Thursday, January 1, 2026
Home Blog Page 334

50MP कॅमेरा, 7000mAh बॅटरीसह लाँच झाला Realme Neo 7 मोबाईल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रियलमीने आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन रियलमी निओ 7 ( Realme Neo 7 ) लाँच केला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना प्रीमियमचा अनुभव चांगला मिळावा, यासाठी वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञात वापर करण्यात आला आहे . तसेच या फोनची डिझाईन सगळ्यांच्या मनाला भावेल अशी करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन त्याच्या दमदार फीचर्स आणि उत्कृष्ट अनुभवासाठी ओळखला जात आहे . तर चला जाणून घेऊया रियलमी निओ 7 च्या फीचर्सची आणि किमतीची सविस्तर माहिती .

Realme Neo 7 चे फीचर्स –

रियलमी निओ 7 मध्ये 6.78 इंच LTPO AMOLED चा डिस्प्ले असून , जो तुम्हाला 1.5K रिझोल्यूशन देतो. तसेच या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. फोनची स्क्रीनची पीक ब्राइटनेस 6000 निट्स इतकी असून, उन्हातही स्क्रीन सहज वापरता येणार आहे. फोनच्या प्रोसेसर बदल बोलायचं झालं तर , याच्या हँडसेटमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 9300+ प्रोसेसर आहे, जो उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो. फोटो प्रेमींसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात OIS सपोर्ट आणि f/1.9 अपर्चर आहे. त्याचबरोबर , 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेंस देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी –

बॅटरी आणि कनेक्टिविटीसाठी 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी मिळणार असून , जी दीर्घकालीन परफॉर्मन्ससाठी उपयुक्त आहे. तसेच कनेक्टिविटीसाठी 5G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ आणि GPS यांसारखे फीचर्स यात दिले आहेत. त्याचसोबत हा फोन 12GB व 16GB RAM पर्यायांमुळे मल्टिटास्किंग, गेमिंग आणि ऍप्सचा वापर अधिक सोयीचा होतो. रियलमी निओ 7 मध्ये Android 15 बेस्ड Realme UI 6 सॉफ्टवेअर देण्यात आले आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना उत्तम युजर एक्सपीरियन्स मिळतो.

फोनची किंमत तसेच रंग –

रियलमी निओ 7 सध्या 359 डॉलर म्हणजेच सुमारे 30500 किमतीत लाँच करण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन काळ्या, निळ्या आणि पांढऱ्या अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे . त्यामुळे तुम्ही जर एक प्रीमियम आणि पॉवरफुल स्मार्टफोन शोधत असाल, तर रियलमी निओ 7 हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

नवीन वर्षाची करा दमदार सुरुवात; 20 हजारापेक्षा कमी किमतीत खरेदी करा हे लॅपटॉप

Laptops

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फोनप्रमाणेच लॅपटॉपही आजकाल लोकांची मुख्य गरज बनत चालली आहे. बहुतांश कामे ऑनलाइन होऊ लागली आहेत आणि लॅपटॉपची गरजही वाढू लागली आहे. जर तुम्ही अभ्यास करत असाल तर लॅपटॉपचा तुम्हाला अनेक उपयोग होऊ शकतो. जर तुम्ही कमी बजेटमध्ये चांगला लॅपटॉप शोधत असाल, तर तुम्हाला 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे अनेक लॅपटॉप बाजारात मिळतील. तुम्ही गेमिंग आणि ग्राफिक्सशी संबंधित जड कार्ये करू शकणार नाही, परंतु हे लॅपटॉप तुमच्या अभ्यासात आणि दैनंदिन दिनचर्यामध्ये खूप उपयुक्त ठरतील.

Acer Aspire 3 Intel Celeron Dual Core N4500

शुद्ध सिल्व्हर कलरमध्ये येत असलेल्या या लॅपटॉपमध्ये इंटेलचा सेलेरॉन ड्युअल कोर प्रोसेसर आहे. हे 8GB रॅम आणि 256 GB SSD क्षमतेसह येते. हे Windows 11 Home वर चालते आणि 14-इंचाच्या HD डिस्प्लेने सुसज्ज आहे. हे फ्लिपकार्टवर 19,990 रुपयांना उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 750 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो.

ASUS Chromebook Intel Celeron Dual Core N4500

पारदर्शक सिल्व्हर कलरमध्ये येत असलेला हा लॅपटॉप इंटेल सेलेरॉन ड्युअल कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 64 GB EMMC स्टोरेज क्षमता मिळते. यात SSD नाही. यात 14 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असेल. हे फ्लिपकार्टवर 13,990 रुपयांना उपलब्ध आहे. यावर तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरून ऑफरचा लाभही घेऊ शकता.

Lenovo Chromebook MediaTek Kompanio 520

लेनोवोच्या क्रोमबुक सीरीज अंतर्गत येत असलेला हा लॅपटॉप मीडियाटेकच्या कोम्पॅनियो 520 प्रोसेसरसह येतो. यामध्ये तुम्हाला 4 GB रॅम आणि 128 GB EMMC स्टोरेज क्षमता मिळेल. हे क्रोम ऑपरेटिंग सिस्टमवर चालते आणि 14-इंचाची एचडी स्क्रीन आहे. तुम्हाला ते फ्लिपकार्टवर 11,990 रुपयांना मिळेल. यावरही तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरून ऑफरचा लाभ घेऊ शकता.

जगातील ‘या’ देशात नाही एकही जंगल; अशी आहे भौगोलिक स्थिती

Country without Forest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोक असे म्हणतात की, जंगलाशिवाय पृथ्वीवर जीवन अशक्य आहे. जंगलांशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का? की जगात असा एक देश आहे जिथे तुम्हाला जंगलांची हिरवळ पाहायला मिळणार नाही. हा मध्य पूर्व मध्ये वसलेला एक छोटासा देश आहे, जो तेल आणि नैसर्गिक वायूच्या प्रचंड साठ्यांसाठी ओळखला जातो. तुम्ही कतारबद्दल ऐकलेच असेल. या देशात दूरवरच्या ठिकाणांची चिन्हे नाहीत, तरीही लोक विलासी जीवन जगतात.

कतारची भौगोलिक स्थिती कशी आहे?

कतारची भौगोलिक स्थिती अशी आहे की वनस्पती वाढू शकत नाही. कतार हा एक छोटा पण अतिशय समृद्ध देश आहे, ज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने तेल आणि वायू उद्योगावर अवलंबून आहे. कतारचे हवामान कोरडे आहे आणि तेथे पाऊस फारच कमी आहे. अशा परिस्थितीत या देशातील तापमान नेहमीच उच्च राहते, ज्यामुळे झाडे आणि वनस्पती जगणे जवळजवळ अशक्य आहे. या देशाचा बहुतेक भाग वाळवंट आहे. वाळवंटात फक्त काही प्रकारच्या वनस्पती वाढू शकतात. तेल आणि वायू उत्पादनासाठी जमिनीचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे जंगले नष्ट झाली, असे म्हटले जाते.

उंट स्वारी आणि स्थानिक बाजारपेठा

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जंगले नसतानाही कतारमध्ये पर्यटन वेगाने वाढत आहे. येथे पर्यटक वाळवंट सफारीचा आनंद घेतात. याशिवाय तो उंट स्वारी आणि स्थानिक बाजारपेठेत खरेदीही करतो. उंट स्वारी ही इथली खासियत आहे. कतारची संस्कृतीही पर्यटकांना आकर्षित करते, एवढेच नाही तर कतारची गावेही कोणत्याही मोठ्या शहरांपेक्षा कमी नाहीत.

पुण्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा; सुरु होणार 134 इलेक्ट्रिक बस

Electric Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील जे लोक रोज बसने प्रवास करत असतात. त्या सगळ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता पुणे एसटी विभागात नव्याने 134 इलेट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना देखील आता प्रवास करायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. एसटी बस सेवा बंद झाल्यामुळे गाड्यांची संख्या देखील कमी झालेली होती. आणि त्यामुळेच प्रवाशांकडून नवीन इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आली होती. प्रवाशांची ही मागणी मंजूर झालेली आहे. येत्या दोन महिन्यातच पुण्यामध्ये 134 इलेक्ट्रिक बस येणार आहेत. अशी माहिती देखील एसटी प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

आजकाल वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने हवेमध्ये प्रदूषण देखील होत आहे. आणि हेच प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर अधिक भर देण्यात आलेला आहे. इतर अनेक खाजगी वाहने देखील इलेक्ट्रिक स्वरूपात आता उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे एसटीच्या प्रवासाच्या तिकिटामध्ये सवलत दिल्याने प्रवाशी देखील वाढलेली आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांच्या संख्येतील असे दिवस वाढ होत चाललेली आहे. या सगळ्यात आता जर इलेक्ट्रिक बस आली तर प्रवाशांना चांगला दिलासा मिळणार आहे.

पुण्यातून सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी इलेक्ट्रिक बस जात आहे. आणि आता पुढील काळात इतर मार्गांवर देखील इलेक्ट्रिक बसची संख्या वाढणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. पुण्यामध्ये जवळपास 134 इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अगदी आरामदायी आणि कमी खर्चात होणार आहे.

RTE मार्फत अर्ज करणे सोप्पे; ‘या’ दिवसापासून होणार प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

RTE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील अनेक लोक हे आरटीईमार्फत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रवेश घेत असतात. आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत राज्यातील अनेक खाजगी शाळांमध्ये आर्थिक आणि दुर्बल घटकांसाठी 25% राखीव जागा असतात. आणि या राखीव जागा भरण्यासाठी 2025- 26 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही प्रवेश प्रक्रिया 18 डिसेंबर पासून चालू होणार आहे. त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यापासून विद्यार्थी नोंदणीला देखील सुरुवात होणार आहे.

प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर मार्च महिन्यामध्ये लॉटरी देखील जाहीर केली जाणार आहे. तसेच जून आणि जुलै या महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आहे. या आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25% आरक्षित जागांसाठी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. दरवर्षी ही प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश देखील उशिरा होतात. परंतु यावर्षी ही प्रवेश प्रक्रिया लवकरच राबवण्यात आलेली आहे.

डिसेंबर महिन्यात CBSE शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असते. परंतु आयटीई अंतर्गत प्रवेश मात्र होत नाही. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यापासूनच ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर्षी जून आणि जुलै महिन्यात आरटीई मार्फत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी कोणतेही अडथळे येणार नाही.

RTE मार्फत प्रवेश घेणारे बऱ्याचशा इंग्रजी माध्यमांच्या शाळा या सीबीएससी बोर्डाच्या असतात. तसेच महाराष्ट्रात आरटीई प्रवेश सुरू होण्याआधीच इतर मुलांचे शिक्षण देखील सुरू झालेले असते. त्यानंतर आरटीई अंतर्गत विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे त्यांना बराचसा अभ्यास करून समजत नाही. तसेच ते वेगळे असल्याची त्यांना जाणीव होते. या सगळ्याचा विचार करून शिक्षण विभागाने यावर्षी डिसेंबर महिन्यापासूनच आरटी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे.

Jio Recharge Plan | Jio ने आणला नवीन रिचार्ज प्लॅन ; 200 दिवसांच्या वैधतेसह मिळणार हे फायदे

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan | देशातील अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी विविध ऑफर आणलेल्या आहेत. आता नवीन वर्ष सुरू होण्यास अगदी काही दिवसच शिल्लक आहेत. अशातच रिलायन्स जिओ नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तयार झालेले आहे. त्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर लॉन्च केलेली आहे. ही ऑफर प्रीपेड प्लॅनची आहे. या ऑफरचा फायदा सगळ्या युजरला नक्कीच होणार आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला अनेक फायदे होणार आहेत. आता या रिचार्ज प्लॅनबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

कोणता आहे रिचार्ज प्लॅन? | Jio Recharge Plan

जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये तुम्हाला 2.5 जीबी डेटाची ऑफर मिळते. तुम्ही दिवसभर हे नेट वापरू शकता. तसेच तुमच्या प्लॅनची वैधता 200 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला 100 एसएमएस देखील मिळणार आहेत. म्हणजेच जवळपास सात महिने तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही. तसेच तुम्ही इंटरनेटचा देखील आनंद होऊ शकतो. त्याचप्रमाणे जिओ तुम्हाला या प्लॅनसह 2150 रुपयांची व्हॅल्यू बुक कुपन ऑफर करत आहेत. त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे.

यामध्ये तुम्हाला 2999 रुपयांच्या ऑर्डरवर 500 रुपयांची सुट दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे इझी माय शोवर स्लाईड बुकिंग वर तुम्हाला 1500 रुपयांपर्यंतची सूट दिली जाणार आहे. स्विगीवर 499 पेक्षा जास्त किमतीची तुमची ऑर्डर असेल तर तुम्हाला 150 रुपयांची सूट दिली जाणार आहे.

तुम्हाला देखील जर सतत ऑनलाईन शॉपिंगची तसेच ऑर्डर करण्याची आणि प्रवास करण्याची सवय असेल, तर हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटाचा कॉलिंगचा अनुभव घेता येईल. तसेच इतर अनेक सुविधांचा देखील अनुभव घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला माय जिओ ॲपच्या किंवा जिओच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण माहिती नवीन घ्यावी लागेल.

Skin Cancer | त्वचेवर दिसणाऱ्या ‘या’ बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; असू शकते कर्करोगाचे लक्षण

Skin Cancer

Skin Cancer | त्वचा हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे, ज्यामुळे कर्करोग देखील होऊ शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दरवर्षी त्वचेच्या कर्करोगाची लाखो प्रकरणे नोंदवली जातात. स्किन कॅन्सर फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार, निदान झालेल्या प्रत्येक तीन कॅन्सर रुग्णांपैकी एकाला त्वचेचा कर्करोग होतो. मे महिना हा त्वचा कर्करोग जनजागृती म्हणून साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामुळे आपण आपल्या त्वचेला या गंभीर आजारापासून वाचवू शकतो.

त्वचेचा कर्करोग म्हणजे काय? | Skin Cancer

त्वचेचा कर्करोग ही एक अशी स्थिती आहे जी उद्भवते जेव्हा त्वचेच्या बाह्यत्वचा, त्वचेचा सर्वात बाहेरचा थर, डीएनएच्या नुकसानीमुळे उद्भवलेल्या नियंत्रणाबाहेरील पेशी वाढतात ज्यामुळे उत्परिवर्तन सुरू होते. उत्परिवर्तनामुळे, त्वचेच्या पेशी वेगाने वाढू लागतात आणि ट्यूमरचा धोका वाढतो.

त्वचेच्या कर्करोगाचे मुख्य प्रकार

बेसल सेल कार्सिनोमा (BCC)
स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (SCC)
मेलेनोमा आणि मर्केल सेल कार्सिनोमा (MCC)

त्वचेचा कर्करोग कसा दिसतो?

त्वचेचा कर्करोग हा रंग, आकार, त्वचेचा प्रकार, शरीराचे वेगवेगळे भाग आणि कर्करोगाच्या विविध प्रकारांमुळे व्यक्तीपरत्वे भिन्न दिसू शकतो.

त्वचेच्या कर्करोगाचे कारण

त्वचेच्या कर्करोगाची दोन मुख्य कारणे म्हणजे सूर्याची हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणे आणि अतिनील टॅनिंग बेडचा जास्त वापर. ही दिलासा देणारी बाब आहे की जर त्वचेचा कर्करोग वेळीच आढळून आला, तर त्वचेचे तज्ज्ञ त्यावर थोड्या-थोड्या डाग नसून उपचार करू शकतात आणि तो पूर्णपणे नाहीसा होण्याची शक्यताही जास्त असते. लक्षात घ्या की, त्वचेवर दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ टिकणारे कोणतेही नवीन किंवा बदलणारे डाग तुमच्या डॉक्टरांच्या निदर्शनास आणले पाहिजेत. त्वचेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहसा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु याचा अर्थ असा नाही की लक्षणे दिसणार नाहीत. हे कधीही दिसू शकतात.

त्वचेच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे

  • त्वचेवर नवीन डाग तयार होणे
  • जुन्या स्पॉटच्या आकारात किंवा रंगात बदल.
  • हे बदल मोठ्या प्रमाणात बदलू शकतात, त्यामुळे त्वचेचा कर्करोग कसा दिसतो हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही.
  • एका भागात खाज सुटणे किंवा वेदना
  • न बरी होणारी जखम ज्यातून रक्तस्त्राव होतो किंवा खरुज होतात
  • त्वचेच्या वरच्या पृष्ठभागावर लाल किंवा त्वचेच्या रंगाचे उठलेले चिन्ह
  • एक लाल, खडबडीत किंवा खवले क्षेत्र जे तुम्हाला जाणवू शकते
  • त्वचेवर चामखीळ सारखी वाढ
  • चांगल्या-परिभाषित सीमेशिवाय डाग सारखी वाढ

Film City Mumbai Bharti 2024 | फिल्म सिटी मुंबईमध्ये नोकरीची संधी ; येथे करा अर्ज

Film City Mumbai Bharti 2024

Film City Mumbai Bharti 2024 | मुंबईमध्ये नोकरी करण्याची एक अतिशय चांगली संधी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई यांच्या अंतर्गत भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत विधी सल्लागार या पदाच्या रिक्त जागा आहेत. या भरती अंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Film City Mumbai Bharti 2024

या भरती अंतर्गत विधी सल्लागार या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

निवड प्रक्रिया

या भरतीची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे.

ई-मेल आयडी | Film City Mumbai Bharti 2024

[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

अर्ज कसा करावा?

  • त्या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे
  • तुम्ही वर दिलेल्या ईमेल आयडीवर तुमचा अर्ज पाठवायचा आहे.
  • 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये बदल; आता या लोकांना देखील मिळणार लाभ

PM Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकार देशवासीयांच्या मदतीसाठी अनेक उत्कृष्ट योजना आसनात असतात, जेणेकरून ते आर्थिक समस्यांशी लढू शकतील आणि स्वतःला सक्षम बनवू शकतील. अशातच आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत एक मोठे अपडेट केले आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे नियम शिथिल करण्यात येणार आहेत. देशातील अनेक कुटुंबांना राहण्यासाठी घराची सुविधा सहज मिळू शकेल. आगामी काळात सुमारे ३ कोटी लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरांची सुविधा मिळेल, असे सरकारचे उद्दिष्ट आहे.

त्याच वेळी, योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी, सरकारने योजनेच्या पात्रता अटी 13 वरून 10 केल्या आहेत, ज्यामध्ये घराचे किमान क्षेत्रफळ 25 चौरस मीटर असेल. ज्यामध्ये एक स्वयंपाकघर देखील बांधले जाईल.

15 हजार रुपये कमावणाऱ्यालाही सुविधा मिळणार

यापुढे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ 15 हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांनाही मिळणार आहे. सरकारने ही रक्कम वाढवून पाच हजार रुपये केली आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ 10,000 रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला मिळत होता, मात्र आता असे होणार नाही.

5 एकरपर्यंतच्या बिगर बागायती जमिनीवरही लाभ मिळेल

प्रधानमंत्री आवास योजनेच्या नवीन नियमांतर्गत यापुढे पाच एकरपर्यंत बिगरसिंचन जमीन असलेल्या कुटुंबांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत पूर्वी अडीच एकरपर्यंत जमीन सिंचनासाठी मर्यादित होती. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत यापूर्वी एखाद्या व्यक्तीला बिगर बागायती जमिनीबाबत कोणतीही सुविधा मिळत नव्हती. यापुढे त्यांनाही प्रधानमंत्री आवास योजनेचा पूर्ण लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने या योजनेसाठी ज्यांची कुटुंबे पात्र आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत प्राधान्य दिले जाईल. तसेच, ते लोक देखील या सुविधेसाठी अर्ज करू शकतात, ज्यांच्या कुटुंबात केवळ पुरुषच कमाईचे साधन आहेत. याशिवाय, अर्जदाराला याआधी कोणत्याही सरकारी गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळालेला नसावा. या सुविधेत लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पारदर्शक करण्यात आली आहे, जेणेकरून गावातील सभांमध्येच लाभार्थ्यांची निवड करता येईल.

BSNL चा जबरदस्त प्लॅन! 6 महिने मिळणार मोफत इंटरनेट

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | BSNL ने आपल्या यूजर्ससाठी पुन्हा एकदा एक भन्नाट ऑफर आणली आहे. सरकार आता टेलिकॉम वापरकर्त्यांना पूर्ण 6 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट देत आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दर महिन्याला 1300GB हायस्पीड डेटा दिला जात आहे. कंपनीने आपल्या X हँडलद्वारे ही माहिती दिली आहे. BSNL चा हा ब्रॉडबँड प्लॅन देशातील सर्व दूरसंचार मंडळांसाठी आहे.

BSNL ने X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हिवाळी बोनान्झा ऑफर अंतर्गत, युजरला भारत फायबर ब्रॉडबँड सेवा पूर्ण 6 महिन्यांसाठी 1,999 रुपयांमध्ये मिळेल. या प्लॅनमध्ये युजर्सना दर महिन्याला 25Mbps च्या स्पीडने 1300GB डेटा दिला जात आहे. FUP (फेअर यूसेज पॉलिसी) मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, युजरला 4Mbps च्या वेगाने अमर्यादित इंटरनेट मिळेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना लँडलाईनद्वारे अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते.

599 रुपयांची योजना

यापूर्वी BSNL ने 599 रुपयांचे स्पेशल टेरिफ व्हाउचर (STV) लॉन्च केले होते. या प्लान अंतर्गत मोबाईल यूजर्सना 84 दिवसांची वैधता मिळत आहे. याशिवाय यूजर्सला दररोज 3GB हायस्पीड डेटाचाही लाभ मिळणार आहे. या प्लॅनमध्ये, युजरला भारतातील कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ मिळतो.

D2D सेवा

अलीकडेच, BSNL ने देशातील पहिली D2D म्हणजेच डायरेक्ट-टू-डिव्हाइस सेवा सुरू केली आहे. सॅटेलाइट बेस्ट: या सेवेमध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही मोबाइल नेटवर्कशिवाय कनेक्टिव्हिटी मिळेल. विशेषत: आपत्कालीन परिस्थितीत ही सेवा वापरकर्त्यांना खूप मदत करणार आहे. वापरकर्ते कॉल करू शकतात आणि उपग्रहाद्वारे इंटरनेट वापरू शकतात.