Monday, December 29, 2025
Home Blog Page 387

भारतीय रेल्वे लॉन्च करणार ‘सुपर ॲप’ ; सर्व सुविधा असतील एकाच ॲप मध्ये

indian railway app

भारतीय सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेचे महत्व काही वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. त्यातच आता भारतीय रेल्वेच्या सुविधा सुद्धा डिजिटल होण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे स्टेशन्सवर आता तिकिटांसाठी QR कोड प्रणाली बसवण्यात आली आहे. तर तिकिटे , आरक्षण या सुविधा सुद्धा घरबसल्या करता येतात. त्यातच आता आणखी एकाची भर पडणार आहे. भारतीय रेल्वे डिसेंबर 2024 च्या अखेरीस सुपर ॲप लाँच करण्याची योजना आखत आहे. कसे असेल हे नवीन ॲप ? चला जाणून घेऊया …

एक असे नवीन ॲप, जे सध्याच्या IRCTC प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळे आहे, देशभरातील लाखो प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम करण्यासाठी एका प्लॅटफॉर्मवर अनेक सेवा हे ॲप एकत्रित करेल.

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (CRIS) द्वारे विकसित केले जाणारे आगामी नवीन ॲप, प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी अनेक रेल्वे सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करेल. नवीन ॲप हे अनेक सध्याच्या मोबाइल ॲप्सचे एकत्रीकरण असेल जे रेल्वे-लिंक्ड सेवा हाताळतात. नवीन ॲप प्रवासी आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुक करणे आणि ट्रेनची स्थिती तपासणे यासारख्या अनेक सेवा प्रदान करेल. नवीन ॲप वापरकर्त्यांना तिकीट बुक करणे, प्लॅटफॉर्म पास खरेदी करणे, वेळापत्रकांचे निरीक्षण करणे, ट्रेनची स्थिती तपासणे आणि इतर कामे करण्यास अनुमती देईल.

नवीन सुपर ॲप ची वैशिष्ट्ये

  • आगामी नवीन ॲप रेल्वे प्रवाशांसाठी सर्वसमावेशक डिजिटल सहचर म्हणून काम करेल कारण प्रवासी वेगवेगळ्या ॲप्स किंवा प्लॅटफॉर्ममध्ये स्विच न करता अखंडपणे ट्रेन तिकीट बुक करू शकतील. प्रवासी आसन उपलब्धता तपासण्यापासून पसंतीचे वर्ग निवडणे आणि सवलतीसाठी अर्ज करण्यापर्यंत सर्व काही तपासू शकतात.
  • नवीन ॲपसह, भारतीय रेल्वे प्रवाशांना सुपर ॲपद्वारे थेट प्लॅटफॉर्म पास तयार करण्यास अनुमती देईल आणि जे लोक तिकीट काउंटरवर लांब रांगा न लावता आपल्या प्रियजनांसोबत स्टेशनवर जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी नवीन वैशिष्ट्य उपयुक्त ठरेल.
  • नवीन ॲप प्रवाशांना भागीदार रेस्टॉरंट्स आणि विक्रेत्यांच्या विस्तृत निवडीतून जेवणाची प्री-ऑर्डर करण्याची परवानगी देईल. नवीन वैशिष्ट्ये प्रवाशांना त्यांच्या आसनांवर थेट ताजे आणि उच्च दर्जाच्या जेवणाचा आनंद घेता येईल याची खात्री करतील.
  • सुपर ॲप रिअल-टाइम ट्रेनच्या धावण्याच्या स्थितीबद्दल देखील माहिती देईल आणि ट्रेनची ठिकाणे, अंदाजे आगमन वेळा आणि संभाव्य विलंब याबद्दल अचूक आणि अद्ययावत माहिती अपडेट करेल.

Bussiness Idea | नोकरी करता करता करा हे व्यवसाय; महिन्याला होईल बक्कळ कमाई

Bussiness Idea | आजकाल अनेक लोकांना नोकरी करता करता स्वतःचा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असतो. जेणेकरून त्यांना अतिरिक्त पैशाचा एक मार्ग तयार होईल. परंतु नोकरी करताना असा कोणता व्यवसाय आहे, ज्यात तुम्हाला कमी वेळ द्यावा लागेल, आणि त्यातून पैसे देखील चांगले मिळेल. या गोष्टीची माहिती अनेकांना माहित नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बिझनेस आयडिया बद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी प्रमाणात गुंतवणूक करू शकता. पण त्यातून तुम्हाला चांगला नफा देखील मिळेल. तसेच तुमच्या नोकरीला यातून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. तुम्ही नोकरी करता करता घर व्यवसाय (Bussiness Idea) करू शकता. हे काही असे व्यवसाय आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागणार नाही. परंतु जसा तुमचा बिजनेस वाढत जाईल, तस तशी तुमची गुंतवणूक वाढवून तुमची कमाई देखील वाढत जाईल. आता हे व्यवसाय नेमके कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया.

फायनॅनशियल प्लानिंग सर्विस | Bussiness Idea

अनेक लोकांकडे अमाप पैसा असतो. परंतु तो पैसा कुठे आणि कसा गुंतवायचा? या गोष्टी अनेकांना माहित नसतात. त्यांना फायदेशीर प्लॅनिंग करायला जमत नाही. हे पैसे कुठे गुंतवले तर तुम्हाला त्यातून जास्त पैसे मिळतील? तसेच तुमचे पैसे कशाप्रकारे सुरक्षित असतील? याची माहिती प्रत्येकाला हवी असते. यामध्ये तुम्ही फायनान्शिअल संबंधित माहिती देऊन चांगले पैसे कमवू शकता. यासाठी तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग सर्विस चालू करू शकता आणि चांगल व्यवसाय करू शकता. यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मोठी गुंतवणूक करावी लागत नाही. तुम्हाला या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.

गेम स्टोर

आजकाल अनेक लहान मुलांना तसेच मोठ्या मुलांना देखील गेम खेळायला खूप आवडतात. परंतु गेम्सचे संपूर्ण सेटअप घरी करता येत नसल्याने अनेक मुलंही मार्केटमध्ये गेम्स स्टोअरमध्ये गेम खेळण्यासाठी करतात तुम्हीही अशा ठिकाणी राहत असाल. जिथे या गेम्स स्टोअरला जास्त मागणी आहे. त्या ठिकाणी तुम्ही गेम्स स्टोर चालू करून चांगला नफा मिळू शकता. यासाठी तुम्हाला काही डिव्हाईसची आवश्यकता आहे ही डिवाइस तुम्हाला भाड्याने देखील मिळतील.

ब्यूटी आणि स्पा शॉप | Bussiness Idea

महिलांसाठी हा घरगुती परंतु अत्यंत फायदा कमावून देणारा हा व्यवसाय आहे. तुम्हाला ब्युटी आणि स्पा बद्दल चांगले ज्ञान असेल, तर यातून तुमची चांगली कमाई होईल. यासाठी तुम्ही घरात ब्युटी अँड स्पा शॉप उघडू शकता. आणि दर महिन्याला त्यातून खूप चांगली कमाई करू शकता. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला अगदी कमी गुंतवणूक करावी लागते.

कोल्हापुरात काँग्रेसला धक्का …! कार्यकर्त्यांसमोर सतेज पाटलांना अश्रू अनावर… पहा व्हिडीओ

satej patil

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकींमुळे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. अशातच काल दिनांक ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. मात्र याचवेळी कोल्हापूर उत्तर मतदार संघात मोठ्या धक्कादायक आणि नाट्यमय घडामोडी झालेलया पाहायला मिळाल्या. दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असतानाच अचानक उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरिमाराजे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर मात्र सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांशी बोलताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली…

कोल्हापूर म्हणजे काँग्रेचा बालेकिल्ला मानला जातो. वर्षानुवर्ष कोल्हापूरमध्ये काँग्रेसची पकड मजबूत आहे असं असताना आधीच राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाल्यामुळे यंदाच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काय निकाल लागेल याची उत्सुकता असतानाच अचानक कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेसच्या मधून राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली. खरंतर पक्षातील वरिष्ठांनी आधी उमेदवारी जाहीर केलेल्या राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली त्यामुळे सतेज पाटील चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. माधुरिमाराजे यांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अर्ज देखीलदाखल केला होता. मात्र अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार शाहू छत्रपती यांच्या समोर सतेज पाटील यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करून दाखवली. यावेळी ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले ” दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली” अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. “जर लढायचं नव्हते तर उमेदवारी घ्यायलाच नको होती मी माझी ताकद दाखवली असती” अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

अर्ज मागे घेऊन मधुरिमाराजे गेल्यानंतर दरवाजातच सतेज पाटील यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या समोरच” हे पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं आहे हे चालणार नाही. मग आधीच नाही म्हणून निर्णय घ्यायला हवा होता. मला काही अडचण नव्हती. हे चुकीचं आहे महाराज… हे मला मान्य नाही. मला तोंडघशी पाडण्याची गरज नव्हती” असं म्हणत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली तसाच शाहूंच्या समर्थकांना सतेज पाटलांनी ” हे अजिबात बरोबर नाही तुम्ही जेवढ्यानी आग लावली त्या सर्वांना सांगत आहे” असं म्हणत आपला संताप व्यक्त केला.

सतेज पाटलांना अश्रू अनावर …

दरम्यान मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची बातमी तोपर्यंत सर्वत्र पसरली होती. यानंतर अजिंक्यतारा येथील कार्यालयासमोर सतेज पाटलांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांशी बोलत असताना सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं. “माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो, मला काही माहीत नाही. जे काय झालं ते तुमच्या समोर आहे,” असं म्हणत भाषणाला सुरुवात केल्यानंतर सतेज पाटील यांचा कंठ दाटून आला. त्यानंतर त्यांनी माईक खाली ठेवत ते खाली बसले आणि डोळे पुसू लागले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ‘सतेज पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर एका पदाधिकाऱ्याने उठून कार्यर्त्यांची गर्दी पाहून आणि पाठिंबा पाहून सतेज पाटलांच्या डोळ्यात आश्रू आल्याचं सांगत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास सांगितलं. “जे काही घडलं त्यावर मी आज काही टीका-टीप्पणी करणार नाही. मात्र जे घडलं त्याला समोरे जाण्याचं समर्थ्य तुम्ही मला द्यावं अशी माझी विनंती आहे,” असं सतेज पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले.

PM Kisan Yojana | ‘या’ दिवशी येणार PM किसान योजनेचा 19 वा हप्ता; तारीख आली समोर

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana | केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. आपल्या भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे सरकार देखील देशातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतात. त्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी अनेक प्रयत्न देखील करत असतात. अशातच काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. आणि ती योजना खूप लोकप्रिय झाली. या योजनेचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) असे आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षाला 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे जवळपास 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या आहेत. आणि आता पुढचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? याची सगळेजण वाट पाहत आहेत.

याआधी 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. जवळपास 9.4 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. आणि आता लवकरच या योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.

या योजने अंतर्गत 6 हजार रुपये दर वर्षाला 3 समान हप्त्यांमध्ये दिली जातात. ही रक्कम एप्रिल – जुलै, ऑगस्ट- नोव्हेंबर तसेच डिसेंबर – मार्च या तीन महिन्यांमध्ये दिले जाते. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार आपण सन्मान योजना 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजना ही जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना बनलेली आहे.

या योजनेचा लाभ आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळालेला आहे. परंतु जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी इ केवायसी केलेले नसेल, तर तुम्ही ते इ केवायसी करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही केवायसी केले नाही, तर पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यातील येणार नाही. यासाठी तुम्हाला एम किसान पोर्टलवर जाऊन ई केवायसी करावी लागेल. नंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी; आहारात करा या पदार्थ्यांचा समावेश

Hemoglobin Rich foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योग्य पौष्टिक आहार घेणे खूप गरजेचे असतो. आज काल लोकांची जीवन शैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यामुळे अनेक लोक घरचे जेवण न जेवता बाहेरील फास्ट फूड खातात. आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. तुम्ही जर पौष्टिक आहार घेतला नाही, तर शरीरात अनेक पोषण तत्त्वांची कमतरता असते. त्यात आजकाल रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात चालू झालेल्या आहेत.

जर तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाली तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात असणे खूप गरजेचे असते. तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाली तर तुम्हाला अशक्तपणा येतो, थकवा जाणवतो तसेच श्वास घेण्यास देखील त्रास होतो. तुम्हाला जर अशा काही समस्या जाणवत असेल, तर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि उपचार देखील सुरू करा. हिमोग्लोबिनची कमी झाल्यावर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मनुके आणि खजूर

ड्रायफ्रूट्स हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यातही मनुके आणि खजूर खाल्ल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. यामध्ये असलेले अनेक घटक आरोग्य देखील सुधारतात. मनुक्यांमध्ये फॉलिक ऍसिड आढळते. त्यामुळे रक्तातील लाल पेशी वाढतात. तसेच सकाळी उठल्यावर जर तुम्ही नियमितपणे मनुके खाल्ले, तसेच खजूर देखील खाल्ले, तर रक्तातील लाल पेशी वाढविण्यास त्याची मदत होते.

पालक

पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि जीवनसत्व असतात. तुम्ही जर रोजच्या आहारात एक तरी पालेभाजी सेवन केले, तर तुमच्या आरोग्याला त्याचे खूप फायदे होतात. पालेभाज्या खाल्ल्याने आपल्याला चांगले पौष्टिक तत्त्व मिळतात. तसेच हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यातही पालकमुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

ब्रोकोली

फ्लॉवरप्रमाणे हिरव्या रंगाची दिसणारी ब्रोकोली देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. ब्रोकोलीमध्ये विटामिन सी आणि आयन भरपूर प्रमाणात असतात. तसेच अँटीऑक्सिडंट देखील असतात. यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. आणि शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. तुम्ही जर ब्रोकोलीचे सूप किंवा इतर पदार्थ बनवून खाल्ले तर तुमच्या शरीराला याचा खूप फायदा होतो.

बीट

तुम्ही जर लोहयुक्त बीटाचे दररोज सेवन केले, तर तुमच्या शरीरातील रक्ताची तसेच पातळी देखील वाढते. बीटाचा रस तुम्ही नियमित पिल्यावर तुमचे आरोग्य देखील सुधारते. तसेच आयर्न आणि प्रोटीनची कमतरता भरून निघते. शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया देखील चांगली होते. बीट मुळे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. तसेच साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी देखील बीटचा फायदा होतो.

शेवग्याच्या भाजीने शरीराला होणार अद्भुत फायदे; वाचून तुम्हीही रोज कराल जेवणात समावेश

Moringa
Moringa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल अनेक लोक हे घरातील जेवण तसेच पालेभाज्या न खाता बाहेरील फास्ट फूड तसेच हॉटेलमध्ये जेवण करतात. त्यामुळे त्यांना आरोग्य संबंधित विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. परंतु जर तुम्ही नियमितपणे घरातील ताजे अन्न खाल्ले तर तुमच्या शरीराला चांगले पोषण मिळेल. आणि तुम्हाला कोणता आजारही होणार नाही. आपल्या पालेभाज्या तसेच कडधान्य आपल्या शरीरासाठी खूप पोषक तत्वे देतात. त्यातही शेवगा अशी एक अशी भाजी आहे, ज्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

शेवग्यापासून अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवले जातात. शेवग्याची शेंगांची भाजी, पानांची भाजी लोक आवडीने खातात. त्यामुळे आपल्या शरीराला खूप जास्त फायदे होतात. या शेवग्यामध्ये विटामिन ई, विटामिन सी, विटामिन ए, कॅल्शियम, आयन, प्रोटीन हे मुबलक प्रमाणात असतात. तसेच तुम्ही जर या शेवग्याच्या भाजीचे नियमितपणे सेवन केले, तर तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. आता या शेवग्याच्या भाजीचे तुम्ही नियमितपणे सेवन केले, तर तुमच्या शरीराला कोणते फायदे होतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

शेवग्याच्या भाजीचे फायदे

रोगप्रतिकार शक्ती वाढते

शेवग्याच्या भाजीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तुमच्या शरीराला जर कोणत3ही इन्फेक्शन झाले असेल, तर त्यासोबत लढण्याची ताकद देखील शेवग्यामुळे आपल्या शरीराला प्राप्त होते

हृदयासाठी फायदेशीर

शेवग्याच्या भाजीचे सेवन केले, तर तुमच्या हृदयाला देखील खूप फायदे होतात. कारण या भाजीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये येते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते.

सूज कमी होते

तुम्ही जर शेवग्याच्या शेंगांचे नियमितपणे सेवन केले, तर तुमच्या शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. तसेच अनेक गंभीर आजारांचा धोका देखील कमी होतो.

पचनक्रिया सुधारते

तुम्ही जर शेवग्याच्या भाजीचे नियमितपणे सेवन केले ते तुमची पचनक्रिया देखील सुधारते. तसेच पोटा संबंधित ज्या काही समस्या असतील, त्या देखील दूर होतात. तसेच बद्धकोष्ठता देखील दूर होते.

