Friday, January 2, 2026
Home Blog Page 326

Jio, Airtel, Vi, BSNL वर TRAI ची मोठी कारवाई, ‘या’ कारणामुळे ठोठावला करोडोंचा दंड

TRAI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्पॅम कॉल्स थांबवण्यात अपयशी ठरलेल्या टेलिकॉम कंपन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने देशातील चारही कंपन्या – BSNL, Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea तसेच काही छोट्या कंपन्यांना दंड ठोठावला आहे. माध्यमातील वृत्तानुसार यावेळी कंपन्यांना 12 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी लावण्यात आलेल्या दंडाच्या रकमेचाही समावेश केला तर एकूण रक्कम १४१ कोटी रुपये आहे. TRAI ने टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन (TCCCPR) अंतर्गत हा दंड ठोठावला आहे. TRAI TCCCPR मजबूत करण्यावरही काम करत आहे.

कंपन्यांनी त्यांच्या बचावात काय म्हटले?

या सर्व कामाला ते एकटे जबाबदार नाहीत, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत दूरसंचार कंपन्यांनी मागणी केली की व्हॉट्सॲपसारख्या ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्मसह, बँका, वित्तीय संस्था आणि टेलिमार्केटर इत्यादींना देखील स्पॅम कॉलसाठी जबाबदार धरण्यात यावे. टेलिकॉम कंपन्यांचे म्हणणे आहे की जर हे प्लॅटफॉर्म नियमांच्या बाहेर ठेवले तर स्पॅम आणि स्कॅम कॉल्स थांबवता येणार नाहीत कारण कायद्यात त्यांचा उल्लेख नाही.

बैठकीदरम्यान, कंपन्यांनी सांगितले की त्यांनी स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी खूप प्रयत्न आणि गुंतवणूक केली आहे. त्यामुळे इतर काही कंपन्या आणि टेलिमार्केटर यांच्या चुकांमुळे त्यांना दंड होऊ नये. या युक्तिवादाने कंपन्यांनी अद्याप दंड भरलेला नाही.

बँक गॅरंटी कॅश करण्याची तयारी

दंड भरण्यात अयशस्वी झालेल्या या कंपन्यांच्या बँक गॅरंटी जमा करण्यासाठी ट्रायने दूरसंचार विभागाला पत्र लिहिले आहे. मात्र, अद्यापपर्यंत विभागाकडून याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की कंपन्या बँक गॅरंटीच्या स्वरूपात सरकारकडे मोठ्या प्रमाणात पैसे जमा करतात.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! 5 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे बंद

Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | याआधी केंद्र सरकारने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे धोरण अवलंबले होते. परंतु आता या धोरणात बदल केलेला असून सरकारने सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द केलेले आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. ही सूचना केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळा केंद्रद्वारे चालवल्या जाणार 3000 पेक्षा अधिक शाळांना लागू होणार आहे. जर एखादा विद्यार्थी नापास झाला, तर त्याला पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. परंतु जर तो दुसऱ्यांना देखील नापास झाला तर त्याला पुन्हा त्याच इयत्तेत बसावे लागणार आहे. परंतु विद्यार्थी नापास झाला तरी आठवीपर्यंत विद्यार्थ्यांचे नाव शाळेतून काढले जाणार नाही, असे सरकारने सांगितलेले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि आता नो डिटेन्शन पॉलिसी संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. येत्या काळात सुरू केलेल्या या व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या निर्णयानंतर पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलने बंद केले जाणार आहेत. या निर्णयामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल असे देखील सांगण्यात आलेली आहे.

या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता वाढेल आणि अकॅडमी परफॉर्मन्स देखील सुधारेल अशी माहिती शिक्षण मंडळांनी दिलेली आहे. या पॉलिसीवर खूप काळापासून चर्चा चालू होती. परंतु अखेर आता या या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पाचवी आणि आठवीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. परंतु त्यांना शाळेतून काढले जाणार नाही.

