Success Story | आज-काल अनेक शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीचा अवलंब करत आहेत. तसेच अनेक आधुनिक पिके देखील शेतातून घेत आहे. आणि त्यातून त्यांना खूप चांगला फायदा देखील होत आहेत. या तंत्रज्ञानाचा तसेच नवीन आव्हानांचा सामना करत शेतकऱ्यांनी नव्या पद्धतीने शेती करायला सुरुवात केलेली आहे. अशातच आपण आज एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. ज्याने लसणाच्या शेतीतून लाखो रुपये गमावले आहेत.
आज काल लसणाचे दर हे गगनाला भिडलेले आहेत. जवळपास 600 रुपये प्रति किलोने लसुन विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादकांना लसणाचा मोठा फायदा होत आहेत. लसूण हा प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये भाजी करताना वापरला जातो. तसेच लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील असतात. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत. ज्यांनी लसणाची शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
पंजाबमधील मुगा जिल्ह्यातील रोडे गावात भूपिंदर सिंग रोडे नावाचा एक शेतकरी राहतो. त्यांनी लसणाच्या बियांच्या लागवडीतून चांगला नफा कमवलेला आहे. भूपिंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांच्याकडे जवळपास 20 एकर जमीन आहे. यातील त्यांनी केवळ अडीच एकरमध्ये लसूणची लागवड केलेली आहे. आणि चांगला नफा देखील कमावत आहे. तसेच उरलेल्या जमिनीत त्याने गहू, बटाटा, मोहरी तसेच अनेक प्रकारची कडधान्य यांसारखी पिके घेतलेली आहे.
सुरुवातीला अडीच लाख रुपये खर्च | Success Story
माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भूपेंद्र सिंग यांनी शेतीतील नफा आणि खर्च याबद्दल सांगितले की, त्यांना सुरवातीला भरपूर गुंतवणूक करावी लागली आहे. लसणाचे दोन प्रकार वाढतात मोठ्या लवंगा जी 386 आणि लहान लवंगा जी 323 अशा संकरित जाती आहेत. लसणाच्या बियांसाठी त्यांनी चार क्विंटल बिया लसूण पाकळीसाठी आणि प्रती एक एकर सुमारे 1.60 लाख रुपये खर्च केले आहेत.
लागवडीसाठी मजूर आणि शेत तयार करण्यासाठी त्यांना 15000 रुपये खर्च आला. तसेच खत आणि फवारणीसाठी 5 हजार रुपये खर्च आला. त्याला कापण्यासाठी 15 हजार रुपये मजूर खर्च आलेला आहे. एकूण अंदाजे खर्च काढला तर त्याला यासाठी अडीच लाख रुपयांचा खर्च आलेला आहे.
एकरी 14 लाखांहून अधिक नफा
भूपेंद्र यांनी सांगितले की त्यांना जवळपास 80 क्विंटल लसणाचे उत्पादन मिळाले. बियाणांची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी 37 ते 42 क्विंटल सुकल्यानंतर निघते. मागील हंगामात लसणाला प्रति किलो 400 ते 450 रुपये भाव होता. त्यामुळे त्यांना एक एकरला जवळपास 16 ते 18 लाखांचे उत्पादन मिळाले. तसेच सर्व खर्च जाऊन त्यांना जवळपास 14 लाख रुपयांपर्यंतचा नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.
तुम्ही कधी ना कधी तरी ट्रेन मधून प्रवास केला असेलच आणि कधी ना कधी तुमचा सामना TTE सोबत झाला असेल. पण तुम्हाला माहिती आहे का ? भारतीय रेल्वेमध्ये TTE कसे व्हायचे? टीटीई होण्यासाठी काय करावे लागेल? यासाठी तुम्हाला कोणती परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल? चला जाणून घेऊया…
प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेमध्ये TTE तैनात आहे. जो सर्व प्रवाशांची तिकिटे तपासतो आणि त्यांना त्यांचे नेमके ठिकाण सांगतो. जर एखाद्या प्रवाशाकडे योग्य प्रवासाचे तिकीट नसेल तर TTE त्याला दंड करू शकतो.
काय आहे आवश्यक पात्रता ?
TTE होण्यासाठी उमेदवाराने 50 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
रेल्वे टीटीई पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने डिप्लोमा कोर्स करणे आवश्यक आहे.
टीटी होण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
उमेदवार कोणत्याही राज्यातून रेल्वे TTE साठी अर्ज करू शकतात.
कोणत्या विषयाचे प्रश्न विचारले जातात?
भारतीय रेल्वे दरवर्षी TT साठी फॉर्म जारी करते. टीटीई परीक्षेत विशेषत: सामान्य ज्ञान, गणित आणि तर्क या विषयांवर प्रश्न विचारले जातात. टीटीई परीक्षेत 150 प्रश्न विचारले जातात. रेल्वेमध्ये टीटीई होण्यासाठी, 150 गुणांची ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवाराला प्रथम विशिष्ट ट्रेन आणि स्टेशनवर प्रशिक्षण दिले जाते. यानंतर त्यांचा कार्यकाळ सुरू होतो
फिजिकल फिटनेस
उमेदवारांनी RRB ने सेट केलेले सर्व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
दृष्टी क्षमता – अंतर दृष्टी – 6 / 9, 6 / 12 चष्म्यासह आणि शिवाय.
दृष्टी जवळ – 0.6, 0.6 चष्म्यासह आणि शिवाय
किती मिळतो पगार ?
सहाव्या वेतन आयोगानुसार या पदासाठी कमी वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली असली, तरी सातव्या वेतन आयोगानुसार पे बँड पद्धत आता संपुष्टात आली असून, उमेदवारांना यापेक्षाही जास्त वेतन मिळणार आहे. रु 5200/- – रु 20200/- + रु 1900/- ग्रेड पे + DA + HRA + इतर भत्ते एकूण अंदाजे रु 14,000/- दरमहा
Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे आपल्याला दररोज लाखो व्हिडिओज व्हायरल होताना दिसत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडिओ कधीकधी अत्यंत मनोरंजनात्मक असतात. तर कधी कधी आपल्या काळजाचा ठोका चुकवणारे असतात. काही व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटते की, प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार होतात. अगदी त्यांच्या जीवावर बेतेल असे कृत्ये देखील करतात. कधी स्टंट तर कधी जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गाडीवर त्याचप्रमाणे रेल्वेमध्ये स्टंट करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच आता एका लहान मुलाचा ट्रेनमधील स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. जो पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे की, अगदी जीवावर बेतेल असेल कृत्य तो करत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या (Viral Video) या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक लहान मुलगा धावत्या ट्रेनमध्ये स्टंट करताना दिसत आहे. ज्यामुळे त्याचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो. या व्हिडिओमध्ये एक ट्रेन वेगाने धावत आहे. आणि दोन अल्पवयीन मुले या ट्रेनला लटकताना दिसत आहे. ट्रेनच्या दरवाज्यात उभे राहून ते त्यांचे एक हात आणि पाय बाहेर काढताना दिसत आहे. ट्रेन धावताना अनेक गोष्टी देखील येत आहे. परंतु चुकुं जर त्या लहान मुलाचा हात सुटला असता तर त्याचा जीव धोक्यात आला असता. परंतु त्या मुलाला त्याची कसलीही भीती वाटत नव्हती. ट्रेन मधील अनेक लोक त्याला आत मध्ये जाण्यास सांगत होते. परंतु व्हिडिओ शूट करण्याच्या नादात त्या मुलाने कोणाकडेही लक्ष दिले नाही. आणि जीवघेणा स्टंट करत राहिला.
हा व्हायरल होणारा व्हिडिओ एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ मुंबईचा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर अनेक लोकांनी संतप्त अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “कुठली आहेत ही पोरं यांना काही अक्कल आहे की नाही?” तसेच दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, ” बापरे” तसेच आणखी एका युजरने लिहिले आहे की, “चांगले झोडपले पाहिजे म्हणजे पुन्हा असे करणार नाही.” अशा प्रकारे अनेक लोक या मुलाच्या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया देत आहे.
Post Office Scheme | आर्थिकदृष्ट्या भविष्याचा विचार करून अनेक लोक गुंतवणूक करत असतात. बाजारामध्ये देखील गुंतवणुकीसाठी अनेक नवनवीन योजना आलेल्या आहेत. त्यामध्ये अनेक लोक गुंतवणूक देखील करतात. परंतु आपल्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. अशातच अनेक सरकारी योजना आहेत. किंवा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये देखील अनेक लोक आर्थिक गुंतवणूक करत असतात. एक चांगली योजना आहे. ज्यातून तुम्हाला मंथली परतावा मिळणार आहे. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजना असे आहे.
पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) या मंथली इन्कम योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये गुंतवावे लागतात. तसेच तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये देखील गुंतवू शकता. या योजनेमध्ये तुम्ही जॉईंट खाते देखील चालू करू शकता. या खात्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. त्याचप्रमाणे पाच वर्षापर्यंत या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. सध्या या योजनेचा व्याजदर हा 7.4% एवढा आहे. त्याचप्रमाणे अल्पवयीन गटातील लोकांना देखील या योजनेमध्ये खाते उघडता येते. तीन लोक मिळून देखील तुम्ही या योजनेत जॉईन खाते उघडू शकता.
तुम्ही जर या अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला 5500 रुपये मिळतात. तसेच जॉईंट अकाउंट मध्ये तर तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तर महिन्याला तुम्हाला 9250 रुपये मिळतात. या योजनेत तुम्हाला 5 वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते. जर या योजनेत एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न हे जास्त असेल तर या योजनेतील व्याजदरावर त्यांना कर देखील भरावा लागतो.
जर पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) या योजनेतून तुम्हाला मध्येच पैसे काढायचे असेल, तर तुम्ही ते एक वर्षानंतर काढू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही एक ते तीन वर्षात पैसे काढले तर गुंतवणुकीमधील 2 टक्के रक्कम कापली जाते. तर तुम्ही तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर पैसे काढले तर तुमची केवळ 1 टक्के रक्कम कापली जाते. अशाप्रकारे तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करून मंथली इन्कम चालू करू शकता.
Motorola G85 5G | तुम्ही देखील जर एखाद्या नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी एका भन्नाट स्मार्टफोन बद्दल माहिती सांगणार आहोत. हा स्मार्टफोन तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये मिळणार आहे. फ्लिपकार्टवर एक नवीन सेल सुरू झाला आहे. आणि या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींवर तुम्हाला भन्नाट ऑफर मिळत आहेत. या सेलमध्ये तुम्हाला मोटर कंपनीचा एक स्मार्टफोन मिळत आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मोटोरोला जी 85 5G फोन अत्यंत स्वस्त किमतीत उपलब्ध होत आहे.
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत केवळ 17999 एवढी आहे. या फोनच्या खरेदीवर तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत बँकेचा डिस्काउंट देखील मिळू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही ॲक्सिस बँकेचे कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल. ही ऑफर तुम्हाला केवळ 21 नोव्हेंबर पर्यंत मिळणार आहे. त्यानंतर कदाचित या स्मार्टफोनच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 21 नोव्हेंबर आधीच तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करा.
त्याचप्रमाणे एक्सचेंज ऑफरमध्ये देखील या फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते. एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी तुम्हाला सूट ही तुमचा फोन ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असते. या फोनमध्ये तुम्हाला थ्रीडी कर्व डिस्प्ले आणि 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच यांमध्ये तुम्हाला अनेक नवीन फीचर्स देखील अनुभवायला मिळतील.
मोटोरोला जी 85 5G: डिस्प्ले | Motorola G85 5G
मोटोरोलाच्या या फोनमध्ये तुम्हाला 1080 x 2400 पिक्सल रिझोल्यूशनअसलेला 6म66 इंचाचा फुल एचडी+ ३डी कर्व्ड पीओएलईडी डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 130 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यात गोरिल्ला ग्लास 5 देखील देण्यात आला आहे.
मोटोरोला जी85 5G: स्टोरेज
मोटोरोला या फोनमध्ये तुम्हाला 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देखील आहे. प्रोसेसर म्हणून ही कंपनी फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 3 ऑफर करत आहे.
मोटोरोला जी 85 5G: कॅमेरा
या फोनच्या बॅक पॅनलवर तुम्हाला एलईडी फ्लॅश सहज दोन कॅमेरे देण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलच्या दोन लेन्स आहेत तसेच. आठ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. तसेच सेल्फी साठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
मोटोरोला जी 85 5G: बॅटरी | Motorola G85 5G
या फोनमध्ये तुम्हाला 5000 एमएएचची बॅटरी देखील देण्यात आलेली आहे. तसेच या फोनमधील दिलेली बॅटरी 33 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Credit Card Application | आजकाल क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. क्रेडिट कार्डचा वापर एका ट्रेंड प्रमाणे केला जात आहे. तुमच्याकडे पैसे नसले, तरी देखील तुम्ही क्रेडिट कार्डमुळे अनेक ठिकाणी पैसे खर्च करू शकता. यामुळेच आजकाल क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु जर तुम्हाला देखील क्रेडिट कार्ड वापरायचे असेल तर त्यासाठी तुमचा बँकेत सीबील स्कोर चांगला असणे खूप गरजेचे असते. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला नसेल, तर बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देत नाही.
सुरक्षित क्रेडिट कार्ड म्हणजे काय?| Credit Card Application
क्रेडिट कार्ड मध्ये सुरक्षित क्रेडिट कार्डचा एक नवीन प्रकार आलेला आहे. यासाठी तुमचे सुरक्षित मुदत ठेवी असायला लागतात. म्हणजेच तुम्हाला जर सुरक्षित क्रेडिट कार्ड बँकेकडून घ्यायचे असेल, तर त्या बँकेमध्ये तुमची एफडी असणे गरजेचे आहे. यामध्ये एफडीची मर्यादा जवळपास 85% पर्यंत ठेवली जाते.
या सुरक्षित क्रेडिट कार्डमध्ये एफडी बँकेमध्ये असते. आणि ग्राहक त्या क्रेडिट कार्डचा वापर करू शकतात. तुम्ही जेव्हा हे क्रेडिट कार्ड वापरता, तेव्हा ते क्रेडिट कार्डचे बिल देखील तुम्हाला वेळेवर भरावे लागतात. परंतु जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही, तर बँका तुमच्याकडून एक्स्ट्रा चार्जेस लावतात. तुमचा सिबील स्कोर चांगला नसल्याने बँकेने तुम्हाला क्रेडिट कार्ड दिले नाही, तर तुम्ही बँकेमध्ये एफडी करून सुरक्षित क्रेडिट कार्ड घेऊ शकता.
सुरक्षित क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे कोणते?
तुम्हाला जर तुमचा क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर त्यासाठी तुमचा बँकेचा क्रेडिट स्कोर चांगला असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमचे क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे गरजेचे आहे तसेच इतर ईएमआय देखील वेळेवर भरावे लागते.
तुमच्या या सुरक्षित क्रेडिट कार्डची मर्यादा एफडीवर अवलंबून असते. म्हणजे तुमच्या एफडीची रक्कम जेवढी जास्त असते, तेवढी जास्त रक्कम तुम्हाला क्रेडिट कार्डद्वारे वापरायला मिळते.
सुरक्षित क्रेडिट कार्ड घेताना तुम्हाला तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा कोणत्याही प्रकारचा पुरावा द्यावा लागत नाही.
सुरक्षित क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या खर्चाव्यतिरिक्त मर्यादा असते.
देशभरात पूर्णपणे स्वदेशी असलेल्या वंदे भारत ट्रेनचा विस्तार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अशातच आता वंदे भारत च्या फॅन्स साठी आनंदाची बातमी आहे. कारण आता वंदे भारत एक्सप्रेस श्रीनगर पर्यन्त धावणार आहे. याचा फायदा पर्यटकांना होणार आहे. चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती
भारतीय रेल्वेने काश्मीर खोऱ्यात ट्रेन चालवण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. श्रीनगर रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे धावण्याची रेल्वेची योजना आहे. वंदे भारत एक्स्प्रेस श्रीनगरपर्यंत चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.म्हणजेच वंदे भारत ही पहिली ट्रेन असेल, जी श्रीनगरपर्यंत धावेल. याशिवाय श्रीनगरला इतर कोणत्या गाड्या धावू शकतात? भारतीय रेल्वेनेही त्याचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू केले आहे. ज्या गाड्यांचा विस्तार केला जाणार आहे त्या सध्या फक्त जम्मू आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकापर्यंत जात आहेत. रेल्वेची योजना निश्चित होताच वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांनाही श्रीनगरला जाता येणार आहे. याचा फायदा पर्यटनाला होणार आहे.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 गाड्यांचा विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. आता या गाड्या लवकरच श्रीनगरला पोहोचतील. याचा फायदा पर्यटकांनाही होणार आहे.
कोणत्या गाड्यांचा समावेश
यामध्ये तिरुनेलवेली ते माता वैष्णो देवी कटरा ही ट्रेन क्रमांक 16787-88, नवी दिल्ली ते जम्मू तावी ट्रेन क्रमांक 12425-26, कोटा ते माता वैष्णो देवी कटरा ही ट्रेन क्रमांक 19803-04, ट्रेन क्र. 16317-18 कन्या कुमारी ते माता वैष्णो देवी कटरा, ट्रेन क्र. 12445-46 नवी दिल्ली ते माता वैष्णो देवी कटरा, ट्रेन क्र. 12331-32 हावडा ते जम्मू तवी, ट्रेन क्र. 11449-50 जबलपूर ते माता वैष्णो देवी कटरा, ट्रेन क्र. 16031 -32 चेन्नई सेंट्रल ते माता वैष्णोदेवी कटरा इत्यादी गाड्यांचा समावेश आहे.
21 सप्टेंबर रोजी सुटली होती विशेष गाडी
याआधीही भारतीय रेल्वेने माता वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांसाठी सप्टेंबरमध्ये विशेष ट्रेन चालवली होती. स्वस्त तिकिटांवर जेवण, वाहतूक आणि हॉटेलचे भाडे यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. हे IRCTC ने बजेट फ्रेंडली प्लॅन अंतर्गत आणले आहे. ज्यामध्ये एक रात्र आणि दोन दिवसांचा समावेश होता. ही ट्रेन 21 सप्टेंबर रोजी कटरा येथून दिल्लीला रवाना झाली होती. कटरा येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश होता. ज्यामध्ये एका व्यक्तीसाठी ९१४५ रुपये तिकीट ठेवण्यात आले होते.
Ambolgad Beach | आपल्या महाराष्ट्राला सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या सिक्रेट बीच आहेत. त्याबद्दल अनेक लोकांना माहिती देखील नाही. महाराष्ट्रात असे एक गाव आहे, ज्या गावात चंद्रकोर आकाराचा एक छुपा समुद्रकिनारा आहे. या समुद्राचा आकार मुंबईतील मरीन ड्राईव्ह प्रमाणे क्वीन नेकलेस सारखा दिसतो. हा समुद्रकिनारा कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. राजापूर तालुक्यात हा समुद्र किनारा आपल्याला दिसतो.
कोकणातील आंबोळगड (Ambolgad Beach) या गावात हा समुद्रकिनारा आहे. आंबोळगड हे किल्ल्यासाठी आणि श्री गगनगिरी स्वामींच्या मठासाठी प्रसिद्ध आहे. परंतु या आंबोळगड गावातील समुद्रकिनाऱ्यांना जास्त गर्दी नसते. त्यामुळे या ठिकाणी एकांत अनुभवता येतो. आणि निसर्गाचा सुंदर असा अनुभव देखील घेता येतो.
आंबोळगड हे गाव रत्नागिरी शहरांपासून 57 किलोमीटर आणि राजापूर पासून 36 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव तिन्ही बाजूने अरबी समुद्राने वेढलेली आहे. गावाची एक बाजू पठाराच्या दिशेने नाटे या गावाशी जोडलेली आहे. राजापूर तालुक्यात दोन किनारी किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. यातील एकाचे नाव आहे आंबोळगड आणि दुसऱ्याचे नाव आहे यशवंतगड असे आहे. किल्ल्यात एक तुटलेली तोफ एवढेच आहे. याव्यतिरिक्त त्या ठिकाणी काहीही पाहायला मिळत नाही. किल्ल्याजवळच्या सड्यावर गगनगिरी महाराजांचा मठ देखील आहे.
आंबोळगड या गावांमध्ये दोन स्वच्छ आणि सुंदर असे समुद्रकिनारी आहेत. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. परंतु अजूनही अनेक लोकांना या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य माहिती नाही. त्यामुळे गर्दी देखील मर्यादित असते. तुम्हाला जर या ठिकाणी जायचे असेल, तर रत्नागिरी या शहरातून आंबोळगड पर्यंत जाण्यासाठी थेट एसटी बस आहे. ही बस तुम्हाला आंबोळगड किल्ल्यापर्यंत पोहोचवते. अशाप्रकारे तुम्हाला जर महाराष्ट्रातील या सुंदर आणि लपलेल्या समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायची असेल, तर तुम्ही नक्की देऊ शकता.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांनंतर सोन्याच्या दरामध्ये घसरण व्हायला सुरुवात झाली त्यानंतर मागील आठवड्यात देखील सतत सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळले. आता आज नव्या आठवड्याच्या सुरुवातिला सोन्याच्या दरात काय बदल झाला ? सोडण्याचा दरात घासरण झाली आहे की वाढ ? चला जाणून घेऊया २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट
गुड रिटर्न्स या वेबसाईटवर दिलेल्या सोन्याच्या दराच्या माहितीनुसार आज एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 6,995 रुपये इतका आहे. हा दर काल 6935 रुपये इतका होता. म्हणजेच आज सोन्याच्या एक ग्राम 22 कॅरेट च्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ झाली आहे. दहा ग्रॅम सोन्याचा भाव 69 हजार 950 रुपये इतका आहे. हाच दर काल 69,350 रुपये इतका होता. म्हणजेच आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 600 रुपयांची वाढ झाली आहे.
24 कॅरेट
24 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7631 रुपये आहे. हाच दर काल 7565 रुपये इतका होता. म्हणजेच आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 66 रुपयांची वाढ झाली आहे. तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 76,310 रुपये इतका आहे हाच दरकाल 75 हजार 650 रुपये इतका होता. म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 660 रुपयांची वाढ झाली आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २ दिवस राहिले असून यंदा कोणाची सत्ता येणार? महायुती आपली सत्ता कायम ठेवणार का? कि महाविकास आघाडी मुसंडी मारणार अशा चर्चाना ऊत आलाय. विविध अंदाजानुसार महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत येण्याची शक्यता असल्याचा दावा केला जात आहे. महायुतीचे सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दरमहा 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. यामुळे शेतकरी आणि महिला वर्गामध्ये समाधानाची आणि आनंदाची भावना दिसून येत आहे. मावळत्या विधिमंडळात शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “लाडकी बहीण” योजनेची घोषणा केली. पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची ही योजना होती. घोषणेपासूनच या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र वाढत्या प्रतिसादाबरोबरच ही योजना विरोधकांच्या टीकेचेही लक्ष ठरली.
ही योजना म्हणजे फक्त जुमला आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची टीका विरोधकांनी केली. ही योजना बंद पडण्यासाठी विरोधकांनी प्रचंड प्रयत्न केले. काहीजण कोर्टात गेले. काही जणांनी जंक डाटा अपलोड करून योजनेचे पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर कार्यक्रमात केला होता. मात्र सरकारने आत्तापर्यंत या योजनेचे सर्व हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा करून विरोधकांना चोख प्रत्त्युत्तर दिले.
लाडकी बहीणसाठी अडीच कोटी महिलांची नोंदणी
विरोधकांच्या टिकेनंतरही महाराष्ट्रातील महिलावर्गाने या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला असे महायुतीचे नेते सांगत आहेत. तब्बल अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून लाभाची रक्कम प्राप्त झालेल्या कित्येक महिलांनी मिळालेल्या रकमेच्या सदुपयोग केला आहे, काही महिलांनी या पैशातून स्वयं रोजगार सुरू केला असून काही जणांनी आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश घेतले आहेत यासंदर्भात महिलांनीच अशा प्रतिक्रीया दिलेल्या आहेत. या योजनेची लोकप्रियता प्रचंड असल्यामुळे महिला वर्गाचा सरकारला असलेला पाठिंबा विविध माध्यमांच्या निवडणूकपूर्व अंदाजात दिसून आला. महिला वर्गाच्या पाठिंब्यामुळेच महायुती सरकार सत्तेत येण्याची शक्यता कित्येक पटीने बळावल्याचा अंदाज आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी तब्बल 46 हजार कोटी रुपयांची तरतूद
महायुती सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम पंधराशे वरून 2100 रुपये करू, असे आश्वासन महायुतीच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्याकडे महायुतीचा भर असल्यामुळे सरकार आल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात तर महा 2100 रुपये जमा होतील अशी आशाही लाभार्थ्यांना आहे. यावर्षी लाडकी बहिण योजनेसाठी सरकारने तब्बल 46 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली यासंदर्भात अनेकदा महायुतीच्या नेत्यांनी जाहीर सांगितले आहे.
महायुती सरकारचा शेतकरी कल्याणावर भर
महायुती सरकारने आपल्या कार्यकाळात शेतकरी कल्याणवर भर दिला. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा आणि सोयाबीन उत्पादकांचे नुकसान झाले हे नाकारून चालणार नाही.. मात्र या उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये देणारी भावांतर योजना सरकारने लागू केली आणि या रकमेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. गाईच्या दुधाला अनुदान देण्याचा निर्णय देखील घेतल्याचे महायुती सरकारचे म्हणणे आहे. त्याचबरोबर शेतीला पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी नदीजोड प्रकल्पना चालना दिली असून नारपार नदी जोड योजना तसेच नळगंगा वैनगंगा नदी जोड योजनेला केंद्राची मान्यता घेण्यात आली. मराठवाडा वॉटर ग्रीड या प्रकल्पाला देखील चालना दिल्याचे महायुतीचे नेते सांगत असतात.
शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणेज राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने घेतलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना मोफत कृषी वीज देण्याचा निर्णय होय. सात अश्वशक्ती पर्यंत मर्यादा असलेल्या कृषी पंपांना शून्य विज बिल देण्याची घोषणा खुद्द महायुती सरकारने केली. घोषणा केल्यानंतर काही दिवसातच शेतकऱ्यांना शून्य रकमेची बिले प्राप्त झाली. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी वीज निर्मिती कंपनीशी राज्य सरकारने करार केला असून भविष्यात कृषी पंपांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 44 लाख शेतकऱ्यांना मोफत कृषी वीज योजनेचा लाभ होणार आहे.
महायुती सरकार देणार शेतकऱ्यांना कर्जमाफी
गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातील शेती अडचणीत आहे. नापिकी आणि कर्जबाजारी म्हणाला कंटाळून शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे निर्णय झाले, परंतु त्याचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळण्याऐवजी सरकारमधील नेत्यांच्या पतसंस्था आणि बँका यांना झाल्याचा आरोप नेहमीच करण्यात आला. काँग्रेसच्या काळात योजनांचे लाभ थेट लाभार्थींना मिळाले नाहीत तर मध्यस्थांनीच त्याच्यात हात धुवून घेतले, असा आरोप भाजपचे नेते सातत्याने करीत असतात.
महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी हे एक महत्त्वाचे आश्वासन देण्यात आले आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेअंतर्गत पाचशे रुपये दरमहा देण्याची योजना सुरू केली. राज्य सरकारने त्यात स्वतःकडून पाचशे रुपयांची भर घातली. आता शेतकऱ्यांना दरमहा एक हजार रुपये किसान सन्मान निधीच्या अंतर्गत देण्यात येत आहेत. ही रक्कम दरवर्षी 12 हजार रुपये होते. महायुती सरकार आल्यानंतर ती पंधरा हजार रुपये केली जाणार असून किमान आधारभूत किमतीवर 20 टक्के अनुदान देण्याचे आश्वासन देखील महायुतीने दिले आहे.
पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती, वैयक्तिक लाभाच्या योजना, अशी अनेक आश्वासने महायुतीने दिली आणि ती पूर्ण केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आश्वासन देखील पूर्ण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफीचे आश्वासन मूर्त स्वरूपात उतरले आहे. त्यामुळेच शेतकरी आणि महिला हा राज्यातील मोठा घटक महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. विविध संस्थांनी घेतलेल्या निवडणूक पूर्व अंदाजात याचे प्रतिबिंब उमटले आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल असं जनतेला वाटतंय…