प्रोटीनचे प्रमाण वाढते

जर तुम्ही शाकाहारी असाल आणि प्रोटीनसाठी कोणता पदार्थ खावा, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल? तर शेवग्याची भाजी ही तुमच्यासाठी प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे. तुम्ही जर शेवग्याच्या भाजीचे नियमितपणे सेवन केले, तर तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळेल.

कमी किंमतीत खरेदी करा Samsung Galaxy A54 5G; आहेत जबरदस्त फीचर्स

Samsung Galaxy A54 5G

सध्या दिवाळी जरी संपली असली तरी इ कॉमर्स वेबसाईटस वर ऑफर्सचा पाऊस सुरूच आहे. तूम्ही देखील नवा मोबाईल घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. इ कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट तुम्हाला Samsung Galaxy A54 5G मोबाईल कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी देत आहे. Samsung Galaxy चे मोबाईल फोन्स जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याचे फीचर्स देखील लोकांच्या पसंतीस उतरतात. आजच्या लेखात आपण Samsung Galaxy A54 5G चे फीचर्स आणि फ्लिपकार्ट वर त्याच्या कमी झालेल्या किंमती बद्दल जाणून घेणार आहोत.

कॅमेरा

Samsung Galaxy A54 5G Camera या मोबाईलच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 50MP पहिला, 12MP दुसरा आणि 5MP तिसरा सेन्सर उपस्थित आहे. Samsung Galaxy A54 मध्ये 6.4 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.मोबाइल फोनमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32MP कॅमेरा आहे.

बॅटरी

या सॅमसंग स्मार्टफोनला तासन्तास चालण्यासाठी 5000mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. जलद काम करण्यासाठी Samsung Galaxy A54 मध्ये Exynos 1380 प्रोसेसर आहे. या डिव्हाइसमध्ये 256GB स्टोरेज आणि 8GB रॅम आहे.

किंमत

Samsung Galaxy A54 चा 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart वर 27,928 रुपयांना उपलब्ध आहे. Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 5 टक्के सूट उपलब्ध आहे. फोनवर 982 रुपये प्रति महिना नो-कॉस्ट ईएमआय दिला जात आहे.

लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी ठरणार मैलाचा दगड; अर्थसंकल्पात केलीये भविष्यातील निधीची तरतूद

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने त्याचप्रमाणे राज्य सरकारने विविध गटातील नागरिकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. ज्याचा फायदा देखील नागरिकांनी घेतलेला आहे. परंतु अनेक योजना आणून देखील लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला अपयश आले. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली. ज्या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे आहे. या योजनेअंतर्गत जवळपास दोन कोटी महिलांना फायदा झालेला आहे. ही योजना संपूर्ण राज्यभरात गाजली तसेच लोकप्रिय झाली. या योजनेच्या अनेक हेडलाईन देखील तयार झाल्या आहेत. आणि आता हीच योजना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारचा एक भक्कम आधार असल्याचे म्हटले जात आहे.

सरकार हे महिलांसाठी तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. आणि त्यातीलच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपये देण्यात आलेले आहेत. 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी आत्तापर्यंत सरकारने अनेकवेळा मुदतवाढ देखील केलेली आहे.

दोन कोटी महिलांना लाभ

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही संपूर्ण राज्यातील महिलांसाठी एक आर्थिक पाठबळ देणारी योजना ठरली. परंतु विरोधकांनी मात्र या योजनेवर नेहमीच टीका करून फक्त निवडणुकीसाठी ही योजना आणली असल्याचा आरोप केलेला आहे. निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद पडणार आहे. तसेच दीड हजार रुपयांमध्ये महिलांचे काय होते? अशा अनेक टीका करण्यात आलेल्या आहेत. परंतु महिलांनी याकडे अजिबात लक्ष दिले नाही. आणि या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. आतापर्यंत तब्बल दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

भविष्यात मानधन वाढवणार

रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर या ही योजना चालू करण्यात आली. परंतु ही योजना बंद होणार असल्याची टीका विरोधकांनी केलेली आहे. परंतु ही योजना रक्षाबंधनापासून आता भाऊबीजेपर्यंत पोहोचलेली आहे. आणि भविष्यातही योजना सुरू अशीच राहणार आहे. असा विश्वास देखील महायुती सरकारने व्यक्त केलेला आहे. तसेच भविष्यात जाऊन या योजनेचे मानधन वाढणार असल्याचा विश्वास देखील महायुती सरकारने व्यक्त केलेला आहे.

