Thursday, January 1, 2026
Home Blog Page 336

Adhar Card | फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्यासाठी केवळ 24 तास शिल्लक; अन्यथा मोजावे लागतील एवढे पैसे

Adhar Card

Adhar Card | आधार कार्ड हा प्रत्येक भारतीयासाठी ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. आले आधार कार्ड हे प्रत्येक गोष्टीशी जोडलेले असते. अगदी आपला मोबाईल नंबर, पॅन कार्ड तसेच बँकेचे व्यवहार करताना देखील आधार कार्ड गरजेचे असते. आणि आता आधार कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अशी घेऊन आलेलो आहोत. जर तुम्हाला देखील तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर फ्री आधार कार्ड अपडेट करण्यासाठी केवळ 24 तास शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आजच आधार कार्ड अपडेट करून घ्या. अन्यथा त्यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे.

तुम्ही जर ऑफलाइन पद्धतीने आधार कार्ड (Adhar Card) अपडेट करत असाल, तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. परंतु जर ऑनलाईन पद्धतीने अपडेट करत असाल, तर त्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही. आता यासाठी केवळ 24 तास शिल्लक राहिलेले आहेत. यानंतर तुम्हाला अगदी छोटेसे अपडेट तरी करायचे असेल तरी देखील पैसे द्यावे लागणार आहेत.

UIDAI दिली महत्वाची माहिती | Adhar Card

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची 14 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख दिलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही माय आधार पोर्टल वर जाऊन मोफत आधार कार्ड अपडेट करू शकता. जर 14 डिसेंबर नंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

10 वर्ष जुने आधार कार्ड असेल तर अपडेट करा

प्रत्येक व्यक्तीच्या आधार कार्डवर 12 अंकी ओळख क्रमांक असतो. याद्वारे भारतीय नागरिकांची बायोमेट्रिक माहिती दिली जाते. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार तुमचे जर आधार कार्ड दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त जुने असेल, तर तुम्ही त्या आधार कार्डमध्ये अपडेट करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरील तुमचे नाव, फोटो, पत्ता, लिंग, जन्मतारीख बदलू शकता. तसेच तुम्ही तुमच्या आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल नंबर देखील बदलू शकता. जर तुम्हाला देखील या गोष्टी बदलायच्या असेल तर आजच अपडेट करा. करा. यानंतर तुम्हाला पैसे मोजावे लागतील.

Credit Card पॉलिसीमध्ये मोठे बदल; ‘या’ बँकांचा आहे समावेश

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 डिसेंबर 2024 पासून भारतातील प्रमुख बँकांनी त्यांच्या क्रेडिट कार्ड पॉलिसीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलांचे मुख्य कारण चार्जेस, रिवॉर्ड पॉइंट्स, आणि ट्रान्झॅक्शनशी संबंधित अटींमध्ये होणारे बदल आहेत. ग्राहकांनी या बदलाबद्दल माहिती ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे गरजेचे नसलेले शुल्क टाळता येणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.

SBI क्रेडिट कार्ड –

SBI ने 50000 रुपयांपेक्षा अधिकच्या युटिलिटी बिल पेमेंटवर 1% चार्ज लागू केला आहे. तसेच, SimplyCLICK, AURUM, आणि Gold SBI कार्डधारकांना डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर केलेल्या पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.

ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड –

ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डधारकांसाठी 20 डिसेंबर 2024 पासून कॅश रिडेम्प्शनवर 1 रुपया + 18% GST आणि माइल्स पॉइंट्स ट्रान्सफरवर 199 रुपये + 18% GST आकारले जाणार आहेत. याशिवाय वॉलेट लोड, फ्यूल खरेदी आणि रेंट पेमेंटवर नवीन चार्जेस आणि व्याजदर लागू केले आहेत.

YES बँक क्रेडिट कार्ड –

YES बँकेने रिवॉर्ड पॉइंट्स रिडेम्प्शन पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. हॉटेल आणि फ्लाइट बुकिंगसाठी रिवॉर्ड पॉइंट्सच्या मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. YES Private आणि EYES MARQUEE कार्डसाठी रिडेम्प्शन लिमिट जास्त ठेवण्यात आली आहे. 1 एप्रिल 2025 पासून फ्री एअरपोर्ट लाउंज एक्सेससाठी जास्त खर्च करावा लागेल. YES MARQUEE कार्डधारकांना 6 लाउंज व्हिजिट्ससाठी 1 लाख रुपये आणि YES First Preferred कार्डधारकांना 2 व्हिजिट्ससाठी 75000 रुपये खर्च करावे लागतील.

AU स्मॉल फायनान्स बँक क्रेडिट कार्ड –

AU स्मॉल फायनान्स बँकेच्या Ixigo AU क्रेडिट कार्डवर 22 डिसेंबर 2024 पासून रिवॉर्ड पॉइंट्सच्या अटींमध्ये बदल केला जाणार आहे. युटिलिटी, विमा, आणि टेलिकॉम व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्ससाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. सरकारी सेवा, शिक्षण, रेंट पेमेंट आणि BBPS यावर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत. 23 डिसेंबर 2024 पासून विदेशी खरेदीवर 0% FX मार्कअप लागू केल्यामुळे रिवॉर्ड पॉइंट्स देणे बंद केले जाणार आहे.

जिओची न्यू इयर वेलकम ऑफर; ग्राहकांना मिळणार अनेक फायदे

JIO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक खास प्रीपेड प्लॅन आणला आहे. न्यू इयर वेलकम ऑफर या नावाने सादर केलेला हा प्लॅन 2025 रुपयांच्या किमतीत उपलब्ध होणार आहे . या प्लॅनमध्ये 200 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे , तसेच यासोबत आकर्षिक ऑफर्स देखील मिळणार आहे. त्यामुळे हा प्लॅन ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

जिओच्या प्लॅनची वैशिष्ट्ये –

या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळणार आहे. ज्यामुळे कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्याची सुविधा मिळते. तसेच ग्राहकांना दररोज 100 SMS देखील दिले जातात. या प्लॅनची व्हॅलिडिटी एकूण 200 दिवस आहे, म्हणजेच दीर्घकाळासाठी कनेक्टिव्हिटीचा चांगला अनुभव मिळवता येतो. हा प्लॅन ग्राहकांना एक आकर्षक डेटा व कॉलिंग अनुभव प्रदान करतो. यात दररोज 2.5GB 4G डेटा उपलब्ध आहे, ज्यामुळे एकूण 500GB 4G डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड 5G डेटा देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे ग्राहकांना उच्च गती इंटरनेट अनुभव मिळतो.

जास्त फायदे देणारा प्लॅन –

ग्राहकांना अनेक फायदे देखील मिळणार असून , यामध्ये 500 रुपयांचा कूपन आहे, जो 2999 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या खरेदीवर रिडीम करता येतो. तसेच EaseMyTrip वर 1500 रुपयांचा कूपन फ्लाइट तिकिटांवर लागू होतो आणि Swiggy वर 499 रुपये किंवा त्याहून अधिकच्या ऑर्डरवर 150 रुपयांचा कूपन मिळते . हा प्लॅन इतर प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या तुलनेत परवडण्याजोगा आहे, ज्यामुळे ग्राहक 450 रुपयांपर्यंतची बचत करू शकतात. यातली खास गोष्ट म्हणजे, हा प्लॅन चालू रिचार्जवर देखील सुरु होऊ शकतो. आधीचा रिचार्ज संपल्यानंतर तो आपोआप सुरु होतो. जे ग्राहकांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे. ही ऑफर 11 डिसेंबर 2024 पासून 11 जानेवारी 2025 पर्यंत उपलब्ध आहे.

ST महामंडळाचा निर्णय ; तिकीट भाडेवाढ प्रस्ताव शासनाकडे सादर

ST bus ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ लोकाच्या सेवेत कार्यरत असून, त्यांनी लाखो प्रवास्यांचा प्रवास सुलभ केला आहे. या मंडळाने आता अपघात कमी करण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रमावर अधिक भर दिला आहे. त्यासाठी अनेक योजना आखल्या जाणार आहेत. यात चालक प्रशिक्षण, मानसिक आरोग्य सुदृढीकरण, तसेच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बस सेवा हे मुख्य घटक असणार आहेत. तसेच लवकरच प्रलंबित असलेल्या तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक –

गोगावले यांनी नुकत्याच झालेल्या भंडारा व नाशिक येथील एसटी अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत चालकांच्या निवडीची चाचणी, प्रशिक्षण, आणि बसच्या तांत्रिक तपासणीबाबत सखोलपणे चर्चा झाली. त्यांनी चालकांना दर सहा महिन्यांनी उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य आणि मानसिक आरोग्य सुधारण्यावर भर देण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीतून घेण्यात आला आहे.

तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव –

गेल्या काही वर्षांपासून इंधन दरवाढ, सुट्ट्या भागांच्या किमती, त्याचसोबत कर्मचाऱ्यांचे वेतन यामुळे आर्थिक अडचणींशी सामना करणाऱ्या एसटी महामंडळाने 2021 पासून प्रलंबित असलेल्या तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

एसटी महामंडळाकडे सध्या 14000 बस –

एसटी महामंडळाकडे सध्या 14000 बस आहेत, मात्र प्रवाशांच्या मागणीच्या तुलनेत त्या अपुऱ्या आहेत. अनेक बस खराब झाल्यामुळे महामंडळाने नवीन बस खरेदीसाठी प्रक्रिया राबवली होती. पण वेळेत बस पुरवठा न करणाऱ्या संस्थांना नोटीस पाठविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महामंडळाने चालकांना सेवेत राहण्यासाठी वाहन कौशल्य तपासणी आणि नशापानविरहित कामाचे पालन सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे नियम खासगी चालकांनाही लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पत्नीच्या मदतीने अशाप्रकारे वाचवा इनकम टॅक्स; जाणून घ्या महत्वपूर्ण मार्ग

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण बचतीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असतात. पण त्या गुंतवणुकीवर तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटला टॅक्स भरावा लागतो. हा टॅक्स जर वाचवायचा असेल तर, तुम्हाला काही मार्गाचा वापर करावा लागेल . यासाठी काही स्मार्ट ट्रिक्स वापरून तुम्ही मोठ्या प्रमाणात फायदा मिळवू शकता. पण हे सर्व तुमच्या पत्नीच्या मदतीने शक्य होऊ शकते. या टिप्स नुसार तुमची पत्नी तुमचा इन्कम टॅक्स वाचवू शकते, तसेच तुमची कमाईही दुप्पट होऊ शकते. तर चला जाणून घेऊयात या मार्गाबद्दल अधिक माहिती.

जॉईट होम लोन –

जर तुम्ही आणि तुमच्या पत्नीने एकत्र होम लोन घेतलं, तर दोन्ही व्यक्ती कलम 80C आणि 24(B) अंतर्गत स्वतंत्रपणे कर सवलतीचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही एकूण 7 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सूट मिळवू शकता.

PPF तसेच NPS मधील गुंतवणूक –

तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या नावावर पीपीएफ खाते उघडा. दोघं मिळून पीपीएफमध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करा , जर हि गुंतवणूक केली तर तुम्हाला एकूण 3 लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट मिळेल. तसेच पत्नीच्या नावाने एनपीएस खाते उघडून गुंतवणूक केल्यास , त्यावर तुम्ही 50000 रुपयांची जास्त कर सवलत मिळवू शकता.

आरोग्य विमा –

तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा घेऊन, कलम 80D अंतर्गत तुम्ही कर सवलतीचा दावा करू शकता. पती-पत्नी दोघंही स्वतंत्रपणे आरोग्य विम्याच्या हप्त्यावर कर सूट मिळवू शकतात. त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा मिळेल.

बचत खाते आणि एफडी –

पत्नीच्या नावावर बचत खाते उघडा. त्यावर 10000 रुपयांपर्यंत व्याज उत्पन्नावर सूट मिळते. तसेच पत्नीच्या नावावर फिक्स्ड डिपॉझिट किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास कर बोजा कमी होण्यास मदत होते. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या फायनान्शियल पोर्टफोलिओला मजबूत करू शकता आणि टॅक्स वाचवू शकता. तसेच तुमचे उत्पन्न दुप्पट करू शकता.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत आरोग्य सेवा; अशाप्रकारे काढा आयुष्मान वयवंदन कार्ड

Ayushman Vayvandan card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. सरकार आता मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. आयुष्मान व्यवंदन कार्डच्या माध्यमातून 70 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना मोफत उपचार व औषधांची सुविधा दिली जाणार आहे. यामध्ये जुन्या आजारांवरही मोफत उपचार केले जातील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आयुष्मान व्यवंदन कार्ड –

29 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानात धन्वंतरी जयंती आणि आयुर्वेद दिनानिमित्त 12850 कोटी रुपयांच्या आरोग्य योजनांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले की, 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना रुग्णालयात मोफत उपचार देण्यासाठी आयुष्मान व्यवंदन कार्ड सुरू करण्यात आले आहे.

कार्डची वैशिष्ट्ये –

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सीनियर सिटीझन्ससाठी एक महत्त्वाची सुविधा प्रदान केली आहे, ज्यामुळे सर्व आर्थिक स्तरांवरील ज्येष्ठ नागरिकांना विनाशुल्क वैद्यकीय सेवा मिळवता येईल. या योजनेच्या माध्यमातून, रुग्णालयात दाखल होण्याआधीच्या सर्व खर्चांसह, औषधे, लेबोरेटरी तपासणी, डायग्नोस्टिक चाचण्या यांचा समावेश असलेल्या उपचारांची पूर्ण मोफत सेवा मिळेल. रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर 15 दिवसांपर्यंत फॉलोअप देखभाल देखील मोफत उपलब्ध असेल. यामध्ये जुन्या आजारांवरही सुरुवातीपासून उपचार केले जातील.

योजनेचे उद्दिष्ट –

या योजनेचे उद्दिष्ट सुमारे 6 कोटी ज्येष्ठ नागरिक आणि 4.5 कोटी कुटुंबांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवेचा लाभ देणे आहे, ज्यामुळे प्रत्येक आर्थिक गटातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कार्डसाठी अर्ज –

आयुष्मान व्यवंदन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. अर्जासाठी आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. ज्यामुळे पात्रता तपासली जाऊ शकते. अर्ज ऑनलाइन आयुष्मान अ‍ॅपच्या माध्यमातून करता येतो, ज्यामध्ये सोप्या पद्धतीने नोंदणी केली जाऊ शकते. आतापर्यंत सुमारे 10 लाख ज्येष्ठ नागरिकांनी यासाठी नोंदणी केली आहे. आयुष्मान भारत कार्ड देशभरातील आरोग्य सेवा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवते. हे कार्ड ज्येष्ठ नागरिकांसाठी खास महत्वाचे आहे, कारण त्यामुळे त्यांचे औषधांवरील खर्च कमी होईल आणि त्यांना आवश्यक आरोग्य सेवांचा फायदा मिळेल.

गुंतवणुकीत मोठा बदल ; म्युच्युअल फंडासह इतर फंडांमध्ये तब्बल 75 टक्क्यांची घट

Mutual Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुंतवणुकीच्या दृष्टीने आघाडीवर असलेल्या म्युच्युअल फंडाबद्दल एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक नोव्हेंबरमध्ये तब्बल 75 टक्क्यांनी घटली आहे. यामुळे सातत्याने वाढणाऱ्या चढता आलेखाची नोंद असलेल्या म्युच्युअल फंडांमध्ये एक मोठा बदल दिसून आला आहे. यासोबत इक्विटी म्युच्युअल फंडांमध्येही 14 टक्क्यांची घट झाली असून, एसआयपीमध्ये देखील मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

गुंतवणुकीवर मोठा परिणाम –

जागतिक भू-राजकीय घटनांचा, अमेरिकेतील निवडणूक निकालांमुळे वाढलेली अस्थिरता तसेच इतर आर्थिक घटक यांमुळे गुंतवणुकीवर मोठा परिणाम झाला आहे. नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडांमध्ये केवळ 60363 कोटी रुपये गुंतवले गेले, तर ऑक्टोबरमध्ये हा आकडा 2.39 लाख कोटी रुपये होता. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये नोव्हेंबरमध्ये 35943 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, ज्यात 14 टक्क्यांची घट नोंदवली गेली. सेक्टोरल आणि थीमॅटिक फंड या विभागात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पण लार्ज कॅप फंडांमध्ये गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे.

SIP मधेही घट –

SIP मधून नोव्हेंबरमध्ये 25320 कोटी रुपये गुंतवले गेले, ज्यात ऑक्टोबरच्या 25322 कोटी रुपयांच्या तुलनेत दोन्ही महिन्यांमध्ये खूप कमी फरक आहे. पण यामध्ये घट दिसून येत आहे. एसआयपी खात्यांची संख्या 10.22 कोटींवर पोहोचली आहे. तसेच डेट फंडांमध्ये 92 टक्क्यांनी घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये या फंडांमध्ये 1.57 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होती, पण नोव्हेंबरमध्ये फक्त 12915 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

2025 च्या महाकुंभ मेळाव्यात भाविकांच्या आरोग्य सुविधांवर अधिक भर

Mahkumbh Melava

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा प्रयागराजमध्ये पार पडणार असून , या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. 2025 च्या मेळावात उत्तर प्रदेश सरकारने भाविकांच्या आरोग्य सुविधांवर अधिक भर दिलेला आहे. त्यासाठी विविध योजनांची आखणी केली जात आहे . जेणेकरून यात्रेकरूना येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर मात करता येईल. या आखणीमध्ये आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी स्वतः याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यंदाच्या महाकुंभासाठी सुमारे 40 कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे.

आरोग्याच्या झटपट सेवेसाठी 6000 खाटांची व्यवस्था

महाकुंभच्या काळात 6000 खाटांची व्यवस्था केली जात आहे. त्यापैकी 360 खाटा मेला स्थळावर असतील. तसेच अरेत व झुसी येथे प्रत्येकी 25 खाटांचे दोन नवीन रुग्णालये उभारली जातील. सरकारी रुग्णालयांमध्ये 3000 खाटांची उपलब्धता निश्चित करण्यात आली आहे आणि गरज पडल्यास खाजगी रुग्णालयांमधूनही तितक्याच खाटांची व्यवस्था केली जाईल. त्यामुळे लोकांना झटपट सेवा प्रदान होणार आहेत.

टेली आयसीयू सुविधा

भाविकांच्या देखभालीसाठी टेली आयसीयू सुविधा सुरू केली जाणार आहे. तसेच मेला स्थळावर 125 अँब्युलन्स आणि सात रिव्हर अँब्युलन्स 24×7 तैनात राहतील. त्याचसोबत रुग्णालय व्यवस्थापकांची नेमणूक केली जात आहे, जे रुग्णांच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असतील. तसेच नेत्र कुंभच्या माध्यमातून तीन लाख गरजू भाविकांना मोफत चष्मे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय प्रत्येक सेक्टरमध्ये वैद्यकीय मदत केंद्रे उभारली जात आहेत. रुग्णालयांमध्ये महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.

15 डिसेंबरपासून प्रशिक्षण

15 डिसेंबरपासून आपत्ती व्यवस्थापनासाठी मॉक ड्रिल सुरू होणार आहे. तसेच डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफला नरोरा येथील अणुऊर्जा केंद्रात केमिकल, बायोलॉजिकल, रेडियोलॉजिकल, न्यूक्लियर आणि एक्सप्लोसिव्ह (CBIRNE) धोक्यांना सामोरे जाण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाकुंभ मेळ्यादरम्यान भाविकांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे, म्हणून यासाठी सर्व संबंधित विभाग एकत्र काम करत आहेत.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत बदल होणार? आदिती तटकरेंकडून परिपत्रक जारी

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) हि विधानसभेच्या विजयासाठी महत्वाची ठरलेली आहे. पण सध्या काही कारणामुळे त्याभोवती अफवांचे जाळे पसरलेले आहे. या योजनेत प्रत्येक महिलांना 1500 रु थेट बँकेत जमा होतायत. पण निवडणुकांनंतर काही व्हिडिओ आणि पोस्टद्वारे योजनेबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे योजनेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. या योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात येतील असे दावे केले जातायत. मात्र महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक पत्रक जारी करत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

योजनेमध्ये कोणतेही बदल नाहीत – Ladki Bahin Yojana

आदिती तटकरे यांनी या अफवांची दखल घेऊन सांगितले की, योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दिशाभूल करणाऱ्या पोस्ट आणि व्हिडिओंना कोणीही बळी पडू नका . त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी जनतेला जागरूक केले आहे की, या योजनेवर जातीने लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे या अफवांकडे दुर्लक्ष करा असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यभरातील तमाम लाभार्थी महिलांनी मोकळा श्वास घेतलाय.

महिला व बालकल्याण विभागाचे परिपत्रक –

महिला व बालकल्याण विभागाने देखील परिपत्रक काढून सांगितले की, समाज माध्यमांवर पसरत असलेल्या चुकीच्या माहितीमुळे लाभार्थी महिलांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. विभागाने योजनेच्या (Ladki Bahin Yojana) अटी व शर्ती किंवा कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. आणि तसा कोणताही बदल झाल्यास तो अधिकृतपणे कळवण्यात येईल, असेही परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

मोहीम राबवण्याचे आदेश –

राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना तसेच शासकीय यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी या योजनेसंबंधीची खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. तसेच योजनेसंदर्भात गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर जागरुकता मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाची ठरली आहे. सध्याच्या परिस्थितीत या योजनेचा लाभ सुरूच राहणार असल्याचे सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्याप्रमाणे नवं सरकार लवकरच महिलांना दर महिन्याला २१०० रुपये देणार आहे… त्यासाठी सर्वात आधी अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करण्यात येईल.

Elon Musk ठरला 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्तीचा टप्पा गाठणारा पहिला व्यक्ती

elon musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक इतिहास रचला आहे. ते जगातील 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेले पहिले व्यक्ती बनले आहेत. तसेच ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या अहवालानुसार, मस्क यांची सध्याच्या घडीला संपत्ती 447 अब्ज डॉलर्सवर पोचली असून त्यांनी नवा विक्रम तयार केला आहे . त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

तब्बल 62.8 अब्ज डॉलर्सची वाढ –

मस्क यांनी दुसऱ्या क्रमांकावरील जेफ बेझोस जे कि अमेझॉनचे संस्थापक आहेत , यांनाही मस्क यांनी मागे टाकले आहे. यांच्या तुलनेत मस्क यांची संपत्ती सुमारे 200 अब्ज डॉलर्सने जास्त आहे. एका दिवसात त्यांच्या संपत्तीत तब्बल 62.8 अब्ज डॉलर्सची वाढ झाली, ज्याचा मुख्य भाग स्पेसएक्सच्या शेअर्सच्या वाढीमुळे आहे. 2024 या वर्षात मस्क यांच्या संपत्तीत एकूण 218 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

टेस्लाच्या शेअर्समध्ये 65% वाढ –

स्पेसएक्सने नुकत्याच घेतलेल्या मोठ्या टप्प्यांमुळे मस्क यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. याशिवाय टेस्लाच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे याचा फायदा त्यांना झाला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर टेस्लाच्या शेअर्समध्ये 65% वाढ झाली आहे. वर्ष संपण्यापूर्वी इलॉन मस्क 500 अब्ज डॉलर्सची संपत्ती गाठण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी दररोज 3.50 अब्ज डॉलर्सची संपत्ती वाढ आवश्यक आहे. सध्याच्या गतीने ते लवकरच हा टप्पा गाठण्यास यशस्वी होतील.

मस्क यांचे लक्ष –

इलॉन मस्क यांचे लक्ष केवळ इलेक्ट्रिक वाहन आणि अंतराळ उद्योगांवर नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोलर एनर्जी, आणि न्यूरोटेक्नॉलॉजी क्षेत्रांवरही आहे. त्यामुळे ते आणखीन प्रगती साधण्यास यशस्वी होतील . त्यांच्या या दूरदृष्टीमुळे ते जागतिक अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख चेहरा ठरले आहेत.