Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 37

Extra Marital Affairs : लफडेबाजीत टॉपला आहे ‘हे’ शहर!! लग्नानंतर अफेअर्स करतातच

Extra Marital Affairs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Extra Marital Affairs । भारतात मागच्या काही दिवसापासून अनैतिक संबंधांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे तरी अफेयर्स आणि त्यातून होणाऱ्या खुनाच्या घटना बघायला मिळतायत. खास करून लग्नानंतर महिलांच्या अफेअर्स च्या गोष्टी चांगल्याच वाढलेल्या आहेत. घरात नवरा असतानाही दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध ठेवताना या महिलांना कसलीच भीती वाटत नाही. यामुळे देशाचं नाव सुद्धा खराब होत आहे. परंतु तुम्हाला माहितेय का? भारतातील कोणत्या शहरात सर्वात जास्त अनैतिक संबंधाच्या घटना घडतायत?? हे काय मुंबई, दिल्ली, बंगळुरू सारखं मोठं शहर नाही… तर तामिळनाडू राज्यातील एक लहान शहर आहे. आकाराने आणि लोकसंख्येने जरी लहान असलं तरी लफडेबाजीत मात्र हे शहर देशात टॉपला आहे.

आम्ही तुम्हाला ज्या शहराबद्दल सांगतोय त्याच नाव आहे कांचीपुरम…. विवाहबाह्य संबंधात (Extra Marital Affairs) हे शहर अग्रस्थानी आहे. डेटिंग वेबसाइट अ‍ॅशले मॅडिसनच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये कांचीपुरम १७ व्या स्थानावर होते, परंतु यावर्षी ते अचानक पहिल्या क्रमांकावर आले आहे. इथली सनम हि बेवफाच असते असं एकूण चित्र आहे.. त्यामुळे याठिकाणची महिला असो वा पुरुष लग्नानंतर अनैतिक संबंध ठेवण्याचे प्रमाण देशात एक नंबरला आहे. खरं तर मागच्या वर्षी या यादीत मुंबईचा पहिला क्रमांक होता, मात्र आता पण यावेळी मुंबईचे नाव टॉप 20 यादीतही नाही हि महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

लफडेबाजीत कोणकोणत्या शहरांचा समावेश –

कांचीपुरम
मध्य दिल्ली
गुरुग्राम
गौतम बुद्ध नगर
दक्षिण पश्चिम दिल्ली
डेहराडून
पूर्व दिल्ली
पुणे
बेंगळुरू
दक्षिण दिल्ली
चंदीगड
लखनऊ
कोलकाता
पश्चिम दिल्ली
कामरूप (आसाम)
उत्तर पश्चिम दिल्ली
रायगड
हैदराबाद
गाझियाबाद
जयपूर

अनैतिक संबंध का वाढलेत?

आजकाल अनैतिक संबंध (Extra Marital Affairs) वाढण्यामागे काही कारणे आहेत. मनाविरुद्ध लग्न करणे, नवऱ्याला असलेले व्यसन, शारीरिक आणि मानसिक त्रास, जुने प्रेमप्रकरण, पैशासाठी इतर पुरुषासोबत संबंध प्रस्तावित ठेवणे, अशा अनेक कारणांनी आजकाल देशातील अनैतिक संबंधांच्या घटना वाढत आहेत. कायद्यानुसार, विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नाही. सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये आयपीसीचे कलम 497 हे असंवैधानिक घोषित केले. आणि प्रौढांमधील संमतीने झालेले संबंध गुन्हा मानले जाऊ शकत नाहीत, असे नमूद केले. मात्र, हे संबंध घटस्फोटाचे निमित्त ठरू शकते.

Private Railway Station In India : देशातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन!! मिळतात या खास सुविधा

Private Railway Station In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Private Railway Station In India । भारतात रेल्वेचे जाळे प्रचंड आहे. कमी पैशात आणि आरामदायी प्रवास होत असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. महत्वाची बाब म्हणजे रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. मागच्या काही वर्षात तर रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. वंदे भारत ट्रेन, नमो भारत एक्सप्रेस, मेट्रो ट्रेन, मोनोरेल अशा नवनवीन आणि आधुनिक ट्रेन रेल्वेच्या ताफ्यात आल्या आहेत. दुसरीकडे अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून अनेक रेल्वे स्थानकांचाही चेहरामोहरा बदलला आहे. खरं तर भारतीय रेल्वे आणि स्टेशन्स हे केंद्रीय रेल्वे मंत्रालय अर्थात केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात. परंतु देशात असेही एक रेल्वे स्थानक आहे जे खासगी आहे. हे रेल्वे स्टेशन नेमकं कुठे आहे? यामध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात ते आपण जाणून घेऊयात.

देशातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन (Private Railway Station In India) हे काय मुंबई, पुणे दिल्ली किंवा कोलकाता सारख्या मोठ्या शहरात नाही तर भोपाळ मध्ये आहे. हबीबगंज रेल्वे स्टेशन असं या स्थानकाचे नाव आहे. हे स्टेशन सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत चालवले जात आहे. हबीबगंज रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास बन्सल ग्रुपने भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ (IRSDC) च्या सहकार्याने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी हबीबगंज रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. यानंतर या स्थानकाचे नामांतर राणी कमलापती रेल्वे स्टेशन केलं. स्टेशन कोड सुद्धा HBJ वरून RKMP मध्ये बदलण्यात आला.

कोणकोणत्या सुविधा मिळतात ? Private Railway Station In India

या रेल्वे स्टेशनवर 5 प्लेटफॉर्म, 6 ट्रॅक आहेत. पुनर्विकास केल्यानंतर अगदी विमानतळासारखी सुविधा याठिकाणी पाहायला मिळते. रिटेल दुकाने, फूड कोर्ट/कॅफे, आरामदायी वेटिंग लाऊंजसारख्या सुविधा या रेल्वे स्टेशनवर मिळतात. एस्कलेटर्स, लिफ्ट, ट्रॅव्हेलेटर; ब्रेल टाईमटेबल, दिव्यांगांसाठी सुविधा देण्यात आल्यात. सुरक्षेसाठी 160 CCTV कॅमेरा, SCADA स्वयंचलित मॉनिटरिंग, अग्नि सुरक्षा यंत्रणा तैनात आहेत. तसेच 300 कार, 850 दुचाकींसाठी भलीमोठी जागा आहे. हे रेल्वे स्थानक खाजगी कंपनीकडून चालवले जात असले तरी, मालकी भारतीय रेल्वेकडेच राहते हे मात्र याठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे.

India UK FTA : सर्वसामान्यांना दिलासा!! स्वस्तात मिळणार या वस्तू; FTA करार गेमचेंजर ठरणार

India UK FTA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन India UK FTA । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन दौऱ्यावर असून मोदींचा यंदाचा ब्रिटन दौरा खूप खास असणार आहे. या दौऱ्यामध्ये ते ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर आणि ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांची भेट घेतील. यावेळी मोदींच्या उपस्थितीत भारत आणि ब्रिटन आज लंडनमध्ये मुक्त व्यापार करारावर (एफटीए) स्वाक्षरी करणार आहे. या नवीन करारामुळे भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक, राजकीय आणि प्रादेशिक संबंधांना नवीन दिशा मिळेल. तसेच अनेक उत्पादनावरील आयात आणि निर्यात स्वस्त होईल. मात्र हा करार अंमलात येण्यापूर्वी त्याला ब्रिटिश संसदेची मान्यता आवश्यक असेल. या प्रक्रियेला सुमारे एक वर्ष लागू शकते.

भारत-यूके मुक्त व्यापार करार (India UK FTA) 2030 पर्यंत दोन्ही अर्थव्यवस्थांमधील व्यापार दुप्पट करून US $ 120 अब्ज पर्यंत पोहोचण्यास मदत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या उपस्थितीत व्यापक आर्थिक आणि व्यापार करारावर (एफटीए) स्वाक्षरी केली जाईल. या मुक्त व्यापार कराराचा परिणाम केवळ कंपन्या किंवा व्यावसायिकांपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावरही होईल. अनेक गोष्टी स्वस्त होऊ शकतात, तर काही गोष्टींच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

कोणत्या वस्तू स्वस्त होणार ? India UK FTA

भारत-ब्रिटन करारानंतर, अनेक उत्पादनांवरील कर कमी होईल. ज्यामुळे व्हिस्की, चॉकलेट, बिस्किटे, सॅल्मन मासे, कॉस्मेटिक वस्तू, वैद्यकीय उत्पादने, लक्झरी कार, मोबाईल, लॅपटॉप, गॅझेट्स, शूज, कपडे आणि फॅशन उत्पादने चामड्याची उत्पादनं स्वस्त होऊ शकतात. याशिवाय यूकेमधून येणाऱ्या दागिन्यांवरील कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्याने त्यांच्या किमतीही कमी होऊ शकतात.

दुसरीकडे, फक्त भारतच नव्हे तर ब्रिटन मधील लोकांनाही स्वस्तात काही वस्तू मिळणार आहेत. आजही ब्रिटन भारताकडून ११ अब्ज पौंड किमतीच्या वस्तू खरेदी करतो. परंतु करात कपात झाल्यामुळे ब्रिटनमधील लोकांना आणि व्यावसायिकांना भारतीय वस्तू खरेदी करणे आणखी सोपे होईल. यामध्ये चामडे, शूज, ऑटो पार्ट्स, सीफूड, खेळणी आणि कपड्याचा समावेश आहे. या ट्रेड डीलमुळे (India UK FTA) भारतीय उत्पादन, कापड, सागरी आणि दागिने क्षेत्रांना फायदा होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधील सागरी उत्पादनांची बाजारपेठ सुमारे ५० हजार कोटींची आहे, जिथे भारतीय उत्पादनांना आता स्पर्धा करणे सोपे जाईल आणि त्यांच्या उत्पादनांची पोहोच वाढवता येईल.

Shravan 2025 : श्रावणात मांसाहार का करत नाहीत?? धार्मिक नव्हे तर हे वैज्ञानिक कारणंही पहा

Shravan 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shravan 2025 । उद्यापासून श्रावण महिना सुरु होत आहे. श्रावण हा पवित्र महिना भगवान शिव यांना समर्पित आहे. यंदा २५ जुलै ते २३ ऑगस्ट या काळात श्रावण महिना आहे. श्रावण म्हंटल कि पहिल्यांदा आपल्या डोक्यात हे येत कि या महिन्यात मटण, चिकन, अंडी, मासे यांसारखा मांसाहार करायचा नाही. जवळपास ९० टक्के हिंदू श्रावणात मांसाहार करत नाही. उलट या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. श्रावणात उपवास, रुद्राभिषेक, पूजा व सात्विक जीवन पद्धतीचे पालन केले जाते. परंतु श्रावणात मांसाहार न करण्याचे फक्त धार्मिक कारणच आहे असे अजिबात नाही, तर यामागे काही वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. चला तर आज आपण जाणून घेऊयात कि श्रावण महिन्यात मांसाहार का करत नाहीत??

धार्मिक कारण –

श्रावण हा महिना (Shravan 2025) देवशिवासोबत तंतोतंत जोडलेला आहे. हा एक शुभ महिना मानला जातो. जस आम्ही आधीच सांगितलं कि, श्रावण महिना हा श्रावण हा पवित्र महिना भगवान शिव यांना समर्पित आहे. त्यामुळे भक्त पारंपारिकपणे उपवास करतात, मंदिरांना भेट देतात आणि सात्विक जीवनशैली स्वीकारतात. शंभो महादेवाला ‘पशुपतिनाथ’देखील म्हटले जाते म्हणजेच काय तरसंपूर्ण जीवजंतूंचा पालनहार….. त्यामुळे या महिन्यात शंकराची पूजा करताना जीव जपायचे म्हणून मांसाहार टाळला जातो. तसेच पूजापाठ करताना मांसाहार चालत नाही असेही हिंदू धर्मात मानले जाते.

वैज्ञानिक कारण- Shravan 2025

विज्ञानानुसार, श्रावण महिन्यात सूर्यप्रकाश खुप कमी वेळ असतो. पावसाळी वातावरणामुळे सगळीकडे गारवा आणि आद्रता वाढते. त्यामुळे आपली पचनक्रिया कमजोर होते. मांमांसाहारी अन्न खूप जड आणि चरबीयुक्त असते, जे सामान्यपेक्षा पचणे अधिक कठीण होते. अशावेळी शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. अपचन, गॅस आणि इतर पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे श्रावण महिन्यात (Shravan 2025) मांसाहार करणे योग्य नसल्याचं बोललं जाते.

पावसाळ्यात नद्या आणि तलावांसारखे पाण्याचे स्रोत दूषित होतात. परिणामी या पाण्यातील मासे देखील दूषित होऊ शकतात . दुसरीकडे, श्रावण महिना माशांच्या प्रजनन काळात येतो. या काळात, माशांमध्ये जैविक बदल होतात ज्यामुळे त्यांच्या गुणवत्तेवर आणि पौष्टिकतेवर परिणाम होतो. ते परजीवी आणि संसर्गांना देखील अधिक संवेदनशील असतात. त्यांच्या सेवनाद्वारे ते मानवांमध्ये पसरू शकतात. म्हणूनच, या काळात मासे खाणे अयोग्य मानले जाते.

Russian Plane Missing : मोठी बातमी!! विमान हवेतच झालं बेपत्ता; 50 प्रवाशांचा जीव संकटात

Russian Plane Missing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Russian Plane Missing मागच्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. अहमदाबाद येथील विमान अपघातांनंतर कुठ ना कुठे विमानातील तांत्रिक बिघाड समोर येत आहेत. विमानाच्या इंजिनला आग लागल्याच्या किंवा टायर फुटल्याचा घटना घडू लागल्यात. आता तर थेट रशियामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ५० प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेलं एक विमान गायब झालं आहे. या विमानाचा संपर्क तुटला असून एका मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.

कुठे निघाले होते विमान – Russian Plane Missing

रशियाच्या राज्य वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या वृत्तानुसार, या विमानाचे नाव An-24 असं आहे. यातून जवळपास ५० प्रवासी प्रवास करत होते. अंगारा एअरलाइन्सच्या या विमानाने टिंडासाठी उड्डाण केले होते परंतु ते डेस्टिनेशन वर पोहोचण्यापूर्वीच त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. जेव्हा या विमानाशी शेवटचा संपर्क साधला गेला तेव्हा ते टिंड विमानतळापासून काही किलोमीटर अंतरावर होते. तेव्हापासून त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही. खरं तर हा परिसर चीनच्या सीमेजवळ आहे आणि या भागातील हवामान जवळजवळ नेहमीच खूप खराब असते, ज्यामुळे विमानांना उड्डाण करणे खूप आव्हानात्मक बनते. त्यामुळे मोठी दुर्घटना तर झाली नाहीयेना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

प्रवासी विमान बेपत्ता झाल्याचे समजताच स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरणाने तातडीने शोध मोहीम सुरू केली. जंगले आणि डोंगराळ भागात बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. ज्या प्रदेशात विमान बेपत्ता झाले आहे तो डोंगराळ भाग आहे, त्याठिकाणी घनदाट जंगले आहेत. सदर भागात खूप थंडीचे वातावरण असल्याने हवामानाच्या दृष्टीने सुद्धा हा एक आव्हानात्मक मार्ग आहे. त्यामुळे विमान क्रॅश (Russian Plane Missing) तर झालं नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, त्याच अमूर प्रदेशात तीन जणांसह रॉबिन्सन R66 हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. हा प्रदेश मॉस्कोपासून अंदाजे ६,६०० किमी पूर्वेला आहे.

BSF Recruitment 2025 : 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!! BSF अंतर्गत 3588 पदांची भरती

BSF Recruitment 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BSF Recruitment 2025 । १० वी पास असणाऱ्या आणि सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. सीमा सुरक्षा दलात (BSF) ३५८८ पदांची भरती जाहीर झाली आहे. ट्रेड्समन या पदासाठी हि भरती सुरु असून इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 26 जुलै पासून सुरु होणार आहे तर अंतिम तारीख २५ ऑगस्ट आहे. BSF अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीसाठी काय पात्रता आहे? सिलेक्शन कस होणार आणि अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात.

एकूण पदसंख्या –

कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) – पुरुष – 3,406 पदे
कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) – महिला – 182 पदे

शैक्षणिक पात्रता: BSF Recruitment 2025

कुक, वॉटर करिअर, वेटर या पदांच्या भरतीसाठी सदर उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा + मान्यताप्राप्त संस्थेतून अन्न उत्पादन/स्वयंपाकघर अभ्यासक्रम केलेला असावा

सुतार, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, अपहोल्स्टर या पदांच्या भरतीसाठी सदर उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा + संबंधित ट्रेड मध्ये एक वर्षाचा डिप्लोमा + एक वर्षाचा अनुभव असावा.

मोची, शिंपी, धोबी, नाई, सफाई कामगार, खोजी/सायस पदांच्या भरतीसाठी सदर उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा+ संबंधित ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • या भरतीसाठी (BSF Recruitment 2025) सदर उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे (राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट असेल).

अर्ज शुल्क –

जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. १००/- • एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: रु. ०/

निवड कशी होईल ?

१. शारीरिक चाचणी
२. लेखी परीक्षा
३. कागदपत्र पडताळणी
४. वैद्यकीय तपासणी

पगार:

निवडलेल्या उमेदवारांना वेतन रेंज ३ च्या आधारे २१७०० ते ६९१०० रुपये पगार मिळेल. यासोबतच, त्यांना घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, महागाई भत्ता आणि बरेच काही असे अतिरिक्त भत्ते मिळतील. BSF Recruitment 2025

अर्ज कसा कराल –

सर्वात आधी https://rectt.bsf.gov.in या अधिकृत भरती वेबसाइटला भेट द्या
यानंतर वैध ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरसह नोंदणी करा
आता लॉग इन करा आणि अचूक तपशीलांसह अर्ज फॉर्म भरा
शैक्षणिक प्रमाणपत्रे, आयडी प्रूफ आणि फोटोसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
र्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा

Bachhu Kadu Chakkajam Andolan : गांधीगिरी संपली, आता भगतसिंगगिरी सुरू; शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक

Bachhu Kadu Chakkajam Andolan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bachhu Kadu Chakkajam Andolan। आता गांधीगिरी संपली आणि भगतसिंग गिरी सुरू झाली, तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है असं म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकार विरोधातील आपली आक्रमकतेचा धार आणखी बोथट केली आहे. शेतकरी कर्जमाफीचा नि पिकाला हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी आज बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडू यांनी यापूर्वी ८ दिवस अन्नत्याग उपोषण केलं होते. यानंतर विदर्भात पदयात्रा काढली. त्याचवेळी त्यांनी आंदोलनाची दिशा ठरवली. आता सरकारला आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी रस्त्यावरची लढाई करण्यात आली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात बच्चू कडू यांच्याकडून चक्काजाम आंदोलन (Bachhu Kadu Chakkajam Andolan) करण्यात आले. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचे आक्रमक रूप बघायला मिळालं. ठिकठिकाणी टायर जाळण्यात आले. सरकार विरोधीच घोषणाबाजी करण्यात आली. शेतमजूर, दिव्यांग, शेतमजूर, मच्छिमार, मेंढपाळ अशा सर्वच समाजातील लोकांनी या चक्काजाम आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच अनेक आमदार- खासदार यांच्यासह काही राजकीय पक्षांनीही बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दिला.

गांधीगिरी संपली आता भगतसिंगगिरी सुरू- Bachhu Kadu Chakkajam Andolan

परतवाडा येथील चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू यांनी म्हंटल, कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर येत आहेत, तर मच्छीमार, दिव्यांग, मेंढपाळ आदी घटकांच्या समस्याही गंभीर आहेत. मात्र, सरकारकडून सातत्याने दिशाभूल केली जात आहे. सरकारलाच राज्यात अशांतता हवी आहे. त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा होत नाही. सरकारने जी समिती नेमली, त्याचे अध्यक्ष म्हणतात मला अध्यक्ष नेमलं म्हणून मलाही माहिती नाही. त्यामुळे आता आमची गांधीगिरी संपली आणि भगतसिंग गिरी सुरू झाली आहे. आम्ही गुन्हे दाखल होण्यास घाबरणार नाही, आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसू असा इशारा बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला.

Lavasa City : महाराष्ट्रातील ‘हे’ शहर देतंय इटलीचा फील; फोटो पाहूनच व्हाल चकित

Lavasa City

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Lavasa City । पावसाळा म्हंटल कि कुठंतरी पर्यटनाला जाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही.. खास करून हिल स्टेशन, धबधबे अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. तुम्हीही पावसाळ्याच्या पर्यटन करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका अनोख्या हिल स्टेशन बाबत सांगणार आहोत ज्याठिकाणी जाताच तुम्हाला वाटेल कि आपण जणू युरोप मध्येच आलोय. तुम्हाला याठिकाणी इटलीत आल्यासारखाच फील होईल.. दोन्ही बाजूला सेम इटली सारखी घरे.. आणि मध्ये पाण्याचा कालवा… ओळखलंत ना? बरोब्बर आम्ही बोलतोय लवासा बद्दल… पुण्याच्या शेजारी असलेल्या या प्रसिद्ध सिटी बद्दल…

फोटोग्राफी प्रेमींसाठी लवासा म्हणजे जणू स्वर्गच- Lavasa City

लवासा (Lavasa City) हे पुणे जवळील खासगी hill city आहे, ज्याला “युरोपियन टच” दिलेला आहे. पुण्यापासून 65 किमी आणि मुंबईपासून 195 किमी अंतरावर Warasgaon Lake च्या परिसरात व सात डोंगरांच्या घेरात हे शहर वसलेले आहे. लवासाचे संपूर्ण नियोजन तेलग्रामातील पोर्टोफिनो या इटालियन शहरावरून प्रेरित आहे.

फोटोग्राफीसाठी परफेक्ट स्पॉट म्हणूनही याची ओळख आहे. लवासाचे डिझाईन इतकं सुंदर केलं आहे की ते पाहताना तुम्हाला इटलीतल्या एखाद्या छोट्याशा शहराची आठवण येईल. स्वच्छ वातावरण, उच्च दर्जाची हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, मनोरंजन पार्क आणि इतर सुविधांमुळे ते तुम्हाला दुसऱ्या देशात असल्याचे फील मिळेल. फोटोग्राफी प्रेमींसाठी लवासा म्हणजे जणू स्वर्गच आहे. याठिकाणी असलेल्या रंगीबेरंगी इमारती, तलावाचं सौंदर्य, आणि प्रत्येक कोपर्‍यावर असलेली वॉल आर्ट तुम्हाला नक्कीच भुरळ पाडेल.

लवासा मध्ये (Lavasa City) तुम्ही लेकसाईड प्रोमेनेड, टेमघर धरण, दासवे दृष्टिकोन, बांबूसा, तिकोना किल्ला, देवकुंड धबधबा, वरसगाव धरण याठिकाणी पर्यटन करू शकता.
लवासामध्ये असलेला घाणागड किल्ला ताम्हिणी घाटाजवळ आहे. मध्ययुगीन काळात बांधलेल्या या किल्ल्यानं एकेकाळी मराठे, पेशवे आणि इंग्रज यांच्यातील अनेक युद्धे पाहिली आहेत हा किल्ला त्या युद्धाचा साक्षी आहे.

मुठा नदीवर वसलेले टेमघर धरण हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे तसेच एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. आजूबाजूची हिरवळ आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. लवासा मध्ये तुम्ही बोटिंग, जेट स्कीइंग, क्रूझ राईड्स, ट्रेकिंग, सायकलिंग अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकता.

Bullet Train : बुलेट ट्रेन कधी धावणार?? रेल्वेमंत्र्यांनी तारीखच सांगून टाकली

Bullet Train Updates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bullet Train। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे. भारतातील हि पहिलीच बुलेट ट्रेन असल्याने ती कधीपासून सुरु होणार? याची उत्सुकता लागली आहे. आता खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच बुलेट ट्रेन पटरीवर कधी धावणार याबाबत अपडेट दिली आहे. संसदेत बोलताना अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल कि, २०२९ पर्यंत मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे संपूर्ण काम पूर्ण होईल.

बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) कामाबाबत अपडेट्स देताना अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल, वापी ते साबरमती दरम्यान बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होईल. महाराष्ट्र ते साबरमती विभागाचा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होईल. बुलेट ट्रेन प्रकल्प खूप गुंतागुंतीचा आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. त्याच्या पूर्णतेचा अचूक कालावधी तेव्हाच निश्चित करता येईल जेव्हा त्याच्याशी संबंधित सर्व बांधकाम कामे जसे की नागरी संरचना, ट्रॅक, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन, ट्रेनसेट्सचा पुरवठा पूर्ण होईल.

अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा (Bullet Train) एकूण खर्च १,०८,००० कोटी रुपये आहे, त्यापैकी ८१ टक्के म्हणजे ८८,००० कोटी रुपये जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जिका) कडून निधी दिला जात आहे, तर राहिलेल्या २०००० कोटीमधील १०००० कोटी महाराष्ट्र सरकार आणि १०००० कोटी रुपये गुजरात सरकार देत आहे. ३० जून २०२५ पर्यंत या प्रकल्पावर एकूण ७८,८३९ कोटी रुपये खर्च झाले आहेत अशी माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली.

कुठून कशी धावणार बुलेट ट्रेन ? Bullet Train

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, महाराष्ट्र, दीव दमन आणि गुजरात मधून धावेल. या बुलेट ट्रेनला मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती असे १२ थांबे असतील. अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल कि, ३९२ किमी घाट बांधकाम, ३२९ किमी गर्डर कास्टिंग आणि ३०८ किमी गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण झाले आहे. तर समुद्राखालील बोगद्याचे (सुमारे २१ किमी) काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रात भूसंपादनास विलंब झाल्यामुळे २०२१ पर्यंत प्रकल्प प्रभावित झाला होता. मात्र सध्या MAHSR प्रकल्पासाठी संपूर्ण जमीन (१३८९.५ हेक्टर) संपादित करण्यात आली आहे. अंतिम स्थान सर्वेक्षण आणि भू-तांत्रिक तपासणी देखील पूर्ण झाली आहे आणि संरेखन देखील अंतिम करण्यात आले आहे.

Indian Railways Rules : सर्वसामान्यांना मोठा दिलासा!! रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय

Indian Railways Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways Rules । रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वे विभागाने आपत्कालीन कोटा (EQ) अंतर्गत तिकिटे बुक करण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. या नव्या नियमामुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा लवकर त्यांच्या रिक्वेष्ट पाठवणे बंधनकारक केले आहे. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवाशांनी आता ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या किमान एक दिवस आधी त्यांची विनंती दाखल करावी. रेल्वे मंत्रालयाने अलीकडील निर्णयानुसार हा बदल केला आहे की ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्यासाठी रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी आरक्षण चार्ट तयार केले जातील.

रेल्वेने नेमकं काय म्हटले ? Indian Railways Rules

आपत्कालीन कोट्याच्या नियमांमध्ये बदल करण्यासंबंधीचे एक परिपत्रक रेल्वे मंत्रालयाने जारी केले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, “०००० ते १४०० तासांच्या दरम्यान सुटणाऱ्या सर्व गाड्यांसाठी आपत्कालीन कोट्याची विनंती प्रवासाच्या आदल्या दिवशी १२०० तासांपर्यंत इमर्जन्सी कोटा EQ सेलवर पोहोचली पाहिजे. तसेच १४०१ ते २३५९ तासांच्या दरम्यान सुटणाऱ्या उर्वरित सर्व गाड्यांसाठी आपत्कालीन कोट्याची विनंती प्रवासाच्या आदल्या दिवशी १६०० तासांपर्यंत EQ सेलवर पोहोचली पाहिजे.

खरं तर इमर्जन्सी कोटा (Indian Railways Rules) जागा व्हीआयपी, रेल्वे कर्मचारी आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असलेल्या प्रवाशांसाठी राखीव आहेत. परंतु, या सुविधेचा गैरवापर आणि शेवटच्या क्षणी केलेल्या विनंत्यांमुळे चार्ट तयार करण्यास उशीर होत आहे. परिणामी वेटिंग लिस्ट मधील तिकीट कन्फर्म करण्यात अडचणी येतात आणि प्रवाशांची गैरसोय होतेय.

यापूर्वी, रेल्वे बोर्डाने ट्रेनचा आरक्षण चार्ट ४ तासांऐवजी ८ तास आधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. दुपारी २ च्या आधी सुटणाऱ्या गाड्यांसाठी, चार्ट आदल्या दिवशी रात्री २१:०० वाजता तयार करण्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय, रेल्वेकडून प्रवासी आरक्षण प्रणालीत बदल करण्याची चर्चा देखील झाली होती. रेल्वे मंत्रालयाने सर्व अधिकाऱ्यांना या वेळापत्रकांचे पालन करण्याचे (Indian Railways Rules) आवाहन केले आहे जेणेकरून तिकीट वाटप वेळेत होईल आणि चार्ट तयार होण्यास उशीर होणार नाही. यामुळे गाडी सुटण्यासही उशीर होणार नाही आणि प्रवाशांना अडचणीचा सामनाही करावा लागणार नाही .