डिसेंबर महिन्यात येणार सहावा हप्ता

आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पाच हप्ते हे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे. आणि डिसेंबर महिन्यामध्ये सहावा हप्ता देखील येणार आहे. तसेच योजनेच्या निधीची अर्थसंकल्पात देखील तरतूद केलेली आहे. त्यामुळे भविष्यात जाऊन ही योजना बंद पडणार नाही. असे महायुती सरकारकडून सांगण्यात आलेले आहेत.

सरकारची 46 कोटींची तरतूद

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीसाठीच आहे. असा आरोप विरोधकांनी केलेला आहे. परंतु या योजनेसाठी मागील अर्थसंकल्पाचे 40 हजार कोटींची तरतूद देखील केली असल्याने ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. तसेच या योजनेचा राज्याच्या आर्थिक स्तरावर कोणताही परिणाम झाला नाही. असे सरकारकडून देखील सांगण्यात आलेले आहेत. या योजनेचे यश पाहता सरकारने आगाऊ पैशांची देखील व्यवस्था केलेली आहे. आचारसंहितेच्या काळातही महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, म्हणून अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वीच महिलांना सलग दोन महिन्याचे 3000 रुपये आलेले आहेत.

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक करा, आणि दर महिन्याला मिळवा चांगला परतावा

Post Office Scheme

Post Office Scheme |आजकाल आर्थिक गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. भविष्याचा विचार करता आर्थिक सुरक्षितता असणे खूप गरजेचे आहे. आजकाल मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या अनेक योजना आहेत. पोस्ट ऑफिस मधून देखील अनेक योजना आहेत. त्यामुळे अनेक लोक पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफिस मधून गुंतवणूकदारांना चांगले व्याजदर मिळते. तसेच इतर अनेक सुविधा देखील उपलब्ध होतात. त्यामुळे पोस्ट खाते ही एक विश्वासाहार्य योजना बनलेली आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Scheme) अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत योजना आहेत. अशीच एक पोस्ट ऑफिसची पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम आहे. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करू शकता. आणि त्यातून तुम्हाला चांगला परतावा देखील मिळणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला एकदाच एक ठराविक रक्कम गुंतवावी लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला नियमितपणे त्यातून उत्पन्न मिळेल. आता ही योजना नक्की काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.

काय आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजना ? | Post Office Scheme

पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम योजनेमध्ये आला तुम्ही गेलेल्या गुंतवणुकीवर 7.4% वार्षिक व्याज मिळते. यामध्ये तुम्ही सिंगल अकाउंट देखील उघडू शकता. या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी 9 लाख रुपये गुंतवू शकता. तसेच तुमचे जॉईंट अकाउंट असेल तर तुम्हाला 15 लाख रुपये देखील गुंतवता येतात. या योजनेचे सगळ्यात चांगले वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला 100 टक्के परताव्याची हमी असते. आणि तुम्ही गुंतवलेले पैसे देखील अगदी सुरक्षित.

पोस्ट ऑफिसच्या या मंथली इन्कम स्किममध्ये तुम्हाला खाते उघडायचे असेल, तर तुम्ही कमीत कमी 1000 रुपये गुंतवणे गरजेचे आहे. तुम्ही 1000 च्या पटीत पुढील पैसे गुंतवणूक शकता. एका सिंगल अकाउंटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता. तर जॉईंट अकाउंट मध्ये तुम्हाला 15 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेमध्ये तुम्हाला दर वर्षाला 7.4 टक्के व्याजदर मिळते. तसेच तुम्ही जमा केलेल्या पैशावर जे व्याज मिळते ते बारा महिन्यात विभागले जाते. आणि इतर प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात. या योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे. पाच वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला ही योजना पुढे सुरू ठेवायची असेल, तर नवीन व्याजदर लागू होईल.

या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर त्या तारखेपासून पुढील एक वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या खात्यातून तुम्हाला पैसे काढता येत नाही. अंतर्गत तुम्ही खाते उघडले तर त्या तारखेपासून एक वर्षानंतर आणि तीन वर्षांपूर्वी योजना बंद केली, तर मूळ रकमेच्या 2 टक्के रक्कम कमी केली जाईल. त्याचप्रमाणे खाते उघडण्याच्या तारखेपासून तीन वर्षानंतर आणि पाच वर्षाच्या आधी जर खाते बंद केले, तर मूळ रकमेच्या 1% रक्कम कमी केली जाईल.