Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 363

IPO गुंतवणुकीत SEBI करणार मोठे बदल ; गुंतवणूकदारांसाठी काय आहे नवीन नियम ?

IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक गुतंवणूकदार बचतीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असतो. जर तुम्हाला एखाद्या कंपनीच्या IPO (Initial Public Offering) मध्ये नेहमी गुंतवणूक करण्याची सवय असेल , तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. SEBI (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) लवकरच SME IPOs (Small and Medium Enterprises IPOs) मध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव देणार असून, ज्यामुळे गुंतवणूकदारांना जास्त पैसे गुंतवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

SME IPO मध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढणार

SEBI ने SME IPO साठी कमीत कमी गुंतवणुकीची रक्कम 1 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या प्रस्तावात ही रक्कम 4 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये फक्त जोखीम घेण्याची क्षमता आणि पुरेसे ज्ञान असलेल्या गुंतवणूकदारांनीच SME IPO मध्ये गुंतवणूक करावी, हा त्याचा मुख्य उद्देश आहे . SEBI च्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीची रक्कम वाढवल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांची भागीदारी कमी होईल आणि जास्त अनुभव असलेल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करता येईल. हे केल्यामुळे SME विभागाचा आत्मविश्वास वाढून गुंतवणूकदारांसाठी जास्त सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.

SEBI चा निर्णय

अनेक वर्षांपासून SME IPO मध्ये गुंतवणूकदारांचा सहभाग झपाट्याने वाढताना दिसत आहे. पण या IPOs मध्ये जोखीम जास्त असते . तसेच शेअर्स सूचीबद्ध झाल्यानंतर बाजारभावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत गुंतवणूकदार अडचणीत येऊ शकतात. हे टाळण्यासाठी आणि SME IPO गुंतवणुकीला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी SEBI हा निर्णय घेतलेला आहे.

4 डिसेंबर 2024 पर्यंत प्रस्ताव

SEBI ने या प्रस्तावांवर लोकांकडून 4 डिसेंबर 2024 पर्यंत सूचना मागवल्या आहेत. यानंतर प्रस्ताव लागू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. SEBI चा हा प्रस्ताव SME क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महत्वाचा ठरेल. गुंतवणूकदारांनी सावधगिरीने आणि योग्य माहितीच्या आधारावर गुंतवणूक करण्याची गरज आहे. यामुळे SME कंपन्यांमध्ये प्रामाणिक आणि स्थिर गुंतवणूक वाढण्यास मदत होईल. त्यामुळे या बदलाकडे दुर्लक्ष करू नका .

जबरदस्त लूक आणि दमदार फीचर्ससह ; महिंद्रा XUV200 लवकरच बाजारात उडवणार धुव्वा

Mahindra XUV 200

ऑटोमोबाईल उद्योगात दररोज नवीन वाहने दाखल होत आहेत. या मालिकेत महिंद्रा XUV200 लवकरच बाजारात धमाल करणार आहे. महिंद्राने ही एसयूव्ही नवीन रूप आणि प्रगत वैशिष्ट्यांसह सादर करण्याची योजना आखली आहे. ही कार थेट क्रेटा आणि ब्रेझाशी स्पर्धा करणार आहे.

काय आहेत फीचर्स ?

  • डिजिटल मीटर कन्सोल
  • एलईडी हेडलाइट्स आणि आकर्षक डीआरएल
  • दुर्मिळ पार्किंग सेन्सर
  • उत्तम एसी प्रणाली
  • दुहेरी एअरबॅग्ज
  • चांगली ध्वनी प्रणाली
  • अधिक बूट जागा
  • आरामदायक आणि सुरक्षित सीट बेल्ट
  • शक्तिशाली इंजिन आणि कार्यक्षमता

इंजिन

या गाडीच्या इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 110bhp पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करते.
जे 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह ऑफर केले जाईल. या शक्तिशाली इंजिनमुळे, ही SUV शक्ती आणि कार्यक्षमतेचे उत्तम मिश्रण देते.

काय असेल किंमत ?

Mahindra XUV200 ची अंदाजे किंमत सुमारे 6 लाख रुपये असू शकते. या परवडणाऱ्या किमतीच्या रेंजमध्ये ही एसयूव्ही ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरेल. Mahindra XUV200 उत्कृष्ट लुक, अप्रतिम वैशिष्ट्ये आणि शक्तिशाली इंजिनसह सादर करण्यात येत आहे. हे वाहन मिड-रेंज एसयूव्ही सेगमेंटमधील Creta आणि Brezza सारख्या लोकप्रिय वाहनांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेची मोठी भेट, जाणून घ्या काय मिळणार फायदे

railway news

भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. दररोज करोडो लोक रेल्वेने कुठे ना कुठे जोडलेले असतात. रेल्वे प्रवाशांना काही सुविधा देत असते. मात्र, येथे ज्या सुविधांची चर्चा होत आहे. ते फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेकडून पुरवले जातात. विशेषतः 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आणि 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना या नवीन वैशिष्ट्यांचा फायदा होईल. यापैकी काही सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी आधीच उपलब्ध आहेत. मात्र माहितीअभावी वयोवृद्ध प्रवाशांना त्याचा लाभ घेता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे कोणत्या सुविधा पुरवते ते जाणून घेऊया.

लोअर बर्थ आरक्षण सुविधा

भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना लोअर बर्थ आरक्षणात प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा केवळ 45 वर्षांवरील महिला आणि 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांसाठी उपलब्ध असेल. माहितीनुसार, या सुविधेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना तिकीट बुकिंगच्या वेळी लोअर बर्थसाठी विशेष पर्याय दिला जाणार आहे. जर लोअर बर्थ उपलब्ध नसेल तर त्यांना प्रतीक्षा यादीत प्राधान्य दिले जाईल. तिकीट कन्फर्म झाल्यावर, त्यांना शक्य तितक्या कमी बर्थचे वाटप केले जाईल.

विशेष कर्मचारी तैनात

वृद्ध प्रवाशांना आधार देण्यासाठी स्टेशनवर विशेष कर्मचारी तैनात केले जातील जे ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना मदत करतील. हे कर्मचारी ज्येष्ठ नागरिक प्रवाशांचे सामान उचलण्यास मदत करतील. गरज भासल्यास हे कर्मचारी ट्रेनमध्ये चढताना आणि उतरतानाही मदत करतील. एवढेच नाही तर भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्य लक्षात घेऊन ट्रेनमध्ये आपत्कालीन वैद्यकीय मदतीची सुविधा सुरू केली आहे. ज्या अंतर्गत प्रत्येक ट्रेनमध्ये प्रथमोपचार किट उपलब्ध असेल. काही लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एक प्रशिक्षित पॅरामेडिक देखील उपस्थित असेल.
आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत दिली जाईल.

एकही मतदार न आल्याने कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रातच पंगत करून केले जेवण; जळगावचा प्रकार समोर

Assembly Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान चालू झालेले आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून कलाकारांकडून देखील मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आपण मतदान केले पाहिजे, असे आव्हाने आवाहन जनतेला केले जात आहे. अनेक ठिकाणी मतदान देखील जोरात चालू झालेले आहे. परंतु जळगाव मधील एरंडेल मतदार संघात एक वेगळाच प्रकार समोर आलेला आहे.

या मतदार केंद्रावर ती कुणीच मतदान करायला आले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या लोकांनी पंक्तीत बसून जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
राज्यभरात मतदानाचा उत्साह सुरू आहे. लोकांनी मतदान करावे यासाठी आज सुट्टी देखील दिलेली आहे. तसेच काही स्थानिक पक्षांकडून लोकांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी गाड्यांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये मतदार केंद्रावर मतदार न आल्याचे चित्र समोर आलेले आहे.

एरंडोल विधानसभा क्षेत्रातील वडगाव मतदान केंद्र क्रमांक 214 या ठिकाणी सकाळपासून मतदान करायला लोक आलेले नाही. तेथील काही लोकांनी सकाळी मतदान केले. परंतु त्यानंतर कोणीही आले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाची कर्मचारी कंटाळले आणि दुपारची वेळ झाल्यानंतर त्यांनी भूकही लागली होती. मतदार न आल्यामुळे त्या मतदान अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणीच जेवणाची पंगत पाडली.

मतदान केंद्रातून हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. कर्मचारी मस्तपैकी बसून जेवत आहे. तसेच पोलीस कर्मचारी देखील या जेवणाच्या पंक्तीचा आनंद घेत आहेत. दुपार झाली तरीदेखील या गावातील अनेक लोकांनी अजूनही मतदान केलेले नाही.

Bussiness Idea | घराच्या टेरेसवर सुरु करा हे व्यवसाय; महिन्याला होईल लाखोंची कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | अनेक लोकांना नोकरी सोबत व्यवसाय करण्याची इच्छा असते. परंतु हा व्यवसाय नक्की कोणता करावा? बाजारात त्याला मागणी आहे का? या सगळ्याचा विचार करून अनेक लोकांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे व्यवसाय करताना तो व्यवसाय नक्की कुठे सुरू करायचा? त्याचप्रमाणे त्याला भांडवल किती लागेल? या सगळ्या गोष्टींचा विचार येतो. परंतु आता तुम्ही अगदी कमीत कमी भांडवलामध्ये तुमच्या घराच्या छतावर व्यवसाय सुरू करून एक यशस्वी उद्योजक देखील बनवू शकता.

तुमच्या घराच्या छतावर बिजनेस सुरु केल्यानंतर तुम्हाला जागेचे भाडे देखील लागणार नाही. तसेच इतर खर्च देखील लागणार नाही. तुम्ही अगदी घरगुती काही व्यवसाय करून ते यशस्वी होऊ शकतात. आहे कोणते बिझनेस करता येईल, हे आपण जाणून घेणार आहोत.

टेरेस फार्मिंग | Bussiness Idea

सध्या टेरेस फार्मिंग हे खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही घराच्या छतावर शेती करू शकता. तुम्ही अगदी कमीत कमी खर्चामध्ये काही फळांची झाडे, वनस्पती छतावर लावू शकता. तसेच तुम्ही भाज्यांचे पीक देखील घेऊ शकता. त्याचप्रमाणे पॉली बॅगमध्ये देखील भाज्यांचे बियाणे लावू शकता. छतावर तुम्ही माती पसरवून त्या प्रमाणात शेती करू शकता. यामध्ये तुम्हाला घरबसल्या चांगला फायदा मिळेल.

सोलर पॅनल

तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावून देखील स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. यामुळे तुम्हाला जास्त वीज बिल देखील येणार नाही. आणि घरातील वीज देखील कमी वापरता येईल. या व्यवसायाने तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

मोबाईल टॉवर

तुम्ही जर मोबाईल टॉवर साठी तुमच्या घराचे छत भाड्याने दिले, तर तुम्ही त्यातून चांगले कमाई करू शकता. मोबाईल कंपन्या या टॉवर लावण्यासाठी विविध जागा शोधत असतात. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर टॉवर लावण्यासाठी जागा दिली तर त्याचे तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळेल. तुम्हाला जर टॉवर लावून घ्यायचा असेल, तर तुम्हाला टॉवर ऑपरेटर कंपनीची संपर्क साधावा लागेल.

होर्डिंग किंवा बॅनर

आज काल रस्त्यावर होर्डिंग आणि बॅनर लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अशातच तुम्ही छतावर होडींग किंवा बॅनर लावू शकता. यामुळे तुम्हाला चांगले पैसे देखील मिळते. परंतु हे होर्डिंग लावताना काही कायदेशीर गोष्टींचे पालन करावे लागेल. आणि त्यातून तुम्हाला भाडे मिळत राहील.

Viral Video | पाण्याशी मस्ती करणे पडले महागात ! माय लेक गेली समुद्रात वाहून

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. ज्या ठिकाणी आपण घरबसल्या जगभरातील सगळ्या गोष्टी पाहू शकतो. सोशल मीडियामुळे हे जग अगदी जवळ आलेले आहे. परंतु या टेक्नॉलॉजीने जशी प्रगती केलेली आहे. तसे त्याचे अनेक वाईट परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियावर रोज असे लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. काही व्हिडिओ हे स्टंटचे असतात. तर काही व्हिडिओ पाहून अगदीच आपल्या काळजाचा ठोका चुकतो.

आज-काल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. अगदी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा ते करत नाही. अनेक लोकांना या व्हिडिओ आणि सेल्फीच्या नादात त्यांचा जीव देखील गमवावा लागलेला आहे. याबाबत अनेक बातम्या आपण पाहिलेल्या आहेत. अशातच हिवाळा सुरू झालेला आहे. आणि या हिवाळ्यामध्ये अनेक लोक हे बीचवर फिरायला जात असतात. बीचवर पाण्याच्या लाटांचा आनंद घ्यायला सगळ्यांनाच आवडतो. परंतु समुद्र कधी कधी इतका खवळतो की, त्यापुढे आपण काहीच करू शकत नाही.

समुद्राच्या लाटांची ताकद इतकी मोठी असते की, त्यात आपण केलेली छोटीशी चूक देखील आपल्या जिव्हारी बेतू शकते अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यातूनच हे समुद्राच्या पाण्याचे सत्य सिद्ध झालेली आहे.या व्हिडिओमध्ये एक तरुण महिला आणि तिचा पती मुलींचं समुद्रकिनारी बसलेली असतात. ते अत्यंत आनंदाने एन्जॉय करत असतात. परंतु अचानक एक जोरदार लाट आली आणि त्यामध्ये दोघींचा तोल गेला.

सुरुवातीला ती महिला आणि तिची मुलगी जोरदार आलेली लाट पाहून त्या लाटेचा आनंद घेत असतात. परंतु काही सेकंदातच त्यांचा तोल जातो. आणि त्या लाटांसोबत त्या देखील समुद्रात निघून जातात. त्या अवाढव्य असलेल्या लाटेसमोर कोणालाही काहीच करता आले नाही. आणि शेवटी त्या समुद्राच्या लाटांसोबत वाहून जाताना दिसत आहेत.

Coriander Powder | हिवाळ्यातच करून ठेवा कोथिंबिरीची पावडर; महाग झाल्यावर विकत घेण्याचे टेन्शनच नको !

Coriander Powder

Coriander Powder | संपूर्ण राज्यात हिवाळा चालू झालेला आहे. आणि या हिवाळ्याच्या महिन्यामध्ये पालेभाज्या तसेच कोथिंबीर या अत्यंत स्वस्त दरात मिळतात. तसेच हिरव्यागार भाज्या, वाटाणा, गाजर भाज्या हिवाळ्याच्या महिन्यात येत असल्याने त्या स्वस्त असतात. परंतु हिवाळा संपला की या भाज्या खूप महाग होतात. कोथिंबीर देखील या महिन्यांमध्ये खूप स्वस्त असते. परंतु हिवाळा संपला की, कोथिंबीरीची एक गड्डी जवळपास 30 ते 35 रुपयाला असते. तसेच कोथिंबीर देखील चांगली मिळत नाही. परंतु तुम्हीही कोथिंबीर स्वस्त असताना घेऊन तीच वाळवून वर्षभर टिकेल अशी पावडर करून ठेवू शकता. आता कोथिंबीरची पावडर करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. ती आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही जर कोथिंबिरीची पावडर (Coriander Powder) करून ठेवणार असाल, तर कोथिंबीर अगदी फ्रेश आणि हिरवीगार घ्या. त्यानंतर ती कोथिंबीर व्यवस्थित निवडा त्यातली सडकी आणि खराब असलेली कोथिंबीर वेगळी काढा. तसेच पिवळी पानं देखील घेऊ नका. त्यानंतर तुम्ही निवडून घेतलेली ही कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवा. आणि ओल्या फडक्याने पुसून घ्या. त्यानंतर तुम्हाला उन्हामध्येही कोथिंबीर पूर्णपणे वाळवायची आहे. तुम्ही उन्हामध्ये एका कापडावर ही कोथिंबीर पसरून वाळत घालू शकता.

पाच ते सहा तास ही कोथिंबीर चांगली वाळवायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा तिला ऊन द्यायचे आहेत. जेणेकरून ती व्यवस्थित वाढेल ही कोथिंबीर योग्य प्रमाणात वाळली आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही कोथिंबीर थोडीशी हातावर घ्या आणि चुरून पहा. जर त्याची पावडर झाली. तर कोथिंबीर पूर्णपणे वाळलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीर हातावर चुरून देखील तिची पावडर करून ठेवू शकता. किंवा मिक्सरमध्ये देखील बारीक करून ही पावडर करू शकता. तुम्ही ती कोथिंबीर जसेच्या तसे डब्यात ठेवा आणि जेव्हा लागेल तेव्हा या कोथिंबीरीच्या पावडरचा वापर करा. ही कोथिंबीरीची पावडर तुम्ही वरण, भाज्या, ढोकळा, इडली, ताक पराठे यांसारख्या रेसिपीमध्ये वापरू शकता. तसेच या कोथिंबीरीच्या पावडरला वास देखील चांगला येतो.

‘या’ शहरातून थेट काश्मीरपर्यंत धावणार ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ; प्लॅन तयार PM मोदी करणार उद्घाटन

delhi-kashmir

देशभरात रेल्वेचे जाळे आणखी मजबूत करण्यात येत आहे. अशातच आता देशातील मुख्य शहरांना रेल्वे द्वारे जोडण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून लवकरच भारताचे नंदनवन कश्मीर आणि राजधानी दिल्ली या मार्गावर थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहे. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.

खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीमध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) वर काश्मीर ते नवी दिल्ली जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करतील, असे रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी मंगळवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीमध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) वर काश्मीर ते नवी दिल्ली जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करतील, असे रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी मंगळवारी सांगितले.

रेल्वेने 272 किमी यूएसबीआरएल प्रकल्पापैकी 255 किमी पूर्ण केले आहे, कटरा आणि रियासी दरम्यान फक्त 17 किमीचा छोटासा भाग डिसेंबरपर्यंत पूर्ण केला जाईल. रवनीत सिंह म्हणाले की, पंतप्रधानांच्या वेळापत्रकानुसार उद्घाटन जानेवारीत होईल. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

तपासले जात आहेत सर्व पैलू

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येक पैलू तपासणे आवश्यक आहे आणि या सर्व गोष्टींची मोठ्या प्रमाणावर तपासणी केली जात आहे आणि सर्व काही प्रमाणानुसार आहे याची खात्री करण्यासाठी अधिकारी आणि तांत्रिक पथके वारंवार भेटी देत ​​आहेत. या प्रकल्पासाठी खूप मेहनत घेतली आहे. हा एक मोठा उपक्रम आहे. प्रत्येक पैलू पडताळून पाहिल्यानंतरच उद्घाटनाची तारीख ठरवली जाईल.

काश्मीरपर्यंत वंदे भारत चालवण्याची योजना

कटरा ते श्रीनगरपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी होताच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा प्रस्ताव आहे. चेन्नईतील रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये तयार झालेला वंदे भारत देशाच्या विविध भागांत याआधीच रुळांवर आला आहे. या मार्गावर कमी डबे असलेल्या गाड्या धावतील.

‘या’ गाड्यांचा प्रस्ताव तयार

यह प्रोजेक्ट पूरा होते ही 32 ट्रेनों (अप-डाउन) को पटरी पर दौड़ाया जाएगा। इसके तहत ट्रेन नंबर 12425/26 न्यू दिल्ली से जम्मूतवी, 12445/46 न्यू दिल्ली से माता वैष्णो देवी कटरा, 16031/32 चेन्नई सेंट्रल से माता वैष्णो देवी कटरा, 11449/50 जबलपुर से माता वैष्णो देवी कटरा, 16787/88 तिरुनेलवेली ते माता वैष्णो देवी कटरा, 16317/18 कन्याकुमारी ते माता वैष्णो देवी कटरा, 19803/04 कोटा ते माता वैष्णो देवी कटरा, 12331/32 हावडा ते जम्मू तवी आणि इतर सात गाड्या.

महाराष्ट्रातील या हिल स्टेशनबद्दल माहित आहे का? कॅन्सल कराल फॉरेन ट्रिप्स

Hill Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोकांना फिरायला खूप आवडते. निसर्गाच्या कानाकोपऱ्यात जाऊन घेतला आनंद घेऊन घेण्यात एक वेगळीच मजा आहे. अनेक लोक फिरायला जाताना महाराष्ट्र बाहेर किंवा देशाबाहेर देखील जातात. परंतु आपल्या महाराष्ट्रात देखील अशी अनेक ठिकाण आहेत. तिथे जाऊन तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येईल. महाराष्ट्रातील अशी अनेक ठिकाण आहेत, याबद्दल लोकांना अजूनही माहित नाही.

इतर राज्यातील अनेक लोकही महाराष्ट्रात फिरण्यासाठी येतात. येथील नैसर्गिक सौंदर्य पाहून अक्षरशः लोकांचे मन हरपून जाते. महाराष्ट्रात छोट्या छोट्या शहरांमध्ये अनेक लपलेली सुंदर ठिकाण आहेत. अत्यंत शांत आणि बजेट फ्रेंडली ही ठिकाणे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच महाराष्ट्रातील काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही या हिवाळ्यात नक्कीच फिरायला जाऊ शकता.

तोरणमाळ हिल स्टेशन

ज्या लोकांना ट्रेकिंग आणि कॅम्पिंग करायला आवडते. त्यांच्यासाठी हे हिल स्टेशन खूप महत्त्वाची हिल स्टेशन आहे. तुम्ही सीताखाई ट्रेक करू शकता. तसेच मच्छिंद्रनाथ महाराजांची गुहा देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ही गुहा निसर्गात आहे. ही गुहा मच्छिंद्रनाथांचे ध्यान स्थान मानले जाते. हे महाराज महान तपस्वी होते. त्यांना माशांचा स्वामी म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी अनेक लोक फिरायला जात असतात.

यशवंतराव तलाव आणि लोटस तलाव

तोरणमाळ हिल स्टेशनचे सर्वात जास्त आकर्षण म्हणजे यशवंतला तलाव आणि लोटस तलाव. हे तलाव पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या ठिकाणी अनेक कमळाची फुले तुम्हाला पाहायला मिळतात. या हिल स्टेशनवर अनेक हिरवीगार झाडे देखील आहे. आणि जंगलांनी वेढलेल्या आहेत निसर्ग प्रेमींना हे ठिकाण खूप आवडते.

या ठिकाणी कसे जायचे

तोरण माहे मुंबईपासून सुमारे 465 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्ही रेल्वेने जाऊ शकता. नंतर नंदुरबार रेल्वे स्थानकावरून तुम्ही बस किंवा कॅबने तोरणमाळ हिल स्टेशन पर्यंत जाऊ शकता. या ठिकाणी अनेक बसेसची सुविधा देखील उपलब्ध आहेत. त्याच्या वेळा देखील वेगवेगळ्या आहेत. तुम्ही ट्रेनने 600 ते 700 रुपयात या ठिकाणी पोहोचू शकता. तसेच टोल पेट्रोल या सगळ्याचा खर्च मिळून तुम्ही 200 रुपयांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकता. आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकता

येत आहे ‘मारुती सुझुकी वॅगन आर’ चे नवीन मॉडेल ; किंमतही असेल परवडेबल

maruti

तुम्ही जर नवीन कार घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. वाहन क्षेत्रात आपलं एक वेगळा स्थान निर्माण केलेल्या मारुती कंपनीकडून ‘मारुती सुझुकी वॅगन आर’ चे नवे मॉडेल बाजारात येणार आहे. मारुती कंपनी लवकरच भारतात शक्तिशाली मारुती सुझुकी वॅगन आर हॅचबॅक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. एवढेच नाही तर अशी बोललं जात आहे की लॉन्च झाल्यानंतर, ही गाडी क्रेटा सारख्या 10 मोठ्या एसयूव्ही वाहनांची सुट्टी करेल. आज आम्ही तुम्हाला नवीन मारुती वॅगन आर कारची संपूर्ण माहिती देणार आहोत. या वाहनाची वैशिष्ट्ये आणि किंमत काय असेल ते जाणून घेऊया.

या गाडीमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. मारुती कंपनीच्या या वाहनाचे सेफ्टी टेस्टिंगही करण्यात आले असून, त्यात या गाडीला चांगले रेटिंग मिळाले आहे. 7 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले कनेक्टिव्हिटी, स्पीकर ऑडिओ सिस्टीम सारखी वैशिष्ट्ये या वाहनात देण्यात आली आहेत.याशिवाय सुरक्षितता लक्षात घेऊन या वाहनात सेंट्रल लॉकिंग, ड्युअल एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, स्टीअरिंग व्हीलवर नियंत्रण यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

कसे असेल इंजिन ?

वाहनाच्या आत, 1.0 लीटर के सीरीज ड्युअल जेट ड्युअल VVT इंजिन प्रदान करण्यात आले आहे जे 67bhp पॉवर आणि 89nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.या वाहनात आणखी एक इंजिन पर्याय देण्यात आला आहे जो 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 90bhp पॉवर आणि 113nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.या वाहनात 1.0 लीटर सीएनजी आवृत्ती देखील देण्यात आली आहे. सीएनजी मोडमध्ये हे वाहन 57bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे.

काय असेल किंमत ?

जर या कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ही कार 1.0 लीटर इंजिनमध्ये 25 पॉइंट 19 किमी प्रति लीटर मायलेज देते पॉइंट्स 43 किमी प्रति लिटरचे मायलेज देते. जर आपण मारुती सुझुकी वॅगन आर कारच्या किंमतीबद्दल बोललो तर या कारची प्रारंभिक किंमत 539000 रुपये आहे, ज्याचे टॉप मॉडेल सुमारे 7 लाख 10000 रुपये लाँच केले गेले आहे. तुम्ही जवळच्या शोरूमला भेट देऊन या वाहनाबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.