Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 346

IRCTC सोबत करा ‘श्रीरामायण यात्रा’ ; श्रीलंकेतील ठिकाणे पाहण्याची संधी, पहा किती येईल खर्च ?

shri ramayan yaatra

जर तुम्हीच यंदाच्या नाताळाच्या सुट्टीत आपल्या कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. IRCTC ने परदेशात जाण्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज लाँच केले आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला श्रीलंकेच्या कँडी, नुवारा एलिया आणि कोलंबोला भेट देण्याची संधी मिळेल. चला तर मग जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती

IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव आहे ‘श्री रामायण यात्रा’. या पॅकेजमध्ये तुमची राहण्याची, जेवणाची आणि प्रवासाचीही व्यवस्था असेल. ही पूर्ण ट्रिप पाच रात्री आणि सहा दिवसांची असेल. या ट्रिप ची सुरुवात दिल्ली पासून सुरू होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही भागात असाल आणि तुम्हाला या ट्रीपला जायचं असेल तर आधी दिल्लीमध्ये पोहोचावे लागेल.

कुठे कुठे फिराल?

या पॅकेजच्या अंतर्गत तुम्हाला श्रीलंका मधील कॅन्डी, नुवारा एलिया आणि कोलंबो या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

किती येईल खर्च?

जर तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल आणि बुकिंग करत असाल तर तुम्हाला 85 हजार रुपये मोजावे लागतील. दोघांकरिता 69 हजार रुपये आणि तिघांकरिता 67 हजार रुपये प्रति व्यक्ती खर्च येणार आहे. जर तुमच्या सोबत कोणी पाच ते अकरा वर्षांचे मुल असेल तर त्यासाठी 57 हजार रुपये आकारले जातील. पाच ते अकरा वर्षांच्या मुलासाठी बेड घेणार नसाल तर त्यासाठी 55 हजार 950 रुपये लागतील. तर या ट्रिपमध्ये दोन ते अकरा वर्षाच्या मुलासाठी 55 हजार रुपये द्यावे लागतील.

कधीपासून सुरुवात

जर तुम्हाला या पॅकेज अंतर्गत प्रवास करायचा असेल तर लक्षात घ्या की या पॅकेज ची सुरुवात 14 डिसेंबर पासून होत आहे.

संपर्क

8287930747
8287930624
8287930718
9717641764

महत्वाची बातमी ! CIDCO साठी अर्ज केलाय ? बारकोड प्रमाणपत्राबाबत मोठी अपडेट

Cidco Lottery

मुंबई-पुणे सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये सर्वसामान्य माणसाला हक्काचं घर मिळवून देणाऱ्या संस्था म्हणून म्हाडा आणि सिडको या दोन्ही संस्थांचे नाव आवर्जून पुढे घेतलं जातं. तुम्ही जर सिडकोच्या घरांसाठी अर्ज केला असेल किंवा करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सिडको लॉटरी साठीच्या अटींमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती आहे.

11 ऑक्टोबरला सिडकोच्या मंडळाने जाहीर केलेल्या ‘माझे पसंतीचे सिडको घर’ या तब्बल 26000 घरांच्या महागृहनिर्माण योजनेला सध्या इच्छुकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आहे. या योजनेदरम्यान अनेक अटी शर्तींची पूर्तता करत प्रक्रियेचा पुढील टप्पा गाठला जातो. मात्र याच प्रक्रियेतील काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.

बारकोड असलेले प्रमाणपत्र

मिळालेल्या माहितीनुसार सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी नव्याने अर्ज करणाऱ्यांना इथून पुढे बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्यासोबतच स्टॅम्प पेपर वरची अट सिडकोने शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय सिडकोच्या घरासाठी नव्याने अर्ज भरणाऱ्यांना कोऱ्या कागदावर स्वक्षांकित शपथ पत्र सादर करता येणार आहे. ही योजना सुरू झाल्यापासून काहीच दिवस उलटल्यानंतर आता सिडकोने अटी संदर्भातली ही नवी अपडेट जारी केली आहे. इथं बारकोड नसलेलं रहिवासी प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात येत असले तरी वाटप पत्र देण्यापूर्वी बारकोड असलेलं रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे ठरणार आहेत तरच पुढचा अर्ज पात्र धरला जाणार आहे.

काय आहे ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजना?

सिडकोनं, दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ ही योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत सिडकोच्या वतीनं खारघर, वाशी, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, बामनडोंगरी, खारकोपर, कळंबोली अशा विविध नोडमध्ये घरं उपलब्ध करून देण्यात आली. योजनेतील सर्वाधिक, 13 हजार घरं तळोजा इथं उपलब्ध करून देण्यात आली होती.

सदर योजनेअंतर्गत अर्जदारांना 11 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटामधील नागरिकांसाठी ही घरं उपलह्ध असून, यामध्ये योजनेच्या नावाप्रमाणेच अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर निवडण्याचं स्वातंत्र्य असणार आहे. राहिला प्रश्न आवश्यक कागदपत्रांचा, तर अर्जदारांना ऑनलाइन अर्ज करताना ओळखपत्राच्या पुराव्यांसमवेत उत्पन्नाचं प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र अशा पुराव्यांचीही पूर्तता करावी लागणार आहे.

महाकुंभला जायचे आहे ? IRCTC ने केली VIP व्यवस्था, संगमावर तयार होतीये ‘टेंट सिटी’

mahakumbh 2025

महाकुंभला जाण्याची तयारी करत असाल आणि तिथे राहण्याची व्यवस्था काय असेल याची काळजी वाटत असेल तर? अशा लोकांना ही बातमी उपयोगी पडू शकते. IRCTC ने संगमच्या काठावर राहण्याची व्यवस्था केली आहे. ती सुद्धा व्ही.आय.पी. यासाठी आजपासून बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे आता उशीर करू नका. तुमच्या सोयीनुसार लगेच बुक करा आणि आरामात महाकुंभात स्नान करू शकता.

आयआरसीटीसीचे व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार जैन यांनी सांगितले की, महाकुंभला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी संगममध्ये टेंट सिटी तयार करण्यात येत आहे. ज्याचे नाव असेल महाकुंभ ग्राम. IRCTC टेंट सिटी प्रयागराज ही तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या क्षेत्रात एक नवीन ओळख बनणार आहे. हे लक्झरी टेंट सिटी सांस्कृतिक अनुभवाला भारतातील अध्यात्मिक विविधतेशी जोडून एक अनोखा अनुभव निर्माण करेल. त्याचे बुकिंग सुरू झाले आहे.

किती असेल भाडे ?

आयआरसीटीसीचे संचालक (पर्यटन आणि विपणन) राहुल हिमालयन यांनी सांगितले की, टेंट सिटीमध्ये राहण्याचे भाडे प्रति रात्र 6000 रुपये (अधिक कर) पासून सुरू होते. डबल ऑक्यूपेंसी, नाश्त्यासह. ग्रुप डिस्काउंट उपलब्ध. रद्द केल्यावर श्रेणीबद्ध परतावा दिला जाईल.

कसे कराल बुकिंग ?

टेंट सिटीमध्ये बुकिंग करण्यासाठी https://www.irctctourism.com/ या लिंकवर जाऊन बुकिंग करता येईल. कस्टमर सपोर्ट व्हॉइस साठी 1800110139 हा क्रमांक आहे. याशिवाय, +91-8287930739, +91-8595931047, किंवा +91-8076025236 वर यासंबंधीची माहिती मिळू शकते.

टेंट सिटीची खासियत

  • डिलक्स टेंट – आरामदायी शयनकक्ष, आधुनिक सुविधांसह स्नानगृह, गरम पाण्याची सुविधा.
  • प्रीमियम टेंट – लाइव्ह इव्हेंट स्ट्रीमिंगसह अतिरिक्त एसी, एलईडी टीव्ही.
  • चोवीस तास सुरक्षा आणि अग्निरोधक तंबू.
  • आरामदायी डायनिंग हॉलमध्ये बुफे कॅटरिंग सेवा.
    चोवीस तास वैद्यकीय सहाय्य.
  • प्रेक्षणीय स्थळे आणि आंघोळीच्या ठिकाणी शटल सेवा.
  • इको-फ्रेंडली बॅटरी ऑपरेटेड कार्ट्स.
  • योग/स्पा/बायकिंग सुविधा.
  • एक्झिक्युटिव्ह लाउंज, भोजनालये आणि नदीच्या काठाजवळील घरातील पाहुण्यांसाठी शौचालये.
  • चोवीस तास रिसेप्शन.

Viral Video | रागाच्या भरात नवऱ्याने पेटवून दिले घर; क्षणात झाले होत्याचे नव्हते

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. आपण घरात बसून जगभरातील अनेक गोष्टी पाहत असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात. काही गोष्टी या मनोरंजनात्मक असतात तर काही व्हिडिओ (Viral Video) पाहून आपल्यालाच आश्चर्य वाटते. असाच एक विचित्र व्हिडिओ समोर आलेला आहे. त्यामध्ये पती आणि पत्नीचे जोरदार भांडण झालेले आहे. भांडण झाल्यानंतर रागामध्ये त्या नवऱ्याने खूप घर पेटून दिलेले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ बघून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

आनंदनगर मध्ये एका विवाहित जोडप्यामध्ये एक अनेक दिवसांपासून घरगुती वाद होता. परंतु त्यांच्यातील हा वाद खूप जास्त प्रमाणात वाढला. त्यांची भांडण (Viral Video) देखील मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. त्यानंतर रागात त्या पतीने त्यांच्या घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी घराबाहेर फेकून दिल्या, आणि त्यांना आग लावली. या सगळ्या गोष्टींना आग लावताना तो खूपच रागात होता. त्यानंतर त्याने गाडीतील पेट्रोल काढले आणि त्या सामानावर शिंपडून पेटून दिलं. हळूहळू ती आग वाढत गेली आणि त्याचे संपूर्ण जळ घर जळून खाक झालेले आहे. त्याच्या बायकोला कोणतीही शारीरिक दुखापत झालेली नाही. खिडकीतून धूर बाहेर येत होता. ते पाहून ती घराबाहेर पडली. परंतु त्या दोघांमध्ये झालेला छोट्याशा भांडणामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे.

आजूबाजूच्या लोकांनी जेव्हा ही आग पाहिली, तेव्हा त्यांना वाटले की शॉर्ट सर्किट झालेले आहे. त्यांनी लगेच पोलिसांना आणि अग्निशमन दलाला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर सगळे घटनास्थळी आले. आणि ती आग विझवण्यात आली. त्यानंतर त्या दोघांनाही ती चूक मान्य केली आणि भविष्यात अशी चूक करणार नाही, हे देखील पोलिसांसमोर मान्य केले.

हिवाळ्यात का वाढतो हृदयविकाराचा त्रास? जाणून घ्या आरोग्य तज्ज्ञांचे मत

Heart Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डिसेंबर महिना सुरू होणार आहे. आणि संपूर्ण राज्यामध्ये थंडी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. थंडीमध्ये अनेक लोकांना विविध त्रास होत असतात. लोकांना थंडीमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा थंडीमध्ये हार्ट अटॅक आणि ब्लॉगचा धोका देखील वाढतो. त्यामुळे थंडीमध्ये आजारी लोकांना जास्त काळजी घ्यावी लागते. आता हृदयाचा आजार असणाऱ्या लोकांनी या थंडीत नेमकी कोणती काळजी घ्यावी? हे आपण जाणून घेणार आहोत.

जर जास्त थंडी असेल तर आपल्या शरीरातील रक्त वाहिन्या गोठण्याचे प्रमाण देखील जास्त होते. वाढत्या थंडीमुळे हा त्रास अनेक लोकांना उद्भवतो. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. आणि याचा परिणाम तुमच्या हृदयावर होता. हृदयापर्यंत रक्त प्रवाह नीट पोहोचत नाही. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता देखील वाढते. तसेच रक्तदाब देखील वाढण्याची शक्यता हिवाळ्यामध्ये जास्त असते.

थंडीच्या काळात अनेक लोकांना जास्त भूक लागते. त्यामुळे आपण जास्त खात असतो. आणि अनेक वेळा याचा आपल्याला त्रास होतो. थंडीच्या काळात नेहमी उबदार आणि गरम कपडे घालावे. तसेच रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये. जास्त थंडी असेल तर आपल्या शरीराला त्याचा त्रास होतो. त्यामुळे हात मोजे पायात मोजे घालावे. पदार्थांनी आपल्या शरीराला हिट मिळते त्या पदार्थांचे सेवन करावे. खास करून थंडीमध्ये अक्रोड आणि बदामाचा तुमच्या आहारात समावेश करावा. यामुळे तुमच्या शरीराला उष्णता मिळते.

हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे शरीराला तसेच हृदयाला रक्त पुरवठा नीट होत नाही. यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. आणि हृदयविकार होण्याची शक्यता देखील वाढत असते. त्यामुळे थंडीमध्ये स्वतःला जपणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमचा आहारात देखील योग्य गोष्टीचे सेवन केले पाहिजे. आजकाल हृदयविकाराचा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. खास करून थंडीमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण देखील वाढते. लोकांना सकाळी श्वास घ्यायला देखील त्रास होतो. त्यामुळे शक्यतो सकाळी आणि संध्याकाळीच्या वेळेला घराबाहेर पडू नका. तसेच दिवसा कोवळ्या उन्हामध्ये फिरायला जा.

काय सांगता ! सुरु होणार पुणे-दिल्ली ‘वंदे भारत स्लीपर’ ? मुरलीधर मोहोळ यांचा केंद्रीय मंत्र्यांकडे प्रस्ताव

murlidhar mohol

संपूर्ण देशामध्ये जवळपास आता ‘वंदे भारत एक्सप्रेस’ पोहोचली आहे. एवढंच नाही तर काश्मीर पर्यंत सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. जानेवारी 2025 मध्ये दिल्लीहून काश्मीरला वंदे भारतने जाता येणं शक्य होणार आहे. असं असताना आता दिल्ली ते पुणे या भागात वसलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच दिल्ली ते पुणे आणि पुणे ते दिल्ली या मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरू होऊ शकते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली आहे. एका निवेदनाद्वारे त्यांनी पुणे ते दिल्ली वंदे भरत स्लीपर सुरू करण्याबाबत मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी इतरही महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली आहे.


इतर रेल्वे मार्गांबाबतही प्रस्ताव

दिल्ली ते पुणे या मार्गाबरोबरच त्यांनी पुणे- सोलापूर, पुणे- नाशिक आणि पुणे- कोल्हापूर या मार्गावर देखील वंदे भारत चालवण्याची विनंती आणि प्रपोजल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याकडे दिला आहे. सध्या यावर कुठलाच निर्णय झालेला नाही. मात्र असं मानलं जात आहे की यावर नक्कीच लवकरात लवकर निर्णय घेतला जाऊ शकतो. याबरोबरच पुणे ते जोधपुर या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गावरील ट्रेनची संख्या वाढवण्यात यावी अशी देखील विनंती मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

काय केल्या मागण्या

एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर संवाद साधताना, मोहोळ यांनी वैष्णव यांच्याशी चर्चा केलेले एकूण सहा मुद्दे मांडले आहेत.

  • पुणे आकाशवाणीचे प्रक्षेपण मुंबईऐवजी पुणे केंद्रावरून व्हावे आणि पुण्यासाठी ‘रेनबो’ रेडिओ वाहिनी सुरू करावी.
  • पुणे आकाशवाणीला अद्ययावत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात यावे आणि कार्यक्रम विभागातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी.
  • पुणे ते दिल्ली दरम्यान ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ सुरू करावी.
  • पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक आणि पुणे-कोल्हापूर दरम्यान ‘वंदे भारत’ गाड्या देण्यात याव्यात.
  • पुणे दूरदर्शन केंद्राचे आधुनिकीकरण करावे.
  • पुणे ते जोधपूर (राजस्थान) दरम्यान धावणाऱ्या रेल्वे प्रवासाची संख्या वाढवण्यात यावी.

चीनमध्ये सापडला जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा, किंमत वाचून वाटेल आश्चर्य

Gold In china

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील सर्वात मोठा नवीन सोन्याचा साठा मध्य चीनमध्ये सापडला आहे.सुमारे 1,000 मेट्रिक टन उच्च दर्जाचे सोने खनिज तेथे आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनुसार, नवीन सोन्याच्या साठ्याचे मूल्य अंदाजे 83 अब्ज आहे, जे कदाचित आतापर्यंतचा सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे. अहवालानुसार, चीनमध्ये सापडलेला सोन्याचा साठा दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण खोल खाणीपेक्षा मोठा आहे, ज्यामध्ये सुमारे 900 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे. चीनच्या हुनान प्रांताच्या जिओलॉजिकल ब्युरोने जाहीर केले की ही ठेव पिंग्झियांग काउंटीमध्ये आहे, जिथे भूवैज्ञानिकांनी 2 किलोमीटर खोलीवर 40 सोन्याच्या नसा ओळखल्या आहेत.

विविध भूगर्भीय प्रक्रियांद्वारे सोन्याचे साठे तयार होतात, अनेकदा उष्ण, खनिजयुक्त द्रवपदार्थ पृथ्वीच्या कवचातील भेगा आणि विकृतींमधून फिरतात. हे द्रव सभोवतालच्या खडकांमधून सोने विरघळवतात आणि तापमानात घट किंवा दाब बदलण्यासारख्या परिस्थिती बदलतात तेव्हा ते जमा करतात.सुरुवातीच्या अंदाजानुसार मध्य चीनमध्ये सापडलेल्या सध्याच्या ठेवींमध्ये फक्त शिरांमध्ये सुमारे 300 मेट्रिक टन सोने असू शकते. प्रगत 3D मॉडेलिंग सूचित करते की अतिरिक्त साठा आणखी खोलवर असू शकतो. त्यांची खोली 3 किलोमीटरपर्यंत असू शकते.

जागतिक सोन्याच्या उत्पादनात आधीच महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चीनच्या सोन्याच्या व्यवसायावर या शोधाचा मोठा परिणाम होण्याची अपेक्षा आहे. जगातील एकूण सोन्याच्या उत्पादनात चीनचा वाटा 10% आहे. 2024 च्या सुरूवातीला सोन्याचा साठा 2,000 टनांपेक्षा जास्त होईल असे वाटून जागतिक सोन्याच्या बाजारपेठेवर चीनचे वर्चस्व आहे.

चीनमध्ये सोन्याचा साठा सापडल्याच्या घोषणेमुळे सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. आर्थिक अनिश्चितता दरम्यान मौल्यवान धातूची जागतिक मागणी वाढल्याने हे घडले आहे. जगभरात आणखी लक्षणीय सोन्याचे साठे सापडतील की नाही यावर तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. नवीनतम शोध सूचित करतात की आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य साठा अजूनही मुबलक असू शकतो.

रात्री दूध पिल्याने शरीराला होतात अनेक फायदे; जाणून घ्या दूध पिण्याची योग्य पद्धत

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दूध हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानले जातेम कारण दुधातून आपल्याला भरपूर पोषण मिळते. त्यामुळे दिवसभरात एक पेला का होईना पण दूध प्यावे. असे आरोग्य तज्ञ सांगत असतात. परंतु तुमच्या वयानुसार दूध पिण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. तुम्ही कोणत्याही वयात दूध पिले तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होत नाही. जर तुम्ही प्रौढ होत असाल, तर तुम्ही रात्री दूध पिणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. तसेच इतर लोकांनी देखील रात्रीच्या वेळी दूध पिणे. आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. आता दूध पिण्याचे आपल्या शरीराला काय फायदा होतो. आणि दूध पिण्याची योग्य वेळ काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.

दूध पिण्याची योग्य पद्धत

तुम्ही जर दूध पीत असाल, तर त्या दुधामध्ये थोडीशी हळद आणि आलं टाकून ते दूध उकळून प्यावे. नंतर दूध थंड करून प्यावे. यामुळे तुमच्या शरीरातील कफ कमी होतो. आणि इतर त्रास देखील होत नाही. तसेच तुम्ही या दुधाची चमचाभर तूप टाकले तर देखील अपचनाचा त्रास होत नाही. आणि तुमचे पोट देखील लवकर साफ होईल. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. त्यांनी दुधामध्ये एक चमचा दूध टाकून दिले पाहिजे आहे .

तुम्ही जर दुधामध्ये हळद आलं आणि तूप टाकून पिले तर तुमचा थकवा तसेच ताण देखील कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच शरीरातील इन्फेक्शन देखील दूर होईल. जर तुम्ही रात्री झोपताना दूध पिले, तर तुम्हाला शांत झोप लागेल रात्रभर आपले शरीर शांत असते. यामुळे आपल्या शरीराला दुधाच्या सगळ्या पोषक तत्त्वांची पूर्तता होते. त्यामुळे तज्ञ लोक नेहमी रात्रीच्या वेळी दूध पिण्याचा सल्ला देतात. जर तुम्हाला देखील शरीराबाबत पोषक तत्वांची कमतरता असेल, तर पूर्ण रोज रात्री दुधाचे सेवन करू शकता.

केवळ 1100 रुपयात करा विमानाने प्रवास; या एअरलाईन कंपनीने आणली भन्नाट ऑफर

Airline Indigo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक सामान्य माणसाची एक ड्रीम लिस्ट असते. आणि त्या ड्रीम लिस्टमध्ये कधीतरी विमानाने प्रवास करावा. हे स्वप्न नक्कीच असते. परंतु विमानाचा प्रवास हा खूप महाग असल्याने प्रत्येकाला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार ते शक्य होत नाही. परंतु आता विमानाने प्रवास करण्याचे तुमचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तुम्ही अगदी बसच्या तिकिटात विमानाने प्रवास करू शकता. कारण आता देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने त्यांच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तिकीटांचे दर कमी केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सहजपणे विमानाने प्रवास करू शकता. या कंपनीने जर तुम्हाला देशांतर्गत प्रवास करायचा असेल, तर वनवे तिकीटाची सुरुवात ही 1199 पासून होते. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल, तर ही किंमत 5199 एवढी ठेवण्यात आलेली आहे. तसेच सीट बुक तुम्ही केवळ 99 रुपयांमध्ये करू शकता. त्यामुळे अगदी सर्वसामान्य नागरिकांना देखील आता विमानाने प्रवास करणे शक्य होणार आहे.

इंडिगोने केवळ तिकिटांवर सूट दिली नाही, तर बऱ्याच सेवांवर देखील सूट दिलेली आहे. या प्रीपेड ॲक्सिस बॅगेज वर प्रवाशांना 15% सूट मिळत आहे. तर फास्ट फॉरवर्ड सेवेवर 50% सूट मिळत आहे. तसेच देशांतर्गत जर प्रवास करायचा असेल, तर असिस्टंटसाठी केवळ तुम्हाला 59 रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. जर ही रक्कम तुमच्या आर्थिक बजेटमध्ये बसत असेल, तर तुम्ही नक्कीच विमानाने प्रवास करू शकता.

इंडिगोही आपल्या भारतातील सर्वात कमी खर्चिक अशी एअरलाईन आहे. इंडिगो त्यांच्या प्रवाशांना अगदी कमी दरामध्ये चांगल्या सेवा देत आहे. 2006 मध्ये या कंपनीची स्थापना झालेली, असून हरियाणामध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. ही कंपनी नागरिकांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सेवा देखील पुरवत असते. तसेच प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये, यासाठी देखील ही कंपनी नेहमीच प्रयत्नशील असते. अगदी कमी किमतीमध्ये प्रवाशांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन ही कंपनी येत असते. आणि अशा ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये त्यांनी तिकिटांच्या किंमतीत कमालीची घट केलेली आहे.

मोबाईलमधील हे 15 अँप्स आजच डिलीट करा; अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान

Fraud Apps

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ऑनलाइन फसवणूक करून घोटाळेबाज लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान करत आहेत. अशातच असे काहीबनावट ॲप्स सापडले आहेत जे लोकांना त्यांच्या फसवणुकीला बळी पडतात. हाती आलेल्या माहितीनुसार; गेल्या काही महिन्यांत अनेक बनावट कर्ज ॲप्सनी लोकांची फसवणूक केली आहे. त्यांना सहजपणे कर्जाचे आमिष दाखवून सापळ्यात अडकवून फसवणूक केली. हे बनावट लोक ॲप वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील चोरतात, त्यामुळे फसवणुकीचा धोका वाढला आहे. McAfee ने असे 15 बनावट कर्ज ॲप्स ओळखले आहेत, जे लाखो लोकांनी डाउनलोड केले आहेत.

हे 15 लोन ॲप्स अतिशय धोकादायक

मॅकफीच्या अहवालानुसार, 15 बनावट कर्ज ॲप्स सुमारे 8 दशलक्ष म्हणजेच 80 लाख वापरकर्त्यांनी डाउनलोड केले आहेत. बहुतेक वापरकर्ते गुगल प्ले स्टोअरचे आहेत. तथापि, यापैकी काही ॲप्स स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहेत.

चुकूनही परवानगी देऊ नका

काही ॲप्स अजूनही वापरकर्त्यांच्या फोनमध्ये उपलब्ध आहेत. ॲप इंस्टाल झाल्यावर हे बनावट लोक अनेक प्रकारच्या परवानग्या मागतात. यासाठी तुम्हाला मेसेज, कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशनचा ॲक्सेस द्यावा लागेल. मात्र अनेकजण विचार न करता त्यासाठी परवानगी देतात. एकदा ॲपला प्रवेश मिळाल्यानंतर, बँकिंगसाठी आवश्यक असलेल्या वन-टाइम पासवर्डसह तुमचा महत्त्वाचा डेटा सहजपणे चोरीला जाऊ शकतो.

ॲप्सची संपूर्ण यादी

  • Préstamo Seguro-Rápido, seguro
  • Préstamo Rápido-Credit Easy
  • ได้บาทง่ายๆ-สินเชื่อด่วน
  • RupiahKilat-Dana cair
  • ยืมอย่างมีความสุข – เงินกู้
  • เงินมีความสุข – สินเชื่อด่วน
  • KreditKu-Uang Online
  • Dana Kilat-Pinjaman kecil
  • Cash Loan-Vay tiền
  • RapidFinance
  • PrêtPourVous
  • Huayna Money
  • IPréstamos: Rápido
  • ConseguirSol-Dinero Rápido
  • ÉcoPrêt Prêt En Ligne