Monday, December 29, 2025
Home Blog Page 385

सोन्याच्या दरात वाढ की घट ? काय आहे आजची स्थिती ?

gold rate today

मागच्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दारामध्ये सतत चढ उतार होताना दिसत आहे. यावर्षी तर सोन्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठलेली दिसत आहे. तरीसुद्धा सोने खरेदी करणाऱ्यांची बाजारात काही कमी नाही. केवळ दागिने बनवण्यासाठी नाही तर दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सुद्धा सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे. आज सोन्या चांदीच्या दराची काय स्थिती आहे ? चला पाहूयात…

आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सराफा बाजारात सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली दिसत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झालेली दिसत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्यामध्ये नरमाई दिसून येत होती तर चांदीचा थेट दर 900 रुपयांनी घसरला. MCX म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. तर चांदी देखील 999 रुपयांनी घसरून 93 हजार 79 रुपये प्रति किलोग्राम वर स्थिरावली आहे. तर काल चांदीचा दर हा 94,648 इतका होता.

24 कॅरेट सोनं

सराफा बाजारात स्थानिक विक्रेते आणि व्यवसायीक यांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे सोन्याचे दर वधारल्याचे बोलले जात आहे. सात नोव्हेंबर रोजी फेडरल रिजर्व बँकेकडून व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला तर संपूर्ण आठवड्यात सोन्याच्या किमतीत चढ उतार होण्याची शक्यता आहे. आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 110 रुपयांनी वधारला आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोनं आज 80 हजार 350 रुपयांवर स्थिरावला आहे.

22 कॅरेट सोनं

जर आज तुम्ही 22 कॅरेट सोन्याची खरेदी करणार असाल तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात आज शंभर रुपयांची घसरण झाली असून 22 कॅरेट प्रति तोळा सोन्याचा दर 73 हजार 650 रुपये इतका आहे.

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 73,650 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 80,350 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 60,260 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,365 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8, 035 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6, 026 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 58,920 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 64,280 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 48,208 रुपये

Adhar Card Free Update | लवकरच फ्रीमध्ये अपडेट करा आधार कार्ड; अपडेटची ‘ही’ आहे शेवटची तारीख

Adhar Card Free Update

Adhar Card Free Update | आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे ओळखपत्र आहे. आधार कार्डशिवाय आणि कोणतीही काम होत नाही. तुम्हाला कॉलेजपासून ते अगदी सरकारी काम असेल मॅरेज सर्टिफिकेट काढायचे असेल, तरी आधार कार्ड हे लागतेच. कारण आधार कार्ड आपल्या ओळखीचे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. परंतु आपल्याला वेळोवेळी आपल्या आधार कार्डमध्ये बदल करावे लागतात. त्यासाठी आपल्याला आधार कार्ड अपडेट (Adhar Card Free Update) देखील करावे लागते आता ऑनलाईन मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ करण्यात आलेली आहे.

तुमच्या आधार कार्डला दहा वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले असेल, तर तुमचा आधार कार्डचा पत्ता, नाव, जन्मतारीख जर तुम्हाला अपडेट करायचे असेल, तर तुम्ही करू शकता. कारण आता युनिट आयडेंटिफिकेशन ऑफ इंडियाने या संदर्भात एक मोठी असते दिलेली आहे. तुम्ही आता 14 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने हे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता.

युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर गेल्या दहा वर्षात तुमच्या आधार कार्ड अपडेट केले नसेल, तर ते लवकर अपडेट करून घ्या. कारण दहा वर्षातून एकदा आधार कार्ड अपडेट करणे खूप गरजेचे आहे. यापूर्वी अपडेट करण्याचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2024 ठेवली होती. परंतु ती वाढवून 15 डिसेंबर 2024 करण्यात आली. त्यानंतरही पुन्हा एकदा मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करावे. अन्यथा त्यानंतर तुम्हाला त्यासाठी शुल्क भरावी लागेल.

आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस | Adhar Card Free Update

  • आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गव्हर्मेंटच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला माय आधारवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्ही अपडेट आधार कार्डवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही तुमची सगळी महत्वाची माहिती भरून कागदपत्र अपडेट करा. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल.
  • ओटीपी नंतर लॉगिन करा आणि जी माहिती अपडेट करायची आहे ती निवडा आणि भरा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे सगळे कागदपत्र स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट येते. अपडेटची रिक्वेस्ट तुम्ही ट्रॅक करू शकता. आणि काही दिवसातच तुमचे आधार कार्ड अपडेट केले जाईल.

5,667 रुपयांमध्ये खरेदी करा DSLR क्वालिटी देणारा स्मार्ट फोन, पहा वैशिष्ट्ये

Vivo T3 Ultra 5G

संपूर्ण जग एका छोट्याशा डिव्हाईस मध्ये एकत्र आले आहे. हे डिव्हाईस म्हणजे मोबाईल. केवळ बोलणेच नाही तर उत्तम फोटो , इंटरनेटच्या वापराने जी हवी ती गोष्ट या डिव्हाइसच्या माद्यमातून आपण करू शकतो. म्हणूनच अनेक लोक चांगला मोबाईल घेणे पसंत करतात. मात्र एक उत्तम स्मार्ट फोन घेत असताना बाजेटचा विचार सर्वात आधी करावा लागतो. तुम्हाला सुद्धा एक उत्तम फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. चला जाणून घेऊया …

शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर स्मार्टफोन फेस्टिव्हल सेलमुळे अनेक स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहेत. आपण हे स्वस्त दरात खरेदी करू शकता. Vivo T3 Ultra 5G सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. हा फोन उत्कृष्ट कॅमेरा आणि मजबूत बॅटरीसह येतो . त्यामुळे तुम्हाला हा फोन खूप आवडेल. तुम्ही अनेक सवलती आणि ऑफरसह ते खरेदी करू शकता.

5,667 रुपयांचा नो-कॉस्ट EMI

12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे. तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 33,999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या सेलदरम्यान 10% डिस्काउंटसह खरेदी करू शकता. तुम्ही बँक ऑफरद्वारे त्याची किंमत देखील कमी करू शकता. बँक ऑफर अंतर्गत, तुम्हाला सर्व बँक कार्डांवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5% अमर्यादित कॅशबॅक उपलब्ध आहे. ग्राहक 24,500 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकतात. सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हे मूल्य मिळते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते रु. 5,667 च्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायावर देखील खरेदी करू शकता.

Vivo T3 Ultra 5G ची वैशिष्ट्ये

यात मोठा 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2800×1260 पिक्सेल आहे. फोन 120Hz रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करतो. त्याची कमाल ब्राइटनेस 4500 nits आहे. हे MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसरद्वारे चालवला जातो. हे 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेजसह येते. प्राथमिक कॅमेरा 50 MP आहे. एक 8MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. सेल्फीसाठी 50MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. डिव्हाइस 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5500mAh बॅटरी पॅक देते.

सरकार या प्रादेशिक बँकांचे विलीनीकरण करणार ; ही संख्या होणार 43 वरून 28

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील बँकांसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने आता प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या विलीनीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. या निर्णयामुळे अनेक बँकांचे एकत्रीकरण केले जाणार असून , सध्या देशात एकूण 43 प्रादेशिक ग्रामीण बँका कार्यरत आहेत, त्याची संख्या 28 पर्यंत कमी केली जाईल . हि विलीनीकरणाची योजना आखल्यामुळे बँकांना खर्च कमी होण्यासाठी , तंत्रज्ञान सुधारण्यासाठी आणि भांडवल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

रॉयटर्सचा अहवाल

रॉयटर्सच्या अहवालानुसार सरकारने या संदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे, ज्यामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या विलीनीकरणाचा समावेश आहे. या बँका प्रामुख्याने लहान शेतकरी, शेतमजूर आणि लहान व्यवसायांना कर्ज देतात, परंतु यांच्याकडे भांडवल आणि तंत्रज्ञानाच्या सुविधांचा अभाव आहे. 31 मार्च 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकूण ठेवी 6.6 लाख कोटी रुपये होत्या, तर त्यांनी दिलेली कर्जे 4.7 लाख कोटी रुपयांपर्यंत होती.

