Thursday, January 1, 2026
Home Blog Page 344

आल्याची शेती करून शेतकरी झाला मालामाल; वर्षातच घेतले लाखोंचे उत्पन्न

Ginger Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |आजकाल अनेक शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीच्या शेतीला प्राधान्य देतात. मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे शेती करता येते. यामुळे शेतकऱ्यां बे कष्ट कमी होऊन चांगल्या प्रकारे पीक येते. आणि त्यांना चांगला नफा देखील मिळत आहे. शेतकरी आता आर्थिक समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करत आहेत. त्यामुळे आता ते पारंपारिक पद्धतीने पिके न घेता, नवीन आधुनिक पद्धतीच्या पिकाची लागवड करत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत, ज्यांनी आधुनिक पद्धतीची शेती करून लाखो रुपये कमावले आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एका प्रगतशील शेतकऱ्यांनी एका शेतीचा वेगळा प्रयोग केलेला आहे. या शेतकऱ्याचे नाव दामू भागवत असे आहे. त्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीची शेती अवलंबली आहे. आणि त्यांनी आल्याच्या पिकाची लागवड केलेली आहे. दामू भागवत यांनी चार वर्षांपूर्वी जवळपास एक एकर शेतीमध्ये आल्याची लागवड केली. आणि त्यातून त्यांना चांगला नफा देखील मिळालेला आहे. त्यानंतर त्यांनी जास्त क्षेत्रामध्ये आल्याची लागवड केली.

बाजारात चांगला नफा मिळत असल्याने त्यांनी मागील वर्षी जवळपास 11 एकर शेतीमध्ये आल्याची लागवड केलेली आहे. मागील वर्षी साधारणपणे संपन्न राज्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती. आणि त्याचा फटका दामू भागवत यांना देखील बसलेला आहे. परंतु तरी देखील त्यांना या 11 एकरमध्ये 80 लाख खर्च उत्पन्न मिळवलेले आहे. खर्चाच्या तुलनेत त्यांचे हे उत्पन्न कमी होते. परंतु त्यांनी निराश न होता यावर्षी पुन्हा एकदा आल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी यावर्षी पाच एकरमध्ये आल्याची लागवड केलेली आहे.

त्यांनी आल्याच्या शेतीसाठी ठिबक सिंचन वापरले होते. पाच एकर त्यांना जवळपास 1000 क्विंटल आल्याचे उत्पन्न झाले आणि त्यामधून आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी अत्यंत नियमात आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून आल्याची लागवड केलेली आहे. बाजारामध्ये आल्याला खूप जास्त भाव आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच त्यांनी आल्याची लागवड केली. आणि त्यांना लाखो रुपयांचा नफा लाभ झालेला आहे.

सिडकोने शिथिल केल्या या 2 अटी; 11 डिसेंबरपर्यंत करा अर्ज

Cidco

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सिडको मार्फत नागरिकांना कमी किमतीमध्ये घर उपलब्ध होत असतात. आता या सिडकोच्या घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 11 डिसेंबर 2024 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आजपर्यंत या सिडको अंतर्गत जवळपास 96 हजार ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहे. याबाबत नियम देखील सिडकोने दिलेले आहेत. आता समाजातील प्रत्येक घटकाला या प्रक्रियेत सहभागी होता यावे आणि अर्ज प्रक्रिया करता यावे. यासाठी बारकोड नसलेले रहिवासी प्रमाणपत्र आणि स्टॅम्प पेपर वर शपथपत्र देण्याची अट शिथिल केलेली आहे. आता उरलेल्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता यावा, यासाठी कोणी हा निर्णय घेतलेला आहे.

सिडको हे शहराच्या अनेक भागांमध्ये 27 ठिकाणी 67 हजार घरे बांधत आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात 43 हजार घरांना महारेराची परवानगी मिळालेली आहे. आणि त्यांचे बांधकाम देखील चालू झालेले आहे. यातील 26000 घरांची योजना ही 11 ऑक्टोबर पासून सुरू केलेली आहे. यामध्ये जवळपास 13000 घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. तर उर्वरित ते 13 हजार घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. यातील सर्वात जास्त म्हणजे जवळपास 50% घरे हे तळोजात आहेत. तसेच खानदेश, मानसरोवर आणि खारकोपर यांची सारख्या ठिकाणी देखील घरांचा समावेश असणार आहे.

सिडको अंतर्गत अर्ज करण्यासाठी सुरुवातीला 11 नोव्हेंबर पर्यंत अर्ज नोंदणीची शेवटची तारीख ठेवली होती. परंतु या दरम्यान विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे अनेक ग्राहकांना अर्ज करता आला नाही. आणि म्हणूनच अर्ज नोंदणीची प्रक्रिया 11 डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे आता नागरिकांना त्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र यांसारख्या कागदपत्रांची जमवाजमव करायला वेळ मिळणार आहे. तुम्हाला सिडको अंतर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणी करताना बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल केली आहे. त्यामुळे बारकोड नसलेले प्रमाणपत्र घेऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता. परंतु वाटप पत्र देण्यापूर्वी ते सादर करणे गरजेचे आहे. असे देखील सिडकोने सांगितलेले आहे. तसेच शंभर किंवा पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करण्याची अट देखील शिथील करण्यात आलेली आहे.

Travel Places | हिवाळ्यात मुंबई जवळच्या ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या; दिसेल नयनरम्य दृश्य

Travel Places

Travel Places | हिवाळा चालू झालेला आहे. आणि हिवाळ्यामध्ये अनेक लोक फिरायला जाण्याचे प्लॅन करत आहे. महाराष्ट्रात देखील फिरण्याचे अशी अनेक ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येईल. आज आम्ही तुम्हाला मुंबईपासून जवळ असणाऱ्या काही निसर्गरम्य ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चांगले दृश्य पाहायला मिळेल. असे म्हणतात की, मुंबई हे शहर कधीच झोपत नाही. 24 तास मुंबईमध्ये गर्दी असते. त्यामुळे मुंबईमधील अनेक लोक हे फिरायला जाण्यासाठी शांत ठिकाणी जात असतात. आज आम्ही तुम्हाला मुंबईपासून 100 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या काही सुंदर पर्यटन स्थळांबद्दल माहिती सांगणार आहोत.

लोणावळा | Travel Places

Travel Places

लोणावळा हे एक अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मुंबईपासून केवळ 80 km अंतरावर आहे. हे हिल स्टेशन निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते. लोणावळ्यामध्ये चारी बाजूंनी हिरव्यागार डोंगरदऱ्या आहेत. तसेच टायगर पॉईंट कारला लेणी यांसारखे अनेक दृश्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल
तसेच खंडाळा घाट भुशी धरण हे देखील निसर्ग प्रेमींसाठी असणार आहे.

अलिबाग

 Travel Places

मुंबईपासून अलिबाग हे केवळ 95 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रकिनार असलेला अलिबाग हे मुंबईतील लोकांसाठी अत्यंत शांत असे ठिकाण आहे. या शहराला सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तसेच अनेक ऐतिहासिक किल्ले देखील आहे. यामध्ये तुम्हाला अलिबाग बीच, वर्सोली बीच पाहायला मिळतील तसेच समुद्रकिनाऱ्यावर असलेला कोलाबा किल्ला देखील तुम्हाला पाहायला मिळेल.

माथेरान

Matheran

माथेरान हे देखील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मुंबईपासून अत्यंत सुंदर आणि शांत असे हे ठिकाण आहे. चारी बाजूने निसर्गाने वेढलेले आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. तसेच येथील खास गोष्ट म्हणजे या ठिकाणी वाहनांना जाण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे तुम्हाला घोड्यांवरून किंवा तेथील एका ट्रेन मिळेल माथेरानला जाता येते.

खंडाळा

Khandala

खंडाळा हे शहर देखील मुंबईपासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावर आहे. अत्यंत डोंगराळ भाग असलेले हे ठिकाण आहे. या ठिकाणाहून तुम्हाला हिल स्टेशन पश्चिम घाटाचे दर्शन होते. या ठिकाणी तुम्हाला लोणावळा, भुशी डॅम यांसारख्या ठिकाणांचा देखील अनुभव घेता येईल.

एलिफंटा लेणी

एलिफंटा लेणी ही मुंबईपासून केवळ 11 किलोमीटर अंतरावर आहे. ही लेणी एलिफंटा बेटावर वसलेली आहे. या ठिकाणी प्राचीन हिंदू देवदेवतांचे वास्तव्य होते. असे मानले जाते या ठिकाणी शिल्प आणि कोरीव काम देखील अत्यंत सुंदर आहे. तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर मुंबईपासून हे ठिकाण अत्यंत जवळ आहे.

भारतातील लोक कर्जाच्या विळख्यात; ग्रामीण भागात कर्ज घेण्याचे प्रमाण जास्त

Debt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल कर्ज घेण्याचा एक नवीन ट्रेंड आलेला आहे. अनेक लोक कर्ज घेताना दिसत आहेत. अगदी ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक लोक कर्ज घेत आहेत. एका अहवालात अशी माहिती समोर आलेली आहे. भारतातील अनेक लोक हे कर्जाच्या विळख्यात अडकलेली आहेत. परंतु या कर्जाचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे. अहवालानुसार अशी माहिती समोर आलेली आहे की, जवळपास एक लाख लोकांमध्ये 18000 पेक्षा अधिक लोक कर्जबाजारी झालेले आहेत.

याबाबत एक अहवाल सादर केलेला आहे आणि या कर्जाच्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. आज काल लोकांचे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. शहरी भागातील अनेक लोक हे ईएमआयवर नवीन गोष्टी खरेदी करत असतात. त्यामुळे अनेक लोक कर्जाच्या विळख्यात अडकलेले आहेत. त्याचप्रमाणे आजकाल ग्रामीण भागात देखील या ईएमआयवर वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

या अहवालानुसार अशी माहिती समोर आलेली आहे की, एक लाख लोकांवर जवळपास 18 हजार लोक कर्जबाजारी आहेत. या अहवालानुसार ईएमआयवर वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण जास्त आहे. शहरी भागात ईएमआयवर वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण हे 17.44% आहे, तर ग्रामीण भागात हेच प्रमाण 18.7% एवढे आहे. म्हणजेच ग्रामीण भागात कर्ज घेणाऱ्या लोकांचे प्रमाण हे 6% ने वाढलेले आहेत.

आजकाल ग्रामीण भागातील कुटुंबाचा मासिक खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तसेच गेल्या दहा वर्षात ग्रामीण भागात कुटुंबाचा खर्च हे 164 टक्क्यांनी वाढलेला आहे. ते शहरी भागात हे प्रमाण 146 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटांतर्गत कर्ज देण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. यामध्ये 1 लाख महिलांना मागे जवळपास 13% महिला कर्ज घेतात. शहरांमध्ये 1 लाख महिलांमागे 10 % महिला कर्ज घेतात.

RBI ने CIBIL स्कोअरबाबत बनवले हे 6 नवीन नियम; 1 तारखेपासून झाली अंबलबजावणी

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट स्कोअरबाबत एक मोठे अपडेट आणले आहे. आरबीआयकडे क्रेडिट स्कोअरबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. तक्रार आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी आरबीआयने सिबिल स्कोअरबाबत 5 नवीन नियम केले होते. अलीकडेच त्यात आणखी एक नवीन नियम जोडला गेला आहे. चांगला सिबिल स्कोअर असणे प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात फायदेशीर आहे, कारण यामुळे तुम्हाला कर्ज मिळणे सोपे होते. CIBIL स्कोर राखण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट डिफॉल्ट टाळणे. म्हणजेच, वेळेवर ईएमआय भरा. सिबिल स्कोअरशी संबंधित नवीन नियम 6 पासून लागू झाले आहेत. हे नियम केवळ कर्ज प्रक्रिया सुलभ करत नाहीत तर ग्राहक त्यांच्या क्रेडिट स्कोअरचे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण देखील करू शकतात. या 6 नियमांचा तुमच्या कर्ज सुविधा आणि क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होईल हे आपण जाणून घेणार आहोत.

सिबिल स्कोअर 15 दिवसांत अपडेट केला जाईल

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, आता 15 दिवसांच्या आत ग्राहकांचा सिबिल स्कोअर अपडेट केला जाईल. हा नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. रिझर्व्ह बँकेने वित्तीय संस्थांना वेळोवेळी ग्राहकांचे क्रेडिट स्कोअर अपडेट करण्याचे निर्देश दिले. अलीकडेच, RBI गव्हर्नरने जाहीर केले होते की सिबिल स्कोअर दर 15 दिवसांनी अपडेट केला जाईल. याद्वारे, ग्राहकाला त्याच्या सिबिल स्कोअरची नवीनतम स्थिती वेळेवर जाणून घेता येईल आणि त्याच्या कर्जाच्या पात्रतेवर चांगले लक्ष ठेवता येईल.

नवीन नियमानुसार, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला आणि महिन्याच्या शेवटी सिबिल स्कोअर अपडेट केला जाईल. क्रेडिट संस्था आणि क्रेडिट माहिती कंपन्या त्यांच्या सोयीनुसार इतर कोणतीही तारीख निश्चित करू शकतात ज्याद्वारे डेटा 15 दिवसांच्या आत अपडेट केला जाऊ शकतो. नियमांनुसार, पतसंस्थांना प्रत्येक महिन्याला ग्राहकाची क्रेडिट माहिती CIC कडे पाठवणे बंधनकारक असेल ज्या वेळी क्रेडिट स्कोअर अपडेट केला जाऊ शकतो.

CIBIL स्कोर संबंधित माहिती पाठवावी लागेल

मध्यवर्ती बँकेने सर्व क्रेडिट माहिती कंपन्यांना सांगितले आहे की, जेव्हाही बँक किंवा NBFC ग्राहकाचा क्रेडिट अहवाल तपासेल तेव्हा ही माहिती ग्राहकांना पाठवणे आवश्यक असेल. ही माहिती एसएमएस किंवा ईमेलद्वारे पाठविली जाऊ शकते. वास्तविक, क्रेडिट स्कोअरबाबत अनेक तक्रारी पुढे येत होत्या, त्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.

विनंती नाकारण्याचे कारण द्यावे लागेल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मते, जर ग्राहकाची विनंती नाकारली गेली तर त्याचे कारण स्पष्ट करणे बंधनकारक असेल. यामुळे ग्राहकाला त्याची विनंती का नाकारली गेली हे समजण्यास मदत होईल. सर्व पतसंस्थांनी नाकारण्याच्या संभाव्य कारणांची यादी तयार करणे आणि ग्राहकांना माहिती प्रदान करणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून ते त्यांची क्रेडिट स्थिती सुधारण्यास मदत करू शकतील.

वर्षातून एकदा ग्राहकांना मोफत सिबिल स्कोअर

रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मते, क्रेडिट कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना वर्षातून एकदा मोफत सिबिल स्कोअरची माहिती द्यावी लागेल. यासाठी, क्रेडिट कंपनीला त्यांच्या वेबसाइटवर एक लिंक देखील द्यावी लागेल जेणेकरुन ग्राहक सहजपणे त्याचा क्रेडिट रिपोर्ट पाहू शकतील. यामुळे ग्राहकाला त्याचा/तिचा सिबिल स्कोअर आणि दरवर्षी संपूर्ण क्रेडिट इतिहास जाणून घेण्यात मदत होईल.

डिफॉल्टची तक्रार करण्यापूर्वी ग्राहकाला माहिती देणे

रिझव्र्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या ग्राहकाचे कर्ज थकीत होणार असेल, तर डिफॉल्टचा संपूर्ण अहवाल देण्यापूर्वी ग्राहकाला माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. कर्ज देणाऱ्या संस्थांनी सर्व माहिती ग्राहकांना एसएमएस किंवा ईमेलद्वारे शेअर करावी. याशिवाय बँका आणि कर्ज वाटप करणाऱ्या संस्थांनी नोडल अधिकारी नेमावेत. क्रेडिट स्कोअरशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी नोडल अधिकारी काम करतील.

३० दिवसांत तक्रारीचे निराकरण केले जाईल

जर क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीने तक्रारीचे निराकरण केले नाही किंवा 30 दिवसांच्या आत ग्राहकाच्या तक्रारीचे निराकरण केले नाही, तर त्याला दररोज 100 रुपयांचा दंड भरावा लागेल. म्हणजेच जितक्या उशिरा तक्रारीचे निराकरण होईल, तितका अधिक दंड भरावा लागेल. कर्ज वाटप करणाऱ्या संस्थेला २१ दिवस आणि क्रेडिट ब्युरोला ९ दिवसांचा कालावधी मिळेल. जर बँकेने 21 दिवसांच्या आत क्रेडिट ब्युरोला माहिती दिली नाही तर बँक नुकसान भरपाई देईल. बाईकची माहिती देऊन 9 दिवसांनंतरही तक्रारीचे निराकरण झाले नाही, तर क्रेडिट ब्युरोला नुकसान भरपाई द्यावी लागेल.

Weather Update | फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका; पुढील 3 दिवस राज्यात पावसाची शक्यता

Weather Update

Weather Update | सध्या बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळ चालू आहे. आणि या फेंगल चक्रीवादाचा फटका तमिळनाडूसह इतर अनेक राज्यांना देखील बसत आहे. आणि आता या चक्रीवादळाचा कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकताना दिसत आहे. त्यामुळे हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामाना विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. सध्या राज्यातील तापमान देखील कमी होताना दिसत आहे. आणि वातावरणात चांगलाच गारठा पसरलेला असून ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे 3 आणि 4 डिसेंबर दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देखील जारी केलेला आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या सरी बरसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता तळ कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून हा पाऊस पडणार आहे. 3 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट दिलेला, असून 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पुणे, सोलापूर, सांगली आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा वायव्यकडे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असणारी ही कडाक्याची थंडी ओसरणार असून हा तापमान वाढणार असा आहे. हे फेंगल चक्रीवादळ हळूहळू आता पश्चिमेकडे सरकत आहे. आणि नंतर त्याची तीव्रता कमी होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.

फेंगल चक्रीवादळाचा परिणाम कोकणातही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. 3 ते 6 सप्टेंबर दरम्यान कोकणामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे हवामानात बदल होणार असून हवामान दमट होणार आहे. मागील दोन दिवसापासून हवामानात बदल झालेला आहे. तापमान आता वाढत असल्याने कोकणातील थंडी देखील गायब झालेली आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज कसा करावा? लागतात ‘ही’ महत्वाची कागदपत्र

Vayoshri Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकार हे राज्यातील सगळ्या घटकांचा विचार करून विविध योजना आणत असतात. अशातच आता सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे ल. या योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना असे आहे. या योजने अंतर्गत राज्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वय असणारे नागरिक सहभाग घेऊ शकतात. ही योजना राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि वयोमानानुसार अनेक अडचणी येतात. यावर उपाययोजना करण्यासाठी आणि आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी ही रक्कम दिली जाणार आह यामध्ये मनुष्य केंद्र, उपचार केंद्र, मानसिक स्वास्थ्य प्रबोधन यांचा लाभ घेता येणार आहे. यासाठी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या योजनेअंतर्गत शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार साधने आणि उपकरणे खरेदी करता येणार आहे. यामध्ये चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, विंचर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर यांसारख्या गोष्टी खरेदी करता येणार आहे. यासाठी सरकारकडून 100% आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध आहेत.

योजनेत सहभाग घेण्यासाठी निकष

31 डिसेंबर 2023 च्या अखेरपर्यंत उमेदवाराचे 65 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेला असला तरी चालेल. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असावे. यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असणार आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे त्याच्या आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र यांसारख्या कागदपत्रांची गरज आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा.

डिसेंबर महिन्यात तब्बल 10 दिवस शेअर मार्केट बंद राहणार

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल, तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. आजपासून डिसेंबर महिना सुरु झाला असून , 2024 वर्ष संपायला फक्त एक महिला राहिला आहे. हा महिना गुतंवणूकदारांसाठी आर्थिक बाजूच्या तसेच गुंतवणुकीच्या दृष्टिकिनातून अतिशय महत्वाचा मनाला जातो. पण या महिन्यात गुंतवणूकदारांना बाजारात कमी व्यवहार करावे लागणार आहेत. कारण डिसेंबर महिन्यात तब्बल 10 दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे. तर चला जाणून घेऊयात कोणकोणत्या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार आहे.

डिसेंबरमधील सुट्ट्या

शेअर मार्केटला डिसेंबरमध्ये शनिवार , रविवार आणि रेड मार्क धरून एकूण दहा सुट्या आहेत . या महिन्याच्या प्रत्येक शनिवारी म्हणजे 7 ,14 ,21 आणि 28 रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. त्याचबरोबर आठवड्याच्या सुट्टीमध्ये 1 ,8 ,15 , 22 तसेच 29 रोजी रविवार असल्यामुळे शेअर मार्केटचे व्यवहार बंद असतील . या सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त 25 डिसेंबरला बुधवारी ख्रिसमस , नाताळ निमित्त सुट्टी असणार आहे.

दहा दिवस शेअर मार्केट बंद

डिसेंबर महिन्यात चार शनिवार आले आहेत . तसेच पाच रविवार आणि नाताळची सुट्टी मिळवून तब्बल दहा दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे. या महिन्यात एकूण 31 दिवस असून , यामध्ये व्यवहाराचे गणित पाहिल्यास 31 मधून 10 सुट्ट्या वजा केल्यास 21 दिवस शिल्लक राहतात. या शिल्लक राहिलेल्या दिवसांमध्ये शेअर मार्केटच्या गुंतवणूकदारांना व्यवहार करता येणार आहेत.

2024 मध्ये 17 दिवस सुट्ट्या

2024 या वर्षात बीएसई आणि एनएसईने वर्षाच्या 14 दिवस सुट्ट्या जाहीर केल्या होत्या , या 14 दिवसाच्या सुट्ट्यामध्ये शनिवार आणि रविवार पकडले जात नाहीत. पण अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारीला , लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे आणि विधानसभेच्या निवडणुकीमुळे 20 नोव्हेंबर या सुट्ट्यांच्या दिवसांची भर पडली आहे . त्यामुळे एकूण 17 सुट्ट्या या वर्षी शेअर बाजाराला देण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले. सेन्सेक्सने एका दिवशी 1000 अंकांची उसळी घेतली, तर दुसऱ्या दिवशी तो 1000 अंकांनी घसरला. मात्र आता बाजारात चांगली वाढ दर्शवली जात आहे.

FlipKart सेलमध्ये Motorola चे हे फोन कमी किमतीत उपलब्ध; लगेच घ्या ऑफरचा फायदा

Motorola Phones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपनीने त्यांची एक नवीन डील चालू केलेली आहे. फ्लिपकार्डवर आजपासून बिग सेविंग डेस सेल सुरू झालेला आहे. हा सेल येत्या 5 डिसेंबर पर्यंत चालू असणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला काही टॉप कंपन्यांचे चांगले स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध होणार आहे. तुम्हाला स्मार्टफोनवर चांगला डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही जर मोटोरोला मोबाईल घेण्याचा प्लॅन करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण फ्लिपकार्टवर मोटो रोला कंपनीचे काही फोन अत्यंत चांगल्या डिस्काउंटमध्ये तुम्हाला विकत मिळणार आहे.

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला मोटोरोला या फोनवर जवळपास 2500 रुपयांपर्यंत त्याची सूट मिळत आहे. आज आपण मोटोरोला फोनच्या काही चांगल्या फोनबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच तुम्ही एक्सचेंज ऑफर सोबत देखील हे फोन खरेदी करू शकता. हा डिस्काउंट तुमच्या जुन्या फोनचा ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असणार आहे.

मोटोरोला जी 85 5G

मोटोरोला जी 85 5G या फोनची 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणार आहे. ज्या मॉडेलची किंमत ही 17,999 रुपये एवढी असणार आहे. यावर तुम्हाला 1.5 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे. तसेच तुम्ही ॲक्सिस बँकेचे कार्ड वापरत असाल, तर यावर तुम्हाला पाच टक्के सूट मिळणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफर पर्यंत तुम्हाला 16500 आणि पर्यंत मिळू शकते. त्याचप्रमाणे या फोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचीचा फुल एचडी + डिस्प्ले मिळणार आहे. तसेच त्याचा फ्रंट कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असणार आहे.

मोटोरोला एज 50 प्रो 5G

मोटोरोला मध्ये तुम्हाला 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. या मोबाईलची किंमत 31 हजार 999 रुपये एवढे आहे. परंतु बँक ऑफरमध्ये या फोनवर तुम्हाला जवळपास 2500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच फ्लिपकार्ट ॲक्सिस बँकेच्या कार्डद्वारे जर तुम्ही पेमेंट केले तर तुम्हाला पाच टक्के कॅशबॅक देखील मिळणार आहे. म्हणजेच हा फोन तुम्ही एकूण 20, 300 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा डिस्प्ले देखील मिळणार आहे. तसेच कॅमेराचा मुख्य कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा असणार आहे तसेच कॅमेरा देखील 50 मेगापिक्सल असणार आहे. तुम्हाला 4500 एमएएचची बॅटरी मिळणार आहे. ही बॅटरी 125 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

मोटोरोला एज 50 फ्युजन

या फोन मध्ये तुम्हाला 12 GB रॅम आणि 256 इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. या मोबाईलची एकूण किंमत ही 24999 एवढी आहे. तसेच सेलमध्ये तुम्हाला 2500 पर्यंत डिस्काउंट मिळेल. तसेच फ्लिपकार्डच्या ॲक्सिस बँक कार्ड द्वारे तुम्हाला पाच टक्के कॅश बॅक मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन तुम्हाला एकूण 23,200 रुपयांना विकत मिळणार आहे. फोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे.

EPFO चा मोठा निर्णय ; कर्मचाऱ्यांना आधार सीडिंगमधून मिळणार सूट

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण भविष्य निर्वाह संघटनेचे म्हणजेच EPFO चे सदस्य असतात. त्यामुळे EPFO संदर्भात येणारी कोणतीही माहिती त्यांच्यासाठी महत्वाची असते. जर तुम्हीही या संघटनेचे सदस्य असला तर हि बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या संघटनेने आपल्या कर्मचाऱ्यांना आधार सीडिंगमधून सूट देणार असल्याचे सांगितले आहे . या सुटीमुळे कर्मचाऱ्यांना EPFO क्लेम सेटलमेंटसाठी आधार सीडिंगची (Aadhaar seeding) गरज भासणार नाही. त्यामुळे या बातमीमुळे अनेक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आधार सीडिंग

कर्मचाऱ्यांना EPFO क्लेम सेटलमेंटसाठी आधार सीडिंगची गरज भासणार नाही. यापूर्वी क्मेल करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आधारशी जोडणे बंधनकारक होते, पण आता EPFO ने या नियमात बदल करुन काही विभागातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पण हि सूट सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार नाही .

कर्मचाऱ्यांना आधार सीडिंगमधून सूट

या सुटीमध्ये आंतरराष्ट्रीय कामगारांचा समावेश आहे, म्हणजेच जे कामगार भारतात काम करून त्यांच्या देशात परतले आहेत आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही. अशा कामगारांसाठी आधार अनिवार्य असणार नाही. तसेच भारतीय नागरिक ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि ज्यांनी इतर कोणत्याही देशात जाऊन नागरिकत्व घेतले आहे, त्यांनाही आधार सीडिंगमधून सूट दिली जाईल. त्याचबरोबर या देशातील नागरिक जे भारतातील EPF&MP कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांमध्ये काम करतात, पण भारतात राहत नाहीत, त्यांच्यासाठी आधार आवश्यक नसेल.

पर्याय म्हणून इतर कागदपत्रांची निवड

आधारला पर्याय म्हणून काही इतर कागदपत्रांची निवड केली जाऊ शकते. या कागदपत्रांमध्ये पासपोर्ट, नागरिकत्व प्रमाणपत्र आणि नेपाळ व भूतानच्या नागरिकांसाठी नागरिकत्व प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. ईपीएफओच्या परिपत्रकानुसार ज्या कर्मचाऱ्यांकडे आधार नाही, त्यांच्या बाबतीत ड्यू डिलिजेन्स म्हणजेच सर्व तपास पूर्ण काळजीने केला जाईल. यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याचे सर्व तपशील योग्यरित्या रेकॉर्ड केले जातील आणि मंजूरी देण्यापूर्वी ऑफिस इन चार्ज (OIC) कडून त्याची खात्री केली जाईल. जर कर्मचाऱ्याची शिल्लक पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर बँक खाते देखील तपासले जाईल आणि त्याची खातरजमा संबंधित कंपनी किंवा मालकाकडून केली जाणार आहे.

EPFO चा निर्णय महत्त्वाचा

हा निर्णय आंतरराष्ट्रीय कामगार तसेच नेपाळ-भूतानच्या नागरिकांना मोठा दिलासा देणारा आहे. यामुळे त्यांचे क्लेम प्रक्रियेत अडथळे येणार नाहीत आणि त्यांना सहजतेने पैसे मिळू शकतील.