Bullet Train : AC चेअर कार, डस्ट प्रूफ कोच… बुलेट ट्रेनमध्ये मिळणार ‘या’ लक्झरी सुविधा !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने नवनवीन ट्रेन भारतात आणून , मोठा विकास साधला आहे. आता देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठीचे ( First Bullet Train) प्रयत्न जोरदार सुरु असून , मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (MAHSR) प्रकल्पाला गती मिळत आहे. या बुलेट ट्रेनच्या डिझाइनमध्ये भारत आणि जपानकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. बुलेट ट्रेनमध्ये भारतीय प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक सुधारणा करण्यात आल्या असून, यात वातानुकूलित सीट्स, जास्त सामान क्षमता, धुळीपासून बचाव करणारे डबे, तसेच उच्च तापमानात (50°C पेक्षा जास्त) चालण्याची क्षमता समाविष्ट आहे. त्यामुळे हि कॉरिडॉरची बुलेट ट्रेन लोकांना आरामदायी प्रवासासाठी फायदेशीर ठरणार आहे.

ट्रेनच्या डिझाइनमध्ये बदल –

भारत आणि जपानच्या सहकार्याने शिंकानसेन ट्रेनच्या डिझाइनमध्ये भारतीय परिस्थितीसाठी आवश्यक बदल करण्यात आले आहेत. एका रिपोर्टनुसार 50% हून अधिक बांधकाम पूर्ण झाले असून ट्रॅक टाकण्याचे काम सुरू आहे. प्रकल्पासाठी लागणारा रेल्वे ट्रॅक (Railway Track) जपानमधून आयात करण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत 60 किलोमीटरचा ट्रॅक टाकण्यात आला आहे. त्यामुळे उच्च प्रगती साधली जाणार आहे.

प्रवाशांसाठी बदल –

प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी कोचेसमध्ये सामान ठेवण्याची क्षमता वाढवली जाणार आहे . तसेच, धुळीपासून बचावासाठी , सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याचसोबत बैठक व्यवस्थेतही काही बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जागेचा वापर अधिक कार्यक्षम आणि योग्य होईल. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ( Mumbai Ahmedabad Bullet Train Project ) हे भारतातील हाय-स्पीड रेल्वेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच वेगाने धावणाऱ्या या ट्रेनमुळे प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे .

PM आवास योजनेचे नियम शिथिल; महाराष्ट्राला मिळणार 20 लाख घरे

PM Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. याचा फायदा महाराष्ट्रतील लोकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. ते म्हणजे आता महाराष्ट्रातील घरांसाठी जवळपास 6 लाख 36 हजार 89 घरे उपलब्ध करून दिली आहेत. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. अनेक निकषांमुळे गरीब लोकांना घरे मिळत नव्हती. परंतु आता सरकारने या योजनेसाठी पात्रतेचे निकष शिथिल केलेले आहेत. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्रात जवळ 20 लाख घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय कृषी आणि ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केलेली आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख संस्थेचे संचालक एस के रॉय देखील उपस्थित होते.

यावर्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने जवळपास साडेसहा लाख घरे मंजूर केलेली आहेत. आणि आता त्याचे टार्गेट वाढवण्यात आलेला आहे. आणि आता लोकांना अतिरिक्त 13 लाख घरे देखील देण्यात येईल येणार आहे. महाराष्ट्रातील लोकांसाठी ही एक मोठी भेट असणार आहे. आज पर्यंत राज्याला कधी इतक्या संख्येने घर मिळालेली नाहीत.

या योजनेमध्ये अनेक निकष असल्याने गरीब लोकांना याचा फायदा घेता येत नव्हता. परंतु आता ते निकष बदलण्यात आलेले आहेत. याआधी फोन तसेच दुचाकी असलेल्यांना घरी मिळत नव्हती. परंतु आता अशा लोकांना देखील घरी मिळणार आहेत. तसेच ज्या लोकांचे दरमहा उत्पन्न दहा हजार रुपये असायचे त्यांना या योजनेत समावेश केला जात नव्हता. आता ही मर्यादा 15000 रुपये प्रति महिना एवढी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 5 एकर कोरडवाहू आणि अडीच एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांना देखील ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलेला आहे.

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची आणखी एक संधी; कोकण मंडळातर्फे मुदतवाढ

Mhada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | म्हाडा अनेक लोकांना त्यांच्या स्वतःचे हक्काचे घर घेण्यासाठी मदत करत असते. आता तुमचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होण्यासाठी तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे. म्हाडा अंतर्गत कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ अंतर्गत 2264 घरांच्या विक्रीसाठी जाहीर केली होती. या म्हाडा अंतर्गत अर्ज करण्याची 24 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख होती. परंतु आता म्हाडाने (Mhada) ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढ केलेली आहे. आणि आता 6 जानेवारी 2025 ही म्हाडा अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिलेली आहे.

कोकण मंडळातील म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी 11 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. त्याचप्रमाणे 24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. परंतु यामध्ये आता वाढ करून 6 जानेवारी 2025 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद केली जाणार आहे. तर 7 जानेवारी पर्यंत उमेदवारांना अनामत रक्कम भरता येईल.

त्याचप्रमाणे सोडतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी 20 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच 22 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रारूप यादी वर आपले दावे आणि हरकती नोंदवता येतील. तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन सगळी माहिती घेऊ शकता.

कोकण मंडळांनी 200264 घरांसह 12,626 घरांची विक्री करण्याची तयारी सुरू केलेली आहे. यामध्ये विरारसह इतर भागातील तयार सरांचा देखील समावेश आहे. यासाठी म्हाडा कडून विशेष मोहीम देखील चालवण्यात आली होती. परंतु अनेक प्रयत्न नंतरही कोकण मंडळातील घराची विक्री झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ करण्यात आलेली आहे.

आता विमानाने कमी किमतीत होणार प्रवास; इंडिगोकडून प्रवाशांसाठी बंपर ऑफर

Indigo Airline

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये अनेक एयरलाईन्स कंपन्या आहेत. त्यातील इंडिगो ही भारतातील एक सगळ्यात मोठी एअरलाईन कंपनी आहे. इंडिगो त्यांच्या प्रवाशांसाठी अनेकवेळा स्वस्तात प्रवास करण्याच्या ऑफर देत असतात. जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना देखील विमानाने प्रवास करता येतो. अशातच आता इंडिगोने पुन्हा एकदा त्यांच्या प्रवाशांसाठी एक खास ऑफर लॉन्च केलेली आहे. इंडिगोने गेट अवे सेलची घोषणा केलेली आहे. इंडिगोने केलेल्या या ऑफरमुळे आता ग्राहकांना देशांतर्गत तसेच देशाबाहेरील प्रवासाच्या तिकिटांवर मोठ्या प्रमाणात ऑफर देण्यात आलेली आहे. इंडिगोची ही ऑफर 25 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.

क्रिसमसच्या मुहूर्तावर इंडिगोने त्यांच्या प्रवाशांसाठी एक खास ऑफर लॉन्च केलेली आहे. देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर 23 जानेवारी ते 30 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही तिकीट बुक करू शकता. देशांतर्गत प्रवाशाच्या तिकिटाची किंमत ही केवळ 1 हजार 999 पासून सुरु होणार आहे. तर इंटरनॅशनल प्रवासाची किंमत ही केवळ 4499 पासून सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे इंडिगोने काही खास कार्डवर देखील जास्तीची 50% पर्यंत सूट देण्यात आलेली आहे.

यामध्ये प्रवाशांना आणखी काही खास ऑफर देखील मिळणार आहे. यामध्ये तुम्ही प्रीपेड एक्सेस बॅगेज ऑप्शन 15 kg, 20 kg, आणि 30 kg स्टॅंडर्ड सिलेक्शन आणि xl शीटची सुविधा देखील घेऊ शकता. या ऑफरमध्ये ऍडव्हानची किंमत देशांतर्गत उड्डाणासाठी 599 रुपयांपासून सुरू होते, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी 699 पासून सुरु होते.

क्रेडिट कार्डवर देखील सूट

जर प्रवाशांकडे फेडरल बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे. म्हणजेच तुम्हाला अतिरिक्त आणखी 15% सूट मिळणार आहे. यामध्ये देशांतर्गत उड्डाणासाठी तुम्हाला 15 टक्के सूट तर आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी जवळपास 10 टक्के सूट मिळणार आहे. अशाप्रकारे आता तुम्ही टॅक्सी अथवा बसच्या तिकिटाच्या दरामध्ये विमानाने प्रवास करू शकता. क्रिसमस तसेच नवीन वर्ष तोंडावर आले असताना इंडिगो कडून त्यांच्या प्रवाशांसाठी अत्यंत स्वस्त दरात ऑफर लॉन्च करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही केवळ 1199 मध्ये तुमच्या पहिल्या विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण करू शकता.

