Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 366

तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाईल बघत असाल तर, सावधान ! होऊ शकतो हा गंभीर आजार

Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मानवाच्या आयुष्यात खूप जास्त प्रगती झालेली आहे. आधुनिक पद्धतीने आयुष्य जगावे असे प्रत्येकाला वाटते. याबद्दलचे जीवनशैलीमुळे आता मोबाईल, फोन, लॅपटॉप यांसारख्या गोष्टी आपल्या जीवनाच्या खूप जवळ आलेले आहे. या तंत्रज्ञानाने आपल्याला संपूर्ण जगाची नव्याने ओळख पटलेली आहे. तसेच आपण जगाशी पटकन जोडले जात आहोत. परंतु या तंत्रज्ञानाचा आपल्या आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होताना दिसत आहेत. मोबाईल फोन वापरण्यात आजकाल काळाची गरज झालेली आहे. अगदी एक मिनिट देखील माणूस स्वतःला मोबाईल पासून लांब ठेवत नाही. अगदी बाथरूममध्ये जरी गेले तरी ते फोन घेऊन जातात. आणि सोशल मीडियावर स्क्रोल करतात. अनेक लोकांना तर टॉयलेटमध्ये बसूनच ऑफिसचे ई-मेल्स वाचण्याची किंवा इतर गोष्टींवर काम करण्याची सवय असते. आणि या कामांमध्ये आपण टॉयलेटमध्ये किती वेळ बसतो? हे आपल्याला समजतच नाही. आणि याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतात.

टॉयलेटमध्ये आधी फक्त 5 ते 10 मिनिटे लागायची. पण आता 15 ते 20 मिनिट माणूस टॉयलेटमध्ये असतो. परंतु तुम्ही जर टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसून राहिले, तर याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. तुम्हाला मूळव्याध पेल्विक मासपेशीचे नुकसान होते. तसेच पचनाच्या संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. हाती आलेल्या माहितीनुसार असे समजले आहे की, तुम्ही जर टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसला, तर तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचते. या सवयीमुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे स्नायूंचा कमकुवतपणा वाढतो.

तुम्ही जर टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसून राहिला तर गुदद्वारा भोवती तसेच मलाशयामध्ये रक्तवाहिन्यांवर दबावत येतो. जर या भागात सततचा ताण पडला, तर रक्तवाहिन्या देखील सुजतात आणि मुळव्याधाची समस्या निर्माण होते. शरीराच्या खालच्या भागावर अतिरिक्त दाब पडतो. त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेला देखील हानी पोहोचते.

तुम्ही जर टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसलात, तर मास पेशींवर सततचा तणाव येत राहतो. आणि हळूहळू कमजोर होत जातात. आणि यामुळे पचनप्रक्रिया बाधित होते. आणि मल शरीराबाहेर टाकताना अडचणी होतात. दीर्घकाळ जरी ही समस्या राहिली तर त्याचे एका गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे टॉयलेटमध्ये जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटे घालवावी.

या सगळ्या समस्यांपासून वाचायचे असेल, तर तुम्ही टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल घेऊन जाण्याची सवय मोडा. तुम्ही पाच ते दहा मिनिटात फक्त टॉयलेटमध्ये वेळ द्या. तुमची पचनक्रिया चांगली होण्यासाठी आहारात ओट्स, बीन्स, फळं आणि भाज्या इत्यादींचा समावेश करा. तसेच शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसाला कमीत कमी दोन लिटर पाणी प्या. त्याचप्रमाणे शौचाला जाण्यासाठी एक ठराविक वेळ द्या. म्हणजेच तुमची पचनक्रिया सुधारेल.

गोल्ड ETF गुंतवणुकीतील लोकप्रियता वाढली ; नफा मिळवण्याचा जबरदस्त मार्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोक आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक पर्याय शोधत असतात. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांसाठी सोन्यात गुंतवणूक हा एक आकर्षित पर्याय ठरला आहे . भारतात अलीकडे गोल्ड ईटीएफ (गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड) बाबत लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. जागतिक परिषदेच्या अहवालानुसार भारतीय गोल्ड ईटीएफकडे असलेले सोने 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत विक्रमी 54.5 टनांवर पोहोचले असून, हे गेल्या चार वर्षांतील जवळपास दुप्पट झालेले आहे. 2020 मध्ये ही संख्या केवळ 27.4 टन होती.

गोल्ड ईटीएफ म्हणजे काय ?

गोल्ड ईटीएफ म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोने खरेदी करण्याचा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे . प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी गुंतवणूकदार स्टॉक एक्सचेंजवर गोल्ड ईटीएफ खरेदी विक्री करू शकतात. यामुळे चोरीचा किंवा तोटा होण्याचा धोका टाळता येतो.

लोकप्रियता वाढण्याची कारणे

भौगोलिक अस्थिरता, सेंट्रल बँकेच्या बदलत्या धोरणांचा प्रभाव तसेच इक्विटी मार्केटमधील अस्थिरता यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. भारतीय म्युच्युअल फंड इंडस्ट्री बॉडी AMFI च्या अहवालानुसार गेल्या 21 महिन्यांत 12448 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक गोल्ड ईटीएफमध्ये झालेली आहे . 2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गोल्ड ईटीएफ अधिक आकर्षक ठरले आहेत. नव्या कर रचनेत एका वर्षापेक्षा जास्त काळ सोन्यातील गुंतवणूक ठेवल्यास 12.5% भांडवली नफा कर आकारला जातो.

गुंतवणुकीमध्ये वाढ

गेल्या 15 वर्षांत 2011, 2020 आणि 2024 मधील अनिश्चिततेच्या काळात सोन्यातील गुंतवणूक मोठयाप्रमाणात वाढली आहे. 2024 मध्ये गोल्ड ईटीएफद्वारे 12 टन, तर 2011 आणि 2020 मध्ये अनुक्रमे 17 टन आणि 14 टन सोने खरेदी झाले.

गुंतवणुकीचे एक आदर्श साधन

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना अनेक फायदे मिळतात. डायरेक्ट सोन्याच्या दागिन्यांऐवजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात गुंतवणूक केल्याने चोरीचा धोका पूर्णपणे टाळता येतो, त्यामुळे ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तसेच लॉकर चार्ज किंवा दागिन्यांच्या मेकिंग चार्जसारख्या खर्चांची बचत होते, ज्यामुळे ही अधिक फायदेशीर ठरते. स्टॉक एक्सचेंजवर शेअर्सप्रमाणे गोल्ड ईटीएफचे व्यवहार सहज करता येतात, ज्यामुळे गुंतवणूक आणि विक्री अधिक सोपी व सुलभ होते. या सर्व फायद्यांमुळे गोल्ड ईटीएफ गुंतवणुकीचे एक आदर्श साधन मानले जाते.

नफा मिळवून देणारी संधी –

गोल्ड ईटीएफ खरेदीसाठी केवळ 1% किंवा त्यापेक्षा कमी ब्रोकरेज आकारले जाते, जे सोन्याच्या पारंपरिक खरेदीच्या तुलनेत कमी आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे गोल्ड ईटीएफ युनिट्सवर कर्ज घेण्याचीही सुविधा उपलब्ध आहे, जी आर्थिक गरजांसाठी उपयोगी ठरते. गोल्ड ईटीएफ भारतीय गुंतवणूकदारांसाठी एक सोपी, सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक संधी ठरत आहे. वाढत्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणूक भविष्यातही स्थिर नफा देणारी ठरू शकते.

2025 मध्ये स्मार्टफोन खरेदीसाठी ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

smart phone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोनचा वापर करणाऱ्याची संख्या वाढत असून , अलीकडे फोनमधील वेगवेगळ्या फीचर्सने लोकांना भारावून टाकले आहे. त्यातच 2024 मध्ये AI फीचर्सने सज्ज स्मार्टफोन बाजारात धडाक्यात आले आहे. पण हे तंत्रज्ञान सध्या काही मर्यादित डिव्हाईसमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. मात्र पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये हे तंत्रज्ञान अनेक स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळणार आहे. या तंत्रज्ञानामुळे बाजारातील स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ दिसून येणार आहे. AI ची वाढती मागणी , हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधील गुंतवणूक तसेच 5G तंत्रज्ञानातील बदल यामुळे स्मार्टफोन उत्पादकांना मोठा खर्च करावा लागत आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशावर परिमाण होणार आहे.

किंमतीत 5% वाढ होण्याची शक्यता –

एका अहवालानुसार 2025 पर्यंत स्मार्टफोनच्या जागतिक सरासरी विक्री किंमतीत 5% वाढ होण्याची शक्यता आहे. पॉवरफुल प्रोसेसर, कॅमेरा आणि AI सारख्या तंत्रज्ञानाने सुसज्ज प्रीमियम स्मार्टफोनची मागणी वाढत आहे. जनरेटिव्ह AI सारख्या तंत्रज्ञानाची क्रेझ वाढल्याने उत्पादकांना अधिक कार्यक्षम CPU, GPU, आणि NPU तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

स्मार्टफोन खरेदीसाठी अधिक खर्च –

स्मार्टफोनची किमत वाढत असल्याने ग्राहकांनी खरेदी करताना काळजीपूर्वक विचार करावा लागेल. AI फीचर्स आणि प्रीमियम हार्डवेअरचे फायदे जाणून घेत, स्मार्टफोनची निवड करणे गरजेचे आहे. 2025 मध्ये AI आधारित स्मार्टफोनमुळे डिजिटल अनुभव नक्कीच वेगळ्या उंचीवर जाईल, पण यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.

प्रेशर कुकरमध्ये शिट्टी वाजवताच डाळ फसफसणार नाही, ‘हे’ कुकिंग हॅक वापरून पहा

kitchen tips

आपण सगळे रोज स्वयंपाकघरात काम करतो. विविध प्रकारचे अन्न तयार करा. कधीकधी काही लोकांना भाज्या आणि मसाले चिरून आणि बारीक करायला खूप वेळ लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही सोप्या कुकिंग हॅक्स आणि किचन टिप्स वापरून पहा. तुम्हाला अनेक किचन टिप्स आणि हॅक्स ऑनलाइन सापडतील. शेफ रणवीर ब्रार देखील त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर अनेकदा विविध पाककृती तसेच किचन टिप्स आणि हॅक शेअर करतात. चला जाणून घेऊया त्यापैकी काही महत्वाच्या टिप्स

किचन टिप्स

  • शेफ रणवीर ब्रार यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही प्रेशर कुकरमध्ये काही शिजवता तेव्हा तांदूळ आणि डाळीचे पाणी बाहेर फेकायला लागते? तुम्ही डाळ आणि तांदळाच्या पाण्यात थोडं तूप टाका आणि शिट्ट्याभोवती तूपही लावा. हे प्रेशर कुकर ओव्हरफ्लो होण्यापासून रोखेल.
  • जर तुम्ही नवीन पॅन वापरत असाल तर प्रथम ते स्वच्छ करा. नंतर ते कोरडे करून थोडे तेल घालून कांद्याच्या तुकड्याने चोळा. यामुळे पॅन गुळगुळीत आणि नॉन-स्टिक दिसेल.
  • जर तुम्ही खीर बनवत असाल तर बासमती तांदूळ वापरू नका, कारण ते नाजूक आणि ठिसूळ आहे. लहान दाण्यांच्या तांदळाची खीर बनवणे चांगले. या प्रकारच्या भातापासून बनवलेली खीरही चवीला छान लागते.
  • जर तुम्हाला अंडी जास्त काळ ताजी ठेवायची असतील तर ती ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. अंड्याची टोकदार बाजू तळाशी आणि गोलाकार भाग वरच्या बाजूला ठेवा
  • जेव्हा तुम्ही हिरव्या पालेभाज्या पाण्यात उकळा तेव्हा त्यात मीठ आणि बेकिंग सोडा घाला. त्यामुळे भाज्यांचा प्रत्येक रंग शाबूत राहील.
  • तुम्ही कांदा, मसाले, टोमॅटो आणि व्हिनेगर घालून मसाल्याची पेस्ट तयार करू शकता आणि ते तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. ही पेस्ट तुम्ही कधीही वापरू शकता. कांदा, टोमॅटो, मसाले, व्हिनेगर एकत्र मिक्स करून शिजवा. तुम्ही कोणत्याही भारतीय पदार्थात हे वापरू शकता.