प्रत्येक राज्यात एकच प्रादेशिक ग्रामीण बँक

या सरकारच्या प्रस्तावानुसार विलीनीकरणानंतर प्रत्येक राज्यात एकच प्रादेशिक ग्रामीण बँक राहील. यामुळे बँकांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि त्यांचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होईल. मालमत्तेच्या दृष्टीने, सार्वजनिक क्षेत्रातील बँका अजूनही देशातील बँकिंग क्षेत्रावर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे या विलीनीकरणातून सरकारचा उद्देश बँकांचे कामकाज सुधारणे आणि त्यांचे सरकारवरील भांडवलासाठीचे अवलंबित्व कमी करणे आहे.

महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक बँकांचे विलीनीकरण

प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये केंद्र सरकारचे 50% हिस्सेदारी आहे, तर प्रायोजक किंवा शेड्युल्ड बँकांचे 35% आणि राज्य सरकारचे 15% हिस्सेदारी आहे. सरकारने 2004 ते 05 मध्ये बँकांचे एकत्रीकरण सुरू केले होते, ज्यामुळे 2020 – 21 पर्यंत या बँकांची संख्या 196 वरून 43 पर्यंत कमी झाली. प्रस्तावानुसार महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक बँकांचे विलीनीकरण होणार आहे, तर आंध्र प्रदेशातील चार बँकांचे विलीनीकरण करण्याचीही योजना आहे. या विलीनीकरणाच्या प्रस्तावामुळे बँकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणि त्यांच्या भांडवलात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे देशाचे आणि लोकांचे कल्याण होण्यास मदत मिळणार आहे.

PM Matrutv Vandana Yojana | गर्भवती महिलांना सरकारकडून मिळणार 6 हजार रुपये; जाणून घ्या योजना

PM Matrutv Vandana Yojana

PM Matrutv Vandana Yojana | आपले सरकार देशातील विविध नागरिकांचा विचार करून नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. अशातच आतागर्भवती महिलांचे चांगले आरोग्य आणि योग्य काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान वंदना योजना सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2017 रोजी पंतप्रधान मातृत्व वंदना योजना (PM Matrutv Vandana Yojana ) सुरू केली. जे केंद्र सरकारच्या अखत्यारीत महिला आणि बाल विकास द्वारे चालवले जाते. ही योजना पंतप्रधान गर्भधारणा योजना म्हणूनही ओळखली जाते. ज्यामध्ये महिलांना 6,000 रुपयांची मदत दिली जाते. जेणेकरून आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिला स्वतःची काळजी घेऊ शकतील आणि बाळाच्या जन्मानंतरच्या आवश्यक गरजा पूर्ण करू शकतील.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे उद्दिष्ट | PM Matrutv Vandana Yojana

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आली. विशेषतः कष्टकरी महिला. बाळाच्या जन्मानंतर महिला खूप अशक्त होतात. अशा वेळी महिलांनी नीट खाल्लं नाही आणि मुलाची योग्य काळजी घेतली नाही तर आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच गरोदर महिलांना योग्य काळजी आणि आहारासाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा उद्देश गर्भवती आणि स्तनदा महिलांची काळजी घेणे, बालकांचे कुपोषणापासून संरक्षण करणे आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हा आहे.पंतप्रधाप्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे उद्दिष्ट
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आली. विशेषतः कष्टकरी महिला. बाळाच्या जन्मानंतर महिला खूप अशक्त होतात. अशा वेळी महिलांनी नीट खाल्लं नाही आणि मुलाची योग्य काळजी घेतली नाही तर आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच गरोदर महिलांना योग्य काळजी आणि आहारासाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा उद्देश गर्भवती आणि स्तनदा महिलांची काळजी घेणे, बालकांचे कुपोषणापासून संरक्षण करणे आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हा आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी पात्रता

केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गर्भवती महिलांनाच प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ मिळेल.
भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
एखाद्या महिलेला या योजनेचा लाभ एकदाच म्हणजेच तिच्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी दिला जाईल.
महिलांचे वय 19 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
नोकरी करणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. मात्र यामध्ये कष्टकरी महिलांचा समावेश करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. जे आधार कार्डशी लिंक आहे.
एखाद्या महिलेने या योजनेसाठी अर्ज केला असला आणि तिने गर्भपात केला किंवा मृत मुलाला जन्म दिला तरीही ती या योजनेसाठी पात्र असेल. जेणेकरून स्त्री स्वतःची योग्य काळजी घेऊ शकेल.

