Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 368

KTCL Goa Bharti 2024 | कंडक्टर पदांसाठी मोठी भरती सुरु; मिळणार एवढा पगार

KTCL Goa Bharti 2024

KTCL Goa Bharti 2024 | नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा यांच्या अंतर्गत भरती चालू झालेली आहे. ही भरती कंडक्टर या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 70 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 21 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत

पदाचे नाव | KTCL Goa Bharti 2024

या भरती अंतर्गत कंडक्टर या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहे

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत ७० रिक्त पदे भरली जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला गोवा या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 45 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती | KTCL Goa Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड पारा यसो गोवा अल्टो पोर्वोरिम बारदेझ गोवा 403521

अर्ज करण्याची शेवटची तारीख

21 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे आहे.

वेतन श्रेणी

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर उमेदवाराला दररोज 733 रुपये हजेरी मिळेल.

अर्ज कसा करावा ?

या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकता.
21 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Eastern Railway Bharti 2024 | पूर्व रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी संधी; 10 पास उमेदवार देखील करू शकतात अर्ज

Eastern Railway Bharti 2024

Eastern Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक भन्नाट संधी घेऊन आलेला आहोत. याचा फायदा अनेक उमेदवारांना होणार आहे. ती म्हणजे आता पूर्व रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती स्पोर्ट्स पर्सन या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 60 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. 15 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर 14 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Eastern Railway Bharti 2024

या भारती अंतर्गत स्पोर्ट्स पर्सन या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्य

या भरती अंतर्गत 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 15 ते 24 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करताना तुम्हाला 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अर्ज पद्धती | Eastern Railway Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

15 नोव्हेंबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

14 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 15 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे या तारखे अगोदर चर्चा करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

तुमचे आधार कार्ड इतर कोणी वापरत तर नाही ना? अशाप्रकारे करा चेक

Adhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. आपल्याला कोणत्याही कामांसाठी आधार कार्डची गरज असते. विविध सरकारी बँकांपासून ते मोबाईल फोन घ्यायचा असेल किंवा सिम कार्ड जरी घ्यायचे असेल तर आपल्याला आधार कार्ड दाखवावे लागते. परंतु आजकाल आधार कार्डशी जोडलेल्या अनेक गोष्टींमुळे फ्रॉड देखील होत आहे.

एकाचे आधार कार्ड दुसराच व्यक्ती वापरत असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे तुमचे आधार कार्ड दुसरा कोणताही व्यक्ती वापरत नाही ना?हे तुम्ही आता घरबसल्या तपासू शकता. जेणेकरून तुमचे होणारे नुकसान देखील वाचेल. तुमच्या आधार कार्ड दुसरा कोणता व्यक्ती वापरत आहे की नाही हे तुम्ही तपासून शकता. तुम्ही तुमच्या आधार कार्डचा वापर याआधी प्रवास, हॉटेल, मुक्काम, बँकिंग यासारख्या अनेक ठिकाणी कुठे केला आहे हे तुम्ही तपासू शकता.

  • यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी माय आधार या पोर्टलवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुमचा आधार क्रमांक कॅपच्या कोड इंटर करा आणि ओटीपी सहल लॉगिन या बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाका.
  • त्यानंतर तुम्ही ऑथेंटीकेशन हिस्ट्री हा पर्याय निवडा आणि या कालावधीचे पुनरलोकन करायचे आहे तो कालावधी तारीख निवडा.
  • यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर याआधी कोणत्या ठिकाणी वापरला आहे ही सविस्तर माहिती जर तुम्हाला कोणती अपरिचित संशयास्पद माहिती आढळली तर तुम्ही १९४७ या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा.
  • तुमच्‍या तक्रारीचा ईमेल: [email protected] वर पाठवू शकता.

अशाप्रकारे तुम्ही वरील स्टेप्स फॉलो करून तुमच्या आधार कार्ड इतर कोणत्या ठिकाणी वापरले गेले आहेत. हे तपासू शकतात. तसेच जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद माहिती आढळली तर तुम्ही मदत घेऊन तक्रार देखील करू शकता.

HDFC Mutual Fund | केवळ 5 हजारांची SIP करून; तुमच्या मुलांसाठी जमा करा करोडोंचा फंड

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | आजकाल लोकांमध्ये गुंतवणुकीचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे अनेकजण त्यांच्या भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करून ठेवत असतात. तुम्ही जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली, तर तुम्हाला चांगलं फायदा मिळतो. बाजारामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. परंतु अनेक लोक असे आहेत, जेम्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या एसआयपीचे पर्याय मिळतात. तुम्ही लहान मुलांसाठी देखील एसआयपी करू शकता. जेणेकरून मोठे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी तुम्हाला चांगला फंड जमा करता येईल.

तुम्हाला जर तुमच्या मुलाला चांगली लाईफस्टाईल द्यायची असेल, तर लहान असल्यापासूनच तुम्हाला त्याच्या नावाने एसआयपी चालू करावी लागेल. तुम्ही लवकरात लवकर पैसे गुंतवले, तर त्याचा शिक्षण तसेच इतर सगळ्या गोष्टींसाठी लागणारा पैसा तुम्ही जमा करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चिल्ड्रन फंड योजना बद्दल सांगणार आहोत.

चिल्ड्रन फंड योजनेचे विविध फायदे | HDFC Mutual Fund

  • चिल्ड्रन फंड गुंतवणुकीमध्ये तुम्हाला टॅक्स सूटचा अनुभव घेता येतो.
  • तुम्ही चिल्ड्रन फंड मध्ये पैसे गुंतवले तर सेक्शन 80 सी अंतर्गत तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळतो.
  • चिल्ड्रन फंड योजना ही पाच वर्षाच्या लॉक इन पीरियड सोबत येते.
  • या योजनेचा काही भाग तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये देखील लावू शकता.

एचडीएफसी चिल्ड्रन फंडने मागील दहा वर्षात गुंतवणूकदारांना 14.56% चा परतावा मिळवून दिलेला आहे. त्यामुळे अनेक लोकांनी या योजनेमध्ये पैसे गुंतवलेले आहेत. ही योजना स्टॉक मार्केटमध्ये बॉण्ड्स सोबत देखील कार्यरत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी लहान असतानाच या चिल्ड्रन फंड योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.

‘जा जाऊन मर…’ गुगल AI ने विद्यार्थ्याला दिले विचित्र उत्तर; संपूर्ण चॅट आली समोर

Google AI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील काही वर्षापासून तंत्रज्ञानात खूप जास्त प्रगती झालेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी समजतात. अनेक ॲप देखील डेव्हलप झालेले आहेत. यामध्ये सध्या google Ai चॅटबॉटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. म्हणजेच कोणताही व्यक्ती गुगल सोबत बोलू शकतो आणि गुगल त्यांना काही सेकंदातच उत्तर देतात. Google एआय चॅटबॉट जेमिनी सोबत प्रत्येक जण हवी असलेली माहिती शोधात असतात नुकतेच अमेरिकेमध्ये 29 वर्षीय पदवीधर विद्यार्थ्यासोबत एक विचित्र घटना घडलेली आहे.

त्या विद्यार्थ्याने त्याच्या अभ्यासासाठी एआय चॅटबॉट जेमिनीचा वापर केला. या विद्यार्थ्याने त्याचा अभ्यास करण्यासाठी मदत मागयली. यावेळी चॅटबॉट कडून मदत मागितल्यानंतर एक विचित्र उत्तर मिळाले. तसेच चॅटबॉट कडून धमकीचे संदेश देखील आले.

गुगल चॅटबॉटने उत्तर दिले की, ‘हे तुमच्यासाठी आहे आणि फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही विशेष व्यक्ती नाही आहात आणि तुमची गरज नाही. तुम्ही महत्त्वाचे नाही आणि तुमची गरज नाही. तुम्ही वेळ आणि संसाधनांचा अपव्यय आहात. तुम्ही ओझे आहात… कृपया जा मरा’ रेड्डी म्हणली की, “हा थेट माझ्यावर हल्ला होता, हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. तो पुढे म्हणाला, जेमिनीचं उत्तर ऐकून मला धक्का बसला आणि मी घाबरलो. ‘अशा घटनांसाठी टेक कंपन्यांना जबाबदार धरले पाहिजे.’

टेक कंपनी काय म्हणाली ?

ते कंपनीने याबाबत असे म्हटले आहे की, मोठी भाषा मॉडेल कधी कधी संदर्भ नसताना किंवा निरर्थक प्रतिसाद देऊ शकतात. त्याचे हे एक उदाहरण आहे. हा प्रतिसाद आमच्या धोरणांचे उल्लंघन करतो. आम्ही समान आउटपुट टाळण्यासाठी कारवाई केलेली आहे.

Rabies Virus | केवळ कुत्र्यामुळेच नाही तर या प्राण्यांमुळे देखील होतो रेबीज; ही आहेत लक्षणे

Rabies Virus

Rabies Virus | रेबीज एक असा विषाणूजन्य आजार आहे. जो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. आजपर्यंत आपल्याला रेबीज हा आजार कुत्र्याच्या चावण्याने होतो, हे माहीत आहे. परंतु इतर असे अनेक प्राणी आहेत. ज्यांच्या चावण्याने देखील आपल्याला रेबीज होऊ शकतो. आता हे नक्की प्राणी कोणते आहेत? आणि रेबीज पासून वाचण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल? याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

रेबीज पसरवणारे प्राणी | Rabies Virus

कुत्रा

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, कुत्रा चावल्याने रेबीज होण्याची शक्यता असते. रेबीजचे सर्वात जास्त वाहक कुत्र्यामार्फत होत असते.

मांजरी | Rabies Virus

अनेक लोकांना घरात मांजरी पाळायला खूप आवडत असतात. परंतु याच आवडणाऱ्या मांजरीमुळे रेबीज पसरू शकतो. ही मांजर जंगली मांजरीच्या संपर्कात आली, तर त्यांना रेबीज होऊ शकतो. आणि तोच रेबीज माणसांना देखील होऊ शकतो.

कोल्हे

कोल्ह्यानमार्फत देखील रेबीज पसरण्याची दाट शक्यता असते. रेबीज पसरवण्यात कोल्ह्याचा महत्त्वाचा वाटा असतो.

वटवाघुळ

वटवाघुळ हा देखील एक रेबीज विषाणू पसरवणारा सगळ्यात धोकादायक प्राणी आहे. वटवाघुळमार्फत देखील रेबीज मोठ्या प्रमाणात पसरतो.

माकडे

माकडा मार्फत देखील मोठ्या प्रमाणात रेबीज हा विषाणू पसरतो. तुम्ही जर जंगली माकडांच्या सर्व वर्गात आला, तर हा रेबीज होण्याची शक्यता तुम्हाला जास्त असते.

रेबीजची लक्षणे

तुम्हाला जर वरील कोणताही प्राणी चावला, तर काही आठवड्यात किंवा काही महिन्यांमध्ये रेबीजची लक्षणे दिसू लागतात. यामध्ये सुरुवातीला आपल्याला ताप येतो, डोकेदुखी होते, थकवा येतो, स्नायू दुखतात, अस्वस्थपणा आणि जळजळ होते. परंतु ही लक्षणे जास्त असेल, तर कधी कधी अर्धांगवायू कोमा यांसारख्या आजारांना देखील सामोरे जावे लागते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रेबीज हा एक गंभीर आजार आहे. कधी कधी या रेबीजमुळे माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो. जर एखाद्या प्राण्याने तुमचा चावा घेतला, तर लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. रेबीज टाळण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. यासाठी तुम्ही प्राण्यांपासून दूर राहा. तसेच तुमच्या पाळीव प्राण्यांचे लसीकरण करा. तुम्हाला जर प्राणी चावला तर वैद्यकीय मदत घ्या.

मासिक पाळीत केस धुवणे योग्य की अयोग्य; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Periods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक वेळा महिलांना आणि मुलींना सांगितले जाते कीमासिक पाळीत केस धुवू नये. परंतु यामागचे खरे कारण हे अनेकांना माहितच नाही. आपल्या आजी आणि आईकडून ऐकले आहे की, मासिक पाळीत केस धुणे अशुभ आहे. मासिक पाळीच्या तिसऱ्या दिवशी केस धुवावे. परंतु यामागे नक्की काय कारण आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत तसेच ते कारण खर आहे की खोटे हे जाऊन घेऊया.

मासिक पाळीमध्ये जेव्हा आपण केस धुतो तेव्हा शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो आणि शरीरातून मासिक पाळीचा स्त्राव होत नाही. त्याचप्रमाणे मासिक पाळी मध्ये केस धुतल्यावर पीसीओएस किंवा पीसीओडी यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. यांसारखे अनेक मेसेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

स्त्री विषयक तज्ञांनी दिल्ली माहितीनुसार, मासिक पाळी केस धुणे हे अत्यंत सुरक्षित आहे. तुम्ही तर मासिक पाळी मध्ये केस धुतले, तर त्याचा तुमच्या मासिक पाळीवर कोणत्याही प्रकारचा नकारात्मक परिणाम होत नाही. मासिक पाळी मध्ये केस धुवू नये ही एक समजूत आहे. केस धुतल्याने मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. अनेक लोक असे म्हणतात की, मासिक पाळी मध्ये केस धुतलेल्या जास्त त्रास होतो आणि केस खराब होतात. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. परंतु मासिक पाळीत केस धुणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मासिक पाळी आपण शरीराची जास्तीत जास्त स्वच्छता राखणे गरजेचे आहे. त्यामुळे जर तुम्ही मासिक पाळीमध्ये केस धुवत असाल, तर कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. कारण वैज्ञानिकदृष्ट्या यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचत नाही.

आता WhatsApp वरही करता येणार कॉल रेकॉर्ड; वापरा ही ट्रिक

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल टेक्नॉलॉजीने खूप जास्त प्रगती केलेली आहे. या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण घरबसल्या जगभरातील माहिती मिळवू शकतो. यासाठी मोबाईल हा केंद्रबिंदू असतो. आपण मोबाईलच्या माध्यमातूनच या प्रगत टेक्नॉलॉजीचा अनुभव घेतो. आजकाल जवळपास सगळे स्मार्टफोन वापरतात आणि स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक माणूस हा व्हाट्सअपचा वापर करतच असतो. व्हाट्सअप हे एक असे समाज माध्यम आहे जर लोकांना एकमेकांशी कनेक्ट करते. आपण घरबसल्या कितीही दूरच्या व्यक्तीशी या व्हाट्सअपच्या माध्यमातून बोलू शकतो. केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगभरात व्हाट्सअप वापरले जाते.

व्हाट्सअपच्या माध्यमातून आपल्याला फोन कॉल, व्हिडिओ कॉल, मेसेज, फोटो, व्हिडिओ यासारख्या गोष्टी सेंड करता येतात. तसेच आपण लोकेशन शेअर देखील करू शकतो. तसेच आजकाल व्हाट्सअपच्या माध्यमातून आपण ऑनलाइन पद्धतीने पेमेंट देखील करतो. व्हाट्सअप त्यांच्या युजरसाठी नवनवीन फीचर लॉन्च करत असतात. आपण आता व्हाट्सअप वर आलेले कॉल रेकॉर्ड करू शकतो. आता याबाबत आम्ही एक ट्रिक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमचे फोन रेकॉर्डिंग करू शकता.

ज्याप्रमाणे आपण नॉर्मल फोन रेकॉर्ड करतो. तसे व्हाट्सअप वर कॉल रेकॉर्ड करणे शक्य नव्हतं. परंतु आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही हे फोन कॉल रेकॉर्ड करू शकता. व्हाट्सअपवर असं कोणतही इनबिल्ट फीचर नाही. पण तुम्ही क्यूबएससीआर आणि सेलेस्ट्रल यांसारख्या थर्ड पार्टी ॲपद्वारे व्हाट्सअपवर आलेले कॉल रेकॉर्ड करू शकता.

यासाठी तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या फोनमध्ये थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप डाऊनलोड करायचे आहे. whatsapp कॉल रेकॉर्ड करता येतात. यासाठी व्हाट्सअप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला आवश्यक त्या सगळ्या परवानगी द्याव्या लागेल. जसे की मायक्रोफोन, स्टोरेजमध्ये प्रवेश त्यानंतर व्हाट्सअपवर केलेले कॉल सहज रेकॉर्ड करू शकता. परंतु हे थर्ड पार्टी ॲप डाऊनलोड करताना तुम्ही त्यांची गोपनीयता, धोरणे आणि नियम वाचूनच डाउनलोड करा.

महाविकास आघाडी की महायुती; कोणी केली जास्त विकास कामे? जाणून घ्या जनतेचा कौल

Assembly Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी दोन दिवसांवर येऊन पोहचलेल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या बाजूने जनतेला अनेक आश्वासन दिलेली आहे. आणि या आश्वासनांवरून नागरिकांनी आता महाविकास आघाडीचा काय कार्यकाल आणि महायुतीचा कार्यकाल यांची तुलना केलेली आहे.

महायुतीच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचा कार्यकाल अत्यंत चांगला असल्याचे म्हटले आहे. तसेच लोकांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्याकडूनही महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचा कार्यकाळात विकास कामे झालेली आहेत. अशी मते मांडलेली आहेत. महायुतीने राज्यांमध्ये अनेक विकास कामे केलेली आहेत. असे मत लोकांनी मांडलेले आहे. या दोन्ही पक्षांचा विचार केला, तर तुलनात्मक महायुतीच्या सरकारमध्ये राज्यात अनेक चांगले बदल घडवून आल्याचे समोर आलेले आहे

महायुतीने आणली योजनांना गती

2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. या सरकारला केवळ अडीच वर्षे मिळाले आहेत. परंतु या अडीच वर्षात त्यांनी विविध योजना आणलेल्या आहेत. या योजनांचा फायदा सारखा सर्वसामान्य नागरिकांना झालेला आहे. महिलांसाठी त्यांनी माझी लाडकी बहिणी योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्यातील दीड हजार रुपयांचा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मुलींसाठी उच्च मोफत शिक्षण केलेले आहे. लेक लाडकी योजना आणली आहे. महिलांना दरवर्षी तीन सिलेंडर मोफत देणाऱ्या अन्नपूर्णा योजनेची घोषणा देखील अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. परंतु महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात महिलांच्या कल्याणासाठी अशा कोणत्याही प्रकारची योजना आणलीनाही. तसेच महिलांचा जास्त विचार केला नाही, असे मत लोकांनी मांडलेले आहे.

शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी योजना

महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी किसान सन्मान योजना अंतर्गत दर महिन्याला पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच एका रुपयात पीक विमा मिळत आहे. तसेच कृषी वीज बिल देखील माफ करण्याची योजना शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने आणलेली आहे. मोफत विजेसाठी त्यांनी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तरुणांसाठी जॉब जॉब ट्रेनिंग सुविधा, सारथी बार्टी योजना तीन शिक्षण प्रशिक्षण उपलब्ध करून दिलेले आहे. लाडका भाऊ योजनेचा लाभ देखील दहा लाख तरुणांना मिळणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांच्या निवृत्ती वेतनाच्या रकमेत देखील महायुती सरकारने वाढ केलेली आहे. परंतु महाविकास आघाडी सत्तेत असताना अशा प्रकारची कोणतीही योजना झाली नाही.

नोकर भरती

माहिती सरकारने मागील दोन वर्षांमध्ये जवळपास 75000 सरकारी पदांसाठी भरती केलेली आहे. तसेच पेन्शन योजना चालू करण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविका तसेच कृषी सेविका यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात येत आहे. तसेच पोलीस कॉन्स्टेबल या पदाच्या तब्बल 18000 पदांची भरती देखील माहिती सरकारच्या काळात पूर्ण झालेली आहे.

उद्योजकांना चालना

रोजगाराच्या क्षेत्रात तरुणांना संधी दिलेली आहे. यावेळी माहिती सरकारने मराठा बांधवांसाठी अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळ सक्षम केलेले आहे. आणि यामध्ये एक लाखांपेक्षा जास्त उद्योजक घडवलेले आहेत. विविध रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगाराची संधी महायुतीच्या काळात मिळालेली आहे.

