Monday, December 29, 2025
Home Blog Page 381

ES खरेदीची घाई नकोच ! 27 नोव्हेंबरला येणार आहे Honda एक्टिवा इलेक्ट्रिक ,TVS iQube ला देणार टक्कर

honda activa es

Honda Motorcycle and Scooter India ने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. Honda च्या नवीन EV ची भारतात खूप दिवसांपासून प्रतिक्षा होती. सूत्रानुसार, Honda ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 27 नोव्हेंबरला लॉन्च होणार आहे. पण नवीन स्कूटर फक्त Activa असेल की नवीन स्कूटर येईल हे कंपनीने अजून सांगितलेले नाही. पण हे देखील लवकरच उघड होईल. होंडाकडून मीडिया निमंत्रण जारी करण्यात आले आहे. चला या नवीन स्कूटरबद्दल जाणून घेऊया आणि त्याची रेंज आणि किंमत देखील जाणून घेऊया…

Honda Activa इलेक्ट्रिक होऊ शकते लॉन्च !

आम्ही तुम्हाला सांगितले की नवीन इलेक्ट्रिक स्कूटर कोणत्या नावाखाली येईल याची माहिती Honda ने अद्याप दिलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्स आणि सूत्रांवर विश्वास ठेवला तर, नवीन स्कूटर Activa EV असेल. परंतु हे पूर्णपणे नवीन डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह येईल. सध्याच्या पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत, ती अधिक प्रगत आणि उच्च तंत्रज्ञान वैशिष्ट्यांसह येईल. गेल्या वर्षी होंडाने इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये दोन नवीन उत्पादने लॉन्च केल्याची माहिती देण्यात आली होती. यातील एक वाहन फिक्स बॅटरी आणि दुसरे काढता येण्याजोग्या बॅटरीसह आणल्याची माहिती मिळाली. पण भारतात लाँच होणारी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर फिक्स्ड बॅटरीने सुसज्ज असेल असा विश्वास आहे. तर काही काळानंतर काढता येण्याजोग्या बॅटरीसह स्कूटर लॉन्च केली जाऊ शकते.

अलीकडे, Honda ने त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर EICMA 2024 मध्ये सादर केली आहे. होंडाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरला पॉवर करण्यासाठी दोन काढता येण्याजोग्या बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. पूर्ण चार्ज केल्यावर 70 किलोमीटरची रेंज देईल असा कंपनीचा दावा आहे. या मॉडेलची संकल्पना गेल्या वर्षी टोकियो मोटर शोमध्येही दाखवण्यात आली होती.

या गाडयांना तागडे आव्हान

होंडाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर थेट TVS iQube, Ather Rizta, 450, Ola S1 आणि Bajaj Chetak EV शी स्पर्धा करेल. सध्या या स्कूटरच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. सूत्रानुसार या स्कूटरची किंमत सुमारे एक लाख रुपये असू शकते. या स्कूटरमध्ये डिजिटल डिस्प्ले असेल जो अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह येईल.

आता ड्राइविंग लायसन्स घेऊन फिरण्याची गरज नाही; मोबाईलमध्ये इंस्टाल करा हे अँप

Digilocker

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जे लोक स्वतः गाडी चालवतात, ते लोक घराबाहेर पडताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ड्रायव्हिंग लायसन स्वतःजवळ ठेवत असतात. कारण गाडी चालवताना आपल्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे खूप गरजेचे असते. परंतु अनेक वेळा घाई गडबडीत आपण हे ड्रायव्हिंग लायसन घरी विसरतो. आणि पोलीस आपल्याला पकडतात. अशा वेळी जर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल, तर आपल्याला दंड भरावा लागतो.

परंतु आता जर तुम्ही इथून पुढे तुमच्या ड्रायव्हिंग लायसन घरी विसरलात आणि पोलीस आणि तुम्हाला पकडले, तर तुम्हाला दंड भरण्याची काहीच गरज नाही. आता फक्त तुमच्याकडे दोन ॲप असणे गरजेचे आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा वाहन परवाना घरी विसरले, तरी तुम्हाला कोणताही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही. तुम्ही मोबाईलच्या मदतीने तुमचे ड्रायव्हिंग लायसन दाखवू शकता. जर तुमच्या मोबाईलमध्ये डीजे लॉकर आणि एमपरिवहन ॲप असेल तर या डिजिटल प्रतच्या माध्यमातून तुम्हाला सुटका मिळू शकते. कारण या ॲप मधील डिजिटल प्रत देखील वैद्य मानली जाते. असे मंत्रालयाने देखील सांगितलेले आहे.

नियम वाचा आणि दंड टाळा

आयटीआय नुसार तुमचे ड्रायव्हिंग लायसन वाहन नोंदणी प्रमाणपत्र अशा कागदपत्रांच्या प्रती तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणे इथून पुढे बंधनकारक नाही. कारण डीजी लॉकर आणि एम परिवहन ॲपवर देखील या कागदपत्रांची असणारी डिजिटल प्रत वैद्य मानले जाते. याबाबतची माहिती मंत्रालयाने दिलेली आहे.
आता वाहतूक पोलीस त्यांच्या मोबाईल मधून किंवा कोड स्कॅन करून ड्रायव्हर आणि वाहनाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती मिळवू शकतात. तसेच नियमांचे उल्लंघन जर तुम्ही केले असेल तर या गोष्टींची माहिती देखील आता डिजिटल पद्धतीने ठेवता येणार आहे.

डीजी लॉकर आणि एम परिवहन ॲप कसे वापरायचे

  • तुम्ही यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये डीजी लॉकर आणि एम परिवहन ॲप डाऊनलोड करा.
  • या ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे द्या.
  • त्यानंतर तुमचे युजर नेम पासवर्ड सेट करून लॉगिन करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक डीजी लवकर या ॲपमध्ये लिंक करावा लागेल.
  • ओटीपीद्वारे त्या आधार कार्ड नंबरची देखील पडताळणी केली जाईल.
  • ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचे ड्रायव्हिंग लायसन वाहन नोंदणी प्रमाणपत्र विम्याची डिजिटल प्रत डिजी लॉकर वरून तुम्हाला डाऊनलोड करता येईल.

आला हिवाळा टाचा सांभाळा ! भेगा पडलेल्या टाचा एका रात्रीत होतील बऱ्या , करा हा उपाय

foot care in winter

सुंदर त्वचा मिळविण्यासाठी लोक अनेक उपचार घेतात. पण अनेक वेळा आपण पायाच्या त्वचेची काळजी घेऊ शकत नाही. यामुळे पायाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी बाहेरील उत्पादने वापरली तरीही ही टाचा फुटू लागतात. ब्युटी एक्सपर्ट अदीबाने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भेगा पडलेल्या टाचांवर उपचार सांगितले आहेत. फुटलेल्या त्यांचांवर प्रभावी घरगुती उपाय कसे केले जातील चला जाणून घेऊया…

बाहेरच्या उत्पादनांची गरज भासणार नाही

तुमच्या पायांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही बाहेरची उत्पादने वापरून नाही तर घरच्या घरी ही एक उपचार करून त्याची काळजी घेऊ शकता. याच्या मदतीने तुम्ही केवळ तुमच्या पायांची काळजी घेऊ शकणार नाही. याशिवाय, याचा तुमच्या त्वचेला अनेक प्रकारे फायदा होईल. आपल्या पायांची काळजी घेण्यासाठी, सर्वप्रथम त्वचेच्या दैनंदिन काळजीची मदत घ्या आणि त्वचा कोरडी होण्यापासून दूर ठेवा.

भेगा पडलेल्या टाचांकरिता खास उपाय

  • सर्व प्रथम 1 टेबलस्पून व्हॅसलीन घाला. ½ टीस्पून खोबरेल तेल, 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. थोड्या प्रमाणात वितळलेल्या मेणबत्तीचे मेण घाला.
  • यानंतर, नमूद केलेल्या गोष्टी योग्य प्रमाणात भांड्यात टाका आणि मिक्स करा.
  • यानंतर, मिश्रण वितळवण्यासाठी गरम करा.
  • थोडे कोमट झाल्यावर हे मिश्रण पायाच्या टाचांवर लावा.
  • कमीतकमी 20 मिनिटे ते आपल्या पायावर तसेच राहू द्या.
  • ते सुकल्यानंतर हळूहळू स्वच्छ करा.

या उपचाराचे फायदे

  • त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होईल.
  • त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल.
  • टाचेच्या भेगा हळूहळू कमी होतील.

(टीप : येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ‘हॅलो महाराष्ट्र’ याची पुष्टी करत नाही )

Reliance Jio IPO | गुंतवणूकदारांची 5 वर्षांची प्रतीक्षा लवकरच संपणार, 2025 मध्ये येणार रिलायन्स जिओचा IPO!

Reliance Jio IPO

Reliance Jio IPO | Reliance Jio Infocomm च्या IPO च्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. गुंतवणूकदार देखील बऱ्याच दिवसांपासून या IPO ची वाट पाहत आहेत.अशातच आता हाती आलेल्या माहितीनुसार लवकरच Reliance Jio Infocomm चा IPO बाजारात येऊ शकतो.

रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या आयपीओची (Reliance Jio IPO) अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. रिलायन्स जिओचा हा IPO देशातील सर्वात मोठा IPO असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या IPO बाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा हा IPO 2025 मध्ये येऊ शकतो. अशा स्थितीत गुंतवणूकदारांच्या नजरा त्यावर खिळल्या आहेत. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. खरे तर, काही काळापूर्वी Hyundai India चा IPO देशातील सर्वात मोठा IPO बनला आहे. यापूर्वी हा विक्रम एलआयसीच्या नावावर होता. आता हा रेकॉर्ड रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या आयपीओने मोडला जाऊ शकतो.

हा भारतातील सर्वात मोठा IPO असू शकतो का? | Reliance Jio IPO

रिलायन्स जिओच्या मार्केट व्हॅल्यूबद्दल बोलायचे झाले; तर ते 8.4 लाख कोटी रुपये म्हणजेच सुमारे 100 बिलियन डॉलर्स आहे. त्याचा IPO हा भारतातील सर्वात मोठा IPO असेल अशी अपेक्षा आहे. सध्या रिलायन्स जिओचे अंदाजे ४७.९ कोटी ग्राहक आहेत. आज रिलायन्स जिओची भारतातील सर्वाधिक ग्राहक असलेल्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये गणना केली जाते. मात्र, जिओच्या स्पर्धकांवर नजर टाकली तर त्यात भारती एअरटेलचे नाव येते.

5 वर्षांपासून रिलायन्स जिओ आयपीओची वाट पाहत आहे

मात्र, या आयपीओची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. गुंतवणूकदार जवळपास 5 वर्षांपासून आयपीओची वाट पाहत आहेत. वास्तविक, मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 2019 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (रिलायन्स एजीएम) याची घोषणा केली होती. मुकेश अंबानी यांनी माहिती दिली होती की ते येत्या 5 वर्षात त्यांची टेलिकम्युनिकेशन कंपनी आणि रिटेल कंपनी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्याचा विचार करत आहेत. त्याच वेळी, गुंतवणूकदारांना अशी अपेक्षा आहे की रिलायन्स जिओच्या आयपीओसोबत रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) चा आयपीओ देखील बाजारात येऊ शकतो.

‘हा’ अँप चोरतो मोबाईलमधील संपूर्ण माहिती; वापरात असाल तर आजच डिलीट करा

Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |आजकाल प्रत्येक घरामध्ये स्मार्टफोन असतो स्मार्टफोन शिवाय लोकांचे लोकांच्या दिवसाची सुरुवात देखील होत नाही. स्मार्टफोन मध्ये आपण सोशल मीडियासह अनेक ॲप्स देखील डाऊनलोड करत असतो. हे ॲप डाऊनलोड केल्यावर आपण ते चालू करताना ते ॲप आपल्या स्मार्टफोनच्या अनेक परवानगी घेत असतो. आणि आपण घाईघाईमध्ये त्या परवानगी देत देखील असतो. परंतु हेच ॲप्स आपल्या फोनमधील काही माहिती चोरत असतात. काय त्यामुळे तुमचे वैयक्तिक आणि आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता असते.

त्यातील सगळ्यात महत्त्वाचा ॲप म्हणजे ट्रू. कॉलर प्रत्येक लोकांच्या मोबाईलमध्ये ट्रू कॉलर हा ॲप घेतात. कारण हा ॲप जर अनोळखी नंबर असेल, तर तो नंबर कोणाचा आहे. याबद्दल माहिती देतच असतात. त्याचप्रमाणे काही ॲप्स किराणामाल भाजीपाला वस्तू खरेदी करण्यासाठी असतातच सोशल मीडिया ॲप्स असतात. जेव्हा आपण हे ॲप्स स्मार्टफोन मध्ये चालू करतो. तेव्हा ते तुमचे मेसेजेस, लोकेशन कॉन्टॅक्ट लिस्ट मागतात. आणि आपण त्यांना परवानगी देखील देत असतो.

अशातच ट्रू कॉलर हे ॲप्स स्वीडन मधील ट्रू सॉफ्टवेअर स्कॅनडे नेव्ही या कंपनीने तयार केलेले आहे. कॉल संबंधित माहिती देणारा हा एक ॲप आहे. जर तुम्ही एखाद्या सोशल मीडिया अकाउंटवर तुमचा मोबाईल क्रमांक टाकला तरी तो ट्रू कॉलरकडे जातो तसेच एपीआय आणि एसडीके हे वेगवेगळे कम्प्युटर प्रोग्राम असून याच्या मदतीने ट्रू कॉलर फोन क्रमांक ओळखतो.

या ट्रू कॉलर ॲपचा वापर अनोळखी कॉलच्या माहितीसाठी होतो. जर तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीचा कॉल येत असेल तर ट्रू कॉलरमध्ये तुम्हाला त्या युजरचे नाव समजते. जेव्हा आपण हे ट्रू कॉलरचे ॲप इंस्टॉल करतो. त्यावेळी हे ॲप आपले मेसेज कॉल डिटेल कॉन्टॅक्ट लिस्ट याची परवानगी देखील मागत असते. अगदी बँकेच्या तपसीलांपासून ते कॉन्टॅक्टची लिस्ट ट्रू कॉलर कडे जाते. त्यामुळे तुमच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होतो. त्यामुळे शक्यतो हे ॲप वापरू नका. आणि वापरले तरी त्या ॲपला देणाऱ्या परवानगी चेक करून द्या.

हिवाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणांना देऊ शकता भेट; जाणून घ्या सविस्तर माहिती

Travel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे. आणि थंडीला देखील सर्वत्र सुरुवात झालेली आहे. या महिन्यांमध्ये मुलांना देखील दिवाळीच्या सुट्ट्या असतात. त्यामुळे अनेक लोक कुटुंबासोबत बाहेर फिरायला जात असतात. कुटुंबासोबत किंवा अनेक कपल देखील फिरायला जातात. जर तुम्ही मुंबई आणि ठाण्यात राहत असाल, तर आज आम्ही तुम्हाला मुंबई ठाण्यापासून जवळ असणारी फिरण्यासाठी अत्यंत चांगले ठिकाणी सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचा अद्भुत आनंद घेता येईल.आणि तुमचे मन देखील प्रसन्न होईल. ठाण्यापासून अगदी शंभर किलोमीटर अंतरावर असलेली काही ठिकाणी आम्ही सांगणार आहोत. तुम्ही वीकेंडला देखील या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.

ठाणे हे राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांपैकी एक आहे. मुंबईपासून हे शहर अत्यंत जवळ आहे. ठाण्याला संपूर्ण चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. स्थानिक लोक याला तलावांचे शहर असे म्हणतात. कारण हे शहर सुमारे नऊ तलावांनी वेढलेले आहेत.त्यामुळे अनेक पर्यटक देखील या ठिकाणी भेट देत असतात. आज आम्ही ठाण्यापासून अत्यंत जवळ असणाऱ्या काही ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत.

माथेरान

माथेरान हे ठाण्यापासून अगदी जवळ आहे.तुम्ही जर ठाण्यापासून काही जवळच्या अंतरावर जाण्यासाठी ठिकाण शोधत असाल, तर माथेरान हे अत्यंत उत्कृष्ट ठिकाण आहे. हे अत्यंत लोकप्रिय हिल स्टेशन आहे. माथेरान अनेक जंगले, धबधबे आहेत. त्यामुळे येथील सौंदर्य पाहण्यासारखे असते. तसेच या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला घोडे किंवा टॉय ट्रेनचा आनंद घेता येतो. ठाण्यापासून सुमारे 90 किलोमीटरवर असणारे हे माथेरान निसर्गाने वेढलेले आहे. या ठिकाणी तुम्ही नक्कीच तुमची ट्रिप प्लॅन करू शकता.

कर्जत

कर्जत हे देखील महाराष्ट्रातील एक सुंदर असे पर्यटन स्थळ आहे. हे कर्जत रायगड जिल्ह्यात वसलेले आहे. कर्जत हे उल्हास नदीच्या काठावर आहे. मुंबई आणि ठाण्यामधील लोकांना विकेंडला जाण्यासाठी हे अत्यंत चांगले ठिकाण आहे. या कर्जतला निसर्गांनी वेढलेल्या आहे. यामध्ये ट्रेकिंग, रिवर राफ्टींग कॅम्पिंग देखील असते. तसेच कोथळीगड किल्ला देखील या ठिकाणी आहे. कोंढाणा लेणी, भोर घाट यासारखे अद्भुत ठिकाण तुम्हाला पाहता येईल. ठाण्यापासून हे अंतर केवळ 68 किलोमीटर एवढे आहे.

मनोरी बीच

तुम्ही जर ठाण्यापासून जवळच्या समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायचा विचार करत असाल, तर मनोरी बीच हा तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. या ठिकाणचे वातावरण देखील अत्यंत शांत आहे. या ठिकाणी तुम्ही चांगला वेळ देखील घालू शकता. मनोरी बीचमध्ये तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्त या गोष्टी अत्यंत सुंदरपणे पाहू शकता. तसेच या ठिकाणी तुम्ही स्कुबा डायविंगचा अनुभव देखील घेऊ शकता. ठाण्यापासून मनोरी बीच अंतर केवळ 35 किलोमीटर एवढे आहे.

सोन्याच्या दरात आजही घसरण ! पहा 22 आणि 24 कॅरेट साठी किती रुपये मोजावे लागतील

gold rate 13-11-24

आज शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी मागच्या दोन दिवसाप्रमाणेच सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत कमी होऊन 79 हजार 360 रुपये प्रति दहा ग्रॅम येथे झाली आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 79 हजार 510 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे तर चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर चांदीची किंमत 94 हजार रुपये प्रति किलोग्राम वर आहे.

यंदाच्या वर्षी सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला अगदी काही दिवसातच सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम 80 हजार रुपयांपर्यंत गेले होते. त्यानंतर आता अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्यानंतर सोन्याच्या दरामध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. मागचे सलग दोन दिवस सोन्याचे दर उतरले असताना आज देखील सोन्याच्या दरामध्ये काहीशी घसरण झाले आहे

22 कॅरेट

आज देशात तुम्हाला बावीस कॅरेट सोनं एक ग्राम खरेदी करायचं असेल तर त्यासाठी 7275 रुपये मोजावे लागतील. तर दहा ग्रॅम सोनं 22 कॅरेट मध्ये खरेदी करायचं असेल तर 72 हजार 750 रुपये मोजावे लागतील. आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये शंभर रुपयांची घसरण झाली आहे.

24 कॅरेट

आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोनं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 7936 मोजावे लागतील. कालचा एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर हा 7947 रुपये इतका होता त्यामुळे आज 11 रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. तर तुम्हाला दहा ग्रॅम 24 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर त्याची किंमत 79360 रुपये इतकी आहे आज 24 कॅरेट दहा ग्राम सोन्याच्या दरामध्ये 110 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे

18 कॅरेट

आणि जर तुम्हाला एक ग्रॅम 18 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आज 5952 मोजावे लागतील. तर दहा ग्राम 18 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर 59520 रुपये लागतील

HDFC कर्ज घेणाऱ्यांसाठी नवीन दर जाहीर ; कर्जाच्या दरात होणार वाढ

HDFC Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकांच्या आर्थिक कमाईनुसार प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी कर्ज देत असतात. त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य मिळत असते. जर तुम्हीही कोणत्या बँकेकडून कर्ज घेण्याच्या विचारात असाल , तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. ही बातमी HDFC बँकेच्या संदर्भात आहे. या बँकेने पुन्हा एकदा त्यांच्या कर्जाच्या दरात वाढ केली असून, त्यामुळे आता कर्जदात्याना जास्त व्याजदर द्यावा लागणार आहे. या नवीन नियमानुसार आता बँकेचे व्याजदर किती असतील हे जाणून घेऊयात.

MCLR मद्ये वाढ

HDFC त्यांच्या ठराविक कर्जावर मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मद्ये 0.05 % म्हणजेच 5 बेस पॉईंट्सची वाढ केली आहे. ज्यामुळे ग्राहकांना कर्ज महाग मिळणार आहे. याचाच परिणाम म्हणजे आता EMI मद्ये वाढ होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांची चिंता वाढणार आहे.

नवीन दर कधी लागू

एमसीएलआरचे नवीन दर 7 नोव्हेंबर पासून लागू झाले आहेत. यात एका दिवसाच्या कर्जासाठी MCLR 9.10 टक्क्यांवरून 9.15 % एवढा झाला आहे. तसेच एक महिन्याचा एमसीएलआर दर 0.05 टक्क्यांनी वाढून 9.20 % झाला आहे. या उलट इतर मॅच्युरिटीच्या कर्जासाठी एमसीएलआर दरामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत.

बेंचमार्क दर

एका वर्षासाठीचा बेंचमार्क एमसीएलआर दर हा 9.45 % आधी होता तसाच ठेवण्यात आला आहे. जो प्रामुख्याने कार लोन आणि पर्सनल लोनसाठी लागू होतो. सप्टेंबर 2024 मद्ये एचडीएफसी बँकेने होम लोन कार लोन आणि पर्सनल लोन यासारख्या कर्ज दरात वाढ केली होती.

RBI पॉलिसी रेपो रेट

RBI चे गव्हर्नर दास यांनी आपला पॉलिसी रेपो रेट 6.5 टक्क्यांवरच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतरच एचडीएफसी बँकेने हे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

केवळ 2,399 च्या मंथली EMI वर घरी आणा Hero Splendor Plus Xtec ; जाणून घ्या फीचर्स

Hero Splendor Plus Xtec

मित्रांनो, जर तुम्हाला चांगली आणि जबरदस्त मायलेज सोबत उत्तम इंजिन असलेली मोटारसायकल आवडत असेल तर आजच्या लेखात आम्ही तुमच्या सर्वांसाठी हिरोकडून एक मोटारसायकल ची माहिती घेऊन आलो आहोत. जी तुमच्या बजेटमध्ये सुद्धा असेल. चला तर मग Hero Splendor Plus Xtec मोटरसायकलबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

Hero Splendor Plus Xtec चे फीचर्स

आता जर आपण या हिरो मोटरसायकलच्या फीचर्स आणि परफॉर्मन्सबद्दल बोललो तर Hero Splendor Plus Xtec मोटारसायकलमध्ये अनेक लक्झरी फीचर्स आहेत. उदाहरणार्थ, या मोटरसायकलमध्ये तुम्हाला पुढील आणि मागील दोन्ही बाजूस डिस्क ब्रेकचा सपोर्ट मिळेल. याबरोबरच ही मोटर सायकल स्पीडोमीटर, ऑडोमीटर आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशा फीचर्स येते. याबरोबरच या गाडीमध्ये तुम्हाला मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी पोर्ट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी चा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे

Hero Splendor Plus Xtec इंजिन आणि मायलेज

आता गाडीच्या इंजिन आणि मायलेज बद्दल सांगायचं झालं तर हिरोच्या मोटरसायकलवर मिळणाऱ्या मायलेज आणि इंजिन दोन्ही जबरदस्त आहे कारण एक लिटर पेट्रोलमध्ये जवळपास 85 ते 88 किलोमीटर पर्यंत ही गाडी मायलेज देते. याशिवाय हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक मोटरसायकल मध्ये आपल्याला 98.96 सीसी च इंजिन मिळतं. जे सिंगल चैनल abs system बरोबरच चार स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये येते. यामध्ये तुम्हाला १२.७२ बीएचपीचे पावर पाहायला मिळेल.

Hero Splendor Plus Xtec किंमत

आता या गाडीच्या किमती बद्दल बोलायचं झाल्यास या गाडीची किंमत जवळपास 90 हजारांच्या आसपास आहे. मात्र जर तुम्ही ही गाडी ईएमआय वर खरेदी केली तर तुम्हालाही गाडी खरेदी करताना केवळ पंधरा हजार रुपये डाऊन पेमेंट भरावे लागेल आणि त्यानंतर ही मोटरसायकल तुम्ही2,399 रुपयांच्या ईएमआय वर तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता.