Friday, January 2, 2026
Home Blog Page 322

Ration Card : रेशन कार्डसाठी अर्ज करण्याच्या 2 सोप्प्या प्रक्रिया जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेशन कार्ड (Ration Card) हे भारत सरकारने नागरिकांसाठी जारी केलेले महत्त्वाचे कागदपत्र आहे. याच्या मदतीने नागरिकांना फेअर प्राइस किंवा शिधा दुकानदारांकडून कमी दरात अन्नधान्य ( रेशनिंग ) खरेदी करता येते. त्यामध्ये तुम्हाला तांदूळ ,गहू, तेल अशा अनेक गोष्टी कमी किंमतीत दिल्या जातात. प्रत्येक राज्य सरकार रेशन कार्डसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देते. तर ती अर्ज प्रकिया कशी करायची ,हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर चला त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ऑनलाइन रेशन कार्डसाठी अर्ज –

ऑनलाइन रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम संबंधित राज्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रासाठी mahafood.gov.in या वेबसाइट्सवर अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध आहे. या वेबसाइटवर जाऊन, अर्ज फॉर्म भरून त्यात आवश्यक असलेली माहिती भरावी लागते. अर्ज फॉर्म भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागते, जसे की ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, आणि इतर आवश्यक कागदपत्रे . त्यानंतर, अर्जासाठी आवश्यक शुल्क भरून अर्ज सबमिट करावा लागतो. या प्रक्रियेनंतर संबंधित विभाग अर्जाचा तपास करून योग्यतेनुसार रेशन कार्ड जारी करते.

रेशनिंग कार्डसाठी ऑफलाइन अर्ज –

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम आपल्याला जवळच्या शिधा दुकानावर किंवा संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज फॉर्म मिळवावा लागतो. फॉर्म मिळविल्यानंतर, त्यामध्ये आवश्यक असलेली माहिती व्यवस्थितपणे भरून, त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जसे की ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी जोडून, संबंधित अधिकाऱ्याकडे द्यावीत . त्यानंतर, संबंधित अधिकारी अर्जाची तपासणी करून आवश्यकतेनुसार पुढील प्रक्रिया सुरू करतात. अर्ज मंजूर झाल्यानंतर, रेशन कार्ड जारी केले जाते.

रेशन कार्डचा स्टेटस असा तपासा –

रेशन कार्डच्या अर्जाचा स्टेटस तपासण्यासाठी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोर्टल (NFSA.gov.in) वापरता येते. सर्वप्रथम, nfsa.gov.in या वेबसाइटला भेट द्या. वेबसाइटवर Citizen Corner विभागात जाऊन Know Your Ration Card Status पर्याय निवडा. त्यानंतर, आवश्यक माहिती जसे की रेशन कार्ड नंबर आणि सुरक्षा कोड टाका. नंतर Get RC Details या बटणावर क्लिक करा. यानंतर, तुमच्या अर्जाचा स्टेटस स्क्रीनवर दिसेल. या माध्यमातून तुम्ही तुमच्या रेशन कार्डच्या अर्जाची स्थिती सहजपणे तपासू शकता.

IDBI बँकेच्या नवीन FD योजनेवर जास्त व्याजदर ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDBI बँकेने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) योजनांमध्ये मोठे बदल केले असून , आता त्यांनी नवीन कालावधी आणि अधिक व्याजदर असलेल्या एफडी योजना सादर केल्या आहेत. तसेच बँकेने आपल्या पूर्वीच्या विशेष एफडी योजनांच्या गुंतवणुकीची अंतिम मुदतही वाढवली आहे. हि नवीन FD योजना 555 दिवसांच्या कालावधीची असून , या योजनेत 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत गुंतवणूक करता येईल. मात्र, या एफडीवर मुदतपूर्व पैसे काढण्यास परवानगी नाही.

555 दिवसांच्या कालावधीची FD योजना –

नवीन 555 दिवसांच्या कालावधीची उत्सव एफडी योजना हि फायदेशीर ठरणार आहे. तसेच पूर्वीपासून सुरू असलेल्या 300, 375, 444 आणि 700 दिवसांच्या विशेष एफडी योजना आता 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध राहणार आहेत. उत्सव एफडीवरील व्याजदर सामान्य नागरिकांसाठी कालावधीनुसार वेगवेगळे आहेत. 300 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदर 7.05% आहे, तर 375 दिवसांच्या एफडीसाठी 7.25% व्याज दर मिळते . 444 दिवसांच्या एफडीसाठी 7.35% आणि 555 दिवसांच्या नव्या योजनेसाठी 7.40% व्याजदर आहे, जो तुलनेने अधिक लाभकारी ठरतो. 700 दिवसांच्या एफडीसाठी व्याजदर 7.20% आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक आकर्षक –

उत्सव एफडीवरील व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक आकर्षक आहेत. 300 दिवसांच्या एफडीसाठी 7.55% व्याज दर आहे, तर 375 दिवसांच्या कालावधीसाठी 7.75% व्याज मिळते. 444 दिवसांच्या एफडीसाठी 7.85% व्याजदर आणि 555 दिवसांच्या नव्या योजनेसाठी 7.90% व्याजदर आहे, जो विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरतो. 700 दिवसांच्या एफडीसाठी 7.70% व्याजदर मिळतो. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक व्याजदराचा फायदा होतो, ज्यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होऊ शकते.

सामान्य एफडीवरील व्याजदर –

सामान्य एफडीवरील व्याजदर 3.35% ते 7.30% पर्यंत असतात, आणि हे दर 3 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर लागू होतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही व्याजदर 3.50% ते 7.50% पर्यंत असतात, जे त्यांना अधिक आकर्षक ठरतात. तसेच मुदतपूर्व एफडी बंद करण्याच्या बाबतीत, ग्राहकावर बँक 1% पेनल्टी शुल्क आकारले जाते . हे शुल्क प्रामुख्याने पैसे काढण्यावर आणि स्विप-इन सुविधांवरही लागू असते, ज्यामुळे एफडीचे लवकर बंद करण्यावर अतिरिक्त शुल्काचा भार पडतो. यामुळे ग्राहकांना एफडी बंद करण्याआधी सर्व शर्ती आणि शुल्कांचा विचार करणे आवश्यक आहे. जर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

PM किसानच्या लाभार्थ्यांनी त्वरित करा हे काम; अन्यथा मिळणार नाही 19 वा हप्ता

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. अशातच आता सरकारने नवीन ॲग्री स्टेक योजना सुरू केली आहे. याअंतर्गत शेतकरी नोंदणी योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर शेतकऱ्यांनी ही नोंदणी केली नाही, तर त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. शासनाने शेतकऱ्यांसाठी आवश्यक निर्देश जारी केले आहेत. वास्तविक, ज्या शेतकऱ्यांना आधीच सन्मान निधी मिळत आहे त्यांनाही शेतकरी नोंदणी योजनेंतर्गत नोंदणी करावी लागणार आहे. जर त्यांनी नोंदणी केली नाही तर त्यांना पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.

कृषी स्टेक आणि फार्मर रजिस्ट्री योजना काय आहे?

ॲग्री स्टेक ही डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत लागू केलेली कृषी योजना आहे. यामध्ये फार्मर रजिस्ट्रीद्वारे शेतकऱ्यांचा ऑनलाइन डेटा तयार करण्यात येत आहे. या नोंदणीद्वारे, शेतकरी किसान सन्मान निधी/PM किसान सन्मान निधी तसेच इतर योजनांशी जोडला जाईल. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये या योजनेचे काम सुरू झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूपीच्या बागपत जिल्ह्यात या योजनेवर काम सुरू झाले आहे.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
किसान सन्मान निधीशी मोबाईल नंबर लिंक करा
बँक पासबुक

कुठे आणि कशी नोंदणी करावी?

  • सार्वजनिक सेवा केंद्र (CSC)
  • येथे जाऊन तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरू शकता
  • ग्रामपंचायत कार्यालय
  • पंचायत सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करा
  • गावोगावी शिबिरांचे आयोजन
  • नोंदणी शिबिराचा लाभ घ्या आणि फॉर्म भरा

यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर

Sai Paranjape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून १५ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका व नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम व महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी केली आहे. पद्मपाणी पुरस्कार निवड समितीने सई परांजपे यांच्या नावाची निवड केली असून या समितीच्या अध्यक्षपदी लतिका पाडगांवकर (पुणे) तर सदस्यपदी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रूपये असे आहे.

पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रूक्मीणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.

मागील चार दशकांहून अधिक काळापासून सई परांजपे या भारतीय सिनेजगतात कार्यरत असून त्यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी सिनेमांनी भारतीय सिनेजगताला वेगळी ओळख प्राप्त करून दिली आहे. अतिशय भावस्पर्शी, मानवी नातेसंबंधांवर भाष्य करणारे सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्पर्श (१९८०), चश्मेबद्दूर (१९८१), कथा (१९८३), दिशा (१९९०), चुडिया (१९९३), साज (१९९७) यांचा समावेश आहे. चित्रपट दिग्दर्शनासमवेत परांजपे यांनी अनेक महत्वपूर्ण नाटकांचे व बालनाट्यांचे देखील दिग्दर्शन केलेले आहे. तसेच त्यांनी मराठी साहित्यात विपुल प्रमाणात लेखन केले असून प्रामुख्याने बालसाहित्याचा त्यात समावेश होतो. २००६ साली भारत सरकारने परांजपे यांना त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरविले आहे. तसेच फिल्मफेअर पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी या केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण संस्थेवर देखील परांजपे यांनी सलग दोनदा अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे.

नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा केंद्रीय सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. सॉलीटेअर टॉवर्स, अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अ‍ॅकॅडमीक पार्टनर आहेत.

छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्‍या या महोत्सवात अधिकाधिक रसिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, शिव कदम, आकाश कागलीवाल, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, प्रेरणा दळवी, सुबोध जाधव, अमित पाटील आदींनी केले आहे.

व्हॉट्सॲपने लॉन्च केले नवे फीचर; फेक फोटोंपासून बचाव होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | व्हॉट्सॲप आपल्या मोबाइल युजरसाठी तसेच वेबयुजरसाठी सतत नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता वेब युजरना रिव्हर्स इमेज सर्च मिळणार आहे. या फीचरमध्ये यूजर्स गुगलला मिळालेला कोणताही फोटो लगेच व्हेरिफाय करू शकतील. यामुळे त्यांना मिळालेला कोणताही फोटो खरा आहे की नाही हे शोधणे त्यांना सोपे जाईल. या वैशिष्ट्यावर काम सुरू आहे..

या वैशिष्ट्याचा काय फायदा होईल?

आजकाल इंटरनेटवर खूप खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती आहे. अनेकवेळा असे दावे बनावट फोटोसह केले जातात, ज्यामुळे समाजात अशांतता पसरते आणि हिंसाचाराचा धोकाही असतो. याशिवाय, एआयच्या आगमनानंतर, असे फोटो देखील शेअ केली जात आहेत जी वास्तविक दिसतात, परंतु ती चुकीच्या हेतूने सोशल मीडियावर प्रसारित केली जातात.

हे फीचर सुरू केल्याने, अशा फोटोंची Google सोबत पडताळणी करणे सोपे होईल आणि युजरना त्यामागील सत्य जाणून घेता येईल. या वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते खोट्या बातम्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतील आणि इंटरनेटला एक चांगले आणि विश्वासार्ह स्थान बनविण्यात मदत करतील.

वैशिष्ट्य कसे कार्य करेल?

व्हॉट्सॲप वेबवर येणाऱ्या या वैशिष्ट्याच्या मदतीने, युजर थेट Google वर ॲपवरील कोणताही फोटो उलट शोधण्यास सक्षम असतील. आतापर्यंत त्यांना रिव्हर्स सर्च करण्यासाठी इमेज डाऊनलोड करून गुगलवर अपलोड करावी लागत होती. आता वेबवर सर्च करण्याचा पर्याय थेट ॲपवर इमेजच्या वर दिसणाऱ्या 3 डॉट्समध्ये दिसेल. यावर क्लिक करून यूजर्स गुगलवर कोणतीही इमेज शोधू शकतील. गुगलवर उपलब्ध असल्यास, मूळ वेबसाइटला भेट देऊन त्याचे संपूर्ण संदर्भ मिळू शकतात.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या मृत्यूनंतर सरकारचा मोठा निर्णय; स्मारक बांधण्यास दिली परवानगी

Manmohan Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी म्हणजेच 26 डिसेंबर रोजी 92 व्या वर्षी निधन झालेले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरलेली आहे. तसेच देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा देखील राबवण्यात आलेला आहे. आता मनमोहन सिंग यांचे स्वतंत्र स्मारक उभारावे अशी मागणी आता काँग्रेस नेत्यांकडून केली जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 28 डिसेंबर रोजी स्मारकासाठी जागा मागितलेली आहे. त्यामुळे आता मनमोहन सिंग यांच्या नावाने स्मारक बांधले जाणार आहे. आणि कॅबिनेटमध्ये झालेल्या बैठकीच्या संदर्भात निर्णय देखील घेण्यात आलेला आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी म्हणजेच आज दिनांक 28 डिसेंबर रोजी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. देशाच्या माजी पंतप्रधानांचे स्मारक बांधण्यासाठी सरकारला जागा देखील मिळू शकली नाही. या देशातील पहिल्या शीख पंतप्रधानांचा अपमान असल्याचे देखील काँग्रेस नेत्यांनी म्हटलेले आहे. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असलेल्या ठिकाणी स्मारक उभारणी द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारकडे केलेली होती. यानंतर केंद्र सरकारने देखील स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल गृह मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध पत्रक जाहीर केले आहे.

आज सकाळी 8 वाजता मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या कार्यालयात ठेवण्यात आलेले होते. त्या ठिकाणी साडेआठ ते साडेनऊ या दरम्यान त्यांच्या पाठीवरचे अंत्यदर्शन घेता येणार होते. आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर नवी दिल्ली या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत. जाहीर केलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करून घेतले जावेत. त्यानंतर विश्वस्त मंडळ स्थापन करावे लागेल आहे. या विश्वस्त मंडळाची स्थापना झाल्यावर मनमोहन सिंग यांचे स्मृती स्थळ उभारले जाईल अशी माहिती सांगण्यात आलेली आहे.

राज्यातून थंडी गायब होणार; अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात सर्वत्र थंडी चालू असताना, पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झालेला आहे. सर्वत्र आता ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे आणि हिवाळ्या जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणात मोठा बदल झाल्याने दुसरीकडे थंडी देखील गायब होताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 28 डिसेंबर रोजी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडत होती. परंतु वातावरण बदलले आणि अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता बदलण्यात आलेली आहे. पुढील काही दिवस देखील पाऊसासाठी पोषक असे वातावरण असणार आहे. त्यामुळे 29 डिसेंबर पर्यंत उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र धुके पसरले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात धुके होते की, 200 ते 300 मीटर अंतरावरील वाहने, इमारती देखील दिसत नव्हत्या. परंतु शनिवारी पहाटेपर्यंत पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तसेच काही परिसरात गारपिटीसह पाऊस पडणार आहे. रविवारी विदर्भ मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी देखील हवामान स्थिर राहणार आहे. तसेच सोमवारपासून पुन्हा एकदा थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. जर तुम्ही कोणतीही पिकांचे काम करत असाल, तर ते लवकरात लवकर करा. नाहीतर तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा परिणाम हरभरा, गहू तुर या पिकांवर होणार आहे

संतोष देशमुखांची हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मर्डर करणाऱ्या तिघांची हत्या

Santosh Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बीड जिल्ह्यातील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे. आणि आता याच प्रकरणासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तीन आरोपींचा खून झाला असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेला आहे. त्यांच्या या दाव्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे. बीड मधील राजकीय गुन्हेगारीचा आणि गुंडाशाहीचा प्रश्न सारखा समोर येत आहे. आणि यामुळेच पोलिस यंत्रणा आणि सीआयडीच्या तपासावर मोठे प्रश्नचिन्ह देखील उपलब्ध केले जात आहे. सरपंच संतोष देसाई यांच्या आरोपींना अटक करा अशी मागणी लोकांनी केलेली आहे. आणि त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी बीडमध्ये आज मूळ मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. आणि तोपर्यंत आता यामुळे मूक मोर्चामध्ये अंजली दमनिया या सहभागी येणार नाही, तर त्या ठिय्या आंदोलन करणार आहेत. आणि संतोष देशमुख यांना न्यान मिळवून देणार आहे असे माहिती त्यांनी दिलेली आहे.

बीड मधील सर्वपक्षीय मोर्चा बद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी सांगितले की, “सध्या तेथे राजकीय नाटक सुरू झालेले आहे. दीपक क्षीरसागर, सुरेश धस हे दुसरे धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडच आहेत. ते आपापल्या क्षेत्रातील काम करतात. अशा लोकांनी बोलावं हे हास्यास्पद आहे. आम्ही हातभर माणसं जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा स्वीकारत नाही आणि वाल्मीक कराडला अटक केली जात नाही. तोपर्यंत या आंदोलन करणार आहे.”

यापुढे अंजली दमानिया यांनी सांगितले की, “आरोपींना अटक करण्याची मागणी घेऊन आम्ही आलो होतो. परंतु मला एक अत्यंत धक्कादायक बातमी सांगायची आहे. ती म्हणजे काल रात्री जवळपासच्या 11. 30 आसपास मला फोन आला आणि त्यात सांगण्यात आले की, ते तीन आरोपी आता तुम्हाला कधीच मिळणार नाही. कारण त्यांचा मर्डर झालेला आहे. हे ऐकून धक्कादायक आहे. मी ताबडतोब पोलीस निरीक्षकांना फोन करून त्याची माहिती दिली. ते मेसेज त्यांना सांगितले. त्याची चौकशी ते करतील परंतु मला यात कितीपत सत्यता आहे हे ठाऊक नाही. परंतु जर असं झालं असेल तर हे अत्यंत भयानक आहे.”

पुणे विमानतळाचा नवा विक्रम ; नोव्हेंबरमध्ये 9 लाखांहून अधिक प्रवाशांनी घेतली भरारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाने नोव्हेंबर महिन्यात विक्रमी प्रवासी संख्या नोंदवली आहे. या महिन्यात एकूण 9 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते, ज्यामध्ये 8.80 लाख प्रवासी देशांतर्गत होते तर 20,554 प्रवासी आंतरराष्ट्रीय होते. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये 44% वाढ झाली असून देशांतर्गत प्रवाशांमध्ये 5% वाढ झाली आहे. यात 8.44 लाख घरेलू प्रवासी आणि 14,238 आंतरराष्ट्रीय प्रवासी होते.

नोव्हेंबरमधील प्रवासी संख्या सर्वाधिक –

नोव्हेंबरमधील प्रवासी संख्या या वर्षातील सर्वाधिक असून यापूर्वी मे महिन्यात 8.94 लाख प्रवाशांचा विक्रम झाला होता. पुणे विमानतळाचे संचालक संतोष धोके यांनी नवीन उड्डाणे आणि प्रादेशिक संपर्क वाढीच्या उपक्रमांमुळे ही वाढ झाल्याचे सांगितले आहे . या वाढीचे श्रेय नवीन उड्डाणे सुरू करण्यास आणि शहराच्या आंतरराष्ट्रीय व घरेलू प्रवेशासाठी सुरू केलेल्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी उपक्रमांना दिले, ज्यामुळे पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून प्रवास करणे अधिक सोयीस्कर झाले आहे .

तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी पाच उड्डाणे –

सध्या पुणे विमानतळावरून सिंगापूर, बँकॉक आणि दुबई या तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी पाच उड्डाणे सुरू आहेत. याशिवाय एका दिवसात 102 आगमन आणि 102 प्रस्थानांची विक्रमी नोंदही विमानतळाने केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या सुविधा आणि ऑपरेशनल व्यवस्थापन नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीत (NITB) हलविण्यात आले आहे. पण इंडिगो आणि FLY91 सारख्या देशांतर्गत विमान कंपन्या अजून जुन्या टर्मिनलवरून कार्यरत आहेत. लवकरच त्या नव्या टर्मिनलमध्ये हलविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव –

महाराष्ट्र विधानसभेने नुकत्याच घेतलेल्या ठरावानुसार पुणे विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याचा प्रस्ताव केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. या नामांतराचा उद्देश विमानतळाच्या वाढत्या महत्त्वाला अधोरेखित करणे असून, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ करते आहे.

भारतीय रेल्वे लाँच करणार 200 वंदे भारत स्लीपर ट्रेन; प्रवास होणार आणखी सोप्पा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे 200 वंदे भारत स्लीपर ट्रेन्स ( Vande Bharat Sleeper Trains) लाँच करण्याची तयारी करत असून , यामुळे दीर्घ आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे. तसेच याचा मुख्य उद्देश भारतातील लांब पल्ल्याच्या प्रवासाचा अनुभव बदलणे आहे. वंदे भारत चेअर कार ट्रेनच्या यशानंतर आता स्लीपर ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देण्याचा रेल्वेचा हेतू आहे. त्यामुळे लांब आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

पहिल्या रेकचे प्रोटोटाइप –

BEML कंपनीने तयार केलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या रेकचे प्रोटोटाइप सध्या लखनऊच्या संशोधन डिझाइन्स आणि मानक संघटना (RDSO) यांच्या देखरेखीखाली चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. या चाचण्या विविध भारद्वारे 130 किमी/तास ते 180 किमी/तास वेगाने होणार आहेत. 16 डब्यांच्या या रेकमध्ये Class I ते Class III च्या सुविधा असून प्रवाशांच्या सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी कडक चाचण्या घेतल्या जात आहेत.

200 स्लीपर ट्रेन तयार करण्याचे नियोजन –

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे की , सध्या 10 वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उत्पादन सुरू असून एकूण 200 स्लीपर ट्रेन तयार करण्याचे नियोजन आहे. चाचण्यांचे निकाल आल्यावर वेळापत्रकानुसार उत्पादन प्रक्रियेला गती दिली जाईल. या स्लीपर ट्रेन प्रवाशांसाठी अधिक जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा निर्माण करतील.

LHB च्या उत्पादनात वाढ –

सध्या 136 वंदे भारत चेअर कार ट्रेन इलेक्ट्रिफाइड ब्रॉड गेज मार्गावर चालत आहेत आणि त्यांचा प्रवासी दर 100 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. याशिवाय, भारतीय रेल्वेने Linke Hofmann Busch (LHB) कोचचे उत्पादनही वाढवले आहे. 2014 ते 2024 या कालावधीत 36933 कोच तयार करण्यात आले आहेत. , जे कि मागील दशकाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. हा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीला अनुसरून रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या व्यावसायिक सेवेला येत्या काही वर्षांत सुरुवात होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुखकर होणार आहे. त्यामुळे प्रवासातील अडथळे कमी होणार आहेत.