Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 365

SAIL Bharti 2024 | SAIL अंतर्गत मोठी भरती सुरु; या पदांच्या भरल्या जाणार जागा

SAIL Bharti 2024

SAIL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध समिति घेऊन येत असतो. जेणेकरून तुम्हाला देखील चांगली नोकरी मिळेल. आज देखील आम्ही तुमच्यासाठी नोकरीची एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. त्या अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ती म्हणजे आता स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आह. ही भरती परिचारिकांचे प्राविण्य प्रशिक्षण या पदाच्या आहेत. या पदाच्या एकूण 51 रिक्त जागा आहे. तरी त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहेत. 3 ते 5 डिसेंबर दरम्यान ही मुलाखत होणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | SAIL Bharti 2024

पारिचारिकांचे प्राविण्य प्रशिक्षण या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 51 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीची निवड मुलाखती अंतर्गत होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

ही मुलाखत टीव्ही स्कूल डीएसपी मुख्य रुग्णालय जवळ जे एम सेन गुप्ता रोड बी झोन दुर्गापूर 713205

मुलाखतीची तारीख | SAIL Bharti 2024

3 ते 5 डिसेंबर दरम्यान मुलाखत होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा बीएससी नर्सिंग पास असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भारती अंतर्गत निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 10 हजार रुपये एवढे वेतन मिळेल.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • ही भरती मुलाखती द्वारे होणार आहे
  • दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Khajoor Milk Benefits | दुधात खजूर उकळून प्यायल्याने आरोग्याला होतात अद्भुत फायदे; वाचा सविस्तर

Khajoor Milk Benefits

Khajoor Milk Benefits | संपूर्ण राज्यात हिवाळा चालू झालेला आहे. सर्वत्र थंडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. या थंडीसोबत अनेक आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होतात. थंडीमध्ये वातावरण थंड असल्याने सर्दी खोकल्यासारखे विविध आजार होतात. यामुळे या थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काही पदार्थांची सेवन करणे गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही जर थंडीमध्ये खजूर खाल्ले, तर ते तुमच्या शरीराला खूप फायदेशीर असतात. खजूर आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतात तसेच उष्णता वाढवतात. यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट आणि फायबरचे घटक असतात. यामुळे तुमची पचनक्रिया देखील चांगली होते आणि शक्ती येते. परंतु तुम्ही जर योग्य पद्धतीने खजुराचे सेवन केले तर याचे तुम्हाला खूप जास्त फायदे होतील.

खजूर दुधात उकळून प्यावे? | Khajoor Milk Benefits

तुम्ही खजूर हे दुधात उकळून देखील पिऊ शकता. यासाठी तुम्ही दुधात खजूर टाकून चांगले उकळून घ्यायचे आहे. दूध घट्ट होईपर्यंत ते उकळा. त्यानंतर दूध थंड झाल्यानंतर ते बाहेर काढा आणि तुम्ही गाळणीने गाळून हे दूध पिऊ शकता.

खजूर दुधात उकळून पिण्याचे फायदे

तुम्ही जर दुधामध्ये खजूर उकळून पिले तर शरीरातील अशक्तपणा दूर होतो. खजुरामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. तसेच दुधामध्ये प्रोटीन असते. या दोन्हींमुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि हिवाळ्यांमध्ये अशक्तपणा येत नाही.

शरीर अधिक गरम राहते

तुम्ही जर दुधामध्ये खजूर उकळून प्यायले, तर तुमचे शरीर उबदार राहते. यामुळे शरीराला उष्णता निर्माण होते. आणि सर्दी खोकल्याचा त्रास होत नाही. तसेच शरीराचे तापमान देखील संतुलित राहते.

चांगली झोप येते

तुम्ही जर खजूर दुधामध्ये उकळून प्यायले, तर तुम्हाला चांगली झोप देखील येते. एवढेच नाही तर खजुराने दुधाचे सेवन केल्याने तुमचा मूड देखील चांगला राहतो. आणि राग कमी होण्यास मदत होते.

मासिक पाळी नियमित होण्यात मदत

आजकाल महिलांना मासिक पाळी संबंधित अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अशा वेळी जर महिलांनी दूध आणि खजूर एकत्र खाल्ले, तर शरीरातील उष्णता वाढते आणि रक्त देखील वाढते. तसेच रक्त प्रवाह देखील सुरुवात होतो आणि मासिक पाळी नियमित येण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे तुम्ही दूध आणि खजूर एकत्र खाल्ले तर तुमची भूक नियंत्रणात राहते. आणि वजन देखील वाढत नाही. यामुळे शरीराला विटामिन सी, लोह, फायबर मिळते.

Viral Video | रेल्वे स्थानकावरून महिला कोसळली खाली; पुढे जे झाले ते पाहून डोक्यालाच लावाल हात

Viral Video

Viral Video | आजकाल सोशल नाही आहे असे ठिकाण झाले आहे. जिथे प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करतात. सोशल मीडियावर आपण घरबसल्या अनेक गोष्टी पाहू शकतो. अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओमधून लाईक आणि कमेंट्स मिळवण्यासाठी आजकाल लोक कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत.

सध्या सोशल मीडियावर असाच एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. यामध्ये ती महिला पायऱ्यांवरून घसरत येताना दिसत आहे. नंतर खाली कोसळते तिला पाहून बाकीचे लोक खूपच घाबरतात. परंतु नंतर असे समजते की, ती हे सगळे फक्त व्हिडिओसाठी करत आहे. या महिलेचा व्हिडिओ पाहून सुरुवातीला सगळ्यांना तिची काळजी वाटते. परंतु नंतर लोकांनी तिच्यावर संताप व्यक्त केलेला आहे.

https://www.instagram.com/reel/DCbwgD6t9G2/?utm_source=ig_embed&ig_rid=fd4de4e8-d12a-49b7-9466-51b6a20eabfe

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video ) पाहू शकता की, एक महिला रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवरून चालत असते. आणि अचानक तिला चक्कर येते. आणि ती खाली कोसळते. पायऱ्यांवरून घरंगळत खाली येत असते. तेवढ्यात समोरून एक माणूस येतो आणि तिची मदत करतो. परंतु नंतर त्याला समजते की, ती महिला हे केवळ एका व्हिडिओसाठी करत आहे. त्यानंतर ती महिला स्वतःच उठून बसते आणि हसायला लागते.

सोशल मीडियावर instagram अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेले आहे. या व्हिडिओवरून या महिलेचे नाव आरती आहे असे लक्षात येते. त्या महिलेने हा व्हिडिओ शेअर करून “मला खूप जास्त लागले आहे” असे कॅप्शन दिलेले आहे. तिच्या या व्हिडिओवर युजरने मात्र संताप व्यक्त केलेला आहे.

या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली आहे की, “यांच्यासारख्या लोकांमुळे इतर प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.” आणखी एका व्यक्तीने लिहीले आहे की, “या लोकांमुळे माणसांचा माणसांवरील विश्वास उडून जाईल. जेव्हा खरच कोणाला कोणाची गरज असेल. तेव्हा त्यांच्या मदतीला कोणीही जाणार नाही.” अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार, खुद्द नितीन गडकरी यांनी दिली माहिती

nitin gadakri

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा देशाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे. त्यातही वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आणि रस्ते उत्तम करणे यामध्ये देखील नितीन गडकरी यांचे प्लॅन गेम चेंजर ठरलेत यात शंका नाही. आता राज्याची राजधानी मुंबईमध्ये वाहतूक कोंडी पासून सुटका मिळावी यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तसंच इतरही काही प्रकल्प मुंबईच्या प्रगतीसाठी सुरू आहेत. अशातच ऍडिशन म्हणून आता मुंबई ते नवी मुंबई विमानतळ अगदी 17 मिनिटात गाठता येणार आहे. त्यासाठी वॉटर टॅक्सीची सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. एका प्रचारसभेमध्ये गडकरी बोलत होते तेव्हा त्यांनी याबाबत भाष्य केले.

सुरु होणार वॉटर टॅक्सी

न्यूझीलंड, अमेरिका, फ्रान्स यासारख्या अनेक देशांमध्ये वॉटर टॅक्सी सार्वजनिक वाहतूक म्हणून वापरली जाते. आता भारतात प्रथमच वॉटर टॅक्सी सेवा 2020 मध्ये केरळ इथे सुरू झाली. याबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितलं की नवी मुंबई विमानतळा जवळ जेट्टीची निर्मिती यापूर्वीच झाली आहे मुंबई आणि ठाणे परिसराला विशाल असा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्राचा जलवाहतुकीसाठी वापर करून रस्त्यावरची गर्दी आणि प्रदूषण कमी करता येणार आहे. मुंबई- दिल्ली एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर मुंबई -पुणे महामार्गावरील गर्दी देखील कमी होणार असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना गडकरींनी ठाण्यातील वाहतूक कोंडीवर सुद्धा भाष्य केलं ते म्हणाले, ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न कायम आहे या ठिकाणी उड्डाण पूल बांधून सुद्धा वाहतूक कोंडीची समस्या आहे. ठाणे, मुंबई, दिल्ली या शहरांची सर्वात मोठी समस्या म्हणजे वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण आहे. मुंबई ठाणे शहराची प्रगती शैक्षणिक क्षेत्रामध्ये होत आहे त्यामुळे शिक्षण आणि रोजगारासाठी इथं लोकांचे लोंढे वाढत आहेत. या भागातच नव्हे सर्वत्र विकास झाला पाहिजे.

आतापर्यंत उत्तर प्रदेश मध्ये पाहिजे तसा रोजगार उपलब्ध झाला नाही. महाराष्ट्रात सर्व मोठे उद्योग येत आहेत 20,000 कोटींची गुंतवणूक संभाजीनगर मध्ये होते आहे. राज्य आणि प्रशासन कसे असावे आणि ते कसे चालवावे हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे आहे परंतु गेल्या साठ वर्षात काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकास झाला नाही. अशी टीका देखील नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमांमध्ये बोलताना केली आहे

मतदान कार्ड नसेल तर हे 12 ओळखपत्र दाखवून करा मतदान; वाचा सविस्तर

Voter ID

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा निवडणुक आता अगदी एका दिवसावर येऊन पोहोचलेली आहे. उद्या म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये विधानसभा निवडणूकसाठी मतदान होणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रशासकीय यंत्रणा मतदानाच्या तयारीमध्ये आहे. तर मतदाराचा कोणाला मत द्यायचे याकडे लक्ष देत आहे. मतदान करायला जाताना आपले ओळखपत्र घेऊन जाणे खूप गरजेचे असते. परंतु जर तुमच्याकडे ओळखपत्र आले नसेल तर असे काही महत्त्वाचे ओळखीचे पुरावे आहे. जे घेऊन गेल्यानंतर देखील तुम्हाला मतदान करता येईल.

12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य

अनेक लोकांनी ची मतदार म्हणून नोंद आहे. परंतु त्यांच्याकडे मतदानाची ओळख पत्र नाही. परंतु अशावेळी निवडणूक आयोगाने तुमच्यासाठी अन्य 12 पुरावे मतदान म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचे सांगितलेले आहे. त्यापैकी तुम्ही एखादा पुरावा घेऊन मतदार केंद्रावर गेला, तरी देखील तुम्हाला मतदान करता येणार आहे.

हे ग्राह्य धरले जाणारे 12 पुरावे कोणते?

  • तुम्ही जर मतदान केंद्रावर आधार कार्ड घेऊन गेले तरी देखील तुम्हाला मतदान करता येणार आहेत.
  • मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार देखील त्यांचे जॉब कार्ड दाखवून मतदान करू शकतात.
  • बँक किंवा टपाल खात्याचे पासबुक दाखवून देखील तुम्ही मतदान करू शकता.
  • श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्डचा वापर करून देखील तुम्ही मतदान करू शकता.
  • तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन दाखवून देखील मतदान करू शकता.
  • तुमच्या पॅन कार्ड चा वापर करून देखील तुम्ही मतदान करू शकता.
  • तुम्ही राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक आरजीसी यांनी दिलेले स्मार्ट कार्ड दाखवून देखील मतदान करू शकता.
  • तुमचा पासपोर्ट दाखवून देखील तुम्हाला मतदान करता येते.
  • तुमच्या वेतनविषयक कागदपत्रे दाखवून देखील मतदान करता येते.
  • केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र.
  • संसद विग्रहण सभा सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र दाखवून देखील मतदान करता येते.
  • भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र.

Jio New Plan | जिओने लॉन्च केला 601 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; वर्षभर मिळेल अनलिमिटेड 5G डेटा

Jio New Plan

Jio New Plan | जिओ ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओ तसेच इतर खाजगी टेलीकॉप कंपन्यांनी जुलै महिन्यामध्ये त्यांच्या रिचार्जच्या दरात वाढ केली. त्यानंतर त्यांचे अनेक ग्राहक नाराज झाले होते. परंतु आता कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना आणत आहे. अशातच जिओनी त्यांच्या युजरसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. ती म्हणजे जिओ (Jio New Plan) त्यांच्या यूजरसाठी नवीन लॉन्च केला आहे. या प्लॅन द्वारे युजर्सला आता अमर्यादित 5G डेटाचा ॲक्सेस मिळणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून जिओ (Jio New Plan) त्यांच्या 5G कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ करण्यावर काम करत आहे. अशातच आता कंपनीने त्यांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक फायदे सादर केलेले आहेत. त्यामुळे आता युजरला अमर्यादित 5G वॉचर प्लॅन लॉन्च केलेले आहे. म्हणजे आता युजरला एक वर्षासाठी अमर्यादित स्पीडवर इंटरनेट वापरता येणार आहे.

Jio चा 601 रुपयांचा डेटा व्हाउचर | Jio New Plan

जिओनी फाईव्हच्या 601 रुपयांच्या किमतीत ऑफर केलेला आहे. हे वाउचर फक्त प्रीपेड युजर्ससाठी उपलब्ध आहे. जिओचे हे वाउचर यूजर्सला एक वर्षाच्या मर्यादेत दिलेले आहे. यामध्ये त्यांना अमर्यादित 5G डेटा दिला जाणार आहे. या 601 रुपयांच्या डेटा व्हाउचरसह युजर्सला प्रत्येकी 51 रुपयाचे 21 डेटा वाउचर देण्यात येणार आहे. 51 रुपयाचे डेटा व्हाउचर युजर्सला एक महिन्यासाठी अमर्यादित डेटा ॲक्सिस देणार आहे. जे तुम्हाला प्रत्येक महिन्याला जिओ ॲप आणि वेबसाईटवर सक्रिय करावे लागतील.

601 व्हाउचर कसे सक्रिय ऍक्टिव्ह करायचे?

यासाठी तुम्ही सगळ्यात आधी जिओ ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन 601 रुपयाचे वाउचर खरेदी करायचे आहे. जर तुम्हाला हे कोणाला गिफ्ट करायचे असेल, तर त्याच्याकडे ट्रान्सफर करा. किंवा ते स्वतः वापरायचे असेल, तर ते स्वतः रीडिंग करा. तुम्ही या रिचार्जसह वर्षभर अमर्यादित 5G डेटाचा अनुभव घेऊ शकता.

शेतकऱ्यांच्या मुलांनाही घेता येणार स्वाधार योजनेचा लाभ; मिळणार असा लाभ

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारमार्फत अनेक वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. ज्याचा फायदा संपूर्ण विद्यार्थ्यांना होत असतो. अशातच आता आपल्या राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून एक नवीन योजना राबविण्यात आलेली आहे. ही योजना अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध घटकातील शासकीय वस्तीगृहासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या योजनेचे नाव स्वाधार योजना असे आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 30 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

योजना राबविणे मागची उद्दिष्टे काय आहे?

सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. ही जिल्ह्याच्या ठिकाणी इयत्ता दहावी आणि बारावीच्या नंतर व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांना भोजन निवास आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे.

योजनेच्या लाभाचे स्वरूप

सरकारच्या या स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवोदय घटकातील विद्यार्थ्यांना 51 हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिले जाणार आहेत. हे पैसे त्यांना दोन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना 5000 रुपये व इतिहास इतर अभ्यासक्रमांना 2 हजार रुपये अतिरिक्त दिले जाणार आहे.

योजनेच्या अटी

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जाती आणि नवोदय प्रवर्गातील असावा.
  • विद्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
  • तो विद्यार्थी स्थानिक रहिवाशी नसावा.
  • तो विद्यार्थी नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 km पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा.
  • विद्यार्थी हा बारावी किंवा त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
  • पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा.
  • इयत्ता अकरावी मध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी 50% गुण असणे गरजेचे आहे.

एक होम लोन घेतल्यावर दुसरे होम लोन घेता येते का? जाणून घ्या सविस्तर

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या हक्काचं स्वतःचं घर असावं. असे प्रत्येक व्यक्तीचा स्वप्न असते. परंतु आजकाल महागाई तसेच इतर गोष्टी इतक्या प्रमाणात वाढलेल्या आहेत की, त्यामुळे हे घर घेण्याचे स्वप्न तसेच राहून जाते त्याचप्रमाणे आजकाल घरांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे एक रकमी घर घेणे हे अनेक लोकांना शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा लोक होम लोनच्या माध्यमातून घर खरेदी करतात. परंतु एकदा होम लोन घेतले असताना आणखी एक घरी घेण्याचा विचार लोकांच्या मनात येतो. परंतु आता एक होमलोन असताना दुसरे होम लोन तुम्हाला घेता येते की, नाही? याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. एक होम लोन घेतल्यानंतर जर तुम्हाला दुसरं होम लोन घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला टॉप-अप लोन घेता येईल. आता आपण या टॉप अप होम लोनची माहिती आणि व्याजदर जाणून घेणार आहोत.

टॉप अप होम लोन

या टॉपअप होम लोनमध्ये तुम्हाला खूप चांगल्या डील्स देखील मिळतात. जर एखाद्या ग्राहकाने त्यांच्या कर्जाच्या बारा महिन्यांचा ईएमआय अजिबात स्लिप न करता भरला असेल, तर त्यांच्यासाठी टॉप-अप होम लोनचा पर्याय चांगला आहे. या कर्जाचा कालावधी हा बँकांनुसार वेगवेगळा असतो. नॉर्मल होम लोन आणि टॉपअप होम लोनच्या व्याज दरात एक ते दोन टक्क्यांचा फरक असतो. टॉप-अप होम लोनचा व्याजदर हा सामान्य लोनपेक्षा जास्त असतो.

अशाप्रकारे जर तुम्ही एक होम लोन घेतले असेल आणि दुसऱ्या होम लोनसाठी तुम्ही अप्लाय केले असेल, तर तुम्ही टॉप होम लोनचा पर्याय निवडू शकता. यामुळे तुमच्या दुसऱ्या घराचे स्वप्न देखील लवकरच पूर्ण होईल. आज-काल अनेक लोक एकापेक्षा जास्त घरे विकत घेतात. अशावेळी ते टॉप-अप होम लोनचा आधार घेतात. या होम लोनच्या आधारे त्यांना त्यांच्या स्वप्नातील घर उभे करता येते.

सलग दुसऱ्या दिवशी वाढला सोन्याचा दर ; पहा 22, 24 आणि 18 कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागतील ?

gold rate

मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण झाल्यानंर कालपासून म्हणजेच 18 नोव्हेम्बर पासून पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली असून आज प्रति 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 7600 रुपयांनी वाढला असून त्यानंतर त्याची किंमत 7,72,200 रुपये झाली आहे. त्याच वेळी, प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर आज 760 रुपयांनी महागून 77,220 रुपयांवर पोहोचला आहे.

आता आजचे पुण्यातील सोन्याचे दर पाहुया आज तुम्हाला 22 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर त्यासाठी एक ग्राम करिता 75 रुपये मोजावे लागतील. काल हीच सोन्याची किंमत 6995 रुपये इतकी होती त्यामुळे आज सोन्याच्या दरामध्ये 70 रुपयांची वाढ झाली आहे तर आज तुम्हाला 22 कॅरेट दहा ग्रॅम सोने खरेदी करायचं असेल तर त्यासाठी 700650 रुपये मोजावे लागतील काल हाच दर 69,950 रुपये इतका होता म्हणजेच आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये तब्बल 700 रुपयांची वाढ झाली आहे. आज पुण्यामध्ये सोन्याचा दर काय आहे चला पाहुयात …

24 कॅरेट

24 कॅरेट सोन्याच्या दाराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7707 रुपये इतका आहे. हाच दर काल 7631 रुपये होता आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 76 रुपयांची वाढ झाली आहे. तर आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 77 हजार 70 रुपये इतका आहे. हाच दरकाल 76 हजार 310 रुपये इतका होता म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 760 रुपयांची वाढ झाली आहे.

18 कॅरेट

18 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 5781 रुपये इतका आहे. तर दहा ग्रॅम 18 कॅरेट सोनं तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 57810 रुपये मोजावे लागतील

अशा पद्धतीने Elon Musk ने भारताच्या सॅटेलाईटला पोहचवले अंतराळात ; पहा जबरदस्त Video

elon musk

भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT N-2 अखेर आकाशात झेपावले आहे. इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे हे सॅटॅलाइट उद्योगपती एलोन मास्क यांच्या SpaceX मधील फाल्कन नाईन या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. अमेरिकेतल्या फ्लोरिडा येथील केप कार्निवल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं याचं कार्य सुरू झाल्यानंतर भारताची दळणवळण व्यवस्था अधिक बलशाली होईल असं सांगितलं जात आहे. हा प्रोजेक्ट म्हणजे भारताच्या इंटरनेट जगातली एक क्रांती असल्याचे बोलले जात आहे.

मिळेल विमानातही इंटरनेट

यामुळे ईशान्येपासून लक्षद्वीपपर्यंतच्या संपूर्ण भारतीय प्रदेशाला जलद ब्रॉडबँड सेवांनी जोडेल आणि विमानातही इंटरनेट प्रदान करेल. कनेक्टिव्हिटी, अमेरिकन कंपनी स्पेसएक्स फ्रॉमच्या फाल्कन-9 लॉन्च व्हेईकलवर लॉन्च करण्यात आले. सोमवारी मध्यरात्रीनंतर अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केले.

भारताचे पहिले परदेशातील मिशन

हे भारताचे पहिले मिशन आहे जे अमेरिकन माती आणि SpaceX रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांमध्ये इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ची व्यावसायिक शाखा, NewSpace India Limited (NSIL) चा हा दुसरा मागणी-चालित उपग्रह आहे. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 12.01 वाजता हे मिशन प्रक्षेपित केले गेले .

संपूर्ण भारत व्यापणारे 32 युजर बीम

GSAT N-2 हा अंदाजे 4700 किलो वजनाचा केए-केए बँड उपग्रह आहे ज्यामध्ये अंदमान-निकोबार द्वीपसमूह आणि लक्षद्वीपसह संपूर्ण भारतीय उपखंड कव्हर करणारे 32 वापरकर्ता बीम आहेत. यापैकी 8 अरुंद स्पॉट बीम ईशान्य क्षेत्रासाठी समर्पित आहेत, तर 24 रुंद बीम उर्वरित भारतासाठी समर्पित आहेत. या 32 बीमना भारतीय हद्दीत असलेल्या हब स्टेशन्समधून सपोर्ट केले जाईल. केए बँड हाय-थ्रूपुट कम्युनिकेशन पेलोडची क्षमता सुमारे 48 जीबी प्रति सेकंद आहे आणि ती देशातील दुर्गम गावांना इंटरनेटशी जोडेल. हा उपग्रह १४ वर्षांच्या मोहिमेवर पाठवला जात आहे. हे संपूर्ण भारतीय प्रदेशात ब्रॉडबँड सेवांसह इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी (IFC) वाढवेल.

एन-सिलचा दुसरा उपग्रह

N-SIL चा हा दुसरा मागणी आधारित उपग्रह आहे. यापूर्वी, N-SIL ने जून 2022 मध्ये पहिला मागणी-आधारित उपग्रह GSAT-24 प्रक्षेपित केला होता. अंतराळ सुधारणांअंतर्गत, N-SIL आता उपग्रहांची मालकी आणि संचालन करू शकते. सध्या N-Sil चे 11 उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत आहेत.