Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 369

वंदे भारत स्लीपरची होणार धमाकेदार एंट्री ! धावणार 10 ट्रेन, काय आहे रेल्वेचा प्लॅन ?

vande bharat sleeper train

देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेन वंदे भारतबद्दल प्रवाशांसोबतच रेल्वे विभागही खूप उत्सुक आहे. वंदे भारतच्या यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार आहेत. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी खूशखबर दिली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर २०२५-२६ पर्यंत वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. या गाड्या आरामदायी, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आधुनिक डिझाइनसह दिल्या जातील.

10 वंदे भारत चालणार?

एका इंग्रजी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वे 2025-26 पर्यंत 10 नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखत आहे. भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 2025 मध्ये चाचणी आणि चाचणीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. महाव्यवस्थापक, इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई, यू. सुब्बा राव यांनी याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की 15 नोव्हेंबरपासून या गाड्यांच्या दोलन चाचण्या आणि इतर चाचण्या दोन महिन्यांसाठी घेतल्या जातील, त्यानंतर त्या व्यावसायिक सेवेत आणल्या जातील.

वंदे भारत स्लीपर ट्रेनची रचना प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोयींना प्राधान्य देऊन करण्यात आली आहे. या गाड्या उच्च ताकदीच्या ऑस्टेनिटिक स्टेनलेस स्टीलपासून बनवल्या जातात. त्यांच्यात क्रॅश बफर आणि खास डिझाइन केलेले कपलर सारखी प्रगत सुरक्षा उपकरणे बसवली आहेत, जी आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहेत.

काय असतील सुविधा ?

या गाड्यांना एकूण 16 डबे असतील आणि त्यांची क्षमता 823 प्रवासी असेल. या प्रवासासाठी फर्स्ट क्लास एसी, सेकंड क्लास एसी आणि थर्ड क्लास एसी सुविधा उपलब्ध असतील. रेल्वेने अद्याप वंदे भारत स्लीपर गाड्यांच्या मार्गांची औपचारिक घोषणा केलेली नसली तरी, सुरुवातीच्या सेवा नवी दिल्ली ते पुणे किंवा नवी दिल्ली ते श्रीनगर या प्रमुख शहरांदरम्यान चालवल्या जाण्याची शक्यता आहे.

केवळ 1000 रुपयर गुंतवा आणि करोडपती व्हा ! काय आहे म्युच्युअल फंडातील 12-30-12 फॉर्म्युला ?

mutual funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि प्रभावी पर्याय शोधत असाल, तर म्युच्युअल फंडामधील एसआयपी (Systematic Investment Plan) हा एक चांगला ऑपशन ठरू शकतो. फक्त 1000 रुपयांपासून सुरू होणाऱ्या एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही करोडपती होऊ शकता. यासाठी फक्त 12-30-12 या सोप्या फॉर्म्युल्याचा अवलंब करावा लागतो. तर चला या फॉर्म्युल्याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात .

नफा कमावण्याची संधी

या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून लोकांना दीर्घकालीन नफा कमावण्याची संधी प्राप्त होते. तुम्हाला प्रत्येक वर्षी टॉप अप एसआयपी गुंतवणुकीत 12% वाढ करायची आहे. त्यानंतर ही गुंतवणूक सलग 30 वर्षे चालू ठेवावी लागेल . या तीस वर्ष्याच्या कालावधीत तुम्हाला त्या रक्कमेवर अंदाजे 12% नफा मिळू शकतो. आपण हे एका उदाहरणाच्या साह्याने समजून घेऊयात , समजा तुम्ही सुरुवातीला 1000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली, तर पहिल्या वर्षात तुम्ही एकूण 12,000 रुपये गुंतवाल. त्यानंतर प्रत्येक वर्षी 12% टक्क्यांनी ही रक्कम वाढवा. दुसऱ्या वर्षी तुम्ही 1120 रुपये प्रति महिना, तिसऱ्या वर्षी 1254 रुपये प्रति महिना, असे करत तुमची गुंतवणूक वाढत जाईल.

12-30-12 फॉर्म्युल्याचे काटेकोरपणे पालन

जर तुम्ही या फॉर्म्युल्याचे काटेकोरपणे पालन केले, तर 30 वर्षांत तुम्ही एकूण 28.96 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. या गुंतवणुकीवर तुम्हाला साधारणतः 83.45 लाख रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच 30 वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण 1 कोटी 12 लाख 41 हजार 603 रुपये जमा होतील.

आर्थिक सल्ला महत्त्वाचा

म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणूक ही शेअर बाजाराशी जोडलेली असते , म्हणून त्यामध्ये कमी जोखीम असते. गुंतवणूक केल्याने व्याजावर व्याज (Compound Interest) मिळत राहते . एसआयपी हा गुंतवणुकीचा आधुनिक आणि लोकप्रिय पर्याय आहे. फक्त 1000 रुपयांपासून सुरू करून, 12-30-12 फॉर्म्युल्याच्या साहाय्याने करोडपती होण्याचा मार्ग निवडता येईल. पण गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. अशा गुंतवणुकीने तुमच्या भविष्याला सुरक्षित आणि समृद्ध बनवा.

उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मिळणार कर्ज ; काय आहे विद्यालक्ष्मी योजना ? कसा कराल अर्ज ?

pm vidylaxmi yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक गोरगरीब मुलांना पैशाअभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही . अशा सर्व मुलांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिले जाते. तसेच विद्यालक्ष्मी योजनाचा फायदा विद्यार्थ्यांना एका क्लिकवर मिळावा, यासाठी सरकारने विद्यालक्ष्मी पोर्टल नावाचे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी अनेक बँकांकडून शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतात, तसेच शिष्यवृत्ती मिळवण्यासाठीही अर्ज करू शकतात. त्यामुळे आता शिक्षण घेणे सोपे झाले आहे.

अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी

विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल . सर्वप्रथम विद्यार्थी विद्यालक्ष्मी पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. लिंक ओपन झाल्यानंतर तिथे रजिस्ट्रेशनच्या पर्यायावर क्लिक करून नाव, पत्ता, ईमेल आयडी, आणि इतर आवश्यक माहिती भरावी . रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एक युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल, ज्याच्या मदतीने ते पोर्टलवर लॉग इन करू शकतात.

महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक

लॉग इन केल्यानंतर पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी उपलब्ध पर्याय निवडा. त्यानंतर आवश्यक शैक्षणिक माहिती, कुटुंबाचे उत्पन्न, व अन्य तपशील अचूक भरावा. अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. त्यामध्ये आधार कार्ड , कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र , इयत्ता 12 वीची गुणपत्रिका , जातप्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागतील.

शिक्षणाच्या संधीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

अर्ज भरल्यानंतर त्यात दिलेली माहिती व्यवस्थित तपासून पहावी . सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यानंतर तो पोर्टलद्वारे तपासला जाईल. त्यानंतर मग अर्ज स्वीकारण्यात आल्यास विद्यार्थ्यांना ई-मेल आणि मेसेजद्वारे कळवण्यात येईल. विद्यालक्ष्मी योजना ही आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी विस्तारित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक अडचणींना दूर करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक पाठबळ मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळ न घालवता विद्यालक्ष्मी पोर्टलवर भेट द्यावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा.

घरभर लाल मुंग्यांचा उपद्रव ? वापरा ‘या’ सोप्या ट्रिक, कायमचा त्रास होईल कमी

rid from ants

आपल्या घरामध्ये तुम्हाला मुंग्यांचा वावर जास्त प्रमाणात दिसत असतील. मग फरशीवर थोडासा जरी अन्नाचा कण जरी पडला तरी त्याला लगेच मुंग्यांची रांग लागतेच. यात काही मुंग्या ह्या उपद्रवी असतात. त्यांच्या चावण्याने खूप (Kitchen Tips) जळजळ तर होतेच पण फोडही उठतात. त्यातही लाल मुंग्यांच्या चावण्याने खूप दाह होतो.

शिवाय अन्न जर किचनमध्ये चुकून जरी उघडे राहीले तर मुंग्या लागल्यामुळे सर्व अन्न पदार्थ खराब होतात. भात, दूध, तलकट पदार्थ अशा पदार्थाना हमखास मुंग्या होतातच त्यामुळेच आजच्या लेखात आपण अशा काही ट्रिक्स पाहणार आहोत ज्यामुळे अवघ्या काही सेकंदात तुम्ही मुंग्यांपासून सुटका करून घेऊ शकता.चला तर मग जाणून घेऊया.

साखरेमध्ये बोरॅक्स पावडर

साखर आणि बोरॅक्स पावडरच्या मदतीने आपण लाल मुंग्यांना पळवून लावू शकतो. यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा साखर आणि एक चमचा बोरॅक्स पावडर घेऊन मिक्स करा. तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा, आणि ज्याठिकाणी मुंग्या दिसतील, त्याठिकाणी स्प्रे करा.

लिंबू

घरातून लाल मुंग्यांना पळवून लावण्यासाठी लिंबू प्रभावी उपाय ठरेल. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा. त्यात लिंबाचा रस मिसळा. जिथून मुंग्या बाहेर पडतील, तिथे स्प्रे करा. लिंबाच्या रसातील उग्र गंधामुळे मुंग्या पळ काढतील.

मीठ

मिठाच्या वापरानेही मुंग्या घरातून पळ काढतील. यासाठी जिथे मुंग्यांची फौज दिसेल, तिथे मीठ शिंपडा. मुंग्या लगेच पळून जातील.

काळी मिरी पावडर

काळी मिरी पावडर फक्त स्वयंपाकात नसून, मुंग्यांना पळवून लावण्यासाठीही याचा वापर आपण करू शकता. घराच्या ज्या भागात मुंग्या दिसतात त्या ठिकाणी काळी मिरी पावडर शिंपडा. त्याजागी मुंग्या आपल्याला पुन्हा दिसणार नाहीत.

CG-महाराष्ट्र सीमेवर चकमक, 5 नक्षलवादी ठार ; दोन्ही राज्यांची संयुक्तिक कारवाई ; 2 जवान जखमी

kanker naxal encounter

नारायणपूरच्या अबुझमद भागात माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर, सैनिकांची संयुक्त टीम शोधासाठी निघाली तेव्हा सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. दोन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत दोन डीआरजी जवानही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. खिलेश्वर गावडे या एका सैनिकाच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गोळी लागली आहे, तर दुसऱ्याचे नाव हिरामण यादव असून त्याच्या उजव्या पायाच्या मांडीला गोळी लागली आहे.

नक्षलवाद्यांनी केला हल्ला

कांकेर आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या माड भागात ही चकमक झाली. सुरक्षा दलांना नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती, त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला, त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला.

दोन्ही जवान धोक्याबाहेर

ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. बस्तरचे आयजी पी सुंदरराज म्हणाले की, ‘दोन्ही जखमी जवानांवर उत्तम उपचारांची व्यवस्था करण्यात येत आहे. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे.

जखमी सैनिकांना केले एअरलिफ्ट

नारायणपूर कांकेर अबुझमद भागात झालेल्या नक्षलवादी चकमकीत दोन जखमी जवानांना उपचारासाठी रायपूरला नेण्यात आले, जिथे जखमी सैनिकांवर रायपूरच्या नारायण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळी 6 वाजल्यापासून चकमक सुरू

या संपूर्ण घटनेत, सैनिकांसोबत असलेल्या सहाय्यक शिपायाने सांगितले की, ही चकमक सकाळी 6 वाजता झाली, ज्यामध्ये पाच नक्षलवादी ठार झाले. दरम्यान, दोन जवान जखमी झाले आहेत. दोन्ही जवानांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही एकूण संयुक्त कारवाई होती ज्यात सुमारे 20-25 नक्षलवादी होते. या चकमकीत अनेक नक्षलवादीही जखमी झाले आहेत. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

काँग्रेसने केला मुंबईचा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना दिली ही वचने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार चालू झालेला आहे. तसेच अनेक पक्षांनी त्यांचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला आहे. अशातच आता मुंबई काँग्रेसने निवडणूकीसाठी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. या जाहीरनामांमध्ये त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक वचने देखील दिलेली आहे. परंतु त्यांच्या या जाहीरनामावर मोठ्या टीका देखील होऊ लागलेल्या आहेत. काँग्रेसच्या या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी महिलांसाठी अनेक वचने दिलेली आहेत. तसेच बेरोजगारी विरोधात अनेक उपाय योजना तसेच मच्छीमार समाजाच्या कल्याणासाठी अनेक योजना देखील आणलेल्या आहेत. परंतु त्यांनी या जाहीरनामात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावल्याने काँग्रेस पक्षावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या या जाहीरनामात सोनिया गांधींचा फोटो नाही असे करण्यामागे नक्की काय कारण आहे? असा प्रश्न देखील विरोधकांकडून केला जात आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पत्रिका परिषद घेतली. आणि महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर त्यांनी मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्र देशातील आर्थिक केंद्र आहे. परंतु दिवसेंदिवस या स्थितीत घसरल होत चालल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. यावेळी चिदंबरम म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य होते. इंडस्ट्री, सेवा, क्षेत्र आणि शेती क्षेत्रात अनेक भूमिका बजावलेले आहेत. परंतु आता शेती क्षेत्रात अत्यंत बिकट परिस्थितीला सामना देत आहे. शेतीच्या मालाचे दर घसरलेले आहेत. आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होत नाही त्यामुळे या क्षेत्रात घसरून दिसत आहे.

यावेळी चिदंबरम यांनी अनेक कर्ज घेण्याच्या धोरणावर हे मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. आणि राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले की, “पैसे वापरले जात आहेत पण विकास कुठे आहे? कोणत्याही प्रकारचा विकास अजून झालेला दिसत नाही. तसेच बेरोजगारीच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. 18300 पोलीस भरतीसाठी 11 लाख उमेदवारांनी अर्ज केलेला आहे. तसेच तलाठी भरती ही 4600 पदांसाठी जवळपास 11.5 लाख उमेदवारांनी अर्ज केलेले आहे. यावरूनच महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती किती बिकट आहे हे समोर आलेले आहे.”

या जाहीरनाम्यामध्ये वर्षा गायकवाड यांनी देखील मुंबईकरांसाठी अनेक योजनांची घोषणा केलेल्या आहे. या जाहीरनाम्यात त्या म्हणाल्या की, आम्ही मुंबईचा मुंबईनामा देत आहोत. या योजनांमध्ये महिलांसाठी 3000 रुपये मासिक सहाय्य तसेच महिलांना वन्स स्टॉप प्राइस इन सेंटर वस्तीगृहांची उभारणी आणि बेरोजगार तरुणांसाठी महिन्यात 4 हजार रुपये देण्याचे आश्वासन देत आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी मच्छीमार समुदायासाठी पाच लाख रुपयांची कर्जमाफी तसेच 25 लाख रुपये आरोग्य विमा आणि मोफत औषधे देण्याचा वादा देखील केलेला आहे. त्याचप्रमाणे वर्षाच्या शिकाउ उमेदवारांसाठी शिक्षित तरुणांना संधी देणे, धारावी प्रकल्प रद्द करणे आणि आरक्षण मर्यादा 50% निवडून हटवण्याचा निर्णय देखील जाहीर केलेला आहे.

रेल्वेच्या डब्यावर लिहिलेला H1 चा अर्थ माहीत आहे ? जाणून घेतल्यास होऊ शकतो फायदा

number on train

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अशा अनेक महत्त्वाच्या नियमांचा साईन बोर्डवर उल्लेख करत असते. या काही सांकेतिक शब्दांत लिहिलेल्या शब्दांचा अर्थ ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे प्रवासाची सोय आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अशा अनेक महत्त्वाच्या नियमांचा साईन बोर्डवर उल्लेख करत असते. या काही सांकेतिक शब्दांत लिहिलेल्या शब्दांचा अर्थ ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे प्रवासाची सोय आहे.

ट्रेनच्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये काही कोड शब्द वेगवेगळ्या शब्दांत लिहिलेले असतात हे तुमच्या लक्षात आले असेल. ज्यामध्ये काही डब्यांवर H1 देखील लिहिलेले आहे पण 90 टक्के लोकांना याची माहिती नाही.

भारतीय रेल्वेद्वारे दररोज देशातील कोट्यवधी लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानी नेले जाते. त्यामुळे भारतीय रेल्वेकडे सध्या हजारो किलोमीटरचे रनिंग ट्रॅक असून हजारो गाड्या चालवल्या जात आहेत. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. तुम्हीही कधी ना कधी ट्रेनने प्रवास केला असेलच.

डब्यांवर लिहिलेला H1 चा अर्थ

भारतीय रेल्वे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांचा डबा ओळखण्यासाठी ही अक्षरे लिहितात, त्यामुळे या अक्षरांसोबत काही संख्याही लिहिल्या जातात. उदाहरणार्थ, H1

H1 लिहिलेले डबे अलिशान आहेत

वास्तविक, H1 असे लिहिलेले कोच खूप खास आहेत, ज्यामुळे ते रेल्वेचे सर्वात प्रीमियम कोच असलेल्या फर्स्ट एसी कोचवर लिहिलेले आहे. या कारणास्तव, हे डबे वेगळे करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी ट्रेनवर H1 लिहिलेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की या प्रकारच्या कोचमध्ये प्रवाशांना स्वतःची खाजगी केबिन मिळते. तसेच, इतर डब्यांपेक्षा चांगल्या सुविधांचा त्यात समावेश आहे. तथापि, येथे भाडे देखील महाग आहे.

त्यामुळे तुम्ही प्रवासी असाल तर हे शब्द ट्रेनच्या इतर डब्यांवर लिहिलेले असतात, इतर स्लीपर कोचवर ‘S’ द्वारे दर्शविले जाते, तर द्वितीय श्रेणीचे AC डबे ‘B’ ने दर्शविले जातात. याशिवाय खुर्ची वर्ग ‘CC’ द्वारे दर्शविला जातो. ही माहिती तुम्ही कधीही विसरणार नाही.

ट्रेनच्या तिकिटासोबत ‘या’ 5 सुविधा मिळतात अगदी मोफत ; माहिती नसेल तर जाणून घ्या

train ticket

रेल्वेने प्रवास करताना, रेल्वे आपल्या प्रवाशांना अशा अनेक सुविधा पुरवते, ज्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते. ट्रेनचे तिकीट खरेदी केल्याने प्रवाशाला अनेक अधिकार मिळतात, तेही अगदी मोफत. यामध्ये मोफत बेडरोलपासून ते ट्रेनमध्ये मोफत जेवणापर्यंतच्या अधिकारांचा समावेश आहे. या सर्व सुविधा रेल्वे प्रवाशांना केव्हा आणि कशा पुरवते ते जाणून घेऊया.

भारतीय रेल्वे सर्व AC1, AC2, AC3 कोचमध्ये प्रवाशांना एक ब्लँकेट, एक उशी, दोन बेडशीट आणि एक हात टॉवेल प्रदान करते. मात्र, गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये यासाठी लोकांना 25 रुपये मोजावे लागतात. याशिवाय, काही गाड्यांमध्ये, प्रवाशांना स्लीपर क्लासमध्ये बेडरोल देखील मिळू शकतात. तुमच्या ट्रेन प्रवासादरम्यान तुम्हाला बेडरोल न मिळाल्यास, तुम्ही त्याविरुद्ध तक्रार करू शकता आणि परताव्याची मागणी करू शकता.

मोफत वैद्यकीय मदत

रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला आजारी वाटल्यास, रेल्वे तुम्हाला मोफत प्रथमोपचार पुरवते आणि प्रकृती गंभीर असल्यास पुढील उपचारांचीही व्यवस्था करते. यासाठी तुम्ही फ्रंट लाइन कर्मचारी, तिकीट संग्राहक, ट्रेन अधीक्षक इत्यादींशी संपर्क साधू शकता. आवश्यक असल्यास, भारतीय रेल्वे तुमच्यासाठी पुढील ट्रेनच्या थांब्यावर वाजवी शुल्कात वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करेल.

फ्री फूड

जर तुम्ही राजधानी, दुरांतो आणि शताब्दी सारख्या प्रीमियम ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुमची ट्रेन 2 तासांपेक्षा जास्त उशीर होत असेल, तर रेल्वे तुम्हाला मोफत जेवण देते. याशिवाय, जर तुमची ट्रेन उशीर होत असेल आणि तुम्हाला काहीतरी चांगले खायचे असेल तर तुम्ही आरई ई-कॅटरिंग सेवेतून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करू शकता.

तुमचे सामान महिनाभर स्टेशनवर ठेवू शकता

देशातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर क्लोकरूम आणि लॉकर रूम उपलब्ध आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही तुमचे सामान या लॉकर रूम आणि क्लोकरूममध्ये जास्तीत जास्त 1 महिन्यासाठी ठेवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागेल.

मोफत वेटिंग हॉल

कोणत्याही स्टेशनवर उतरल्यानंतर पुढची ट्रेन पकडण्यासाठी काही वेळ स्टेशनवर थांबावं लागलं किंवा इतर काही कामासाठी स्टेशनवर थांबावं लागलं, तर तुम्ही एसी किंवा नॉन-एसी वेटिंग हॉलमध्ये आरामात थांबू शकता. स्टेशन यासाठी तुम्हाला तुमचे ट्रेनचे तिकीट दाखवावे लागेल.

Maruti Suzuki Hustler उद्या होणार लॉन्च ; असतील हायटेक फीचर्स, किती असेल किंमत ?

Maruti Suzuki Hustler

मारुती सुझुकी कंपनीच्या वाहनांना आपल्या देशात खूप पसंती दिली जाते. ग्राहकांना कंपनीची वाहने खूप आवडतात. दरम्यान, मारुती कंपनी आपली नवीन कार घेऊन बाजारात आली आहे. कंपनीच्या या नवीन वाहनाचे नाव मारुती सुझुकी हसलर आहे. ही कार बाजारात येताच आपली मोहिनी दाखवत आहे. या कारचे सर्वांनाच वेड लागले आहे. लॉन्च होताच या वाहनाची युनिट्स वेगाने विकली जात होती.

स्पेशफिकेशन

मारुतीची ही कार अशा लोकांसाठी आहे ज्यांना दररोज ऑटो मार्केटमध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह नवीन कार खरेदी करायची आहे. मारुतीच्या या कारमध्ये तुम्हाला जबरदस्त मायलेज मिळणार आहे. यासोबतच त्याचा लुकही खूप चांगला असणार आहे.

फीचर्स

सुझुकी हसलर कारच्या अप्रतिम वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, तुम्हाला 360 कॅमेरा, रियर सेन्सर, पॉवर विंडो, पॉवर साइड मिरर, एसी, एबीएस, एअरबॅग, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, डिजिटल कन्सोल, सनरूफ, डिजिटल डिस्प्ले इत्यादी फीचर्स देण्यात येत आहेत.

शक्तिशाली इंजिन

Suzuki Hustler च्या पॉवरफुल इंजिनबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला या कारमध्ये 658 cc चे पॉवरफुल इंजिन दिले जात आहे. हे इंजिन ५२ पीएस पॉवर आणि ६३ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. यासोबतच मारुतीच्या या कारचे मायलेजही चांगले असणार आहे.

काय असेल किंमत ?

जर आपण सुझुकी हसलरच्या आलिशान कारबद्दल बोललो तर या कारची रेंज बाजारात सुमारे 6.7 लाख रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.

ISRO आणि Elon Musk यांच्या कंपनीत मोठा करार, Spacex भारतातील सर्वात प्रगत उपग्रह प्रक्षेपित करणार

istro and musk

भारतीय अंतराळ संस्था इस्रोने ज्येष्ठ उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीशी हातमिळवणी केली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खास मित्र असलेल्या मस्कची कंपनी स्पेसएक्स पुढील आठवड्याच्या सुरुवातीला फाल्कन लॉन्च करणार आहे. भारताचा सर्वात आधुनिक दळणवळण उपग्रह GSAT-20 (GSAT N-2) अंतराळात नेण्यासाठी 9 रॉकेट वापरण्यात येणार आहेत.

या करारामागील कारण काय ?

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि SpaceX यांच्यात अनेक करार झाले आहेत. GSAT-N2 हे अमेरिकेतील केप कॅनवेरल येथून प्रक्षेपित होणार आहे. 4700 किलो वजनाचा हा उपग्रह भारतीय रॉकेटसाठी खूप जड असल्याने तो परदेशी व्यावसायिक प्रक्षेपणासाठी पाठवण्यात आला. भारताचे स्वतःचे रॉकेट ‘द बाहुबली’ किंवा प्रक्षेपण वाहन मार्क-3 हे अंतराळ कक्षेत जास्तीत जास्त 4000 ते 4100 किलो वजन वाहून नेऊ शकते.

भारत आतापर्यंत आपले वजनदार उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी एरियनस्पेसवर अवलंबून होता, परंतु सध्या त्याच्याकडे कोणतेही ऑपरेशनल रॉकेट नाहीत आणि भारताकडे SpaceX सह जाणे हा एकमेव विश्वासार्ह पर्याय होता. भारताला आतापर्यंत आपली चिनी रॉकेट भारतासाठी अयोग्य वाटली आहे आणि युक्रेनमधील संघर्षामुळे रशिया आपली रॉकेट व्यावसायिक प्रक्षेपणासाठी देऊ शकला नाही.

GSAT-N2 विशेष का आहे?

इस्रोने 4700 किलो वजनाचे GSAT-N2 तयार केले आहे आणि त्याचे मिशन लाइफ 14 वर्षे आहे. हे पूर्णपणे व्यावसायिक प्रक्षेपण आहे, जे NSIL द्वारे चालवले जात आहे. उपग्रह 32 युजर बीमने सुसज्ज आहे, ज्यामध्ये ईशान्येकडील आठ अरुंद स्पॉट बीम आणि उर्वरित भारतातील 24 रुंद स्पॉट बीम आहेत.