Thursday, January 1, 2026
Home Blog Page 328

बटाटयाच्या पिकाला पूर्णपणे नष्ट करतील हे रोग; अशाप्रकारे करा व्यवस्थापन

Potato

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या धुके, तापमानातील चढ-उतार आणि उच्च सापेक्ष आर्द्रता असे हवामानात बदल होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात उगवलेल्या बटाटा पिकांवर उशिरा येणा-या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे.बटाटा हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पीक आहे, परंतु धुके, तापमानातील चढउतार आणि उच्च आर्द्रता या बदलत्या हवामानामुळे रोगांचा धोका वाढतो. यापैकी सर्वात सामान्य आजार म्हणजे ब्लाइट, जो दोन प्रकारांमध्ये विभागलेला आहे: पिचटा ब्लाइट आणि अगाट ब्लाइट. या दोन्ही रोगांमुळे बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांनी बटाट्याच्या पिकाला तुरट रोगापासून वाचवण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या तर त्यातून चांगला नफा मिळू शकतो. हे आजार ओळखण्याचे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग जाणून घेऊया.

पिछाता झुलसा

रोगाची ओळख : या रोगात बटाट्याची पाने काठावरुन सुकू लागतात. कोरडा भाग बोटांनी चोळला की कर्कश आवाज येतो. हा रोग प्रामुख्याने जेव्हा वातावरणातील तापमान 10°C ते 19°C दरम्यान असते तेव्हा पसरतो. याला शेतकरी ‘आफत’ म्हणतात.

व्यवस्थापन:

  • डिसेंबरच्या शेवटी एकदा संरक्षणात्मक फवारणी करा.
  • 400-500 लिटर पाण्यात द्रावण तयार करा आणि 10-15 दिवसांच्या अंतराने पुढीलपैकी कोणतीही फवारणी करा.
  • मॅन्कोझेब ७५% विद्राव्य पावडर (२ किलो प्रति हेक्टर)
  • झिनेब ७५% विरघळणारी पावडर (२ किलो प्रति हेक्टर)
  • पिकावर प्रादुर्भाव असल्यास खालील औषधांची फवारणी करावी.
  • मेटॅलॅक्सिल ८% + मॅन्कोझेब ६४% (२.५ किलो प्रति हेक्टर)
  • कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% (1.75 किलो प्रति हेक्टर)

अगात झुलसा

रोगाची ओळख: या रोगात पानांवर तपकिरी गोल ठिपके तयार होतात, जे हळूहळू वाढतात आणि पाने जाळतात. हा आजार साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दिसून येतो.

व्यवस्थापन:

  • झिनेब ७५% विरघळणारी पावडर (२ किलो प्रति हेक्टर)
  • मॅन्कोझेब ७५% विद्राव्य पावडर (२ किलो प्रति हेक्टर)
  • कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% विरघळणारी पावडर (२.५ किलो प्रति हेक्टर)
  • कॅप्टन 75% विरघळणारी पावडर (2 किलो प्रति हेक्टर)
  • रोगाची लक्षणे दिसू लागताच त्वरित फवारणी करावी.
  • 400-500 लिटर पाण्यात द्रावण तयार करून फवारणी करावी.

Benefits of Eating Garlic | कच्च्या लसणाची एक पाकळी आरोग्यासाठी वरदान; कोलेस्ट्रॉपासून ते कर्करोगापासून होते संरक्षण

Benefits of Eating Garlic

Benefits of Eating Garlic | आपले भारतीय मसाले हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहेत. जेवणाला चव येण्यासोबतच आपल्याला आरोग्याला देखील याचे खूप फायदे होतात. लसूण हा औषधी गुणधर्मांसाठी शतकानुशतके ओळखला जातो. लसणाची एक पाकळी अनेक रोगांवर रामबाण उपाय मानली जाते. विशेषत: रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात (Benefits of Eating Garlic). चला जाणून घेऊया रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे काही खास फायदे.

हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान | Benefits of Eating Garlic

  • रक्तदाब नियंत्रण- लसणात असलेले एलिसिन नावाचे घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. हे रक्तवाहिन्यांना ब्लॉक होण्यापासून रोखून रक्त परिसंचरण सुरळीत करते.
  • कोलेस्ट्रॉल कमी करते- लसूण खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करतो.
  • रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते- लसूण रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

  • लसणात अँटिऑक्सिडेंट आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. हे सर्दी, खोकला आणि इतर संक्रमणांशी लढण्यास मदत करते.
  • पचनसंस्था निरोगी राहते
  • पचन सुधारते- लसूण पाचन एंझाइमचे उत्पादन वाढवून पचन सुधारते.
  • बद्धकोष्ठतेपासून आराम- लसूण बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास आणि पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत करते.
  • हेलिकोबॅक्टर पायलोरी बॅक्टेरियाशी लढा – या जीवाणूमुळे पोटात अल्सर होऊ शकतो. लसूण या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करते.

कर्करोगपासून संरक्षण

  • लसणात अनेक संयुगे असतात जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात. हे पोट, कोलन आणि स्तनाच्या कर्करोगासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते.
  • अजून बरेच फायदे आहेत
  • वजन कमी करण्यास मदत- लसूण चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करते.
  • त्वचेसाठी फायदेशीर- लसणात अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.
  • केसांसाठी फायदेशीर- लसूण केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि कोंडा कमी करते.

लसूण कसा आणि किती खावा? | Benefits of Eating Garlic

  • कच्च्या लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास ते चावून खाऊ शकता किंवा दही किंवा मध मिसळून खाऊ शकता.
  • या गोष्टी लक्षात ठेवा
  • ऍलर्जी- काही लोकांना लसणाची ऍलर्जी असू शकते. त्यामुळे लसणाची ऍलर्जी असेल तर ते खाऊ नका.
  • औषधांशी संवाद- लसूण काही औषधांशी संवाद साधू शकतो. त्यामुळे, तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर कच्चा लसूण खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • रक्त पातळ करणारी औषधे- लसूण रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा प्रभाव वाढवू शकतो.

Jio New Recharge Plans | Jio ने आणले 3 स्वस्त रिचार्ज प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार अनेक फायदे

Jio New Recharge Plans

Jio New Recharge Plans | आजकाल टेलिकॉम कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत आहेत. अनेक खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्चाचे प्लॅन खूप महाग केले आहेत. त्यानंतर अनेक ग्राहकांनी त्यांचे सीम पोर्ट करून सरकारी बीएसएनएल कंपनीकडे ते वळलेले आहेत. ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्याच्या कालावधी बीएसएनएलने जवळपास 36 लाख नवीन युजर जोडलेले आहेत, तर एअरटेल आणि जिओनी त्यांचे अनेक युजर्स कमावलेले आहे.

परंतु आता या खाजगी टेलिकॉम कंपन्या त्यांचे ग्राहक परत मिळवण्यासाठी अनेक नवनवीन प्लॅन लॉन्च करत आहेत. जिओनी देखील अनेक प्लॅन ऑफर केलेले आहेत. जे तुम्हाला अत्यंत स्वस्त करत मिळतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्लॅन बद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत जास्त फायदा होणार आहे.

जिओचा 336 दिवसांचा प्लॅन | Jio New Recharge Plans

सध्या जिओ नवनवीन ग्राहकांना जोडण्यासाठी अनेक प्लॅन लॉन्च करत आहेत. अशातच त्यांनी आणखी एक नवीन प्लॅन लॉन्च केलेला आहे. जिओचा हा प्लॅन 1199 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला 336 दिवसाची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये महिन्याला किंवा 150 रुपये एवढा खर्च येणार आहे. यामध्ये तुम्ही संपूर्ण भारतभर अनलिमीटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. तसेच 24 जीबी डेटा देखील तुम्हाला मिळणार आहे. हा डेटा तुम्ही संपूर्ण व्हॅलिडीटी काळात वापरू शकता. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला 3600 फ्री एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा ॲक्सिस देखील तुम्हाला फ्री दिला जाणार आहे. यामध्ये युजर्सला अनेक फायदे मिळणार आहे.

जिओचा 479 रुपयांचा प्लॅन

जिओनी नवीन 479 रुपयांचा प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 6 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा देखील यामध्ये लाभ घेता येणार आहे. जर तुम्हाला जास्त इंटरनेटची गरज नसेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत चांगला प्लॅन आहे. तुम्हाला कमी किमतीमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा देखील पर्याय यामध्ये मिळत आहे.

जिओचा 189 रुपयांचा प्लॅन

जिओचा 189 रुपयांचा प्लॅन हा सगळ्यात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 2 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. ज्या लोकांना इंटरनेट पेक्षा कॉलिंग जास्त लागते. त्यांच्यासाठी हा आपल्याला अत्यंत फायद्याचा प्लॅन असणार आहे.

महिलांसाठी सरकारने आणली पिंक ई रिक्षा योजना; जाणून घ्या पात्रता

Pink E Rikshaw

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले राज्य सरकार तसेच केंद्र सरकार हे महिलांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना आणत असतात. महिलांचा आर्थिक दृष्ट्या आणि त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून अनेक योजना राबवल्या जातात अशातच आता महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच महिलांना रोजगार निर्मिती व्हावी. यासाठी राज्य सरकारने एक नवीन योजना राबवली आहे. या योजनेचे नाव पिंक इ रिक्षा असे आहे. या योजनेअंतर्गत विशेषतः दारिद्र रेषेखालील महिला, विधवा महिला आणि घटस्फोटीत महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.

सरकार या योजनेअंतर्गत महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये महिलांना केवळ 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. 20 टक्के रक्कम आर्थिक सहाय्य राज्य सरकारकडून दिले जाणार आहे. आणि उरलेले 70% हे बँकामार्फत कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी अनेक बँकांसोबत सरकारने करार देखील केलेली आहे. मुख्यमंत्री राजकीय बहिणी योजनेच्या अधिवेशनात सरकारने ही नवीन योजना चालू केलेली आहे. आणि तिची सध्या राज्यभर चर्चा देखील चालू झालेली आहे.

राज्यातील सर्व पात्र महिला या पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात. आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सरकारने ही पिंक इ रिक्षा योजना चालू केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आणि संरक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती यांच्याकडून आव्हान देखील करण्यात आलेले आहेत. सार्वजनिक वाहतूक करताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि इतर महिलांना रोजगारांची संधी देखील उपलब्ध व्हावी. या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. .महिलांच्या आर्थिक स्तरात सुधारणा व्हावी आणि स्वावलंबी बनण्याच्या दिशेने त्यांना आणखी एक पाऊल टाकता यावे, यासाठी ही योजना चालू केलेली आहे.

योजनेसाठी पात्रता

  • लाभार्थी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • महिलेचे वय हे 20 ते 40 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • त्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख रुपयांच्या आत असावे.
  • लाभार्थी महिन्याचे बँक खाते असणे गरजेचे आहे.
  • दारिद्र रेषेखालील विधवा आणि घटस्फोटीत महिलांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाईल.

आवश्यक कागदपत्रे

  • मतदान ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • डोमासाईल सर्टिफिकेट
  • शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न दाखला
  • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
  • बँक खाते पुस्तक

8 एकरात कोबीची लागवड करून शेतकरी झाला मालामाल; कमावतोय लाखो रुपये

Success Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल शेतकरी हे आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहेत. जुन्या पारंपारिक पद्धतीची पिके न घेता आता नवनवीन पिकांची ते शेतामध्ये लागवड करायला लागलेले आहे. यामध्ये त्यांना चांगली यश देखील मिळत आहे. अनेक तरुण लोक देखील नोकरी सोडून शेतीकडे वळताना दिसत आहे. जर तुम्ही बाजारपेठेचा तसेच पिकांच्या भावाचा योग्य पद्धतीने अभ्यास करून नियोजन केले तर त्यातून तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळू शकतो. शेतीमध्ये अनेक प्रकारचा भाजीपाला देखील केला जातो. परंतु जर तुम्ही योग्य नियोजन करून हा भाजीपाला केला. तर त्यातील तुम्हाला चांगला फायदा मिळेल. शेतकऱ्यांनी कोबीची लागवड करून त्यातून चांगले उत्पन्न मिळवलेले आहे. आता आपण या शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या घोडेश्वर येथे असृलम चौधरी हे राहतात. ते एक उच्चशिक्षित आहेत. त्यांनी त्यांच्या तब्बल 8 एकर क्षेत्रामध्ये कोबीचा यशस्वी प्रयोग केलेला आहे. त्यांच्या या कोबीला चांगला बाजारभाव देखील मिळालेला आहे. जर आत्ता आहे, तोच बाजार भाव पुढील दोन अडीच महिने राहिला, तर त्यांना या पिकातून जवळपास 54 लाखांची उत्पन्न होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या शेतातून कोबीची काढणी देखील सुरू झाली आहे. तसेच त्या परिसरातील अनेक व्यापारी शेतात जाऊन त्यांच्या कोबीची खरेदी देखील करत आहे.

असलम चौधरी यांचे शिक्षण बीएससी झालेले आहेत. परंतु उच्चशिक्षण घेऊन देखील नोकरीच्या मागे न करता त्यांनी शेतामध्ये काम करण्यास सुरुवात केली. आधुनिक पद्धतीने ते शेतीचे वेगवेगळे प्रयोग करत आहेत. तसेच शेतीकडे त्यांनी स्वतःचे करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू केले. त्यांनी कोबी सोबतच केळी, द्राक्ष इत्यादी बागायती पिके देखील घेण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी आठ एकर शेतीमध्ये कोबीची लागवड केली. पिकाचे योग्य व्यवस्थापन केले, योग्य पद्धतीने त्यांना पाणी दिले. आणि यातून त्यांना आता चांगले उत्पादन देखील मिळत आहे.

या शेतीतून मिळणारा कोबीचा गड्डा हा साधारणपणे दीड किलो वजनाचा आहे. त्यामुळे त्या शेतामधून त्यांना जवळपास 270 टन एवढे उत्पादन निघेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. 20 रुपये प्रति किलोचा दर त्यांनी गृहीत धरला, तर त्यांना जवळपास 54 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे 78 फूट खोलाने 30 फूट रुंद एवढी विहीर आहे. तसेच त्यांनी भीमा नदीवरून या विहिरीमध्ये पाईपलाईन देखील टाकलेली आहे. या माध्यमातून ते पाण्याचे नियोजन करतात.

या आठ एकरच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जवळपास 1 लाख 78 हजार रोपांची लागवड केलेली आहे. त्यांना एक रोप 60 पैसे प्रति या दराने मिळालेले आहे. यासाठी त्यांना एक एकरी 45 हजार रुपये एवढा खर्च आलेला आहे. म्हणजेच 8 एकर साठी त्यांना एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा खर्च आलेला आहे. परंतु त्यांनी योग्य व्यवस्थापन करून कोबीची लागवड केल्याने यातून त्यांना लाखो रुपयांचा नफा देखील होत आहे.

क्रेडिट कार्डने ऑनलाइन शॉपिंग करताना या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दररोज अशी अनेक प्रकरणे समोर येतात. ज्यात कुणाला तरी डिजिटल पद्धतीने अटक केली जाते. कुणाची वैयक्तिक माहिती चोरली जाते आणि त्याच्या खात्यातून पैसे काढले जातात. अशा परिस्थितीत ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते आणि काही वेळातच तुमचे कष्टाने कमावलेले पैसे सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचतील. आज जाणून घेऊया क्रेडिट कार्डने ऑनलाइन शॉपिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

केवळ विश्वासार्ह साइटवरूनच खरेदी करा

नेहमी विश्वासार्ह साइटवरूनच खरेदी करा. आजकाल, सायबर फसवणूक करणारे देखील लोकांना गोंधळात टाकण्यासाठी समान नावांच्या साइटद्वारे लोकांची फसवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत, नेहमी खात्री करा की तुम्ही अस्सल वेबसाइटवरून खरेदी करत आहात.

आपल्याकडे माहिती नसल्यास शोध घ्या

जर तुम्ही पहिल्यांदाच एखाद्या वेबसाइटवरून खरेदी करत असाल तर त्याबद्दल नक्कीच संशोधन करा. इंटरनेटवर जा आणि त्याची पुनरावलोकने वाचा. जर कोणत्याही वेबसाइटला खूप नकारात्मक पुनरावलोकने मिळाली असतील तर त्यातून खरेदी करणे टाळा. असे केल्याने तुम्ही सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचाल.

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्रिय करा

अनेक ऑनलाइन किरकोळ विक्रेते टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन देतात. हे फार महत्वाचे आहे. पासवर्ड व्यतिरिक्त, तुम्हाला तुमचे खाते सुरक्षित करण्याचा दुसरा मार्ग मिळेल. अशा परिस्थितीत, एखाद्याला तुमचा पासवर्ड माहित असला तरीही, ते संदेश किंवा मेलवर प्राप्त झालेल्या सत्यापन कोडशिवाय तुमच्या खात्यात प्रवेश करू शकणार नाहीत.

व्हर्च्युअल किंवा डिस्पोजेबल क्रेडिट कार्ड वापरा

अनेक वित्तीय संस्था आभासी किंवा डिस्पोजेबल क्रेडिट कार्ड देतात. हे तात्पुरते कार्ड क्रमांक आहेत, जे तुमच्या क्रेडिट कार्ड खात्याशी जोडलेले आहेत, परंतु ते व्यवहारानंतर कालबाह्य होतात. अशा परिस्थितीत, कोणताही फसवणूक करणारा तुमच्या वास्तविक खात्यात प्रवेश करू शकणार नाही.

तुमच्या खात्यावर लक्ष ठेवा

तुमच्या खात्यावर लक्ष ठेवा आणि ते नियमित अंतराने तपासत रहा. याच्या मदतीने कोणताही बेकायदेशीर व्यवहार होत असल्यास त्याची माहिती मिळेल आणि आवश्यक ती पावले उचलता येतील. खात्याशी संबंधित कोणत्याही संशयास्पद हालचालीबद्दल बँकेला ताबडतोब कळवा.

Youtube चा मोठा निर्णय, आता न कळवता डिलिट करणार असे व्हिडिओ

Youtube

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्ही देखील YouTube कंटेंट क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. भारतात, लोक सहसा त्यांच्या व्हिडिओंना अधिक व्ह्यूव्ज मिळविण्यासाठी YouTube वर क्लिकबेट म्हणजेच फसव्या थंबनेलचा वापर करतात. परंतु युट्युबने असे व्हिडिओ न कळवता डिलिट करणार असल्याचे सांगितले.

Google च्या मालकीच्या YouTube ने घोषणा केली आहे की ते क्लिकबेट थंबनेल आणि शीर्षक असलेल्या व्हिडिओंवर कठोर कारवाई करेल. ही मोहीम भारतात सुरू केली जाईल आणि विशेषत: ब्रेकिंग न्यूज किंवा वर्तमान घटनांवर आधारित व्हिडिओंवर लक्ष केंद्रित केले जाईल. व्हिडिओ कंटेंटबद्दल दर्शकांची दिशाभूल होऊ नये म्हणून हे पाऊल उचलले जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. YouTube ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की भारतात क्लिकबेट थंबनेल आणि शीर्षकांवर कठोर कारवाई केली जाईल. “अति क्लिकबेट” ची समस्या सोडवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. जेव्हा व्हिडिओचे शीर्षक किंवा थंबनेल त्याच्या विषयाशी जुळत नसल्यास असे व्हिडीओ डिलिट करण्यात येणार आहेत.

प्रेक्षकांची दिशाभूल करण्यास मनाई

YOUTUBe ने सांगितले आहे की; अशा सवयींमुळे दर्शकांना विश्वासघात झाल्याची भावना येऊ शकते. विशेषतः जेव्हा ते महत्त्वाच्या किंवा वेळ-संवेदनशील माहितीसाठी प्लॅटफॉर्म वापरतात. ही समस्या कमी करण्यासाठी, YouTube या धोरणाचे उल्लंघन करणारी सामग्री काढण्यास सुरुवात करेल.

सुधारण्यासाठी वेळ मिळेल

सुरुवातीला प्लॅटफॉर्म अशा व्हिडिओंवर स्ट्राइक जारी करणार नाही. निर्मात्यांना या नवीन नियमांनुसार त्यांची सामग्री संपादित करण्यासाठी वेळ मिळेल याची खात्री करणे हा यामागचा उद्देश आहे, परंतु लवकरच, YouTube हे धोरण नवीन व्हिडिओ अपलोडसाठी प्राधान्याने लागू करेल.

‘या’ सवयी करतील तुमच्या डोळ्यांचे आरोग्याचे खराब; अशाप्रकारे घ्या काळजी

Eyecare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डोळे हे आपल्या शरीराचा अनमोल भाग आहेत. हे आपल्याला जग पाहण्यास, समजून घेण्यास आणि अनुभवण्यास मदत करते. त्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, आपल्या व्यस्त जीवनामुळे आणि वाईट सवयींमुळे आपण अनेकदा डोळ्यांची काळजी घेणे विसरतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की जीवनशैली आणि आहारातील गडबडीमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर तसेच संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो.

आपले डोळे हे जग पाहण्याचे माध्यम आहे, परंतु काही सवयी हळूहळू त्यांचे नुकसान करू शकतात. सतत डिजिटल स्क्रीनचा वापर, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, विश्रांतीचा अभाव अशा सवयींमुळे डोळ्यांच्या गंभीर समस्या निर्माण होतात. या सवयी वेळीच बदलल्या नाहीत तर त्यांचा केवळ तुमच्या दृष्टीवरच परिणाम होत नाही तर डोळ्यांच्या आरोग्यावरही खोल परिणाम होऊ शकतो.

डोळ्यांच्या समस्या

आरोग्य तज्ञ म्हणतात, आपले डोळे अतिशय नाजूक आणि संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे प्राधान्य असले पाहिजे. काही सवयी सुधारून तुम्ही तुमचे डोळे सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकता. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये काही समस्या जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. आजकाल, मुलांना कमी दृष्टी आणि डोळ्यांशी संबंधित विविध रोगांचा धोका देखील आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानावर परिणाम होतो. याशिवाय वाढत्या वयाबरोबर डोळ्यांच्या समस्यांचा धोका वाढतो, त्याबाबत प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

डिजिटल स्क्रीनचा दीर्घकाळ वापर

आजकाल बहुतेक लोक दिवसभर संगणक, मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनसमोर वेळ घालवतात. जास्त वेळ स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांना थकवा जाणवतो आणि त्यामुळे जळजळ आणि खाज सुटते याला ‘डिजिटल आय स्ट्रेन’ म्हणतात. स्क्रीनवर जास्त वेळ घालवण्यामुळे डिजिटल डोळा ताण, ड्राय आय सिंड्रोम आणि अंधुक दृष्टी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

संतुलित आहाराचा अभाव

जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते. विशेषतः अ, क आणि ई जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन न केल्यास त्याचा परिणाम डोळ्यांवरही होऊ लागतो. आजकाल, मुलांना कमी दृष्टी गाजर, पालक, ब्रोकोली आणि मासे यांसारखे पौष्टिक पदार्थ खा. तुमच्या आहारात ओमेगा ३ फॅटी ॲसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करा. जास्त पाणी प्या, जेणेकरून डोळे हायड्रेट राहतील.

पुरेशी झोप न मिळणे

झोपेची कमतरता एकंदर आरोग्यासाठी हानिकारक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे डोळे लाल, सुजलेले, थकलेले दिसतात. याचा तुमच्या डोळ्यांच्या कार्यावर आणि दृष्टीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आरोग्य तज्ञ म्हणतात की सर्व लोकांनी दररोज किमान 7-8 तास झोप घेतली पाहिजे. झोपण्यापूर्वी स्क्रीन वापरणे थांबवा आणि झोपण्याची निश्चित वेळ निश्चित करा. पुरेशी झोप न मिळणे

झोपेची कमतरता एकंदर आरोग्यासाठी हानिकारक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे डोळे लाल, सुजलेले, थकलेले दिसतात. याचा तुमच्या डोळ्यांच्या कार्यावर आणि दृष्टीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आरोग्य तज्ञ म्हणतात की सर्व लोकांनी दररोज किमान 7-8 तास झोप घेतली पाहिजे. झोपण्यापूर्वी स्क्रीन वापरणे थांबवा आणि झोपण्याची निश्चित वेळ निश्चित करा. अशा काही सवयी सुधारून तुम्ही तुमचे डोळे सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकता.

स्मार्ट वॉच वापरणे आरोग्यासाठी धोकादायक; संशोधनात सापडली हानिकारक रसायने

Smart watch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुरुवातीच्या काळात घड्याळाद्वारे केवळ वेळ जाणून घेतली जात होती. परंतु हळूहळू या घड्याळाचे स्वरूप बदलत गेले. आणि आजकाल फॅशनसाठी घड्याळ वापरण्यात येते. घड्याळाचे वेगवेगळे प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यातीलच आजकाल स्मार्ट वॉच वापरणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक लोक स्मार्ट वॉच वापरतात. या स्मार्ट वॉचद्वारे तुम्हाला वेळ तर समजते. परंतु त्या बरोबरच तुमच्या आरोग्याची माहिती देखील मिळते. म्हणजेच तुम्ही किती पावले चाललेले आहात? तुमच्या हृदयाची गती कशाप्रकारे होत असते. या सगळ्या गोष्टींवर स्मार्ट वॉच लक्ष ठेवत असते. परंतु एका नवीन संशोधनात अशी वेगळी समोर आली आहे की, या स्मार्टवॉचमुळे तुम्ही काही हानिकारक रसायनांच्या संपर्कात देखील घेऊ शकता. काही लोकप्रिय स्मार्ट वरचा ब्रँडमध्ये PFHXA याचे प्रमाण जास्त आहे. हे रसायन आपल्या त्वचेद्वारे शरीरात शोषले जाऊ शकते.

घड्याळाच्या वेगवेगळ्या ब्रँडचे निरीक्षण करण्यात आलेले आहे. आणि यामध्ये संशोधकांनी शोधून काढलेली आहे की फ्लोरोइलास्टोमर्स हे घाम आणि तेलांचा प्रतिकार तयार करणे यासाठी डिझाईन केलेले एक सिंथेटीक रबर बँड आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर होतो. आणि ही रसायने त्वचेद्वारे आपल्या शरीरात शोषली जाऊ शकतात.

रासायनिक विश्लेषकांच्या भाग म्हणून चाचणी केलेल्या बँडमध्ये Google, Samsung, Apple, Fitbit आणि CASETiFY सारख्या मोठ्या नावांनी ऑफर केलेल्या बँडचा समावेश होतो. विशेष म्हणजे, सॅमसंग आणि ऍपल दोघेही फ्लोरोइलास्टोमर्सपासून बनवलेले घड्याळ बँड विकतात, संशोधनाच्या केंद्रस्थानी असलेले मुख्य समस्याप्रधान रसायन आहे आणि त्यांच्या वेबसाइटवर त्याचे फायदे देखील नमूद करतात.
संशोधन पेपर “फ्लोरोइलास्टोमर्सपासून बनवलेल्या घड्याळाच्या बँडच्या पृष्ठभागावरून सहजपणे काढता येणाऱ्या PFHxA च्या उच्च एकाग्रतेबद्दल” चिंता व्यक्त करतो. अधिक चिंताजनक भाग म्हणजे लोक ही स्मार्ट उपकरणे दिवसाच्या कामांपेक्षा अधिक वापरतात.

स्लीप-क्वालिटी मॉनिटरिंग आणि स्लीप एपनिया डिटेक्शन यासारख्या वैशिष्ट्यांचा मुख्य प्रवाहात प्रवेश केल्यामुळे, लोकांनी झोपेत असतानाही ते परिधान केले पाहिजे. “दिवसाला 12 तासांपेक्षा जास्त काळ या वस्तू परिधान केल्याने त्वचेवर लक्षणीय हस्तांतरण आणि त्यानंतरच्या मानवी संपर्कात येण्याची संधी मिळते, अशी माहिती संशोधनात समोर आली आहे संशोधनाने असे सुचवले आहे की PFHxA चे तब्बल 50% एक्सपोजर त्वचेद्वारे शोषले जाते आणि एक तृतीयांश रक्तप्रवाहात प्रवेश करते. “एका अभ्यासात असे दिसून आले आहे की PFHxA हे संपूर्ण रक्ताच्या नमुन्यांमध्ये मोजले जाणारे तिसरे सर्वोच्च PFAS एकाग्रता आहे,” असे संशोधन संघ म्हणतो.

PFHxA हे कायमचे रसायन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसायनांच्या विशेषत: धोकादायक वर्गात मोडतात, आणि त्यांना कुप्रसिद्ध नाव प्राप्त झाले आहे कारण ते कायम राहतात आणि पर्यावरणीय बिघाडाचे नियमित चक्र टाळतात. चिंतेची बाब म्हणजे त्यांचा हानीकारक प्रभाव अजूनही पूर्णपणे शोधला गेला नाही.

शेतकऱ्यांना खुशखबर!! नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari Yojana) योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे . या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना पाच हप्ते दिले गेले असून, सहावा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरु केलेल्या या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होत असून, यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यास मदत झाली आहे.

योजनेचा लाभ –

राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच दिला जातो. यामध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हा लाभ तीन हप्त्यांमध्ये प्रत्येक चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या स्वरूपात दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे. हि योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरलेली आहे.

हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा होणार –

रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. याच महिन्यात नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. तसेच याआधी 5 ऑक्टोबर 2024 रोजी नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पीएम किसानचा अठरावा हप्ता एकाच दिवशी पात्र शेतकऱ्यांना मिळाला होता.

चार महिन्यांच्या अंतराने हप्ते जमा –

दोन्ही योजना चार महिन्यांच्या अंतराने हप्ते जमा करतात. ऑक्टोबर 2024 मध्ये हे पैसे जमा झाल्यानंतर फेब्रुवारी 2025 हा पुढील वितरणाचा कालावधी ठरतो. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा लाभ लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी या योजना राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांचे फळ असून, यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो.