Friday, January 2, 2026
Home Blog Page 324

VI ने आणला 128 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; 12 तास मिळणार फ्री इंटरनेटचा अनुभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. त्यातील वोडाफोन आयडिया ही भारतातील तिसरी मोठी टेलिकॉम कंपनी आहे. वोडाफोन आयडिया त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लॅन लॉन्च करत असतात. अलीकडेच वोडाफोन आयडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केलेला आहे. या आधीपासूनच अनेक प्रीपेड प्लॅन आहेत. त्यात काही त्यांनी बदल केलेले आहेत. वोडाफोन आयडियाने नवीन सुपर हिरो पॅक आणि हिरो पॅक लॉन्च केलेले आहेत. यामध्ये युजर्सला जास्त डेटा आणि जास्त दिवसाची व्हॅलिडीटी उपलब्ध होणार आहे. आता वोडाफोन आयडियाने कोणते प्लॅन आणले आहेत? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

वोडाफोन आयडिया सुपर हीरो प्लॅन्स

वोडाफोन आयडियाने सुपरहिरो प्लॅन लॉन्च केलेला आहे. यामध्ये जास्त डाटा मिळणार आहे. ज्या लोकांना जास्त डेटाची गरज असते. त्यांच्यासाठी हा आपल्या अत्यंत योग्य प्लॅन ठरणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला तर रोज 2 जीबी पेक्षा जास्त डाटा मिळणार आहे. तसेच मध्यरात्री 12 ते दुपारी 12 पर्यंत अनलिमिटेड डेटाचा लाभ मिळणार आहे. वोडाफोन आयडिया प्लॅनची सुरुवात 365 रुपयांपासून होते. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 365 रुपये, 379 रुपये, 407 रुपये, 449 रुपये, 539 रुपये आणि 649 रुपये अशा वेगवेगळ्या रिचार्ज प्लॅनचे ऑप्शन मिळतात. खास करून तरुणांना लक्षात घेऊन हे डेटा प्लॅन तयार केलेले आहेत.

वोडाफोन आयडियाने याआधी हिरो अनलिमिटेड प्लॅन लॉन्च केला होता. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. यामध्ये युजर्सला रात्री अनलिमिटेड डेटा वापरण्याची सुविधा मिळते. हा प्लॅन तुम्हाला 349 रुपये, 579 रुपये, 666 रुपये, 799 मध्ये मिळतो. यामध्ये तुम्हाला अतिरिक्त डाटा देखील मिळत आहे. तसेच 5g डेटाची सुविधा देखील यामध्ये आहे.

वोडाफोन आयडियाचा 128 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

वोडाफोन आयडियाने 128 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन देखील लॉन्च केला आहे. हा एक परवडणारा प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता 18 दिवसांची असते. यामध्ये तुम्हाला 10 लोकल नाईट मिनिट्स आणि शंभर MB डेटा मिळतो.

Holidays List : महाराष्ट्र सरकारने जाहीर केली 2025 साठी 24 सार्वजनिक सुट्ट्यांची यादी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकजण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपापल्या घरात कॅलेंडर घेऊन येत असतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत यंदा किती सार्वजनिक सुट्ट्या ( Holidays ) आहेत , हे शोधत असतात. यासाठी महाराष्ट्र सरकारने 4 डिसेंबर 2024 रोजी एक अधिसूचना जारी केली असून , 2025 या वर्षासाठी सार्वजनिक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. तसेच या सुट्ट्या 1881 च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या (Negotiable Instruments Act ) कलम 25 अंतर्गत देण्यात आल्या आहेत. राज्यातील सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी 24 सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तर चला जाणून घेऊयात कोणत्या दिवशी या सुट्ट्या मिळतील .

2025 वर्षासाठी सुट्ट्यांची यादी –

26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असणार असून , या दिवशी रविवार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी , महाशिवरात्री 26 फेब्रुवारी , होळी 14 मार्च , गुढीपाडवा 30 मार्च , रमजान-ईद 31 मार्च , राम नवमी 6 एप्रिल , महावीर जन्मकल्याणक 10 एप्रिल , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल , गुड फ्रायडे 18 एप्रिल , महाराष्ट्र दिन 1 मे , बुद्ध पौर्णिमा 12 मे , बकरी ईद 7 जून , मोहरम 6 जुलै , स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट , पारसी नववर्ष 15 ऑगस्ट , गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट , ईद-ए-मिलाद 5 सप्टेंबर , महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर , दसरा 2 ऑक्टोबर , दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन ) 21 ऑक्टोबर , दिवाळी (बलिप्रतिपदा) 22 ऑक्टोबर , गुरु नानक जयंती 5 नोव्हेंबर , ख्रिसमस 25 डिसेंबर बुधवारला साजरा केला जाईल. त्यामुळे या सर्व दिवशी सर्वाना सार्वजनिक सुट्ट्या ( public holidays list 2025 ) असणार आहेत.

सार्वजनिक सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त एक सुट्टी जास्त –

महाराष्ट्र सरकारने 24 सार्वजनिक सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त गुरुवार , 23 ऑक्टोबर 2025 रोजी भाऊबीज ही अतिरिक्त सुट्टी म्हणून जाहीर केली आहे. ही सुट्टी राज्यातील सरकारी कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, तसेच महानगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांसारख्या स्थानिक संस्था आणि कार्यालयांसाठी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सर्व संस्थांमध्ये कामकाज थांबवून कर्मचारी आणि नागरिकांना भाऊबीज सण साजरा करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होईल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत या महिलांना मिळणार 9 हजार रुपये; अदिती तटकरे यांनी दिली माहिती

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2024 मध्ये महायुती सरकारने महाराष्ट्रात अनेक नवनवीन योजना अमलात आणल्या. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये देण्यात आलेले आहेत. नोव्हेंबर पर्यंतचे सगळे हप्ते महिलांच्या खात्याचा जमा झालेले आहेत. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांमुळे महिलांना पैसे मिळाले नव्हते. परंतु आता पुन्हा एकदा डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला लिंक आहे. त्यांनाच केवळ या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि आता याच योजनेबाबत नवीन आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड सिडींग असणे खूप गरजेचे असते. जर तुमचे आधार कार्ड सिडींग नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाही. त्याचप्रमाणे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात अर्ज केला होता. त्यांचे आधार कार्ड सिडींग नसेल, आता त्यांनी ते लिंक केले असेल, तर त्यांना हे पैसे मिळणार आहेत. याची माहिती देखील आदिती तटकरे यांनी दिलेली आहे

आदित्य तटकरे यांना जून आणि जुलैमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना आधार कार्ड सिडींग नव्हते त्यांना पैसे मिळणार का?असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, “आम्ही सुरुवातीपासून जाहीर केले होते. तेव्हा यामध्ये नमूद केले होते की जुलै आणि ऑगस्ट मध्ये ज्या महिलांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे अर्ज मान्य झालेले आहेत. त्यांना त्या दिवसापासून पैसे दिले जाणार आहेत. त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या दिवसापासून लाभ मिळणार आहे. परंतु आधार सिडींगमुळे ज्यांना पैसे मिळाले नाही, त्यांना आता या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत

ऑक्टोबर महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रजिस्ट्रेशन केलेल्या महिलांना 7500 रुपये जमा झालेले होते. परंतु ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाही. त्यांनी जर रजिस्ट्रेशन केले असेल, तर त्यांना या महिन्यापासून पैसे मिळणार आहे. म्हणजेच त्या महिलांना आता डिसेंबर महिन्यात एकूण 9000 रुपये मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

विधानसभा निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना 2100 रुपये चालू होणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिलेले आहे. परंतु हे पैसे आता मार्च महिन्यानंतर महिलांना देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती देखील अदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

क्रेडिट कार्ड खरेदी करताना सावधान! मार्केटमध्ये सुरु झाला नवा स्कॅम

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात आर्थिक क्षेत्रात खूप मोठी प्रगती झालेली आहे. आता सगळेच व्यवहार डिजिटल पद्धतीने व्हायला लागलेले आहेत. त्याचप्रमाणे आजकाल क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत चाललेली आहे. अगदी सामान्यपणे सगळेच लोक त्याचा सर्रास वापर करतात. बहुतांश नोकरदार वर्गाकडे देखील आजकाल क्रेडिट कार्ड असतात. केवळ बँका नाहीतर फायनान्स कंपनीने देखील या क्षेत्रात आता प्रगती केलेली आहे. एका कॉलवर तुम्हाला सहज नवीन क्रेडिट कार्ड मिळवणे सोप्पे झाले आहे. परंतु प्रत्येक गोष्टीचे काही ना काही फायदे आणि तोटे असतात. क्रेडिट कार्डचे ज्याप्रमाणे आपल्याला फायदा घेता येतात, तसेच अनेक घोटाळे देखील समोर आलेले आहेत. मार्केटमध्ये सध्या नवीन क्रेडिट कार्डचा स्कॅम चालू झालेला आहे. तरुणांसोबत खास असे प्रकाश घडताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे ज्या नोकरदार वर्गांच्या पगार कमी आहे. त्यांच्यासाठी ही एक धोक्याची घंटा आहे. कारण अशा लोकांना लक्ष करून त्यांचा सीबील स्कोर खराब होत आहे.

भारतातील डेटा गोपनीयता कायद्याचा चुकीचा फायदा घेऊन अनेक एजन्सी लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करतात. तसेच तुम्हाला कॉल करतात आणि मोठी मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड घेण्यासाठी सांगतात. या क्रेडिट कार्डवर तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त क्रेडिट लिमिट आहे, असे सांगून आमिष दाखवतात. ते तुम्हाला हे क्रेडिट कार्ड खरेदी करण्यासाठी फोर्स करतात. क्रेडिट कार्डची मोठ्या रकमेची लिमिट पाहून अनेक सामान्य लोक फसतात. परंतु जेव्हा तुम्ही या क्रेडिट कार्ड साठी अर्ज करता आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करता. त्यावेळी अगदी कमी मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड ते तुम्हाला देतात. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला त्यांनी 50000 रुपयांचे लिमिट असलेले क्रेडिट कार्ड देऊन असे सांगितले असेल, तर प्रत्यक्षात केवळ 25 हजार मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड दिले जाते. परंतु असे काही घडल्यास त्याचा तुमच्यावर क्रेडिट स्कोरवर मोठा परिणाम होतो

सिबिल स्कोर कसा खराब होतो

क्रेडिट कार्डचा वापर एक प्रकारचा कर्जाप्रमाणे केला जात. तुम्ही जर क्रेडिट मर्यादेचा मोठा भाग खर्च केला, तर तुमच्या क्रेडिट स्कोरवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. म्हणजेच जर तुमची मर्यादा 25 हजाराची असेल, आणि तुम्ही 20 हजार रुपये खर्च करत असाल तर तुमचा युटीलायझेशन रेशो 75 टक्के होईल. आणि हा रेशो 30% पेक्षा कमी असावा. परंतु असे न झाल्याने तुमचा सीबील स्कोर खराब होऊ शकतो.

फसवणूक कशी टाळायची ?

अशाप्रकारे फसवून होऊ नये म्हणून तुम्ही थेट बँकांची संपर्क साधावा. नवीन क्रेडिट कार्डवर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इतरत्र कुठेही न जाता थेट बँकेची संपर्क साधून हे क्रेडिट कार्ड घ्यावे. बँकेने दिलेली माहिती ही जास्त विश्वासहार्य आणि सुरक्षित असते. जर कोणती एजन्सी तुम्हाला फोन करून क्रेडिट कार्ड ऑफर करत असेल, तर अशा कोणत्याही स्कॅमला बळी पडू नका

TCS ची मोठी घोषणा ; BSNL 4G-5G सेवा 2025 मध्ये सुरू होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय दूरसंचार कंपनी बीएसएनएलचे (BSNL) ग्राहक खूप दिवसापासून 4G आणि 5G सेवेची वाट पाहत होते. हि सेवा आता 2025 मध्ये सुरू होणार असून , टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. टीसीएसचे मुख्य परिचालन अधिकारी एन. गणपति सुब्रमण्यम यांनी सांगितले की, बीएसएनएलची हाय-स्पीड नेटवर्क सेवा वेळेवरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

2025 पासून 5G नेटवर्क सुरू –

दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याआधी सांगितले कि , बीएसएनएल 2025 च्या मे महिन्यापर्यंत देशभरात एक लाख ठिकाणी 4G सेवा सुरू करणार आहे. त्याचसोबत जून 2025 पासून 5G नेटवर्कही सुरू होईल. टीसीएस आणि तेजस नेटवर्क्स या भारतीय कंपन्या या प्रकल्पावर काम करत असून, हा पूर्णपणे स्वदेशी नेटवर्क असेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास मदत होणार आहे.

सर्व कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण –

टीसीएसने सांगितले आहे की या प्रकल्पाच्या कामात कोणतीही अडचण नाही आणि सर्व कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण केली जातील. कंपनीला 2023 च्या जुलै महिन्यात हा प्रकल्प सोपवण्यात आला होता आणि त्यासाठी 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच आता तो येत्या नवीन वर्षात यशस्वी होईल. त्यामुळे बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी लवकरच 4G आणि 5G सेवांसंबंधी अधिक माहिती देईल. या सेवांमुळे लाखो ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ मिळणार आहे.

प्रकल्पासाठी मजबूत पायाभूत सुविधा तयार –

मोदी सरकारने या सेवांसाठी भारतीय तंत्रज्ञान आणि संसाधनांचा वापर करण्यावर भर दिला आहे. टीसीएस आणि तेजस नेटवर्क्सने या प्रकल्पासाठी मजबूत पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. यामुळे 2025 मध्ये बीएसएनएल 4G आणि 5G सेवा देशभरात यशस्वीपणे सुरू होणार असल्याची अशा वर्तवली जात आहे.

BSNL चा परवडणारा रिचार्ज प्लॅन ; 2399 रुपयांत 395 दिवसांची व्हॅलिडिटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही महिन्यांपासून जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (vi) सारख्या कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक चिंतेत होते. याच काळात बीएसएनएलने नवनवीन प्लॅन आणून लोकांचे लक्ष आकर्षित करून घेतले . त्याचाच परिमाण म्हणजे असंख्य ग्राहक बीएसएनएलकडे वळताना दिसत आहेत. तसेच आता बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी 2399 रुपयांचा एक खास प्लॅन बाजारात आणला असून, ज्यामध्ये ग्राहकांना 395 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. हा प्लॅन बाजारातील इतर कंपन्यांच्या तुलनेत वेगळा आहे आणि आकर्षिक ठरणार आहे. तर चला या प्लॅन बदल अधिक माहिती जाणून घेऊयात .

BSNL चा 2399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

या 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनेक आकर्षक फायदे आहेत. सर्वप्रथम या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो, ज्यामुळे ग्राहकांना कॉलिंगसाठी कोणत्याही प्रकारची चिंता नाही. दुसरे म्हणजे या प्लानमध्ये रोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो, ज्यामुळे इंटरनेट ब्राउझिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि सोशल मीडिया वापरणे सोपे होते. तसेच यामध्ये एकूण 395 दिवसांसाठी 790GB डेटा उपलब्ध आहे, आणि डेटा संपल्यानंतरही 40Kbps वेगाने डेटा वापरण्याची सुविधा मिळणार आहे . त्याचबरोबर, रोज 100 मोफत एसएमएस मिळतात, जे मॅसेज पाठवण्यासाठी आदर्श आहेत. एकूणच, हा प्लॅन ग्राहकांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, भरपूर डेटा आणि एसएमएस सुविधा देतो, ज्यामुळे ग्राहकांना अधिक फायदे मिळतात.

प्रत्येक दिवशी केवळ 6 रुपये खर्च –

बीएसएनएलचा 2399 रुपयांचा प्लॅन ग्राहकांना एक आकर्षक ऑफर प्रदान करत आहे, ज्यामुळे प्रत्येक दिवशी केवळ 6 रुपयांमध्ये उत्तम डेटा आणि मोठी व्हॅलिडिटी मिळवता येते. या प्लॅनची प्रमुख फायदेशीर गोष्टी म्हणजे वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही, आणि ग्राहकांना कमी खर्चात अधिक डेटा मिळतो. यामुळे बीएसएनएलला ग्राहकांमध्ये लोकप्रियता मिळाली असून, बाजारात आपली खास ओळख निर्माण केली आहे. सवलतीमुळे बीएसएनएलने मोठ्या प्रमाणावर नवीन ग्राहक आकर्षित केले आहेत, ज्यामुळे त्याचे ग्राहकसंख्या वाढली आहे आणि कंपनीला इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी ओळख मिळवता आली आहे.

1 जानेवारीपासून बदलणार हे 5 नियम; खिशाला बसणार कात्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 हे वर्ष येत्या पाच ते सहा दिवसात संपणार असून , त्यानंतर 2025 या नववर्षाची सुरुवात होणार आहे. या सुरु होणाऱ्या वर्षात अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि धोरणात्मक बदल लागू केले जाणार आहेत. म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून वेगवेगळ्या क्षेत्रातील होणाऱ्या बदलाचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसणार आहे. तर हे बदल कोणते आहेत , आणि त्याचा परिणाम लोकांवर कसा होईल हे आज आपण पाहणार आहोत . तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Amazon Prime मध्ये बदल –

Amazon Prime या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्याची संख्या प्रचंड असून , हि बातमी त्यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. Amazon India ने प्राइम मेंबरशिपच्या अटींमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, प्राइम व्हिडिओ आता एका खात्यातून केवळ दोन टीव्हीवरच स्ट्रीम होऊ शकतो. यापेक्षा जास्त टीव्हीवर स्ट्रीम करण्यासाठी अतिरिक्त सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना त्याचा तोटा होऊ शकतो.

GST पोर्टलवर तीन महत्त्वाचे बदल –

GST हा जीवनाचा एक अविभाज भाग बनला असून, आता GST पोर्टलवर तीन महत्त्वाचे बदल होणार आहेत. ई-वे बिलाच्या मर्यादा आणि व्हॅलिडिटीत सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच पोर्टलवर सुरक्षिततेसाठी नवीन नियम लागू होणार आहेत, ज्याचा खरेदीदार, विक्रेता आणि वाहतूकदार यांच्यावर परिणाम होताना दिसणार आहे.

RBI च्या FD धोरणातील बदल –

आपले सर्व व्यवहार बँकांनाच्या माध्यमातून चालत असतात. त्यामुळे हि माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. रिझर्व्ह बँकेने NBFC आणि HFC यांच्यासाठी मुदत ठेवीच्या धोरणांमध्ये बदल जाहीर केला आहे. ठेवींच्या विम्यासह, ठेवींच्या व्याजदरांवरही याचा परिणाम होऊ शकतो. हे बदल नववर्षाच्या पहिल्या तारखेपासून करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांवर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो.

कार आणि एलपीजी दरात बदल –

मारुती सुझुकी, महिंद्रा, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू यांसारख्या कंपन्या 3% किमती वाढवणार आहेत. तसेच यासोबत एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसोबत इतर लोकांवरही याचा परिमाण दिसून येणार आहे.

दूरसंचार कंपनीचे नवीन नियम –

या सर्व बदलासोबतच दूरसंचार कंपन्या नवीन नियम लागू करणार आहेत. त्यासाठी कंपन्यांना अधिकाधिक ऑप्टिकल फायबर आणि मोबाइल टॉवर बसवण्यावर भर दिला आहे. या धोरणामुळे नेटवर्क सुधारणा होईल आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळेल.

मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ वाचणार; उभारला जातोय सर्वात उंच केबल ब्रिज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई आणि पुणे हि दोन महत्वाची शहरे असल्यामुळे तिथे वाहतुकीच्या अनेक समस्या उभारतात. या समस्यांवर उपाय करण्यासाठी सरकार विविध योजनांची आखणी करत असते. त्यामुळेच या दोन शहरांदरम्यान होणारा प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान करण्यासाठी मिसिंग लिंक केबल ब्रिज प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकल्पामुळे प्रवासातील अंतर तब्बल सहा किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच खोपोली ते कूसगाव यादरम्यानच्या 13.3 किमी अंतरावर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल. तर चला या प्रकल्पाबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

मुंबई ते पुणे प्रवास –

सध्या मुंबई-पुणे प्रवास करताना खोपोली घाटात वाहतूक कोंडी, अपघात, आणि पावसाळ्यात होणाऱ्या भूस्खलनामुळे अनेक समस्या निर्माण होतात . या समस्या सोडवण्यासाठी या प्रकल्पांतर्गत दोन बोगदे आणि दोन केबल ब्रिज उभारले जात आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. तसेच हा प्रकल्प देशातील सर्वात उंच केबल ब्रिजचा मान पटकावणार असून याची उंची 183 मीटर आहे. दोन डोंगरांदरम्यान बांधला जाणारा हा ब्रिज 250 किमी/ताशी वाऱ्याचा वेग सहन करण्यासाठी क्षमता आहे. तसेच येथे वाहने येथे 100 किमी/ताशी वेगाने प्रवास करू शकतील.

मुंबईहून पुणे वेळ 25 मिनिटांनी कमी होणार –

सध्याच्या मार्गापेक्षा हा नवीन रस्ता 6 किमीने कमी असून मुंबईहून पुण्याला पोहोचण्याचा वेळ सुमारे 25 मिनिटांनी कमी होणार आहे. खोपोली एक्झिटपासून सिंहगड इन्स्टिट्यूटदरम्यानचे अंतर 19 किमीवरून 13.3 किमीवर येणार आहे. त्याचसोबत या प्रकल्पात 11 किमीचे बोगदे आणि 2 किमीचे केबल ब्रिज असणार आहेत. दोन्ही बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून फिनिशिंगचे काम सुरू आहे. 850 मीटर लांब आणि 26 मीटर रुंद अशा दोन केबल ब्रिजपैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाचा टप्पा –

मुंबई ते पुण्यावरील प्रवाशांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होण्यासोबतच वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होईल,

इतना टैक्स मैं कैसे भरूं…; विजय केडिया यांच्या गाण्याला जोरदार प्रतिसाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडे वस्तू आणि सेवांवरती प्रचंड टॅक्स भरावा लागतो. यामुळे गुंतवणूकदारांवरील आर्थिक तणाव वाढत निघाला असून , त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्वावर प्रकाश टाकण्यासाठीच काही दिवसांपासून एक गाणं खूप चर्चेत आलं आहे. या गाण्यात शेअर बाजारातील नावाजलेले गुंतवणूकदार विजय केडिया यांनी टीका केली आहे. या जोरदार गाजलेल्या गाण्याचे बोल एफएम जी, एफएम जी, इतना टैक्स मैं कैसे भरूं असे आहेत. तर चला जाणून घेऊयात याबद्दल अधिक माहिती .

आर्थिक बोजावर प्रश्न उपस्थित –

केडिया यांनी आपल्या गाण्याच्या ओळींमधून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांवर होत असलेल्या आर्थिक बोजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गाण्यात एसटीटी (Securities Transaction Tax), एसटीजी (Short Term Gains Tax), एलटीसीजी (Long Term Gains Tax), आणि डिव्हिडंड टॅक्स यामधील वाढीमुळे येणाऱ्या अडचणी त्यांनी विनोदी शैलीत मांडणी केली आहे.

गाण्याला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद –

केडिया यांच्या या सर्जनशील गाण्याला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या भावना व्यक्त करत केडिया यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पोस्टवर असंख्य लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. यांनी केवळ वयाच्या 19 व्या वर्षी शेअर बाजारात पाऊल ठेवले होते. त्यांचा पोर्टफोलियो आज अनेक गुंतवणूकदारांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. तसेच त्यांनी 1992 मध्ये केडिया सेक्युरिटीज या संस्थेची स्थापना केली आहे. विजय केडिया यांच्या या गाण्याने गुंतवणूकदारांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या गाण्याने गुंतवणूकदारांच्या समस्या प्रकट दिसण्यास मदत होणार आहे.

मोहम्मद शमी अन सानिया मिर्झा एकत्र ? व्हायरल फोटोमागील सत्य पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एका फोटोची तुफान चर्चा होत असून , यात भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या दोघांचे रोमँटिक फोटो व्हायरल होत आहेत. तसेच या फोटोंमध्ये दोघे दुबईमध्ये खास वेळ घालवत असल्याचा दावा देखील केला जात आहे. अनेकांनी तर हे फोटो खरे मानून शेअर केले , पण आता मिळालेल्या माहितीनुसार हे फोटो फेक असल्याचे सांगण्यात आले आहे. चला तर या फोटोमागचे खरे कारण काय आहे हे पाहुयात.

सोशल मीडियावरील पोस्ट –

22 डिसेंबर 2024 रोजी फेसबुक आणि एक्सवर अनेक युजर्सने मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाचे फोटो पोस्ट केले. या पोस्टमध्ये दोघे दुबईत एकत्र वेळ घालवत असल्याचे म्हटले गेले. Lovely picture of Mohammed Shami and Sania Mirza in Dubai असे कॅप्शन देखील लिहिले होते. या फोटोमुळे सोशल मीडियावर फॅन्सना मोठी उत्सुकता निर्माण झाली.

फोटो एआयद्वारे तयार –

फॅक्ट चेकिंग संस्थांनी या फोटोंचा बारकाईने तपास केला. तसेच विश्वास न्यूजने फोटोंवरील मॉडरेशन टूल्सच्या मदतीने त्याचा अभ्यास केला. या टूलने 99.8% शक्यता दर्शवली की हे फोटो एआयद्वारे तयार केलेले आहेत. याचसोबत decopy.ai या दुसऱ्या टूलने 96.8% खात्री दिली की हे फोटो खरे नसून डिजिटल स्वरूपात बनवले आहेत.

तपासामुळे खरी माहिती समोर –

हे फोटो सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून तयार केले गेले असून , मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाचे व्हायरल होणारे दुबईतील फोटो खरे नाहीत , हे सिद्ध झाले आहे. या फेक फोटोमुळे अनेक गैरसमज निर्माण झाले होते . पण यावर केलेल्या तपासामुळे खरी माहिती समोर आली आहे.