हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. निवडणुकीसाठी अगदी दोन-तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. राज्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन देखील निवडणूक आयोग कधन करण्यात आलेले आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. आपल्या एका मतामुळे आपल्या समाजाचे भवितव्य ठरवले जाते. मतदानाच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. परंतु हा दिवस आपल्या भविष्यातील विकासासाठी असतो.
त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी या दिवशी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. दरवर्षी अनेक नवीन मतदार देखील जोडले जातात. आता मतदान करण्यापूर्वी मतदार यादी देखील जाहीर केली जाते. या यादीत जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला मतदान करता येते. तुम्ही अगदी घर बसल्या मतदार यादी तुमचे नाव आहे की, नाही हे चेक करू शकता. याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
मतदार यादीत नाव असं चेक करा
मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही यासाठी तुम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
तुम्ही https://electroalsearch.eci.gov.in/ या वेबसाइटवर जा.
वेबसाइटच्या वरच्या बाजूला serach by details, serach by epic, search by mobile हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
यानंतर संपूर्ण माहिती भरा. कॅप्चा कोड टाका आणि सर्च वर क्लिक करा.
यानंतर मतदार यादीतील तुमचं नावं,epic नंबर अशी सर्व माहिती दिसेल.
यानंतर सर्च केल्यानंतर तुमचं नाव दिसत नसेल तर राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.
SMS द्वारे शोधा मतदार यादीतील तुमचं नाव
तुम्ही एसएमएस पाठवून देखील मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही चेक करू शकता. तुम्ही तुमचा मतदार ओळख क्रमांक टाईप करा.हा एसएमएस 9211728082 किंवा 1920 वर पाठवा. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती मिळेल.
Whatsapp New Feature | प्रत्येक स्मार्टफोन वापरणारा माणूस हा व्हॉट्सअँप वापरत असतो. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आता संदेशवहन करणे खूप सोपे आणि सुलभ झाले आहे. व्हॉट्सअँप द्वारे आपल्याला मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉईस कॉल यांसारख्या फीचर्सचा फायदा घेता येतो. व्हॉट्सअँप देखील त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन अपडेट आणत असतात. अशातच आता एक नवीन फीचर आले आहे. यामध्ये तुम्हाला ड्राफ्ट फीचर मिळणार आहे. त्यामुळे तुमचा पूर्ण न झालेला मेसेज आता तुम्हाला नंतरही पूर्ण करता येणार आहे. तुम्ही जर एका वेळी अनेक ठिकाणी चॅटिंग करत असाल, तर या फीचरचा तुम्हाला फायदा होणार आहे.
ड्राफ्ट्स वैशिष्ट्य कसे काम करते? | Whatsapp New Feature
या मध्ये व्हॉट्सअँपच्या मेन चॅट लिस्टमध्ये तुम्हाला अपूर्ण मेसेजसाठी एक हिरवा ड्राफ्ट लेबल दिसेल. तसेच ड्राफ्ट चॅट मध्ये वरचा बाजूला देखील याची माहिती मिळेल. तुमचे जे मेसेज अर्धवट राहिले आहेत. त्याची तुम्हाला लगेच माहिती समजेल. आणि तुम्हाला पुन्हा तो मेसेज लिहिण्यासाठी वेळ मिळेल.
ग्लोबल अपडेट लवकरच उपलब्ध होणार
व्हॉट्सअँपच्या या फीचरचा फायदा आता संपूर्ण जागतिक स्तरबत होणार आहे. मेटाचे प्रमुख मारक झुकेरबर्ग यांनी त्यांच्या व्हॉट्सअँप चॅनलवर याबाबत माहिती दिलेली आहे. यामुळे आता तुमच्या चॅटिंग करण्याचा अनुभव अधिक सुलभ होणार आहे. अस विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
व्यवसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हे फीचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ड्राफ्ट लेबल वरच्या क्रमांकावर ठेवले जाणारे मेसेज यामुळे संपर्क साधने सोप्पे होणार आहे. व्हाट्सअपच्या नवीन फीचरमुळे आता युजरला चांगल्या प्रकारे व्हाट्सअपचा वापर करता येणार आहे. तसेच संदेशवहन देखील सोपे होणार आहे. डिजिटल संवाद साधने अधिक सुलभ होणार आहे.
High Blood Pressure | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीचा नकारात्मक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. यातीलच एक गंभीर आजार म्हणजे उच्च रक्तदाब. अनेक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे. आणि अशा लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येते. लोकांची जीवनशैली तसेच आहारात नियमितता नसल्याने तसेच फास्ट फूड जास्त प्रमाणात खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होतो.
ही समस्यापूर्वी वाढत्या वयात आल्यानंतर लोकांमध्ये दिसत होती. परंतु आजकाल अनेक तरुण लोकांना देखील उच्च रक्तदाबाच्या समस्या दिसून येते. 120 / 80 हा रक्तदाब सामान्य रक्तदाब मानला जातो. जर तुमचा रक्तदाब 140 / 90 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
ज्या लोकांचा रक्तदाब वाढलेला असतो. त्या लोकांना काही औषधी दिले जातात. तसेच आहारामध्ये देखील अनेक नियम असतात. रक्तदाबाची ही औषधे अनेक वर्ष खायला सांगतात. परंतु तुम्ही अगदी घरगुती काही पद्धतींचा अवलंब करून देखील तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवू शकता. हे घरगुती उपाय रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतील.
व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करा | High Blood Pressure
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी दररोज विटामिन सी असलेले पदार्थ खाणे गरजेचे असते. विटामिन सी असलेले पदार्थ रक्तदाबाची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच विटामिन सी हा एक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांमधील दाब कमी होतो. तुम्ही दररोज लिंबू, संत्री, पालक, टोमॅटो, हिरव्या पाले भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.
जेवणात मिठाचे प्रमाण कमी करा
तुम्ही जर तुमच्या जेवणात मिठाचे प्रमाण कमी केले, तरी देखील तुम्ही रक्तदाब नियंत्रित करू शकता. जेव्हा तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात सोडियम जाते. तेव्हा ते द्रव पदार्थांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे रक्तदाब वेगाने वाढू शकतो. त्यामुळे सहसा जास्त मीठ खाणे टाळा.
लसूण आरोग्यासाठी फायदेशीर
जवळपास आपल्याकडे प्रत्येक भाजीमध्ये लसणाचा वापर केला जातो. लसूण हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही जर रोज सकाळी कच्च्या लसणाच्या पाकळ्या झाल्या तर यामुळे तुमच्या शरीराला खूप फायदा होतात. तुमचे कोलेस्ट्रॉल देखील कमी होते. आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.
गाजर आणि पालक रस
गाजर आणि पालकाचा रस देखील रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय बीट रूट आणि आवळा यांचा देखील तुम्ही समावेश करू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहील. तसेच शरीराला पोषक तत्वांचा देखील पुरवठा होईल.
Benefits Of Eating Ginger | प्रत्येकाच्या घरामध्ये आल्याचा वापर केला जातो. अनेक भाज्यांमध्ये आले वापरले जाते. तसेच चहामध्ये देखील आले टाकले जाते. कारण हे आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आल्यामुळे जेवणाची चव देखील चांगली लागते. तसेच आपल्या आरोग्याला देखील अनेक फायदे होतात. आयुर्वेदात देखील अल्यला खूप जास्त महत्त्व आहे. या आल्यामध्येविविध निरोगी आणि चांगले एंजाइम्स असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला रोगाशी लढण्यासाठी ताकद निर्माण होते. तसेच जळजळ कमी करण्यासाठी देखील मदत होते. आल्यामध्ये कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, जस्त यांसारखे घटक आढळतात. त्यामुळे तुमच्या शरीराला खूप चांगला फायदा होतो. तुम्ही जर नियमितपणे 14 दिवस आल्याचे सेवन केले, तर तुमच्या शरीरात त्याचे खूप सकारात्मक बदल होतील. आता आले खाल्ल्याने आपल्या शरीराला नेमका कोणता फायदा होतो? हे आपण जाणून घेणार आहोत.
आले खाण्याचे फायदे | Benefits Of Eating Ginger
पचन सुधारते
तुम्ही जर सलग 14 दिवस आले खाल्ले, तर तुमची पचनक्रिया सुधारते. तसेच गॅस्ट्रिक ऍसिड नियंत्रित करते. आतड्या संबंधित स्नायू देखील सक्रिय होतात. ज्यामुळे खाल्लेले अन्न चांगल्या प्रकारे पचले जाते. तसेच पोट दुखणे, सूज येणे आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.
सूज कमी करते
आरोग्य तज्ञांच्या मते आल्यामध्ये जिंजरॉल नावाचा एक घटक असतो. जे आपल्या शरीरातील दाहक बॅक्टेरिया दूर करतात. आले हे एक नैसर्गिक दाहक विरोधी आहे. यामुळे सूज यांसारख्या समस्यावर आल्याचा चांगला परिणाम होतो.
अँटिऑक्सिडंट्स
आल्यामध्ये अनेक चांगले अँटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला इन्फेक्शनशी लढण्याची ताकद मिळते. तुम्ही जर नियमितपणे आल्याचे सेवन केले, तर तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील चांगली होते. तसेच सर्दी, खोकला विषाणूजन्य आजारांपासून तुमचा बचाव होतो.
वाईट कोलेस्टेरॉल |Benefits Of Eating Ginger
आल्यामुळे नैसर्गिक रित्या आपले रक्त पातळ होते. जे लोक रक्त पातळ करण्यासाठी औषध खातात. ते रोज आले खाऊ शकतात. ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे. ते लोक देखील आले खाऊ शकतात. यामुळे आपल्या शरीरातील चरबी वितळून जाते. आणि तुम्ही निरोगी राहतात. तसेच हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतामध्ये नदीला खूप पवित्र मानले जाते. आणि त्यामागे अनेक शास्त्रीय कारणे देखील आहे. कारण गावोगावी ही नदीच प्रत्येकापर्यंत पाणी पोहचवते. पाणी हे आपले जीवन आहे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. त्यामुळेच प्राचीन काळापासूनच नदीच्या काठावर अनेक गावे वसलेली आहेत. परंतु आपल्या जगात असा एक देश आहे. ज्या देशात एकही नदी वाहत नाही. त्या देशातील भूजल पातळी देखील कमी कमी होत चाललेली आहे. तसेच एका अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे की, या देशातील पाण्याची पातळी कमी झाल्याने काही वर्षातच इथे भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे. या गावात नदी नसल्याने अनेक संकटांना त्यांना सामोरे जावे लागते. आता हा देश कोणता आहे? हे आपण जाणून घेऊया
सौदी अरेबिया हा एक असा देश आहे, ज्या देशात एकही नदी किंवा तलाव नाही सौदी अरेबियामध्ये पाऊस पडण्याचे प्रमाण देखील अगदी कमी आहे. या देशामध्ये प्रत्येक वर्षी एक किंवा दोन दिवस पाऊस पडतो. या देशात पुरेसा पाऊस न झाल्याने तेथील भूजल पातळी देखील कमी कमी होत चाललेली आहे. आणि या देशातील भूजल पातळी लवकर संपुष्टात येईल असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे.
आता अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की, या देशात केवळ एक ते दोन दिवस पाऊस पडतो. तसेच या देशात एकही नदी वाहत नाही. मग या देशातील लोक पाणी कोणते पितात? तर सौदी अरेबियामध्ये पिण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर केला जातो. समुद्रातील खारट पाणी हे पिण्यायोग्य बनवले जातात. यावर मोठी प्रक्रिया देखील केली जाते. परंतु ही प्रक्रिया खूप महागडी आहे. सौदी अरेबियामध्ये एकही नदी नसली तरी हा देश दोन्ही बाजूने समुद्राने वेढलेला आहे. या सौदी अरेबियाच्या पश्चिमेला लाल समुद्र आहे, तर पूर्वेला पर्शियन खाडी आहे. या दोन्ही समुद्राला व्यापारी खूप जास्त महत्व आहे. या समुद्रातील पाणी पिण्यायोग्य करून ते वापरले जाते.
या देशांमध्ये जास्त पाऊस न पडल्याने येथील भूजल पातळी खालावत आहे. त्यामुळे सौदी अरेबियाला पाण्यावर जास्त पैसा खर्च करावा लागतो. जागतिक बँकेच्या अहवालानुसार सौदी अरेबिया दरवर्षी त्यांच्या जीडीपीतील जवळपास दोन टक्के खर्च हा पाण्यावर करत असते. तेथील अनेक लोक आजही पाण्यासाठी विहिरीचा वापर करतात. परंतु भूजल पातळी अत्यंत खालवलेली असल्याने त्या ठिकाणी त्यांना पुरेसे पाणी मिळत नाही.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा वापर होण्याला प्रचंड मोठा वाव आहे. या पश्चिम किनारपट्टीला जागतिक व्यापारात आपल्या धोरणात्मक स्थान मिळवून देण्यासाठी एका परिवर्तनीय प्रकल्पाची फार पूर्वीपासून गरज आहे. महाराष्ट्राच्या अरबी समुद्र किनाऱ्यावरील वाढवण बंदर हे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात प्रगत बंदर बनणार आहे, जे महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्राला पुन्हा आकार देण्याचे आणि जागतिक स्तरावर भारताची सागरी बलस्थान होण्याचे वचन देते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या नेतृत्वाखालील हा महत्त्वाकांक्षी उपक्रम, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासासाठी मजबूत राजकीय बांधिलकी अधोरेखित करतो.
भारतीय सागरी पायाभूत सुविधांमध्ये गेम चेंजर
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ स्थित, वाढवण बंदरात 23 दशलक्ष TEUs (ट्वेंटी-फूट समतुल्य युनिट्स) हाताळण्याचा अंदाज आहे आणि त्याची किंमत 76,220 कोटी रुपये असेल असा अंदाज आहे. भारताची डीप-ड्राफ्ट बंदर तूट भरून काढत आणि शेजारील देशांमधील महागड्या जहाज वाहतुकीचे (ट्रान्सशिपमेंट हब) अवलंबित्व संपवून 2040 पर्यंत जगातील शीर्ष 10 कंटेनर बंदरांपैकी एक होण्यासाठी हे स्थान आहे. अति-मोठ्या कंटेनर जहाजांच्या थेट डॉकिंगला परवानगी देऊन, वाढवण बंदर भारतीय व्यापार सुलभ करेल, निर्यात कार्यक्षमता वाढवेल आणि लॉजिस्टिक खर्च कमी करेल, यामुळे स्थानिक उद्योग आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला फायदा होईल.
फडणवीस आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने हा ऐतिहासिक प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) आणि महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड (MMB) यांनी स्थापन केलेले वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड (VPPL), एक विशेष उद्देश वाहन (SPV) ची निर्मिती केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील एक अनोखे सहकार्य दर्शवते. ही भागीदारी भारताच्या बंदर विकासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे, यातून महाराष्ट्रात प्रभावी पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्याचा महायुती सरकारचा निर्धार दिसून येतो.
धोरणात्मक स्थान आणि कनेक्टिव्हिटीचा फायदा
वाढवण बंदराचे एक सामर्थ्य त्याच्या मोक्याच्या ठिकाणी आहे. डेडिकेटेड रेल फ्रेट कॉरिडॉरपासून फक्त 12 किमी आणि मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेपासून 22 किमी अंतरावर स्थित, हे महाराष्ट्र, गुजरात आणि त्यापलीकडे औद्योगिक केंद्रांशी अखंडपणे जोडते. हे पोझिशनिंग मालाची कार्यक्षम हालचाल, वेळेची बचत आणि किफायतशीर लॉजिस्टिक सोल्यूशन्स सक्षम करते, यामुळे पोर्टचे दळणवळण आणि व्यापार केंद्र म्हणून आकर्षण वाढते.
महत्त्वाच्या भूसंपादनाची आवश्यकता असलेल्या इतर बंदरांच्या विपरीत, वाढवण बंदर मुख्यतः किनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रात वसलेले असून विकास योजनेसह किनाऱ्यावरील व्यत्यय कमी करते. प्रकल्पाच्या ऑफशोअर ऑपरेशन्समध्ये 1,473 हेक्टरचा समावेश आहे. रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी केवळ 571 हेक्टर सरकारी आणि खाजगी जमिनीची आवश्यकता आहे.
पश्चिम महाराष्ट्रासाठी आर्थिक परिवर्तन
वाढवण बंदराची आर्थिक क्षमता पालघरच्या पलीकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पसरलेली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात पसरलेल्या विस्तीर्ण अंतराळ प्रदेशाची पूर्तता करण्याच्या क्षमतेसह, वाढवण हे एक महत्त्वपूर्ण आर्थिक केंद्र बनले आहे. हे स्थानिक व्यवसायांना चालना देईल, गुंतवणूक आकर्षित करेल आणि राष्ट्रीय आणि जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राला महत्वाचा स्पर्धक म्हणून नवा चेहरा देईल.
शाश्वतता आणि पर्यावरणीय वचनबद्धता
वाढवण बंदराची पर्यावरणीय शाश्वतता हा महायुती सरकारसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्राची समृद्ध किनारपट्टी अन् जैवविविधता लक्षात घेता, प्रकल्पामध्ये कार्गो हाताळणीतील स्वच्छ तंत्रज्ञान, ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली आणि वाढवणच्या स्थानावरील नैसर्गिक खोलीमुळे कमी झालेले ड्रेजिंग यासारख्या पर्यावरणपूरक पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे बंदरामुळे पर्यावरणीय ऱ्हास कमी होतो, आर्थिक प्रगती कायम ठेवत सागरी परिसंस्थेचे रक्षण होते.
बंदराच्या डिझाइनमध्ये किनारपट्टीवरील धूप विरूद्ध लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी ऑफशोअर ब्रेकवॉटर, कार्यक्षम ड्रेजिंग आणि पुनर्प्राप्ती प्रक्रिया आणि नाविन्यपूर्ण किनाऱ्यावरील संरक्षण उपायांचा देखील समावेश आहे. खारफुटीचे संवर्धन, सागरी जीवसृष्टीचे संरक्षण आणि अधिवास जतन करण्याच्या प्रयत्नांमुळे विकासाचा संतुलित दृष्टिकोन दिसून येतो, जो शाश्वत प्रगतीसाठी महायुती सरकारच्या वचनबद्धतेवर भर देतो.
महाराष्ट्र आणि भारतासाठी एक दूरदर्शी पाऊल
इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉर (INSTC) आणि इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC) सारख्या जागतिक व्यापार मार्गांचे प्रवेशद्वार म्हणून वाढवणला स्थान देऊन, महायुती सरकार महाराष्ट्राला जागतिक सागरी अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख केंद्र बनवत आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देणारी दीर्घकालीन वाढ, आर्थिक सर्वसमावेशकता आणि विकासाची दृष्टी प्रतिबिंबित करतो.
व्यापार आणि पायाभूत सुविधांच्या क्षमतेच्या नवीन युगाकडे भारत वाटचाल करत असताना, वाढवण बंदर हे महायुती सरकारच्या प्रादेशिक विकास आणि आर्थिक नेतृत्वाच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे, यामुळे महाराष्ट्र आणि भारत विकसित होत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला हव्या असलेल्या गोष्टींसाठी सज्ज आहेत.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनशिवाय माणसाच्या दिवसाची सुरुवात देखील होत नाही. हा स्मार्टफोन खरेदी करताना वेगवेगळ्या गोष्टींची चौकशी केली जाते. आणि त्यानंतरच खात्री पटल्यावर आपण हा फोन विकत घेतला आज घेतो. आजकाल स्मार्टफोनमध्ये फ्लॅट स्क्रीन फोन आणि कर्व्ड स्क्रीन डिस्प्ले असलेला फोन उपलब्ध आहे. परंतु यापैकी कोणता फोन खरेदीसाठी चांगला आहे. असा प्रश्न अनेकांना पडतो. तर आज आम्ही तुम्हाला यात दोन्ही मॉडेल्सचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला फोन खरेदी करतांना याचा वापर होईल.
आजकाल लोकांना स्टायलिश फोन हवा असतो. त्यामुळे अनेक कंपन्या देखील आणि स्टायलिश लुक असलेले फोन बनवत आहे. मार्केटमध्ये कर्व्ड डिस्प्ले फोन आणि फ्लॅट डिस्प्ले फोन देखील बाजारात उपलब्ध आहेत. परंतु अनेकांना प्रश्न पडतो की फ्लॅट स्क्रीन वाला मोबाइल घ्यावा की, कर्व्ड स्क्रीन वाला मोबाइल घ्यावा? आता त्याचे फायदे तोटे जाणून घेणार आहोत
फ्लॅट स्क्रीन फोनचे फायदे आणि तोटे
या फ्लॅट डिस्प्ले स्क्रीनवर टेम्पल ग्लास लावणे खूप सोपे आहे आणि सुरक्षित देखील आहे.
यामुळे तुमच्या स्क्रीनवर बबल येण्याची शक्यता जास्त आहे.
फ्लॅट डिस्प्ले असलेले फोन हे कर्व्ड डिस्प्ले असलेल्या फोन पेक्षा स्वस्त असतात.
फ्लॅट डिस्प्ले स्क्रीनवर व्हिडिओ पाहण्याचा अनुभव जास्त चांगला येत नाही.
कर्व्ड स्क्रीन डिस्प्लेचे फायदे तोटे
कर्व्ड डिस्प्ले असलेले फोन दिसायला खूपच आकर्षक दिसतात.
या मोबाईलवर व्हिडिओ पाहण्याचा अनुभव खूप चांगला असतो.
कर्व्ड डिस्प्ले असलेले फोन हे सामान्यतः फ्लॅट डिस्प्ले असलेल्या फोन पेक्षा महाग असतात.
टेम्पल ग्लास कर्व्ड डिस्प्लेवर लावणे तुलनेने अवघड असते
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण घरात महिनाभर कितीही वीज वापरतो पण महिना संपल्यानंतर जेव्हा आपल्या घरी लाईट बिल येते. तेव्हा मात्र आपल्याला मोठा धक्का बसतो की, एवढं बिल कसं काय आलं? अनेक लोकांचे असे म्हणणे असते की, आम्ही लाईटचा वापर खूपच कमी करतो. दिवसभर घरी देखील कोण नसतं. तरी देखील आम्हाला दर महिन्याला एवढं लाईट बिल कसे येते? परंतु अनेक वेळा तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला एवढ्या जास्त प्रमाणात लाईट बिल येत असते. तुम्ही लाईट बाबत अशा अनेक चुका करत असता.ज्यामुळे तुमचं लाईट बिल हे जास्त येते. आता या चुका नक्की कोणत्या आहेत? आणि त्या चुका जर तुम्ही केल्या नाही, तर तुम्हाला लाईट बिल कसे कमी येणार आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
आपण घरात अनेक इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी वापरतो. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे काम झाल्यावर तुम्ही त्याची वायर काढून स्विच बंद करून ठेवत जा. अनेकवेळा आपण इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे चालू ठेवत असतो. त्यामुळे तुमचे बीज जोल जास्त येऊ शकते. आपल्याला असे वाटते की, आपण लाईटचा वापर जास्त केला नाही. परंतु आपल्या अनावधानाने आपण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या स्वरूपात या लाईटचा वापर करत असतो. त्यामुळे तुमचे वीजबिल जास्त असते.
आपला मोबाईल चार्ज करण्यासाठी आपण दररोज लाईटचा वापर करतो. आपला मोबाईल चार्ज झाल्यानंतर आपण मोबाईलची पिन काढतो. पण अनेक वेळा आपण बटन बंद करायला विसरतो. आणि यामुळेच आपले लाईट बिल जास्त येते. आपल्या घरी अशी अनेक बटणे असतात. जी विनाकारण सुरू असतात. त्यामुळे ही बटन तुम्ही बंद करत जा. तुम्ही जर विनाकारण बटन चालू ठेवले, तरी देखील तुमचे वीज बिल जास्त येऊ शकते. अनेक चार्जरने अगदी फास्ट चार्जिंग होती. परंतु जेव्हा एखादा चार्जर फास्ट चार्जिंग करतो. त्यावेळी वीज देखील जास्त प्रमाणात वापरली जाते.
ज्यावेळेस स्विचला तुमचा चार्जर जोडलेला असतो. आणि बटन चालू असते. त्यावेळी त्यातून विजेचा प्रवाह चालू असतो. यामुळे तुमच्या वीज बिळात देखील वाढ होत असते. मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला 0.1 ते 0.4 युनिट्स वीज लागू शकते. त्यामुळे जर तुम्ही कोणतेही स्विच वापरत नसाल, तर ते बंद करून ठेवा. तसेच छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचे आहे. तरच तुम्हाला वीज बिल कमी येईल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रोहित दुसऱ्यांदा पिता बनल्याचा माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. त्याची पत्नी रितिका सजदेहने एका मुलाला जन्म दिला आहे. चाहत्यांनी रोहित आणि रितिकाबद्दल सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, अजून रोहित किंवा रितिका यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठी विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडू ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. पण रोहित अजून गेलेला नाही. रोहितने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे रजेची विनंती केल्याची बातमी होती. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की रितिकाने मुलाला जन्म दिला आहे. मात्र रोहितने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
Rohit Sharma and Ritika have been blessed with a baby boy. 👦
रोहित आणि रितिका यांचे 2025मध्ये लग्न झाले होते. डिसेंबर 2018 मध्ये रितिकाने एका मुलीला जन्म दिला. मुलीचे नाव समायरा. रोहित आणि रितिका यांची लव्हस्टोरी ही खूप रंजक आहे. हाती आलेल्या माहितीनुसार रितिका याआधी रोहितची मॅनेजर होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. रोहित आणि रितिका यांनी नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. सर्व काही ठीक झाले तर रोहित या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचू शकतो.
भारतीय रेल्वेने दररोज करोडो लोक प्रवास करतात. करोडो लोक रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या अपेक्षित स्थानी पोहोचतात. रेल्वे सेवेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. अनेक लोक रेल्वेवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत रेल्वेही आपल्या प्रवाशांच्या सोयीची काळजी घेते आणि प्रवाशांच्या सोयीनुसार अनेक बदल करत असते. या संदर्भात भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या नवीन नियमांबद्दल जाणून घेऊया.
तत्काळ तिकीट म्हणजे काय?
तत्काळ तिकीट हे तिकीट आहे जे प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी बुक केले जाते. ज्या प्रवाशांना अचानक प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. तात्काळ तिकिटे अल्प सूचनेवर उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहे. तत्काळ तिकिटे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहेत. नव्या नियमानुसार आता प्रवाशांना तत्काळ तिकिटांसाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे.
नवीन नियमांमध्ये काय बदल?
नवीन नियमांमध्ये बदल केल्यानंतर, तत्काळ तिकीट शुल्क आता काही श्रेणींमध्ये वाढवण्यात आले आहे. बुकिंगची वेळ आगाऊ ठरवलेली असते. तसेच रिफंडच्या अटींमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमानुसार, तत्काळ तिकिटांची बुकिंगची वेळ एसी क्लाससाठी सकाळी 10 आणि स्लीपर क्लाससाठी 11 वाजता निश्चित करण्यात आली आहे. एका युजर आयडीवरून एका महिन्यात जास्तीत जास्त 6 तिकिटांसाठी, आधार वापरकर्त्यांसाठी 12 तत्काळ तिकिटांपर्यंत बुकिंग मर्यादा मर्यादित करण्यात आली आहे.
रिफंड साठी अटी
रिफंड बद्दल बोलायचे झाल्यास, तत्काळ तिकिटात कोणताही परतावा मिळत नाही, जरी काही विशेष परिस्थितींमध्ये परतावा शक्य आहे. जसे ट्रेन रद्द झाल्यास पूर्ण परतावा दिला जातो किंवा ट्रेन उशिराने धावल्यास काही अटींसह परतावा दिला जातो. तत्काळ तिकिटात, प्रवाशांचे तपशील भरण्यासाठी २५ सेकंदांचा वेळ, कॅप्चा भरण्यासाठी ५ सेकंद, पेमेंटसाठी १० सेकंदांचा वेळ, ज्यामध्ये OTP देखील आवश्यक आहे.
तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया
तत्काळ तिकिटासाठी, प्रथम IRCTC वेबसाइटवर जा किंवा ॲप डाउनलोड करा. “बुक ट्रेन तिकीट” पर्यायावर क्लिक करा.
तुमची प्रवास तारीख आणि वर्ग निवडा. उपलब्ध गाड्यांच्या सूचीमधून तुमची ट्रेन आणि वर्ग निवडा.
सर्व आवश्यक प्रवासी तपशील भरा.
तुमची लॉगिन माहिती भरा.
पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा आणि आरक्षण पुष्टीकरण प्राप्त करा.
तुम्हाला तत्काळ तिकीट ऑफलाइन मिळवायचे असेल तर रेल्वे स्टेशनवर जा.