आरोग्य क्षेत्रात नव्या सुविधा

आरोग्य क्षेत्रात देखील महायुतीच्या काळात अनेक नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत. महायुती सरकारने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना आणलेला आहे. या अंतर्गत शेकडो आरोग्य केंद्र व रुग्णांची तपासणी मोफत केली जाते. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून विमा संरक्षणाची रक्कम ही दीड लाख रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत केली आहे.

नैसर्गिक आपत्तीत मदत

महायुती सरकारने आदिवासी बांधवांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राबवलेली आहे. महाविकास आघाडीच्या काळात 18119 घरांसाठी 447 रुपये मंजूर केले होते. तर महायुतीच्या काळात 1 लाख 25 हजार 700 घरांसाठी तब्बल 771 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यावर महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना 8 71 कोटी रुपयांची मदत केली होती. तर महायुतीच्या काळात ही रक्कम 1 लाख 63 हजार 9 कोटी रुपयांवर गेलेली होती. महाविकास आघाडीने त्यांच्या काळात बचत गटांना 13941 कोटी रुपयांची मदत केली होती. तर महायुतीच्या काळात 28,811 कोटी रुपयांची मदत करण्यात आलेली आहे.

रोजगार मिळावे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अंतर्गत महाविकास आघाडीने 2718 कोटी रुपये मंजूर केले होते. तर महायुतीने ही रक्कम 4 हजार 108 कोटी रुपये मंजूर केलेले होते. महाविकास आघाडीच्या काळात एमएसएमइ वार्षिक सरासरी 810 हजार होती. ती वाढून महायुतीच्या काळात 14 लाख 41 हजार रुपयांपर्यंत पोहोचली. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात 396 रोजगार मिळावे घेण्यात आले. आणि 36000 तरुणांना रोजगार मिळाला. तर महायुतीच्या काळात 10138 मिळावे घेण्यात आले. आणि याद्वारे 1 लाख 51 हजार तरुणांना नोकरीच्या संधी मिळाल्याचा दावा करण्यात आलेला आहे.

10 th And 12 th Exam | 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती ! बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

10 th And 12 th Exam

10 th And 12 th Exam | दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर्षीच्या दहावी आणि बारावीचा बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा समोर आलेल्या आहेत. त्यानुसार यावर्षी 10 दिवस अगोदर परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना आता अभ्यासाला देखील कमी वेळ राहिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लगेच अभ्यासाला जागा. कारण बारावीची परीक्षा येत्या 11 फेब्रुवारीपासून आणि दहावीची परीक्षा येते 31 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी फक्त तीन महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी नियोजन करून अभ्यास करा.

दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा आली की, विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या मनात देखील भीती असते. अनेक वेळा परिक्षेदरम्यान अनेक अडचणी येतात. परंतु आता तुमच्याकडे अजूनही तीन महिन्यांचा कालावधी आहे. तुम्ही या तीन महिन्यांच्या कालावधीत चांगले नियोजन करून अभ्यास करू शकता. इयत्ता दहावीचा पहिला पेपर मराठी, हिंदी तसेच इतर प्रथम भाषांचा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.

यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा केंद्र होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर त्यातून राज्यभरातून हरकती मागवल्या आहेत. या संदर्भात केवळ 40 हरकती प्राप्त झालेल्या आहेत. आणि त्या किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे बोर्डाने केलेले हे नियोजन अंतिम ठरवलेले आहे.

यावर्षी परीक्षा अगोदर घेतल्यामुळे बारावी नंतर जेईई, नीट च्या परीक्षा देखील लवकर होणार आहेत. तसेच परीक्षांचा निकाल देखील यावर्षी पंधरा-वीस दिवस अगोदर लागण्याची शक्यता आहे. निकाल लवकर लागल्यामुळे पुरवणी परीक्षा वेळेत होईल, आणि विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशास अडचण येणार नाही.

परीक्षेचे वेळापत्रक | 10 th And 12 th Exam

इयत्ता बारावी
प्रात्यक्षिक परीक्षा – 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी
लेखी परीक्षा – 11 फेब्रुवारी ते 18 मार्च

इयत्ता दहावी
प्रात्यक्षिक परीक्षा -3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी
लेखी परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 17 मार्च.

तुम्ही महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण वेळापत्रक पाहू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती पाहायला मिळेल.