Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 362

गौतम अदानींना एकाच दिवशी मोठा दणका! 2.45 लाख कोटी प्रकरणी मागितले स्पष्टीकरण

gautam adani

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून गौतम अदानींचे (Gautam Adani) नाव पुढे घेतले जाते. मात्र गौतम आदानी हे सध्या अडचणीत असल्याचे दिसत आहे. कारण गौतम अदानीच्या विरोधात फसवणूक आणि आणि लाचखोरी प्रकरणी अमेरिकेतील फेडरल कोर्टाने अतिशय महत्त्वाचा निर्णय सुनावला असतानाच आता देशातील सर्वात श्रीमंत उद्योग समूह अशी ओळख असलेल्या आदानी ग्रुपमध्ये आणखी एक मोठा भूकंप झाला आहे. आदानींच्या आलेल्या बातमीनंतर शेअर बाजारात देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. या बातमीनंतर आदानी ग्रुपचे शेअर सर्रर्रर्रकन घसरले. इथे शेअर निश्चांकी स्तर गाठत असतानाच कंपनी पुढे आणखी अनेक आव्हान उभे राहिले आहेत.

NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या वतीने या गटात येणाऱ्या अनेक कंपन्यांनी आता अमेरिकेतून झालेल्या दोषारोपण 2.45 लाख कोटी कुठं घालवले या संदर्भात अदानींकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. गुरुवारी कार्पोरेट अनाउन्समेंटच्या माध्यमातून अंबुजा सिमेंट, अदानी टोटल गॅस लिमिटेड, अदानी पावर, एसीसी लिमिटेड, अदानी विल्मार, एनडीटीवी, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी एंटरप्राईजेस, अदानी ग्रीन एनर्जी अदानी स्पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनोमिक झोनला पुन्हा पडताळणी संदर्भात नोटीस जारी केली आहे.

दरम्यान सदर प्रकरण समोर येताच अदानी समूहाचा मार्केट कॅप जवळपास 2.45 लाख कोटी रुपयांनी कोसळला थोडक्यात सुरुवातीच्या दोन दिवसात आत्ताच अडीच लाख कोटी रुपये बुडाले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील मुख्य कंपनी असणाऱ्या Adani Energt solutions मध्ये 20% अदानी ग्रीन एनर्जी मध्ये 19.53% आणि आदाने टोटल गॅस मध्ये 18.14% इतकी घट झाली आहे.

आज गुरुपुष्यामृत ! सोने खरेदी करण्यापूर्वी पहा आजचे 22 आणि 24 कॅरेटचे भाव

gold rate

आज गुरुपुष्यामृत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. म्हणूनच आज सोने खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात लगबग असते. तसेच लग्नसराई सुद्धा सुरु झाली असल्यामुळे अनेकजण सोन्याची खरेदी या काळात करतात. तुम्ही सुद्धा आज सोन्याची खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे आधी आजचे सोन्याचे दर तपासा आणि मगच खरेदी करा. आज सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे. पुण्यामध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे भाव आज काय आहेत ? जाणून घेऊया…

22 कॅरेट

आज 22 कॅरेट सोनं तुम्ही खरेदी करणार असाल किंवा 22 कॅरेट सोन्यामध्ये कोणतेही दागिने घडवणार असाल तर आज एक ग्राम साठी तुम्हाला 7145 रुपये मोजावे लागतील. आज 1 ग्राम 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 30 रुपयांची वाढ झाली आहे. तर आज दहा ग्राम 22 कॅरेट सोन्याचा दर 71450 रुपये इतका आहे आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 300 रुपयांची वाढ झाली आहे.

24 कॅरेट

दुसरीकडे शुद्ध सोनं म्हणजेच 24 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7795 रुपये इतका आहे. हा दर काल 7762 रुपये इतका होता. म्हणजेच आज 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 33 रुपयांची वाढ झाली आहे. तर दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 77 हजार 950 रुपये इतका आहे. हाच दरकाल 77,620 रुपये इतका होता म्हणजेच दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये आज 330 रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीचे भाव

चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. प्रतिकिलो चांदीच्या दरात स्थिरता आहे. आज चांदी 1,01,000 रुपये प्रति किलो दराने विकली जाईल. तर काल (बुधवार) सायंकाळपर्यंत चांदीची केवळ १,०१,००० रुपये दराने विक्री झाली.

लोन अप्लिकेशन रिजेक्ट होण्यापासून वाचवा ; ‘हे’ उपाय करून मिळावा त्वरित कर्ज

loan application

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पैशाची गरज भासत असते. त्यासाठी बँकांकडे लोन अर्ज करत असतात. पण कित्येकदा त्यांचे लोन अर्ज नाकारले जातात. त्यामुळे निराशजनक वातावरण निर्माण होते. पण याचा अर्थ असा नाही की, लोन मिळवण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. सर्वात आधी तुम्हाला तो अर्ज का रिजेक्ट झाला याची कारणे शोधावी लागतील. जर बँक किंवा एनबीएफसीने लोनचा अर्ज नाकारला असेल, तर त्यांना याचे कारण सांगणे आवश्यक असते. विशेषतः बँका कमी क्रेडिट स्कोअर, कमी उत्पन्न, आधीच्या कर्जाचा जास्त भार किंवा अपुरी क्रेडिट हिस्ट्री यांसारख्या कारणांमुळे लोन अर्ज नाकारतात.

खराब क्रेडिट स्कोअर –

तुमच्या खराब क्रेडिट स्कोअरमुळे तुमचा अर्ज नाकारला जातो. जर तुमचा अर्ज खराब क्रेडिट स्कोअरमुळे नाकारला गेला असेल, तर सर्वात प्रथम त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही CIBIL आणि Equifax यांसारख्या क्रेडिट स्कोअर एजन्सीकडून तुमचा क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकता. हा स्कोर सुधारण्यासाठी तुम्ही वेळेवर हप्ते भरणे आवश्यक असते. खराब क्रेडिट स्कोअर होण्याची काही कारणे आहेत, त्यामध्ये हप्ते वेळेवर न भरणे, उधारीची जास्त रक्कम असणे , जास्त क्रेडिट कार्ड्स वापरून बिल न भरणे , क्रेडिट रिपोर्टमध्ये चुकीची माहिती असणे. तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी हप्ते वेळेत भरणे, अनावश्यक खर्च टाळणे, आणि आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.

विनाकारण कर्जासाठी चौकशी टाळावी –

बर्‍याच लोकांना क्रेडिट कार्डचा जास्त वापर करण्याची सवय असते. 30% Credit Utilization Ratio आदर्श मानला जातो. तसेच अनेक कर्जासाठी अर्ज करण्याचा परिणाम देखील तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. कर्जासाठी केलेल्या प्रत्येक चौकशीचा प्रभाव क्रेडिट स्कोअरवर पडतो. म्हणून विनाकारण कर्जासाठी चौकशी टाळावी. जर कर्जाची गरज असेल तर विचारपूर्वक एका बँक किंवा एनबीएफसीकडे अर्ज करा. यामुळे तुमचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही वाईट परिणाम होत नाही.

750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर –

तुमचा 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. बँका आणि एनबीएफसी 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना लगेच कर्ज देतात. बँका आणि एनबीएफसी ग्राहकाच्या DTI रेशो विचारात घेतात. DTI वरून व्यक्तीच्या आर्थिक स्थैर्याचा अंदाज येतो. जास्त DTI रेशो आदर्श मानला जात नाही. DTI जास्त असल्याचा अर्थ तुमच्या उत्पन्नाचा जास्त भाग कर्ज फेडण्यासाठी वापरला जातो. बँका आणि एनबीएफसी 40% पेक्षा कमी DTI रेशो आदर्श मानतात.

सहज कर्ज मिळू शकते –

जर तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारला असेल , तर तुम्ही पुन्हा कर्जासाठी अर्ज करू शकता. बँकांचे किंवा एनबीएफसीचा मुख्य उद्देश कर्ज देणे हाच असतो. कर्जावरील व्याज हा त्यांचा उत्पन्नाचा भाग आहे. त्यामुळे बँका आणि एनबीएफसीचा पहिला प्रयत्न कर्ज अर्ज मंजूर करणे हा आहे. पण काही वेळा मोठया कारणास्तव अर्ज फेटाळले जातात . मात्र त्यात तुम्ही सुधारणा केल्यास तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते.

पगार लगेच संपतो ? अशा प्रकारे बचतीसाठी बनवा स्मार्ट प्लॅन

management

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंदीची स्थिती पाहता आर्थिक नियोजन करणे अतिशय महत्वाचे असते . त्यामुळे पगारामधून थोडे पैसे बाजूला काढून बचत करणे हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो . पण महिना संपायच्या आठवड्यात अनेकांचे खिशे रिकामे होतात , त्याचाच परिमाण म्हणजे आर्थिक नियोजन गोंधळते. यासाठीच आज आम्ही तुम्हाला बचत कशी करावी हे सांगणार आहोत . ज्यामुळे तुमची गुंतवणूक अधिक होऊन , खर्च कमी होण्यास मदत मिळेल आणि त्या बचतीचा फायदा भविष्यकाळातील नियोजनासाठी उपयोगी ठरेल. तर चला जाणून घेऊयात त्याबद्दल अधिक माहिती.

पगाराचे विभाजन करा

तुम्ही तुमच्या पगाराचे वेगवेगळ्या भागात विभाजन करणे गरजेचे असते. त्यासाठी पगाराचा 50 टक्के भाग दैनंदिन खर्चासाठी, 30 टक्के बचतीसाठी आणि 20 टक्के लक्झरी किंवा मनोरंजनासाठी वापरा. हे तुम्हाला बजेट नियोजनात मदत करेल. तसेच तुम्ही कोणत्याही वस्तूची खरेदी करताना 20 टक्के डाऊन पेमेंट आणि त्या वस्तूचा कर्जाचा कालावधी 4 वर्षांचा करून घ्यावा . त्याचबरोबर EMI च्या रकमेमुळे बजेटवर जास्त प्रभाव पडू नये याची खास काळजी घ्यावी . आपल्या कुटुंबातील लोकांच्या सुरक्षेसाठी 10 पट आयुर्विमा आणि वैद्यकीय विमा घेणे आवश्यक आहे. हे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.

स्मार्ट आर्थिक नियोजन

तुम्ही कर्ज घेत असाल तर कर्जाचा डोंगर वाढवू नका . कर्जाची एकूण रक्कम 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवा. गृहकर्जाचा कालावधी कमी ठेवून व्याज कमी करणे फायद्याचे ठरते. इक्विटी आणि म्यूच्यूअल फंडामध्ये 20 ते 30 टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक करू नका. गुंतवणूक विविध ठिकाणी करण्याचा सल्ला तज्ञ देतात, ज्यामुळे जोखमीचे प्रमाण कमी होते. अशा प्रकारच्या स्मार्ट आर्थिक नियोजनामुळे तुमचा पगार योग्यरीत्या वापरता येईल आणि भविष्याच्या आर्थिक सुरक्षेसाठी तुम्ही योग्य पाऊले उचलू शकाल.

पोस्ट ऑफिसच्या कोणत्या स्कीम वर किती व्याज ? 1 जानेवारीपासून होणार सुधारणा

post office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसचा पर्याय निवडत असता. अशा गुतंवणूकदारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 जानेवारीपासून पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांवरील व्याज दरात सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी व्याजदराबद्दल माहिती असणे गरजेचे असते . पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (FD), आरडी (RD), पीपीएफ (PPF) यांसारख्या लोकप्रिय योजनांवर बँकेपेक्षा चांगले व्याज दर मिळू शकतात. तर चला जाणून घेऊयात कोणत्या योजनेवर किती व्याज मिळणार .

विविध योजनांवर व्याजदर

पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी विविध योजनांवर व्याज दर वेगवेगळे आहेत. पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4% दर आहे. 1 वर्षाच्या मुदत ठेवावर 6.9%, 2 वर्षांच्या मुदत ठेवावर 7.0%, 3 वर्षांच्या मुदत ठेवावर 7.1% दर उपलब्ध आहे. 5 वर्षांच्या मुदत ठेवावर 7.5% व्याज मिळते, तर 5 वर्षांची आवर्ती ठेव योजना 6.7% व्याज देते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत 8.2% व्याज मिळते, तसेच मासिक उत्पन्न योजनेत 7.4% दर लागू आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेवर 7.1% दर, सुकन्या समृद्धी खात्यावर 8.2%, आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे व किसान विकास पत्रांवर 7.5% दर आहे. महिलांसाठी विशेष असलेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर देखील 7.5% व्याज दर मिळतो. यावरून स्पष्ट आहे की पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये विविध व्याज दर आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.

व्याजदरात सुधारणा फायदेशीर ठरणार

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही अशी योजना आहे ज्यात दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळते. यामध्ये एका खात्यावर जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यावर जास्तीत जास्त 15 लाख रुपये ठेवता येतात. 5 वर्षांसाठी ठेवलेल्या रकमेवर 7.4% दराने व्याज मिळते. तसेच सरकार दर तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिस योजनांवरील व्याज दरात सुधारणा करते. त्यामुळे 1 जानेवारीला व्याज दरात होणारी सुधारणा तुमच्या गुंतवणुकीला अधिक फायदेशीर बनवू शकते.

घराच्या घरीच बनवा तुमचा पर्सनल ऑक्सिजन पार्क ! आजच प्लांट करा ‘ही’ झाडे

oxygen park

देशातील मोठ्या शहरांमध्ये वायुप्रदूषणामुळे लोकांना श्वास घेणे मुश्किल झाले. म्हणून दिल्ली सारख्या महत्वाच्या शहरात ऑक्सिजन पार्क उभारले जात आहेत. जिथे मोठी रक्कम देऊन ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो आहे.म्हणूनच आजच्या लेखात आम्ही घराच्या घरी लावता येतील अशा काही रोपांची माहिती देणार आहोत ज्यामुळे घरात २४ ऑक्सिजन राहून घरातील हवा सुद्धा शुद्ध राहील. यातील काही झाडे 24/7 ऑक्सिजन उत्पादन करून आणि हवा शुद्धीकरण करतात याबरोबरच तुमच्या घराची शोभा सुद्धा वाढवतात. चला तर मग जाणून घेऊया…

स्नेक प्लांट

वायूप्रदूषणापासून बचाव करण्यासाठी घरात स्नेक प्लांट लावा. ही वनस्पती हवा शुद्ध करते आणि घरात कुठेही लावता येते. ते जिथे ठेवले जाते तिथे हवा शुद्ध करते. हे रोप दिसायला सुद्धा खूप आकर्षक दिसते.

बांबूचे रोप

वायू प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी घरात बांबूचे रोप लावा. याच्या पानांमध्ये क्लोरोफिल आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे हवेतील हानिकारक वायू आणि कण कमी करतात.

खजूराचे झाड

वायू प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी खजूर लावा. ही वनस्पती हवा शुद्ध करते आणि वातावरणातील विषारी वायू काढून टाकण्यासाठी ओळखली जाते. हे तुम्ही तुमच्या घरातही ठेवू शकता.

कोरफडीचे रोप

वायू प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही कोरफडीचे रोप देखील लावू शकता. तुम्ही ते तुमच्या घरात किंवा बाल्कनीत ठेवू शकता. ही वनस्पती घरातील हवा शुद्ध करते आणि आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.

मनी प्लांट

मनी प्लांटमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि हवा शुद्ध होते. घरात ठेवल्यास घरातील हवा पूर्णपणे स्वच्छ होईल.

IDBI Bank Bharti 2024 | IDBI बँकेत 600 पदांसाठी मोठी भरती सुरु; येथे करा अर्ज

IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. त्याचा फायदा अनेक उमेदवारांना होणार आहे. ती म्हणजे आता आयडीबीआय बँकेत सहाय्यक व्यवस्थापक, कृषी मालमत्ता अधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 600 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 30 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक आणि कृषी मालमत्ता अधिकारी या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 600 रिक्त जागांची भरती होणार आहे .

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 20 ते 25 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धत

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 30 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

BEL Bharti 2024 | BEL अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

BEL Bharti 2024

BEL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. त्याचा फायदा अनेकांना होईल. ती म्हणजे आता बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती निश्चित कार्यकाल अभियंता या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 229 जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | BEL Bharti 2024

या भरती अंतर्गत निश्चित कार्यकाळ अभियंता या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 229 रिक्त पदे भरली जाणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमचे 28 वर्षे पर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज कसा करावा | BEL Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

गव्हाची उत्पादकता वाढवण्यासाठी या पद्धतीचा करा अवलंब; कमी खर्चात होईल जास्त फायदा

Wheat crop

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गहू हे उत्तर भारतातील मुख्य पीक आहे, विविध कृषी-हवामान परिस्थिती असलेल्या प्रदेशात. उगवण, गव्हाच्या विकासाचा प्रारंभिक आणि गंभीर टप्पा, पीक स्थापना आणि उत्पादनावर लक्षणीय परिणाम करते. या प्रदेशातील गव्हाच्या उगवणावर विविध घटक प्रभाव टाकतात, ज्यात पर्यावरण, मातीशी संबंधित आणि कृषीविषयक घटकांचा समावेश होतो. गव्हाचे उत्पादन अनुकूल करण्यासाठी हे घटक समजून घेणे महत्त्वाचे आहे.

तापमान

गव्हाच्या उगवणावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तापमान. गव्हाच्या उगवणासाठी 12-25°C तापमानाची आवश्यकता असते. उत्तर भारतात, पेरणीचा कालावधी सामान्यतः रब्बी हंगामात (नोव्हेंबर-डिसेंबर) असतो, जेथे तापमान थंड असते.

कमी तापमान: तापमान इष्टतमपेक्षा कमी झाल्यास, उगवण मंद होते, उगवण होण्यास उशीर होतो आणि कीटक आणि रोगांची संवेदनशीलता वाढते.

उच्च तापमान: याउलट, उशीरा पेरणीच्या वेळी उच्च तापमानामुळे बियाणे सुकते आणि एंजाइमॅटिक क्रियाकलाप कमी झाल्यामुळे उगवण खराब होते.

ओलावा

उगवणासाठी आवश्यक शारीरिक प्रक्रिया सक्रिय करण्यासाठी पुरेशी माती ओलावा आवश्यक आहे. पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र किंवा अनियमित सिंचनावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांना जमिनीतील ओलावा योग्य पातळी सुनिश्चित करण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागतो.

ओलाव्याचा अभाव: खराब बियाणे शोषण आणि कमी एन्झाइमॅटिक क्रियाकलाप परिणामी असमान उगवण होते.

जास्त ओलावा: पाणी साचल्याने ऑक्सिजनची कमतरता आणि बियाणे क्षय होऊ शकते, विशेषत: भारी जमिनीत. इष्टतम आर्द्रता राखण्यासाठी शेतकरी अनेकदा पेरणीपूर्व सिंचनावर अवलंबून असतात, परंतु पाण्याची उपलब्धता वाढत्या प्रमाणात एक अडचण होत आहे.

मातीची स्थिती

मातीचा पोत: वालुकामय चिकणमाती ते चिकणमाती माती चांगली पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि वायुवीजन गव्हाच्या उगवणासाठी आदर्श आहे. जड चिकणमाती माती जास्त ओलावा टिकवून ठेवू शकते, ज्यामुळे पाणी साचते.

माती pH: गहू किंचित अल्कधर्मी ते तटस्थ मातीत (pH 6.5-7.5) उत्तम वाढतो. आम्लयुक्त किंवा खारट माती बियाणे उगवण कमी करू शकते.

पोषक स्थिती: योग्य पोषक उपलब्धता, विशेषतः फॉस्फरस, उगवण दरम्यान मुळांची वाढ वाढवते.

JioStar लॉन्च ! केवळ 15 रुपयांपासून फुल्ल ऑन मनोरंजन ; पहा काय आहेत प्लॅन ?

jiostar

रिलायन्स जिओने वॉल्ट डिस्नेच्या हॉटस्टार प्लॅटफॉर्मसह एक ऐतिहासिक विलीनीकरण पूर्ण केले आहे, जिओस्टार ही नवीन OTT संस्था तयार केली आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आता प्लॅटफॉर्ममध्ये 46.82% हिस्सा आहे, तर डिस्ने हॉटस्टारकडे 36.84% आणि Viacom18 कडे उर्वरित 16.34% हिस्सा आहे. या संयुक्त उपक्रमाचे उद्दिष्ट आहे की भारतात स्ट्रीमिंगची पुनर्परिभाषित करणे, परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम सामग्री ऑफर करणे.

नव्याने लाँच झालेल्या Jiostar.com मध्ये विविध प्रेक्षकांसाठी सबस्क्रिप्शन योजना आहेत. सबस्क्रिप्शन स्टँडर्ड डेफिनिशन (SD) आणि हाय डेफिनिशन (HD) श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत, दरमहा फक्त ₹15 पासून सुरू होतात, ज्यामुळे प्रीमियम मनोरंजन व्यापक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते.

Subscription Packs

किड्स पॅक

डिस्ने किड्स पॅक: ₹१५/महिना
डिस्ने हंगामा किड्स पॅक: ₹१५/महिना

हिंदी पॅक

स्टार व्हॅल्यू पॅक: ₹५९/महिना
स्टार प्रीमियम पॅक: ₹105/महिना

प्रादेशिक पॅक

मराठी: ₹67 (मूल्य) / ₹110 (प्रीमियम)
ओडिया: ₹65 (मूल्य) / ₹105 (प्रीमियम)
बंगाली: ₹65 (मूल्य) / ₹110 (प्रीमियम)
तेलुगु: ₹70–₹81 (मूल्य)
कन्नड: ₹४५–₹६७ (मूल्य)

हाय डेफिनेशन (HD) योजना

किड्स एचडी पॅक: ₹18/महिना पासून सुरू
हिंदी HD पॅक: ₹88/महिना पासून सुरू
मराठी HD पॅक: ₹99/महिना