Monday, December 29, 2025
Home Blog Page 386

काय लूक ! काय style ! Royal Enfield ची नवीन इलेक्ट्रिक बाईक पाहिली का ?

royal

जगभरातील वाहन कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहन बनवण्यात गुंतल्या आहेत. ग्राहकांचा कल सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढतो आहे. अशातच बाइक्सच्या जगात आपलं एक नाव कमावलेली कंपनी Royal Enfield ने सुद्धा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. रॉयल एनफिल्डने या विभागासाठी ‘फ्लाइंग फ्ली’ ही उपकंपनी स्थापन केली आहे. Flying Flea लवकरच बाजारात आपली पहिली बाईक C6 लॉन्च करणार आहे.

Flying Flea C6 ओल्ड स्कुल लूकसह येईल. इलेक्ट्रिक बाईकचे सिल्हूट लो-स्लंग बॉबर मोटरसायकलसारखे दिसते, ज्याच्या समोरचा भाग आणि एकल काठी आहे. फ्लाइंग फ्ली C6 सस्पेन्शन ड्युटी हाताळण्यासाठी गर्डर-शैलीतील फ्रंट फोर्क वापरते, जे आधुनिक मोटरसायकलमध्ये सहसा दिसत नाही. C6 ची फ्रेम बनावट ॲल्युमिनियमची बनलेली आहे, जी बजेट-अनुकूल EV मार्केटप्लेसमध्ये सामान्य नाही. त्याच्या प्रीमियम वैशिष्ट्यांमध्ये टचस्क्रीन TFT डॅशबोर्डचा समावेश आहे. दरम्यान, सर्व-नवीन स्विचगियर नवीन डॅशला पूरक आहे. बाईकला ऑल-एलईडी लाइटिंग मिळते, हेडलाइट आता जवळजवळ संपूर्ण रॉयल एनफिल्ड लाइन-अपमध्ये दिसत नाही. कंपनीने अद्याप पॉवरट्रेन, स्पेक्स किंवा त्याच्या रेंजबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

याशिवाय या बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक आहेत. महत्वाची बाब म्हणजे सर्व आकारांच्या रायडर्ससाठी ही एक चांगली बाइक असल्याचे सिद्ध होऊ शकते. C6 मध्ये खूप पातळ टायर आहेत. त्यामुळे हे शहरी रस्त्यांसाठी एक चांगला पर्याय बनवते आणि त्याची श्रेणी वाढवण्यास देखील मदत करू शकते. C6 मध्ये, ग्राहकांना सोलो तसेच ड्युअल सीटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येतो.

फ्लाइंग फ्ली ने आगामी मॉडेल S6 इलेक्ट्रिक स्क्रॅम्बलरचा टीझर देखील जारी केला आहे. S6 मध्ये लॉन्ग ट्रॅव्हल सस्पेन्शन , ड्युअल -प्रोंग रबर-स्पोक व्हील आणि एक सपाट, बेंच-शैलीतील आसन असेल. Autocar च्या मते, S6 2026 मध्ये लॉन्च होईल.

काय सांगता ! आता किमान पेन्शन 9 हजार होणार ?

epfo

मागच्या अनेक दिवसांपासून पेन्शन धारक पेन्शन वाढीची मागणी करत आहेत. अशा पेन्शन धारकांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आता किमान पेन्शन मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार किमान पेन्शन 9000 रुपये करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पेन्शन धारकांना दिलासा मिळणार आहे.

कोणाला मिळणार लाभ

महत्त्वाची बाब म्हणजे याचा लाभ सर्व सरकारी आणि गैरसरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाभ पेन्शन धारक आणि चालू खातेधारकांना मिळणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असून यामध्ये हा निर्णय मंजूर होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.

