केवळ दोन मुलांपुरताच घेता येतो.

अर्ज कुठे करायचा

या योजनेचा अर्ज तुम्ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रिय ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालय जिल्हा आणि नगरपालिका रुग्णालय मध्येच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये करू शकता.

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु होणार

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2024 या वर्षात महाराष्ट्र सरकारने अनेक विविध योजना सुरू केल्या आहेत. महिलांसाठी देखील अनेक योजना सुरू केल्या आहेत. परंतु त्यातील लाडकी बहीण योजना खूपच गाजली. जुलै 2024 पासून या योजनेला सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महाराष्ट्रातील अनेक बहिणींना 6 हफ्ते आलेले आहे. म्हणजे आतापर्यंत 9000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी उशिरा अर्ज केलेला आहे किंवा काही महिलांना अर्ज देखील केलेला नाही. आता त्या महिलांना देखील अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे. आणि त्याची प्रोसेस कधी सुरू होणार आहे? याची अनेक जण वाट पाहत आहेत. आणि आता याच लाडक्या बहिणी योजनेच्या अर्ज करण्याच्या प्रोसेस बद्दल एक नवीन अपडेट समोर आलेली आहे.

ती म्हणजे आता ज्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज केला नाही. त्यांच्यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस पुन्हा एकदा सुरू केली जाऊ शकते. पुढील आर्थिक वर्षात महिलांना दर महिना 2100 रुपये देण्याची घोषणा केली आहे. आणि ही घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते. परंतु त्यासाठी महिलांना काही महिने वाट पाहावी लागणार आहे.

परंतु आता या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. या आधी राज्यातील जवळपास 12 लाख महिलांच्या बँक अकाउंटला त्यांच्या आधार कार्ड लिंक नव्हते. अशा महिलांना या योजनेचे पैसे आले होते परंतु ज्या महिलांनी उशिरा होईल का होईना? परंतु आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक केलेले आहे. त्यांना डिसेंबर महिन्यात एकूण 9000 रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही या योजनेचा अर्ज केला नाही. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दक्षिण कोरियात विमानाचा मोठा स्फोट; 85 जणांचा जागीच मृत्यू

South korea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दक्षिण कोरियातून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी विमानाला आग लागल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात 85 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमान बँकॉकहून परतत होते. विमानात 175 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. जहाजावर सहा क्रू मेंबर्सही होते. आपत्कालीन कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, विमान धावपट्टीवरून घसरले आणि एका भिंतीवर आदळले, त्यानंतर त्याला आग लागली. या अपघातातील मृतांचा आकडाही वाढू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान जेजू एअरचे होते आणि बोइंग ७३७-८०० होते. आग विझवल्यानंतर बचाव अधिकारी विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीचे कारण तपासले जात आहे. काही दिवसांपूर्वी कझाकिस्तानमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर ही दुर्घटना घडली होती, ज्यामध्ये 67 पैकी 38 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

दक्षिण कोरियाच्या दक्षिण-पश्चिमेकडील विमानतळावर रविवारी सकाळी १८१ जणांना घेऊन जाणारे दक्षिण कोरियाचे प्रवासी विमान कोसळले, अशी माहिती एएनआयने योनहाप न्यूज एजन्सीच्या हवाल्याने दिली. यामध्ये किमान 47 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. इतर अनेक जण जखमी झाल्याची भीती आहे. पोलिस आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

ही घटना सकाळी 9:07 वाजता घडली जेव्हा जेजू एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि सोलच्या नैऋत्येस सुमारे 288 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुएन काउंटीमधील मुसान आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कुंपणाला धडकले. विमानाच्या मागील भागात 47 मृतदेह सापडले आहेत. एकूण 85 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. 175 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स घेऊन हे विमान बँकॉकहून परतत होते. बहुतेक प्रवासी दक्षिण कोरियाचे नागरिक होते.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 1 जानेवारीपासून होणार या लोकांचे रेशन कार्ड बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशातील गरीब जनतेचा विचार करून भारत सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांनी घेतलेला आहे. आपल्या देशात अजूनही अशी परिस्थिती आहे की, अनेक लोकांना दोन वेळेचं नीट जेवण मिळत नाही. यासाठी सरकारने रेशन कार्डची सुविधा आणलेली आहे. या रेशन कार्ड द्वारे देशातील नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते. या योजनेअंतर्गत देशातील जवळपास 80 कोटी लोक फायदा घेत आहे. परंतु काही लोक याचा गैरफायदा देखील घेत आहेत. पात्रता नसताना रेशन घेत आहेत आणि आता यासाठी केंद्र सरकारने एक मोठी कारवाई केली आहे. जे लोक बनावट शिधापत्रिका वापरत आहेत, ते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

ज्या लोकांनी बनावट शिधापत्रिका तयार केलेली आहे, आणि पात्रते शिवाय त्यांना मोफत रेशन मिळत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने 1जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे. या नवीन वर्षामध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या लोकांची ओळख ही ईकेवायसी द्वारे होणार आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून देशातील अनेक लोकांचे रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे.

सरकार हरभरा, गहू साखर आणि इतर दहा स्वयंपाक घरातील वस्तू लवकरच मोफत वितरित करण्याची योजना आखत आहे. आणि अशावेळी आजकाल बनावट रेशन कार्डचे प्रमाण वाढत चालले असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. आता त्या लोकांचे रेशन कार्ड ओळखून ते कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत, जे दरवर्षी हजारो रुपयांचा आयकर भरूनही रेशन घेतात. मोठमोठ्या गाड्यात लोक येतात आणि रेशन घेऊन जातात. परंतु ज्या लोकांची खरी पात्रता आहे, त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळत नाही.

त्यामुळे आता बनावट शिधापत्रिका ओळखण्यासाठी केंद्र सरकारकडून ही ईकेवायसी लागू करण्यात आलेली आहे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांनी केवायसी कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे. यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख ठेवलेली होती. परंतु ती मुदत वाढून आता फेब्रुवारी 2025 पर्यंत मदत वाढवण्यात आलेली आहे. जर कोणीही ई केवासी केले नसेल तर त्वरित ती करून घ्या. त्यांना त्यांच्या जवळच्या रेशन दुकानात जावे लागेल. आणि POS पूर्ण करावी लागेल. शिधापत्रिकेवर नोंदणी असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनाही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.