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • बँक पासबुक
  • मुलाचे जन्म प्रमाणपत्र
  • पोस्ट ऑफिस पास बुक
  • पासपोर्ट
  • शिधापत्रिका
  • मतदार ओळखपत्र
  • मोबाईल नंबर
  • शेतकरी फोटो पासबुक
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • दोन्ही पालकांचे आधार कार्ड

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचे फायदे

  • केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत, आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
  • योजनेचा लाभ तीन हप्त्यांमध्ये दिला जातो.
  • प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठीही ऑनलाइन अर्ज करता येईल.
  • मदतीची रक्कम महिलेच्या गर्भधारणेपासून बाळाच्या जन्मापर्यंत दिली जाते.
  • ज्या महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेत आहेत आणि त्यांच्या मुलाचा जन्म रुग्णालयात झाला आहे, त्यांना 1000 रुपयांची मदत दिली जाईल.
  • योजनेसाठी ऑनलाइन अर्जही घरबसल्या करता येणार आहेत.

Google Chrome | गुगल क्रोम युजर्ससाठी सरकारचा मोठा इशारा, मिनिटातच खाली होईल बँक अकाउंट

Google Chrome

Google Chrome | गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी सरकारने एक नवीन इशारा जारी केला आहे. सरकारी एजन्सी CERT-In (कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) ने Google Chrome वापरकर्त्यांसाठी ही नवीन चेतावणी उच्च तीव्रतेच्या श्रेणीमध्ये ठेवली आहे, म्हणजे ती अत्यंत संवेदनशील आहे. सुरक्षा एजन्सीला Google च्या वेब ब्राउझरच्या अनियंत्रित कोडमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत, ज्याचा फायदा हॅकर्स घेतात आणि वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरू शकतात.

हॅकर्स बँकेचे तपशील चोरू शकतात | Google Chrome

सरकारने जारी केलेल्या इशाऱ्यात गुगल क्रोम ब्राउझरमध्ये ही समस्या क्रोम एक्स्टेंशनमध्ये चुकीच्या अंमलबजावणीमुळे आली असल्याचे म्हटले आहे. ही समस्या हॅकर्सना वापरकर्त्याच्या सिस्टममध्ये रिमोट ऍक्सेस देऊ शकते. गुगल क्रोमच्या सुरक्षा संरक्षणाला बायपास करण्यासाठी हॅकर्स याचा फायदा घेऊ शकतात. स्कॅमर Google Chrome वापरकर्त्यांचे वैयक्तिक आणि बँकिंग तपशील, पासवर्ड इत्यादी चोरू शकतात. आर्थिक आणि वैयक्तिक डेटाची चोरी म्हणजे हॅकर्स मोठे सायबर हल्ले करू शकतात, जे खूप हानिकारक ठरू शकतात.

CERT-In ने 4 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या चेतावणीमध्ये म्हटले आहे की वापरकर्त्यांनी त्यांच्या PC मधील Google Chrome ब्राउझर नवीनतम आवृत्ती 130.0.6723.69 सह अद्यतनित करावे. पूर्वीच्या आवृत्त्यांच्या अनियंत्रित कोडमध्ये समस्या आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल तर ते लगेच अपडेट करा. सरकारने जारी केलेला हा इशारा तुम्हाला मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचवू शकतो.

अशा प्रकारे Google Chrome अपडेट करा

  • PC वर Google Chrome वेब ब्राउझर अपडेट करण्यासाठी, प्रथम ब्राउझर लाँच करा.
  • यानंतर, वरच्या उजव्या बाजूला दिलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा आणि सेटिंग्जवर क्लिक करा.
  • येथे तुम्ही अबाउट क्रोम वर टॅप करताच, तुम्हाला तुमच्या ब्राउझरची आवृत्ती दिसेल आणि नवीन आवृत्ती अपडेट होण्यास सुरुवात होईल.
    अपडेट डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला Google Chrome ब्राउझर पुन्हा लॉन्च करावा लागेल.
  • ब्राउझर लॉन्च केल्यानंतर, पुन्हा एकदा अबाउट क्रोम वर जा आणि नवीनतम आवृत्ती 130.06723.92 सह अपडेट करा.

त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी ‘या’ तेलाचा करा वापर; एका रात्रीतच दिसेल परिणाम

Wrinkle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वाढत्या वयासोबत आपल्या आरोग्याशी संबंधित जशा अनेक समस्या निर्माण होतात. तशाच आपल्या त्वचेच्या संबंधित देखील अनेक समस्या निर्माण होतात. जसे आपले वय वाढत जाते. तशा आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होतात. तसेच काळे डाग देखील यायला लागतात. परंतु जर तुम्ही योग्य वयातच त्वचेची काळजी घेतली, तर त्वचेवर कमी सुरकुत्या येतात. त्यामुळे तुमचे वय देखील कमी दिसते. आजकाल तर कमी वयात सुरकुत्या येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे कमी वयातही लोक म्हातारे झालेली दिसतात. परंतु तुम्ही जर योग्य पद्धतीने उपचार घेतले, तर हा या सुरकुत्या कमी होतील. यासाठी खोबऱ्याचे तेल अत्यंत फायदेशीर आहे. तुम्ही जर खोबऱ्याच्या तेलाचा चेहऱ्यासाठी वापर केला, तर तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील. आता या खोबऱ्याच्या तेलाचा कसा वापर करावा? त्याने आपल्या त्वचेला काय फायदा होतो? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

खोबऱ्याच्या तेलाचे फायदे

खोबऱ्याच्या तेलामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात. तुम्ही जर खोबऱ्याचे तेल तुमच्या चेहऱ्याला लावले, तर तुमची त्वचा अत्यंत हेल्दी होईल. आणि तुमच्या चेहऱ्याला चांगले विटामिन्स मिळतील. खोबऱ्याचे तेल हे तुमची त्वचा तरुण दिसण्यासाठी मदत करते. या तेलामध्ये लॉरीक ऍसिड असते. त्यामुळे त्वचेला मुलायमपणा मिळ5ओ. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई असल्याने त्वचा अत्यंत मुलायम दिसते आणि अँटिऑक्सिडंट असल्याने तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या देखील दूर होतात.

खोबऱ्याच्या तेलाचा वापर कसा करावा ?

तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच डाग कमी करण्यासाठी खोबऱ्याचं तेल चेहऱ्यावर तसंच लावू शकता. यासाठी तुम्ही चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. खोबऱ्याचे तेल घ्या आणि चेहऱ्यावर सर्क्युलर मोशन मध्ये तेल लावा. तुमची त्वचा जर ड्राय असेल, तर खोबऱ्याचं तेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा. परंतु तुमची त्वचा ऑईली असेल तर तेल लावल्यानंतर अर्ध्या तासाने तुमचा चेहरा धुऊन टाका.

खोबऱ्याचं तेल आणि हळद

तुम्ही सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलासह हळद मिक्स करून देखील लावू शकता. यासाठी तुम्ही अर्धा चमचा खोबऱ्याच्या तेलात दोन चिमूटभर हळद टाका आणि ते मिक्स करा. नंतर हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा. आणि पंधरा ते वीस मिनिटांनी तुमचा चेहरा धुऊन टाका. यामुळे तुमच्या चेहऱ्याला हायड्रेशन मिळेल. आणि अँटीएजिंग गुणधर्म मिळता त्यामुळे त्वचेवरील डाग देखील दूर होतात. तसेच त्वचा चमकदार बनते.

भारतात तरुण महिलांचा सोनं खरेदीकडे जास्त कल; ‘ही’ आहेत कारणे

Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक शतकापासून ते आजपर्यंत अलंकारांना महत्वाचे स्थान मिळाले आहे. तेव्हा पासून दिवसेंदिवस सोन्यात गुंतवणूक करण्याचा महिलांचा कल वाढत आहे. काही महिला सोन्यात गुंतवणूक करणे म्हणजे एक पारंपरिक प्रथा समजतात तर दुसऱ्या बाजूला ती गुंतवणूक पोर्टफोलिओचा महत्त्वाचा भाग असते. आज ग्रामीण भागापासून ते शहरी भागातील तरुण महिलांमध्ये सोनं खरेदी करण्याचा नवा ट्रेंड दिसत आहे. या छोट्या गुंतवणुकीतून मोठी बचत होऊ शकते ज्यामुळे आर्थिक स्थिरता प्राप्त होते. या कारणामुळेच सोन्याच्या धातूकडे आकर्षण वाढत आहे.

आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल

महिला आता स्वत:च्या आर्थिक भविष्याचा विचार करत अधिक सजग होत आहेत. त्यांची निर्णयक्षमता वाढली असून त्यांना आता आपल्या आर्थिक खर्चावर अधिक नियंत्रण ठेवायचे आहे. महिलांच्या कामाच्या मानसिकतेत झालेले बदल, वेतनातील असमानता कमी करण्यासाठीचे प्रयत्न आणि आर्थिक स्थिरतेवर दिलेले अधिक लक्ष यामुळे त्यांच्या गुंतवणुकीच्या निर्णयांमध्ये मोठा बदल झाला आहे. यामुळे त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, जे पारंपारिक पद्धतींमध्ये प्रामुख्याने पुरुषांकरताच राखीव होते. ते आता 21 व्या शतकात बदलताना दिसत आहे.

सोने गुंतवणुकीचे सर्वोच्च साधन

आजही महिलांचे सोन्याबद्दलचे आकर्षण कायम आहे. भलेही त्या इतर गुंतवणूक पर्यायांचा विचार करत असल्या, तरी सोन्याचा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विशेष स्थान आहे. भारतीय संस्कृतीत सोन्याला संपत्ती आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे महिलांसाठी हे गुंतवणुकीचे सर्वोच्च साधन ठरते. भौतिक सोने खरेदीसोबतच आजच्या काळात डिजिटल सोने आणि सुवर्ण रोखे यांसारख्या पर्यायांचा स्वीकार देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. महिलांचे हे नव्या गुंतवणुकीच्या साधनांकडे वळणे हा बदल अधिक सुरक्षिततेची आणि सोयीची जाणीव करून देत आहे. त्यामुळे नव्या गुंतवणुकीच्या माध्यमातून नफा मिळवण्याचा चांगला मार्ग आहे.

तरुण महिलांचा गुंतवणूक दृष्टिकोन

तरुण महिलांचे सोने खरेदी करण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पारंपारिक पिढ्यांच्या तुलनेत वेगळा आहे. दागिने खरेदी करून त्यांचा उपयोग गुंतवणुकीसाठी करण्यापेक्षा त्या आता संपत्ती वाढवण्यासाठी आणि सामाजिक स्थैर्यासाठी सोन्याला एक साधन मानत आहेत. सोन्याच्या स्वरूपात केलेली गुंतवणूक विविध आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वापरली जात आहे.

JIO चे दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लाँच ; BSNL ला मिळणार टक्कर

JIo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिओने बीएसएनएलच्या वाढत्या लोकप्रियतेला टक्कर देण्यासाठी दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. या नवीन प्लॅन्समुळे बीएसएनएलला टेन्शन वाढू शकते, कारण जिओने कमी किंमतीत अधिक फायदे देण्याचा निर्णय घेतला आहे. जिओने नुकतीच दिवाळी ऑफर सादर केली होती, ज्यामध्ये ग्राहकांना फ्री रिचार्ज आणि अतिरिक्त डेटा मिळत होता. तसेच आता कंपनीने दोन स्वस्त प्लॅन्स आणले आहेत. ज्यांची किंमत हि 899 रुपये आणि 999 रुपये आहे. यामुळे ग्राहकवर्ग जास्त प्रमाणात आकर्षित होणार असून , बीएसएनएल सोबत इतर कंपन्यानदेखील याचा फटका सहन करावा लागेल .

जिओचा 899 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळत आहे , ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्याची मुभा प्राप्त होणार आहे. ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळतो, तसेच 20 जीबी अतिरिक्त डेटा देखील दिला जातो. यासोबतच दररोज 100 फ्री एसएमएस मिळतात. हा प्लॅन बजेटमध्ये असून तुम्हाला दररोज 10 रुपयांपेक्षा कमी खर्चात अधिक फायदे मिळणार आहेत.

जिओचा 999 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये 98 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. यामध्ये दररोज 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, आणि दररोज 100 फ्री एसएमएस मिळतात. त्याचबरोबर तुम्हाला JioTV आणि JioCinema चे फ्री सबस्क्रिप्शनदेखील उपलब्ध होणार आहे . या प्लॅनमुळे ग्राहकांना मनोरंजनाच्या क्षेत्रातही जास्त फायदा मिळणार आहे. तसेच यामधील सुविधांमुळे इतर कंपन्यांना जोरदार टक्कर मिळेल .

बीएसएनएलचा प्लॅन

बीएसएनएलने 365 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे, ज्याची किंमत 1999 रुपये आहे. या प्लॅनमध्ये दर महिन्याला 300 फ्री कॉल मिनिट्स, 3 जीबी हाय स्पीड डेटा, आणि 30 फ्री एसएमएस मिळतात. कंपनीने आपला एक वर्षाचा रिचार्ज प्लॅन 100 रुपयांनी स्वस्त केला असून आता त्याची किंमत 1899 रुपये आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 600 जीबी डेटा मिळतो, ज्यामुळे जिओला कडवी स्पर्धा मिळू शकते. जिओचे नवीन प्लॅन्स बीएसएनएलला टक्कर देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, तर बीएसएनएलने देखील आपले प्लॅन्स अधिक आकर्षक बनवण्याचे प्रयत्न करीत आहे.

लाडक्या बहि‍णींना मिळणार 2100 तसेच वीजबिलातही सूट; महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणारी पंधराशे रुपयेची रक्कम 2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पंधरा दिवस शिल्लक असतानाच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ,यांच्या महायुतीने आपला धमाकेदार जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये हि मोठी घोषणा करण्यात आली . महिलांसाठी विविध योजना, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ,शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिलात कपात, 25 लाख रोजगार निर्मिती अशी आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.” केलंय काम भारी, आता पुढची तयारी” अशी टॅग लाईन असलेला जाहीरनामा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या 10 महत्त्वाच्या घोषणा

लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. 15000 वरून ही रक्कम 2100 रुपये केली जाणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी 25000 महिलांचा पोलिस दलात समावेश करणार आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15000 रुपये मिळणार आहेत. तसेच एमपीएस वर 20 टक्के अनुदान देण्यात येते देखील सांगण्यात आलेले आहे.

प्रत्येक व्यक्तीला अन्न आणि निवारा देण्याचे आणि गरिबांना अन्न, वस्त्र, निवारा देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे.

वृद्ध पेन्शनधारकांना आता दर महिन्याला 2100 रुपये देणार आहेत. सुरुवातीला ही रक्कम 1500 रुपये एवढी होती.

तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार आहे. असे देखील सांगण्यात आलेले आहे.

25 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच प्रशिक्षणातून दर महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्या वेतन देखील देण्यात येणार आहे.

45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते बांधणार आहेत. असे देखील सांगण्यात आलेले आहेत.

अंगणवाडी आणि आशा सेविकांना दर महिन्याला 15000 रुपये वेतन आणि संरक्षण देण्याचे सांगितले आहे.

त्याचप्रमाणे वीज बिलामध्ये 30 टक्के कपात करून सौर आणि अक्षय उर्जेवर भर देणार आहे.

सरकार स्थापन झाल्यानंतर व्हिजन महाराष्ट्र 2029 100 दिवसाच्या आत सादर करणार आहे.

महायुती सरकारने राज्यात विविध योजना आणल्या असून अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे नेले आहेत. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, अमरावती येथे टेक्सटाईल पार्क, महापे येथे सेमीकंडक्टर संदर्भातील प्रकल्प, विदर्भात सुरजागड येथील प्रकल्प, सौर ऊर्जा निर्मिती करणारे कंपनीची स्थापना आणि त्या संदर्भातील करार, विविध नदी जोड प्रकल्पांना मान्यता आणि गती, मोफत कृषी वीज, वाढवण बंदराला मान्यता, रखडलेल्या प्रकल्पांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता, राज्यभरात जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या उभारणीला गती अशी अनेक कामे महायुती सरकारच्या काळात होत आहेत आणि झाली आहेत. त्यामुळेच “केलंय काम भारी, आता पुढची तयारी” अशी टॅग लाईन या जाहीरनाम्याला देण्यात आली असून “विकासनीती म्हणजे महायुती” अशी जोड देखील देण्यात आली आहे.