Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 354

वुलन कपड्यांवर हट्टी डाग? ‘या’ सोप्या पद्धतींनी स्वच्छ करा, एकही धागा बाहेर येणार नाही.

tips and tricks

थंडीपासून बचाव करण्यासाठी ठेवणीतून लोकरीचे कपडे हमखास काढले जातात. उन्हाळ्यात रोज परिधान केल्या जाणाऱ्या कपड्यांपेक्षा लोकरीचे कपडे वेगळे असतात. सामान्य कपड्यांप्रमाणे लोकरीच्या कपड्यांवरही डाग येऊ शकतात, परंतु ते साफ करणे इतके सोपे नसते कारण ते खूप मऊ असते आणि त्याचे धागे बाहेर येण्याची भीती असते. जर तुम्ही सामान्य कपड्यांसारखे धुतले तर तुमचे हिवाळ्यातील कपडे खराब होतील. चला जणूं घेऊया लोकरीचे कपडे धुण्यासाठीचे खास टिप्स

लोकरीचे कपडे सौम्य असतात. त्यांची साफसफाई करताना काळजी न घेतल्यास त्यांचा रंग फिका पडून ते फुटू शकतात. जर तुम्हाला तुमचे डाग पडलेले स्वेटर किंवा लोकरीचे कपडे स्वच्छ करायचे असतील तर प्रथम ते पाण्याने चांगले धुवा. जेव्हाही एखादा डाग दिसतो, तेव्हा तो ताबडतोब धुण्याचा प्रयत्न करा, कारण एकदा डाग फॅब्रिकमध्ये घुसला की तो साफ करणे कठीण होऊ शकते.

कोमट पाणी

लोकरीचे कपडे खूप नाजूक असतात, त्यामुळे लोकरीचे कपडे धुण्यासाठी डिटर्जंट वापरू नका. डिटर्जंट हिवाळ्यातील पोशाखांच्या फॅब्रिकचे नुकसान करू शकते. डाग साफ करण्यासाठी, कोमट पाणी आणि मऊ धुण्याचे द्रव वापरा आणि हलक्या हाताने घासून घ्या.

व्हाईट व्हिनेगर

डाग घालवण्यासाठी व्हाईट व्हिनेगरचाही वापर केला जाऊ शकतो. पाण्यात पांढरा व्हिनेगर घालून एक उपाय तयार करा आणि डाग असलेल्या भागावर लावा, ते घासून हलक्या हाताने स्वच्छ करा.

बेकिंग सोडा

याशिवाय तुम्ही पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करून त्याची घट्ट पेस्ट डागांवर लावू शकता. ही पेस्ट डागावर 10-15 मिनिटे राहू द्या आणि स्वच्छ करा. धुतल्यानंतर नेहमी लोकरीचे कपडे हवेत पूर्णपणे कोरडे होऊ द्या.

जिओ युजर्सला मोठा दिलासा! आता स्पॅम कॉल आणि मेसेज अशाप्रकारे करा ब्लॉक

Jio Users

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्हीही स्पॅम कॉलला कंटाळले असाल आणि तुम्हाला स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून मुक्त होण्याचा मार्ग हवा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत. तुम्ही जर जिओ यूजर असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता या स्पॅम कॉल आणि मेसेजपासून तुम्हाला कायमची सुटका मिळणार आहे.

MyJio ॲपद्वारे तुम्ही एका क्लिकवर स्पॅम कॉल्स थांबवू शकता. ही एक अतिशय सोपी पद्धत आहे. यासह, काही जाहिरात कॉल्स येण्यासाठी हे कॉल्स अर्धवट ब्लॉक करण्याचा पर्याय देखील आहे. यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया फॉलो करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला स्पॅम कॉल्सपासून आराम मिळेल. देशात स्पॅम कॉल आणि एसएमएसमुळे दररोज लोकांची फसवणूक होत आहे, या पार्श्वभूमीवर टेलिकॉम कंपन्या यूजर्सच्या सुरक्षेसाठी नवीन फीचर्स देत आहेत.

असा फायदा मिळेल

जिओ नेटवर्कवर स्पॅम कॉल आणि एसएमएस थांबवण्यासाठी तुम्हाला डू नॉट डिस्टर्ब (DND) सेवेचा पर्याय सक्षम करावा लागेल. या छोट्या सेटिंगसह, तुम्ही स्पॅम कॉल आणि एसएमएस तसेच टेलीमार्केटिंग कॉल्स नियंत्रित आणि ब्लॉक करू शकता. वापरकर्त्यांची इच्छा असल्यास, ते ब्लॉक करण्यासाठी कॉल आणि संदेशांची श्रेणी निवडून आणि त्यांना फिल्टर करून DND सेवा सानुकूलित करू शकतात. बँकिंग, रिअल इस्टेट, शिक्षण, आरोग्य, पर्यटन इत्यादी पर्याय आहेत.

अशाप्रकारे ब्लॉक करा स्पॅम कॉल

  • स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी तुम्हाला फक्त My Jio ॲप उघडावे लागेल.
  • यानंतर ‘More’ वर क्लिक करा.
  • नंतर खाली डू नॉट डिस्टर्ब वर क्लिक करा.
  • तुम्हाला फुली ब्लॉक केलेले, प्रमोशनल कम्युनिकेशन ब्लॉक केलेले आणि कस्टम प्रेफरन्स असे पर्याय दिसतील.
  • तुम्ही पूर्णपणे ब्लॉक केलेला पर्याय सक्षम केल्यास, बनावट कॉल आणि एसएमएस नियंत्रित केले जाऊ शकतात.

    मोस्ट अवेटेड Honda इलेक्ट्रिक स्कूटर ‘या’ तारखेला होणार लॉन्च ; नवा टिझर रिलीज

    Honda Bike

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानची दोन चाकी वाहन निर्माता कंपनी Honda Motorcycle and Scooter India (HMSI) लवकरच भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. कंपनीकडून लाँच होणारी हि स्कूटर Honda Activa Electric या नावाने ओळखली जाणार आहे. लाँचपूर्वी या स्कूटरचा एक नवीन टीझर सोशल मीडियावर वारंवार दाखवला जात असून , यामध्ये चार्जिंग पोर्टची माहिती देण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊयात या इलेक्ट्रिक स्कूटर खासियत .

    Honda Activa Electric –

    Honda ने याआधी Activa Electric स्कूटरसाठी चार टीझर सादर केले होते. त्यामध्ये स्कूटरच्या मोटर, दोन डिजिटल स्पीडोमीटर, एलईडी लाईट्स, रेंज, ड्रायव्हिंग मोड्स, आणि रिमूवेबल बॅटरी यांसारख्या वैशिष्ट्यांचा उल्लेख होता. नवीन टीझरमध्ये चार्जिंग पोर्टची झलक दाखवण्यात आली आहे. यामुळे अनेक ग्राहक याच्या लाँचिंगसाठी उत्सुकत आहेत. तसेच या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एलईडी हेडलाइट्स आणि ड्रायव्हिंगसाठी दोन मोड्स असणार आहेत.

    27 नोव्हेंबरला लाँच –

    Honda Activa Electric भारतीय बाजारात 27 नोव्हेंबर 2024 रोजी लाँच होणार आहे. या स्कूटरसोबत कंपनी इतर इलेक्ट्रिक वाहनही सादर करू शकते. पण कोणत्या सेगमेंटमधील वाहन लाँच केले जाईल, याबाबत कंपनीने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. भारतीय बाजारात Honda Activa Electric ची थेट स्पर्धा हि मोठया कंपन्यांशी होणार आहे. त्यामध्ये Ola Electric, Ather, Vida, TVS iQube, आणि Bajaj Chetak यांसारख्याचा समावेश असणार आहे . ही स्कूटर्स सध्या बाजारात लोकप्रिय असून Honda च्या Activa Electric स्कूटरला चांगले प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

    किंमत –

    होंडा Activa Electric स्कूटरची किंमत आणि इतर माहिती लाँच दरम्यान समजणार आहे. हि इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात लाँच झाल्यानंतर मार्केटमध्ये अजून एका गाडीची भर पडणार आहे. त्यामुळे बाजारातील स्पर्धा वाढू शकते.

    Amala Benefits | हिवाळ्यात रोज सकाळी खा एक आवळा; शरीराला होतील अद्भुत फायदे

    Amala Benefits

    Amala Benefits | राज्यात हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे. हिवाळा आला कि आरोग्यासंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या समस्या सामान्य होतात. अशा परिस्थितीत आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे खूप गरजेचे आहे. आयुर्वेदात, आवळा हा अनेक शतकांपासून आरोग्य गुणधर्मांचा खजिना मानला जातो, जे खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. रोज एक आवळा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला कोणते फायदे होतात हे देआपण जाणून घेणार आहोत.

    हिवाळ्यात आवळा खाण्याचे फायदे | Amala Benefits

    • व्हिटॅमिन सीचे भांडार- आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन सी आपली प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या आजारांपासून आपले संरक्षण करते.
    • अँटिऑक्सिडंटने समृद्ध- आवळामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या शरीराला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात.
    • पांढऱ्या रक्त पेशी वाढवते- आवळा पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढवण्यास मदत करतो, जे संक्रमणाशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
    • पचनसंस्था निरोगी राहते
      बद्धकोष्ठता दूर करते- आवळा पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतो. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.
    • पाचक एंझाइम सक्रिय करते- आवळा पाचक एंझाइम सक्रिय करते, ज्यामुळे अन्न सहज पचते.
    • ॲसिडिटीपासून संरक्षण- आवळा ॲसिडिटीची समस्या कमी करण्यास मदत करतो.
      त्वचा निरोगी ठेवते
    • त्वचा चमकदार बनवते- आवळा त्वचा चमकदार आणि मुलायम बनवते.
    • सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करते – आवळा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतो.
    • केस गळणे थांबवते- आवळा केस गळती थांबवण्यास आणि केस मजबूत करण्यास मदत करते.
    • टाळूचे आरोग्य राखते – आवळा टाळूची त्वचा निरोगी ठेवते आणि कोंड्याची समस्या कमी करते.
      हृदय निरोगी ठेवते- आवळा हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतो.
      रक्तदाब नियंत्रित ठेवतो- आवळा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
      कॅन्सरपासून संरक्षण- आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात.
      मधुमेहावर नियंत्रण ठेवते- आवळा मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

    भारतात ग्रे डिवोर्सचे प्रमाण का वाढत आहे? जाणून घ्या कारणे

    Gray Divorce

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल आपण जर पाहिले तर समाजात घटस्फोट घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील एकमेकांपासून वेगळे होताना दिसत आहे. वर्षांनुवर्ष एकत्र संसार करून एकत्र आयुष्य घालून देखील घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत आहे. आजकाल घटस्फोटापेक्षा ग्रे डिव्होर्स हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. जे लोक 50 वर्षे किंवा त्याहून जास्त वयानंतर घटस्फोट घेतात. त्यांच्यासाठी ग्रे डिव्होर्स हा शब्द वापरला जातो. आणि या घटस्फोटाची अनेक कारणे देखील आहेत. वयाची 50 वर्षे पूर्ण होईपर्यंत जर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती सोबत राहत नसेल, तर त्यानंतर नक्की कोणत्या गोष्टी घडतात त्यामुळे त्यांना घटस्फोट घ्यावा लागतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

    आजकाल प्रत्येक स्त्री आणि पुरुष हा वैयक्तिकरित्या काम करत आहेत. लग्न हे प्रत्येक स्त्री आणि पुरुषांमध्ये एक पवित्र बंधन आहे. एक मोठी कमिटमेंट असते. परंतु कधी कधी या प्रेमासोबत छोटे-मोठे वादही होतात. आणि वादाचे रूपांतर खूप मोठ्या भांडणात होतात. आणि एकमेकांवरचा विश्वास कमी होऊन नाते कमकुवत होते. आणि अनेक वेळा हे भांडण घटस्फोटापर्यंत जाते. परंतु तरुण वयामध्ये या गोष्टी घडतात परंतु आजकाल वृद्ध जोडप्यांमध्ये देखील हा घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक वर्ष एकत्र राहून देखील एकमेकांपासून वेगळे राहतात. ज्या जोडप्याचे वय 50 पेक्षा जास्त आहे. ते घटस्फोट घेतात त्यांना ग्रेड डिव्होर्स असे म्हणतात.

    परंतु कोणतीही गोष्ट घडता सुरुवातीच्या टप्प्यात त्याची काही लक्षणे दिसत असतात. ग्रे डिव्होर्समध्ये ही अशीच काही लक्षण आहेत. ती म्हणजे आजकाल कम्युनिकेशनचा गॅप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. लोकांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. आणि या गोष्टींमुळेच घटस्फोटासारखे प्रकार आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात घडून येत आहेत. आजकाल लोकांची जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे अनेक लोक हे वैयक्तिक आनंदाला जास्त महत्त्व देतात. आणि म्हणूनच समोरच्या पार्टनरच्या अपेक्षा लक्षात न घेता प्रत्येकजण त्याच्या आनंदाप्रमाणे वागत असतो.

    आजकाल जर आपण पाहिले तर विचारांमध्ये खूप मोठी तफावत निर्माण झालेली आहे. अनेक वर्ष एकत्र राहून देखील अनेक जोडप्यांमध्ये अजूनही त्यांचे वैचारिक बंध जुळलेले नाही. आणि उतार वयामध्ये त्यांच्यातील पहा वैचारिक कलह वाढल्यामुळे घटस्फोट घेण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. अनेक लोकांमध्ये आर्थिक समस्या देखील असतात. जे त्यांच्या विवाहावर परिणाम करतात. आणि म्हणूनच घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

    उतारवयासोबत माणसाला अनेक आजार देखील निर्माण होतात. अशातच स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी देखील उतार वयामध्ये लग्न मोडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक वेळा काही जोडप्यांना मुले होत नाहीत. आणि उतार वयामध्ये त्यांना एकमेकांबद्दल असणारे प्रेम हळूहळू कमी होते. त्यामुळे देखील घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

    SIP मध्ये 10,000 रुपये गुंतवून 15 वर्षांत बना करोडपती ; काय आहे स्कीम ? जाणून घ्या

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला जर गुंतवणुकीची सवय असेल तर तुमच्यासाठी SIP हा योग्य पर्याय ठरतो. या गुंतवणुकीमुळे तुम्हाला भविष्यात नोकरी करण्याची गरज भासणार नाही. यासाठी तुम्हाला दरमहा 10000 रुपये SIP मध्ये गुंतवावे लागतील. या गुंतवणुकीमुळे तुम्ही फक्त 15 वर्षांत करोडपती बनू शकता. तर आज आम्ही तुम्हाला असे काही दीर्घकालीन फंड सांगणार आहोत , ज्यातून तुम्ही जास्त परतावा मिळवू शकता.

    दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी SIP योग्य

    म्युच्युअल फंडाच्या स्कीममध्ये म्हणजे SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) च्या माध्यमातून तुम्ही दीर्घकालावधीची गुंतवणूक करून शकता. या गुंतवणुकीतून तुम्ही फक्त 15 वर्षांतच करोडपती बनू शकता. SIP मध्ये गुंतवणूक केल्यास कंपाऊंडिंग आणि रुपी कॉस्ट एव्हरेजिंगचा फायदा मिळतो. जर तुम्ही विचार करून एखादा फंड निवडला , ज्याचा वार्षिक परतावा 15 % आहे आणि तुम्ही दर महिन्याला त्या फंडमध्ये 10000 रुपये गुंतवले, तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे 1 कोटी रुपयांहून अधिक निधी जमा होऊ शकतो. त्यामुळे यामध्ये केलेली गुंतवणूक जास्त नफा मिळवून देते.

    मोठे रिटर्न्स मिळवून देणारे फंड

    काही म्युच्युअल फंड योजना दीर्घकालीन गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न्स मिळवून देतात . ज्यामध्ये SBI Small Cap Fund, DSP Small Cap Fund, Axis Growth Opportunities Fund यामधील गुंतवणुकीमधून जास्त परतावा मिळत असतो. SBI Small Cap Fund मधून 24.03% चा वार्षिक परतावा मिळतो . या फंडामध्ये दरमहा 10000 रुपये गुंतवले असता 15 वर्षांत 1.35 कोटींची रक्कम मिळू शकते. तर DSP Small Cap Fund च्या माध्यमातून 22.33% चा वार्षिक परतावा आणि या फंडामुळे 15 वर्षांत 1.16 कोटींची रक्कम तयार होते.

    चांगला परफॉर्मन्स फंडांवर लक्ष

    फंड निवडताना दीर्घकालीन चांगला परफॉर्मन्स असलेल्या फंडांवर लक्ष केंद्रित करावे. स्मॉलकॅप फंड्स अधिक रिटर्न्स देतात, पण त्यामध्ये जोखीम जास्त असते. पण दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये जोखीम कमी असते. जर तुम्ही प्रत्येक वर्षी किंवा दोन वर्षांनी SIP रक्कम वाढवू शकत असाल, तर मोठा फायदा होईल. त्यामुळे तुमच्याकडे 15 वर्षांत 1 कोटींच्या पुढे निधी जमा होईल. गुंतवणुकीच्या कालावधीत बाजारातील चढ उतार येतील पण त्याला घाबरू नका. बाजार स्थिर होताच तुमच्या गुंतवणुकीची किंमत वाढेल.

    तुमचे whatsapp दुसरे कोणी वापरत तर नाही ना? अशाप्रकारे करा चेक

    whatsapp

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातही व्हाट्सअप हे एक इन्स्टंट सोशल मीडिया ॲप आहे. प्रत्येक जण व्हाट्सअप वापरत असतो. जगभरात मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली जाते. परंतु आजकाल अनेक वेळा व्हाट्सअप हॅक होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जर तुमचे देखील व्हाट्सअप दुसरीकडे कुठे चालू असेल, तर तुम्हाला अगदी पटकन एका फीचर्सच्या माध्यमातून करणार आहे.

    लिंक डिवाइस या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हाट्सअप कुठे कुठे चालू आहे. हे शोधू शकता. अनेक वेळा आपण व्हाट्सअप लॉगिन करतो. पण लॉग आऊट करण्याचे विसरतो. आणि व्हाट्सअप तसेच राहते. परंतु अशावेळी व्हाट्सअप कुठे कुठे चालू आहे. ते पाहू शकता आणि ते बंद देखील करू शकता. यासाठी तुम्ही सगळ्यात आधी whatsapp चालू करा. नंतर उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा आणि थ्री डॉटवर टॅप केल्यानंतर तुम्हाला लिंक केलेल्या डिवाइस ऑप्शन वर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुमचे व्हाट्सअप कुठे कुठे चालू आहे याची तुम्हाला संपूर्ण यादी दिसेल.

    या यादीमध्ये जर तुमचे व्हाट्सअप कुठे लॉगिन असेल तर तुम्ही त्या व्हाट्सअपच्या नावाखाली टॅप करून अकाउंट लॉग आऊट देखील करू शकता. whatsapp चे हे फीचर खूप फायदेशीर आहे. याच्या मदतीने तुमचे व्हाट्सअप चुकूनही दुसऱ्या डिवाइस वर लॉगिन झाले असेल, तर तुम्ही तुमच्या प्रायमरी डिवाइसच्या मदतीने ते अकाउंट सहजपणे हटवू शकता. तसेच तिथून तुम्ही लॉग आऊट देखील करू शकता.

    अक्षरयात्री साहित्य संमेलनातून जागतिक मैत्रीचा संदेश सर्वदूर जाणार; इरोशनी गलहेना यांनी मांडले मत

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विश्व साहित्य संस्कृती चळवळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान यांनी उभे केलेले काम अत्यंत प्रेरणादायी असून त्यांनी सुरू केलेल्या या संमेलनातून जागतिक प्रेमाची आणि मानवतेची बांधणी होईल तसेच जगातील अनेक देशातील साहित्य व संस्कृती यांचा मिलाफ होऊन जागतिक मैत्रीचा प्रसार सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या २६व्या अक्षरयात्री भारत-श्रीलंका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना इरोशनी गलहेना यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले, आयोजक माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि कवयित्री डॉ. स्वाती शिंदे – पवार यांच्यामुळे दोन देशातील साहित्यिकांच्या विचारांचे आदान-प्रदान आज होत आहे. सबुद्धी प्रतिष्ठान, श्रीलंका सरकार, अनेक विद्यापीठांचे विभागप्रमुख यांच्यासह आम्ही केलेली ही भारताची सांस्कृतिक पाहणी फारच आनंददायी आहे.

    यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या अरुमुगम निरोमी यांनी भारत-श्रीलंका साहित्यिकांचे एकत्रित येणे प्रेरणादायी असून भारतीय स्त्रिया खूप धाडसी असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्रातील स्त्रियांची एकजूट आणि त्यांचे साहित्यातील योगदान महत्वपूर्ण आहे, असे त्यांनी नमूद केले. संमेलनाचे उद्घाटक प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, अक्षरयात्री प्रतिष्ठान आणि विश्व साहित्य संस्कृती चळवळ यांच्यामुळे पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये हे संमेलन भरते आहे, याचा मनस्वी आनंद आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा डॉ. स्वाती शिंदे-पवार या नावाचा उल्लेख करावाच लागेल. या साहित्य संमेलनाने भारतीय संस्कृतीचा जागर जागतिक स्तरावर केला आहे.

    स्वागताध्यक्षा सुनिताराजे पवार यांनी श्रीलंकेहून आलेल्या टीमचे व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिकांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, अक्षरयात्रीची साहित्य संमेलने मी पाहिली आहेत. या संमेलनातून ओसंडून वाहणारा उत्साह मी अनुभवला आहे. स्त्रीशक्तीचे उत्तम दर्शन हे संमेलन घडविते.
    या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रभरातील ऐंशीहून अधिक साहित्यिकांनी हजेरी लावली होती. मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून सुरू झालेली अक्षरयात्री साहित्य संमेलनाची चळवळ ग्रामीण भागातून आता विश्व साहित्य संस्कृतीकडे झेपावली आहे. अक्षरयात्री प्रतिष्ठानचे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन गतवर्षी नेपाळ येथील दुतावासामध्ये संपन्न झाले होते. २५ भाषांतील बहुभाषिक मान्यवर साहित्यिकांनी यामध्ये आपल्या सहभाग नोंदविला होता.

    यंदाच्या संमेलनातील कवी संमेलन अध्यक्षपद मृणालिनी कानेटकर यांनी भूषविले. चिंतक रानसिंह (श्रीलंका) येथील केरानी सिन्हाल यांनी ‘श्रीलंकन कविता व तिची वैशिष्ट्ये’ या विषयावर शब्दसंवाद साधला. यावेळी निमंत्रित मान्यवरांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये श्रीलंकेतील ११ व भारतातील २१ मान्यवर कवी सहभागी झाले. त्यात सिंहली भाषेतील कवितेचे इंग्रजी भाषांतर यावेळी श्रीलंकेतील साहित्यिकांनी सादर केले. भारतीय भाषेत या कवितेचा अनुवाद केला जाईल, भारतीय भाषेतील मराठी कविता इंग्रजी व सिंहली भाषेत भाषांतरित करून ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली जाईल, असे यावेळी डॉ . स्वाती शिंदे -पवार आणि डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले.

    कवीसंमेलनात बालिका ज्ञानदेव (दहिवडी), आशा डांगे (छत्रपती संभाजीनगर), डॉ. अमरसिरी विक्रमारात्ने (भाषा विभाग प्रमुख, कला आणि संस्कृती, दक्षिण पूर्व विद्यापीठ, श्रीलंका) डॉ . प्रदीप गुणसेना (इंग्रजी विभाग प्रमुख, बौद्ध आणि पाली विद्यापीठ, श्रीलंका), प्रा. डॉ. प्रीती शिंदे – पाटील (वारणानगर), चिंतक रानसिंह (सिन्हाल विभाग केरानी विद्यापीठ, श्रीलंका), प्रियांत बंदारा (नॅशनल कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीलंका), राहुल काळे (राजेवाडी), प्रा. गिरिजा शिंदे (सातारा), उपुल गुरुगे (संपादक, श्रीलंका), अस्मिता चांदणे (पुणे), थमिरा मंजू (संस्थापक, सबुद्धी संघटना, श्रीलंका), डॉ. स्मिता पाटील (मोहोळ), सविता करंजकर-जमाले (धाराशिव), डॉ. प्रसाद पिटिगलआराच्ची (श्रीलंका), जोत्स्ना चांदुगडे (पुणे), अंजली ढमाळ (सातारा) , मा. थुशान निसानसन (सब्बुद्धी संघटना, श्रीलंका), डॉ. विलास पाटील (जिंतूर), सांदुन जयवर्धन (वन्यजीव छायाचित्रकार, श्रीलंका), निसर्गाराजे शिंदे (जेजुरी), अपर्णा पाटील (कोल्हापूर), डॉ. स्नेहल तावरे (पुणे) दत्ता केंजळे (पुणे), धनश्री पाटील (सातारा) आदी सहभागी झाले होते.

    रेशनकार्ड धारकांना केवळ 450 रुपयात मिळणार गॅस सिलेंडर; जाणून घ्या पात्रता

    Ration card

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने नागरिकांसाठी विविध योजना आणलेल्या आहे. ज्याचा फायदा आजपर्यंत देशातील लाखो लोकांना झालेला आहे. यातीलच गरीब लोकांना कमीत कमी किमतीमध्ये जीवनावश्यक वस्तू मिळत आहेत. यासाठी सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत कमी किमतीत रेशन दिलेले जाते. परंतु हे रेशन घेण्यासाठी सामान्य नागरिकांकडे रेशन कार्ड असणे खूप गरजेचे आहे.

    अशातच आता रेशन कार्ड धारकांना केवळ 450 रुपयांमध्ये सिलेंडर मिळणार आहे. राजस्थान मधील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना अगदी कमी किमतीमध्ये सिलेंडर खरेदी करता येणार आहे. तसेच दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांना स्वस्त धान्य मिळते. परंतु त्यांच्याकडे शिधापत्रिका असणे गरजेचे आहे. सरकारकडून आता 450 रुपयांनी गॅस सिलेंडर मिळणार आहे. रेशन कार्डबाबत ही एक मोठी घोषणा केलेली आहे.

    राजस्थान मधील उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 450 रुपयांमध्ये सिलेंडर केले जाणार आहे. यासाठी रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी लिंक असणे गरजेचे आहे. राजस्थान मधील एक कोटी पेक्षा जास्त कुटुंबीय हे राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत लाभ घेत आहेत. आणि यांपैकी 37 लाख कुटुंबांना 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य सोबत आता नागरिकांना सिलेंडर देखील कमी किमतीत मिळणार आहे.

    यंदाच्या हिवाळयात भेट द्या देवभूमीला ; खाण्या-पिण्याचे टेन्शन नाही, IRCTC ने आणले आहे स्वस्त पॅकेज

    यंदाच्या हिवाळी सुट्टीत तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
    यावेळी आयआरसीटीसीने देवभूमीला म्हणजेच उत्तराखंडला जाण्याची ऑफर आणली आहे. IRCTC कमी किमतीत देशभरातील प्रेक्षणीय स्थळांना टूर पुरवते. IRCTC कडून बऱ्याच टूर्स चालवल्या जातात. या टूर्स सुरक्षितही मानल्या जातात.

    काय असेल कालावधी ?

    IRCTC 3 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान देवभूमी उत्तराखंड यात्रा सुरू करणार आहे. दहा रात्री आणि अकरा दिवसांच्या प्रवासासाठी दोन श्रेणींमध्ये भाडे ठेवण्यात आले आहे.

    कुठे देणार भेट ?

    कोलकाता येथून हा प्रवास सुरू होणार असून वर्धमान, आसनसोल, झाझा, बरौनी, हाजीपूर, गोरखपूर आणि लखनऊ हे ठिकाण बोर्डिंगसाठी ठेवण्यात आले आहे. उत्तराखंडमधील टनकपूर, चंपावत, चौकोरी अल्मोरा, नैनिताल, भीमताल या ठिकाणी सहल केली जाईल.

    आयआरसीटीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजेश कुमार यांनी सांगितले की, या प्रकारचा प्रवास 20 वर्षांपासून आयोजित केला जात आहे. लोकांना ते खूप आवडते. यावेळी मागणीनुसार देवभूमीची यात्रा आयोजित केली जात आहे. या प्रवासासाठी ऑनलाइन बुकिंगही सुरू झाले आहे. 300 प्रवाशांसाठी बुकिंग केले जाईल आणि IRCTC कडून सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातील.

    किती येईल खर्च ?

    पॅकेज अंतर्गत जर स्टॅंडर्ड तिकीट बुक केले गेले तर त्यासाठी प्रतिव्यक्ती 30,925 रुपये इतका खर्च येईल डीलक्स पॅकेजसाठी अडतीस हजार पाचशे पस्तीस रुपये इतका खर्च येईल जर तुमच्यासोबत ट्रिप मध्ये पाच ते अकरा वर्षांची मुलं असतील तर त्यांच्यासाठी 30,925 रुपये खर्च करावे लागतील तर डीलक्स पॅकेजसाठी प्रतिव्यक्ती 38 हजार 535 रुपये खर्च येईल.

    संपर्क ?

    8595904074
    6290861577