Gold VS Mutual Fund : सोन्यातील गुंतवणूक योग्य की म्युच्युअल फंडातील? जास्त फायदेशीर काय

Gold VS mutual Fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत लोकांचा गुंतवणुकीतील (Money Investment) कल वाढत निघाला आहे. सध्याची आर्थिक स्थिती बघता गुंतवणूक हा आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. तसेच या गुंतवणुकीच्या माध्यमातून बचत वाढवता येते आणि महागाईच्या जोखमीपासून संरक्षण मिळते , त्यामुळे मोठया प्रमाणात लोक विविध ठिकाणी गुंतवणूक करताना दिसतात. पूर्वी लोक सोन्यात गुंतवणूक करत होते , पण आताच्या घडीला म्युच्युअल फंडांत गुंतवणुकीसाठी मोठी पसंती मिळत आहे. या दोन्हीमधला कोणता पर्याय गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरेल, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तर चला जाणून घेऊयात याबद्दल सर्व माहिती.

सोन्यात गुंतवणूक –

सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) ही एक दीर्घकालीन आणि सुरक्षित पर्याय मानली जाते. सोन्याच्या गुंतवणुकीचे मुख्य फायदे म्हणजे कमी जोखीम, महागाईशी जुळणारी दरवाढ आणि विक्रीस सुलभता होय . सोनं गुंतवणुकीच्या विविध स्वरूपात उपलब्ध असते , जसे की फिजिकल सोनं आणि डिजिटल सोने होय. दीर्घकालीन स्थिरता आणि कमी जोखीम या कारणामुळे सोनं विविध आर्थिक परिस्थितींमध्ये सुरक्षित ठरत असते . कठीण काळात, सोनं कर्जासाठी ठेव म्हणून वापरता येऊ शकते. पण या फायद्यासोबतच सोन्यात गुंतवणुकीचे काही तोटे देखील आहेत. उदाहरणार्थ फिजिकल सोनं सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त खर्च आणि मेकिंग चार्जेस असतात. तसेच साठवणुकीसाठी बँकांचा खर्च आणि नियमित उत्पन्नाची अनुपस्थिती हे देखील तोटे आहेत.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक –

म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे तसेच तोटे आहेत. या गुंतवणुकीत, गुंतवणूकदारांचा पैसा विविध प्रकारच्या संपत्तीमध्ये जसे कि शेअर्स, रोखे, इतर मालमत्तांमध्ये विभागलेले दिसते , ज्यामुळे जोखीम कमी होण्यास मदत होते. तसेच, एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) सारख्या पर्यायांद्वारे कमी रकमेतही गुंतवणूक करणे शक्य होते, ज्यामुळे सामान्य लोकांसाठी ही गुंतवणूक अधिक फायदेशीर बनते. यामुळे महागाईवर मात करण्याची क्षमता मिळवली जाते आणि दीर्घकालीन चांगल्या नफा मिळतो . त्याचबरोबर, म्युच्युअल फंडामध्ये पैसे तात्काळ रिडीम करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो. पण यासोबत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना काही तोटेही आहेत. यामधील नफा हा शेअर बाजाराच्या चढ-उतारांवर अवलंबून असतो , त्यामुळे जोखीम असू शकते. परताव्यांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक आवश्यक असते आणि व्यवस्थापन फी आणि कर आकारणीचा भार देखील आहे.

दोन्हींमध्ये कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी योग्य –

अनेकांना प्रश्न पडतो कि , मग या दोन्हींमध्ये कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी योग्य ठरेल. जर तुम्हाला कमी जोखीम घ्यायची असेल, तर सोनं हा एक सुरक्षित पर्याय ठरतो, कारण त्याचे मूल्य स्थिर असते आणि ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले असते. दुसरीकडे म्युच्युअल फंड उच्च नफ्यासाठी योग्य ठरू शकतात, तसेच यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली जाते. पोर्टफोलिओची विविधता साधण्यासाठी, दोन्ही पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे विचारात घेतले जाऊ शकते, ज्यामुळे जोखीम कमी करता येते आणि विविध उत्पन्न स्रोत मिळवता येतात.

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; वयोमर्यादेची अटीत शिथिलता

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक विद्यार्थी हे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असतात. आता त्याच विद्यार्थ्यांचा एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेत विविध पदांसाठी भरती चालू होणार आहे. आणि या संदर्भातच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे आता कमाल वयोमर्यादित शिथिलता देण्यात येणार आहे. आता या मोठ्या निर्णयामुळे महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. आणि त्यांना पुन्हा एकदा नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. याबाबतची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत दिलेली आहे. वयोमर्यादेत शिथिलता आल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठी 6 जानेवारी 2025 ही अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची चलनाची प्रत 7 जानेवारी 2025 मुदत पर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे चलनाद्वारे 9 जानेवारी 2025 पर्यंत परीक्षा शुल्क भरण्यात येणार आहेत. परंतु आता वयोमर्यादित शिथिलता आणल्याने अनेक विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरता येणार आहे.

शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीमध्ये 31 डिसेंबर 2024 पर्यंत उच्च वयोमर्यादित एक वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 01 जानेवारी 2025 ते सदर शासन निर्णय तारखेपर्यंतच्या पदवीधरासाठी या जाहिराती नवीन प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या जाहिरातींच्या प्रवेश प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही. अशा जाहिरातींसाठी सर्व उमेदवारांना कमाल वयोमर्यादित एक वर्षाची वाढीव शिथिलता देण्यात आलेली आहे.

डबल सिम आणि 2G यूजर्ससाठी आनंदाची बातमी; TRAI घेणार मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या आधुनिक युगात मोबाईलचा वापर प्रचंड वाढला असून, तो आपला जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेकजण वेगवेगळ्या प्लॅनसाठी दोन सिम कार्ड्सचा वापर करत असतात. तर काहीजण एकाच फोनमध्ये डबल सिम वापरतात, तसेच अजूनही अनेक वापरकर्ते 2G सेवा घेत आहेत. अशा परिस्थितीत सरकारकडून डबल सिम किंवा 2G सेवा घेणाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली आहे. तर चला जाणून घेऊयात या निर्णयांबद्दल अधिक माहिती.

ट्रायच्या नव्या गाईडलाइन्सची तयारी –

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांसाठी Voice + SMS पॅक उपलब्ध करून देण्यास सांगणार आहे. यासाठी लवकरच नव्या गाईडलाइन्स जारी केल्या जाऊ शकतात. अनेकजण दोन सिम वापरत असले तरी, एकाच सिमवर इंटरनेटसह सर्व सेवा घेतात, तर दुसऱ्या सिमचा वापर फक्त व्हॉईस कॉल आणि एसएमएससाठी होतो. पण सध्याच्या पॅक्समुळे ग्राहकांना फक्त व्हॉईस आणि एसएमएससाठीही महागडे रिचार्ज करावे लागतात. यावर उपाय म्हणून ट्राय नवीन गाईडलाइन्स आणण्याच्या तयारीत आहे. सध्या भारतात जवळपास 30 कोटी 2G ग्राहक आहेत, जे केवळ व्हॉईस आणि एसएमएस सुविधांचा उपयोग करतात.

OpenSignal अ‍ॅप –

जर तुम्हाला फसवणूक कॉल्स किंवा मेसेज येत असतील, तर तुम्ही संचार साथी पोर्टलवर तक्रार दाखल करू शकता. तसेच जर 10 अंकी मोबाइल नंबरवरून तुम्हाला स्पॅम मेसेज आला, तर तुम्ही 1909 या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता. यामुळे तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच तुमच्या भागात कोणत्या टेलिकॉम कंपनीचे नेटवर्क अधिक चांगले आहे हे तपासण्यासाठी OpenSignal अ‍ॅप वापरू शकता. हे अ‍ॅप नेटवर्कची गती, कव्हरेज आणि इतर महत्त्वाच्या बाबींबद्दल माहिती देते. BSNL, Jio, Airtel, Vodafone Idea यापैकी कोणाचे नेटवर्क चांगले आहे, याचा त्वरित अंदाज हे अ‍ॅप देऊ शकते.

योजना फायदेशीर ठरणार –

नव्या गाईडलाइन्समुळे ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळतील आणि केवळ व्हॉईस व एसएमएससाठी जास्त खर्च करावा लागणार नाही. तसेच डबल सिम वापरणाऱ्यांसाठीही ही योजना फायदेशीर ठरणार आहे.

खरे ढेरे कॉलेजमधील 4 प्राध्यापकांना संस्था चालकानेच गावगुंड बोलावून रॉड आणि स्टीकने केली मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिनांक १८/१२/२०२३ रोजी सकाळी ८:३० वाजता खरे ढेरे कॉलेज गुहागर येथे याच कॉलेजच्या संस्था चालक अध्यक्ष असलेल्या आरोपी महेश भोसले याने रोहन भोसले गुंडा मार्फत त्याच्या इतर ७ साथीदारां सह कॉलेज मधील प्राध्यापक असलेल्या ४ प्राध्यापकांवर सुनियोजित कटाने लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला असून, दोन प्राध्यापकांची प्रकृती गंभीर असून नागरी रुग्णालय रत्नागिरी येथे त्याचे उपचार सुरू असून इतर दोन प्राध्यापकांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे.

रोहन भोसले हा गुंड स्वतःला शिंदे गटाचा कार्यकर्ता व मंत्री उदय सामंत व आमदार भैय्या सामंत यांच्याशी जवळीक असलेल भासवून स्थानिक पातळीवर गुंडगिरी करीत असून आपल्या महिंद्रा थार या गाडीवर विधानसभा सदस्य असा स्टिकर लावलेला स्थानिकांद्वारे पाहण्यात आला होता. खरे ढेरे कॉलेज मध्ये बनावट परीक्षार्थी व बनावट गुणपत्रिका यांबाबत मुंबई विद्यापीठा मार्फत फॅक्ट चेकिंग नोटीस देण्यात आली या रागातून संचालकांनी हल्ला केला. असे मारहाण झालेल्या प्राध्यापक फिर्यादीनी जबाबात म्हटले आहे.

सदर घटना सकाळी ८ वाजता झालेली असून देखिल हा गुन्हा नोंद व्हायला रात्री ११:३० वाजले, गुन्हा नोंद करून घ्यायला स्थानकातील आयओ असलेले सोनवणे हे पोलीस अधिकारी टाळाटाळ करीत होते. व फिर्यादीनाच धमकावत असल्याबाबत धक्कादायक आरोप भुक्टोच्या प्राध्यापक संघटनांनी केली आहे. प्राध्यापक संघटना, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनी ११:३० पर्यंत पोलीस स्टेशन परिसर सोडला नव्हता त्यामुळे गुन्हा नोंद होऊ शकला, असे उपस्थित स्थानिक सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी म्हटले. प्रा.गोविंद भास्कर सानप,प्रा. अनिल शशिकांत हिरगुंड,प्रा. निळकंठ सखाराम भालेराव, प्रा. संतोष विठ्ठलराव जाधव अशी हल्ला झालेल्या प्राध्यापकांची नावे आहेत.

सर्व गुन्हेगारांवरती अटेन्प्ट टू मर्डर ही केस दाखल झाली पाहिजे व गुन्हा नोंद करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या सोनवणे या पोलीस अधिकारी चौकशी अंती निलंबण झाल पाहिजे व खरे ढेरे कॉलेज मधील संचालक मंडळ बरखास्त करण्यात येऊन तत्काळ सर्व आरोपीना अटक करण्यात यावी या मागणीसाठी शनिवार दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी गुहागर तहसीलदार कार्यालयावर प्राध्यापक पालक व विद्यार्थी यांचा मोर्चा काढण्यात येण्याबाबत निवेदन प्राध्यापक संघटनांनी गुहागर पोलीस स्थानक व तहसीलदार गुहागर यांना देण्यात आल आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेल नसून, सर्व आरोपी फरार आहेत. अशी माहिती स्थानिक पोलीस स्थानकातून प्राप्त झाली.