Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 360

Air Force AFCAT Recruitment 2024 | भारतीय हवाई दल अंतर्गत मोठी भरती सुरु; येथे करा अर्ज

Air Force AFCAT Recruitment 2024

Air Force AFCAT Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. या अंतर्गत आता अनेक लोकांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. ही भरती भारतीय हवाई दल अंतर्गत होणार आहे. या भरती अंतर्गत हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी या पदांसाठी रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 336 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. 2 डिसेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 31 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Air Force AFCAT Recruitment 2024

या भरती अंतर्गत फ्लाईंग शाखा, ग्राउंड ड्युटी तांत्रिक, ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 336 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पद्धती | Air Force AFCAT Recruitment 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 26 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

2 डिसेंबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

  • फ्लाईंग शाखा – 30 पदे
  • ग्राउंड ड्युटी तांत्रिक – 189 पदे
  • ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल – 117 पदे

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक देखील अर्ज करू शकता.
  • 2 डिसेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे.
  • 31 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Reliance Jio चा मस्त रिचार्ज प्लॅन ! महिन्याला 75 रुपयांपेक्षा कमी दराने मिळेल 1 वर्षाची वैधता

jio recharge

रिलायन्स जिओने आपल्या योजनांमध्ये कालांतराने सुधारणा केली आहे आणि अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर केले आहेत. आज, Jio च्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये लोकप्रिय प्लॅन्स, ट्रू 5G अनलिमिटेड प्लॅन्स, एंटरटेनमेंट प्लॅन्स, डेटा बूस्टर, ॲन्युअल प्लॅन्स, Jio फोन आणि इंटरनॅशनल रोमिंग यांसारख्या श्रेणींचा समावेश आहे. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये दीर्घ वैधता हवी असेल आणि तुमच्याकडे Jio फोन असेल, तर Jio चा 895 रुपयांचा रिचार्ज तुमच्यासाठी चांगला असू शकतो.

ही योजना JioPhone वापरकर्त्यांसाठी आहे

आम्ही ज्या जिओ प्लानबद्दल बोलत आहोत त्याची वैधता ३३६ दिवसांची आहे. याचा अर्थ तुम्ही जवळजवळ वर्षभर त्याचे फायदे घेऊ शकता. या रिचार्ज प्लॅनमध्ये २८ दिवसांच्या सायकलचे १२ प्लॅन उपलब्ध आहेत. प्रत्येक 28 दिवसांसाठी 2GB डेटा दिला जातो, म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान 24GB डेटा. डेटा संपल्यावर, इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधाही मिळेल, ज्याद्वारे कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉल करता येतील. दर 28 दिवसांनी 50 एसएमएस देखील दिले जातात. यासोबतच Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

दररोज 3 रुपयांपेक्षा कमी खर्च

रिलायन्स जिओचा हा स्वस्त प्लॅन खास अशा लोकांसाठी तयार करण्यात आला आहे जे कंपनीचा फीचर फोन JioPhone वापरतात आणि त्यांना एका वर्षासाठी कमी किमतीत कॉलिंगचे फायदे हवे आहेत. 895 रुपयांचा हा Jio रिचार्ज प्लॅन त्या ग्राहकांसाठी परवडणारा आणि सोयीस्कर पर्याय आहे. 895 रुपयांनुसार, या प्लॅनची ​​दररोजची किंमत 2.66 रुपये आहे, म्हणजेच 3 रुपयांपेक्षा कमी. त्याच वेळी, जर एका महिन्याचा खर्च 336 दिवसांच्या दृष्टीने काढला तर तो 75 रुपयांपेक्षा कमी येतो.

चीनमध्ये सापडला सोन्याचा सर्वात मोठा खजिना, किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Gold In china

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. आता चीनला सोन्याचा आणखी मोठा खजिना सापडला आहे. चीनला त्याच्या हुनान प्रांतात 82.8 अब्ज डॉलर्सचा इतका मोठा सोन्याचा साठा सापडला आहे, ज्याचे भारतीय रुपयात मूल्य अंदाजे 7 लाख कोटी रुपये आहे. हुनान अकादमी ऑफ जिओलॉजीने पिंगजियांग काउंटीमध्ये 40 हून अधिक सोन्याच्या धातूच्या नसा ओळखल्या आहेत, ज्यात 300.2 टन सोने असल्याचा अंदाज आहे.

चीनला सापडला1000 टन सोन्याचा साठा

रॉयटर्सने चीनच्या राज्य एजन्सीच्या हवाल्याने सांगितले की, हुनान प्रांताच्या मध्यभागी ड्रॅगनला 82.9 अब्ज डॉलर्स किमतीचे सोन्याचे प्रचंड साठे सापडले आहेत, जे 600 अब्ज चीनी चलन युआनच्या समतुल्य आहे. हुनान अकादमी ऑफ जिओलॉजीने पिंग्झियांग काउंटीमध्ये 2,000 मीटरपेक्षा जास्त खोलीवर 40 हून अधिक सोन्याच्या धातूच्या नसा शोधल्या आहेत, ज्यामध्ये 300.2 टन सोन्याचे स्त्रोत आहेत आणि 138 ग्रॅम प्रति मेट्रिक टन सर्वोच्च श्रेणी आहे. चीनच्या सरकारी एजन्सी शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, समूहाचा अंदाज आहे की 3,000 मीटरपेक्षा जास्त खोलीवर 1,000 टनांपेक्षा जास्त सोन्याचा साठा आहे.

चीन सोन्याचा सर्वात मोठा उत्पादक

चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते, 2023 मध्ये जागतिक सोन्याच्या उत्पादनात चीनचे योगदान 10 टक्के आहे. असे असूनही जागतिक स्तरावर वाढत्या भू-राजकीय तणावानंतर चीनच्या सेंट्रल बँकेने सर्वाधिक सोने खरेदी केले आहे. 2023 मध्ये पीपल्स बँक ऑफ चायना ने सोन्याची खरेदी 20 टक्क्यांनी वाढवली. जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते, सर्व केंद्रीय बँकांनी 1087 टन सोन्याची खरेदी केली, त्यापैकी चीनने सर्वाधिक खरेदी केली. 2024 च्या पहिल्या तिमाहीत चीनने 280 टन सोने खरेदी केले आहे आणि यावर्षी चीन 850 टन सोने खरेदी करू शकेल असा अंदाज आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनने दोन वर्षांत 2800 टन सोने खरेदी केले आहे.

या महिलांना असते जुळी मुले होण्याची जास्त शक्यता ? दिसतात ही लक्षणे

Twins

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आई होणे ही कोणत्याही स्त्रीसाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट असते. निसर्गाने स्त्रीला दिलेलं हे एक वरदान आहे. गर्भधारणेपासून मूल जन्माला येईपर्यंत एका स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये वेगवेगळे बदल देखील होत असतात. आजकाल अनेक स्त्रियांना जुळी मुलं होतात. विज्ञानानुसार असे म्हटले जाते की, जुळी मुलं होणं ही एक मनोरंजक आणि आश्चर्यकारक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आईच्या पोटात दोन मुलं एकत्र विकसित होतात. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. जगामध्ये दरवर्षी जवळपास 1.6 दशलक्ष जुळी मुले जन्माला येतात. परंतु जुळी मुले जन्माला का येतात? आणि कोणत्या स्त्रियांना जुळी मुले होण्याची जास्त शक्यता असते? हे आपण जाणून घेऊयात.

जुळी मुले होण्याची कारणे

आयडेंटीकल ट्विन्स

ज्यावेळी स्त्रियांमधील एकच अंडपेशी दोन भागात विभागली जातात. त्यावेळी आयडेंटिकल ट्विन्स होतात. म्हणजेच यामध्ये दोन्ही मुले गुणसूत्रांच्या बाबतीत पूर्णपणे सारखीच असतात आणि दिसायला देखीलअगदी सेम दिसतात.

फ्रॅटर्नल ट्विन्स

ज्यावेळी महिलेच्या गर्भात दोन अंड पेशी दोन भिन्न शुक्राणू सोबत एकत्र येतात. त्यावेळी मुळे होतात. परंतु ही जुळी मुले सामान्यता वेगळी असतात. त्यांच्या गुणसूत्रांमध्ये 50% सारखेपणा असू शकतो. परंतु पूर्णपणे सारखी नसतात. या प्रक्रिये दोन्ही अंडी वेगवेगळ्या गर्भाशयात फलित होत असतात.

कोणत्या स्त्रियांना जुळी मुले होऊ शकतात

गुणसूत्रे

जर एखाद्या महिलेच्या कुटुंबात जुळी मुले जन्माला येण्याचा इतिहास असेल, तर त्या महिलेला देखील जुळी मुले होण्याची शक्यता असते

वय

ज्या महिलांना 30 ते 40 या वर्षांमध्ये पहिल्यांदा गर्भधारणा राहते. त्यांना सहसा जुळी मुले होण्याची शक्यता जास्त असते.

उंची आणि वजन

ज्या महिलांची उंची आजी वजन जास्त असते. अशा महिलांना देखील जुळी मुले होण्याची शक्यता जास्त आहे.

प्रजनन उपचार

IVF किंवा इतर प्रजनन उपचारांच्या मदतीने महिला गर्भवती झाली, तर अशावेळी जुळ्या मुलांना जन्म देण्याची शक्यता जास्त होते.

जुळी मुलं आहेत याची लक्षणे

जर तुमच्या पोटात जुळी मुलं असतील, तर तुम्हाला सकाळी सकाळी जास्त प्रमाणात थकवा जाणवतो. सामान्य वजनापेक्षा तुमचे वजन देखील जास्त होते. त्याचप्रमाणे तुम्हाला जर वारंवार आणि जास्त भूक लागत असेल, तर तुम्हाला जुळी मुलं होण्याची शक्यता आहे. वारंवार लघवी होणे हे देखील जुळे मुले असण्याचे एक लक्षण आहे.

यंदाच्या हिवाळयात भेट द्या केरळला , IRCTC ने लाँच केले स्वस्त टूर पॅकेज

kerala

आता 2024 सम्पत आले असून अवघ्या महिन्याभरात नवीन वर्ष सुरु होईल पण त्यापुर्वी तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण IRCTC ने केरळसाठी एक अप्रतिम आणि परवडणारे टूर पॅकेज लॉन्च केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला सर्व सुविधांचा लाभ मिळत आहे.

या पॅकेज अंतर्गत तुम्हाला केरळच्या सुंदर ठिकाणी नेले जाईल. केरळ केवळ भारतातच नाही तर परदेशातही आपल्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. केरळमध्ये तुम्ही समुद्रकिनारा आणि पर्वतीय पर्यटनस्थळांचा आनंद घेऊ शकता. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने या पॅकेजमध्ये पर्यटकांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे तुमच्या सहलीचा आनंद द्विगुणित होऊ शकतो.

कुठे फिरवले जाईल

केरळच्या या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला मुन्नार / थेक्कडी / अलेप्पी / तिरुवनंतपुरम / कोची इत्यादी ठिकाणी नेले जाईल. IRCTC चे हे टूर पॅकेज 25 नोव्हेंबर 2024 रोजी कोची येथून सुरू होत आहे. पॅकेज अंतर्गत, IRCTC ने तुमच्या जेवणाची आणि निवासाची योग्य व्यवस्था केली आहे. पॅकेजची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला विम्याची सुविधाही मिळत आहे. या अद्भुत टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना हाऊसबोटमध्ये राहण्याचा अनुभवही मिळणार आहे. केरळच्या पश्चिम घाटात वसलेले मुन्नार हे केरळच्या मुकुटातील रत्नासारखे आहे. याशिवाय इथे तुम्हाला सुंदर चहाच्या बागाही पाहायला मिळतील.

किती येईल खर्च ?

IRCTC ने या टूर पॅकेजला MESMERIZING KERALA असे नाव दिले आहे. पॅकेज कोडबद्दल बोलताना, तो SEH047 आहे. टूर पॅकेजच्या कालावधीबद्दल सांगायचे तर, पर्यटकांना एकूण 6 रात्री आणि 7 दिवस घेतले जातील. जर भाड्याबद्दल बोलायचे झाले , तर तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला 66,870 रुपये मोजावे लागतील. दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती भाडे 34,455 रुपये आहे. जर तुम्ही तीन लोकांसह प्रवास करत असाल तर तुमचे प्रति व्यक्ती भाडे रु. 26,930 आहे. तुमचे तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

सतत डोकेदुखी होत असेल तर सावधान; असू शकते ट्युमरचे कारण, ही आहेत लक्षणे

Headache

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल डोके दुखणे हा आजार सामान्य झालेला आहे. दर दोन व्यक्तींना डोके दुखण्याचा त्रास होत असतो थकवा, सर्दी बदलते हवामान या सगळ्यामुळे देखील डोके दुखत असतात. परंतु काही काही लोकांना डोक्याची तीव्र वेदना चालू होते. आणि ते लोक औषध घेतात. परंतु जर तुमचे प्रमाणापेक्षा जास्त डोके दुखत असेल, किंवा सारखेच डोके दुखत असेल, तर त्याकडे फक्त मेडिकलमधील गोळ्या खाऊन अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण कधी कधी डोके दुखणे हे मेंदूच्या ट्यूमरचे संकेत असू शकते. जर एखाद्या व्यक्तीला वारंवार डोके दुखत असेल, तर त्यांनी डॉक्टरांनी संपर्क साधने खूप गरजेचे आहे.

सामान्य डोकेदुखी आणि ट्यूमरच्या डोकेदुखीमध्ये खूप फरक आहे. सामान्य डोके दुखत दुखत असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. परंतु जर वेगळ्या प्रकारे डोके दुखत असेल तर ट्यूमर असण्याची शक्यता असते. त्यामुळे डोके दुखण्यात कोणते फरक असतात. हे समजून घेणे खूप गरजेचे असते. मेंदूमध्ये ट्यूमर असल्यास डोक्याचे दुखणे अचानक तीव्र होते. शरीराला झटका आल्यासारखे होते. तसेच डोकेदुखी ही सामान्य दुखण्यापेक्षा जास्त वेळ राहते. तसेच डोक्याला काहीतरी धडक लागल्यासारखे वाटते. काही वेळा डोके जड होते. तुम्हाला जर अशी काही लक्षण दिसत असेल, तर अजिबात त्याकडे दुर्लक्ष करू नका.

जर तुम्हाला देखील थंडर हेडॅक वाटत असेल याचा अर्थ तुमच्या डोक्यातील रक्तवाहिनी फुटली आहे. आणि रक्त बाहेर पडत आहे. अशा वेळी तो व्यक्ती दीर्घकाळ अपंग होण्याची शक्यता असते. तसेच कोमामध्ये जाऊन मृत्यू देखील होण्याची शक्यता असते. कधी कधी अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. यावेळी पक्षपात होण्याचा देखील धोका असतो. त्यामुळे गळ्यातून जात असलेल्या रक्तवाहिन्या अचानक बंद होतात. आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अशावेळी माणसाचा मृत्यू होण्याची देखील शक्यता असते. जर तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त डोके दुखत असेल, तर तुम्ही वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तपासणी करून घ्या.

Jio Recharge Plan | Jio ने आणला नवीन स्वस्त प्लॅन, मिळणार 11 महिन्यांची वैधता

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan | रिलायन्स जिओ ही आपल्या देशातील एक सगळ्यात लोकप्रिय टेलिफोन कंपनी आहेत. देशातील कितीतरी कोट्यावधी ग्राहक या कंपनीसोबत जोडलेले आहेत. जिओने जुलै महिन्यामध्ये त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली होती. त्यामुळे त्यांच्या युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. परंतु आता याच युजर्सला जोडून आणि आकर्षित ठेवण्यासाठी जिओ नवीन प्लॅन आणत आहेत. जिओनी त्यांच्या लिस्टमध्ये आणखी एक नवीन प्लॅन आणलेला आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशी या प्लॅनची किंमत असणार आहे. या जिओच्या नव्या प्लॅनची वैधता 11 महिन्यांची असणार आहे. आणि अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही हा प्लॅन खरेदी करू शकता. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यावर तुम्हाला वर्षभर टेन्शन राहणार नाही. आता प्लॅन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

जिओचा 1899 रुपयांचा प्लॅन | Jio Recharge Plan

जिओच्या या नवीन प्लॅन किंमत 1899 रुपये एवढी आहे. या प्लॅनची वैद्यता 11 महिन्यांची आहे. यामध्ये तुम्हाला फ्री अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच 100 फ्री एसएमएस देखील मिळणार आहे. तसेच युजरला 24 जीबीचा डाटा देखील मिळणार आहे. ज्या लोकांना जास्त डेटाची गरज लागत नाही. त्यांच्यासाठी हा आपल्याला अत्यंत चांगला प्लॅन आहे. तसेच या प्लॅनमध्ये युजर्सला जिओ सिनेमा, जिओ टीव्ही जिओ क्लाउड यांचा फ्री ऍक्सेस मिळणार आहे.

अशाप्रकारे जर तुम्ही कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त वैधता असलेला प्लॅन शोधत असाल, तर जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत चांगला असा प्लॅन आहे. तुम्ही एकदा प्लॅन घेतल्यावर 11 महिने तुम्हाला रिचार्ज करण्याची काहीच गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही कमी इंटरनेट डेटा वापरत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे. काही लोकांकडे घरात वायफाय असते. अशा लोकांना केवळ कॉलिंग साठी एखादा रिचार्ज प्लॅन पाहिजे असतो. त्यांच्यासाठी हा प्लॅन अत्यंत उत्कृष्ट असा प्लॅन आहे.

सोन्याला झळाळी ! वाढला भाव, पहा आज काय आहेत सोन्याचे 22 आणि 24 कॅरेटचे दर

gold rate

आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दारात भारी वाढ झालेली दिसून येत आहे. एकीकडे लग्नसराई सुरु झाली असताना सोन्याचे वाढते दर ग्राहकांची चिंता वाढवणारे आहेत. आज पुण्यामध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दारात 870 रुपयांची वाढ होऊन सोन्याचा दर 78,820 वर जाऊन पोहचला आहे. चला तर मग पाहुयात सोन्याचे आजचे(२२-११-२४) भाव सविस्तर

22 कॅरेट

आज एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर 7225 रुपये इतका आहे. हाच दर काल 7145 रुपये इतका होता. म्हणजेच आज एक ग्राम 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 80 रुपयांची वाढ झाली आहे. तर आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 72 हजार 250 रुपये इतका आहे. हाच दर काल 71 हजार 450 रुपये इतका होता म्हणजेच आज 22 कॅरेट १० ग्राम सोन्याच्या दरामध्ये आठशे रुपयांची वाढ झाली आहे.

24 कॅरेट

24 कॅरेट म्हणजे शुद्ध सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 7882 रुपये इतका आहे. हा दर काल 7795 रुपये इतका होता म्हणजेच आज 24 कॅरेट एक ग्राम सोन्याच्या दरामध्ये 87 रुपयांची वाढ झाली आहे. तर दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 78 हजार 820 रुपये इतका आहे. हाच दरकाल 77 हजार 950 रुपये इतका होता. म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दारामध्ये 870 रुपयांची वाढ झाली आहे.

मतदान होताच सर्वसामान्यांना मोठा झटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ

Fuel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. महाराष्ट्र सोबत झारखंड या राज्यातील देखील विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकाच टप्प्यात मतदान पूर्ण झालेले आहे. तर झारखंडमध्ये 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान पूर्ण झालेले आहे. हे मतदान झाल्यानंतर जवळपास 24 तासातच इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. आज मध्यरात्रीपासून सीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती महानगर गॅस लिमिटेड यांनी दिलेली आहे.

इतक्या रुपयांनी गॅस महाग

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी दरामध्ये वाढ झाल्याची माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आज पासून सीएनजीच्या किमती दोन रुपयांनी वाढलेल्या आहेत. यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीचे दर हे 77 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळे आता रिक्षा चालकांच्या खिशाला देखील खात्री लागणार आहे.

सीएनजी दरात वाढ झाल्याने दुसरीकडे शेअर बाजारामध्ये देखील मोठी हालचाल दिसून येत आहे. महानगर गॅस शेअर मध्ये 3 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. म्हणजेच महानगर गॅसचा शेअर हा 100 रुपयांच्या रेंजमध्ये असणार आहे. सरकारने सलग दुसऱ्या महिन्यामध्ये शहरातील गॅस वितरण कंपन्यांसाठी ऍडमिनिस्टर प्राईस मेकॅनिझम ए लोकेशन मध्ये 20 टक्क्यांनी कपात केलेली आहे. यामुळेच एमजीएल आणि आयजीएल सारख्या कंपन्यांची नफ्यामध्ये परिणाम झालेला आहे.

Post Office Scheme | 115 महिन्यात पैसे होणार डबल; जाणून घ्या पोस्ट ऑफिसची नवी योजना

Post Office Scheme

Post Office Scheme | आज काल आर्थिक गुंतवणुकीचे ज्ञान मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या मासिक पगारातून काही ना काही हिस्सा हा त्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करून ठेवतात. जेणेकरून भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण आली तर आपण जमा केलेला फंड आपल्याला वेळेला उपयोगी येईल. मार्केटमध्ये देखील गुंतवणुकीच्या अनेक पर्यायी उपलब्ध आहेत. परंतु हे पैसे गुंतवणे जोखमीचे असते. त्यामुळे अनेक लोक सुरक्षित गुंतवणूक करतात. अशा वेळी सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे जास्त फायदेशीर ठरते. यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित असतात आणि चांगला परतावा देखील मिळतो.

पोस्ट ऑफिस (Post Office Scheme) गेल्या अनेक वर्षांपासून गुंतवणुकीच्या विविध योजना नागरिकांसाठी देत आहेत. तुम्ही काही महिने किंवा वर्षासाठी देखील ठराविक रक्कम भरून चांगली गुंतवणूक करू शकता. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्ही 115 महिन्यात पैसे गुंतवू शकता आणि त्यानंतर तुमचे पैसे डबल होतील.

किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसची एक लोकप्रिय योजना आहेत या योजनेमध्ये 115 महिने तुम्हाला पैसे गुंतवावे लागतात. त्यानंतर तुम्हाला डबल पैसे मिळतात. ही योजना नक्की काय आहे? हे आपण जाणून घेऊया. पोस्ट ऑफिसच्या किसान पत्र योजनेअंतर्गत तुम्हाला कितीही खाती उघडता येतातम या योजनेवर सध्या 7.5% एवढे व्याजदर मिळतेम दर तीन महिन्यांनी या वास व्याजदरात बदल होत असतो. या योजनेमध्ये दोन प्रकारचे खाती असतात एक म्हणजे KVP आणि दुसरं म्हणजे NCS खाते. आता ही खाती कशी उघडायची हे आपण जाणून घेणार आहोत.

  • तुम्ही सगळ्यात आधी पोस्ट ऑफिस मध्ये KVP आणि दुसऱ्या NCS खाते असा लॉगिन अर्ज करा.
  • यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉगिन करा.
  • त्यानंतर तुम्ही जनरल सर्विसेस वर जा.
  • त्यानंतर सर्विस रिक्वेस्टवर जाऊन शेवटी नवीन रिक्वेस्ट वर क्लिक करा.
  • यासाठी NCS खाते उघडण्यासाठी NCS खात्यावर क्लिक करा तसेच KVP खाते उघडण्यासाठी KVP खात्यावर क्लिक करा.
  • NCS खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम जमा करा यासाठी तुम्हाला किमान 1000 किंवा 100 च्या पटीत रक्कम भरावी लागेल.
  • त्यानंतर पोस्ट ऑफिस बचत खात्याची लिंक केलेले डेबिट कार्ड निवडा.
  • अति आणि सर्दी वाचा आणि त्यानंतर क्लिक सबमिट वर क्लिक करा.
  • ऑनलाइन खाते बंद करा
  • त्यानंतर तुम्ही ट्रांजेक्शन पासवर्ड टाकून सबमिट बटनावर क्लिक करा