Monday, December 29, 2025
Home Blog Page 380

Thyroid | थायरॉईड कशामुळे होतो? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Thyroid

Thyroid | आजकाल थायरॉईडची समस्या अनेक लोकांना झालेली आहे. थायरॉईड आपल्या घशात असणारी एक लहान ग्रंथी आहे. यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया नीट होत असते. जेव्हा हे थायरॉईड योग्यरीत्या काम करत नाही. त्यावेळी आपल्याला आरोग्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. परंतु हे थायरॉईड नक्की कशामुळे होते? याची कारण काय आहे? तसेच थायरॉईड पासून बचाव करण्यासाठी कोणत्या सवयींचा अवलंब केला पाहिजे? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

थायरॉइड होण्याची कारणे | Thyroid

थायरॉईड ही अत्यंत सामान्य समस्या आहे. अनेक कारणांमुळे अनेक लोकांनाही समस्या उद्भवते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या हार्मोनल इनबॅलन्स झाले, तरी थायरॉईडचा प्रॉब्लेम निर्माण होतो. ज्यावेळी थायरॉईड ग्रंथी पुरेशी संप्रेरके तयार करत नाही. किंवा खूप जास्त तयार करत नाही. त्यावेळी यासारख्या समस्या निर्माण होतात. आयोडीनची कमतरता असल्याने देखील थायरॉईडची समस्या निर्माण होते. कारण थायरॉईड तयार करण्यासाठी आयोडीन खूप महत्त्वाचे असते.

आनुवंशिकतेमुळे देखील थायरॉईडची (Thyroid) समस्या निर्माण होते. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला थायरॉईडची समस्या असेल, तर तीच समस्या इतर लोकांना होण्याची देखील शक्यता असते. तसेच जर तुम्ही जास्त ताण घेतला त्याचप्रमाणे तुमची जीवनशैली खराब असेल, तरी देखील थायरॉईडच्या समस्येला तुम्ही सामोरे जावे लागते. आता आपण जाणून घेऊयात की, थायरॉईड पासून बचाव करण्याचे उपाय काय आहेत?

खाण्याच्या सवयी | Thyroid

तुम्ही तुमचा आहार नीट घेतला पाहिजे. तुमच्या जेवणामध्ये हिरव्या भाज्या असल्या पाहिजेत. तसेच फळे, पालक, कोबी यांसारख्या हिरव्या भाज्या खाल्ल्याने देखील थायरॉईडचे संतुलन राहते. तसेच तुम्ही ओट्स, तांदूळ, ज्वारी यासारखे संपूर्ण धान्य खाल्ले पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला थायरॉईड होणार नाही. तसेच थायरॉईडसाठी आयोडीन आवश्यक असते. त्यामुळे मीठयुक्त पदार्थ खाणे देखील गरजेचे आहे.

नियमित व्यायाम करणे

थायरॉईड पासून बचाव करण्यासाठी नियमित योग आणि प्राणायाम करणे खूप गरजेचे असते. यासाठी दररोज वीस मिनिट तरी व्यायाम करा. तसेच रोज सकाळी की आणि संध्याकाळी चालायला जा. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि तुमची चयापचय आहे प्रक्रिया सुधारते.

औषधांचा वापर

तुम्हाला जर थायरॉईड झाला किंवा इतर कोणताही आजार झाला तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्या. डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्या. आणि योग्य ते पालन करा. तसेच डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेणे आणि योग्य डोस घेणे.

ताणतणाव कमी घेणे

आजकाल लोकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ताण-तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यासाठी दररोज ध्यान आणि योगा करणे खूप गरजेचे आहे. यामुळे मानसिक शांती मिळते. आणि तणाव कमी होतो आणि मन शांत असले की, थायरॉइड ग्रंथी देखील निरोगी राहतात.

पुरेशी झोप घ्या

दररोज सात ते आठ तासांची झोप घेणे खूप गरजेचे असते. या झोपेमुळे शरीरात तंदुरुस्त राहते. आणि थायरॉईड ग्रंथी देखील निरोगी राहतात. तुमच्या झोपण्याच्या आणि उठण्याची वेळ एकच ठेवा. यामुळे बॉडी क्लॉक काम करते.

भरपूर पाणी प्या

तुमच्या शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पुरेशी पाणी पिणे खूप गरजेचे असते. तसेच जर तुम्ही कोमट पाणी पिले तर थायरॉईड ग्रंथांना आराम मिळतो. आणि तुमची चयापचय प्रक्रिया देखील सुधारते त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी प्या

Viral Video | कोल्हापुरात रात्रीच्या अंधारात फिरते 8 फूट उंचीची महिला; व्हायरल व्हिडीओने भरली धडकी

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे. जिथे आपण घरबसल्या जगभरातील संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतो. जगभरातील अनेक माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असते. आणि व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ (Viral Video) हे कामाचे असतात, तर काही व्हिडिओ हे केवळ मनोरंजन करतात. आपण अनेक वेळा भूतांचे तसेच हॉरर व्हिडिओ पाहत असतो. आपल्याला हे ऐकताना कितीही हसायला आले,तरी हे व्हिडिओज पाहताना मात्र आपल्याला खूपच भीती वाटते. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपण अनेक भूतांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहिलेले आहे. असाच काहीसा प्रकार कोल्हापूरमध्ये घडलेला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) आपण पाहू शकतो की, कोल्हापूरमध्ये आठ फूट उंच महिलेची दहशत आहे. तेथील नागरिकांकडून देखील आपल्याला याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे कोल्हापूर मधील साने गुरुजी या वस्तीत देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने इतर नागरिकांना देखील खूपच भीती वाटत आहे.

कोल्हापूर मध्ये गेल्या काही दिवसांपासून एक आठ फूट उंचीच्या महिलेची दहशत असलेली पाहायला मिळत आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आठ फूट उंच असणाऱ्या एका महिलेचा भूत प्रेत असल्याची अफवा पसरत आहे. परंतु एखादी जिवंत व्यक्ती असे सोंग घेऊन लोकांना घाबरवत आहे,ही माहिती समोर आलेली नाही. परंतु ही घटना सीसीटीव्हीच्या कॅमेरामध्ये कैद झालेली आहे. रात्रीच्या अंधारात फिरणारी ही महिला दिवसा मात्र गायब होते. सध्या पोलिसांकडून देखील या घटनेचा शोध चालू झालेला आहे. रात्रीच्या अंधारात 8 फूट उंच फिरणारे हे भूत प्रेत आहे की एखादी खरी महिला आहे. याबाबत शोध चालू झालेला आहे.

शरद पवार गटातील अशोक पवारांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

Ashok Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि या काळामध्ये सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. काही नेत्यांकडे काही रक्कम सापडत आहे. तर अनेक घडामोडी राज्यातील राजकारणात घडताना दिसत आहेत. अशातच आता शिरूर मतदार संघात एक वेगळाच प्रकार समोर आलेला आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आलेले आहे. त्याचे अपहरण करून त्या मुलाचा एका बाई सोबतचा अश्लील व्हिडिओ काढण्यात आलेला आहे. आणि हा व्हिडिओ अशोक पवार यांना दाखवून त्यांना ब्लॅकमेल केले जात असून त्यांच्याकडे दहा कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. 10 कोटी रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल करू. अशी धमकी अजित पवार गटातील उमेदवाराला दिली जात आहे. याबद्दलची माहिती वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे.

असीम सरोदे यांची 9 नोव्हेंबर रोजी ही पत्रकार परिषद झाली. त्यावेळी हा सगळा प्रकार सांगितला आहे. ऋषिकेश पवार हा अशोक पवार यांच्या प्रचारात व्यस्त होता. यादरम्यान त्याच्या एका सहकाऱ्याने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ऋषीराज या भेटीसाठी तयार देखील झाला. कोलपेबरोबर तो मांडवगण फाट्या जवळील एका गावात गेला. त्या ठिकाणी पोचल्यानंतर कोलपेने त्याला जबरदस्तीने एका रूममध्ये कोंडले. आणि बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर ऋषीराजच्या अंगावरील कपडे काढण्यात आले. आणि एका महिलेला बोलून त्याच्यासोबत अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला. ऋषिराजने या सगळ्याला विरोध केला. तेव्हा त्याला जीव मारण्याची धमकी देण्यात आली. आणि या सगळ्या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यात आले.

हा सगळा प्रकार करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे? असे विचारले त्यावेळी त्या लोकांनी यांनी सांगितले की, यासाठी पुण्यातील एका व्यक्तीने आम्हाला दहा कोटी रुपये देण्याची तयारी केली आहे. त्यानंतर ऋषिराजने लोकांना मी तुम्हाला भरपूर पैसे देईल असे सांगितले. आणि जवळच्याच गावात माझा मित्र राहतो. त्याच्याकडे जाऊन पैसे घेऊ असे सांगितले. त्या गावात गेल्यानंतर आरोपीची नजर चुकवून ऋषीराजने मोबाईलवरून मेसेजच्या माध्यमातून त्याच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधाला. त्यांनी कोलपेसह दोघांना ताब्यात घेतलेले आहे. या प्रकरणात ऋषीराजने तक्रारी केली.आणि शिरूर पोलीस स्टेशनमध्ये कोलपे बरोबर अन्य दोन व्यक्तींना आणि त्या महिलेला अटक करण्यात आले आहेत. आणि त्यांच्याविरोधी तक्रार देखील दाखल करण्यात आलेला आहे.

संपूर्ण घटनेबाबत अशोक पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “माझा मुलगा ऋषीराज बरोबर जे काही घडलं ते संताप जनक आहे. ,या घटनेमुळे माझ्यावर परिणाम झाला आहे. निवडणूक लढताना ती लोकशाही मार्गने लढा, नये पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून यामागील खऱ्या आरोपीला अटक करावी.”

स्वस्तात करा माता वैष्णवदेवीचे दर्शन ! पहा काय आहेत पर्याय, किती येतो खर्च

mata vaishovdevi

दरवर्षी लाखो भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जातात. जर तुम्हालाही वैष्णोदेवीच्या दर्शनाला जायचे असेल तर तुम्हाला किती किंमत मोजावी लागेल ? भारतात अनेक हिंदू तीर्थक्षेत्रे आहेत जिथे दरवर्षी कोट्यवधी भाविक भेट देतात. यामध्ये देशातील विविध राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. तिरुपती बालाजी दक्षिण भारतात सर्वात प्रसिद्ध आहे. उत्तर भारतातील माता वैष्णो देवी.

दरवर्षी लाखो भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जातात. गेल्या वर्षी हा आकडा एक कोटीच्या आसपास पोहोचला होता, तर 93.50 लाख भाविकांनी माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते. तुम्हालाही जाऊन वैष्णोदेवीचे दर्शन घ्यायचे असेल, तर नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी सर्वार्थाने चांगला ठरू शकतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या कारने माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी देखील जाऊ शकता. यासाठी तुम्हाला दिल्लीहून NH 44 आणि NH 1A मार्गे जावे लागेल.

12 किलोमीटरचा पायी मार्ग

वाटेत तुम्हाला कर्नाल, लुधियाना, पठाणकोट आणि जम्मू सारखी शहरे भेटतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वाटेत चंदीगड किंवा लुधियाना येथेही थांबू शकता. माता वैष्णोदेवीसाठी दिल्लीपासूनचे अंतर 650 किलोमीटर आहे. यानंतर कटरा बेस कॅम्प ते माता वैष्णो देवी भवन असा 12 किलोमीटरचा पायी मार्ग आहे.

सार्वजनिक वाहतूक बस

जर तुम्हाला सार्वजनिक वाहतूक बसने जायचे असेल तर तुम्ही दिल्ली ते जम्मू कटरा उधमपूर बस पकडू शकता किंवा तुम्ही खाजगी कॅब देखील बुक करू शकता. तुम्हाला बसने कटरा येथे नेण्यासाठी तिकीट 1400 रुपये लागेल.

IRCTC द्वारे रेल्वेने जायचे असल्यास

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही IRCTC द्वारे रेल्वे तिकीट देखील बुक करू शकता. यासाठी तुम्ही नवी दिल्लीहून सकाळी 6 वाजता वंदे भारत एक्सप्रेस पकडू शकता. जे तुम्हाला १६६५ रुपयांमध्ये श्री वैष्णोदेवी कटरा स्टेशनवर घेऊन जाईल.

खाजगी कॅब बुक केल्यास

जर तुम्ही खाजगी कॅब बुक केली तर मग तुम्हाला 5500 ते 6500 रुपयांपर्यंत भाडे द्यावे लागेल. यासह, तुम्हाला निवास आणि भोजनासाठी पैसे द्यावे लागतील, जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह आलात तर तुम्हाला वैष्णोदेवीच्या प्रवासासाठी 10,000 रुपये खर्च करावे लागतील.

रजाई-ब्लँकेट पाण्याने न धुता मिनिटांत करा स्वच्छ ; वापरा ‘या’ घरगुती सोप्या ट्रिक्स

cleaning hacks

हिवाळा सुरु झाला आहे. वातावरणात दिवसा उष्मा आणि रात्री थंडी जाणवत आहे. अशा स्थितीत घरी ब्लँकेट आणि रजाई दिसू लागली आहे. पण रजाई किंवा घोंगडी जास्त वेळ तशीच ठेवल्याने काही वेळा त्यांना दुर्गंधी येऊ लागते. त्याचबरोबर सततच्या वापरामुळे ते घाणही होतात. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि हे जड कपडे पाण्याने धुणे टाळायचे असेल तर तुमही काही भन्नाट ट्रिक्स वापरू शकता.

रजाई आणि ब्लँकेट्स स्वच्छ करणे म्हणजे ते पाण्यात भिजले की त्यांना बाहेर काढणे, पसरवणे आणि वाळवणे डोकेदुखी बनते. तुम्ही तुमची ब्लँकेट-रजाई काही मिनिटांत पाण्याशिवाय स्वच्छ करू शकता कशी ? चला जाणून घेऊया …

बेकिंग सोडा

जर तुमची रजाई घाण आणि दुर्गंधीयुक्त झाली असेल तर बेकिंग सोडा वापरा. सर्व प्रथम बेकिंग सोडा शिंपडा आणि 20-30 मिनिटे तसेच सोडा आणि नंतर त्यावर व्हॅक्यूम क्लिनर चालवून रजाई स्वच्छ करा. यामुळे रजाईतील ओलावा निघून जाईल आणि दुर्गंधी देखील टाळता येईल.

ओले कापड

जर तुमच्या रजाईवर काही डाग किंवा घाण असेल तर ओल्या कपड्याने रजाई स्वच्छ करा. यासाठी सुती कापड ओले करून ते पिळून त्यावर रजाई चोळा. यामुळे रजाईवरील घाण निघून जाईल आणि तुमची रजाई न धुता स्वच्छ आणि फ्रेश दिसेल.

फॅब्रिक फ्रेशनर

जर तुमच्या ब्लँकेट किंवा रजाईमध्ये दुर्गंधी येत असेल तर फॅब्रिक फ्रेशनरची मदत घ्या. रजाई नीट धुवा, त्यामुळे रजाईमध्ये असलेली घाण निघून जाईल. यानंतर, रजाईवर फॅब्रिक फ्रेशनर वापरा जेणेकरून रजाई फ्रेश आणि सुगंधित होईल.

उन्हात वाळवा

रजाई मधील दुर्गंधी दूर करण्यासाठी सूर्यप्रकाशात ठेवा. उन्हात ठेवल्याने रजाईलाही उबदारपणा येतो. रजईला काही तास उन्हात ठेवल्यानंतर रजईला काठीने मारून धूळ काढा. असे केल्याने रजाई धूळ आणि वासमुक्त होते.

झाकून ठेवा

ब्लँकेट किंवा रजाई घाण होण्यापासून वाचवण्यासाठी, झाकून ठेवा जेणेकरून रजाई घाण होणार नाही आणि जर कव्हर घाण झाले तर तुम्ही ते काढून टाकू शकता आणि ते सहजपणे धुवू शकता. यामुळे रजाई स्वच्छ आणि ताजी राहील. तसेच तुम्हाला रजाई वारंवार धुण्याची गरज भासणार नाही.

Bank Of Baroda Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

Bank Of Baroda Bharti 2024

Bank Of Baroda Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीचे असतील संधी घेऊन आलेलो आहोत. ज्या अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना त्यांची हक्काची नोकरी मिळणार आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती व्यवस्थापक, एमएसएमई प्रमुख प्रकल्प, व्यवस्थापक व्यवसाय, व्यवस्थापक आणि इतर पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 592 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 19 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत

पदाचे नाव| Bank Of Baroda Bharti 2024

या भरती अंतर्गत व्यवस्थापक एमएसएमई प्रमुख प्रकल्प व्यवस्थापक व्यवसाय व्यवस्थापक आणि इतर पदांचे रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 592 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

19 नोव्हेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदर अर्ज करा

वयोमर्यादा

25 ते 40 वर्ष दरम्यान असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा? | Bank Of Baroda Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 19 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

रात्री झोपण्यापूर्वी खा वेलची; महिन्याभरात शरीरात होतील अद्भुत बदल

Cardamon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले भारतीय मसाले हे खूप लोकप्रिय आहेत. भारतीय मसाल्यांना चांगली चव देखील असल्यास तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे मसाले अत्यंत फायदेशीर असतात. म्हणूनच देश विदेशात देखील भारतीय मसाल्यांची निर्यात केली जाते. त्यातील इलायची हा एक असा मसाला आहे. जो प्रत्येक स्वयंपाक घरात असतो. वेलचीचा वापर चहापासून भाज्या खीर शेवया तसेच विविध गोड पदार्थांमध्ये केला जातो. हा अत्यंत छोटा असणारा सुगंधी मसाला आहे. मसाल्यांमध्ये देखील वेलचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. वेलचीमुळे पदार्थाला चव चांगली येते. तसेच आरोग्यासाठी देखील याचा खूप चांगला फायदा होतो.

वेलचीचा वापर जर तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमधून केला तर तुम्ही निरोगी जीवन जगा. अनेक लोक दुधामध्ये वेलची टाकतात. त्याचप्रमाणे तोंडात देखील धरून वेलची चावत असतात. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. परंतु जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ली तर तुमच्या शरीराला अधिक फायदे होतील.

आज-काल लोकांचा ताण तणाव काम मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे अनेक लोकांना रात्रीची शांत झोप देखील मिळत नाही. आणि रात्री झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशी कामावर त्याचा परिणाम होतो. आणि हे चक्र असेच सुरू राहते. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या आहारात वेलचीचा समावेश केला, तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलची तोंडात टाकून नीट चावून चावून खात्यानंतर त्यावर कोमट पाणी प्या. असे जर तुम्ही नियमित केले तर तुम्हाला रात्रीची लवकर झोप लागेल. आणि दिवसा अत्यंत फ्रेश वाटेल.

त्याचप्रमाणे आज काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. पुरेशी झोप न घेणे तसेच फास्ट फूड खाणे या सगळ्यामुळे आजकाल लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. यात जर तुम्ही वेलचीचे रात्री झोपण्यापूर्वी सेवन केले, तर तुमची चरबी कमी होण्यास खूप मदत होते. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम यांसारखे घटक म्हणून ओळख प्रमाणात आढळतात. त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यासाठी मदत होते.

त्याचप्रमाणे आजकाल अनेक लोकांना त्वचेच्या संबंधित अनेक समस्या वाढलेल्या आहे. तुम्ही जर रात्री वेलचीचे सेवन केले तर तुमच्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमचे कोरडे आणि गळणारे केस यापासून सुटका मिळते. तसेच वेलचीचे सेवन केल्याने तुमची त्वचा आणखी चमकदार होते. तसेच रक्त शुद्ध होते आणि शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे तुमची स्किन देखील अगदी मुलायम होते.

Google Pixel 8 | फ्लिपकार्टवरून निम्म्या किमतीत खरेदी करा Google Pixel 8; जाणून घ्या फीचर्स

Google Pixel 8

Google Pixel 8 | सणासुदीच्या काळात अनेक ई कॉमर्स कंपन्या या त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर घेऊन येत असतात. ज्याचा फायदा ग्राहकांना देखील होतो. या ऑफर्स दिल्याने त्यांच्यासोबत अनेक नवीन ग्राहक देखील जोडले जातात. आणि ग्राहकांचा कंपन्यांवर असला असणारा विश्वास देखील वाढीस लागतो. अशातच आता फ्लिपकार्ट ई-कॉमर्स कंपनीने त्यांचा फ्लिपकार्ट बिग बचत सेल सुरू केलेला आहे. या सेलची सुरुवात 7 नोव्हेंबर पासून झालेली आहे. तर 11 नोव्हेंबरपर्यंत हा सेल लाईव्ह असणार आहे.त्यामुळे तुम्हाला अनेक महागड्या गोष्टी कमी किमतीमध्ये विकत घेता येणार आहे.

या फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्ही महागडे स्मार्टफोन चांगल्या ऑफर सह खरेदी करू शकता. गुगलचा बेस्ट सेलर स्मार्टफोन असणारा Google Pixel 8 हा स्मार्टफोन तुम्हाला निम्म्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. तर आता या Google Pixel 8 ची किंमत फीचर्स आणि इतर सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

Google Pixel 8 ची किंमत

Google Pixel 8 फोन मध्ये तुम्हाला 108 जीबी स्टोरेज व्हेरियंट मॉडेल मिळेल. Google Pixel 8 ची किंमत 75 हजार 999 रुपये एवढी आहे. फ्लिपकार्टवर हा फोन तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध होत आहे. Google Pixel 8 हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला केवळ 42 हजार 999 मध्ये खरेदी करू शकतात. या सेल मध्ये तुम्हाला Google Pixel 8 फोनवर तब्बल 33 हजार रुपयांची सवलत मिळत आहे. त्यामुळे हा फोन जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्ट वर तुमच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे.

Google Pixel 8 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 8 फोनची उंची 6.2 इंच एवढी आहे.यामध्ये full Hd + OLED डी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120 hz एवढा आहे. तसेच स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी Google Pixel 8 या फोनमध्ये तुम्हाला प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेज बद्दल सांगायचे झाले असल्यास या फोनची रॅम 8 जीबी आहे. आणि 128 जीबी आहे. यामध्ये तुम्हाला 256 जीबी स्टोरेजचा पर्याय देखील उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला स्मार्ट इमेज हाय क्वालिटीचे फोटो देखील काढता येतील.

Google Pixel 8 या फोन मध्ये तुम्हाला फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअल कॅमेरा सेटअप करण्यात आलेला आहे. या सेटमध्ये 50 mp प्रायमरी कॅमेरा दिलेला आहे. तसेच दुसरा कॅमेरा मेगा पिक्सेल आहे. यामध्ये तुम्ही चांगल्या सेल्फी व्हिडिओज तसेच कॉलिंगसाठी 10.5 mp कॅमेरा देण्यात आलेला आहे. या फोनच्या बॅटरी बद्दल सांगायचे झाल्यात गुगल पिक्सेल 8 फोनची बॅटरी 4575mAh ची आहे. Pixel 8 ची बॅटरी 24 तासांपेक्षा जास्त आणि एक्स्ट्रीम बॅटरी सेव्हरसह 72 तासांपर्यंत टिकू शकते. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला Google Pixel 8 या फोनवर खूप चांगली ऑफर मिळत आहे.

UPI Payment | इंटरनेटशिवायही करता येणार UPI द्वारे पेमेंट; हे फिचर होणार लॉन्च

UPI Payment

UPI Payment | संपूर्ण भारताचा डिजिटल क्रांती झालेली आहे आणि या डिजिटल क्रांतीमुळे अनेक गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. आर्थिक व्यवहारात देखील डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळेच आपण एका जागेवर बसून मोबाईल द्वारे कोणालाही पैसे पाठवू शकतो. तसेच पैसे मिळवू देखील शकतो. यात यूपीआय पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आजकाल प्रत्येकजण ऑनलाईन पेमेंटसाठी यूपीआयचा वापर करत असतात. तसेच अगदी सहज आणि काही सेकंदातच तुम्हाला आर्थिक व्यवहार करता येतात.

या यूपीआय पेमेंट ॲपमुळे आजकाल कॅशलेस व्यवहार व्हायला लागलेले आहेत. अगदी कमी वेळेत आणि सुरक्षित पद्धतीने आपण आर्थिक व्यवहार करू शकतो. यूपीआय पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने देखील अनेक पावले उचललेली आहे. भारतासोबतच मालदीव, श्रीलंका इतर अनेक देशांमध्ये युपीआय पेमेंटची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. अशातच आता या यूपीआय पेमेंट संबंधित एक अत्यंत महत्त्वाची बातमी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत.

इंटरनेटशिवाय व्यवहार करता येतात | UPI Payment

तुम्ही आता इंटरनेट शिवाय देखील यूपीआय पेमेंट करू शकता. रिझर्व बँक ऑफ इंडियाने यूपीआय 123 पे द्वारे फीचर फोन आणि स्मार्टफोन युजरसाठी एक डिजिटल पेमेंट अधिक सोपे केलेले आहे. आता तुम्ही इंटरनेटशिवाय यूपीआय पेमेंट द्वारे दहा हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार करू शकता.

‘या’ पद्धतीने इंटरनेट शिवाय होते पेमेंट | UPI Payment

इंटर ऍक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स

तुम्ही इंटरनेटिव्ह वाईज रिस्पॉन्सच्या मदतीने व्हॉइस पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला ठराविक आयव्हीआर नंबरवर कॉल करावा लागेल. आणि त्या नंतर तुम्ही तुमच्या कीपॅड मधून योग्य पर्याय निवडून पेमेंट करू शकता.

प्रॉक्सिमिटी साउंड बेस पेमेंट

या अंतर्गत तुम्ही तुमच्या फोनच्या जवळच्या डिवाइस वरून येणाऱ्या स्पेशल टोन द्वारे पेमेंट करू शकता. या डिवाइसवर तुम्हाला तुमचा फोन टॅप करून पैसे देता येतात.

मिस कॉल

आता युजर मिस कॉलच्या माध्यमातून देखील पैसे टाकू शकतात
यासाठी तुम्हाला एक नंबरवर कॉल करावा लागेल. यानंतर तुम्हाला कॉल येईल आणि कॉलमध्ये तुम्ही तुमचा यूपीआय पिन टाकून ट्रांजेक्शन करू शकता.

फोन द्वारे पेमेंट |UPI Payment

सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या फोन द्वारे ॲप द्वारे यूपीआय पेमेंट करू शकता. तुम्ही इंटरनेट शिवाय देखील हे पेमेंट करू शकता.

Birth And Death Registration | घरबसल्या काढू शकता जन्म आणि मृत्यूचा दाखला; वाचा संपूर्ण प्रोसेस

Birth And Death Registration

Birth And Death Registration | जन्म आणि मृत्यूचा दाखला आपल्याकडे असणे. हा प्रत्येक नागरिकांचे प्रमुख कागदपत्र आहे. या कागदपत्राची नोंदणी सरकार दरबारी देखील होत असते. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. ज्यावेळी जन्म प्रमाणपत्र काढले जाते त्यावेळी त्या नागरिकाचे जन्माची नोंद केली जाते. या प्रमाणपत्रात व्यक्तीचे संपूर्ण नाव, जन्म तारीख, जन्मस्थान, बायोलॉजी कल माता-पितांचे नाव या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. कागदपत्रांवरून व्यक्तीची ओळख वय किती आहे? या सगळ्यांची माहिती मिळते. त्यामुळे जन्म प्रमाणपत्र काढणे खूप गरजेचे असते. या प्रमाणपत्राचे इतर अनेक महत्त्व देखील आहे. राष्ट्रीय आणि स्थानिक जनसंख्या आरोग्य नियोजनाच्या रेकॉर्डमध्ये याची माहिती दिली जाते. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होते त्यावेळी मृत्यूची नोंद देखील केली जाते.

महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र कसे काढावे? | Birth And Death Registration

  • तुम्हाला जर जन्म आणि मृत्यूचा दाखला काढायचा असेल किंवा नोंदणी करायची असेल तर तुम्ही या वेबसाईटला भेट द्या.
  • https://www.urban.maharashtra.gov.in/
  • त्यानंतर तुम्हाला जन्म प्रमाणपत्र नोंदणी या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • तुम्ही जर नवीन यूजर असाल तर तुम्हाला नोंदणी करून आधीची नोंदणीकृत असल्यास लॉगिन लॉगिन करायचे आहे.
  • त्यानंतर सगळी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची फी भरायची आहे आणि सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि पावती मिळेल.
  • त्यानंतर 15 दिवसांच्या आत तुमचे जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होईल.
  • हे तुम्ही डाउनलोड करून प्रिंट देखील होऊ शकता.

ऑफलाइन नोंदणी पद्धत

  • तुम्हाला जर ऑफलाइन पद्धतीने तुमचा जन्माची नोंद करायची असेल तुम्हाला तुमच्याजवळील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयात जावे लागेल.
  • त्यानंतर ते जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करा आणि आवश्यक असणारी सगळी माहिती द्या.
  • त्यानंतर तुमची फी भरा आणि तुमचा अर्ज जमा करा.
  • 7 ते 15 दिवसांमध्ये तुमचे प्रमाणपत्र तयार होईल आणि तुम्ही ते कार्यालयातून जमा करू शकता.

आवश्यक कागदपत्रे

  • हॉस्पिटल डिस्चार्ज सारांश
  • पालकांचे विवाह प्रमाणपत्र
  • पालकांचे आधार कार्ड
  • पत्ता पुरावा (जसे की वीज बिल, रेशन कार्ड)
  • जन्म घेणाऱ्या मुलाचा / मुलीचा फोटो
  • तुम्ही MahaGov Seva Kendra द्वारे देखील प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता.