Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 36

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणांना 3000 रुपये मिळणार?? रक्षाबंधननिमित्त सरकारकडून खास भेट मिळण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातली पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये सरकार कडून जमा करण्यात येतात. आत्तापर्यंत १२ हप्ते या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात जमा झाले. आता जुलैच्या हप्ताची प्रतीक्षा महिलावर्ग करत आहे. मात्र महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकाच वेळी मिळतील असं बोललं जातंय.

यंदा ९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीण भाऊंच्या जिव्हाळ्याचा सण, उत्सव… या निमित्त महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) जूनच्या आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे मिळून ३००० रुपये सरकार देऊ शकते. रक्षाबंधन निमित्त सरकार कडून मिळालेली हि जणू भेटच असेल. मात्र अजून तरी कोणतीही अधिकृत घोषणा याबाबत सरकार कडून करण्यात आलेली नाही. परंतु मागच्या वर्षी रक्षाबंधनला २ महिन्याचे एकदम ३००० रुपये महिलांना मिळाले होते. त्यामुळे आताही असच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची रक्षाबंधन धुमधडाक्यात होऊ शकते.

योजनेतील पडताळणी स्थगित – Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ पात्र महिलांनाच मिळतोय का कि या योजनेचा चुकीचा वापर केला जातोय यासाठी राज्य सरकार कडून या योजनेची पडताळणी काही महिन्यापासून सुरु आहे. त्यानुसार, सरकारी कर्मचारी असलेल्या महिला, इनकम टॅक्स भरणाऱ्या महिला, चारचाकी असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. मात्र सरकारने आता हि पडताळणी स्थगित केल्याचं बोललं जातंय. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही सगळी प्रक्रिया थांबवल्याच्या चर्चा सुरु आहेत. आगामी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका लक्षात घेता ही छाननी प्रक्रिया जैसे थे आहे. या निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे. निवडणुका संपल्यानंतर सरकार छाननीबाबत पावले उचलण्याची शक्यता आहे.

OTT Apps Banned : केंद्र सरकारची मोठी कारवाई!! Ullu सह 25 अश्लील OTT प्लॅटफॉर्म बॅन

OTT Apps Banned

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन OTT Apps Banned। मोबाईल वरून अश्लील विडिओ बघणाऱ्या लोकांना केंद्र सरकारने दणका दिला आहे. सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लील आणि अनुचित कंटेंटवर मोठी कारवाई केली आहे. प्रसिद्ध अशा Ullu अँप सह २५ OTT प्लॅटफॉर्म सरकारने बॅन केले आहेत. या अॅप्सवर वापरकर्त्यांना अश्लील आणि बोल्ड कंटेंट दाखवल्याचा आरोप आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंटरनेट सेवा प्रदात्यांना (ISPs) भारतात या वेबसाइट्स आणि अॅप्स तात्काळ ब्लॉक करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

मंत्रालयाला असे आढळून आले की हे अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स आक्षेपार्ह जाहिराती आणि अश्लील सामग्री प्रसारित करत होते. हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स सातत्याने अश्लील कन्टेन्ट दाखवत आहे जे भारतीय संस्कृतीला न शोभणारे आहे. आणि भारतीय कायद्यांचे उल्लंघन करत होते. यानंतर, मंत्रालयाने त्या सर्वांवर कारवाई केली. सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (आयटी कायदा, २०००) आणि आयटी नियम, २०२१ (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) अंतर्गत या OTT अॅप्स आणि वेबसाइट्स बॅन केल्या आहेत. (OTT Apps Banned)

कोणकोणते अँप्स बॅन झाले? OTT Apps Banned

केंद्र सरकार कडून बॅन करण्यात आलेल्या अँप्स मध्ये ALTT, ULLU, Big Shots App, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab App, Kangan App, Bull App, Jalva App, Wow Entertainment, Look Entertainment, Hitprime, Feneo, ShowX, Sol Talkies, Adda TV, HotX VIP, Hulchul App, MoodX, NeonX VIP, Fugi, Mojflix आणि Triflicks या अॅप्सचा समावेश आहे. अनेक युवा तरुण मुले या अँपच्या माध्यमातून आणि वेबसाईट वरून अश्लील विडिओ बघतात. अशा व्हिडिओमुळे सामाजिक वातावरण बिघडते. लोकांच्या मनावर परिणाम होतो आणि गुन्हेगारीच्या घटनाही वाढतात. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत हे सर्व अँप बॅन केले आहेत.

Pune Ganpati Special Trains : पुण्याहून कोकणात 12 स्पेशल ट्रेन!! कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार?

Pune Ganpati Special Trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Ganpati Special Trains येत्या २७ ऑगस्टला गणेशोत्सव आहे. गणेशोत्सव म्हंटल कि मुंबई पुण्यासारख्या शहरात कामाला असणाऱ्या चाकरमान्यांची पाऊले हि आपल्या मूळगावी वळतातच. खास करून कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. साहजिकच कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्याही जास्त असते. मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही रखडलं असल्याने अनेक भाविक रस्ते मार्गाऐवजी रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनही यासाठी सज्ज झालं आहे. मुंबई पुण्यातून कोकणासाठी विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रेल्वेबाबत सांगणार आहोत जी पुण्याहून कोकणासाठी धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक कस आहे? ती कुठून कुठपर्यंत धावेल याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

आम्ही तुम्हाला ज्या ट्रेनबाबत सांगतोय ती आहे पुणे ते रत्नागिरी रेल्वे… कोकणातून पुण्याला कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त आलेल्या लोकांसाठी हि विशेष ट्रेन (Pune Ganpati Special Trains) सुरु करण्यात आली आहे. या स्पेशल रेल्वेमुळे गणेशोत्वाला पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा फायदा होणार आहे. मध्य रेल्वे वातानुकूलित आणि विना वातानुकूलित अशा १२ रेल्वेगाड्या पुणे रत्नागिरी मार्गावर चालवणार आहे.

सहा नॉन-एसी साप्ताहिक विशेष गाड्यांमध्ये ट्रेन क्रमांक ०१४४७ हि २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:२५ वाजता पुण्याहून निघेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०१४८८ त्याच तारखेला सायंकाळी ५:५० वाजता रत्नागिरीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५:०० वाजता पुण्यात पोहोचेल.

याव्यतिरिक्त, सहा एसी साप्ताहिक विशेष गाड्या सुद्धा धावतील. त्यामध्ये ट्रेन क्रमांक ०१४४५ ही एसी रेल्वे २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:२५ वाजता पुण्यातून निघेल आणि सकाळी ११:५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०१४४६ त्याच तारखेला सायंकाळी ५:५० वाजता रत्नागिरीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५:०० वाजता पुण्यात पोहोचेल. Pune Ganpati Special Trains

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा – Pune Ganpati Special Trains

या सर्वच्या सर्व १२ विशेष ट्रेन चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड या रेल्वे स्थानकांवर थांबतील.

Realme 15 Series : 7,000mAh बॅटरी, भन्नाट AI फीचर्ससह Realme ने लाँच केले 2 नवे 5G मोबाईल

Realme 15 Series

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Realme 15 Series । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme ने भारतीय बाजारपेठेत २ नवे ५G मोबाईल लाँच केले आहेत. Realme 15 Pro 5G आणि Realme 15 5G असं या दोन्ही स्मार्टफोनची नावे आहेत. दोन्ही स्मार्टफोनची खास बाब म्हणजे यामध्ये तब्बल 7,000mAh ची पॉवरफुल बॅटरी बसवण्यात आली आहे तसेच तुम्हाला AI फीचर्सचाही लाभ घेता येईल. आज आपण या दोन्ही मोबाईलचे खास स्पेसिफिकेशन आणि किमती याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Realme 15 5G –

Realme 15 5G मध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2,800×1,280 पिक्सेल रिझोल्युशन, 2,500Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट, 6,500 nits पर्यंत लोकल पीक ब्राइटनेस मिळतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i चे प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 7300+ चिपसेट बसवण्यात आली असून हा स्मार्टफोन Android 15-आधारित Realme UI 6 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. Realme 15 5G मध्ये 50-मेगापिक्सेल चा मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगलसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 7,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Realme 15 Series

किंमत किती-

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Realme 15 5G च्या ८ GB+ १२८ GB मॉडेलची किंमत २५,९९९ रुपये आहे. तर ८ GB + २५६ GB स्टोरेजची किंमत २७,९९९ रुपये आणि १२ GB + २५६ GB व्हेरिएंटची किंमत ३०,९९९ रुपये आहे.

Realme 15 Pro 5G- Realme 15 Series

Realme 15 Pro 5G मध्ये सुद्धा 144Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2,800×1,280 पिक्सेल रिझोल्युशन, 2,500Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट, 6,500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो. Realme 15 Pro 5G मध्ये Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन सुद्धा Android 15-आधारित Realme UI 6 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. फोटोग्राफीसाठी, Realme 15 Pro 5G मध्ये 50-मेगापिक्सेल Sony IMX896 मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेलचाच सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्येही पॉवरसाठी 7,000mAh बॅटरी असून हि बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Realme 15 Pro 5G ची च्या 8GB + 128GB स्टोरेज मोबाईलची किंमत 31,999 रुपयांपासून सुरू होते. तर ८ GB+ २५६ GB मॉडेलची किंमत ३३,९९९ रुपये, १२ GB + २५६ GB स्मार्टफोनची किंमत ३५,९९९ रुपये आणि १२ GB + ५१२ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३८,९९९ रुपये आहे (Realme 15 Series)

Realme 15 Pro 5G आणि Realme 15 5G या दोन्ही स्मार्टफोनमध्ये AI MagicGlow 2.0, AI Landscape, AI Glare Remover, AI Motion Control , AI Snap Mode, AI Edit Genie आणि AI Party सारखे फीचर्स मिळतात. हे दोन्ही मोबाईल हिरव्या आणि सोनेरी रंगात लाँच करण्यात आले आहेत. तुम्ही येत्या ३० जुलैपासून रिअलमी इंडिया वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून हे स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Mumbai Local Train : मुंबईकरांना केंद्राचे गिफ्ट!! 16200 कोटींचे 12 रेल्वे प्रकल्प मंजूर

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिले आहे. मुंबईकरांसाठी १६,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे १२ रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली. हे रेल्वे प्रकल्प या प्रदेशातील कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे सेवांचे सुरळीत ऑपरेशन आणखी वाढवतील असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.

लोकसभेत बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा (Mumbai Local Train) आणखी वाढविण्यासाठी सरकारने १६,२४१ कोटी रुपयांच्या १२ पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. भारतीय रेल्वे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर विशेष लक्ष केंद्रित करण्यावर भर देत आहे. त्यानुसार लोकल ट्रेनचे आधुनिकीकरण करणे, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी करणे यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. नवीन रेल्वे प्रकल्पांचा उद्देशच मुळात लोकलची गर्दी कमी करणे. लोकलच्या फेऱ्या वाढवणे आणि उपनगरीय प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करणे आहे असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.

कोणकोणत्या रेल्वे प्रकल्पाना मंजुरी – Mumbai Local Train

अनुक्रमांकप्रकल्पाचे नावलांबी (किमी)किंमत (रु. कोटींमध्ये)
1सीएसएमटी-कुर्ला पाचवी आणि सहावी लाईन (एमयूटीपी-II)17.5 891
2मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावी लाईन (एमयूटीपी-II)30919
3गोरेगाव-बोरिवली पासून हार्बर लाईनचा विस्तार
(एमयूटीपी-IIIA)
7826
4बोरिवली-विरार पाचवी आणि सहावी लाईन (एमयूटीपी-IIIA)262184
5विरार-डहाणू रोड तिसरी आणि चौथी लाईन (एमयूटीपी-III)643587
6पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर (एमयूटीपी-III)29.62782
7रोली-कळवा (उन्नत) उपनगरीय कॉरिडॉर लिंक
(एमयूटीपी-III)
3.3476
8कल्याण-आसनगाव चौथी लाईन (MUTP-IIIA)321759
9कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी लाईन (MUTP-IIIA)141510
10कल्याण-कसारा तिसरी लाईन67793
11नायगाव-जुईचंद्र डबल कॉर्ड लाईन6176
12निळजे-कोपर डबल कॉर्ड लाईन5338

या नव्या रेल्वे प्रकल्पांच्या मंजुरीनंतर आता मुंबईकरांचा प्रवास सुखद आणि आरामदायी होणार आहे. मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढणार आहे. परिणामी मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. तसेच गर्दीतून थोडीफार का होईना सुटका होणार आहे. खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफलाईन बदलणार आहे.

Mumbai Rain Updates : मुंबईला पावसाचा तडाखा!! अंधेरी सबवे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

Mumbai Rain Updates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Rain Updates मुंबईला आज मुसळधार पावसाचा तडाखा बसला. मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आज (25 जुलै) मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. सध्या अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली या पश्चिम द्रुतगती मार्गावरती धुव्वाधार पाऊस सुरु आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. अंधेरी सबवे ला नदीचे स्वरूप आलं असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावाच्या जोरदार बॅटिंगमुळे मुंबईकरांचे जीवन विस्कळीत झालं आहे. तसेच ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोठा फटका सहन करावा लागतोय.

