Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 345

1 डिसेंबरपासून नवीन नियम लागू ; सिलेंडरच्या किंमतीपासून क्रेडिट कार्ड नियमामध्ये बदल

New rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक महिन्याला काहींना काही बदल होत असतात. त्याचप्रमाणे डिसेंबर महिनाही काही महत्वाचे बदल घेऊन आला आहे. या बदलामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमती , क्रेडिट कार्ड नियम, टेलिकॉम आणि हवाई प्रवासाशी संबंधित आहेत. या बदलामुळे लोकांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होताना दिसणार आहेत. हे बदल 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. तर चला या प्रमुख बदलाबद्दल माहिती पाहुयात.

एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 डिसेंबर 2024 पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. ही वाढ फक्त 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी लागू आहे. पण घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल

1 डिसेंबरपासून SBI कार्डने आपल्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी डिजिटल गेमिंग आणि मर्चंट ट्रान्झॅक्शनवर रिवॉर्ड पॉइंट देणे बंद केले आहे. तसेच यस बँकेने हॉटेल आणि फ्लाइट बुकिंगसाठी रिडीम होणाऱ्या पॉइंट्सची संख्या कमी केली आहे. त्याचसोबत एचडीएफसी बँकेच्या रेगालिया कार्ड धारकांना आता प्रत्येक तिमाहीत 1 लाख रुपये खर्च केल्यावरच लाउंज एक्सेस मिळणार आहे.

एटीएफच्या किमतीत वाढ

ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून एअर टर्बाईन फ्युएलच्या (ATF) किमतीत वाढ केली आहे, या वाढीमुळे हवाई प्रवास महाग होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच मालदीवमध्ये 1 डिसेंबरपासून डिपार्चर फी वाढवण्यात आली आहे. इकोनॉमी क्लाससाठी ही फी $30 वरून $50 करण्यात आली आहे. बिजनेस क्लाससाठी ही फी $60 वरून $120 तर फर्स्ट क्लाससाठी $90 वरून $240 केली आहे. खासगी जेट प्रवास करणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

ट्राईचे नवीन ट्रेसेबिलिटी नियम लागू

टेलिकॉम रेगुलेटर TRAI (ट्राई) स्कॅम आणि फिशिंगला आळा घालण्यासाठी ओटीपीसह कमर्शियल मेसेजच्या ट्रेसेबिलिटीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे 1 डिसेंबर 2024 पासून लागू करण्याची योजना आखत आहे. पूर्वी हे 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होण्याची अपेक्षा होती. या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत सर्व टेलिकॉम ऑपरेटर आणि मेसेजिंग सर्व्हिस प्रोवायडर्सना प्रत्येक मेसेजच्या उगम आणि प्रामाणिकतेची तपासणी करणे बंधनकारक करण्यात येईल. तसेच या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे ओटीपी मेसेज येण्यास जास्त वेळ लागणार नाही .

स्पेशल एफडी स्कीम बंद

काही बँका त्यांच्या ग्राहकांना मर्यादित काळासाठी विशेष फिक्स्ड डिपॉझिट योजनांची ऑफर करतात. अशीच दोन प्रकारच्या योजना IDBI बँकेची उत्सव FD आणि पंजाब अँड सिंध बँकेची स्पेशल FD योजना हि 1 डिसेंबर 2024 रोजी बंद होणार आहे. या सर्व बदलांमुळे सामान्य नागरिकांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांवर परिणाम होणार आहे.

मोबाईलमध्ये व्हायरस सक्रिय असेल तर दिसतात ‘हे’ बदल; अशाप्रकारे करा संरक्षण

Virus in smartphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात प्रगत झालेले आहे. परंतु या वाढत्या तंत्रज्ञानाचे मानवाला जेवढे फायदे होतात, तेवढ्याच नुकसानाला देखील सामोरे जावे लागतेम आज काल अनेक स्मार्टफोनमध्ये व्हायरस असण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. आपला स्मार्टफोनला जेव्हा इंटरनेट कनेक्ट असतो, तेव्हा स्मार्टफोनमध्ये विविध ॲप मधून किंवा ऑनलाईन लिंक्स मधून व्हायरसचा धोका निर्माण होत असतो. तसेच यामुळे आपली बँकिंग क्षेत्रात देखील फसवणूक होऊ शकते. त्यामुळे व्हायरसच्या संदर्भात आपण काळजी घेणे खूप गरजेचे असतेम अनेक वेळा आपल्या मोबाईलमध्ये असलेला व्हायरस आपल्याला ठाऊकही नसतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत. ज्याद्वारे तुमच्या फोनमध्ये व्हायरस आहे हे की नाही? हे तुम्हाला ओळखता येणार आहे.

स्मार्टफोनचा कमी स्पीड

अनेक वेळा जेव्हा आपण स्मार्टफोन वापरतो तेव्हा लक्षात येते की, आपल्या फोनचा स्पीड अचानक स्लो झालेला आहे. म्हणजेच आपल्या फोनची प्रोसेसिंग स्पीड अचानक कमी होते. याचे का मुख्य कारण व्हायरस असू शकते. जेव्हा आपल्या फोनचा वेग कमी होतो त्यावेळी व्हायरसने आपल्या मोबाईलवर हल्ला केलेला असतो. अशावेळी लगेच सावध होणे गरजेचे असते.

बॅटरी लवकर संपणे

अनेकवेळा आपण मोबाईल न वापरता देखील आपल्या मोबाईलची बॅटरी वेगाने कमी होत असते. जेव्हा आपण फोन वापरत नाही. त्यावेळी आपल्या मोबाईलमध्ये असलेला व्हायरस सक्रिय असतो. जो बॅकग्राऊंडमध्ये बॅटरी वापरत असतो. त्यामुळे आपल्या मोबाईलची बॅटरी लवकर संपते. अशावेळी तुम्ही लक्ष देणे गरजेचे आहे.

इंटरनेट लवकर संपणे

त्यावेळी आपल्या मोबाईलमधील डेटा लवकर संपतो. तर तुम्ही तुमच्या डेटा वापराकडे लक्ष दिले पाहिजे. जर तुमचा डेटा लवकर संपत असेल, तर याबाबत तुम्ही मोबाईल चेक करून घेतला पाहिजे.

नको असलेले पॉप-अप आणि जाहिराती बंद करणे

आपण फोनच्या सेटिंमध्ये जाऊन आपल्याला नको असलेले पॉप अप्स बंद केले पाहिजे. कारण हे फोन मधील मालवेअरच्या एन्ट्री साठी फायद्याचे असू शकतात. तसेच आपल्या फोनवर काही काही अनावश्यक जाहिराती दिसतात. त्या देखील बंद करायच्या आहेत.

फोनला कसे सुरक्षित करावे ?

  • आपल्या फोनमध्ये आवश्यक एवढेच ॲप इन्स्टॉल करावे नको असलेले ॲप इन्स्टॉल करू नये.
  • तसेच कोणताही ॲप इंस्टॉल करताना त्याच्या सगळ्या परमिशन चेक कराव्यात.
  • फोनवर ॲप डाऊनलोड करताना गुगल प्ले स्टोअर आणि एप्पल प्ले स्टोअर वरूनच ॲप डाऊनलोड करा.
  • कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
  • मोबाईलमधील सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करा.

‘या’ गावातील लोक मत्स्यपालन करून झाले करोडपती; गावात उभारले 40 मत्स्यकेंद्र

Fish Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल अनेक शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने वेगवेगळे प्रयोग शेतात करायला लागलेले आहेत. आणि त्यातीलच एक यशस्वी प्रयोग म्हणजे मत्स्य शेती. आजकाल अनेक शेतकरी मत्स्य शेती करतात. आणि त्यातून लाखो रुपयांचा नफा कमवतात. आज आपण अशाच एका गावाची यशस्वी स्टोरी जाणून घेणार आहोत. ज्यांनी मत्स्य शेतीतून कोट्यावधी रुपये कमावलेले आहेत. या गावांमध्ये जवळपास 40 पेक्षा जास्त मत्स्य केंद्र आहेत. या गावातील शेतकरी वर्षाला जवळपास एक ते दोन कोटी रुपयांचा नफा कमवत आहे.

मत्स्य शेती हा एक असा प्रकार आहे. ज्यामध्ये तुम्ही कमी खर्च करून जास्त नफा कमवू शकता. उत्तर प्रदेशातील रामपूर मधील धनोरा गावामध्ये अनेक शेतकरी मत्स्य पालन करतात. आणि त्यातील त्यातून चांगला नफा मिळवतात. या ठिकाणी जवळपास 40 पेक्षा जास्त मत्स्य केंद्र आहेत. मत्स्य शेती करण्यासाठी या गावांमध्ये मोठे तलाव हॅचरी बांधण्यात आलेले आहेत. या ठिकाणी शेतकरी मत्स्य केंद्र तयार केले आहे. जे युपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना यांसारख्या विविध राज्यांमध्ये दिले जातात. या गावातील एका शेतकऱ्याने माहिती दिली की, ते लोक 2003 पासून मत्स्यपालन करतात. आणि जवळपास 18 एकर जमिनीवर मत्स्य बीजाचे काम करतात.

या जमिनीवर विविध प्रकारचे मासे तयार केले जातात. आणि याची विक्री देखील स्थानिक बाजारपेठेसह विविध राज्यांमध्ये केली जाते. बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब यांसारख्या राज्यांमध्ये मत्स्य शेती केली जाते. ज्या शेतकऱ्यांची जमीन नापीक आहे, त्या नापिक क्षेत्रावर मत्स्य शेतीचा प्रयोग केलेला आहे.

हे मत्स्य केंद्र सुरू करण्यासाठी त्यांना सरकारकडून देखील अनुदान मिळालेले आहेत. सरकारकडून जवळपास 50 लाख रुपयांचे अनुदान केलेले आहे. एका प्रकल्पासाठी एकूण 25 लाख रुपयांचा खर्च होतो. त्यामुळे सरकारकडून देखील चांगली मदत होते. या ठिकाणातील शेतकऱ्यांनी सांगितले की, मत्स्य पालनातून जेवढा नफा होतो, तेवढा इतर कोणत्याही व्यवसायातून होत नाही. तुम्ही जर माशांची योग्य पद्धतीने काळजी घेतली, तर तुम्ही वर्षाला दीड ते दोन कोटी रुपये सहज कमाऊ होऊ शकतात.

TISS Mumbai Bharti 2024 | TISS मुंबई अंतर्गत नोकरीची संधी; महिना मिळेल 55 हजार रुपये पगार

TISS Mumbai Bharti 2024

TISS Mumbai Bharti 2024 | जे लोक नोकरीच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी आम्ही नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. जेणेकरून त्यांना देखील चांगल्या प्रकारे नोकरी करता येईल. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. जर तुम्ही मुंबईमध्ये नोकरी करण्यासाठी उत्सुक असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या पदांच्या एकूण 3 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलचे माध्यमातून करायचे आहे. तसेच 6 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या सारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीच्या पण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | TISS Mumbai Bharti 2024

या भरती अंतर्गत समुपदेशक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती | TISS Mumbai Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करावा लागणार आहे.

ई-मेल आयडी

[email protected] & [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख

6 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमचे मास्टर डिग्री इन क्लीनिकल सायकॉलॉजीमध्ये शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली का तुम्हाला दर महिन्याला 50 ते 55 हजार रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करू शकता.
  • 6 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदर जास्त करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

ST महामंडळाने 18 टक्के भाडेवाढ करण्याचा केला प्रस्ताव; नवे सरकार काय निर्णय घेणार?

ST Corporation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. आणि भरघोस मतांनी यावर्षी महायुती विजयी झालेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 5 डिसेंबर रोजी राज्याचा मुख्यमंत्रीचा शपथ विधी पूर्ण होणार आहे. हा शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. तसेच महायुतीयोल मंत्री पदांची देखील घोषणा केली जाणार आहे. निवडणुका पार पडण्याआधी महायुती सरकारने नागरिकांना अनेक आश्वासने दिली होती.परंतु आता ही आश्वासने सरकार खरच पूर्ण करणार आहे का? की सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार आता एसटी महामंडळाने तब्बल 18 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे.

एसटी महामंडळाचा हा निर्णय पाहता नवीन सरकारच्या काळात सर्वसामान्य माणसांचा प्रवास देखील महागणार असल्याची शक्यता आहे. कारण एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे 18 टक्क्यांनी भाडे वाढ करण्याचा प्रस्ताव केलेला आहे. हा प्रस्ताव निवडणुकीआधी झाला होता. परंतु शिंदे सरकारच्या काळात हा होल्डर ठेवण्यात आला होता.

महामंडळाला दररोज 15 कोटींचा तोटा

महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळाचा हा प्रस्ताव स्वीकारला तर मुंबई ते पुणे हा प्रवास 50 ते 60 रुपये महाग होणार आहे. याआधी 2021 मध्ये शेवटची भाडे वाढ करण्यात आली होती. त्यानंतर एसटीच्या प्रवासात कोणतेही भाडेवाढ करण्यात आली नव्हती. परंतु गेल्या अनेक दिवसापासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. एस टी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना दररोज 15 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. आणि हा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ करणे गरजेचे आहे. असे सांगितलेले आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतनात सातत्याने वाढ होत आहे. तसेच इंधनाचा दर देखील वाढत आहे. सुट्ट्या भागांची किंमत देखील वाढत आहे . सेच टायर आणि लुब्रिकंटचे दर देखील सातत्याने वाढत असल्याने एसटी महामंडळाने भाडे वाढ करण्याची गरज आहे, असे सांगितलेले आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव सरकार पुढे पाठवलेला आहे. परंतु आता सरकारी यावर नक्की काय निर्णय घेणार आहे? हे पाहणे सगळ्यात महत्त्वाचे आहे

LPG Cylinder Price Hike | महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका; गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ

LPG Cylinder Price Hike

LPG Cylinder Price Hike | डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना महागाईचा फटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. हा गॅस सिलिंडर हॉटेल, रेस्टॉरंट आणि लग्नसमारंभात वापरला जातो. त्याचा थेट परिणाम खाद्यपदार्थांच्या महागाईवर दिसून येईल. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइलकडून मिळालेल्या माहितीनुसार, 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत (LPG Cylinder Price Hike) 16.50 रुपयांनी वाढली आहे. गेल्या महिन्यातही नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती. सरकारी तेल कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे दर ठरवतात. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडरवर 300 रुपयांची सबसिडी दिली जाते. ही सबसिडी एका वर्षात 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध आहे.

19 किलोचे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder Price Hike) आता दिल्ली 1818. 50 रुपयात उपलब्ध होईल. गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्येच या सिलिंडरची किंमत 62 रुपयांनी वाढली होती. ऑक्टोबरमध्ये हा सिलिंडर 1740 रुपयांना मिळत होता. सलग पाचव्या महिन्यात तेल कंपन्यांनी या सिलिंडरची किंमत वाढवली आहे. दिल्लीशिवाय कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता 1927.00 रुपये झाली आहे. हा गॅस सिलिंडर मुंबईत 1771 रुपये आणि चेन्नईमध्ये 1980.50 रुपयात उपलब्ध आहे. 1 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 62 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यापूर्वी, 1 ऑक्टोबर रोजी 48. 50 रुपये 1 सप्टेंबर रोजी 39 रुपये आणि 1 ऑगस्ट रोजी 6.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

यावेळीही घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. या 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत.

  • दिल्ली: ८०३. रुपये
  • कोलकाता: 829 रुपये
  • मुंबई: 802.50 रुपये
  • चेन्नई: 818.50 रुपये

World Aids Day | एड्स झाल्यास सुरुवातीला दिसतात ही लक्षणे; वेळीच घ्या उपचार

World Aids Day

World Aids Day | आज म्हणजेच 1 डिसेंबर होती सर्वत्र जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. एड्स हा गंभीर आजार आहे. आणि या आजाराचे गांभीर्य लोकांना पटवून देण्यासाठी आणि त्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी लोकांनी काय केले पाहिजे? याबद्दलची माहिती देऊन लोकांमध्ये जागृकता निर्माण केली जाते. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने या दिनानिमित्त “योग्य मार्ग घ्या माझे आरोग्य माझा हक्क” ही थीम निवडलेली आहे. आज आपण एचआयव्ही आणि एड्स मधील सामान्य फरक जाणून घेणार आहोत. तसेच एड्स झाल्यावर तुमच्या शरीरात कोणती लक्षणे दिसतात? हे देखील जाणून घेणार आहोत.

एचआयव्ही हा एक व्हायरस आहे. जो मानवाच्या रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. आणि त्याच वेळी एड्स होतो. एचआयव्हीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये माणसाला एड्स (World Aids Day) होत असतो. पहिले दोन टप्पे हे एचआयव्हीचे असतात. परंतु शेवटच्या टप्प्यांमध्ये या एचआयव्हीची तीव्रता वाढते. आणि लोकांना एड्स होतो. आता एड्स झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात ही आपण जाणून घेणार आहोत.

एड्सची सुरुवातीची लक्षणे | World Aids Day

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जेव्हा एखाद्या व्यक्तीला HIV होतो. तेव्हा त्या माणसाला इन्फ्लुएंझा यांसारखी लक्षणे दिसतात. यामध्ये सामान्यता लोकांंना ताप येतो, डोकेदुखी, अतिसार, अंगावर पुरळ येतात. तसेच घसा खवखवतो यांसारखी लक्षणे दिसतात. तसेच तुमची रोग प्रतिकार शक्ती अगदीच कमी होत जाते. तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होते. तसेच खोकला येण्याची शक्यता देखील जास्त असते.

जर तुम्हाला वरील लक्षणे दीर्घकाळ दिसत असतील, तर अजिबात त्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता. तुम्ही वेळीच उपचार घ्या. अन्यथा पुढे जाऊन तुम्हाला अत्यंत गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. या रोगांमध्ये क्षय, मेंदूज्वर, गंभीर जिवाणू, संक्रमण, कपाशी यांसारख्या कर्करोगाचा देखील समावेश असतो. जर तुम्ही वेळीच उपचार घेतले नाही, तर त्याचे संक्रमण तुमच्या शरीरात वाढत जाते. आणि नंतर जाऊन हा आजार तुमच्या जीवाशी देखील बेतू शकतो. त्यामुळे वरील लक्षणे जर दीर्घकाळ शरीरात दिसत असतील, तर तुम्ही वेळीच डॉक्टरांचे उपचार घेणे गरजेचे आहे.

लवकरच लॉन्च होऊ शकतो OnePlus 13R; कोणते असतील फीचर्स ? जाणून घ्या

one plus 13R

OnePlus 13R म्हणजेच OnePlus 12R चे अपग्रेड कंपनी लवकरच लॉन्च करू शकते. हा स्मार्टफोन बेंचमार्किंग वेबसाइटवर दिसला आहे. कंपनीने आधीच चीनमध्ये फ्लॅगशिप OnePlus 13 सादर केला आहे आणि येत्या काही महिन्यांत हँडसेट जागतिक बाजारपेठेत येण्याची अपेक्षा आहे. हा फोन कंपनीच्या हाय-एंड स्मार्टफोन्ससोबत लॉन्च केला जाऊ शकतो. त्यामध्ये कोणती वैशिष्ट्ये असू शकतात ? त्याचा लूक कसा असेल ? चला जाणून घेऊया…

OnePlus 13R ची संभाव्य वैशिष्ट्ये

‘OnePlus CPH2645’ या मॉडेल क्रमांकासह एक हँडसेट गीकबेंचवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन OnePlus 13R नावाने लॉन्च होण्याची शक्यता आहे, ज्याची घोषणा कंपनीने अद्याप केलेली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये, कंपनीने दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत – एक फ्लॅगशिप मॉडेल आणि किंचित कमी प्रीमियम वैशिष्ट्यांसह एक कमी महाग मॉडेल.

कथित हँडसेटच्या सूचीवरून असे दिसून येते की स्मार्टफोन ‘पाइनएप्पल’ नावाच्या मदरबोर्डने सुसज्ज आहे. हे दर्शविते की OnePlus 13R Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असेल. हा तोच प्रोसेसर आहे जो सध्याच्या जनरेशनच्या OnePlus 12 मॉडेलला सामर्थ्य देतो. गीकबेंच सूचीनुसार, OnePlus 13 किमान 12GB RAM ने सुसज्ज असेल. OnePlus 13 प्रमाणे, हे Android 15 सह येण्याची अपेक्षा आहे, ज्याच्या वर कंपनीची OxygenOS 15 स्किन चालेल. बेंचमार्क परिणाम हे देखील दर्शविते की फोन Android च्या समान आवृत्तीवर चालेल.

कथित OnePlus 13R चे बेंचमार्क स्कोअर देखील आम्हाला कार्यक्षमतेच्या बाबतीत हँडसेटकडून काय अपेक्षा करावी याची कल्पना देतात. फोनने सिंगल-कोर टेस्टमध्ये 2,238 पॉइंट्स आणि मल्टी-कोअर टेस्टमध्ये 6,761 पॉइंट्स मिळवले आहेत. हे परिणाम Geekbench वरील OnePlus 12 पेक्षा किंचित जास्त आहेत.

OnePlus Ace 5 मालिका लवकरच चीनमध्ये लॉन्च होणार आहे. या मालिकेत बेस OnePlus Ace 5 आणि Ace 5 Pro प्रकार समाविष्ट असेल. कंपनीच्या अधिकाऱ्याने लॉन्च टाइमलाइन आणि प्रोसेसर तपशीलांची पुष्टी केली आहे. यापूर्वीही या फोनचे अनेक फीचर्स लीक झाले होते. यामध्ये डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी आणि चार्जिंग यांचा समावेश आहे. हे आगामी फोन OnePlus Ace 3 आणि OnePlus Ace 3 Pro वर अपग्रेड म्हणून लॉन्च केले जातील. येत्या काही दिवसांत अधिक माहिती समोर येईल.

कॉलिंगचा अनुभव होईल अधिक चांगला, BSNL ने सुरू केली नवीन सेवा, कसे कराल ऍक्टिव्ह ?

BSNL VoLTE Service

रिचार्ज प्लॅन महाग झाल्यापासून सरकारी कंपनी बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. महागड्या रिचार्जमुळे लोक त्यांचे सिम बीएसएनएलमध्ये पोर्ट करत आहेत. Jio, Airtel आणि Vi ग्राहक गमावत असताना, BSNL चा ग्राहक वर्ग सतत वाढत आहे. हे लक्षात घेऊन कंपनी सेवा सुधारण्यावर भर देत आहे.

BSNL आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी परवडणाऱ्या रिचार्ज योजना देखील देत आहे, कंपनी देशभरात 4G सेवेला गती देत ​​आहे, जी आता 50,000 पेक्षा जास्त ठिकाणी उपलब्ध आहे.

सुरू केली नवीन सेवा

बीएसएनएलने एक नवीन सेवा सुरू केली आहे. हे ग्राहकांना वाय-फाय वापरून कॉल करू देते. कंपनीने 4G वापरकर्त्यांसाठी VoLTE सेवा आणली आहे, जी 4G वर हाय-डेफिनिशन व्हॉईस कॉलची परवानगी देते. जर तुमच्याकडे BSNL 4G सिम असेल आणि तुम्हाला हे फीचर ॲक्टिव्हेट करायचे असेल, तर तुम्हाला ते सक्रिय करण्यासाठी काही प्रक्रिया फॉलो करावी लागेल.

कसे कराल ऍक्टिव्ह ?

ही सेवा सक्रिय करण्यासाठी, BSNL 4G किंवा 5G सिमवरून 53733 वर ‘ACTVOLTE’ संदेश पाठवा. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही सेवा फक्त BSNL 4G आणि 5G सिमकार्डवर कार्य करते. तुम्ही अजूनही जुने BSNL 2G किंवा 3G सिम वापरत असल्यास, तुम्ही तुमच्या जवळच्या BSNL ग्राहक सेवा केंद्राला भेट देऊन कोणतेही शुल्क न घेता 4G किंवा 5G सिममध्ये अपग्रेड करू शकता.

VoLTE म्हणजे काय?

VoLTE म्हणजे व्हॉइस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन. हे 4G नेटवर्कला सपोर्ट करते. यामध्येही तुम्ही हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन या नेटवर्कसह वापरत असाल, तर कॉल आल्यावरही तुमच्या फोनवरील इंटरनेट स्पीडमध्ये कोणतीही घट होणार नाही.

LTE काय आहे ?

या सेवेदरम्यान, तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेट 4G वेगाने चालते. या नेटवर्कमध्ये तुम्ही हाय स्पीड बँडविड्थसह इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. मात्र, या नेटवर्कचा दोष असा आहे की जर तुम्ही ते तुमच्या स्मार्टफोनवर वापरत असाल आणि तुमच्या नंबरवर कोणी कॉल केला तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी थांबते. यावर मात करण्यासाठी अलीकडच्या काळात VoLTE तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे.

पाण्याची टाकी साफ करण्याची पारंपारिक पण प्रभावी पद्धत ; ‘या’ लाकडाचा करा वापर

water tank cleaning

आपल्या प्रत्येकाच्या घरात पाण्याच्या टाक्या असतीलच. पण पाण्याच्या टाक्या वेळेत साफ करणे गरजेचे असते. मात्र हे काम अतिशय कटकटीचे आणि वेळखाऊ आहे. पण कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही तुमच्या घरातील टाकी सहज साफ करू शकता. टाकी साफ करण्याची ही पद्धतही खूप सोपी आहे. तुम्हाला फक्त एका गोष्टींची गरज आहे. जाणून घेऊया काय आहे ही पद्धत…

जांभूळाचे लाकूड हे घरातील टाकी स्वच्छ करण्याचा भारताचा पारंपारिक आणि नैसर्गिक मार्ग आहे. टाकी स्वच्छ करण्यासाठी जांभूळ लाकडाचा वापर केला जातो. शतकानुशतके या लाकडाचा वापर पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी केला जातो.

खरेतर , जांभूळ लाकडात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो म्हणून जीवाणू नष्ट करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आहेत. अँटीव्हायरल म्हणजे जे विषाणू काढून टाकण्यास मदत करते आणि अँटीफंगल म्हणजे बुरशीचे उच्चाटन करण्यास मदत करते.मात्र पाणी शुद्ध करण्यासाठी तुम्हाला या लाकडाचा वापर कसा करायचा ? हे माहित असणे आवश्यक आहे.

या लाकडाचा वापर करून पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचा नैसर्गिक आणि सुरक्षित मार्ग मानला जातो. याशिवाय जामुन लाकडाचा वापर वॉटर फिल्टरमध्येही करता येतो. चला हि ट्रिक कशी वापरायची ? जाणून घेऊया…

  • जांभूळा लाकडाचा तुकडा पाण्याच्या टाकीत टाका.
  • लाकूड टाकीमध्ये 2-3 दिवस ठेवा.
  • यानंतर टाकी रिकामी करा आणि पाण्याने धुवा.
  • टाकी वाळवा आणि पुन्हा नवीन पाण्याने भरा.

घराची टाकी कधी साफ करावी?

दर 6-12 महिन्यांनी नियमितपणे टाकी स्वच्छ करणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही केमिकल्सने टाकी स्वच्छ कराल तेव्हा ती रिकामी करा. टाकीमध्ये केमिकल टाका आणि 2-3 तास सोडा. यानंतर, टाकी धुवा आणि टाकी कोरडी करा.