Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 359

सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर परतणार; नासाने लॉन्च केले नवीन यान

Sunita Williams

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 5 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले आहेत. अगदी एका आठवड्यासाठी गेलेले हे दोघे आता 8 महिने झाले तरी अंतराळातच आहे. दोघांनाही त्यांच्या आरोग्य संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. त्या दोघांना या संकटातून वाचवण्यासाठी आणि त्यांना पृथ्वीवर पुन्हा परत आणण्यासाठी नासा देखील विविध मोहीम राबवत आहेत. अशातच आता गुरुवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता मधील कझाकस्तामधील लॉन्च पॅड वरून नासाने एक अनक्रुड म्हणजे कोणताही सदस्य नसलेले विमान सोडण्यात आलेले आहे. जर शनिवारी रात्री 8 वाजता अंतरावर स्थानकावर पोहोचणार आहे.

अंतराळ सानिकावर अडकलेल्या क्रूडसाठी तीन टन अन्न इंधन आणि आवश्यक अशा वस्तू पाठवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतराळवीरांचे अन्न देखील संपत आल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता तात्काळ तीन टन अन्न अंतराळात पाठवलेले आहे. या आधी 8 नोव्हेंबर रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये त्या दोघांचेजी वजन खूप कमी झाल्याचे दिसत आहे. आणि त्यांच्या प्रकृतीबद्दलही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावेळी नासाच्या स्पेस ऑपरेशन मिशन डायरेक्टरचे प्रवक्ते जीमी रसेल यांनी सांगितले की, “स्पेस स्टेशनवरील सर्व नासा अंतराळवीरांचे नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. समर्पित फ्लाईटच्या सर्जन त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवत आहेत आणि सध्या सर्वजण चांगल्या स्थितीमध्ये आहेत.”

हाती आलेल्या माहितीनुसार माणूस जर जास्त काळ अंतराळात राहिला, तर तुमच्या शरीरासाठी ते चांगले नसते. यामुळे तुमची हाडे कमकुवत होतात. आणि वजन देखील अत्यंत कमी होते. तसेच अंतराळात जास्त काळ राहिल्याने लाल रक्त पेशी कमी होऊ लागतात. आणि याचा धोका मानवाच्या शरीराला होऊ शकतो. तसेच डोळ्यांच्या नसांवर देखील दाब पडल्याने दृष्टी देखील खराब होते. यावेळी अंतराळवीरांना दररोज व्यायाम करणे गरजेचे असते. जेणेकरून त्यांच्या हाडांवर कोणताही परिणाम होणार नाही.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पुन्हा एकदा कधी पृथ्वीवर येणार याची सगळेजण वाट पाहत आहेत. त्यांच्या विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांची ही मोहीम 8 महिन्यांपर्यंत लांबली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2025 मध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर येणार आहे.

गावठी अंड्यांमध्ये आणि बॉयलर अंड्यांमध्ये काय फरक आहे? शरीरासाठी कोणती अंडी फायदेशीर

Eggs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या आरोग्यासाठी अंडी खाणे खूप फायदेशीर असते. अंडीच वीला देखील चांगले लागते. तसेच अंड्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. जर तुम्ही दररोज अंडी खात असाल, तर तुमच्या शरीराला कधीही प्रोटीनची कमतरता भासणार नाही. परंतु बाजारामध्ये आजकाल अंड्याचे वेगवेगळे प्रकार असतात. एक म्हणजे गावठी आणि दुसरी म्हणजे बॉयलर अंडी. या अंड्यांमध्ये गावठी अंडी ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. या अंड्यांचा रंग काहीसा तपकिरी असतो. तसेच ही अंडी आकाराने लहान देखील असतात. आता कोणती अंडी आपल्या आरोग्यासाठी चांगली आहेत? दोन्ही अंड्यांमध्ये काय फरक आहे?हे आज आपण जाणून घेणार आहोत.

शरीरासाठी कोणते अंड चांगलं

तपकिरी रंगाची अंडी याला गावठी अंडी असे म्हणतात. गावठी कोंबड्यांपासून ही अंडी होतात. तसेच पांढऱ्या रंगाची अंडी ही बॉयलर कोंबड्यांपासून मिळवली जातात. त्यांना इंग्लिश अंडी असे देखील म्हणतात. अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. परंतु गावठी अंड्यांमध्ये प्रोटीन सोबतच कॅल्शियम रोज इतर कॅलरीज देखील असतात. परंतु पांढऱ्या अंड्यामध्ये या कॅलरीज आणि कॅल्शियम तुलनेने कमी असतात. आजारी व्यक्तीच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी अनेक वेळा डॉक्टर हे गावठी अंड्यांचे सेवन करण्यासाठी सांगतात. गावठी अंडी ही थोडी महाग असतात. पोल्ट्रीच्या अंड्यांमध्ये आवश्यक ती पोषक तत्वे देखील असतात.

किती अंडी खावी ?

अंड्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळते. तसेच शरीराची झीज देखील भरून काढली जाते. यासाठी राष्ट्रीय अन्न समन्वय समिती यांनी संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे अशी जाहिरात देखील केली होती. तुम्ही दररोज एक अंडे खाऊ शकता. परंतु तुम्ही जर अंड्यातला पिवळा बलक खाणार नसाल, तर तुम्ही चार अंडी देखील खाऊ शकता. अशाप्रकारे जर तुम्ही सेवन केले, तर तुमच्या शरीराला त्याचा खूप फायदा होईल.

क्रिझक कंपनीचा IPO लाँच करण्याचा निर्णय ; 1000 कोटी रुपयांचा निधी उभारणार

crizac

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिझक (Crizac), एक स्टुडंट रिक्रूटमेंट सोल्युशन प्रदाता कंपनी असून, ते लवकरच आपला आयपीओ लाँच करणार आहे. कंपनीने बाजार नियामक सेबीकडे आपला सुधारित ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) पुन्हा सादर केला. या आयपीओद्वारे 1000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा कंपनीचा हेतू आहे.

ऑफर फॉर सेल द्वारे शेअर्स –

आयपीओमध्ये फ्रेश शेअर्स जारी केले जाणार नाहीत. फक्त प्रमोटर्सकडून ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे शेअर्स विकले जातील. याचा अर्थ आयपीओमधून मिळालेली संपूर्ण रक्कम विक्री करणाऱ्या शेअरहोल्डर्सकडे जाईल. ओएफएसमध्ये पिंकी अग्रवाल 841 कोटी रुपयांचे शेअर्स आणि मनीष अग्रवाल 159 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. याआधी कंपनीने मार्च 2024 मध्ये मसुदा कागदपत्रे दाखल केली होती. पण सेबीने जुलै महिन्यात कंपनीला आयपीओची कागदपत्रे परत केली होती.

ग्लोबल स्टुडंट रिक्रूटमेंट सोल्युशन्स पुरवते –

क्रिझक ही कंपनी युनायटेड किंगडम, कॅनडा, रिपब्लिक ऑफ आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील उच्च शिक्षण संस्थांना ग्लोबल स्टुडंट रिक्रूटमेंट सोल्युशन्स पुरवते. आर्थिक वर्ष 2022 ते सप्टेंबर 2024 दरम्यान कंपनीने 135 पेक्षा जास्त जागतिक उच्च शिक्षण संस्थांसोबत काम करत 5.95 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची ऍप्लिकेशन्स प्रोसेस केली. कंपनीच्या जागतिक स्तरावर सुमारे 7900 एजंट्स आहेत जे त्यांच्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर नोंदवलेले आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा महसूल 274 कोटींपासून 93.4 टक्क्यांनी वाढून 530 कोटी झाला. तसेच एबिटडा 37.2 टक्क्यांनी वाढून 143.8 कोटी झाला, पण मार्जिन मागील वर्षाच्या तुलनेत 1110 बीपीएसने घसरून 27.1 % वर आलेला आहे .

बँक ऑफ महाराष्ट्राच्या FD व्याजदरात बदल ; जाणून घ्या काय आहेत नवीन दर ?

BOM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक बँकांनी त्यांच्या फिक्स डिपॉझिटमध्ये बदल केले असून , आता बँक ऑफ महाराष्ट्रने सुद्धा FD योजनांवरील व्याजदरांमध्ये बदल केला आहे. या बँकेने सामान्य नागरिक आणि वरिष्ठ नागरिकांसाठी 7 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी एफडी उपलब्ध करून दिला आहे. बँकेचे नवीन दर 14 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाले असून, सामान्य नागरिकांना बँक 2.75% ते 7.35% वार्षिक व्याज दर ऑफर करत आहे.

स्पेशल एफडीवरील व्याजदर –

बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या स्पेशल एफडी योजनांवरील आकर्षक व्याजदर जाहीर केले आहेत. 200 दिवसांच्या एफडीसाठी 6.90%, 333 दिवसांच्या एफडीसाठी 7.35%, 400 दिवसांच्या एफडीसाठी 7.10%, आणि 777 दिवसांच्या एफडीसाठी 7.75% वार्षिक व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत. या योजना निश्चित आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. ग्राहकांनी या विशेष योजना निवडून चांगल्या परताव्याचा लाभ घ्यावा.

वरिष्ठ नागरिकांसाठी व्याजदर –

या बँकेने वरिष्ठ नागरिकांसाठी 2.75% ते 7.85% पर्यंत वार्षिक व्याजदर निश्चित केले आहेत, ज्यामुळे सुरक्षित आणि निश्चित रिटर्न मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या योजना जास्त फायदेशीर ठरतात. 200 दिवसांच्या एफडीवर 7.40%, 333 दिवसांच्या एफडीवर 7.85%, 400 दिवसांच्या एफडीवर 7.60%, आणि 777 दिवसांच्या एफडीवर 7.75% व्याजदर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या योजना दीर्घकालीन वित्तीय स्थैर्यासाठी एक चांगला पर्याय ठरतो . वरिष्ठ नागरिकांनी या आकर्षक व्याजदरांचा लाभ घेऊन त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण आणि वाढ निश्चित करावी .

सामान्य एफडीवरील व्याजदर

सर्वसामान्य ग्राहकांसाठी तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी विविध कालावधीसाठी फिक्स डिपॉझिटवर चांगले व्याजदर निश्चित केले आहेत. 7 ते 30 दिवसांच्या एफडीसाठी सामान्य नागरिकांसाठी आणि वरिष्ठ नागरिकांसाठी समान 2.75% व्याजदर आहे, तर 31 ते 45 दिवसांसाठी 3% दर लागू आहे. 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.75%, तर 91 ते 119 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांसाठी 5% आणि वरिष्ठ नागरिकांसाठी 5.50% व्याजदर दिला जातो.

120 ते 180 दिवसांच्या एफडीवर व्याजदर –

120 ते 180 दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 5.25% आणि वरिष्ठ नागरिकांना 5.75% व्याजदराचा लाभ मिळतो. 181 ते 270 दिवसांच्या कालावधीसाठी हा दर अनुक्रमे 5.75% आणि 6% आहे. एक वर्षासाठी सामान्य नागरिकांसाठी 6.75% आणि वरिष्ठ नागरिकांसाठी 7.25% दर निश्चित करण्यात आले आहेत.

विविध वर्षासाठी एफडी योजना योग्य –

1 ते 2 वर्षांपर्यंतच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.50% आणि वरिष्ठ नागरिकांना 7% दर मिळतो आणि 2 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठीही तोच दर लागू आहे. 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 6.50% तर वरिष्ठ नागरिकांसाठी 7% व्याजदर दिला जातो. वेगवेगळ्या पर्यायांसोबत निश्चित रिटर्न मिळवण्यासाठी या एफडी योजना योग्य ठरू शकतात.

वाह क्या बात ! व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर, व्हॉईस नोट्सला टेक्स्टमध्ये बदलणार

whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हाट्सअँप नेहमी आपल्या नवनवीन कल्पना वापरून अनेक योजना आखत असते . ज्यामुळे लोकांना आधुनिक फीचर्सचा अनुभव घेता येतो. व्हाट्सअँपचे वापरकर्ते प्रचंड असून , जर तुम्ही एक्टिव्हली वापरत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. नवीन फीचरमध्ये व्हाट्सअँप आता असं फिचर घेऊन येणार आहे , ज्यामुळे तुमच मोठं टेन्शन दूर होईल. यांनी व्हॉईस नोट्सला टेक्स्टमध्ये बदलणारं नवीन फीचर लाँच केले असून, त्यामुळे तुम्हाला नोट्स वाचता येणार आहेत. ज्या लोकांना काही कारणास्तव नोट ऐकता येत नाही , त्यांच्यासाठी हे नवीन फीचर्स फायदेशीर ठरणार आहे.

एक नवीन फीचर लाँच

व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर लाँच केले आहे, ज्याद्वारे युजर्स आता व्हॉईस नोट्सचे सहजपणे टेक्स्टमध्ये रूपांतर करू शकतात. हे फीचर वापरणं अत्यंत सोपं आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन चॅट्सवर क्लिक करावं लागेल, त्यानंतर व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्शन या पर्यायावर जाऊन हे फीचर सुरू किंवा बंद करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या आवडीची भाषा देखील निवडू शकता.

युजर्सच्या सुरक्षा आणि गोपनीयतेला प्राधान्य

हे केल्यानंतर व्हॉईस नोटवर क्लिक करून आणि ट्रान्सक्राइबवर क्लिक केल्यावर व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या व्हॉईस नोटला लगेच टेक्स्टमध्ये रूपांतरित करणार आहे . युजर्स हे टेक्स्ट आपापल्या सोयीनुसार वाचू शकतात. या प्रक्रियेत सर्व काम तुमच्या फोनवरच होत असून , त्यामुळे तुमची प्रायव्हसी पूर्णपणे राखली जाते. व्हॉट्सअ‍ॅप किंवा अन्य कोणतीही तुमच्या व्हॉईस नोट्समध्ये प्रवेश करू शकत नाहीत, यामुळे युजर्सच्या सुरक्षा आणि गोपनीयतेला प्राधान्य दिलं जातं.

विविध भाषांमध्ये उपलब्ध

व्हॉट्सअ‍ॅपने नेहमीच युजर्सच्या गोपनीयतेला महत्त्व दिलं आहे. व्हॉईस नोट्सचे टेक्स्टमध्ये रूपांतर करत असताना, सर्व डेटा तुमच्या डिव्हाईसवरच प्रक्रिया होतो, यामुळे इतर सर्व्हरवर कोणताही डेटा पाठवला जात नाही. सध्या हे फीचर काही भाषांमध्ये उपलब्ध आहे, पण लवकरच अजून भाषा ऍड केल्या जाणार आहेत. हे नवीन फीचर लवकरच संपूर्ण जगभरातील व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी उपलब्ध होईल, ज्यामुळे युजर्सला अधिक सोयीचे आणि सुरक्षित व्हॉईस नोट ट्रान्सक्रिप्शन अनुभवता येईल.

अदानी प्रकरणानंतर आज शेअर बाजारात तेजी , निफ्टी 2.5% वाढले

share market

शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त वाढ दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही कंपन्यांनी प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. रियल्टी इंडेक्स 3% वाढून बंद झाला. बँकिंग शेअर्समध्ये खरेदीमुळे निफ्टी बँकेला पाठिंबा मिळत होता. आयटी निर्देशांकातही वाढ झाली. दोन्ही निर्देशांक जवळपास 3 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. याशिवाय एफएमसीजी इंडेक्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, पीएसयू बँक शेअर्समध्येही मोठी खरेदी झाली.

सेन्सेक्स-निफ्टी प्रत्येकी 2.5% च्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 1961 अंकांनी वाढून 79,117 वर बंद झाला. निफ्टी 557 अंकांनी वाढून 23,907 वर बंद झाला आणि बँक निफ्टी 762 अंकांनी वाढून 51,135 वर बंद झाला.

कालच्या बंदच्या तुलनेत सेन्सेक्स 194 अंकांनी वाढून 77,349 वर उघडला. निफ्टी 62 अंकांनी वाढून 23,411 वर उघडला. बँक निफ्टी 140 अंकांनी वाढून 50,512 वर उघडला. काल, गौतम अदानी यांना लाचखोरी-फसवणूक प्रकरणात दोषी ठरवण्याच्या निर्णयाने अमेरिकेच्या कोर्टात बाजारावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. अदानी समूहाचे शेअर्स २६ टक्क्यांनी घसरले होते. आज या ग्रुपसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. न्यूयॉर्क कोर्टाने केलेल्या आरोपानंतर केनिया सरकारकडून अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. केनियाच्या राष्ट्रपतींनी विमानतळ आणि वीज करार रद्द केला आहे.

आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्की नफ्यात तर हाँगकाँगचा हँग सेंग आणि चीनचा शांघाय कंपोझिट तोट्यात होता. गुरुवारी अमेरिकन बाजार सकारात्मक ट्रेंडसह बंद झाले. आंतरराष्ट्रीय मानक ब्रेंट क्रूड 0.26 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल $ 74.42 वर राहिला.

शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारी 5,320.68 कोटी रुपयांचे समभाग विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) 4,200.16 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

BSNL च्या ‘या’ 130 दिवसांच्या स्वस्त प्लॅनने उडवली खळबळ ! Jio, Airtel पिछाडीवर

bsnl

BSNL ने अलीकडेच त्यांचे अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. हे रिचार्ज प्लॅन देशातील सर्व दूरसंचार मंडळांच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. गेल्या तीन महिन्यांत भारत संचार निगम लिमिटेडच्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कंपनीचे आता 9 कोटींहून अधिक मोबाइल वापरकर्ते आहेत.

बीएसएनएलकडे दीर्घ वैधतेसह अनेक योजना आहेत, त्यापैकी सर्वात स्वस्त प्लॅनची ​​वैधता 130 दिवस आहे, ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि विनामूल्य एसएमएस सारखे फायदे उपलब्ध आहेत. बीएसएनएलने आपल्या स्वस्त प्लॅनद्वारे जिओ आणि एअरटेलसाठी तणाव वाढवला आहे.

BSNL चा 130 दिवसांचा प्लॅन

भारत संचार निगम लिमिटेडचा हा स्वस्त रिचार्ज प्लॅन 699 रुपयांचा आहे, ज्यासाठी वापरकर्त्यांना दररोज सुमारे 5 रुपये खर्च करावे लागतील. या प्लानमध्ये यूजर्सना 130 दिवसांची वैधता मिळते. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, वापरकर्त्यांना भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना देशभरात मोफत राष्ट्रीय रोमिंगचा लाभ देखील दिला जातो. वापरकर्त्यांना त्यांच्या नंबरवर रोमिंग करताना मोफत इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्स मिळतील.

या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 0.5GB हायस्पीड डेटाचा लाभ मिळतो. अशा प्रकारे यूजर्सना एकूण 65GB डेटा मिळतो. याशिवाय दररोज 100 मोफत एसएमएसचाही लाभ दिला जातो. दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर, वापरकर्त्यांना 40Kbps च्या वेगाने अमर्यादित इंटरनेट मिळते. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना त्यामध्ये PRBT टोनमध्ये प्रवेश देखील मिळेल.

ठरलं ! ‘या’ दिवशी होणार Redmi Note 14 Pro+ भारतात लॉन्च ; असतील जबरदस्त वैशिष्ट्ये

redmi

भारतात Redmi स्मार्टफोन्सला ग्राहकांची चांगली पसंती मिळते आहे. म्हणूनचा ग्राहकांना नव्या लॉन्च होणाऱ्या फोनची प्रतीक्षा असते. आता Redmi च्या चाहत्यांकरिता एक खुशखबर आहे.Xiaomi ची मिड-बजेट स्मार्टफोन सीरीज पुढील महिन्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात दाखल होणार आहे. Redmi ने फोनच्या लॉन्चची तारीख समोर आणली आहे. अलीकडेच Xiaomi ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे या स्मार्टफोनला समोर आणले होते . रेडमी नोट 14 सीरीज चिनी मार्केटमध्ये आधीच लॉन्च झाली आहे. मात्र, भारतात सुरू होणाऱ्या मालिकेत फरक असू शकतो. वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्या Redmi Note 13 सीरीज प्रमाणेच यामध्ये 200MP कॅमेरा देखील दिसू शकतो.

‘या’ दिवशी होणार लॉन्च

Redmi Note 14 सिरीजमध्ये, कंपनी तीन मॉडेल देऊ शकते – Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+. तिन्ही मॉडेल्स दिसायला जवळपास सारखे असतील. Redmi Note 14 आणि Note 14 Pro च्या फीचर्समध्ये फारसा फरक असणार नाही. तथापि, Pro+ मॉडेलच्या कॅमेरा आणि इतर हार्डवेअर वैशिष्ट्यांमध्ये बदल होतील. काही दिवसांपूर्वी या मॉडेल्सचे अनेक फिचर्स ऑनलाइन समोर आले आहेत. Redmi च्या वेबसाइटनुसार, ही सीरीज भारतात 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल.

Redmi Note 14 मालिकेची वैशिष्ट्ये

या मालिकेतील सर्व मॉडेल्स 6.67 इंच कर्व्ड एज डिझाइन OLED पॅनेलसह येऊ शकतात, ज्याचे रिझोल्यूशन 1.5K असेल. तसेच यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. Android 15 वर आधारित HyperOS 2 सह लॉन्च होणारी Redmi Note 14 मालिका कंपनीची पहिली स्मार्टफोन मालिका असू शकते. MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसर या मालिकेच्या बेस आणि प्रो मॉडेल्समध्ये आढळू शकतो. त्याच वेळी, प्रो+ मॉडेलमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे.