कोणत्या भागात किती पाऊस- Mumbai Rain Updates

मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये आज सर्वाधिक ३५ मिमी पेक्षा जास्त तीव्रतेचा पाऊस पडला. अंधेरी येथील मालपा डोंगरी म्युनिसिपल स्कूलमध्ये फक्त एका तासात ३६ मिमी पाऊस पडला, त्यानंतर केडब्ल्यू वॉर्ड ऑफिसमध्ये ३० मिमी आणि केई वॉर्ड ऑफिसमध्ये २९ मिमी पाऊस पडला. चकाला म्युनिसिपल स्कूल (२८ मिमी), गोरेगावमधील आरे कॉलनी स्कूल (२७ मिमी) आणि जोगेश्वरी येथील एचबीटी स्कूल (२६ मिमी) यासारख्या इतर भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळकरी मुले, नोकरदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर पोचण्यास तारेवरची कसरत करावी लागतेय. दुसरीकडे पूर्व उपनगरात, भांडुपमधील टेंबीपाडा, विक्रोळी, विहार तलाव आणि टागोर नगरसारख्या इतर अनेक ठिकाणी १८ ते २० मिमी पावसाची नोंद झाली. (Mumbai Rain Updates)

दरम्यान, हवामान खात्याने आज कोकण, मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकणात मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात जोरदार पाऊस सुरु असून पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. . पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुण्याचा घाटमाथा, सातारा, बुलढाणा, या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार व विजांसह अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Ketaki Chitale On Marathi Language : मराठी बोललो नाही तर भोकं पडणार आहेत का? केतकी चितळे बरळली

Ketaki Chitale On Marathi Language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ketaki Chitale On Marathi Language । सध्या महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषा वाद पेटला आहे. महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोलावेच लागेल, अशी भूमिका मनसे, ठाकरे गट आणि इतर काही पक्षांनी घेतली आहे. मात्र आता यात मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने उडी घेतली आहे. फक्त उडीच घेतली नाही तर वादग्रस्त विधान करत पुन्हा एकदा टीकाकारांना आमंत्रण दिले आहे. मराठी बोललो नाही तर भोकं पडणार आहेत का? असं म्हणत केतकी चितळे हिने अकलेचे तारे तोडले आहेत. तिच्या या विधानानंतर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

केतकी चितळे नेमकं काय म्हणाली? Ketaki Chitale On Marathi Language

सोशल मीडियावर एक विडिओ पोस्ट करत केतकी चितळेने मराठीबाबत वादग्रस्त विधाने (Ketaki Chitale On Marathi Language) केली आहे. तसेच ठाकरे कुटुंबावरही आगपाखड केली आहे. लोकमराठीच्या वादातून आपली असुरक्षितता दर्शवत आहेत. ‘फक्त मराठीत बोल’ किंवा ‘तुला मराठी कसं येत नाही’ असा दबाव टाकला जात आहे. समोरची व्यक्ती मराठी बोलेल की नाही, याने मराठी भाषेचे नुकसान होणार आहे का? मराठी न बोलल्याने कोणाला भोकं पडणार आहेत का? अशा दबावातून तुम्ही फक्त स्वतःची असुरक्षितता दाखवत आहात. यामुळे कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही, असं केतकीने म्हंटल.

ती पुढे म्हणाली, अभिजात हा संस्कृत शब्द आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी भाषा ही स्वतंत्र असली पाहिजे, अन्य भाषेवर आधारित असू नये, अशी अट होती. मात्र मराठी, बंगाली आणि आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ही अट २०२४ मध्ये काढून टाकण्यात आली. आता अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर तो सगळ्याच भाषांना देऊन टाका असं माझं वैयक्तिक मत आहे. Ketaki Chitale On Marathi Language

ठाकरे कुटुंबावर टीका-

यावेळी केतकी चितळेने ठाकरे कुटुंबियांवरही टीका केली. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू स्कॉटिश मिशनरी ख्रिस्चन कॅथलिक स्कुल मध्ये शिकले ते चालते आणि तुम्ही सगळ्यांपुढे ज्ञान पाजळता कि मराठी बोलणे अनिवार्य आणि गरजेचं आहे.. आणि दुसरीकडे स्वतःची मुले मिशनरी शाळेत शिकतात. सामना वृत्तपत्रही स्वतःचे नाव बदलणार का? राज ठाकरे सामना हे नाव बदलायला लावणार का? कारण सामना हा पारसी शब्द आहे असं म्हणत केतकी चितळे हिने ठाकरेंना लक्ष्य केलं.

Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांना इतक्या दिवस सुट्ट्या मिळणार; केंद्राचा मोठा निर्णय

Government Employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Government Employees । सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ३० दिवसांची रजा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. वृद्ध पालकांची काळजी घेण्यासारख्या वैयक्तिक कारणांसाठी हि रजा घेण्यात येईल. केंद्रीय कामकाज राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत या निर्णयाची माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठं दिलासा मिळणार आहे. अनेकदा सरकारी कर्मचारी घरापासून लांब कामाला असल्याने आई वडिलांची काळजी घेणं त्यांना इच्छा असूनही शक्य होत नाही, कारण विषय सुट्टीचा असतो. परंतु आता हि चिंता मिटणार आहे.

किती सुट्ट्या मिळणार ? Government Employees

याबाबत मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हंटल कि, केंद्रीय नागरी सेवा नियम १९७२ अंतर्गत, दरवर्षी एका कर्मचाऱ्याला ३० दिवसांची अर्जित रजा दिली जाईल. याशिवाय, कर्मचाऱ्याला २० दिवसांची अर्धवेळ रजा, ८ दिवसांची कॅज्युअल रजा आणि २ दिवसांची मर्यादित रजा मिळते. या सर्व रजा कर्मचारी वैयक्तिक कारणांसाठी घेतात. ज्यामध्ये ते त्यांच्या पालकांची काळजी घेऊ शकतात तसेच त्यांची इतर अनेक वैयक्तिक कामे सुद्धा पूर्ण करू शकतात. Government Employees

दरम्यान, भारत तीन प्रकारचे लघु मॉड्यूलर रिअॅक्टर (एसएमआर) विकसित करत आहे. यामध्ये २०० मेगावॅट क्षमतेचे भारत स्मॉल मॉड्यूलर रिअॅक्टर (बीएसएमआर), ५५ मेगावॅट क्षमतेचे एसएमआर आणि ५ मेगावॅट क्षमतेचे उच्च तापमानाचे गॅस कूल्ड रिअॅक्टरचा समावेश आहे. यापैकी एक रिअॅक्टर हायड्रोजन उत्पादनासाठी असेल. भविष्यात ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप प्रभावी ठरू शकते आणि भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल अशी माहितीही डॉ. जितेंद्र सिंह यांनी सभागृहात दिली.

Extra Marital Affairs : लफडेबाजीत टॉपला आहे ‘हे’ शहर!! लग्नानंतर अफेअर्स करतातच

Extra Marital Affairs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Extra Marital Affairs । भारतात मागच्या काही दिवसापासून अनैतिक संबंधांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे तरी अफेयर्स आणि त्यातून होणाऱ्या खुनाच्या घटना बघायला मिळतायत. खास करून लग्नानंतर महिलांच्या अफेअर्स च्या गोष्टी चांगल्याच वाढलेल्या आहेत. घरात नवरा असतानाही दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध ठेवताना या महिलांना कसलीच भीती वाटत नाही. यामुळे देशाचं नाव सुद्धा खराब होत आहे. परंतु तुम्हाला माहितेय का? भारतातील कोणत्या शहरात सर्वात जास्त अनैतिक संबंधाच्या घटना घडतायत?? हे काय मुंबई, दिल्ली, बंगळुरू सारखं मोठं शहर नाही… तर तामिळनाडू राज्यातील एक लहान शहर आहे. आकाराने आणि लोकसंख्येने जरी लहान असलं तरी लफडेबाजीत मात्र हे शहर देशात टॉपला आहे.

आम्ही तुम्हाला ज्या शहराबद्दल सांगतोय त्याच नाव आहे कांचीपुरम…. विवाहबाह्य संबंधात (Extra Marital Affairs) हे शहर अग्रस्थानी आहे. डेटिंग वेबसाइट अ‍ॅशले मॅडिसनच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये कांचीपुरम १७ व्या स्थानावर होते, परंतु यावर्षी ते अचानक पहिल्या क्रमांकावर आले आहे. इथली सनम हि बेवफाच असते असं एकूण चित्र आहे.. त्यामुळे याठिकाणची महिला असो वा पुरुष लग्नानंतर अनैतिक संबंध ठेवण्याचे प्रमाण देशात एक नंबरला आहे. खरं तर मागच्या वर्षी या यादीत मुंबईचा पहिला क्रमांक होता, मात्र आता पण यावेळी मुंबईचे नाव टॉप 20 यादीतही नाही हि महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

लफडेबाजीत कोणकोणत्या शहरांचा समावेश –

कांचीपुरम
मध्य दिल्ली
गुरुग्राम
गौतम बुद्ध नगर
दक्षिण पश्चिम दिल्ली
डेहराडून
पूर्व दिल्ली
पुणे
बेंगळुरू
दक्षिण दिल्ली
चंदीगड
लखनऊ
कोलकाता
पश्चिम दिल्ली
कामरूप (आसाम)
उत्तर पश्चिम दिल्ली
रायगड
हैदराबाद
गाझियाबाद
जयपूर

अनैतिक संबंध का वाढलेत?

आजकाल अनैतिक संबंध (Extra Marital Affairs) वाढण्यामागे काही कारणे आहेत. मनाविरुद्ध लग्न करणे, नवऱ्याला असलेले व्यसन, शारीरिक आणि मानसिक त्रास, जुने प्रेमप्रकरण, पैशासाठी इतर पुरुषासोबत संबंध प्रस्तावित ठेवणे, अशा अनेक कारणांनी आजकाल देशातील अनैतिक संबंधांच्या घटना वाढत आहेत. कायद्यानुसार, विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नाही. सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये आयपीसीचे कलम 497 हे असंवैधानिक घोषित केले. आणि प्रौढांमधील संमतीने झालेले संबंध गुन्हा मानले जाऊ शकत नाहीत, असे नमूद केले. मात्र, हे संबंध घटस्फोटाचे निमित्त ठरू शकते.

Private Railway Station In India : देशातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन!! मिळतात या खास सुविधा

Private Railway Station In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Private Railway Station In India । भारतात रेल्वेचे जाळे प्रचंड आहे. कमी पैशात आणि आरामदायी प्रवास होत असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. महत्वाची बाब म्हणजे रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. मागच्या काही वर्षात तर रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. वंदे भारत ट्रेन, नमो भारत एक्सप्रेस, मेट्रो ट्रेन, मोनोरेल अशा नवनवीन आणि आधुनिक ट्रेन रेल्वेच्या ताफ्यात आल्या आहेत. दुसरीकडे अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून अनेक रेल्वे स्थानकांचाही चेहरामोहरा बदलला आहे. खरं तर भारतीय रेल्वे आणि स्टेशन्स हे केंद्रीय रेल्वे मंत्रालय अर्थात केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात. परंतु देशात असेही एक रेल्वे स्थानक आहे जे खासगी आहे. हे रेल्वे स्टेशन नेमकं कुठे आहे? यामध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात ते आपण जाणून घेऊयात.

देशातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन (Private Railway Station In India) हे काय मुंबई, पुणे दिल्ली किंवा कोलकाता सारख्या मोठ्या शहरात नाही तर भोपाळ मध्ये आहे. हबीबगंज रेल्वे स्टेशन असं या स्थानकाचे नाव आहे. हे स्टेशन सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत चालवले जात आहे. हबीबगंज रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास बन्सल ग्रुपने भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ (IRSDC) च्या सहकार्याने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी हबीबगंज रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. यानंतर या स्थानकाचे नामांतर राणी कमलापती रेल्वे स्टेशन केलं. स्टेशन कोड सुद्धा HBJ वरून RKMP मध्ये बदलण्यात आला.

कोणकोणत्या सुविधा मिळतात ? Private Railway Station In India

या रेल्वे स्टेशनवर 5 प्लेटफॉर्म, 6 ट्रॅक आहेत. पुनर्विकास केल्यानंतर अगदी विमानतळासारखी सुविधा याठिकाणी पाहायला मिळते. रिटेल दुकाने, फूड कोर्ट/कॅफे, आरामदायी वेटिंग लाऊंजसारख्या सुविधा या रेल्वे स्टेशनवर मिळतात. एस्कलेटर्स, लिफ्ट, ट्रॅव्हेलेटर; ब्रेल टाईमटेबल, दिव्यांगांसाठी सुविधा देण्यात आल्यात. सुरक्षेसाठी 160 CCTV कॅमेरा, SCADA स्वयंचलित मॉनिटरिंग, अग्नि सुरक्षा यंत्रणा तैनात आहेत. तसेच 300 कार, 850 दुचाकींसाठी भलीमोठी जागा आहे. हे रेल्वे स्थानक खाजगी कंपनीकडून चालवले जात असले तरी, मालकी भारतीय रेल्वेकडेच राहते हे मात्र याठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे.