Thursday, January 1, 2026
Home Blog Page 335

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये आत्महत्याचे प्रमाण जास्त; काय आहे कारण?

Men sucide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच काही दिवसांपूर्वी बेंगळुरू येथील अतुल सुभाष या इंजिनिअरने आत्महत्या केली. अतुल बेंगळुरूमधील एका कंपनीत एआय इंजिनिअर म्हणून काम करत होता. पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अतुलने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. अतुल सुभाष मोदी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुमारे दीड तासाचा व्हिडिओ बनवून पोस्ट केला होता. यासोबतच त्याने 24 पानांची सुसाईड नोटही सोडली आहे.

जिथे त्याने आपल्यावर झालेला अत्याचार आणि मानसिक छळ या सर्व गोष्टी सांगितल्या. सध्या बेंगळुरू पोलिसांनी अतुलची पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या सासरच्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करणारा अतुल हा पहिला माणूस नाही. प्रत्यक्षात अशी अनेक प्रकरणे यापूर्वीही उघडकीस आली आहेत. पुरुषांच्या आत्महत्येबाबत डब्ल्यूएचओ आणि एनसीआरबीची आकडेवारी तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

दर 5 मिनिटाला एका माणसाची आत्महत्या

दरवर्षी 7 लाखांहून अधिक लोक आत्महत्या करतात. ब्रेस्ट कॅन्सर, एचआयव्ही आणि मलेरिया यांसारख्या आजारांमुळे फारसे लोक मरत नाहीत. आत्महत्येमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, महिलांपेक्षा पुरुष जास्त आत्महत्या करतात. भारतातील NCRB च्या अहवालानुसार, आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक 100 लोकांपैकी 70 पुरुष आहेत. NCRB च्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये भारतात 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्या, ज्यापैकी 1,18,989 म्हणजेच 73% पुरुष होते. तर त्यात फक्त 4,50,26 महिला होत्या. या आकडेवारीनुसार दर ५ मिनिटाला एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे.

पुरुषांच्या आत्महत्येची आकडेवारी

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, भारतातील बहुतांश आत्महत्या प्रकरणांमध्ये ३० ते ४५ वयोगटातील लोकांचा समावेश आहे. यानंतर 18 ते 30 वयोगटातील लोकांचा समावेश करण्यात आला आहे., 45 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये हा आकडा कमी होता. 2021 च्या आकडेवारीनुसार, 30 ते 45 वर्षे वयोगटातील 5,20,54 लोकांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी 78 टक्के पुरुष होते.

तर, 18 ते 30 वयोगटातील 5,65,43 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्यामध्ये 67 टक्के पुरुष होते. तर 45 ते 60 वयोगटातील 3,01,63 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्यामध्ये 81 टक्के पुरुषांचा समावेश होता. 1,09,749 विवाहितांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी 74 टक्के पुरुष होते.

Gold And Silver Price | सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण; जाणून घ्या नवे दर

Gold And Silver Price

Gold And Silver Price | सध्या लगीन सराईला सुरुवात झालेली आहे. आपल्या भारतात लग्नामध्ये सोने खरेदी करण्याची परंपरा खूप जुनी आहे. त्यामुळे सोन्याच्या दुकानामध्ये या दिवसांमध्ये खूप जास्त गर्दी आहे. आता सोने खरेदी करणाऱ्या लोकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे आज 14 डिसेंबर 2024 रोजी सोन्याचे किमतींमध्ये घसरण झालेली आहे. सोन्याच्या किमती जवळपास 900 रुपयांनी कमी झालेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. जाणून घेऊयात आज सोन्याचे भाव नक्की काय आहेत?

24 कॅरेट सोने | Gold And Silver Price

आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 980 रुपयांनी कमी झालेले आहेत. 1 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 7789 रुपये मोजावे लागणार आहे. त्याचप्रमाणे 8 ग्रॅम सोने हे 62 हजार 312 रुपये झाले आहेत. तर 10 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 77890 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 100 ग्रॅम करण्यासाठी तुम्हाला 7 लाख 78 हजार 900 रुपये द्यावे लागणार आहेत.

22 ग्रॅम सोन्याची किंमत

आज 22 ग्रॅम सोन्याचे किमतीत देखील घट झालेली आहे. 1 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 7140 रुपये द्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे 8 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 57 हजार 840 रुपये द्यावे लागणार आहेत. 10 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 71400 मोजावे लागणार आहेत. तर 100 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 7 लाख 14 हजार रुपये मोजावे लागणार आहे.

18 कॅरेट सोने

आज 18 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील घट झालेली आहे. 1 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 5 हजार 842 रुपये द्यावे लागणार आहेत. 8 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 46, 736 रुपये द्यावे लागेल.. त्याचप्रमाणे 10 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 58,420 मोजावे लागणार आहे. तर 100 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 5 लाख 84 हजार 200 रुपये द्यावे लागणार आहेत.

चांदीची किंमत

आज चांदीच्या किमतीत देखील घट झालेली आहे. 8 ग्राम चांदीची किंमत 740 रुपये आहे. त्याचप्रमाणे 10 ग्रॅम चांदीची किंमत 925 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीची किंमत ही 9250 रुपये आहे, तर 1000 ग्रॅम चांदीची किंमत 92 हजार 500 रुपये एवढी आहे.

Pineapple Banefits | हिवाळ्यात अननस खाणे शरीरासाठी वरदान; ‘या’ आजारांपासून होते सुटका

Pineapple Banefits

Pineapple Banefits | हिवाळा सुरू झालेला आहे. थंडीला देखील चांगलीच सुरुवात झालेली आहे. परंतु थंडीत अनेक आजार देखील होत असतात. त्यामुळे हिवाळ्यात स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये शक्यतो सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, बद्धकोष्ठता, सांधेदुखी, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवतात. परंतु हिवाळ्यामध्ये जर आजारी पडायचे नसेल तर आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत करणे खूप गरजेचे असते. त्यामुळेच हंगामी फळे खाणे गरजेचे असते. तुम्ही जर थंडीच्या दिवसात हंगामी फळे खाल्ली, तर त्याचा तुमच्या शरीराला फायदा होतो खास करून हिवाळ्यामध्ये अननस जास्त प्रमाणात खाल्ले जाते. अननसामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला फायदे होतात. थंडीच्या दिवसात अननस शरीराला उबदार ठेवण्यासाठी जास्त मदत करते.

थंडीत अननस खाण्याचे फायदे | Pineapple Banefits

हिवाळ्यात जर तुम्ही अननस खाल्ले, तर त्याचे तुमच्या शरीराला खूप फायदे होतील. हे एक सगळे पोषण तत्व असलेले हंगामी फळ आहे. आता यातून कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत.

विटामिन सी

अननसमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी असते. यामुळे आपल्या रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच जर तुम्ही हिवाळ्यामध्ये अननसाचे सेवन केले, तर तुम्हाला सर्दी, त्याचप्रमाणे इतर इन्फेक्शन पासून बचाव होईल.

पचनक्रिया सुधारते

अननसामध्ये ब्रोमेलीन नावाचे एक एंजाइम असते. जे आपल्या पचन क्रियेमध्ये मदत करत असते. हिवाळ्यात जर तुम्हाला पचनासंबंधी कोणतीही समस्या असेल, तर तुमच्यासाठी अननस हा एक चांगला पर्याय आहे.

वजन नियंत्रित राहते | Pineapple Banefits

अननसमध्ये जास्त फायबर्स असतात. आणि कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अननस खूप फायद्याचे ठरते. हिवाळ्यामध्ये जास्त भूक लागते, त्यामुळे आपण जास्त खातो. परंतु या ऐवजी जर तुम्ही अननस खाल्ले तर तुमच्या शरीराला ऊर्जा देखील मिळते. आणि पोट देखील भरल्यासारखे वाटते. त्यामुळे खाण्याची इच्छा कमी होते.

त्वचेसाठी फायदेशीर

अननसमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट असतात. आणि विटामिन सी देखील असते. जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडे पडते. तसेच हायड्रेशन मिळत नाही. अशावेळी जर तुम्ही अननस खाल्ले तर तुमच्या शरीराला पोषणतत्व देखील मिळेल. आणि हायड्रेशन देखील वाढेल. त्याचप्रमाणे तुमची त्वचा अत्यंत चमकदार आणि सुंदर होईल.

ममता मशिनरीचा IPO 19 डिसेंबरपासून खुला; गुंतवणूकदारांना होणार फायदा

IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ममता मशिनरी लिमिटेडने आपल्या आयपीओसाठी प्राइस बँडची घोषणा केली आहे. तसेच या प्राइस बँडची रक्कम 230 ते 243 रुपयांपर्यंत प्रत्येक शेअरसाठी ठरवण्यात आली आहे. हा आयपीओ 19 डिसेंबर 2024 पासून सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे , तसेच यामध्ये गुंतवणूकदार 18 डिसेंबर रोजी आपले अर्ज करू शकणार आहेत. रिटेल गुंतवणूकदारांसाठी आयपीओ 23 डिसेंबरपर्यंत खुला राहणार आहे. तसेच याचे लिस्टिंग 27 डिसेंबर 2024 रोजी बीएसई आणि एनएसई या स्टॉक एक्स्चेंजवर होण्याची शक्यता आहे.

IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल स्वरूपाचा –

ममता मशिनरी लिमिटेडचा आयपीओ 179.39 कोटींचा आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) स्वरूपाचा असून, कंपनीकडून 74 लाख शेअर्स जारी करणार आहे. प्रत्येक लॉटमध्ये 61 शेअर्स असतील, ज्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांना किमान 14823 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी प्रति शेअर 12 रुपयेची विशेष सूट देण्यात आली आहे. यात वाटपाचे प्रमाण 50% हिस्सा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (QIBs) राखीव आहे. तर रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35% आणि नॉन इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी 15% हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे.

आर्थिक वर्षातील उत्पन्न –

वित्त वर्ष 2024 मध्ये कंपनीने 236.61 कोटींचे उत्पन्न कमावले, जे 2023 मध्ये 200.87 कोटी होते. यासोबतच 2024 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 36.13 कोटी होता, जो 2023 मध्ये 22.51 कोटी होता. हा आयपीओ प्रामुख्याने प्लास्टिक व पॅकेजिंग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या इच्छाशक्ती असलेल्या गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी ठरू शकते.

प्लास्टिक बॅग तयार करणारी आघाडीची कंपनी –

ममता मशिनरी लिमिटेड ही भारतातील प्लास्टिक बॅग तयार करणारी आघाडीची कंपनी आहे. कंपनी पाउच मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकेजिंग मशिनरीच्या उत्पादनात विशेष तज्ञ आहे आणि विविध उद्योगांमध्ये तिची प्रस्थापना आहे. ममता मशिनरीच्या ग्राहकांमध्ये बालाजी वेफर्स, दास पॉलिमर्स, सनराईज पॅकेजिंग, ओम फ्लेक्स इंडिया आणि वीउ पॉलीप्लास्ट यांसारख्या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. कंपनीचे उत्पादन आणि सेवा उच्च दर्जाच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत, जे उद्योग क्षेत्रात त्यांना एक महत्त्वाचे स्थान प्राप्त करण्यास मदत करतात.

गुंतवणूकदारांसाठी SEBI चा मोठा निर्णय; SIP बंद करण्याची प्रक्रिया फक्त 2 दिवसात पूर्ण

SIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक म्युच्युअल फंडात SIP च्या साहाय्याने गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. SEBI ने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये आता SIP बंद करण्याची प्रक्रिया फक्त दोन दिवसात पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त काळ थांबण्याची गरज भासणार नाही. तसेच हा नवीन नियम 1 डिसेंबर 2024 पासून सर्वत्र लागू झाला आहे.

गुतंवणूकदारांसाठी SEBI चा निर्णय –

यापूर्वी SIP बंद करण्यासाठी गुंतवणूकदारांना 10 दिवस आधी प्रक्रिया करावी लागत होती. मात्र SEBI च्या निर्णयामुळे हा अवधी कमी करण्यात आला आहे. म्हणजेच तो 10 दिवसांवरून 2 दिवसांवर आणला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक नियोजनावर जलद निर्णय घेण्याची सुविधा मिळत आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराची SIP तारीख 14 असेल आणि त्याच्या खात्यात 11 तारखेला पुरेशी रक्कम नसेल, तर तो 11 तारखेला SIP बंद करण्याची विनंती करू शकतो. या विनंतीवर फंड व्यवस्थापकांना 14 तारखेपूर्वी कारवाई करावी लागेल आणि गुंतवणूकदाराला कोणताही दंड आकारला जाणार नाही.

ऑनलाइन तसेच ऑफलाइन SIP साठी लागू

SEBI ने सांगितल्यानुसार, हा नियम ऑनलाइन तसेच ऑफलाइन SIP गुंतवणुकीसाठी लागू असेल. यामुळे आता गुंतवणूकदारांना SIP बाऊन्स होण्याच्या समस्येपासून सुटका मिळणार आहे , तसेच त्यांच्या बँक खात्यावर अनावश्यक दंड आकारला जाणार नाही. त्यामुळे अनेक गुतंवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर –

SEBI च्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांचे हक्क अधिक सुरक्षित होतील. याचसोबत गुंतवणुकीतील पारदर्शकता आणि विश्वास वाढेल. दोन दिवसांच्या मर्यादेमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार लवचिकता मिळेल, आणि त्यांना दंड आकारल्याची भीतीही राहणार नाही. त्यामुळे हा निर्णय गुंतवणूकदारांसाठी एक मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.

2024 म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी ठरला सुवर्णकाळ; मिळवला जबरदस्त नफा

Mutual Fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फार वाढली आहे. जे यामध्ये गुंतवणूक करत आहेत त्यांच्यासाठी 2025 वर्ष सुवर्णमय ठरणार आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचे एसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) नोव्हेंबरच्या शेवटी 39 % वाढून ते 68 लाख कोटी रुपयांवर पोहचलेले आहे. भविष्यातही या फंडामध्ये गुंतवणूक वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. हि वाढ होण्यामागे काही कारणे आहेत, त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची भक्कमता आणि कंपन्यांच्या कमाईत होणारी वाढ ही महत्त्वाची कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे.

गुतंवणूकदारांना जबरदस्त नफा देणार फंड –

2024 मध्ये काही फंडांनी गुतंवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. त्यामध्ये Motilal Oswal Midcap Fund, LIC MF Infra Fund, Motilal Oswal ELSS Tax Saver Fund, Bandhan Small Cap Fund आणि Motilal Oswal Small Cap Fund यांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.

किती टक्के परतावा –

LIC MF Infra Fund ने यावर्षी आतापर्यंत 52.4 टक्के नफा मिळवून दिला आहे. तसेच Motilal Oswal ELSS Tax Saver Fund ने 50 टक्के, तर Bandhan Small Cap Fund ने 48.9 टक्के परतावा दिला आहे. त्यासोबत Motilal Oswal Small Cap Fund चा परतावा 48.3 टक्के आहे . तसेच हायब्रिड फंडांमध्येही 2024 मध्ये चांगला नफा कमवून दिला आहे. या फंडांचे एयूएम 8.77 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, यामध्ये एका वर्षात 41 टक्क्यांची वाढ झाली आहे. हायब्रिड फंड म्हणजे इक्विटी आणि डेट या दोन्हीमध्ये गुंतवणूक करणारे फंड होय . अ‍ॅग्रेसिव्ह हायब्रिड फंडांचे सरासरी परतावा 19.8 टक्के, बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंडांचे परतावा 15.2 टक्के, तर मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनचा परतावा 17.3 टक्के होता.

2024 मध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक –

2024 मध्ये बॉण्ड फंडांमध्येही मोठया प्रमाणात गुंतवणूक होताना दिसत आहे. या कॅटेगरीचे एयूएम 16.86 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. यामध्ये एका वर्षात 24 टक्के वाढ झाली आहे. तसेच लाँग ड्युरेशन फंडांचा सरासरी नफा 11.6 टक्के, डायनॅमिक बॉण्ड कॅटेगरीचा परतावा 9.1 टक्के, तर शॉर्ट आणि मिड टर्म कॅटेगरीचा परतावा 8.8 टक्के होता.

गुंतवणूकदारांची SIP च्या प्रति लोकप्रियता –

2024 मध्ये SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) च्या माध्यमातून छोट्या रकमेने गुंतवणूक करणे सोपे झाले. शेअर बाजाराची सुधारलेली स्थिती आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमुळे पुढील काळातही गुंतवणूकदारांचा कल म्युच्युअल फंडांकडे वाढेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला द्या ‘या’ ठिकाणांना भेट; मिळेल अद्भुत आनंद

Travel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2025 हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अगदी काहीच दिवस उरलेले आहेत. अनेक लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुठेतरी बाहेर फिरायला जातात. नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत आनंदात आणि उत्साहात करतात. जर या वर्षी देखील तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल. तर आम्ही तुम्हाला देशातील अशा काही चांगल्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे जाऊन तुम्हाला अत्यंत शांत आणि आरामदायी वाटेल. तसेच निसर्ग सौंदर्य यांनी समृद्ध असलेल्या या ठिकाणांना तुम्हाला भेट देता येईल.

मलनाड कर्नाटक

Malnad

कर्नाटक मधील मलनाड हे अत्यंत शांत असे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक धबधबे आणि हिरवागार निसर्ग पाहायला मिळेल. तसेच अत्यंत सुंदर असा टेकड्यांचे दृश्य देखील तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी पर्यटकांची खूप जास्त गर्दी असते. या ठिकाणी कुमारस्वामी हिल्स, अप्सरा धबधबा, हगडी जंगलांना देखील तुम्ही भेट देऊ शकता. या ठिकाणी जाऊन तुम्हाला नक्कीच प्रसन्न वाटेल.

गंगटोक सिक्कीम

Gangtok

गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. गंगटोक हे एक हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. इतर हिल स्टेशनच्या तुलनेत या ठिकाणी जास्त गर्दी नसते. या ठिकाणचे वातावरण अत्यंत शांत असते. तसेच पर्यटन देखील खूप छान आहे. या ठिकाणाला तिबेटची संस्कृती लाभलेली आहे. तुम्ही जर या वर्षी सिक्कीमला भेट दिली, तर नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत चांगली होईल.

झिरो व्हॅली अरुणाचल प्रदेश

Arunachal pradesh

अरुणाचल प्रदेशमधील झिरो व्हॅली हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला अत्यंत शांततेत वेळ घालवता येईल. या ठिकाणी गर्दी देखील जास्त नसते. तसेच निसर्गप्रेमींसाठी ही अत्यंत चांगली जागा आहे. या झिरो व्हॅली मध्ये तुम्ही पक्षी निरीक्षण करू शकता. या ठिकाणी तुम्हाला सांस्कृतिक अनुभव देखील घेता आहे. तसेच ट्रेकिंगचा अनुभव देखील तुम्हाला या ठिकाणी घेता येईल.

वायनाड केरळ

Vaynad

केरळमधील वायनाड हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे. अनेक लोकांना अजूनही या ठिकाणाची माहिती नाही. त्यामुळे या ठिकाणी जास्त पर्यटन दिसत नाहीत. म्हणून तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने तुमचा वेळ घालवता येईल. या ठिकाणी हिरवेगार निसर्ग, चहाचे मळे देखील आहेत. तुम्ही जर नवीन वर्षासाठी फिरायला जाण्यासाठी एखादी चांगली ठिकाण शोधत असाल, तर केरळ हे ठिकाण तुमच्यासाठी अत्यंत चांगले आहे.

Flipcart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; ऑर्डर रद्द केल्यास द्यावी लागणार कॅन्सलेशन फी

Flipcart

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फ्लिपकार्ट ही आपल्या देशातील नामांकित ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे. आज काल लोकांमध्ये ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून रोज अनेक ऑर्डर देखील केल्या जातात. यामुळे अगदी घर बसल्या तुम्हाला वस्तू मिळतात. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडत नाही. तसेच तुम्हाला जर वस्तू आवडत नसेल, तर तुम्हाला ती रद्द देखील करता येते. परंतु आता यापुढे असे होणार नाही. कारण फ्लिपकार्ट वरून तर तुम्ही कधी वस्तू ऑर्डर केली असेल. आणि ती जर तुम्हाला कॅन्सल करायची असेल, तर त्यासाठी ग्राहकांना आता पैसे मोजावे लागणार आहे. म्हणजेच आता फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांसाठी कॅन्सलेशन फी लागू करणार आहे.

फ्लिपकार्ट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी केलेल्या वस्तू कॅन्सल करायच्या असेल, तर ग्राहकांना कॅन्सलेशन फी लागू करण्याचा विचार फ्लिपकार्ट करत आहे. याबद्दलची माहिती एका नव्या अहवालातून समोर आलेली आहे.

कॅन्सलेशन फी का आकारली जाणार ?

विक्रेते आणि लॉजिस्टिक भागीदारांचा वेळ आणि त्यांची मेहनत लक्षात घेता, जर तुम्ही ऑर्डर रद्द केली, तर त्याची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. असे फ्लिपकार्ट सह इतर ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मने देखील ठरवलेले आहे. त्यामुळे आता या नवीन धोरणामुळे कंपनी ग्राहकांकडून 20 रुपये जास्त शुल्क आकारणार आहे. अजूनही flipkart ने याबाबत कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही. केवळ समोर आलेल्या स्क्रीनशॉट वरून असा अंदाज बांधला जात आहे. परंतु वेगवेगळ्या ऑर्डरसाठी कॅन्सलेशन फी ही वेगवेगळी असू शकते. असे देखील सांगितले जात आहे. तसेच प्रीमियर वस्तूंसाठी कॅन्सलेशन फी जास्त असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

ग्राहकांनी दिलेल्या मर्यादित वेळेत ऑर्डर रद्द केली, तर त्यांना कोणतीही कॅन्सलेशन फी भरावी लागणार नाही. परंतु ऑर्डर प्रोसेसमध्ये असेल किंवा शिपिंग स्टेजमध्ये असेल आणि ग्राहकांनी ऑर्डर कॅन्सल केली, तर त्यांना कॅन्सलेशन फी बंधनकारक असणार आहे. असे नवीन अपडेट्स समोर आलेले आहेत.

महिलांमध्ये का कमी होतंय Menopause चे वय? ही आहेत करणे

Menopause

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मासिक पाळी महत्त्वाची असते. त्यातही मासिक पाळी नंतर रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉझ हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असते. साधारणपणे स्त्रियांचे वय 43 ते 50 वर्ष दरम्यान असल्यावर त्यांना रजोनिवृत्तीचा सामना करावा लागत होतो. परंतु आजकाल अगदी 30 ते 40 वयातील स्त्रियांना देखील रजोनिवृत्तीचा सामना करावा लागत आहे. आजकाल लोकांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. त्यामुळे महिलांमध्ये 40 वर्षापर्यंत त्यांना रजोनिवृत्तीचा सामना करावा लागतो. आता स्त्रियांमधील रजोनिवृत्तीची नक्की कारणे कोणती आहेत?आणि ते कसे टाळता येईल? याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत.

रजोनिवृत्ती म्हणजे काय ?

रजोनिवृत्ती ही स्त्रियांमधील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजेच प्रत्येक महिलांमध्ये एका ठराविक वयानंतर त्यांची मासिक पाळी कायमची बंद होते. काही वर्षापूर्वी साधारणता 45 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये अशी प्रक्रिया घडायची. परंतु आजकाल रजोनिवृत्तीचे वय खूप कमी झालेले आहे. अगदी 30 ते 40 वयातील महिलांना देखील रजोनिवृत्तीचा सामना करावा लागतो.

रजोनिवृत्ती दरम्यान स्त्रियांना दोन टप्प्यातून जावे लागते. सुरुवातीला मासिक पाळी पूर्णपणे थांबत नाही, तर ती अनियमित होते. या काळात मासिक पाळीमधील अंतर वाढते किंवा कधीकधी मासिक पाळी अचानक थांबते. आणि नंतर पुन्हा सुरू होते. यावेळी महिलांच्या शरीरामध्ये अनेक हार्मोनल बदल होत असतात. परंतु जेव्हा सलग 12 महिने मासिक पाळी येत नाही. यावेळी महिलांची रजोनिवृत्ती चालू होते. आता रजोनिवृत्ती लवकर येण्यामागे कोणती कारणे आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

खराब जीवनशैली

लोकांची जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे त्यांच्या खाण्याच्या सवयींचा त्यांच्या आरोग्य विपरीत परिणाम होत आहे. लोकं जंक फूड जास्त प्रमाणात खातात. यामुळे महिलांचे रजोनिवृत्तीचे वय कमी होऊ लागलेले आहे. तसेच शारीरिक व्यायाम देखील करत नाही. आणि मानसिक तणाव वाढल्यामुळे रजोनिवृत्ती लवकर येते.

मानसिक ताण आणि आरोग्य

आजकाल महिलांमध्ये मानसिक तणाव ही एक सामान्य समस्या बनत चाललेली आहे. घरगुती परिस्थिती जबाबदाऱ्या सामाजिक दबाव यामुळे अनेकवेळा महिलांना मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. आणि शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते. त्यामुळेच महिलांना लवकरच रजो निवृत्ती येते.

अनुवंशिक कारण

अनेक महिलांमध्ये अनुवंशिक कारणामुळे देखील रजोनिवृत्ती लवकर येते. जर एखाद्या स्त्रीच्या आईला किंवा आजीला लवकर रजोनिवृत्ती आली असेल, तर तिला देखील ही प्रक्रिया लवकर सुरू होते. अनुवंशिक घटक महिलांच्या हार्मोनाल चक्रावर आणि रजोनिवृत्तीच्या वेळेवर परिणाम करतात.