1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून नवीन Maruti Suzuki Dzire खरेदी केल्यास ; किती असेल EMI ?

maruti Dzire 2024

मारुती सुझुकीची नवी डिझायर कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. त्याची आकर्षक रचना, आधुनिक वैशिष्ट्ये, शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट मायलेज यामुळे तो खरेदीदारांसाठी एक उत्तम पर्याय बनला आहे. ही कार 5-स्टार सुरक्षा रेटिंगसह येते, जी सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय विश्वासार्ह बनवते.

सर्व-नवीन डिझायरची एक्स-शोरूम किंमत 6.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.14 लाख रुपयांपर्यंत जाते. ही सेडान 9 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्यायांचा समावेश आहे. हे LXI, VXI, ZXI आणि ZXI Plus सारख्या ट्रिम स्तरांमध्ये उपलब्ध आहे. या कारचे मायलेज 24.79 किलोमीटर प्रति लीटर पर्यंत आहे, जे इंधन कार्यक्षमतेच्या बाबतीत देखील उत्कृष्ट बनवते.

डिझायर एलएक्सआय मॅन्युअलसाठी आर्थिक पर्याय

जर तुम्ही नवीन Dezire चे बेस व्हेरिएंट LXI खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याची एक्स-शोरूम किंमत 6.79 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 7.64 लाख रुपये आहे. त्याला वित्तपुरवठा करणे खूप सोपे आहे. 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह तुम्ही 6.64 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता. 10 टक्के व्याजदराने पाच वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, दरमहा 14,108 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. या प्रक्रियेत तुम्हाला पाच वर्षांत एकूण 1.82 लाख रुपये व्याज द्यावे लागेल.

डिझायर VXi मॅन्युअलसाठी हे आहेत फायनान्स पर्याय

जर आपण Dezire च्या VXI प्रकाराबद्दल बोललो तर त्याची एक्स-शोरूम किंमत 7.79 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 8.75 लाख रुपये आहे. हे खरेदी करण्यासाठी तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून 7.75 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता. 10 टक्के व्याजदराने पाच वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, दरमहा 16,466 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. या वित्त पर्यायांतर्गत पाच वर्षांत एकूण 2.13 लाख रुपयांचे व्याज भरावे लागेल.

या गोष्टींकडे लक्ष द्या

फायनान्स करण्यापूर्वी, तुम्ही जवळच्या मारुती सुझुकी एरिना डीलरशिपला भेट दिल्याची खात्री करा आणि व्याज दर, EMI आणि कर्जाच्या अटींबद्दल संपूर्ण माहिती मिळवा. याद्वारे तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य निर्णय घेऊ शकाल. मारुती सुझुकी डिझायर केवळ त्याच्या उत्कृष्ट मायलेज आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसाठीच ओळखली जात नाही, तर त्याचे वित्त पर्याय ग्राहकांसाठी ते अधिक परवडणारे आणि सोयीस्कर बनवतात.

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन; ट्रायल पेमेंट म्हणून 1 रुपाया पाठवणार

election staff

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी दोनच दिवसात म्हणजे येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र आता मतदान प्रक्रियेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण मतदान प्रक्रियेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रोख स्वरूपात दिला जाणारा भत्ता आता थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच या निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाइन स्वरूपात मिळणार आहे यासाठी सोमवारी म्हणजेच आजपासूनच ट्रायल पेमेंट साठी एक रुपया पाठवण्यात येणार असून पूर्ण रकमेसाठी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. तुम्ही सुद्धा जर मतदान प्रक्रियेमध्ये काम बजावत असाल तर तुमच्या खात्यामध्ये एक रुपया आल्याचा मेसेज आला आहे की नाही हे तपासून घ्या.

बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्रप्रमुख व इतर चार कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता, आहार भत्ता देण्यात येतो. लोकसभा निवडणुकांपर्यंत हा भत्ता रोखीने देण्यात येत होता मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकांपासून हा भत्ता ऑनलाईन स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे पत्र उपसचिव तथासह मुख्य निवडणूक अधिकारी के सूर्य कृष्णमूर्ती यांच्या सहीने राज्यातील सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलय.

काय आहे पत्रात ?

या पत्रात नमूद करण्यात आलं आहे की निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवडणूक व आहार भत्ता ऑनलाईन स्वरूपात देण्यात यावा यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पीपीएमएस म्हणजेच पोलिंग पर्सोनेल मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये भरण्यात आलेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या प्रशिक्षणानंतर ही माहिती जमा करण्यात आलेली आहे आज सोमवारी यातील तपासणी करता प्रत्येकाच्या खात्यावर प्रायोगिक तत्त्वावर एक रुपया पाठवण्यात येणार आहे.

एक रुपये ट्रायल पेमेंट मिळालेले नाही त्यांचे काय होणार ?

मतदान पथकांना रवाना करताना ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर एक रुपये ट्रायल पेमेंट मिळालेले नाही त्यांचे बँक खाते अद्याप अद्यावत करण्यात येणार आहेत. बँक खाते असल्याची खात्री झाल्यानंतर मंगळवारी दिनांक 19 रोजी दुपारी तीन वाजता संपूर्ण यादी बँकेत दिली जाणार आहे. ही रक्कम बँकेने बुधवारी एक वाजता अदा करण्याची सूचना देण्यात आली आहे.

भत्ता वाटपात पारदर्शकता

या आधी मतदान संपल्यानंतर रोखीने भत्ता मिळत होता. मात्र यंदा ऑनलाइन मिळत असल्याने यामध्ये पारदर्शकता येणार आहे मात्र बुधवारी संबंधित बँका ही रक्कम जमा करणे कठीण आहेत. त्यामुळे मुळात या दिवशी बँकेला सुट्टी आहे. अनेक राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी निवडणूक ड्युटीवर आहेत. त्यामुळे भत्तावाटप बुधवारीच होईल असं सांगता येत नाही. यामुळे यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येणार आहे.

भारतात आज मध्यरात्रीनंतर बदलणार इंटरनेट-ब्रॉडबँडचे जग ! ISRO SpaceX सह लाँच करणार GSAT-N2

istro and musk

मागच्या काही दिवसांपासून अब्जाधीश Elon Musk च्या सस्टारलिंक च्या भारतात सुरु होणाऱ्या इंटरनेट सेवेबद्दल मोठा बोलबाला होतो आहे. या चर्चा लवकरच खऱ्या होणार असे दिसत आहे कारण ISRO SpaceX यांच्याकडून आज अत्याधुनिक हाय-थ्रूपुट कम्युनिकेशन उपग्रह GSAT-N-2 (GSAT-20) चे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मिळेल विमानातही इंटरनेट

यामुळे ईशान्येपासून लक्षद्वीपपर्यंतच्या संपूर्ण भारतीय प्रदेशाला जलद ब्रॉडबँड सेवांनी जोडेल आणि विमानातही इंटरनेट प्रदान करेल. कनेक्टिव्हिटी, अमेरिकन कंपनी स्पेसएक्स फ्रॉमच्या फाल्कन-9 लॉन्च व्हेईकलवर लॉन्च करण्यात येईल. सोमवारी मध्यरात्रीनंतर अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केले जाईल.

भारताचे पहिले परदेशातील मिशन

हे भारताचे पहिले मिशन आहे जे अमेरिकन माती आणि SpaceX रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांमध्ये इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ची व्यावसायिक शाखा, NewSpace India Limited (NSIL) चा हा दुसरा मागणी-चालित उपग्रह आहे. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 12.01 वाजता हे मिशन प्रक्षेपित केले जाईल.

काही कारणास्तव या नियोजित प्रक्षेपण विंडोमध्ये मिशनचे प्रक्षेपण होऊ शकले नाही, तर बुधवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजताचा पर्याय ठेवण्यात आला आहे. Falcon-9 हे पुन्हा वापरता येण्याजोगे दोन-स्टेज प्रक्षेपण वाहन आहे. हे जगातील पहिले ऑर्बिटल क्लास पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन आहे.

संपूर्ण भारत व्यापणारे 32 युजर बीम

GSAT N-2 हा अंदाजे 4700 किलो वजनाचा केए-केए बँड उपग्रह आहे ज्यामध्ये अंदमान-निकोबार द्वीपसमूह आणि लक्षद्वीपसह संपूर्ण भारतीय उपखंड कव्हर करणारे 32 वापरकर्ता बीम आहेत. यापैकी 8 अरुंद स्पॉट बीम ईशान्य क्षेत्रासाठी समर्पित आहेत, तर 24 रुंद बीम उर्वरित भारतासाठी समर्पित आहेत. या 32 बीमना भारतीय हद्दीत असलेल्या हब स्टेशन्समधून सपोर्ट केले जाईल. केए बँड हाय-थ्रूपुट कम्युनिकेशन पेलोडची क्षमता सुमारे 48 जीबी प्रति सेकंद आहे आणि ती देशातील दुर्गम गावांना इंटरनेटशी जोडेल. हा उपग्रह १४ वर्षांच्या मोहिमेवर पाठवला जात आहे. हे संपूर्ण भारतीय प्रदेशात ब्रॉडबँड सेवांसह इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी (IFC) वाढवेल.

एन-सिलचा दुसरा उपग्रह

N-SIL चा हा दुसरा मागणी आधारित उपग्रह आहे. यापूर्वी, N-SIL ने जून 2022 मध्ये पहिला मागणी-आधारित उपग्रह GSAT-24 प्रक्षेपित केला होता. अंतराळ सुधारणांअंतर्गत, N-SIL आता उपग्रहांची मालकी आणि संचालन करू शकते. सध्या N-Sil चे 11 उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत आहेत.

ITBP Bharti 2024 | ITBP अंतर्गत नोकरीची मोठी संधी; 10 वी पास उमेदवार देखील करू शकतात अर्ज

ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. या अंतर्गत विद्यार्थ्यांना खाजगी आणि सरकारी नोकरीच्या अनेक पर्याय देखील मिळतात. ज्याद्वारे त्यांना नोकरी मिळवणे खूप सोपे होऊन जाते. आज देखील आम्ही नोकरीचे असेच एक संधी घेऊन आलेलो आहोत. याचा फायदा नक्कीच अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण आता इंडो तिबेट सीमा पोलीस दल यांच्या अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत “एसआय (दूरसंचार), हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), आणि कॉन्स्टेबल (दूरसंचार)” या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 526 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. 15 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे 14 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत “एसआय (दूरसंचार), हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), आणि कॉन्स्टेबल (दूरसंचार)” या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 526 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

15 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

14 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 14 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेला अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

East Central Railway Bharti 2024 | पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत स्पोर्ट्स कोटा पदासाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

East Central Railway Bharti 2024

East Central Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आजही गावाकडे अशी अनेक लोक आहेत. ज्यांच्यामध्ये चांगले टॅलेंट असून शिक्षण असूनही त्यांना नोकरीच्या संधीबद्दल माहिती नसते. आम्ही त्यांच्यापर्यंत नेहमीच या नोकरीच्या संधी पोहोचवत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती स्पोर्ट्स कोटा या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 56 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे 16 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | East Central Railway Bharti 2024

या भरती अंतर्गत स्पोर्ट्स कोटा या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

16 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 16 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

‘हा’ आहे देशातील सर्वात मोठा महामार्ग, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत दाखवतो भारताची झलक

NH-44

गेल्या दशकात देशात महामार्गांच्या एक पाऊल पुढे जाऊन एक्स्प्रेस वे बांधले जात आहेत. यापैकी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा देशातील एक मोठा पायाभूत प्रकल्प आहे. पण, अंतराचा विचार करता तो सर्वात जुन्या महामार्गाच्या मागे आहे. आम्ही तुम्हाला एका राष्ट्रीय महामार्गाबद्दल सांगणार आहोत, ज्याला देशातील महामार्गांचा कणा म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, हा महामार्ग केवळ देशातील सर्वात लांब महामार्ग नाही, तर बहुतांश राज्यांमधून जातो.

सोप्या शब्दात, सांगायचे झाल्यास NH 44 काश्मीर ते कन्याकुमारी भारताची झलक देते. 3000 किलोमीटरच्या या प्रवासात नद्या, पर्वत, धबधबे, समुद्र हे सर्व पाहायला मिळते. NH44 भारताच्या सर्वात वरच्या बिंदू काश्मीरपासून सुरू होते आणि दक्षिणेला असलेल्या कन्याकुमारीपर्यंत जाते. चला जाणून घेऊया या राष्ट्रीय महामार्गाची संपूर्ण कहाणी

बर्फाच्छादित दऱ्यांपासून समुद्रकिनाऱ्यांपर्यंत

राष्ट्रीय महामार्ग- 44 काश्मीरमधील श्रीनगरपासून सुरू होतो आणि कन्याकुमारी येथे संपतो. हा राष्ट्रीय महामार्ग सुमारे 4,112 किलोमीटर लांबीचा आहे. तथापि, त्याचे जुने नाव NH-7 आहे. काश्मीरमध्ये, बर्फाने भरलेल्या पर्वत आणि धबधब्यांच्या दृश्यांनी सुरुवात होते, तर पंजाबमध्ये पोहोचेपर्यंत मोहरीचे शेत प्रवाशांना भुरळ घालते.

हा राष्ट्रीय महामार्ग हरियाणा आणि दिल्ली मार्गे उत्तर प्रदेशात प्रवेश करतो. त्यानंतर ते राजस्थानमार्गे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रवेश करते. या काळात अनेक सुंदर दृश्ये पाहता येतात. महाराष्ट्रानंतर राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागातून जातो आणि कर्नाटकातील जंगले ओलांडून कन्याकुमारी येथे संपतो.

NH-44 म्हणजे 7 महामार्गांचा संगम

देशातील सर्वात मोठा महामार्ग NH-44 एकाच वेळी बांधला गेला हे खरे नाही. वास्तविक, देशातील 7 प्रमुख महामार्ग एकत्र करून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये NH1A, NH1, NH2, NH3, NH75, NH26 आणि NH7 यांचा समावेश आहे. या राष्ट्रीय महामार्गांच्या विलीनीकरणामुळे देशात प्रथमच उत्तर-दक्षिण कॉरिडॉर तयार झाला आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक सुलभ झाली आणि येथे राहणाऱ्या लोकसंख्येला आर्थिक फायदाही झाला.

NH44 हा देशातील सर्वात मोठा महामार्ग नाही तर जगातील 22 वा सर्वात मोठा महामार्ग आहे. हा महामार्ग दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग (1350 किमी) पेक्षा 4 पट मोठा आहे.