Friday, January 2, 2026
Home Blog Page 327

1 जानेवारीपासून 2025 पासून अँड्रॉइड स्मार्टफोनवर चालणार नाही व्हॉट्सॲप ; जाणून घ्या कारण

whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अँड्रॉइड युजर्ससाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. आजकाल जवळपास सगळेच लोक व्हॉट्सॲपचा वापर करतात. परंतु 2025 पासून अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सॲप काम करणार नाही. मेटाचे हे ॲप जुनी ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या अँड्रॉइड फोनसाठी चालणार नाही. हे जवळजवळ प्रत्येक वर्षी घडते. नवीन वैशिष्ट्ये जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करत नाहीत आणि काहीवेळा हे सुरक्षिततेच्या कारणास्तव केले जाते.

अँड्रॉइडच्या या व्हर्जनवर व्हॉट्सॲप बंद होणार

तुम्ही अजूनही अँड्रॉइडची किटकॅट व्हर्जन वापरत असाल तर तुमच्यासाठी अवघड जाणार आहे. 10 वर्षांपूर्वी आलेल्या या व्हर्जनवर व्हॉट्सॲप आपला सपोर्ट बंद करणार आहे. याचा अर्थ 1 जानेवारी 2025 नंतर व्हॉट्सॲप किटकॅट आवृत्ती असलेल्या फोनवर चालू शकणार नाही. तुम्हाला हे करणे थांबवायचे असल्यास, तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल किंवा नवीन फोन घ्यावा लागेल.

या फोनवर व्हॉट्सॲप चालणे बंद होईल

  • Samsung-Galaxy S3. Galaxy Note 2, Galaxy Ace 3, Galaxy S4 Mini
  • HTC- One X, One X+, Desire 500, Desire 601
  • सोनी- Xperia Z, Xperia SP, Xperia T, Xperia V
  • LG- Optimus G, Nexus 4, G2 Mini, L90
  • Motorola- Moto G, Razr HD, Moto E 2014

अपडेट करणे गरजेचे

व्हॉट्सॲपचे नवीन फिचर्स वापरण्यासाठी ॲप अपडेट करत राहणे महत्त्वाचे आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे. बग दूर करण्यासाठी कंपनी सुरक्षा अद्यतने जारी करत असते. ॲप अपडेट न केल्यास या बग्समुळे नुकसान होऊ शकते. यामुळे ॲप वापरण्याचा अनुभव खराब होण्याची आणि वैयक्तिक माहितीची चोरी होण्याची भीती आहे.

पॉपकॉर्नच्या किंमतीत मोठी वाढ; सरकारने लावला GST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक पॉपकॉर्न प्रेमी आहेत , त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. सरकारने राजस्थानमधील जैसलमेर येथे पार पडलेल्या 55 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवर विविध जीएसटी दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पॉपकॉर्न प्रेमींसाठी पॉपकॉर्न खरेदी करण्यासाठी जादा पैसे द्यावे लागणार आहेत , म्हणजेच आता त्यांच्या खिशाला आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पॉपकॉर्नच्या विक्रीवर आधारित कर लागू करण्याचे ठरवण्यात आले असून , कोणत्या पॉपकॉर्नवर किती कर आकारला जाणार आहे , हे आज आपण पाहणार आहोत . तर चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात .

पॉपकॉर्नचे प्रकार आणि GST दर –

जीएसटी परिषदेने पॉपकॉर्नचे प्रकार आणि विक्रीच्या पद्धतीनुसार वेगवेगळे कर लागू केले आहेत. त्यामध्ये मीठ व मसाल्यासह विना-लेबल विक्री होणाऱ्या पॉपकॉर्नवर 5% जीएसटी लागू करण्यात आला आहे. म्हणजेच 100 रुपयांच्या पॉपकॉर्नसाठी आता 105 रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच लेबल लावून विक्री होणाऱ्या पॉपकॉर्नवर 12% जीएसटी आकारण्यात येणार आहे . त्यामुळे 100 रुपयांचे पॉपकॉर्न 112 रुपयांना मिळतील. त्याचबरोबर साखर मिसळून तयार केलेल्या कॅरॅमल पॉपकॉर्नला मिठाई प्रकारात गणले गेले असून, त्यावर 18% जीएसटी लावला जाणार आहे. त्यामुळे 100 रुपयांचे कॅरॅमल पॉपकॉर्नवर 118 रुपये मोजावे लागणार आहेत.

आर्थिक फटका सहन करावा लागणार –

पॉपकॉर्नवरील जीएसटी वाढीच्या दरामुळे अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता सिनेमागृह, प्रवास किंवा इतर ठिकाणी पॉपकॉर्न खाणारे लोक चिंतेत पडले आहेत . या दर वाढीमुळे येत्या काळात त्याचा काय परिमाण होईल हे लवकरच समोर येईल. त्यामुळे आत पॉपकॉर्न खाताना लोकांना जीएसटीचा विचार करून ते खरेदी करावे लागतील .

लाडक्या बहिणींना खुशखबर!! डिसेंबरच्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येणार , याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत. या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना आता आनंदाची बातमी भेटणार आहे. नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात या हप्त्याबद्ल सांगण्यात आले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना त्यांचा पुढील हप्ता कधी भेटणार आहे , हे आज आपण पाहणार आहोत . तर चला जाणून घेऊयात या बदल अधिक माहिती.

डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार –

सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे ऑक्टोबर महिन्यातच जमा केले होते. आता पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशनानंतर लवकरच वितरित केला जाईल, असे आश्वासन दिले आहे . म्हणजेच 21 डिसेंबर 2024 रोजी अधिवेशन संपल्यानंतर, डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्याही क्षणी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सर्व महिलांनी वेळोवेळी त्यांची बँक खाती तपासणे गरजेचे आहे.

बँक खाते आधार कार्डशी लिंक –

निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही अर्जांची छाननी प्रक्रिया थांबली होती. आता ती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. ज्यांनी अर्ज केले आहेत, पण अजून लाभ मिळाला नाही, त्यांनी खात्री करावी की त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का . बँक खाते आधारशी लिंक असल्यासच या योजनेचे पैसे मिळू शकतात. बँक खात्याशी आधार लिंक करण्यासाठी, https://uidai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आधार लिंकिंग स्टेटस तपासावे. त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस वर क्लिक करून, आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा. ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन केल्यानंतर, तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही, याची माहिती मिळेल. जर बँक खाते लिंक नसेल, तर संबंधित बँकेत जाऊन ते आधारशी लिंक करावे.

अत्यंत लोकप्रिय योजना –

हि योजना राज्यातील महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली असून, या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 जमा केले जातात. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण 7500 रुपये जमा करण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाल्यास महिलांच्या रक्कमेत वाढ होणार आहे.

प्रवाशांसाठी मोठी खुशखबर ; पुणे ते करमाळी विशेष एक्सप्रेस ट्रेन धावणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक लोक फिरण्याचा प्लॅन करत असतात. हे येणारे नववर्ष साजरे करण्यासाठी हजारो प्रवासी पुण्यातून कोकणाचा रस्ता धरताना दिसतात. पण अनेकदा गाडी अभावी त्यांचे नियोजन फसते. यासाठी काही दिवसांपूर्वी अनेक प्रवाशांनी रेल्वे विभागाकडे विशेष रेल्वेची मागणी केली होती. याचीच दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून , अशा प्रवाशांसाठी त्यांनी पुणे ते करमाळी दरम्यान विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना मोठी खुशखबर मिळाली आहे.

पुणे-करमाळी विशेष एक्सप्रेस –

नाताळच्या सुट्या आणि नवीन वर्ष बघता रेल्वेने ही विशेष गाडी 25 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 8 जानेवारीला पुण्याहून सुटणार असल्याचे सांगितले आहे , यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे-करमाळी विशेष एक्सप्रेस (गाडी क्रमांक 01407) दर बुधवाराला प्रवास करणार आहे. हि गाडी पुण्याहून सकाळी 5.10 वाजता सुटणार आहे , आणि ती करमाळी स्थानकावर रात्री 8.25 वाजता पोहचणार आहे . त्यामुळे या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आरामदायक आणि सुबक प्रवास अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे .

करमाळी-पुणे विशेष एक्सप्रेस –

करमाळी-पुणे विशेष एक्सप्रेस दर बुधवाराला प्रवास करणार आहे . या गाडीचा प्रारंभ करमाळी स्थानकावर रात्री 10.00 वाजता होणार असून , ती दुसऱ्या दिवशी दुपारी 1.00 वाजता पुणे स्थानकावर पोहचणार आहे . प्रामुख्याने हि गाडी , 25 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 8 जानेवारी रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे . या गाडीच्या सेवेमुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळेस आरामदायक आणि सोयीस्कर प्रवासाची संधी मिळणार आहे , जी त्यांना पुणे येथे वेळेवर पोहोचवणार आहे.

प्रमुख स्थानकांवर थांबणार –

ही गाडी पुणे आणि करमाळी दरम्यान चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

आनंददायी प्रवासाचा अनुभव घेता येणार –

नाताळ व नववर्षाच्या सुट्टीत कोकण व गोव्याला जाणाऱ्यांसाठी ही गाडी खूप उपयुक्त ठरणार आहे. तिकीट बुकिंग लवकरात लवकर करून आपला प्रवास निश्चित करणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणे आणि कोकण यांच्यातील प्रवास आणखी सोयीस्कर व आरामदायक होणार आहे. त्यामुळे नववर्ष साजरे करण्याच्या उत्साही वातावरणात पुणेकरांना आनंददायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

सातत्याने होणाऱ्या डोकेदुखीकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष; अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम

Headache

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे त्यांना आरोग्यासंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. आजकाल डोकेदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. परंतु आपण कामाच्या व्यापात नेहमीच या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करतो. परंतु जर तुमचे सातत्याने डोके दुखत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अन्यथा तुम्हाला गंभीर परिणाम सामोरे जावे लागेल. अनेकवेळा सातत्याने आणि तीव्र डोकेदुखी हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते. आकडेवारीनुसार, ब्रेन ट्यूमरमुळे दरवर्षी सुमारे 2.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. एकट्या 2020 मध्ये या आजाराने 2.46 लाख लोकांचा बळी घेतला. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काही वेळा ट्यूमर इतका हळूहळू वाढतो की त्याची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकते. डोकेदुखी वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय ?

ब्रेन ट्यूमरमध्ये, मेंदूच्या आजूबाजूच्या पेशी अनियंत्रित पद्धतीने वाढतात, ज्यामुळे कर्करोग होतो. अभ्यासानुसार, मेंदूमध्ये 120 पेक्षा जास्त प्रकारचे ट्यूमर तयार होऊ शकतात. कुटुंबातील कोणाला ब्रेन ट्युमर असेल तर काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय प्लास्टिक आणि रसायन उद्योगात काम करणाऱ्यांनाही सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय विविध पर्यावरणीय परिस्थितींसह जीवनशैली आणि आहारातील अडथळे यांमुळेही समस्या वाढू शकतात.

डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका

ब्रेन ट्यूमरमुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे डोकेदुखी, जी सकाळी वाढते किंवा वारंवार टिकते. असे झाल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

ब्रेन ट्यूमरची लक्षणे

  • डोक्यात वारंवार वेदना किंवा दाब
  • मळमळ आणि उलट्या झाल्याची भावना
  • डोळ्यांच्या समस्या, जसे की अंधुक दृष्टी
  • हात किंवा पाय मध्ये संवेदना
  • शारीरिक संतुलन आणि बोलण्यात अडचण
  • कालांतराने मेमरी समस्या
  • अनेकदा चक्कर येणे

    ब्रेन ट्यूमर कर्करोग आहे

    आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ब्रेन ट्यूमरची सर्व प्रकरणे कर्करोगाचीच आहेत, असे नाही. वेळेवर उपचार करून त्याचा धोका कमी करता येतो. तुमचे वय जास्त असेल किंवा लठ्ठ असाल किंवा कोणत्याही रसायनाच्या संपर्कात असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे.

    ‘या’ लोकांना मिळणार नाही मोफत रेशन; अशाप्रकारे यादीत चेक करा नाव

    Ration Card

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकारने रेशन कार्डचा नियमांमध्ये अनेक मोठे बदल केलेले आहेत. आज आम्ही रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. काही दिवसांपूर्वी सरकारने रेशन कार्डधारकांना ई केवायसी करणे बंधनकारक केले होते आता ज्यांनी ई केवायसी केले नाही, त्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. जर तुम्ही सरकारच्या नियमांचे पालन केले नाही, तर तुम्हाला मोफत रेशन मिळणार नाही. तसेच ही रेशन कार्डची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात.

    ज्या लोकांचे रेशन कार्ड नवीन तयार करायचे आहे किंवा त्यात अपडेट करायचे आहे. याबाबतची लिस्ट सरकारने जारी केलेली आहे. आता याच लोकांना मोफत रेशन मिळणार आहे. ज्या लोकांनी या अटीची पूर्तता केली नाही. त्यांना मोफत रेशन मिळणार नाही. आता ऑनलाइन लिस्ट कशी चेक करायची? याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत

    भारत सरकारने आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोर्टलवर रेशन कार्ड ग्रामीण यादी जाहीर केलेली आहे. त्यामुळे तुम्ही ही यादी ऑनलाईन पद्धतीने सहजपणे चेक करू शकता. या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल, तरच तुम्हाला इथून पुढे रेशनचा लाभ मिळणार आहे. जर तुमचे नाव नसेल तर तुम्हाला रेशनचा लाभ मिळणार नाही. जर तुम्हाला नवीन शिलापत्रिकेसाठी अर्ज करायचा असेल, तर सगळ्यात आधी तुम्ही दारिद्र्यरेषेखाली असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमच्या घरातील कोणताही सदस्य हा सरकारी पद किंवा राजकीय पद धारण केलेला नसावा. तसेच रेशन कार्डचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.

    रेशन कार्ड यादी कशी चेक करावी?

    • तुम्हाला जर रेशन कार्ड ग्रामीण यादी चेक करायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला राष्ट्रीय अन्नसुरक्षा या पोर्टलवर जावे लागेल.
    • त्यानंतर मुख्य पेजवर दिलेले रेशन तपशील तपासा आणि राज्य पोर्टलवर क्लिक करा.
    • त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
    • त्यानंतर तुमचा जिल्हा, तहसील, गाव ग्रामपंचायत या सगळ्या गोष्टी निवडा.
    • त्यानंतर तुमच्यासमोर रेशन कार्डची ग्रामीण यादी उघडेल.
    • या यादीत तुम्ही तुमचे नाव तपासावे.
    • यादीत तुमचे नाव असेल , तर तुम्ही ती यादी डाऊनलोड देखील करू शकता.

    E- PAN कार्ड डाऊनलोडसाठी मेल आला असेल तर सावधान! अन्यथा मिनिटांतच बँक अकाऊंड होईल खाली

    Pan Card

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने जेव्हापासून पॅन कार्ड 2.0 ची घोषणा केलेली आहे. त्या नंतर हे पॅन कार्ड बनवण्यासाठी सगळ्या लोकांची गडबड चालू झालेली आहे. आता हे पॅन कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला अनेक मेसेज देखील येत असतील. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील याबाबतचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. परंतु आता या नव्या पॅन कार्डच्या नावाखाली अनेक लोक स्कॅम करताना दिसत आहेत. आणि त्यांचे बँक अकाउंट खाली झालेले आहेत. जर तुम्हाला ही पॅन कार्ड डाउनलोड करण्याचा ईमेल किंवा मेसेज आला असेल, तर त्यापासून सावध राहणे खूप गरजेचे आहेम यावर चुकूनही क्लिक करू नका. अन्यथा तुमच्या सोबत एक खूप मोठा फ्रॉड होऊ शकतो. एका मिनिटातच तुमचे बँक अकाउंट खाली होऊ शकते. अशावेळी तुम्ही त्या मेलला रिपोर्ट करणे गरजेचे आहे. तुम्ही जर चुकूनही त्यावर क्लिक केले, तर तुमच्या बँकेतील सगळे पैसे जातील.

    कोरोना काळात सगळ्या गोष्टी ऑनलाइन पद्धतीने झालेल्या आहेत. आणि यचा गोष्टीचा फायदा घेऊन सायबर क्राईमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता पॅन कार्ड स्कॅमबाबत आरबीआयने स्वतः ग्राहकांना अलर्ट केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फंडे वापरून स्कॅमर्स लोकांना फसवत आहेत. आता पॅन कार्डची लिंक पाठवून बँक खाते लुटण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. याबद्दल लोकांना एक मेल येत आहे.

    तुम्ही जर नवीन पॅन कार्ड डाउनलोड करत असाल, तर त्यासाठी तुम्ही सावधानगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे. अशा फसव्या लिंक पासून सावध राहण्याचा इशारा देखील दिलेला आहे. PBI फॅक्ट चेक यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. त्यांनी पोस्ट करून संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचे पॅनकार्ड डाउनलोड करण्याची लिंक आली असेल, तर ती लिंक ओपन करू नका. अशा ई-मेलला उत्तर देखील देऊ नका. असे या पोस्टमध्ये सांगण्यात आलेले आहेत. तसेच तुमच्या बँकेची माहिती तसेच वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नका. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

    ज्यावेळी तुम्ही अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करता त्यावेळी तुमच्या बँकेची तसेच तुमची वैयक्तिक माहिती देखील हॅकर्सला कळते. त्यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्ही अशा फ्रॉड ईमेल तसेच लिंकपासून लांब राहा. तसेच तुमच्या मोबाईलच्या सुरक्षिततेसाठी हे देखील धोकादायक असू शकते.

    ई पॅन कार्ड कसे मिळवायचे?

    तुम्हाला जर ई पॅन कार्ड मिळवायचे असेल, तर तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन तिथून हे पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. युजरसाठी पॅन कार्डचा पर्याय मिळेल. या ठिकाणी पूर्ण प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला हे पॅन कार्ड डाउनलोड करता येते. तुम्ही केवळ भारत सरकारच्या अधिकृत आयकर वेबसाईटवरूनच हे पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.

    रेल्वे विभागात 1036 पदांची भरती; असा करा अर्ज

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. RRB ने विविध मंत्रीस्तरीय आणि स्वतंत्र पदांसाठी तब्बल 1036 जागांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये भरतीमध्ये शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुवादक, कायदा तज्ञ यांसारख्या अनेक पदांचा समावेश असणार आहे. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी त्याची पात्रता तपासून या पोस्टसाठी अर्ज करावा.

    ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया –

    अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरू होणार असून , ती 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरु राहणार आहे. तरीसुद्धा, अधिकृत सूचना अद्याप प्रकाशित झालेली नाही. अर्जदारांनी RRB वेबसाइटवर जाऊन वेळोवेळी अपडेट्स तपासणे गरजेचे आहे . यामध्ये नोकरीच्या अधिसूचनेत पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, निवड, रिक्त पदांचे विभाजन आणि इतर तपशीलांचा समावेश असेल. आरआरबी भरती महत्त्वपूर्ण आहे कारण ती भारतीय रेल्वेमधील विविध विभागांमधील पदांसाठी चांगल्या संधी प्रदान करते.

    विविध विभागासाठी जागांची सूची –

    जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये विविध विभागासाठी जागांची सूची देण्यात आली आहे. त्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक (PGT) साठी 187, ट्रेंड ग्रॅज्युएट शिक्षक (TGT) साठी 338 , सायंटिफिक सुपरवायझर (एर्गोनॉमिक्स आणि ट्रेनिंग) साठी 03, मुख्य कायदा सहाय्यक साठी 54, सार्वजनिक वकील साठी 20, फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (इंग्रजी माध्यम) साठी 18, सांस्कृतिक सहाय्यक / प्रशिक्षण साठी 02, ज्युनियर अनुवादक हिंदी साठी 130, सीनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर साठी 03, स्टाफ व वेल्फेअर इन्स्पेक्टर साठी 59, ग्रंथपाल साठी 10, संगीत शिक्षक (महिला) साठी 03 , प्राथमिक रेल्वे शिक्षक साठी 188, सहाय्यक शिक्षक (महिला प्राथमिक शाळा) साठी 02, प्रयोगशाळा सहाय्यक / शाळा साठी 07, आणि प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III (रसायनशास्त्र आणि धातूशास्त्र) साठी 12 पदे उपलब्ध आहेत. विविध शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्रातील हि पदे इच्छुक उमेदवारांसाठी मोठ्या संधी प्रदान करणार आहे.

    किती फी आकारली जाणार –

    अर्ज करण्यासाठी सामान्य , OBC, आणि EWS प्रवर्ग यांच्याकडून 500 रुपये आकारले जातील. तसेच SC/ST च्या उमेदारांकडून 250 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. प्रत्येक पदानुसार पात्रतेचे निकष वेगवेगळे असणार आहेत . तरी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते तपासणे गरजेचे आहे. हे सर्व निकष पाहिल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे तुमच्यासाठी रेल्वेने खूप चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. तरी या संधीचा सर्व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा.

    सिबिल स्कोर खराब झाल्यास सुधारण्यास किती कालावधी लागतो? जाणून घ्या सविस्तर

    Cibil Score

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सर्वसामान्य लोकांमध्ये कर्ज घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. लोकांच्या अपेक्षा खूप जास्त वाढलेले आहेत. परंतु त्यांच्या अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे एका वेळी जास्त रक्कम नसते. त्यामुळे अनेक लोक कर्जाचा पर्याय निवडतात परंतु जेव्हा कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज देते. त्यावेळी त्यांच्या अनेक अटी आणि शर्ती तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. जर तुम्ही त्या अटींचे पालन केले, तरच तुमचे कर्ज मंजूर केले जाते. कर्ज घेताना सगळ्यात आधी तुमचा बँकेच्या सिबील स्कोर चेक करतात. तुमची क्रेडिट हिस्ट्री देखील तपासली जाते. जर तुमचा हा सिबिल स्कोर चांगला असेल तरच तुमचा अर्ज मंजूर केला जातो. जर तुम्ही अगोदर घेतलेले कर्ज व्यवस्थित फेडले नसेल, किंवा ईएमआय थकले असतील तर त्याचा परिणाम तुमच्या सीबील स्कोरवर होतो.आणि तुमचा सीबील खराब होतो. सिबिल स्कोर खराब असल्याने बँका तुम्हाला कर्ज देत नाही. परंतु जर तुमचा सीबील स्कोर खराब झाला असेल, तर तो कशा पद्धतीने नीट करावा? यासाठी किती वेळ लागतो? याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

    सिबिल स्कोर का खराब होतो ?

    खराब होण्यामागे अनेक कारण आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे जर तुम्ही एखाद्या कर्ज घेतले असतील आणि त्याचे ईएमआय वेळेवर भरलेले नसतील, तसेच त्या कर्जाचे सेटलमेंट केले असेल, तर तुमचा सिबील स्कोर खराब होतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल, आणि पेमेंट जर वेळेवर भरले नसेल, तर तुमचा क्रेडिट स्कोर कमी होतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही संयुक्त कर्ज घेतले असेल, किंवा एखाद्याच्या कर्जाला गॅरेंटर असाल, त्या व्यक्तीने जर कर्ज भरले नसेल, तरी त्याचा वाईट परिणाम तुमच्या सिबील स्कोरवर होतो.

    सिबिल स्कोर कसा सुधारायचा?

    तुम्हाला जर तुमच्या सीबील स्कोरची काळजी घ्यायची असेल तर सगळ्यात आधी मोठ्या स्वरूपाचे कर्ज घेऊ नका. जर कर्ज घेतले, तर त्याचे ईएमआय ळेवर भरा. तुम्ही क्रेडिट कार्डवर 30% पेक्षा जास्त खर्च करू नका. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्याच्या कर्जासाठी गॅरेंटर व्हायचे असेल, तर संपूर्ण विचार करून निर्णय घ्या. अन्यथा याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होऊ शकतो.

    सिबिल स्कोर नीट करण्यासाठी किती वेळ कालावधी लागतो

    जर तुमचा सिबिल स्कोर खराब झाला असेल, तर तो एका दिवसात नीट होत नाही. यासाठी जवळपास कमीत कमी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. तसेच यापेक्षाही जास्त काळ लागू शकतो.

    महिला सन्मान योजनेचा अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात; ही आहेत महत्वाची कागदपत्रे

    Mahila Sanman Yojana

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महिलांसाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना आणत असतात. अशातच महिलांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आजपासून म्हणजेच 23 डिसेंबर पासून महिला सन्मान योजना साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. याबाबतची माहिती दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेली आहे.

    2024 आणि 25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची चर्चा झाली होती. याआधी मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत दिल्लीतील महिलांना 1 हजार रुपये दिले जात होते. परंतु आता निवडणुकीनंतर ही रक्कम 2100 रुपये करण्यात येणार आहे. या योजनेसाठी आता अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. तुम्ही आजपासून या योजनेसाठी अर्ज करू शकता. यासाठी महिलांना कुठेही जायची गरज नाही. बाकीचे लोक त्यांच्या घरी येऊन नोंदणी करतील. आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक कार्ड देखील दिले जाईल. त्या कार्डची सुरक्षितपणे काळजी घ्यायची आहे. नोंदणी झाल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होईल. आणि तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

    आवश्यक कागदपत्र

    मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे त्यांच्या आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक खात्याचे तपशील, पत्त्याचा पुरावा, वीज बिल, पाणी बिल, किंवा रेशन कार्ड ही कागदपत्र असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसेल तर तुमचा अर्ज मंजूर केला जाणार नाही.