महागाईच्या काळात पेन्शन पुरेशी नाही

खरंतर 1995 अंतर्गत अनेक पेन्शन धारकांसाठी दर महिन्याला केवळ एक हजार रुपये जगण्यासाठी सध्याच्या महागाई मध्ये पुरेसे नाहीत. मार्च 2021 मध्ये संसदेच्या स्थायी समितीने किमान पेन्शन एक हजार वरून तीन हजार रुपये करण्याची शिफारस केली होती. मात्र या महागाईच्या युगात ती अपुरी आहे. त्यामुळे 21000 रुपयांच्या मूळ वेतनानुसार पेन्शनची गणना केली जाईल असा दावा सूत्रांनी केला आहे. म्हणजेच जर आपण किमान पेन्शन बद्दल बोललो तर आता नऊ हजार रुपये मिळण्याची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे.

कामगार मंत्रालयाच्या बैठकीत किमान पेन्शन वाढीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण पेन्शन धारक अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत तीन हजार रुपये पेन्शन घेऊन जगायचे कसे? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पेन्शन वाढायला हवी याशिवाय नवीन वेतन संहिता लागू करण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या पगाराची रचना बदलू शकते. एवढेच नाही तर कामगार मंत्रालयाच्या बैठकीत किमान पेन्शनचा विचार करणं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे

पुणेकरांसाठी मोठा दिलासा; हडपसर ते हिसार दरम्यान सुरु होणार स्पेशल एक्सप्रेस ट्रेन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीच्या काळात प्रवास करायचा म्हटलं कि , अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लोकांच्या या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे नेहमी नवनवीन योजना आखत असते. प्रवाश्यांचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने एक आनंदाची बातमी दिलेली आहे , आता हडपसर रेल्वे स्थानकावरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे अनेकांना कन्फर्म तिकीट मिळण्यात अडचणी येतात. याच अडचणी लक्षात घेऊन हडपसर ते हिसार दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यात आली आहे. तसेच हि ट्रेन तब्बल 23 स्थानकावर थांबणार आहे.

हडपसर ते हिसार रेल्वेचे वेळापत्रक

गाडी क्रमांक 04724 हडपसर ते हिसार विशेष रेल्वे 4 नोव्हेंबरला हडपसर येथून दुपारी 2:15 मिनिटांनी निघून ती दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 मिनिटांनी हिसारला पोहचणार आहे. तसेच हिसार ते हडपसर विशेष रेल्वे गाडी क्रमांक 04723 हि 3 नोव्हेंबरला पहाटे 5 वाजून 50 मिनिटांनी सोडली जाईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी हडपसरला पोहचणार आहे.

23 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार

हडपसर ते हिसार विशेष एक्सप्रेस ट्रेन 23 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे . या स्थानकांमध्ये पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, पालघर, वापी, सुरत, वडोदरा, गोध्रा, रतलाम, नागदा, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, रिंगस, सीकर, नवलगढ, चिरवा, लोहारू आणि सरदुलपूर यांचा समावेश आहे. या विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे हडपसर आणि हिसार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांसाठी कन्फर्म तिकीट मिळवणे सोपे होईल, तसेच त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल. त्यामुळे पुण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनचा नक्कीच फायदा होणार आहे.

रेल्वेच्या रिझर्वेशन नियमांमध्ये बदल ; बुकिंगचा कालावधी 120 दिवसांवरून 60 दिवस

Indian railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे नेहमी प्रवाशांना फायदेशीर ठरतील अशा नियमांची आखणी करत असते. रेल्वे प्रशासनाने आता अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशनच्या नियमांमध्ये बदल केला आहे. नवीन नियमांनुसार तुम्ही केवळ 60 दिवस आधीच तिकीट बुक करू शकता. याआधी हा कालावधी 120 दिवस म्हणजेच चार महिने होता. या निर्णयाचा लाभ रेल्वेला तसेच प्रवाशांनाही होणार आहे. प्रवाशांच्या हितासाठी आणि बदलत्या काळाच्या गरजेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

रिझर्वेशनच्या नियमांमध्ये बदल

रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, अनेक प्रवासी 120 दिवस आधी तिकीट बुक करतात, पण नंतर ते रद्द करतात. तसेच काही प्रवासी तिकीट ब्लॉक करून फसवणूक करतात. या दोन मुख्य कारणांमुळे रेल्वेने नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अंदाजे 21% तिकिटे रद्द होतात आणि 4 ते 5% प्रवासी प्रवासच करत नाहीत. यामुळे अनेक प्रवाशांना तिकिटे मिळत नाहीत, त्यामुळे रेल्वेने नवीन नियमांच्या मार्गदर्शक सूचना सर्व स्टेशन आणि तिकीट काऊंटरवर पाठवल्या आहेत.

अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा कालावधी

ज्या प्रवाशांनी 120 दिवस आधी तिकीट बुक केले आहे, त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ते त्या तिकिटावर प्रवास करू शकतात. हा नियम 1 नोव्हेंबरपासून लागू झाला आहे. पण ताज एक्सप्रेस आणि गोमती एक्सप्रेस या गाड्यांच्या बुकिंग नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच भारतीय रेल्वेच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग नियमांचा विदेशी पर्यटकांवर परिणाम होणार नाही. ते 365 दिवस आधी तिकिटे बुक करू शकतात. भारतीय रेल्वेने विदेशी पर्यटकांना सुविधा देण्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा कालावधी एका वर्षाचा ठेवला आहे. या नवीन नियमामुळे विशेष गाड्यांची योजना अधिक योग्य पद्धतीने करता येणार आहे . या नियमामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या अचूकपणे ओळखू शकेल आणि सणांच्या काळात स्टेशनवरील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य संख्येत विशेष गाड्या चालवू शकेल.

एआय करेल सीट अलॉट

भारतीय रेल्वे आपल्या सीट अलॉट तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरणार आहे. एआय प्रणाली प्रवाशांच्या माहितीवर आणि उपलब्ध सीटवर आधारित सीट अलॉट करेल. ट्रेनचे सीट चार्ट प्रवासाच्या चार तास आधी तयार होतात. एआय प्रणाली ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, कारण हि सिस्टम त्यांना प्राधान्याने सीट अलॉट करेल.

North East Frontier Railway Bharti 2024| उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत 5647 पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

North East Frontier Railway Bharti 2024

North East Frontier Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय आनंदाचीआणि महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. कारण आता उत्तर पूर्व सीमा व रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती अप्रेंटिस या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 5647 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता. तसेच 3 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | North East Frontier Railway Bharti 2024

या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 5,647 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

वयो मर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वेब 15 ते 24 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करताना तुम्हाला 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख

3 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

अर्ज कसा करावा? | North East Frontier Railway Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
  • 3 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2024 | पिंपरी चिंचवड सहकारी बँक अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2024

Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2024 |नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत आम्ही उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीचे अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ही संधी पिंपरी चिंचवड मध्ये आहे. कारण आता पिंपरी चिंचवड सहकारी बँक (Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2024) अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करायचे आहेत. तसेच 16 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2024

या भरती अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला पिंपरी चिंचवड या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 35 ते 60 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेल आयडीने करायचा आहे.

ई-मेल आयडी | Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2024

[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख

16 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या अगोदर अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा वाणिज्य शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर पास असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 16 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.

निवृत्तीनंतर महिन्याला मिळतील 2.50 लाख रुपये; अशाप्रकारे करा गुंतवणूक

Retirnment Planning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतच जाणार आहे. आणि या सगळ्यात अनेक लोक भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करून ठेवत असतात. भविष्यात जाऊन आणीबाणीच्या काळात आपल्याला आर्थिक गरज असल्यास आपली गुंतवणूक आपल्या कामाला येईल. यासाठी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. तसेच अनेक लोक सेवानिवृत्तीचे देखील नियोजन करत असतात. परंतु यासाठी किती गुंतवणूक कराव कुठे गुंतवणूक करावी? यांसारखे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. परंतु तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. जेणेकरून तुम्हाला निवृत्तीनंतर चांगला परतावा मिळेल. आणि तुमच्या आयुष्य तुम्हाला चांगले जमता येईल.

तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल इतक्या लवकर तुम्हाला परतावा मिळेल. आणि खूप चांगला परतावा मिळेल. तुमच्या निवृत्तीसाठी सर्वात सुरक्षित योजना म्हणजे एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम याद्वारे तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करा. आणि निवृत्तीनंतर तुम्हाला जवळपास 5 कोटी रुपये मिळतील. आता तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी बचत करून निवृत्तीनंतर 2.5 लाख रुपये पेन्शन कसे मिळवायचे? याबद्दल आपण जाणून घेऊया.

जर तुम्ही नुकतीच नोकरी करायला सुरुवात केली असेल, तर हा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्हाला जर तुमच्या निवृत्तीनंतर 5 कोटी रुपये जमा करायचे असेल, आणि तुम्हाला 25 व्या वर्षी नोकरी मिळाली, तर तुम्ही तुमच्या पगारातून दररोज 442 वाचायला सुरुवात करा. आणि ती रक्कम एनपीएस या योजनेमध्ये गुंतवा. त्यानंतर निवृत्तीनंतर 5 कोटी रुपये सहज जमा होते. तुम्ही जर या योजनेमध्ये दर रोज 442 गुंतवले, तर तुम्ही दर महिना 13,260 रुपये जमा होतील आणि अशा पद्धतीने तुम्ही व्हायच्या 25 वर्षापासून सुरुवात केली, तर 60 व्या वर्षापर्यंत ही गुंतवणूक होईल. यामध्ये तुम्हाला 10 टक्के व्याज मिळेल आणि चक्रवाढ व्याज तुम्हाला साठाव्या वर्षी 5.12 कोटी रुपये मिळतील.

या योजनेतून तुम्ही निवृत्तीनंतर केवळ 60% रक्कम काढू शकता. याचा अर्थ तुम्ही 3 होती रुपये काढू शकता. आणि उरलेले दोन कोटी रुपये तुम्हाला वार्षिक योजनेतून गुंतवावे लागेल. म्हणजे तुमचा संपूर्ण गुंतवल्यास तुम्हाला दर महिन्याला भरपूर पैसे देखील मिळेल. या मध्ये तुम्हाला जवळपास पाच ते सहा टक्के दराने व्याज मिळेल. म्हणजेच 5.12 कोटींवर तुम्हाला दर महिन्याला 25.60 ते 30. 72 लाख रुपये मिळतील. म्हणजेच तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यात अत्यंत आनंदाने जगू शकता. तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण देखील येणार नाही. यासाठी जर तुम्ही आजपासून एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल.

सुकं खोबर विमानातून नेण्यास का आहे बंदी? जाणून घ्या नियम

Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमानाने आयुष्यात एकदा तरी प्रवास करावा, हे प्रत्येक सामान्य कुटुंबातील व्यक्तीचे स्वप्न असते. विमानाने प्रवास करणे हे अत्यंत सोयीचं असतं. तसेच वेळ देखील कमी लागला, तरी विमानाने प्रवास करणे हे खर्चिक असते. विमानाने प्रवास करताना अनेक नियम आणि निर्बंध लादले जातात. विमानाने प्रवास करताना तुम्ही तुमच्या सोबत कोणत्या वस्तू नेऊ शकता? कोणत्या नाही? याचे देखील नियम आहेत. जर तुम्ही नियमाच्या बाहेर असणारी कोणती वस्तू नेली, तर ती तुम्हाला विमानतळावरच सोडून द्यावी लागते. अन्यथा तुम्हाला फ्लाईटने प्रवास करून देत नाही. परंतु जर तुम्ही देखील आता काही दिवसात पहिल्यांदाच फ्लाईटने प्रवास करत असाल, तर आपण विमानात कोणत्या गोष्टीने घेऊन जाव्यात तसेच कोणत्या गोष्टी नेऊ नयेत. याबद्दलच्या संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

विमानाने प्रवास करताना कोणत्याही नागरिकाला लाइटर, ड्राय सेल बॅटरी सारख्या ज्वलनशील वस्तू त्याचप्रमाणे चाकू, ब्लेड यांसारख्या धारदार आणि तीक्ष्ण वस्तू घेऊन जाण्यास पूर्णपणे मनाई आहे. या गोष्टींना अनेक कारणं आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? विमानातून तुम्हाला वाळलेलं नारळ किंवा सुक खोबरं घेऊन जाण्यासाठी देखील बंदी आहे. आता वाळलेल्या खोबऱ्याचा आणि विमानाने प्रवास करण्याचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. जेव्हा लोक देशाबाहेर राहत असतात. त्यावेळी तिथे जाताना अनेक घरगुती भारतीय पदार्थ ते घेऊन जात असतात. त्यातील सुक खोबरं हा एक प्रकार आहे. परंतु सुक खोबरं तसेच नारळ फ्लाईट मधून नेण्यास पूर्णपणे बंदी आहे.

एव्हिएशन ट्रेनिंग इंडियाचे एज्युएशन तज्ञ रामगोपाल यांनी सांगितल्याप्रमाणे वाळलेल्या नारळाचे बाहेरील कवच हे खूप कठीण असते. आणि ते एका शस्त्राप्रमाणे काम करू शकते. जर कोणतीही आणीबाणी आली, तर यामुळे विमानाचे नुकसान होऊ शकते. आणि इतर प्रवाशांना इजा होऊ शकते. यामुळे सुके नारळ फ्लाईटमधून नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. अशा प्रकारचे कोणतेही कठीण पदार्थ नेण्यास फ्लाईटमध्ये बंदी आहे.

तसेच विमान चालक तज्ञांच्या मते, नारळाच्या बाह्यकवचाचे तुकडे पटकन होतात. आणि ते तुकडे इतरत्र जाऊन लोकांना लागू शकतात. आणि त्याची इजा देखील होऊ शकते. सुक्या नारळात ओलावा असतो. त्यामुळे केबिनच्या हवेच्या गुणवत्तेत देखील यामुळे बदल होऊ शकतो. या सगळ्या नियमांमुळे आणि कारणांमुळे फ्लाईटमधून नारळ घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही. जर काही कारणास्तव ही परवानगी दिली, तर त्यांना फक्त चेक इन मध्येच सुका नारळ घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली जाते.

हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल फोन शोधणे झाले सोप्पे; या स्टेप्स करा फॉलो

Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल मोबाईल चोरी होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मोबाईल चोर देखील मोबाईल मोठ्या प्रमाणात चोरी करत असतात. आतापर्यंत जवळपास 2.85 लाख हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात यश आलेले आहे. या शोधलेल्या मोबाईल पैकी 21000 मोबाईल जप्त केलेले आहे, तर 6.8 लाख फोन ब्लॉक करण्यात आलेले आहे. सरकारी आकडेवारीनुसार आपल्या देशात दर महिन्याला जवळपास 50 हजार मोबाईल चोरीला जातात.

या मोबाईल चोरीला आळा घालण्यासाठी सरकारने साथी पोर्टल सुरू केलेले आहे. हे पोर्टल 16 मे पासून चालू करण्यात आलेले आहे. या पोर्टल द्वारे चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल ट्रॅक करून त्यांना ब्लॉक करण्यात आलेले आहेत. यासाठी काही गोष्टी लॉन्च देखील करण्यात आलेल्या आहेत. दोन महिन्यातच अनेक चोरीला गेलेले किंवा हरवलेले फोन सापडलेले आहेत.

याबाबत दूरसंचार विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे पोर्टल अत्याधुनिक टेक्नॉलॉजी प्रदान करते. जप्त झालेल्या मोबाईल फोनची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याद्वारे मोबाईलचे नेमके ठिकाण शोधले जाऊ शकते. यामुळे चोरीच्या प्रकरणांमध्ये घट झालेली आहे. पोलीस चोरट्यांना शोधून काढू शकतात. मोबाईल चोरी तसेच फ्रॉड अशा फसवणुकीपासून नागरिकांना वाचवण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे.

या सरकारच्या साथी पोर्टलच्या माध्यमातून आता मोबाईल युजर्सला त्यांच्या नावावर आणखी कनेक्शन घेण्यात आले आहे की नाही याची माहिती देखील मिळते. हरवलेल्या मोबाईलचे लोकेशन शोधता येते. तसेच आयएमइआय क्रमांक मिळून आपण तो मोबाईल ब्लॉक करू शकतो. आणि हा फोन ब्लॉक केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला वापरता येत नाही.

चोरीला गेलेला मोबाईल कसा शोधायचा ?

  • हा मोबाईल शोधण्यासाठी तुम्हाला संचार साथी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • होम पेजवर तुम्हाला लॉस्ट युजर मोबाईल स्क्रोल करण्याचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा त्यानंतर ब्लॉक किंवा मिसिंग मोबाईल या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर एक फॉर्म ओपन होईल. यामध्ये फोनशी संबंधित असणारी माहिती द्यावी लागेल. जसे की मोबाईल आयएमआय नंबर, डिवाइस मॉडेल, त्याचप्रमाणे कंपनीचे नाव आणि मोबाईलच्या बिलाची प्रत देखील तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला सरकारी आयडी नंबर, नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल सह तुमची वैयक्तिक माहिती टाकावी लागेल. आणि तुमचे ओळखपत्र देखील अपलोड करावे लागेल.
  • यानंतर तुमच्या फोनमध्ये दुसरे सिम टाकताच त्याचे लोकेशन तुम्हाला समजेल आणि तुम्हाला तो फोन ब्लॉक करता येईल.

ऐन निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का; हिना गावित यांनी दिला राजीनामा

Heena Gavit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि या काळात राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलेली असतानाच पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता ऐन विधानसभेच्या निवडणुकीत नंदुरबारमध्ये भाजप या पक्षाला एक मोठा धक्का बसलेला आहे. कारण भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भाजप पक्षाला राजीनामा दिलेला आहे. भाजपने हिना गावित यांना नंदुरबारमधून उमेदवारी दिली होती. परंतु त्यांचा हा उमेदवारीचा अर्ज बाद झाला. त्यानंतर हिना यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. परंतु आता त्यांच्या पक्षाला अपक्ष उमेदवारीचा कोणताही कोणती अडचण निर्माण होऊ नये. म्हणून त्या राजीनामा देत आहेत, असे विधान त्यांनी केलेले आहेत.

डॉक्टर हिना गावित या अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढत आहे. अक्कलकुवा मतदारसंघ भाजपला सुद्धा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे गटात विरोधात काम करत असल्यामुळे मी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करीत असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी मतदारसंघात अनेक विकासाची कामे देखील केलेली आहे. आणि याच विकास कामाचा फायदा त्यांना होणार आहे. त्यामुळे भरघोस मतदान मिळून त्या विजयी होणार आहेत, असा दावा त्यांनी केलेला आहे.

हिना गावित यांनी 28 तारखेला अक्कलकुवा आक्रनी या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आणि अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु जागा वाटप करताना एकही जागा शिंदे गटाला सुटली नाही. हिना गावित या 2014 रोजी लोकसभेत पहिल्यांदा निवडून गेल्या होत्या. लोकसभा निवडणूक लढल्यानंतर त्या सर्वाधिक तरुण खासदार ठरल्या होत्या. ज्यावेळी हिना गावित या लोकसभा निवडणूक लढल्या होत्या. त्यावेळी त्या केवळ 26 वर्षाच्या होत्या. हिना गावित यांनी त्यांच्या पहिल्याच कामगिरीने लोकांवर खूप चांगली छाप पडलेली आहे. आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. परंतु आता विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असताना त्यांनी भाजप पक्षाला राजीनामा दिल्यानंतर याचे कोणते परिणाम भोगावे लागणार आहेत? हे पाहणे महत्त्वाचे आहे.