Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 364

काय आहे सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना ? गुंतवणूकदारांचे पैसे होतील दुप्पट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकांना बचत करण्याची सवय लागल्यामुळे गुंतवणूकीकडील कल मोठयाप्रमाणात वाढला आहे. या वाढत्या कलाचा विचार करून, सरकार वेळोवेळी विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे. ज्यामूळे लोकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. सरकारने तुमच्यासाठी सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना सुरु केले असून , यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या पैशांची मोठी वाढ झाली आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती पाहुयात .

सॉव्हरिन गोल्ड बाँड –

सॉव्हरिन गोल्ड बाँड हा एक प्रकारचा प्रमाणपत्र आहे, जो RBI द्वारा जारी केला जातो. यामध्ये गुंतवणूकदार सोन्याच्या ग्रॅमनुसार गुंतवणूक करतात. या योजनेंतर्गत 2.5% वार्षिक व्याज देखील दिले जाते, ज्याची रक्कम दर 6 महिन्यांनी वाटली जाते . सध्याच्या काळात भौतिक सोन्याच्या किमती सतत घसरत असल्याने, गुंतवणूकदारांनी सोन्याचे बाँड खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक फायद्याची मानली आहे. गेल्या 8 वर्षांत सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांना 160 % नफा मिळाल्यामुळे ग्राहकांची यामध्ये अधिक गुंतवणूक करण्याची इच्छा होत आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट –

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्त्वाखाली 2016-17 मध्ये सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची सुरुवात झाली. योजनेत भाग घेतलेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला नफा मिळाला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे 2016-17 या गोल्ड बाँड सिरिज-3 ने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढत आहे. सध्याच्या आर्थिक वर्षातील योजनेतील गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशांची रोख रक्कम अजून प्राप्त झाली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासाठी 16 नोव्हेंबर 2024 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे, ज्याद्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचा परतावा मिळणार आहे.

योजनेचे यश

या योजनेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे आणि सरकारने यासाठी आतापर्यंत एकूण 72274 कोटी रुपये उभारले आहेत. सॉव्हरिन गोल्ड बाँडच्या एकूण 67 हप्त्यांची प्रक्रिया पार पडली आहे. पण या योजनेच्या शेवटच्या हप्त्याची पूर्तता वेळेवर न झाल्यामुळे काही गुंतवणूकदारांना चिंता आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना एक आकर्षक गुंतवणूक पर्याय बनली आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून नागरिक मोठा परतावा मिळवू शकतात.

तुम्हालाही सतत ऍसिडिटी होत असेल तर; करा हे घरगुती उपाय

Acidity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली बदलल्यामुळे याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होताना दिसत आहे. बदलत्या खराब जीवनशैलीमुळे त्यांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये डायबिटीज, हार्ट अटॅक तसेच ऍसिडिटी सारख्या अनेक समस्या उद्भवतात. आजकाल लोकांना ऍसिडिटी होताना दिसत असते. काही लोकांच्या छातीत जळजळ होते तर काही लोकांच्या पोटात दुखते. म्हणजेच ऍसिडिटीचे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु तुम्ही घरगुती काही गोष्टींमध्ये बदल करून देखील तुमची ऍसिडिटी बंद करू शकता. आता कोणत्या गोष्टींमध्ये बदल केले पाहिजेत, हे आपण जाणून घेणार आहोत.

झोपण्याची पद्धत बदला

तुमच्या छातीत जळजळ होत असेल, तर छातीतील जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही कसे झोपता हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर उशी घेऊन डाव्या कुशीवर झोपलात तर ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. परंतु तुम्ही जर सरळ पाठीवर झोपला तर ऍसिडिटीचा त्रास वाढतो. त्याचप्रमाणे तुमची जर झोप अपुरी झाली असेल, तरीदेखील ऍसिडिटीचा त्रास वाढतो. ऍसिडिटीचा त्रास कमी होण्यासाठी योग्य प्रमाणात झोपणे गरजेचे असते. तसेच रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ एकच ठेवली पाहिजे. त्यानंतरच अवयवांचे कार्य सुरळीत चालते.

आहारावर लक्ष द्या

तुम्ही झोपण्यापूर्वी जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. तसेच अति प्रमाणात देखील खाऊ नका. झोपण्यापूर्वी किमान तीन तास आधी तुम्ही रात्रीचे जेवण करा. यामुळे तुमच्या अन्नाचे पचन देखील चांगले होईल. आणि ऍसिडिटी वाढणार नाही. तुम्ही एकाच वेळी जास्त जेवण्यपेक्षा दिवसभरात थोडे थोडे जेव्हा. त्यामुळे त्रास होणार नाही. तसेच चॉकलेट, लिंबू, टोमॅटो यांसारख्या पदार्थाने ऍसिडिटी वाढते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळा.

जीवनशैलीत बदल करा

आजकाल ऍसिडिटीचा त्रास होऊ लागला आहे. यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करणे, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी योगासने करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जर नियमितपणे शारीरिक व्यायाम केला, तर तुमच्या आरोग्य देखील चांगले राहील. त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. परंतु तुम्हाला जर ऍसिडिटीचा जास्त त्रास होत असेल, तर तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शन न घेता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. आणि त्यानुसार तुमचे जीवनशैलीत बदल करून औषधे घेणे गरजेचे असते. तर तुमची ऍसिडिटी कमी होईल.

Flipkart वर Bonanza Sale ! iPhone सह इतर स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट

flipkart

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकजण कमी किमतीत चांगला फोन खरेदी करण्याचा विचार करत असतात . जर तुम्ही भन्नाट सवलती सोबत नवीन स्मार्टफोन घेणार असाल तर Flipkart च्या Mobiles Bonanza वरील सेल तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो . या सेलमध्ये तुम्हाला अनेक प्रीमियम तसेच मिड-रेंज स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट दिली जाणार आहे. तर हा सेल ग्राहकांसाठी 21 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या सेलचा फायदा करून घ्यावा .

iPhone वरील ऑफर्स –

iPhone 15 (128GB) फोनची मूळ किंमत 69900 असून सवलतीनंतर तुम्हाला हा फोन फक्त 57749 मध्ये उपलब्ध होणार आहे . खरेदीदारांना तब्बल 12151 ची बचत होईल. तसेच iPhone 16 हा 79900 च्या लाँच किमतीत उपलब्ध असला तरी HDFC बँकेच्या ईएमआय पर्यायाचा लाभ घेतल्यास तो 74900 रुपयेमध्ये खरेदी करता येणार आहे. त्यामुळे iPhone प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.

स्मार्टफोन्सवर ऑफर्स –

Samsung Galaxy S23 हा स्मार्टफोन 41999 च्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहे. त्याचसोबत Samsung Galaxy S24 फक्त 59145 मध्ये मिळणार आहे. तसेच OnePlus12 हा 64999 च्या लाँच किमतीच्या तुलनेत आता 59884 मध्ये खरेदी करता येणार आहे. मिड-रेंज स्मार्टफोन्समध्ये Poco X6 हा 21999 च्या जागी 18999 मध्ये, Moto G85 फोन 16799 च्या सवलतीसह आणि CMF Phone 1 फक्त 14999 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे Nothing Phone (2) हा 44999 च्या मूळ किमतीवर 8000 ची थेट सूट देऊन फक्त 36999 रु मध्ये खरेदी करता येईल. या सवलतीचा फायदा घेण्यासाठी 21 नोव्हेंबरपूर्वी खरेदी करणे आवश्यक आहे.

विशेष ऑफर्स –

या सेलच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आवडीचा फोन अगदी कमी किमतीत खरेदी करता येईल. सेलमध्ये बँक डिस्काउंट्स, ईएमआय पर्याय आणि थेट किमतीत घट यांसारख्या विशेष ऑफर्स आहेत. त्यासाठी Flipkart च्या वेबसाईटवर भेट द्या आणि अधिक माहिती मिळवा आणि तुमच्या स्वप्नांचा स्मार्टफोन सवलतीत खरेदी करा .

सावधान ! ‘या’ लिंकवर क्लिक केल्यास व्हाल कंगाल ; कसे रहाल सुरक्षित ?

cyber security

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सायबर फसवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, या फसवणुकीमध्ये तुम्हाला अचानक व्हाट्सअँपवर लॉटरी जिंकल्याचे मेसेज अथवा फोन येतात . त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा अनोळखी अँप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जाते . ज्यामुळे तुमच्या बँक खात्यातून काही क्षणातच पैसे गायब केले जातात. अशा प्रकारच्या घटना वारंवार झाल्या असून , अनेक लोक यामुळे कंगाल झाले आहेत. म्हणून अशा घटनांपासून सावध राहण्याची गरज आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही मार्ग सांगणार आहोत , ज्यामुळे तुम्ही फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकता .

काही टक्क्यांचे आमिष दाखवून फसवणूक –

आजच्या घडीला बघता लोकांची शेअर बाजारातील गुंतवणूक वाढली असून , अनेकांचा कल त्याबाजूला असल्याचे दिसून येतो . याचाच फायदा गुन्हेगारांनी घेतला असून , त्यांनी अनेक फसवे शेअर बाजार प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत. ते तुम्हाला काही टक्क्यांचे आमिष देऊन टेलिग्राम ग्रुप्सवर गुंतवणूक करवून घेतात . पण जेव्हा पैसे काढण्याची वेळ येते तेव्हा समजते कि हि सगळी फसवणूक होती . तसेच सोशल मीडियावर देखील बनावट शेअर बाजार प्लॅटफॉर्मची जाहिरात केली जात आहे. अशा प्लॅटफॉर्मवरील रिव्ह्यूज, प्रायव्हसी पॉलिसी आणि अटी व नियम यांची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

क्रेडिट कार्डवरील फसवणूक –

क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी हॅकर्स वेगळे कॉल्स करून तुमच्या खात्याची माहिती घेत आहेत. क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी फोन करून तुमच्याशी संपर्क साधून, तुमच्या कार्डची माहिती घेतात आणि नंतर खात्यातून रक्कम गायब करून फरार होतात. त्याचबरोबर सार्वजनिक बँक व्यवहारातदेखील सायबर गुन्हेगारांनी नवीन फसवणूक प्रकार सुरू केले आहेत. तुमच्या खात्यात चुकून रक्कम आल्याचा दावा करून, त्या रकमेचा हडप करण्यासाठी तुमच्या खात्याची माहिती घेतली जाते आणि त्याद्वारे तुमची फसवणूक केली जाते.

फसवणूक होण्यापासून बाळगा दक्षता –

कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. APK सारख्या फाइल ओपन केल्यास तुमचा फोन हॅक होऊ शकतो. वेगळ्या कॉल्सची तपासणी करून मग त्यांच्याशी बोला. तसेच तुमची वैयक्तिक माहिती मागणारे कॉल्स किंवा ई-मेल्सकडे दुर्लक्ष करा . तुम्ही कुरियर करत असलेल्या मौल्यवान वस्तू पाठवणे टाळा. अशा फसवणुकीला तुम्ही बळी पडल्यास लगेच cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार करा. फसवणूक होऊ नये यासाठी आपल्या डिजिटल सुरक्षिततेची काळजी घ्या आणि आपल्या बँक खात्याची कोणतीही माहिती कोणालाही शेअर करू नका. हि दक्षता पाळल्यास तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता .

हिवाळ्यात आणखी वाढते ‘या’ ठिकाणांचे अलौकिक सौंदर्य ; प्लॅन करा कधी न विसरणारी टूर

winter tour

हिवाळ्यात भारतात प्रवास करणे हा एक अद्भुत अनुभव असतो, विशेषतः जेव्हा तुम्ही थंड वारे, हिमवर्षाव आणि सुंदर टेकड्या पाहता. भारताच्या विविध भागांमध्ये अशी ठिकाणे आहेत जिथे थंडीचा हंगाम शिगेला असतो आणि हिवाळ्यात प्रवास करण्याचा अनुभव आणखीनच खास बनतो. येथे आम्ही तुम्हाला भारतातील 5 सर्वोत्तम थंड ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया …

मनाली, हिमाचल प्रदेश

मनाली हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे जे बर्फाळ टेकड्या, सुंदर दऱ्या आणि रोमँटिक वातावरणासाठी ओळखले जाते. हिवाळ्यात मनालीचे सौंदर्य आणखीनच वाढते, जेव्हा संपूर्ण दरी बर्फाने झाकलेली असते. येथे तुम्ही सोलांग व्हॅली, रोहतांग पास आणि हिडिंबा मंदिर यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. मनालीमध्ये हिवाळ्यात स्कीइंग, स्नोबोर्डिंगसारखे साहसी खेळही उपलब्ध आहेत.

गुलमर्ग, जम्मू आणि कश्मीर

गुलमर्गला “भारताचे स्वित्झर्लंड” देखील म्हटले जाते आणि हिवाळ्यात एक जादुई ठिकाण आहे. बर्फवृष्टीदरम्यान येथील बर्फाच्छादित टेकड्यांचे दृश्य हृदयस्पर्शी असते. स्कीइंग आणि स्नोबोर्डिंग प्रेमींसाठी हे एक योग्य ठिकाण आहे. याशिवाय तुम्ही गुलमर्ग गोल्फ कोर्स, अपरवथ आणि अजयबगाह सारख्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याचा आनंद घेऊ शकता.

औली, उत्तराखंड

औली हे उत्तराखंडमधील एक लहान आणि सुंदर हिल स्टेशन आहे जे हिमवर्षावासाठी प्रसिद्ध आहे. स्कीइंगच्या शौकीनांमध्ये हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे, कारण येथील उतार स्कीइंगसाठी चांगला मानला जातो. बर्फाच्छादित टेकड्या आणि सुंदर दृश्यांमुळे, औली हिवाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

नैनिताल, उत्तराखंड

नैनिताल हे उत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे आणि हिवाळ्यात त्याचे वेगळे आकर्षण असते. गार वाऱ्याच्या झोतात नैनी तलावाच्या काठावर फेरफटका मारून तुम्हाला एक वेगळीच शांतता आणि आनंद मिळेल. हिवाळ्यात येथे बर्फवृष्टी होते आणि यामुळे नैनिताल एक प्रेक्षणीय आणि सुंदर ठिकाण बनते. तुम्ही नैना देवी मंदिर, स्नोव्ह्यू पॉइंट आणि किलबरी सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

मुकुटेश्वर, उत्तराखंड

मुकुटेश्वर हे उत्तराखंडचे एक शांत आणि कमी गर्दीचे हिल स्टेशन आहे, जे थंड दऱ्या आणि आश्चर्यकारक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे नैनितालपासून 50 किमी अंतरावर आहे आणि हिवाळ्यात येथे बर्फवृष्टीचा आनंद लुटता येतो. येथून तुम्ही हिमालयाची सुंदर रांग पाहू शकता, ज्यामुळे हे ठिकाण हिवाळ्यात एक सुंदर ठिकाण बनते.

डिसेंबरमध्ये RBI पतधोरण समितीची बैठक ; व्याजदर कमी होण्याची शक्यता

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या महागाईमुळे अनेक लोकांची चिंता वाढत असून , बऱ्याच वस्तूंची खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच काही बँकानी त्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (MPC) बैठक डिसेंबर महिन्यात होणार असून , त्या बैठकीत देशाच्या धोरणात्मक व्याजदराबाबत महत्वपूर्ण निर्णय होणार आहेत. या निर्णयामध्ये व्याजदर कमी करण्याची योजना आखण्याची शक्यता आहे. सध्या ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) आधारित किरकोळ महागाई दर 6.21 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो मागील 14 महिन्यांतील सर्वाधिक आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या 2 ते 6 टक्क्यांच्या उद्दिष्टाबाहेर गेला असल्याने महागाई नियंत्रणात ठेवण्याचा दबाव बँकेवर वाढला आहे.

RBI चिंता वाढली

मागील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेची चिंता वाढली आहे. जागतिक पातळीवर अमेरिका आणि युरोपियन सेंट्रल बँकेने व्याजदरात घट केली त्यामुळे आर्थिक चैतन्य निर्माण झाले होते. पण भारतातील वाढती महागाई याचा विचार करता रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिमाण होईल , त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक घेऊ शकते .

महागाईचा फटका विविध क्षेत्रांवर –

अर्थव्यवस्थेमधील चलनवाढीवर नियंत्रण ठेवणे हे प्राथमिक ध्येय आहे असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. जेव्हा महागाई 6 टक्क्यांच्या वर जाते, तेव्हा रोख पैशाचा प्रवाह कमी करण्यासाठी व्याजदर वाढवणे हा उपाय आरबीआयकडून स्वीकारला जातो. यामुळे मागणी नियंत्रणात येऊन महागाई कमी करण्यास मदत होते. महागाईचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात विक्रीत घट झाली असून, एफएमसीजी कंपन्यांनाही मागणी कमी झाल्याने तोटा सहन करावा लागत आहे. याशिवाय शेअर बाजारातही सतत घसरण पाहायला मिळत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

व्याजदरातील घट –

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरवाढीचा निर्णय घेतल्यास बाजारात रोख पैसे कमी होऊ शकतात , तर व्याजदर घट केली गेल्यास बाजारातील मागणीला चालना मिळू शकते. सध्याच्या परिस्थितीत रिझर्व्ह बँक आताचे व्याजदर कायम ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरच्या बैठकीत रिझर्व्ह बँक कोणता निर्णय घेईल , याकडे लोकांचे लक्ष वेधले आहे.

व्हॉट्सॲप आता भारतात बंद होण्याची शक्यता; सीसीआयने मेटाला ठोठावला 213 कोटींचा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) सोमवारी फेसबुक आणि व्हॉट्स ॲपची मूळ कंपनी मेटाला २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. 2021 मध्ये व्हॉट्सॲप प्रायव्हसी अपडेटच्या संदर्भात अनुचित व्यवसाय पद्धती अवलंबल्याबद्दल CCI ने मेटाला हा दंड ठोठावला आहे. यासोबतच सीसीआयने मेटाला स्पर्धाविरोधी वर्तन थांबवून अशा कृतीपासून परावृत्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

सीसीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे की, मेटाने आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केला आहे. याशिवाय, हा दंड व्हॉट्सॲपचे 2021 गोपनीयता धोरण कसे लागू केले गेले, वापरकर्त्याचा डेटा कसा संकलित केला गेला आणि तो मेटाच्या इतर कंपन्यांशी कसा शेअर केला गेला याच्याशीही संबंधित आहे.

भारतीय स्पर्धा आयोगाने असेही म्हटले आहे की WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर संकलित केलेला भारतीय वापरकर्ता डेटा 5 वर्षांपर्यंत जाहिरातींसाठी इतर मेटा कंपन्यांसोबत शेअर करू शकत नाही. Whatsapp साठी हा मोठा धक्का आहे. आम्ही असे म्हणत आहोत कारण एकट्या WhatsApp वर देशात 500 दशलक्षाहून अधिक मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत.

सीसीआयला त्यांच्या तपासणीत असे आढळून आले की व्हॉट्सॲपचे ‘टेक-इट-ऑर-लीव्ह-इट’ धोरण अपडेट योग्य नव्हते. म्हणजेच, या धोरणामुळे सर्व व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना डेटा संकलनाच्या अटी स्वीकारण्यास आणि कोणत्याही निवड न करता मेटा गटामध्ये डेटा सामायिक करण्यास भाग पाडले. CCI च्या तपासणीत असे आढळून आले की मेटा ने आणलेले हे धोरण, जे अपडेटच्या स्वरूपात होते, वापरकर्त्यांना ते लागू करण्यास भाग पाडते आणि त्यांची स्वायत्तता कमी करते. CCI नुसार, Meta, WhatsApp च्या माध्यमातून कलम 4(2)(A)(i) चे उल्लंघन करण्यात आले आहे.

CCI ने मार्च 2021 मध्ये WhatsApp च्या सुधारित गोपनीयता धोरणाची तपासणी सुरू केली होती, ज्याने डेटा संकलनाची व्याप्ती वाढवली आणि मेटा आणि त्याच्या इतर उत्पादनांसह डेटा सामायिकरण देखील सोपे केले. तर, 2016 पर्यंत, वापरकर्त्यांना त्यांचा डेटा कोणत्याही कंपनीसोबत शेअर करायचा आहे की नाही हे ठरवण्याचा पर्याय होता.

1 डिसेंबरपासून जनरल तिकीटधारकांना मिळणार आनंदाची बातमी ? जाणून घ्या नवीन अपडेट

indian railway

अलीकडेच सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की भारतीय रेल्वे 1 डिसेंबरपासून जनरल तिकीट असलेल्या प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेणार आहे. या वृत्तानुसार, रेल्वे सर्व गाड्यांमध्ये जनरल डब्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तथापि, या माहितीला अद्याप कोणत्याही अधिकृत स्त्रोताकडून दुजोरा मिळालेला नाही.

या लेखात आपण या व्हायरल बातमीचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि रेल्वेचे सध्याचे नियम आणि योजनांची सविस्तर माहिती देऊ. तसेच ही बातमी खरी असेल तर त्याचा सर्वसामान्य प्रवाशांवर काय परिणाम होईल हे देखील जाणून घेऊ .

रेल्वेचा नवा निर्णय : जनरल कोचमध्ये बदल

भारतीय रेल्वे हे देशातील सर्वात मोठे वाहतूक नेटवर्क आहे, जे दररोज लाखो प्रवाशांना आपली सेवा पुरवते. रेल्वे आपल्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. या मालिकेत, या संदर्भात रेल्वेने नुकतेच काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्यात जनरल कोचशी संबंधित बदलांचा समावेश आहे.

जनरल कोचमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार यांनी नुकतेच एका निवेदनात सांगितले की, रेल्वे सर्व मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये किमान 4 सामान्य डबे बसवण्याचा विचार करत आहे. जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांच्या सुविधा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन जनरल कोचची वैशिष्ट्ये

  • उत्तम व्हेंटिलेशन प्रणाली
  • अधिक आणि आरामदायी जागा
  • मोबाइल चार्जिंग पॉइंट्स
  • उत्तम प्रकाश व्यवस्था
  • स्वच्छ शौचालय

नवीन योजनेबाबत थोडक्यात

  • योजनेचे नाव- जनरल कोच ऑगमेंटेशन योजना
  • प्रभावी तारीख- 1 डिसेंबर 2024 (अनधिकृत)
  • लाभार्थी -सामान्य तिकीट प्रवासी
  • मुख्य उद्देश-प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे
  • सामान्य डब्यांची संख्या- प्रति ट्रेन 4 डबे (प्रस्तावित)
  • लागू गाड्या- सर्व मेल/एक्स्प्रेस गाड्या
  • प्रति ट्रेन -300-400 च्या आसपास अतिरिक्त जागांची संख्या
  • योजनेची स्थिती -अद्याप अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही

खुशखबर ! बिना रिजर्वेशन करा बिनधास्त प्रवास; आजपासून धावणार 19 विशेष ट्रेन्स

train news

भारतीय रेल्वेने 19 नोव्हेंबर रोजी प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणली आहे. आपल्या अपेक्षित स्थानी वेळेवर पोहोचण्यासाठी रेल्वे तिकीट मिळू शकत नाही त्यांच्यासाठी, IRCTC आजपासून 19 विशेष ट्रेन चालवत आहे. या 19 नवीन अनारक्षित गाड्या देशभरात चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या पावलामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबतच रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे.

या 19 गाड्या कुठून धावणार?

या गाड्या देशभरातील मोठ्या शहरांमधून चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये दिल्ली-मुंबई एक्सप्रेस, हावडा-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस, चेन्नई-बेंगळुरू शताब्दी एक्सप्रेस, मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस, कोलकाता-पटणा जन शताब्दी एक्सप्रेस, नवी दिल्ली-लखनौ तेजस एक्सप्रेस, सिकंदराबाद-विशाखापट्टणम गरीब रथ एक्सप्रेस, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, चेन्नई-कोइम्बतूर शताब्दी एक्सप्रेस, नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस, हावडा-रांची इंटरसिटी एक्सप्रेस, बेंगळुरू-म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस, मुंबई-गोवा तेजस एक्सप्रेस, अमृतसर-नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस, हैदराबाद-तिरुपती सुपरफास्ट एक्सप्रेस, जयपूर-दिल्ली डबल डेकर एक्सप्रेस, चेन्नई-मदुराई तेजस एक्सप्रेस, हावडा-पुरी शताब्दी एक्सप्रेस, मुंबई-नाशिक एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे. सकाळपासूनच बहुतांश गाड्या धावतील.

तिकीट कसे खरेदी कराल ?

IRCTC म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने ते सुरू केले आहे. ज्यामध्ये प्रवाशांना प्रवासासाठी आरक्षणाची गरज भासणार नाही. यासाठी थेट स्टेशन गाठून तिकीट खरेदी करा. तिकीट अनेक प्रकारे खरेदी करता येते, स्टेशनच्या तिकीट काउंटरवर जाऊन खरेदी करता येते. तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर UTS (अनरिझव्ह तिकिटिंग सिस्टम) मोबाइल ॲपवरूनही तिकिटे काढता येतील. याशिवाय तुम्ही जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रातूनही रेल्वे तिकीट मिळवू शकता.

कोणत्या सुविधा मिळतील ?

IRCTC च्या अनारक्षित गाड्यांमध्ये अनेक प्रवाशांना अनेक सुविधा मिळतील. यामध्ये तुम्हाला ई-कॅटरिंगची सेवा देखील मिळेल, ज्यामध्ये तुम्ही प्रवासादरम्यान तुमच्या आवडीचे जेवण ऑनलाइन ऑर्डर करू शकता. प्रवासाशी संबंधित संपूर्ण माहिती Rail Connect ॲपमध्ये उपलब्ध असेल. दिशा चॅटबॉटला विचारा, जो AI चॅटबॉट आहे, तुमच्या प्रवासाशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल. याशिवाय प्रवाशाला त्याच्या आवडीची जागा मिळाली नसेल तर तो पर्यायी गाड्या निवडू शकतो.

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवणात सापडल्या अळ्या, रेल्वेकडून केटररला ठोठावला 50 हजारांचा दंड

vande bhrat

रेल्वेमध्ये खराब अन्न सापडल्याच्या अनेक तक्रारी आहेत. बऱ्याचदा त्याचे व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवणात आळ्या सापडल्याची घटना घडली असून तक्रारीनंतर रेल्वेकडून केटररला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चला जाणून घेऊया घटनेबद्दल…

तिरुनेलवेली जंक्शन ते चेन्नई एग्मोर या वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या सांबरात किडे आढळून आल्याने धक्काच बसला. त्यांनी केवळ IRCTC कडे तक्रार केली नाही तर दूषित अन्नाचे व्हिज्युअल देखील शेअर केले आहे.

X वरील पोस्ट

“प्रिय अश्विनी वैष्णव जी, तिरुनेलवेली-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये जिवंत कीटक आढळले,” टागोर यांनी X वर लिहिले. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केले आणि प्रश्न केला की , “याचे निराकरण करण्यासाठी आणि प्रीमियम ट्रेनमध्ये अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत?”

ठोठावला 50,000 रुपयांचा दंड

सोशल मीडियावर या पोस्टला महत्त्व प्राप्त झाल्यानंतर, दक्षिण रेल्वेच्या अधिकृत एक्स हँडलने दूषित अन्नाबाबत स्पष्टीकरण जारी केले. रेल्वेने दूषिततेचे स्रोत ओळखण्यासाठी केवळ अन्नाचे नमुने गोळा केले आणि चाचणीसाठी पाठवले नाहीत तर केटररला 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला.

रेल्वेचे स्पष्टीकरण

“या निष्काळजीपणासाठी, कंत्राटदार एमएस वृंदावन फूड उत्पादनांवर 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे आणि पुढील कारवाई केली जात आहे,” असे रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, “रेल्वे दूषित होण्याच्या स्त्रोताबाबत सर्व शक्यता लक्षात घेऊन या घटनेचा तपशीलवार तपास करत आहे.” असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

रेल्वे प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाच्या दर्जाची खात्री करण्यासाठी वचनबद्ध आहे, अन्न मानकांचे परीक्षण करण्यासाठी ट्रेनमध्ये नियमित तपासणी केली जाते. वेळेवर निराकरण आणि पाठपुरावा सुनिश्चित करून, रेल्वे मदाद प्रणालीद्वारे प्रवाशांच्या तक्रारी तत्परतेने हाताळल्या जातात,” असे निवेदनात पुढे म्हटले आहे.