मिळेल 200MP चा कॅमेरा

200MP Sony IMX882 प्राथमिक कॅमेरा सेन्सर Redmi च्या या आगामी मालिकेतील सर्वात प्रीमियम Pro+ मॉडेलमध्ये दिला जाऊ शकतो. त्याच वेळी, इतर दोन्ही मॉडेल्समध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा असेल. Redmi ची ही सीरीज IP69 रेट केली जाऊ शकते, ज्यामुळे फोन पाण्याखालीही खराब होणार नाही. याशिवाय फोनमध्ये 6,200mAh पर्यंतची पॉवरफुल बॅटरी मिळू शकते. बेस आणि प्रो मॉडेल्समध्ये 45W फास्ट चार्जिंग प्रदान केले जाऊ शकते, तर प्रो प्लस मॉडेल 90W फास्ट चार्जिंग वैशिष्ट्यास बाजारात येऊ शकतो.

मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही ; प्रवास होणार जलद आणि कोंडीमुक्त

missing link

जर तुम्ही मुंबई पुणे असा प्रवास हायवे वरून केला असेल तर तुम्हाला नक्की आठवत असेल तो खंडाळा घाट मात्र आता ह्या खंडाळा घाटामध्ये वारंवार ट्राफिक जामची समस्या उद्भवते. या मार्गावरील ट्रॅफिक जॅम ची समस्या आता वाहन चालकांसाठी डोकेदुखी बनली आहे. मात्र या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण या एक्सप्रेस वे वरून मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरच्या महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत सह्याद्रीच्या डोंगरात केबल स्टेड पूल उभारला जात आहे त्यामुळे एक्सप्रेसवे मार्गे मुंबई पुण्याचा प्रवास आणखी जलद आणि विना कोंडीचा होणार आहे.

मिसिंग लिंक प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात

या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मुंबई पुण्याला जोडणारा मिसिंग लिंक प्रकल्प उभारला जात आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरील मिसिंग लिंक प्रकल्प आता पूर्णत्वाच्या टप्प्यामध्ये आला आहे. या प्रकल्प अंतर्गत सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेल्या खंडाळा घाटात 180 m उंच स्टेड पूल उभारला जात आहे. या प्रकल्पाचे काम 90% पूर्ण झालं असून 2025 या वर्षात हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती आहे या प्रकल्पामुळे मुंबई पुणे या शहरातील अंतर सहा किलोमीटर ने कमी होणार असून यामुळे प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही

14 किलोमीटर चा असणाऱ्या या मिसिंग लिंकच्या खंडाळा येथील केबल स्टेड पुलामुळे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. फक्त लोणावळ्यात प्रवेश करण्यासाठी या खंडाळा घाटातून जावे लागेल. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा मुंबई पुणे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. डिसेंबर 2024 हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता. मात्र, नियोजीत वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. यामुळे आता हा प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली. यामुळे 2025 मध्ये प्रत्यक्षात कधी हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Oil India Bharti 2024 | OIL इंडिया अंतर्गत मोठी भरती सुरु; मुलाखतीद्वारे होणार निवड

Oil India Bharti 2024

Oil India Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आम्ही आमच्या लेखांमार्फत तुम्हाला अनेक सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या संधी देत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत इलेक्ट्रिकल टेक्निशियन मेकॅनिकल टेक्निशियन या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 17 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही मुलाखत 9 आणि 11 डिसेंबर रोजी होणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव |Oil India Bharti 2024

या भरती अंतर्गत इलेक्ट्रिकल टेक्निशियन आणि मेकॅनिकल टेक्निशियन या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 40 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया

ही भरती मुलाखती अंतर्गत होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

लुईतपार क्लब, पाइपलाइन मुख्यालय, ऑइल इंडिया लिमिटेड, उदयन विहार, नारेंगी, गुवाहाटी, आसाम-781171

मुलाखतीची तारीख

9 आणि 11 डिसेंबर 2024 रोजी हे मुलाखत होणार आहे.

रिक्त पदसंख्या | Oil India Bharti 2024

इलेक्ट्रिकल टेक्निशियन – 9 जागा
मेकॅनिकल टेक्निशन – 8 जागा

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला 21,450 रुपये एवढा पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?

  • ही भरती मुलाखती अंतर्गत होणार आहे.
  • तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • 9 आणि 11 डिसेंबर रोजी ही मुलाखत होणार आहे
  • मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणतेही शुल्क दिले जाणार नाही.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा