Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 353

14 डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट करता येणार आधार कार्ड ; अशा प्रकारे करा प्रक्रिया

Adhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे. आपल्याला कोणतेही सरकारी काम करायचे असेल किंवा इतर कोणतेही काम करायचे असेल, तर आधार कार्ड खूप गरजेचे असते. कारण आधार कार्ड हे आपले ओळखीचे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. अनेक वेळा आपल्याला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सांगितले जाते. परंतु जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत मोफत हे आधार कार्ड अपडेट करू शकताम ज्या लोकांनी दहा वर्षापूर्वी आधार कार्ड बनवले आहे. आणि त्यामध्ये आजपर्यंत कोणतेही अपडेट केलेले नाही. त्यांच्यासाठी अपडेट करणे खूप गरजेचे आहे.

यामध्ये तुमचे नाव, फोटो, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी यांसारख्या गोष्टी अपडेट करता येणार आहेत. तुम्ही जर 14 डिसेंबर पर्यंत हे अपडेट केले तर तुम्हाला मोफत अपडेट करता येईल. परंतु 14 डिसेंबर नंतर तुमच्याकडून यासाठी पैसे आकारले जाणार आहेत. आधार कार्ड अपडेट तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील करू शकता. तुम्ही घरबसल्या माय आधार पोर्टलवर लॉगिन करून ते आधार कार्ड अपडेट करू शकता. तसेच ऑफलाइन पद्धतीने तुम्ही जवळच्या आधार केंद्र वर जाऊन देखील अपडेट करू शकता. ऑफलाइनमध्ये तुम्हाला 50 रुपये शुल्क आकारले जाईल. तुम्ही दर दहा वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे खूप गरजेचे आहे.

ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड कसे अपडेट करावे

  • आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला माय आधारच्या अधिकृत वेबसाईटला भेटते वेळ द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. आणि ओटीपी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर येईल तो ओटीपी तिथे टाकावा लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर यामध्ये तुमचे नाव पत्ता फोटो यांसारख्या अपडेटचा पर्याय दिसेल.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
  • साईज पर्यंतचा फोटो अपलोड करायचा आहे
  • या ऑनलाइन प्रक्रियेसाठी पैसे देखील आकारले जाणार नाही
  • मला अपडेट रिक्वेस्ट नंबर दिला जाईल या पद्धतीने तुम्ही ट्रॅक करू शकता.

ऑफलाइन पद्धतीने आधार कार्ड कसे अपडेट करावे?

  • यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल.
  • तिथे गेल्यानंतर तुम्ही आधार सेंटरवर एक फॉर्म भरावा लागेल.
  • आणि आधार नंबर आणि तुमची वैयक्तिक माहिती द्या.
  • यासाठी तुमच्याकडून 50 रुपये शुल्क आकारले जाईल

IRCTC कडून पर्यटकांसाठी नववर्षची भेट ! कमी किंमतीत फिरा बँकॉक, पटाया

irctc bankok

तुम्हीही हिवाळ्यात कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. कारण IRCTC ने अप्रतिम टूर पॅकेज लॉन्च केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला थायलंडच्या सुंदर ठिकाणांना स्वस्तात भेट देण्याची संधी मिळत आहे. या देशाची संस्कृती आणि खाद्यपदार्थ मोठ्या संख्येने लोकांना आकर्षित करतात, याशिवाय तुम्हाला येथे अनेक सुंदर समुद्रकिनारेही पाहायला मिळतील.

IRCTC तुम्हाला स्वस्त टूर पॅकेजसह अनेक सुविधांचा लाभ देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की टूर पॅकेज 29 डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे. टूर पॅकेजची अधिक माहिती आम्हाला कळवा.

कसे असेल शेड्युल

IRCTC ने या टूर पॅकेजला NEW YEAR GET Away – THAILAND DELIGHTS EX BENGALURU असे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच हे टूर पॅकेज खास नवीन वर्षासाठी लाँच करण्यात आले आहे. त्याचा पॅकेज कोड SBO5 आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक उत्तम सुविधा देखील मिळत आहेत.

हे फ्लाइट टूर पॅकेज आहे. लोकल प्रवासासाठी एसी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय राहण्यासाठी थ्री स्टार हॉटेल आणि नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी तीन प्रकारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

किती येईल खर्च ?

पॅकेज अंतर्गत प्रवास करताना तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. IRCTC तुमच्या जेवणाची आणि निवासाची हॉटेल व्यवस्था करेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला विम्याची सुविधाही मिळत आहे. जर आपण भाड्याबद्दल बोललो, तर तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला 79,250 रुपये भाडे द्यावे लागेल. दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती भाडे 68,500 रुपये आहे. जर तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुमचे प्रति व्यक्ती भाडे ६८,५०० रुपये आहे.

बापरे ! सर्जरी करताना महिलेच्या पोटात राहिला टॉवेल; समजताच महिलेने घेतली कोर्टात धाव

Doctors

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राजस्थान मधील जोधपुरमधून एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आलेला आहे. काही दिवसापूर्वी डॉक्टरांनी जिवंत असणाऱ्या तरुणाला मृत घोषित केले होते. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ही घटना राजस्थान मधील आहे. गर्भवती महिलेचे सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी झाली. त्यावेळी तिची शस्त्रक्रिया केली. परंतु डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एक मोठी घटना घडलेली आहे. सर्जरी केल्यानंतर डॉक्टरांनी टाके देखील घातले. परंतु शस्त्रक्रिया दरम्यान वापरण्यात आलेला टॉवेल महिलेच्या पोटात राहिला. हे डॉक्टरांच्या संपूर्ण टीमला समजले नाही.

त्या महिलेची डिलिव्हरी झाल्यानंतर सतत महिलेच्या पोटात दुखत होते. तिने अनेक वैद्यकीय उपचार घेतले. परंतु तिच्या पोटात गाठ आली आहे. असे तिला सांगण्यात आले. शेवटी तिने जोधपूर येथील डॉक्टरांनी तपासणी केली. त्यावेळी त्या महिलेच्या पोटात टॉवेल दिसत होता. परंतु हे समजल्यानंतर त्या महिलेने कोर्टात धाव घेतलेली आहे.

या घटनेची सुरुवात एक जुलैपासून झाली होती. ती महिला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात गेली होती. डिलिव्हरी झाल्यानंतर सतत तिच्या पोटात वेदना होत होत्या. त्यानंतर तिने खाजगी रुग्णालयात देखील उपचार घेतले. परंतु प्रत्येक वेळीला पोटात गाठ असल्याची समस्या सांगून घरी पाठवण्यात आले होते. सर्जरी करताना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्या तरुणीच्या जीवावर बेतेल असा प्रसंग घडलेला आहे. जोधपूर येथील एम्स रुग्णालयात सिटीस्कॅन आणि अल्ट्रासाउंडमध्ये त्या महिलेच्या पोटात टॉवेल असल्याचे स्पष्ट दिसलेले आहे. महिलेच्या पोटात बरेच दिवस टॉवेल असल्याने नुकसान झालेले आहे. त्यामुळे त्या महिलेला पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे.

BSNL चा जबरदस्त Plan ! 200 दिवस मोफत कॉलिंग, Jio ,Airtel चे महागडे Plan सोडून द्याल !

bsnl plan

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने देशभरात 50 हजार नवीन 4G टॉवर लावले आहेत, त्यापैकी 41 हजारांहून अधिक टॉवर आता कार्यरत आहेत. बीएसएनएल पुढील काही महिन्यांत आणखी 50 हजार टॉवर्स बसवण्याचा विचार करत आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत संपूर्ण देशात BSNL 4G सेवा सुरू करणार असल्याचे कम्युनिकेशन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले आहे.

BSNL चा एक स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे, ज्याची किंमत फक्त ₹ 999 आहे. या प्लॅनची ​​वैधता 200 दिवसांची आहे, म्हणजे अंदाजे 7 महिने. या प्लॅनमध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करू शकता, मात्र या प्लानमध्ये डेटा उपलब्ध नाही. हा प्लॅन त्यांच्यासाठी चांगला आहे जे फोन फक्त कॉल करण्यासाठी वापरतात.

BSNL चा आणखी एक स्वस्त प्लॅन आहे, ज्याची किंमत ₹ 997 आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. याशिवाय दररोज 2GB डेटा आणि 100 SMS मिळतात. या प्लॅनची ​​वैधता 160 दिवसांची आहे. ज्यांना कॉलिंगसोबत डेटाची गरज आहे त्यांच्यासाठी हा प्लान चांगला आहे. Jio, Airtel आणि Vodafone Idea सारख्या खाजगी कंपन्या इतक्या लांबलचक वैधतेसह प्लॅन ऑफर करत नाहीत.

जिओचा 999 रुपयांचा प्लॅन देखील आहे, ज्याची वैधता 98 दिवस उपलब्ध आहे. पण तो 200 दिवसांपेक्षा खूपच कमी आहे. पण या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS मिळतात.

भारताची दूरसंचार नियामक संस्था TRAI ने सर्व दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या वेबसाईटवर त्यांच्या नेटवर्क पोहोच क्षेत्राचा नकाशा दाखवण्याचे आदेश दिले आहेत. हा नकाशा दर्शवेल की कोणत्या भागात कोणत्या 2G, 3G, 4G आणि 5G सेवा उपलब्ध आहेत. याद्वारे लोकांना त्यांच्या भागात कोणती नेटवर्क सेवा उपलब्ध आहे हे कळेल.

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पॅनकार्डमध्ये होणार मोठा बदल

Pan Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पॅन कार्ड हे अत्यंत महत्वाचे असे कागदपत्र आहे.तुम्हाला कर्जासाठी अर्ज करायचा असेल किंवा बँक खाते उघडायचे असेल, फ्लॅट घ्यायचा असेल किंवा प्रॉपर्टी घ्यायची असेल… पॅन कार्ड हे आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. सरकारने या पॅन कार्डमध्ये मोठे बदल केले आहेत. सोमवारी झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. यासाठी सरकार 1435 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे केंद्रीय मंत्री अश्वी वैष्णव यांनी सांगितले. नवीन पॅन कार्ड हे सध्याच्या पॅन कार्डपेक्षा खूप प्रगत असेल 10 अंकी पॅन कार्ड हे आयकर विभागाकडून जारी केलेले दस्तऐवज आहे. ते अधिक प्रगत करून, सरकारला ते अधिक चांगले आणि सुरक्षित बनवायचे आहे. डिजिटल सुरक्षा मजबूत करणे आणि फसवणूक आणि डेटा चोरीची शक्यता कमी करणे हा त्याचा उद्देश आहे.

नवीन पॅनकार्ड जुन्या पेक्षा बरेच वेगळे असेल. नवीन पॅन कार्ड QR कोड असतील. यासाठी पेपरलेन म्हणजेच ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब केला जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी लोकांना वेगळे पैसे खर्च करावे लागणार नाहीत, लोकांना क्यूआर कोड असलेल्या पॅनसाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही. स्कॅनर बसवलेल्या नवीन पॅन कार्डमध्ये डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल. लोकांना क्यूआर कोडसह पॅनसाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही.

पॅन कार्ड 2.0 किती वेगळे असेल?

केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन पॅन कार्डला मंजुरी दिली, सरकारने पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पॅन कार्ड अधिक सुरक्षित करणे आणि करदात्यांच्या कायम खाते क्रमांक (पॅन) सर्व सरकारी संस्थांसाठी ‘सामान्य व्यवसाय ओळखकर्ता’ बनवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यासोबतच पॅनकार्डच्या चांगल्या दर्जासोबतच त्याची सेवा अधिक सोपी आणि जलद करावी लागेल. नवीन पॅनकार्ड जुन्या पॅनकार्डपेक्षा बरेच वेगळे असेल. नवीन पॅन कार्ड म्हणजेच पॅन 2.0 मध्ये, कार्ड QR कोडसह जारी केले जाईल.

आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण ; गुंतवणुकीसाठी चांगली संधी ; जाणून घ्या दर

gold rate 13-11-24

मागच्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सतत चढ उतार होताना दिसत आहे. केवळ दागिने म्हणून नाही तर सोने गुंतवणूकीचा देखील चांगला पर्याय मनाला जातो. म्हणूनच ग्राहकांचा कल सोने खरेदीकडे दिसून येतो. सोन्याचा दर प्रति तोळा 1 लाखांपर्यंत जाणार असल्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे.

या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. तर आज सलग आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आज 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 13,100 रुपयांची घसरण झाली आहे. तर 22 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 12,000 रुपयांची घसरण झाली आहे. चला जाणून घेऊया आजचे 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दहा आणि एक ग्रॅम चे दर काय आहेत.

22 कॅरेट

आज एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 7,080 रुपये इतका आहे. हाच दर काल 7200 इतका होता. म्हणजेच आज एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 120 रुपयांची घसरण झाली आहे. तर आज दहा ग्रॅम सोन्याचा 22 कॅरेटचा दर 70,800 रुपये इतका आहे. हाच दर काल 72 हजार रुपये इतका होता म्हणजेच आज दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 1200 रुपयांची घसरण झाली आहे.

24 कॅरेट

24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,724 रुपये इतका आहे. हाच दर काल 7855 इतका होता. म्हणजेच आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 131 रुपयांची घसरण झाली आहे. तर आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 77 हजार 240 रुपये इतका आहे हाच दर काल 8 हजार 550 रुपये इतका होता. म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दारामध्ये 1310 रुपयांची घवघवीत घसरण झालेली दिसून येत आहे.

चांदीच्या दरात घसरण

आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचे दिसत आहे. दहा ग्रॅम चांदी आज 20 रुपयांनी स्वस्त होऊन 895 वर आली आहे. तर शंभर ग्राम चांदी दोनशे रुपयांनी घसरून 8950 रुपयांवर आली आहे. याशिवाय एक किलो चांदीचा दर आज 89,500 इतका झाला आहे.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात घर घेण्यासाठी मोजावे लागतील एवढे पैसे ; जाणून घ्या नवीन रेट

Home In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे हे शहर झपाट्याने वाढताना दिसत आहे. पुण्याला विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असे म्हटले जाते. त्यामुळे अनेक लोक हे शिक्षणासाठी तसेच कामासाठी पुण्यामध्ये स्थलांतर करत आहेत. त्यामुळे पुण्यात येणाऱ्यांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. जेव्हा नवीन लोक कुठल्याही शहरात जात असतात, त्यावेळी तेथील घरांची मागणी सगळ्यात जास्त वाढत असते. परंतु आता पुण्यामध्ये नक्की या घरांची मागणी किती वाढलेली आहे? आणि शहराच्या मध्यवर्ती भागात जर तुम्ही पुण्यामध्ये घर खरेदी करायचे असेल तर किती पैसे मोजावे लागतील हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पुण्यातील मध्यवर्ती समजला जाणारा भाग म्हणजे डेक्कन परिसर. या शहरातील या मध्यवर्ती परिसरात आपले स्वतःचे हक्काचे घर असावे. अशी अनेकांची इच्छा असते. परंतु जर तुम्हाला या भागात घर घ्यायचे म्हटले, तर या घराच्या किमती जवळपास 2.5 कोटींच्या पुढे गेलेल्या आहेत. डेक्कन या भागामध्ये इतर अनेक सोयीसुविधा आहेत. विविध शाळा आहेत. कॉलेज आहेत तसेच व्यावसायिक दृष्ट्या देखील डेक्कन हा भाग अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे डेक्कन मधील घराच्या किमती आता करोडोच्या घरात गेलेले आहेत.

त्याचप्रमाणे पुणेचे रिअल इस्टेट मार्केट देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यात घरी घेण्याची लोकांची इच्छा असते परंतु घराच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत की, सर्व सामान्य लोकांना पुण्याच्या मध्यवर्ती भागात घर घेणे परवडत नाही. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आहे. यामध्ये मेन्ट्रो स्टेशन अनेक सुविधा शिक्षण, आयटी कंपन्यांमुळे या ठिकाणी घराचे रेट वाढलेले आहेत. तुम्हाला जर पुण्यातील डेक्कन परिसर शिवाजीनगर भागात घर घ्यायचे असेल तर 2 बीएचके फ्लॅटची किंमत 1.5 कोटी रुपये एवढी आहे. तर 3 बीएचके घराची किंमत ही 2.5 कोटींच्या घरात गेलेली आहे..

या ठिकाणी डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोकांचा कल हा या ठिकाणी राहण्यात जास्त असतो. त्यामुळे लोकांच्या मागणीत देखील वाढ होईल झालेली आहे. परंतु या ठिकाणी घर घ्यायचे असेल, तर तुम्हाला खूप मोठी रक्कम मोजावी लागते. जर तुम्ही देखील या ठिकाणी घर घेण्याचा विचार करत असाल तर त्या आधी तेथील सगळ्या किमती आणि इतर गोष्टींची माहिती करूनच घर घेण्याचा निर्णय घ्या.

तुमचे ट्रेन तिकीट कन्फर्म होईल की नाही ? ‘या’ रेल्वे कोडवरून समजेल , जाणून घ्या

railway ticket

भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. म्हणूनच भारतीय रेल्वेला लाइफलाइन देखील म्हटले जाते. विशेषतः सण उत्सवांच्या काळात तसेच सलग सुट्टीच्या काळात रेल्वेला खूप गर्दी असते. ही गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून अतिरिक्त गाड्यांची सोय सुद्धा केली जाते. अशा वेळी अनेकदा तिकीट कन्फर्म झाले की नाही हे काळत नाही. मात्र आजच्या लेखात आम्ही तुम्हाला रेल्वे तिकिटांवर असलेल्या एका कोड विषयी सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या तिकीटाची स्थिती नेमकी काय आहे ? हे कळू शकते. चला तर मग जाणून घेऊया …

रेल्वेच्या तिकिटावर RLWL,PQWL,GNWL,TQWL असे काही कोड लिहिलेले असतात. जर तुम्ही घेतलेले तिकीट निरखून आणि लक्ष पूर्वक पहिले तर तुम्हाला हे कोड अगदी सहज दिसू शकतील. या प्रत्येक कोडचा एक अर्थ असतो. यावरून तुमचे तिकीट कन्फर्म आहे किंवा नाही ? तुमच्या तिकीटाची स्थिती समजू शकते.

कोड आणि त्याचे अर्थ

  • जर तुमच्यावर तिकिटावर RLWL (रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट) लिहिलेले असेल, तर तुमचे वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
  • तुमच्या वेटिंग तिकिटावर PQWL (पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट) लिहिलेले असेल, तर तुमचे वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कमी असते.
  • त्याच वेळी, जर तुमच्या तिकिटावर GNWL (जनरल वेटिंग लिस्ट) लिहिलेले असेल तर याचा अर्थ तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता खूप जास्त आहे.
  • त्याचप्रमाणे, जर तुमच्या तिकिटावर TQWL (तत्काळ कोटा वेटिंग लिस्ट) लिहिलेले असेल, तर तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

मृत्यूनंतर व्यक्तीच्या आधार आणि पॅन कार्डचे काय करावे? जाणून घ्या सरकारी नियम

Adhard Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड तसेच मतदार ओळखपत्र या अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुम्हाला कोणतेही सरकारी काम करायचे असेल तर ही ओळखीची कागदपत्रे असणे खूप गरजेचे असतात. ही कागदपत्रे तुम्हाला सरकारद्वारे दिली जातात. आपण भारतातील रहिवासी आहोत तसेच आपल्या ओळखीचा पुरावा या कागदपत्रांमध्ये असतो. या ओळखपत्रावर आपला फोटो, लिंग, जन्मतारीख आपला फोन नंबर, तसेच पत्ता यांसारख्या गोष्टी असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे ही कागदपत्र असणे खूप गरजेचे आहे.

परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यावेळी त्यांच्या या कागदपत्रांचे नक्की काय होते? हे आज आपण जाणून घेणार आहोत. अनेक वेळा जर व्यक्ती हयात नसेल, तर त्या व्यक्तीच्या कागदपत्रांचा अनेक लोक चुकीचा वापर करतात. आधार कार्डवर एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो. अनेक लोक पत्त्याच्या पुरावासाठी हे वापरतात. आधार कार्ड अनेक प्रत्येक कामामध्ये आपल्याला उपयोगी पडते.

आधार कार्ड हे रद्द करण्याची तरतूद कुठेही दिलेली नाही. त्याचप्रमाणे मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड असणे देखील गरजेचे नाही. परंतु त्या मृत व्यक्तीच्या आधार कार्डचा चुकीचा वापर होणार नाही. याची काळजी त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घेणे खूप गरजेचे असते. त्याचप्रमाणे बँक आणि डिमॅट खाती घालवण्यासाठी आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक असते.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर त्या व्यक्तीचे पॅन कार्ड हे सरेंडर करणे देखील बंधनकारक नाही. परंतु मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना त्या आधार कार्डची तसेच पॅन कार्डची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अन्यथा अनेक लोक त्याचा चुकीचा वापर करू शकतात. परंतु मतदार ओळखपत्र बाबत हा नियम नाही. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर त्याचे मतदान ओळखपत्र करण्याची प्रक्रिया आ.हे 1966 च्या मतदार नोंदणी नियमानुसार मृत व्यक्तीचे मतदार ओळखपत्र हे रद्द केले जाते.

आयुष्मान भारत कार्डसाठी पात्रता कशी तपासावी? जाणून घ्या प्रक्रिया

Ayushman Bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांना झालेला आहे. सरकारने आता नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी देखील घेतलेली आहे. यासाठी सरकारने आयुष्यमान भारत योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षाला पाच लाख रुपये पर्यंतचा उपचार अगदी मोफत मिळत आहे. परंतु यासाठी तुमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असणे गरजेचे आहे. पण या कार्डसाठी आपण पात्र आहे की नाही? हे कसे ओळखावे. आजकाल लोकांच्या बद्दलत्या जीवनशैलीमुळे विविध प्रकारचे आजार देखील वाढत चाललेले आहेत. आणि सर्वसामान्य लोकांना या आजारांचे निदान करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणूनच देशातील मृत्यूदर देखील वाढलेला आहे

देशातील नागरिकांचा विचार करूनच आता भारत सरकार त्यांना मोफत आरोग्य विमा योजना देत आहे. भारत सरकारने 2018 साली ही प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत करोडो नागरिकांना लाभ झालेला आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही पात्रता निश्चित करून दिलेल्या आहेत. तुम्ही जर त्या पात्रतेत बसत असाल तरच तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवता येईल.

पात्रता कशी तपासायची?

जर तुम्हाला देखील प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला या योजनेअंतर्गत पात्रता तपासावी लागेल.यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन होम पेजच्या वरच्या बाजूला तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.

त्यानंतर तुम्हाला मी पात्र आहे का असा पर्याय दिसेल तुम्ही त्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर लाभार्थीवर क्लिक करावे आणि खाली एक कॅपच्या कोड दिला असेल. तो टाकावा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा व तुमच्या मोबाईल नंबर एक ओटीपी येईल. तो ओटीपी देखील तुम्हाला तिथे टाकावा लागेल.

त्यानंतर तुम्ही या स्कीममध्ये लॉगिन करू शकता. तुम्हाला काही पर्याय मिळतील. ज्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा यांसारखे पर्याय निवडायचे आहेत. आणि सर्च बार ऑप्शन मध्ये तुम्हाला आधार निवडावा लागेल. तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून सर्चवर क्लिक करावे लागेल. आणि त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला समजेल.

आयुष्मान कार्ड घरबसल्या बनवता येते

तुम्ही जर हे आयुष्मान भारत कार्ड बनवण्यास पात्र असाल तर तुम्ही घरबसल्या देखील हे कार्ड बनवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आयुष्मान ॲप डाऊनलोड करावे लागेल. आणि लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासावे लागेल. त्यानंतर आधारित एक केवायसी करावे लागेल. ही केवायसी केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर आयुष्मान कार्ड दिसेल ते तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकता.