Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 361

मत मोजणीपर्यंत EVM मशीन कुठे ठेवतात ? अशी असते सुरक्षा

EVM machine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. आणि आता सगळ्यांचे लक्ष निकालाकडे आहे. 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. आपण ईव्हीएम मशीनमध्ये आपले मतदान करत असतो. त्यामुळे ईव्हीएम मशीन मतदान झाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी ठेवणे खूप गरजेचे असते. कारण त्यावर समोरच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असते. परंतु मतदान झाल्यानंतर निकाल लागेपर्यंत या ईव्हीएम मशीन कुठे असतात? कोणत्या ठिकाणी ठेवल्या जातात? तसेच या रूमची चावी कोणाकडे असते? अशा अनेक प्रश्न लोकांना पडलेले असतात. आणि तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन या सील करून एका स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जातात आणि मत मोजणी होईपर्यंत या मशीन त्या ठिकाणी अत्यंत सुरक्षित असतात मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रावरून या ईव्हीएम मशीन थेट त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जातात.

मतदान झाल्यानंतर निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन मधील मतदारांची नोंदणी तपासताना मतदारांची संख्या आणि मत या सगळ्या गोष्टी नीट तपासल्या जातात आणि मशीन सील केले जाते. जेव्हा सर्व ईव्हीएम एकत्र येतात. त्यानंतर स्ट्रॉंग रूममध्ये त्या सील करून ठेवल्या जातात. उमेदवारांचे प्रतिनिधी ही यावेळी सील तपासतात. आणि त्यावर सही करून ठेवतात. या स्ट्रॉंग रूम मध्ये कोणीही जाऊ शकत नाही. निवडणूक आयुक्त या सुरक्षतेची पूर्ण काळजी घेतात. निवडणूक आयोग तीन पातळ्यांवर स्ट्रॉंग रूमचे संरक्षण करतात. या रूमची अंतर्गत सुरक्षा ही केंद्रीय निमलष्करी दलाकडे असते. यांच्या आत आणखी एक सुरक्षा आहे. ती स्ट्रॉंग रूमच्या आत असते. जी केंद्रीय बलाद्वारे केली जाते. तसेच सर्वात बाहेरील सुरक्षा ही राज्य पोलीस दलाची असते.

जिल्ह्यातील सर्व ईव्हीएम मशीन हे जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या देखरेखी खाली असतात. त्यामुळे डबल लॉक सिस्टीम आहे. यासोबतच सीसीटीव्ही देखील या ठिकाणी असतो. यावर्षी महाराष्ट्रात 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. तसेच 23 नोव्हेंबर रोजी उद्या या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आता नक्की कौल कोणाच्या बाजूने लागेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहेत. तसेच निवडणुकीचा एक्झिट पोल देखील समोर आलेला आहे. परंतु आता खरा निकाल हा आपल्याला 23 नोव्हेंबर रोजी पाहायला मिळणार आहे.

शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी बातमी, सरकारने 5.8 कोटी रेशन कार्ड केले रद्द

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्हीही शिधापत्रिकाधारक असाल आणि दरमहा सरकारच्या स्वस्त किंवा मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कारण आता केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून ५.८ कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. डिजिटलायझेशन ड्राइव्ह चालवल्याने हे सर्व शक्य झाले आहे. देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) बरेच बदल झाले आहेत आणि 5.8 कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा कार्यक्रमांसाठी नवीन मानके प्रस्थापित झाली आहेत.

मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की 80.6 कोटी लाभार्थ्यांना सेवा देणाऱ्या PDS प्रणालीतील सुधारणांचा भाग म्हणून, आधार आणि इलेक्ट्रॉनिक ई-केवायसीद्वारे पडताळणीच्या प्रणालीद्वारे 5.8 कोटी बनावट रेशन कार्ड काढले जातील. निवेदनानुसार, ‘या प्रयत्नांनंतर अनियमितता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे आणि योग्य लोकांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे.’ यापैकी ९९.८ टक्के लोक आधारशी जोडलेले आहेत आणि ९८.७ टक्के लाभार्थ्यांची ओळख बायोमेट्रिक्सद्वारे सत्यापित करण्यात आली आहे.

देशभरातील रास्त भाव दुकानांमध्ये ५.३३ लाख ई-पीओएस उपकरणे बसवण्यात आली आहेत. याद्वारे धान्य वितरणादरम्यान आधारद्वारे पडताळणीसह योग्य व्यक्तीपर्यंत रेशनचे वाटप करण्यात येत आहे. मंत्रालयाने सांगितले की, ‘आज एकूण धान्यांपैकी सुमारे 98 टक्के धान्य आधार पडताळणीद्वारे वितरित केले जात आहे. यामुळे गैर-पात्र लाभार्थी दूर करण्यात आणि काळाबाजार कमी करण्यात मदत झाली आहे.

सरकारच्या ई-केवायसी उपक्रमाद्वारे एकूण PDS लाभार्थ्यांपैकी 64 टक्के आधीच सत्यापित केले गेले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांसाठी देशभरातील रेशन दुकानांवर प्रक्रिया सुरू आहे. पुरवठ्याच्या बाबतीत, मंत्रालयाने सांगितले की भारतीय खाद्य निगम (FCI) ने अन्नधान्य योग्य ठिकाणी पाठवण्यासाठी रेल्वेसह एकात्मिक वाहन देखरेख प्रणालीसह अन्न पुरवठ्याचे वास्तविक-वेळ निरीक्षण करण्यासाठी पुरवठा व्यवस्थापन प्रणाली लागू केली आहे. ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेमुळे देशभरात शिधापत्रिकांची पोर्टेबिलिटी शक्य झाली आहे.

‘एक देश एक शिधापत्रिका’ योजनेमुळे लाभार्थ्यांना त्यांचे रेशन कार्ड वापरून देशात कुठेही रेशन मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, “डिजिटायझेशन, लाभार्थींची अचूक ओळख आणि पुरवठा प्रणालीमध्ये नवीनता याद्वारे सरकारने अन्न सुरक्षा उपक्रमांसाठी जागतिक मानदंड सेट केला आहे.” यामुळे सिस्टीममधील बनावट कार्ड आणि चुकीच्या नोंदी नष्ट करताना खऱ्या लाभार्थ्यांना वितरण सुनिश्चित केले आहे.

1 जानेवारीपासून बदलणार दूरसंचारचे नियम, Jio, Airtel, Voda, BSNL वर थेट होणार परिणाम

telecom industry

सरकारकडून वेळोवेळी दूरसंचार नियम बदलले जातात. दूरसंचार कायद्यात काही नवीन नियम लागू करण्यात आले. आता याचेही पालन करावे, असे सांगण्यात आले. सर्व राज्यांना या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. याला राइट ऑफ वे (RoW) नियम असे नाव देण्यात आले. प्रत्येक राज्याला त्याचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आणि विविध राज्यांना शुल्कात सूटही देण्यात आली.

30 नोव्हेंबरपर्यंत उत्तर मागितले

नवीन नियम १ जानेवारीपासून लागू होणार असल्याचा दावा ईटीच्या अहवालात करण्यात आला आहे. ऑप्टिकल फायबर आणि टेलिकॉम टॉवर्स बसवण्यास चालना मिळेल. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्सनाही यातून खूप मदत मिळणार आहे. दूरसंचार विभागाचे सचिव नीरज मित्तल यांनी याप्रकरणी सर्व राज्यांच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी याची खात्री करावी, असे ते म्हणाले. RoW पोर्टलचे नवीन नियम 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत.

मित्तल यांनी लिहिले की, ‘नवा नियम जानेवारी 2025 पासून लागू झाला पाहिजे. सध्याचे RoW नियम इथेच थांबले पाहिजेत. म्हणजेच आता नवीन नियम लागू होणार आहे. नवीन नियम आल्यानंतर, राज्यांना अधिक अधिकार दिले जातील जेणेकरुन ते स्वत: या विषयावर प्राधिकरणाला स्पष्टीकरण देऊ शकतील.

RoW नियम काय आहेत?

जर आपण RoW नियम सोप्या शब्दात समजून घेतला, तर तोच नियम सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेवर टॉवर्स किंवा टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मानके ठरवतो. त्याच्या मदतीनेच सरकार दूरसंचार पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणावर भर देत आहे.मालमत्ता मालक आणि दूरसंचार प्रदाते फक्त RoW नियमांचे पालन करतात. या कारणास्तव सार्वजनिक सुरक्षा आणि पारदर्शकतेला खूप महत्त्व दिले जाते. नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून येथे आहेत, त्यानंतर बरेच बदल दिसून येतील.

5G वर पूर्ण लक्ष

RoW च्या नवीन नियमांमध्ये 5G वर अधिक भर दिला जात आहे. आता दूरसंचार पायाभूत सुविधा वेगाने स्थापित केल्या जात आहेत. हा नियम वेगवान नेटवर्कसाठी खूप सकारात्मक वाटतो कारण 5G साठी नवीन टॉवर स्थापित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. यामध्ये कमाल मर्यादाही निश्चित करण्यात येणार आहे.

‘या’ बँकेने वाढवला FD वरील व्याजदर; मिळणार आकर्षक रिटर्न

FD interest rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब अँड सिंध बँकेने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) योजनांवर व्याज दरांमध्ये सुधारणा करत ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदराचा प्रस्ताव ठेवला आहे. या नवीन व्याज दरांचा लाभ 14 नोव्हेंबर 2024 पासून नव्याने सुरु होणाऱ्या एफडींवर लागू होणार आहे. विशेष म्हणजे सुपर वरिष्ठ नागरिक ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांना अतिरिक्त व्याजदराचा फायदा मिळणार आहे. बँक 7 दिवसांपासून 10 वर्षांच्या कालावधीसाठी एफडी ठेवीवर 4% ते 7.45% पर्यंत वार्षिक व्याजदर देत आहे.

वरिष्ठ नागरिकांना फायदेशीर –

सामान्य नागरिकांसाठी कमाल व्याजदर 7.50% असून, तो 555 दिवसांच्या नॉन-कॉलेबल FD वर दिला जातो. वरिष्ठ नागरिकांना 0.50% अधिक व्याजदराचा फायदा असून, 555 दिवसांच्या नॉन-कॉलेबल एफडीवर हा दर 8% आहे. सुपर वरिष्ठ नागरिकांसाठी बँक 0.15% अतिरिक्त व्याजदर देते, जो विशेष कालावधीच्या एफडींवर लागू आहे. या विशेष कालावधीमध्ये 222, 333, 444, 555, 777, 999 दिवस यासह 22, 44 आणि 66 महिन्यांच्या PSB ग्रीन अर्थ एफडींचा समावेश आहे. त्यामुळे दीर्घकालीन बचतीच्या दृष्टीने सुपर वरिष्ठ नागरिकांना अधिक फायदा मिळणार आहे.

व्याज दरांमध्ये सुधारणा –

पंजाब अँड सिंध बँकेने आपल्या एफडी योजनांसाठी व्याज दरांमध्ये सुधारणा करत आकर्षक परताव्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 7-14 दिवसांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 4.00%, वरिष्ठ नागरिकांना 4.50%, आणि सुपर वरिष्ठ नागरिकांना 4.65% वार्षिक व्याजदर मिळतो. विशेषतः 555 दिवसांच्या नॉन-कॉलेबल एफडीसाठी सामान्य नागरिकांना 7.50%, वरिष्ठ नागरिकांना 8.00%, तर सुपर वरिष्ठ नागरिकांना 8.15% व्याजदर दिला जातो, जो दीर्घकालीन बचतीसाठी अत्यंत लाभदायक आहे. 777 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांसाठी 7.25%, वरिष्ठ नागरिकांसाठी 7.75%, आणि सुपर वरिष्ठ नागरिकांसाठी 7.90% व्याजदर आहे, तर 999 दिवसांच्या नॉन-कॉलेबल एफडीवर सामान्य नागरिकांना 7.40%, वरिष्ठ नागरिकांना 7.90%, आणि सुपर वरिष्ठ नागरिकांना 8.05% व्याज मिळते.

चांगला आर्थिक आधार –

या विशेष व्याजदरांमुळे विविध वयोगटांतील ग्राहकांसाठी गुंतवणुकीच्या संधी अधिक फायदेशीर ठरत आहेत. वरिष्ठ नागरिक आणि सुपर वरिष्ठ नागरिकांसाठी या व्याजदर वाढीमुळे त्यांच्या निवृत्ती योजनांमध्ये चांगला आर्थिक आधार मिळेल. विशेषतः दीर्घकालीन मुदतीच्या ठेवींसाठी उच्च परतावे देऊन बँक आपल्या ग्राहकांना त्यांच्या बचतीवर जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.

‘या’ दोन बँकांच्या 3 वर्षांच्या FD वर मिळणार बेस्ट व्याजदर ; जाणून घ्या

FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुंतवणूकदार फिक्स डिपॉझिट (FD) गुंतवणुकीसाठी सरकारी बँका सर्वाधिक सुरक्षित मानल्या जातात. निश्चित परताव्यामुळे अनेक गुंतवणूकदार FD ला प्राधान्य देताना दिसत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) या देशातील प्रमुख सरकारी बँका आहेत. हे ग्राहकांना नेहमी चांगल्या सेवा देत असतात, त्यामुळे ग्राहकांचा त्यांच्यावर अधिक विश्वास आहे. या दोन्ही बँकांच्या 3 वर्षांच्या FD योजनांमध्ये व्याजदर कसे आहेत , हे आज आपण पाहणार आहोत .

SBI आणि PNB FD व्याजदर

SBI मध्ये 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी FD योजना उपलब्ध असून, सामान्य नागरिकांना 6.75% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.25% व्याजदर मिळतो. याउलट PNB 2 ते 3 वर्षांच्या FD वर सामान्य नागरिकांसाठी 7%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50%, तर सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी (80 वर्षांपेक्षा जास्त वय) 7.80% इतका परतावा देते. त्यामुळे गुंतवणूकदार या बँकांकडे आकर्षित होताना दिसतात.

1000 पासून FD उघडता येते

SBI आणि PNB या दोन्ही बँकांमध्ये किमान 1000 पासून FD उघडता येते. पण PNB च्या FD योजनांमध्ये सर्व विभागातील नागरिकांसाठी जास्तीत जास्त व्याजदर मिळतो. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी PNB हा अधिक लाभदायक पर्याय ठरतो. FD योजनांमध्ये वेळेआधी पैसे काढल्यास दोन्ही बँकांकडून प्री मेच्युरिटी पेनल्टी शुल्क लागू होऊ शकते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करताना काळजीपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आपले आर्थिक उद्दिष्ट आणि परताव्याची अपेक्षा यानुसार योग्य FD योजना निवडावी.

गुंतवणूक करून चांगला नफा

PNB च्या 3 वर्षांच्या FD योजना व्याजदराच्या बाबतीत SBI पेक्षा सरस आहेत. पण SBI ची विश्वासार्हता आणि देशभरातील मोठे नेटवर्कही विचारात घेण्यासारखे आहे. अधिक नफ्यासाठी PNB तर विश्वासार्ह सेवेसाठी SBI पर्याय निवडता येईल. आपल्या आर्थिक गरजेनुसार योग्य पर्याय निवडून सुरक्षित गुंतवणूक करून चांगला नफा मिळावा.

केंद्र सरकारने PF नियमांमध्ये केले मोठे बदल ; आता सेवांसह फायदे घेणे होणार सोपे

epfo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने प्रॉविडेंट फंड (PF) संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले असून आता पासबुक पाहणे, ऑनलाइन क्लेम करणे, ट्रॅक करणे आणि पैसे काढणे अधिक सोपे होणार आहे. पण यासाठी कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाचे टप्पे पूर्ण करावे लागणार आहेत. योजनांचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने मिळण्यासाठी सरकारने आधार पेमेंट ब्रिज व 100% बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 2024 – 25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित रोजगार प्रोत्साहन योजना (ELI) अधिकाधिक नियुक्त आणि कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी श्रम व रोजगार मंत्रालयाने EPFO ला विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले आहेत.

UAN 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत –

नियुक्त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आधार आधारित OTP प्रक्रियेद्वारे चालू करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया नव्या कर्मचाऱ्यांपासून सुरू होऊन सर्व विद्यमान कर्मचाऱ्यांवर लागू होणार आहे. UAN चालू झाल्यानंतर कर्मचारी EPFO च्या सर्व डिजिटल सेवा सहजपणे वापरू शकतात. या सेवांमध्ये तुम्हाला PF अकाउंटचे व्यवस्थापन , PF पासबुक पाहणे आणि डाउनलोड करणे , ऑनलाइन क्लेम सादर करणे , वैयक्तिक माहिती अपडेट करणे , क्लेमचा रिअल-टाइम स्टेटस ट्रॅक करणे इत्यादी फायदे होऊ शकतात. तसेच ही प्रक्रिया 24/7 सेवा प्रदान करते, ज्यामुळे तुम्हाला अधिक फायदे मिळणार आहेत.

कशी नोंदणी करावी –

हि सेवा चालू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही EPFO सदस्य पोर्टलला भेट द्या. नंतर Activate UAN लिंकवर क्लिक करा. त्यावर UAN, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि आधार लिंक असलेला मोबाइल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल , त्याला सहमती देऊन प्रक्रिया चालू ठेवा. या OTP साठी Get Authorization PIN वर क्लिक करा आणि OTP प्राप्त झाल्यानंतर तो टाकून द्यावा . नोंदणी यशस्वी झाल्यानंतर पासवर्ड नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवला जाईल. हि सर्व प्रक्रिया झाल्यानंतर UAN सक्रियतेसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा समावेश केला जाणार आहे. याच्यामुळे डिजिटल गती येण्यास मदत होणार आहे.

Zomato CEO ने दिली ही कसली जॉब ऑफर ?20 लाख रुपये जमा करून 1 वर्ष मोफत काम करा

zomato

जेवण आणि ग्रोसरी Zomato कंपनीच्या CEO दीपंदर गोयल एक अजिब नोकरीची घोषणा केली आहे. खरतर एखादी नोकरी लागली की त्यामधून कर्मचाऱ्यांना पगार मिळतो पण या नोकरीत चक्क तुम्हाला 20 लाख रुपये जमा करून 1 वर्ष मोफत काम करावे लागेल काहीशी ही जॉब ऑफर आहे. त्यामुळे ही आगळी वेगळी जॉब ऑफर सध्या चर्चेचा विषय बनली आहे. चला जाणून घेऊया …

डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato चे CEO दीपंदर गोयल यांनी एक अनोखी नोकरी ऑफर केली आहे. यामध्ये निवडलेल्या व्यक्तीला पहिल्या वर्षी 20 लाख रुपये जमा करावे लागतील. गोयल यांनी ‘चीफ ऑफ स्टाफ’ पदासाठीच्या संभाव्य उमेदवारांना पहिल्या वर्षासाठी 20 लाख रुपये भरण्यास सांगितले आहे. गोयल यांनी बुधवारी सांगितले की, ही रक्कम ना-नफा संस्था फीडिंग इंडियाला दान केली जाईल. त्या बदल्यात कंपनी उमेदवाराच्या पसंतीच्या धर्मादाय संस्थेला ५० लाख रुपये योगदान देण्याची ऑफर देईल.

पहिल्या वर्षी 20 लाख रुपये जमा करायचे

“माझ्यासोबत आणि ग्राहक तंत्रज्ञानातील काही अत्यंत विचारशील लोकांसोबत काम करण्याची ही संधी असेल. तथापि, ही भूमिका अशा नोकऱ्यांसह मिळणाऱ्या नेहमीच्या भत्त्यांसह पारंपारिक भूमिका नाही,” तो म्हणाला. पगाराच्या तपशिलावर गोयल यांनी लिहिले की, “पहिल्या वर्षी या पदासाठी कोणताही पगार असणार नाही. उलट तुम्हाला या संधीसाठी 20 लाख रुपये द्यावे लागतील. या ‘फी’ची 100 टक्के रक्कम थेट फीडिंग इंडियाला दिली जाईल

दुसऱ्या वर्षापासून पगार मिळेल

याबाबत बोलताना ते म्हणाले, “आम्ही आमच्या बाजूने हे स्पष्ट करू इच्छितो की आम्ही येथे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. तुमच्या आवडीच्या धर्मादाय संस्थेला आम्ही ५० लाख रुपये (कर्मचाऱ्याच्या पगाराच्या समतुल्य) योगदान देऊ. गोयल म्हणाले की, दुसऱ्या वर्षापासून आम्ही तुम्हाला सामान्य पगार (50 लाख रुपयांपेक्षा जास्त) देण्यास सुरुवात करू, परंतु आम्ही दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीलाच याबद्दल बोलू. गोयल यांनी अशा उमेदवारांना केवळ या पदासाठी अर्ज करण्यास सांगितले ज्यांना शिकण्याची संधी हवी आहे. आकर्षक, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी नाही.

जास्त अनुभवाची गरज नाही

पुढे ते म्हणाले , “याकडे एक शिक्षण कार्यक्रम म्हणून पहा ज्यामध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास दोन्ही आहे.” या भूमिकेत तुम्ही यशस्वी झालात की नाही. आम्हाला या भूमिकेसाठी शिकणारे लोक हवे आहेत, ‘बायोडेटा’ बनवणारे लोक नाहीत. गोयल म्हणाले की, या पदासाठी अशा व्यक्तीची आवश्यकता आहे ज्याला काहीतरी शिकण्याची इच्छा आहे, सामान्य ज्ञान आहे, सहानुभूती आहे आणि जास्त अनुभवाची आवश्यकता नाही. जेणेकरून त्याच्यावर कशाचेही ओझे पडू नये.

10000 लोकांचे अर्ज

दीपंदर गोयल यांनी सांगितले की, या पदासाठी त्यांच्याकडे 10,000 हून अधिक अर्ज आले आहेत. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज प्रक्रिया बंद होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गोयल यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये या पदासाठी उमेदवारांची पात्रता आणि जबाबदाऱ्या शेअर केल्या आहेत. पोस्टमध्ये या पदासाठी आदर्श व्यक्ती असे वर्णन केले आहे ज्याला “भूक”, “सहानुभूती” आणि “सामान्य ज्ञान” आहे, परंतु कोणताही ठोस अनुभव किंवा हक्काची भावना नसावी.

EV Windsor येण्यामुळे EV मार्केटमध्ये खळबळ ! टाटा मोटर्सला तगडे आव्हान

MG Windsor EV

गेल्या वर्षापर्यंत इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत मक्तेदारी असलेल्या टाटा मोटर्सला जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाकडून खडतर आव्हानाचा सामना करावा लागत आहे. कंपनीने आपली नवीन एमजी Windsor बाजारात आणल्यामुळे वेग वाढला आहे. Windsor ने ऑक्टोबरमध्ये इलेक्ट्रिक कारच्या एकूण घाऊक विक्रीत केवळ 30 टक्के योगदान दिले नही तर लॉन्च झाल्यापासून दररोज सरासरी किमान 200 बुकिंग मिळवले. MG Windsor EV ची डिलिव्हरी 12 ऑक्टोबरपासून सुरू झाली.

याव्यतिरिक्त, कंपनीला पहिल्या 24 तासांत 15,000 बुकिंग मिळाले, मॉडेलच्या आधारावर प्रतीक्षा कालावधी चार ते सहा महिन्यांपर्यंत वाढला. दुसरीकडे, EV क्षेत्रातील हळूहळू वाढत्या स्पर्धेमुळे, टाटा मोटर्सचा किरकोळ बाजारातील हिस्सा, जो ऑक्टोबर 2023 मध्ये 74 टक्के होता, तो ऑक्टोबर 2024 मध्ये 58 टक्क्यांवर घसरेल. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे.

JSW MG Motors ने बिझनेस स्टँडर्डला सांगितले की दर सहा महिन्यांनी एक मॉडेल लॉन्च करण्याची त्यांची योजना स्पर्धा आणखी वाढवू शकते. विशेष म्हणजे, MG च्या पोर्टफोलिओमध्ये EV चा वाटाही गेल्या वर्षीच्या केवळ 35 टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये जवळपास 70 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.


2024-25 मध्ये हा आकडा 50 टक्क्यांच्या श्रेणीत असेल आणि तिन्ही मॉडेल्स (धूमकेतू, ZS आणि विंडसर) खरेदीदार मिळतील अशी कंपनीची अपेक्षा आहे. घाऊक विक्रीच्या आकडेवारीनुसार, विंडसरने ऑक्टोबरमध्ये 3,116 वाहने विकली, जी संपूर्ण उद्योगाच्या 30 टक्के आहे.

थंडीत आंबत नाही इडलीचे पीठ? वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स ; पीठ टम्म फुगेल, इडल्याही होतील मऊसूत

साउथ इंडियन पद्धतीचा असलेला इडली हा नाश्त्याचा प्रकार आता जवळपास सगळ्या जगभर प्रसिद्ध आहे केवळ दाक्षिणात्य भागामध्ये नाही तर अख्ख्या भारतामध्ये ही डिश आवडीने खाल्ली जाते. जास्त तेलकट नसलेली पौष्टिक अशी इडली सर्वांनाच हवीहवीशी वाटते.

मात्र सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये इडलीचे पीठ आंबवण्याची प्रक्रिया लवकर होत नाही त्यामुळे इडलीचे पीठ फसफसत नाही आणि इडल्या चांगल्या होत नाहीत. अशावेळी करायचे काय? तर याच प्रश्नाचे उत्तर आजच्या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत. काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर इडलीचे पीठ मस्त फुगेल शिवाय इडल्या सुद्धा मउसूत होतील. चला तर मग जाणून घेऊया…

वापरा ह्या सोप्या ट्रिक्स

  • इडली बनवण्यासाठी चे पीठ बनवताना सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या त्यानंतर हे तांदूळ तुम्हाला पाच ते सहा तासांसाठी भिजवून घ्यायचे आहे.
  • दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उडदाची डाळ ही तांदळात न भिजवता उडदाची डाळ आणि एक चमचा मेथीचे दाणे हे वेगळ्या भांड्यामध्ये भिजत ठेवायचे आहे.
  • इडलीच्या पिठात पोहे घातल्यास इडल्या छान सॉफ्ट होतात. त्यामुळे 1/4 कप पोहे तीन चार तासांसाठी भिजत घाला आणि नंतर भिजत घातलेली उडदाची डाळ आणि पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  • नंतर तांदूळ देखील मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्या आणि हे पीठ आठ ते दहा तासासाठी आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी झाकून ठेवा.
  • सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे हे पीठ लवकर आंबत नाही त्यामुळे इडल्या फुगत नाहीत किंवा चवही बिघडते पीठ आंबवण्यासाठी उबदार वातावरणाची गरज असते. आठ-दहा तासांसाठी भिजवत ठेवतो ते उबदार ठिकाणी ठेवा.
  • पीठ आंबवण्यासाठी ठेवल्यानंतर डब्याच्या भोवती किंवा पातेल्याच्या भौतिक घोंगडी किंवा स्वेटर गुंडाळून ठेवा किंवा पीठ अशा ठिकाणी ठेवा जिथे थोडी तरी उब मिळेल
  • तुमच्या घरात जर ओव्हन असेल तर थोड्या वेळासाठी ओवन गरम करावं थोडासा गरम झाल्यानंतर स्विच ऑफ करा आणि आता त्यामध्ये पीठ ठेवा हे उष्णता पीठ आंबवण्यासाठी पुरेशी असते.
  • एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तांदूळ कमीत कमी पाण्याने बारीक करून घ्या तसेच पीठ मऊसर होते तसंच इडलीचे पीठ साधारण आठ तास तरी चांगले अंबायला हवे. थंडीत पीठ आंबण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.

फ्लॉवर आणि कोबी मधले किडे साफ करण्याची सोपी ट्रिक : वेळेचीही होईल बचत

kitchen tips

साध्या हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे या दिवसात विविध प्रकारच्या पालेभाज्या,फळभाज्या बघायला मिळतात. त्यातही 12 महिने बाजारात उपलब्ध असणारी भाजी म्हणजे फ्लॉवर आणि कोबी… ह्या दोन्हीही भाज्या खाणे आरोग्यासाठी हितकारक असते. मात्र ह्या भाज्या साफ करणे म्हणजे मोठे कटकटिचे काम.

कोबी फ्लॉवर यासारख्या भाज्या जमिनीला लागूनच उगवतात त्यामुळे त्याच्यामध्ये कीटक आढळण्याचे प्रमाण आधीक असते. या दोन्हीही भाज्यात अनेकदा अळ्या आणि जर तुम्ही बरकाईने पाहिले तर त्यांची अंडी सुद्धा दिसतील.

मात्र हे सर्व नीट नाही साफ झाले तर तुम्हाला मोठ्या समस्या येऊ शकतात. त्यामुळे, जुलाब,पोटदुखी, उलटी ऍलर्जी सुद्धा होऊ शकते. एवढेच नाही तर कोबी मधले कीटक हे दीर्घाकाल मेंदूमध्ये राहिल्याचे सुद्धा तुम्ही ऐकले असेल. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात कोबी आणि फ्लॉवर साफ करण्याच्या काही सोप्या आणि प्रभावी पद्धतीबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया….

फ्लॉवर कसा स्वच्छ करायचा?

  • नेहमी ताजा फ्लॉवर खरेदी करा. असा फ्लॉवर विकत घेऊ नका ज्यावर डाग आहे किंवा ते खाल्लेले दिसत आहे. भाजी बनवण्यापूर्वी फुलकोबीचे छोटे तुकडे आपल्या हातांनी करावेत म्हणजे त्यात काही कीटक असेल तर ते तुम्हाला दिसेल. फ्लॉवरच्या आतील अळीचा रंग हलका हिरवा असतो.
  • बऱ्याचदा भाजीतल्या आळ्या दिसत नाहीत म्हणून भांड्यात पाणी घाला आणि त्यात फ्लॉवर आणि थोडे मीठ घाला. आता गॅसवर एक मिनिट उकळा. असं केल्याने सर्व कीटक मरतील आणि बाहेर येतील. याशिवाय भाज्यांवरील कीटकनाशकांचा प्रभावही संपेल.
आता नळाच्या वाहत्या पाण्याखाली पुन्हा एकदा पूर्णपणे स्वच्छ करा. तुम्हाला हवे असल्यास बर्फाच्या पाण्यात एक मिनिट ठेवूनही तुम्ही ते स्वच्छ करू शकता. यामुळे फ्लॉवर शिजवताना ओलसर होणार नाही. तुम्ही त्याला फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत देखील ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला भाजी किंवा फ्लॉवरचा पराठा बनवायचा असेल तेव्हा तुम्ही बनवू शकता. जर तुम्ही ब्रोकोली खात असाल तर त्याला देखील याच पद्धतेने स्वच्छ करा.

कोबी कशी स्वच्छ करावी?

आधी कोबी कापून घ्या. एका भांड्यात पाणी टाकून ठेवा आणि दोन ते तीन वेळा चांगले धुवा. आता एका भांड्यात पाणी घेऊन. त्यात १-२ चमचे व्हाईट व्हिनेगर घाला. त्यात चिरलेला कोबी घाला आणि दोन-तीन मिनिटे सोडा. जंतू, बॅक्टेरिया आणि बुरशी दूर करण्यासाठी व्हिनेगर प्रभावी ठरू शकते. यावरील किडे इतके लहान असतात की ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत पण ते पानांच्या आता असतात.