Friday, January 2, 2026
Home Blog Page 325

तब्बल 6 किलो वजनाचा राजा कोंबडा बारामतीत चर्चेत; किंमत 50 हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्याला जर विचारले कोंबडा किती वजनाचा असतो , तर प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या अंदाजानुसार त्याचे वजन एक-दोन किलो सांगेल. मात्र तुम्ही कधी सहा किलोचा कोंबडा पाहिला आहे का , असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर बरेच लोक नाही असे देतील . पण काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका राजा कोंबड्याने धुमाकूळ घातला आहे. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून , तो स्थानिक बाजारात आणि प्रदर्शनांमध्ये मोठी हवा करताना दिसत आहे . तर चला या तब्बल सहा किलो वजनाच्या कोंबड्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात .

साध्या कोंबड्यांपेक्षा फार हटके –

राजा कोंबड्याने केवळ बारामतीत लोकांचेच नाही तर संपूर्ण जिल्यांचे लक्ष केंद्रित करून घेतले आहे. हा कोंबडा साध्या कोंबड्यांपेक्षा फार हटके आहे. तसेच याचे पोषणदेखील एका रॉयल लोकांसाठी असल्याचे दिसत आहे. त्याचे मालक या कोंबड्याची खूप चांगली काळजी घेतात असे सांगण्यात आले आहे. राजा कोंबड्याला रोजच्या खुराकात दूध दिलं जातं, ज्यामुळे त्याची तब्येत चांगली राखली आहे . दूध पिणारा कोंबडा असे ऐकतात अनेकजण आश्चर्य व्यक्त केलं आहे

खुराकासोबत दूध पिणारा कोंबडा –

राजा कोंबडा हा वनराज क्रॉस जातीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच हा कोंबडा फक्त बारा महिन्यांचा आहे. हा राजा कोंबड्याला खुराकासोबत दूध प्यायला आवडत असल्याचं त्याच्या मालकाने सांगितले आहे. या कोंबड्याला रोज सकाळी मका भरडा, कोंबडी खाद्य, भुसा दिला जातो. तसेच दुपारी भुसा, तांदूळ, गहू, बाजरी हे धान्य दिले जाते. याचसोबत संध्याकाळच्या खुराकात दूध, भुसा, कोंबडी खाद्य दिले जाते. त्यामुळे त्याची उंची, वजन एवढे झाले आहे . तसेच त्याची चमकदार पिसं पाहून अनेकजण विचारात पडले आहेत.

Tata Capitals IPO : Tata लॉन्च करणार 17000 कोटींचा IPO; पहा संपूर्ण डिटेल्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक आयपीओमध्ये ( Initial Public Offering )गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. टाटा समूहाच्या आणखी एका प्रमुख कंपनीचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच टाटा कॅपिटल लिमिटेड ही कंपनी सप्टेंबर 2025 मध्ये आपला आयपीओ लाँच करू शकते, अशी माहिती अनेक सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. त्याचसोबत हा आयपीओ जवळपास 17000 कोटी रुपयांचा असू शकतो , असे सांगण्यात येत आहे. तर चला जाणून घेऊयात यासंदर्भातील सर्व माहिती.

भारतातील अग्रगण्य नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी –

टाटा कॅपिटल ( Tata Capital ) ही भारतातील अग्रगण्य नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) असून विविध वित्तीय सेवा पुरवते. यामध्ये रिटेल फायनान्सिंग, हाउसिंग फायनान्स, वेल्थ मॅनेजमेंट आणि इतर क्षेत्रांचा समावेश आहे. हा आयपीओ गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आकर्षण ठरू शकतो, कारण टाटा समूहाच्या ब्रँडवर आधारित असलेले शेअर्स नेहमीच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पसंतीस येतात. त्यामुळे येणाऱ्या नववर्षात हा आयपीओ धुमाकूळ घालेल , असे अनेकांनी म्हटले आहे.

भांडवल उभारणीची मोठी संधी –

या आयपीओच्या माध्यमातून टाटा समूहाला आपल्या वित्तीय विभागाचा विस्तार करण्याची आणि भांडवल उभारणीची मोठी संधी मिळणार आहे. सध्या टाटा कॅपिटलने आयपीओसाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे , अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे गुतंवणूकदारांसाठी हि संधी मोठी ठरू शकते. 2024 या आर्थिक वर्षात अनेक आयपीओ आले असून , 2025 या नववर्षात अजून आयपीओ (IPO)समाविष्ट होऊ शकतात , तसेच त्याच्या माध्यमातून जास्त नफा मिळवण्याची संधी प्राप्त होईल .

विमानाने प्रवास करताना चुकूनही बाळगू नका या गोष्टी; अन्यथा खावी लागेल जेलची हवा

Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही काळापासून देशात आणि जगात हवाई प्रवाशांची संख्या वाढली आहे. आता पूर्वीपेक्षा जास्त लोक विमानाने प्रवास करत आहेत. विमान प्रवास हा सामान्य प्रवासापेक्षा खूप वेगळा असतो. या काळात सुरक्षेबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे अनेक इलेक्ट्रिक वस्तूंवर बंदी असून प्रवाशांना त्या वस्तू घेऊन प्रवास करता येत नाही. आज आम्ही तुम्हाला त्या इलेक्ट्रिक वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्या विमान प्रवासादरम्यान तुमच्यासोबत ठेवता येत नाहीत.

विमान प्रवासादरम्यान सुरक्षितता सर्वात महत्वाची असते. हे पाहता अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे., इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल उत्सर्जित करतात, ज्यामुळे विमानाच्या नेव्हिगेशन किंवा कम्युनिकेशन सिस्टममध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. जर कोणी विमानात हे नेले तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे

ई-सिगारेट – विमानात ई-सिगारेट घेऊन जाण्यास मनाई आहे. त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो आणि आग लागण्याचाही धोका असतो.

Samsung Galaxy Note 7- या फोनमध्ये आग लागण्याच्या इतक्या घटना घडल्या की ते विमानात आणण्यास बंदी घालण्यात आली.

उच्च-शक्तीचे लेसर पॉइंटर्स – असे पॉइंटर्स हवाई प्रवासादरम्यान सोबत नेले जाऊ शकत नाहीत. यामुळे वैमानिकाचे लक्ष विचलित होण्याचा धोका आहे.

अतिरिक्त लिथियम बॅटरी – मोठ्या क्षमतेच्या लिथियम बॅटरी विमानात वाहून नेल्या जाऊ शकत नाहीत. यातून आग लागण्याचाही धोका असतो. या बॅटरीमुळे हॉव्हरबोर्ड इत्यादी वस्तूंवर बंदी आहे.

पोर्टेबल चार्जर- अनेक विमान कंपन्यांच्या विमानांमध्येही पोर्टेबल चार्जरवर बंदी आहे. याचे कारण देखील लिथियम बॅटरी आहे.

स्टन किंवा टेसर गन – ही स्व-संरक्षण शस्त्रे आहेत जी विद्युत प्रवाहावर चालतात. एअरलाइन कंपन्या त्यांना शस्त्रे मानतात आणि क्रू आणि प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात.

पार्टी ऑल नाईट ! 31 डिसेंबरच्या रात्री इतक्या वाजेपर्यंत बिअर बार राहणार खुले

Beer Bar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डिसेंबर महिना संपत आलेला आहे. आणि 2025 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता अनेक लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स तयार करत असतात. अनेक जण हॉटेल्स, क्लब यांच्याकडून पार्टीचे नियोजन देखील करत असतात. 31 डिसेंबर ची रात्र मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरी केली जाते. हॉटेल्स कडून देखील त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळे पॅकेज दिले जातात. अशातच आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे राज्य उत्पादक शुल्क विभागाने नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच बिअर बार पहाटे 5 पर्यंत सुरू राहतील.

हा अनेक वेळा लोक रात्री 12 नंतर रात्रभर पार्टी करत असतात. आता लोकांना त्यांचा आनंद साजरा करण्यासाठी सरकारने देखील परवानगी दिलेली आहे. ती म्हणजे नाताळ 24 आणि 25 डिसेंबर तसेच 31 डिसेंबर पर्यंत नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामध्ये वाईन शॉप हे सकाळी 10 ते रात्री 1 वाजेपर्यंत चालू राहतील. बियर शॉप हे सकाळी 10 ते रात्री 1 वाजेपर्यंत चालू राहतील. बिअर बार हे रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चालू राहतील. तसेच क्लब देखील रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चालू राहणार आहे.

सरकारने रात्री उशिरापर्यंत अनेक दुकाने चालू ठेवण्यास परवानगी जरी दिली असली, तरी लहान मुलांना मध्ये विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या पार्ट्यांमध्ये लहान मुलांचा सहभाग नसावा, असे निर्देश देखील राज्य उत्पादक विभागाकडून देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे ऐवजी अवैध्य मद्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन वर्षाचा आणि नाताळाचा आनंद हा सरकारचे नियम आणि अटी यांना अनुसरूनच करावे.

हिवाळ्यात महाराष्ट्रातील या ठिकाणांना द्या भेट; कमी खर्चात होईल मस्त ट्रिप

Travel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळा आला की अनेक लोके फिरायला जात असतात. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र गुलाबी थंडी पसरलेली आहे. आणि या थंड वातावरणात अनेक लोकांना निसर्गाचा आनंद घ्यायला आवडतो. जर तुम्ही देखील या हिवाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा काही ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. जिथे जाऊन तुम्हाला अत्यंत निवांत वाटेल. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला फ्रेश वाटेल. सर्वत्र निसर्गाची हिरवळ आणि धोक्याच्या टेकड्या तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन येतील. तर महाराष्ट्रातील या सुंदर हिल स्टेशन बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

भीमाशंकर

Bhimashankar

भीमाशंकर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एक शांत सुट्टी आहे. हे मंदिरे आणि वन्यजीव अभयारण्यांचे आध्यात्मिक वातावरण आणते. ट्रेकिंग प्रेमींसाठी हे चांगले ठिकाण आहे, जे निसर्गात साहस अनुभवतात. पर्यटक तलावाजवळील शिबिरे, किल्ल्यांना भेट देणे, धबधब्यांचे ट्रेक, नौकाविहार आणि अगदी फायरफ्लाइज फेस्टिव्हलचा अनुभव घेऊ शकतात. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य ही प्रमुख आकर्षणे आहेत.

महाबळेश्वर

Mahableshwar

महाबळेश्वर हे हिवाळ्यात महाराष्ट्रातील सर्वात शांत हिल स्टेशन्सपैकी एक आहे. निसर्गरम्य दृश्ये; स्ट्रॉबेरी फार्म आणि चांगले हवामान हे हिवाळ्यातील ब्लूजपासून वाचण्यासाठी एक आदर्श ठिकाण बनवते. हिरवळ आणि धुक्याच्या टेकड्या, शांत सरोवरे हिवाळ्यात जाण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक बनवतात. आर्थर सीट, वेन्ना लेक आणि मॅप्रो गार्डन यासारख्या विविध आकर्षणांसाठी या गंतव्यस्थानाला भेट दिली जाऊ शकते जे गंतव्यस्थानाचे नैसर्गिक सौंदर्य आणि स्थानिक संस्कृती दर्शवते.

लोणावळा आणि खंडाळा

लोणावळा आणि खंडाळा ही मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांजवळील ट्विन हिल स्टेशन्स आहेत. हे निसर्गरम्य दृश्ये, धुकेयुक्त सकाळ आणि थंड धबधबे यांनी परिपूर्ण म्हणून ओळखले जातात. हिवाळ्यातील जलद विश्रांतीसाठी हे एक योग्य स्थान आहे. येथे, निसर्गाचे कौतुक करण्यासाठी शांततेत राहून विश्रांती घेता येते. टायगर्स लीप, भुशी डॅम आणि कार्ला लेणी ही लोकप्रिय ठिकाणे आहेत जी प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आणि साहसाचा आनंद देतात.

माथेरान

Matheran

माथेरान हे एक हिल स्टेशन आहे जिथे वाहने नाहीत, त्यामुळे ते ठिकाण स्वच्छ आणि शांत आहे. हे इको-फ्रेंडली पर्यटन स्थळांपैकी एक आहे जिथे शांतता आणि शांतता हवी असणाऱ्या लोकांना पाठवले जाऊ शकते. हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे त्याच्या सुंदर मार्गांवर ट्रेकिंगसाठी एक चांगला हंगाम येतो. पर्यटकांनी पाहावे अशी काही आकर्षक ठिकाणे म्हणजे पॅनोरमा पॉइंट, शार्लोट लेक आणि इको पॉइंट, जे आजूबाजूच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन देतात.

पाचगणी

Pachgani

पाचगणी हे कृष्णा खोरे आणि आसपासच्या डोंगरांच्या विहंगम दृश्यासाठी ओळखले जाते. हिल स्टेशनमध्ये थंड हवामान, स्ट्रॉबेरी फार्म आणि व्ह्यूपॉईंट व्हिस्ट्स आहेत जे हिवाळ्यात एक रोमांचक गंतव्य बनवतात. विश्रांती आणि साहसी भरपूर संधींसह शहरी जीवनापासून हे एक उत्तम मार्ग आहे. यापैकी टेबल लँड, सिडनी पॉइंट आणि पारसी पॉइंट आहेत जे सभोवतालचे चांगले दृश्य देतात.

चिखलदरा

Chikhaldara

चिखलदरा हे कमी-प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे, तरीही थंड हवामानात, कॉफीच्या मळ्यांनी भरलेले आणि सातपुडा पर्वतरांगांचे सुंदर पॅनोरमा असलेले महाराष्ट्रातील सर्वात अविश्वसनीय हिवाळी ठिकाणांपैकी एक आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, भीमकुंड आणि देवी पॉइंटची वैशिष्ट्ये वन्यजीव प्रेमींसाठी अधिक चांगले आहेत

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन 350 फूट दरीत कोसळले; 5 जवान शहीद

Jammu And Kashmir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जम्मू-काश्मीरमधून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे संवेदनशील सीमावर्ती जिल्हा पुंछमध्ये मंगळवारी लष्कराचा ट्रक 300 फूट खोल दरीत पडला. या अपघातात 5 जवान शहीद झाले आहेत. या अपघातात अनेक जवान जखमी झाल्याची शक्यता आहे. पुंछमधील मेंढरमधील बालनोई भागात हा अपघात झाला. बचावकार्य सुरू आहे. ’11 मद्रास लाइट इन्फंट्री’ (11 MLI) चे वाहन नीलम मुख्यालयाकडून बलोनी येथील घोरा पोस्टकडे जात असताना हा अपघात झाला.

जखमींवर उपचार सुरू झाले

अपघाताची माहिती मिळताच 11 एमएलआयचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. जखमींना चांगले उपचार देण्यासाठी तेथून बाहेर काढले जात आहे. जम्मू आणि काश्मीरच्या व्हाईट किंग कॉर्प्सच्या ट्विटर हँडलने ट्विट केले की, “#व्हाइट नाईट कॉर्प्सच्या सर्व श्रेणींनी पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना झालेल्या वाहन अपघातात पाच शूर सैनिकांच्या दुःखद मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.” बचावकार्य सुरू असून जखमी जवानांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

4 नोव्हेंबर रोजी अपघात

गेल्या महिन्यातही असाच अपघात झाला होता. जम्मू-काश्मीरच्या राजौरी गार्डनमध्ये हा अपघात झाला. येथेही एक वाहन खोल खड्ड्यात पडले होते. या अपघातात लष्कराचा एक जवान शहीद झाला असून दुसरा जखमी झाला आहे. हा अपघात ४ नोव्हेंबर रोजी घडला. या अपघातात नाईक बद्रीलाल आणि हवालदार जयप्रकाश शादीद जखमी झाले. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नाईक बद्रीलाल यांचा मृत्यू झाला.

2 नोव्हेंबर रोजी अपघात

2 नोव्हेंबर रोजी, जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात कार डोंगराच्या रस्त्यावरून घसरून खोल दरीत पडल्याने एक महिला आणि तिच्या 10 महिन्यांच्या मुलासह तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

2025 च्या आर्थिक नियोजनासाठी टॉप ELSS म्युच्युअल फंड्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्ष उजडायला काहीच दिवस राहिले असून, 2025 नववर्ष सुरु होण्याआधीच अनेकांची आर्थिक नियोजने ( Financial planning ) सुरु झाली आहेत. त्यामुळे नवीन वर्षात आर्थिक नियोजनाला गती मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक स्वावलंबन आणि कर बचतीसाठी गुंतवणुकीच्या योग्य पर्यायांचा वापर करून , जास्त नफा कमावणे गरजेचे असते. त्यामुळे गुंतवणुकीसाठी आकर्षक गुंतवणूक पर्याय म्हणून इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ELSS) म्युच्युअल फंड समोर आला आहे. हा कमी लॉक-इन कालावधी आणि आकर्षक नफ्यामुळे ELSS फंड हे करदात्यांमध्ये जास्त लोकप्रिय होत आहेत. तर चला जाणून घेऊयात याची सविस्तर माहिती.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स –

ELSS म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स ( equity-linked savings scheme ) होय . हे असे म्युच्युअल फंड आहेत, जे गुंतवणुकीच्या 80 % रक्कम शेअर बाजारात गुंतवतात. ELSS हा एकमेव म्युच्युअल फंडचा प्रकार असून, जो आयकर कलम 80C अंतर्गत कर सवलत प्रदान करतो. यामध्ये गुंतवणुकीसाठी तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी असून हा सर्वात कमी कालावधी आहे.

कर सवलत मिळते –

ELSS मध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास कर सवलत मिळते, ज्यामुळे कर बचत करण्याचा एक उत्तम मार्ग मिळतो. यासोबतच शेअर बाजाराशी संबंधित असल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगल्या नफ्याची शक्यता असते. शेअर बाजाराची वाढती प्रवृत्ती आणि संबंधित कंपन्यांच्या चांगल्या प्रदर्शनामुळे ELSS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना खूप नफा मिळवता येतो. तसेच, ELSS चा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामध्ये लॉक-इन कालावधी असतो, जो गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यास मदत करतो आणि चुकता निर्णय घेण्यापासून रोखतो. यामुळे, दीर्घकालीन सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ELSS कडे पाहिले जाते.

टॉप ELSS फंड्स –

टॉप ELSS फंड्स मागील वर्षभरातील कामगिरीच्या आधारावर निवडले गेले आहेत. यामध्ये, SBI लाँग टर्म इक्विटी फंड 32.96% च्या परताव्यासह प्रमुख आहे. याच्या नंतर बँक ऑफ इंडिया ELSS टॅक्स सेव्हर फंड 27.73% आणि बडोदा BNP परिवा ELSS टॅक्स सेव्हर फंड 27.42% च्या परताव्यासह चांगला परफॉर्म करणारा आहे. DSP ELSS टॅक्स सेव्हर फंड देखील 27. 50% च्या परताव्यासह एक उत्कृष्ट पर्याय ठरतो. या सर्व फंडांमध्ये HSBC ELSS टॅक्स सेव्हर फंड सर्वाधिक 38.80% चा परतावा देत आहे, जो त्याला या यादीत प्रमुख स्थान देतो. हे फंड्स मुदतीचे कर फायदे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आदर्श ठरू शकतात.

Jio Prepaid Plan : जिओचा 448 रुपयांचा प्लॅन ; कॉलिंगसह 12 OTT अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन उपलब्ध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स जिओ (Reliance Jio) नेहमी वेगवेगळ्या किमतीतील आणि व्हॅलिडिटीचे प्लॅन घेऊन येत असते. ते आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. पण काही दिवसांपूर्वी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किमतींमध्ये 30% ची वाढ केली होती. याशिवाय रिचार्ज प्लॅनसोबत मिळणाऱ्या OTT फायद्यांमध्येही घट केली होती. त्यामुळे अनके ग्राहक नाराज झाले होते. पण आज आम्ही तुम्हाला जिओचा असा प्लॅन सांगणार आहोत , ज्यामध्ये तुम्हाला सर्व सेवा सुविधा मिळणार आहेत. तर चला जाणून घेऊयात या प्लॅन बदल सविस्तर माहिती.

जिओचा 448 रुपयांचा प्लॅन –

जिओचा हा प्लॅन ग्राहकांना 448 रुपयांना उपलब्ध होणार असून , या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB सुपरफास्ट डेटा दिला जातो, ज्यामुळे एकूण 28 दिवसांमध्ये 56GB डेटा वापरता येतो. डेटा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होते . या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळते, ज्यामुळे कॉलिंगच्या बाबतीत कोणताही अडथळा निर्माण होत नाही .याचसोबत प्रत्येक ग्राहकाला दररोज 100 SMS मोफत मिळतात. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये 12 OTT अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शनही समाविष्ट आहे, ज्यामुळे ग्राहकांना मनोरंजनासाठी विविध अ‍ॅप्सचा वापर करण्याची सुविधा मिळते.

12 OTT अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन –

जिओच्या 448 रुपयांच्या प्लॅनमध्ये 12 OTT अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते, ज्यात प्रमुख अ‍ॅप्स समाविष्ट आहेत जसे की JioCinema Premium, Sony LIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, Hoichoi, आणि FanCode. या सब्सक्रिप्शन्सद्वारे ग्राहकांना विविध प्रकारचे मनोरंजन, मूव्हीज, शोज आणि स्पोर्ट्स पाहता येतात. तसेच जिओच्या 5G नेटवर्कचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक खास सुविधा आहे. ज्या भागात जिओचे 5G नेटवर्क उपलब्ध आहे, तिथे डेटा संपल्यानंतरही ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा वापरण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे इंटरनेट स्पीडमध्ये कोणतीही अडचण येत नाही आणि वापरकर्ता अनुभव अजून चांगला होतो.

Vivo Y29 5G स्मार्टफोन भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo ने आताच आपल्या Y-Series मध्ये नवीन Vivo Y29 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. तसेच हा फोन तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असल्यामुळे अनेक ग्राहक त्याकडे वळताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे हा फोन कमी किमतीत SGS आणि मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा असलेला पहिला स्मार्टफोन म्हणून ओळखा जात आहे . हा फोन 5500mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, आणि 256GB स्टोरेजच्या वैशिष्ट्यासह उपलब्ध होणार आहे. तर चला या फोन बदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

फोनची वैशिष्ट्ये –

Vivo Y29 5G हा एक उत्कृष्ट स्मार्टफोन असून, जो आकर्षक डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याची जाडी 8.1 मिमी असून वजन 198 ग्रॅम आहे, ज्यामुळे फोन हातात सहज धरता येतो. या फोनमध्ये 5500mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे, जी 44W फ्लॅश चार्ज सपोर्ट करते, त्यामुळे जलद चार्जिंगचा अनुभव मिळतो. रॅम आणि स्टोरेजच्या बाबतीत सांगायचं झालं तर , Vivo Y29 5G मध्ये 8GB पर्यंत इनबिल्ट रॅम आहे, आणि 8GB वर्चुअल रॅम सह, यासोबत 256GB पर्यंत स्टोरेज ऑप्शन उपलब्ध आहे.

मल्टीटास्किंग आदर्श –

मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसरच्या मदतीने हा फोन मल्टीटास्किंग, गेमिंग, आणि स्ट्रीमिंगसाठी आदर्श आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह LCD डिस्प्ले आणि 1000 निट्स पीक ब्राइटनेस यामुळे स्क्रीनवरील चित्रे अत्यंत स्पष्ट आणि आकर्षक दिसतात. तसेच यामध्ये, 50MP चा प्रायमरी रिअर कॅमेरा AI नाईट मोडसह उत्कृष्ट फोटोग्राफी अनुभव प्रदान करतो, तर 8MP चा फ्रंट कॅमेरा सेल्फी प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे. यासोबतच, या स्मार्टफोनला IP64 रेटिंगसह डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्सची सुरक्षा देखील मिळालेली आहे, जी त्याच्या टिकाऊपणाचे संकेत देत असते.

किंमत –

Vivo Y29 5G च्या विविध वेरिएंट्सची किंमत आकर्षक आहे, ज्यामुळे तो अनेक ग्राहकांना बजेटमध्ये उपलब्ध होतो. तुम्हाला 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटचा फोन 13999 मध्ये, 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट 16499 मध्ये, 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट 16999 मध्ये आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंट 18999 मध्ये उपलब्ध आहे. याचसोबत एसबीआय, IDFC फर्स्ट बँक, Yes बँक, आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या प्रमुख बँकांच्या कार्डांवर 1500 पर्यंत कॅशबॅक मिळवता येतो. तसेच हा फोन ग्राहकांना काळ्या , निळ्या आणि सोनेरी रंगात उपलब्ध होणार आहे.