Sunday, December 28, 2025
Home Blog Page 405

लग्नासाठी ट्रेनचा संपूर्ण डबा बुक करणे स्वस्त आहे की सीट्स ? जाणून घ्या

IRCTC

आपल्याकडे तुळशीची लग्न झाल्यावर लग्नाचा सिझन सुरु होतो. लांब पाल्याच्या ठिकाणांकरिता बस ने प्रवास करण्यापेक्षा रेल्वेने केलेला प्रवास हा सुखकर आणि बजेटफ्रेंड्ली सुद्धा असतो. तुमच्या सुद्धा घरात आगामी काळात कुणाचे लग्न असेल तर लांबच्या नातेवाईकांसाठी तुमही ट्रेनची बोगी बुक करू इच्छित असाल त्याचे नियोजन कसे करावे ? बोगी बुक करायची की सीटस बुकरायच्या ? कोणता पर्याय योग्य ठरेल हेच आजच्या लेखात जाणून घेऊया…

काय आहे स्वस्त ?

लग्नाच्या वऱ्हाडी मंडळींसाठी ट्रेनचा संपूर्ण डबा किंवा कोचच्या जागा बुक करणे हा एक फायदेशीर सौदा आहे. दोन्ही बुकिंगमध्ये खूप फरक आहे, हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. भारतीय रेल्वेच्या मते, जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये सीट बुक करता तेव्हा रेल्वे तुमच्याकडून फक्त भाडे आकारते आणि इतर कोणतेही शुल्क आकारत नाही. परंतु जर तुम्ही संपूर्ण डबा किंवा ट्रेन बुक केली तर तुम्हाला विविध शुल्क द्यावे लागतील, जे खूप महाग आहेत. या संदर्भात रेल्वे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सीट बुक करण्याच्या तुलनेत संपूर्ण डबा बुक करण्यासाठी तुम्हाला जवळपास तिप्पट जास्त शुल्क द्यावे लागते. त्यामुळे स्वतंत्र जागा बुक करणे स्वस्त आहे.

सीट बुक करणे स्वस्त आहे पण ही आहे समस्या

कोचच्या तुलनेत सीट बुक करणे स्वस्त आहे पण एक समस्या अशी आहे की एका PNR मध्ये सहा पेक्षा जास्त तिकिटे बुक करता येत नाहीत. त्यामुळे तुम्हाला वेगळे तिकीट काढावे लागणार आहे. यामध्ये सर्व 72 जागांसाठी 12 लोक रांगेत उभे असले तरीही वेगवेगळ्या डब्यांमध्ये जागा मिळू शकतात. कारण तिकीट बुकिंग एकाच वेळी ऑफलाइन आणि ऑनलाइन सुरू असते

कोच बुक करण्यासाठी भरावे लागणारे शुल्क

कोच किंवा संपूर्ण ट्रेनचे बुकिंग फुल टेरिफ रेट (FTR) वर केले जाते. यामध्ये प्रति डबा 50 हजार रुपये सुरक्षा जमा करावी लागणार आहे. प्रवासाच्या सुरुवातीपासून अंतिम गंतव्यस्थानापर्यंत भाडे भरावे लागेल. प्रवासासाठी 30 टक्के सेवा शुल्क देखील भरावे लागेल. प्रवास किमान 200 किमी असावा. कोच थांबवल्यास त्याचे शुल्क वेगळे भरावे लागेल. यासोबतच एसी आणि फर्स्ट कोचच्या बुकिंगसाठी पाच टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. सुपरफास्ट ट्रेनमध्ये बसवल्यास सुपरफास्ट चार्ज समाविष्ट केला जाईल. जर तुम्ही संपूर्ण ट्रेन बुक केली तर इंजिन स्टॉपिंग चार्जेस देखील भरावे लागतात. अशा प्रकारे ते बरेच महाग होते.

Facial At Home | ‘या’ पदार्थांचा वापर करून दिवाळीसाठी घरीच करा फेशिअल; 10 मिनिटातच येईल ग्लो

Facial At Home

Facial At Home | आपण सुंदर दिसावे, आपली त्वचा एकदम नितळ आणि निर्मळ असावी. असे प्रत्येकालाच वाटते. आणि यासाठी बऱ्याच स्त्रिया पार्लरमध्ये जाऊन अनेक ट्रीटमेंट करत असतात. परंतु पार्लरमधील या उत्पादनांमध्ये केमिकल असते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला देखील हानी पोहोचण्याची शक्यता असते. म्हणूनच अनेक महिला या आता नैसर्गिक उपचाराकडे वळल्या आहेत. त्या घरगुती पद्धतीने स्वतःला सुंदर करण्याचा प्रयत्न करत असतातम इतकच नाही तर आजकाल अनेक सिनेअभिनेत्री देखील नैसर्गिक उपचारांवर जास्त विश्वास ठेवतात. तुम्ही आता या दिवाळीत अत्यंत सुंदर आणि ग्लोइंग दिसण्यासाठी काही घरगुती उपायांचा उपयोग करून एकदम सुंदर दिसू शकता.

दिवाळी जवळ आलेली आहे. आणि या दिवाळीमध्ये प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटते अशावेळी तुम्ही दहा मिनिटात फेशियल (Facial At Home) करू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा एकदम गोइंग होईल. आता तुम्ही तीन पद्धतीने घरच्या घरी घरातील पदार्थांचा वापर करून फेशियल करू शकता.

एक्सफोलिएट | Facial At Home

फेशियल करण्यासाठी तुमची त्वचा एक्सफोलिएट करणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही तांदळाचे पीठ आणि दुधाची साय याची गरज आहे. तुम्ही स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्या. त्यानंतर चेहरा स्क्रब करण्यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात दुधाची साय मिसळा. आणि तुमच्या मानेवर तसेच चेहऱ्यावर स्क्रब करा आणि स्क्रब झाल्यावर धुवून टाका.

मसाज करणे

एक्सफोलेशन झाल्यावर मसाज करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही दुधाची साय एक चिमूटभर हळद आणि एक चमचा बेसन पीठ मिसळा आणि त्याची एक पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर व्यवस्थित तुमच्या चेहऱ्यावर मेसेज करा. काही मिनिटे तुमचा चेहरा आणि मानेला हा मसाज करत राहा. त्यामुळे त्वचा बाहेरून सुंदर होते आणि चेहऱ्यावर असलेले तेल देखील निघून जाते. आणि तुमचा चेहरा एकदम क्लीन होतो त्यानंतर तुम्ही वाफ घ्या.

फेस पॅक लावणे | Facial At Home

फेस पॅक लावण्यासाठी सायीमध्ये थोडीशी मध आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट करा. त्यानंतर ही पेस्ट तुमच्या चेहऱ्याला लावा. काही वेळ ती तसेच सुकून द्या. चेहऱ्यावरील पॅक थोडासा सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुऊन टाका. या सगळ्या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर अगदी पार्लर सारखा ग्लो येऊन जाईल. तुम्ही अगदी दहा मिनिटात घरच्या घरी हा इन्स्टंट ग्लो येणारा फेस पॅक करू शकता. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. त्याचप्रमाणे पिंपल्स किंवा डाग असतील तर ते देखील निघून जाईल.

शिंदे गटाच्या ‘या’ 5 जागा भाजपने ढापल्या; पहा कोणकोणत्या मतदारसंघांचा समावेश ?

eknath shinde

निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून येत्या २० नोव्हेंबर ला मतदान आणि २३ नोव्हेंबर ला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यात सध्या दोन्ही महत्वाच्या पक्षांमध्ये जागावाटप सुरु आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीतील उमेदवारांच्या घोषणेच्या बाबतीत भाजपने बाजी मारली आहे. पक्षाने रविवारी (20 ऑक्टोबर) आपल्या 99 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेने गेल्या वेळी अनेक जागा लढवल्या होत्या. यावेळी या जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला द्याव्या लागल्या आहेत.

वास्तविक, भाजपने जाहीर केलेल्या यादीत अशा पाच जागा आहेत ज्यांवर शिवसेना वर्षानुवर्षे लढली आहेत. आता शिवसेनेने उबाठा गटाने आपले उमेदवार उभे केल्यास भाजप आणि उद्धव ठाकरे गटात थेट लढत होईल.

या मतदार संघात BJP ने दिले उमेदवार

  • धुले शहर
  • देवली
  • अचलपूर
  • नालासोपारा
  • उरण

काय होती यापूर्वीची स्थिती ?

  • 2019 मध्ये धुळे शहरातून शिवसेनेचे हिलाल माळी हे उमेदवार होते, तर यावेळी भाजपने अनुप अग्रवाल यांना या जागेवरून उमेदवारी दिली आहे.
  • 2019 मध्ये अचलपूरमधून सुनीता फिस्के या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. यावेळी भाजपने येथून अतुल तायडे यांना उमेदवारी दिली आहे.
  • 2024 च्या देवळी मतदारसंघातून भाजपने राजेश बकाणे यांना उमेदवारी दिली आहे.
  • 2019 मध्ये नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रदीप शर्मा हे उमेदवार होते, तर यावेळी भाजपचे राजन नाईक येथून उमेदवार आहेत.
  • उरणमध्ये 2019 मध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर हे उमेदवार होते, आता भाजपने महेश बालदी यांना येथून उमेदवारी दिली आहे.

विशेष म्हणजे नालासोपाऱ्यात भाजपचा एकही आमदार किंवा भाजपचा पाठिंबा नसलेला अपक्ष आमदार निवडून आला असतानाही भाजपने या मतदारसंघात आपला उमेदवार दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत महाआघाडीत फक्त भाजपने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीची प्रतीक्षा आहे.

‘अमृत भारत’ योजनेतील रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकास कामांची स्थिती काय ? दिमाखात झाले होते उदघाटन

Amrut bharat yojana

अमृत भारत योजनेअंतर्गत पुणे विभागातील 16 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचं काम गेल्यावर्षी हाती घेण्यात आलं. काम सुरू होऊन सात ते दहा महिने झाले असले तरी काहीच स्थानकांवर केवळ 30 ते 35 टक्केच काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ही कामे पूर्ण होण्यास अजून एक वर्ष लागण्याची शक्यता आहे.

पुनर्विकास यादीत ‘या’ स्थानकांचा समावेश

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुणे विभागातील कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, कराड, सातारा, वठार, लोणंद, तळेगाव, देहू रोड, आकुर्डी, चिंचवड, हडपसर, उरळी, कडेगाव, बारामती आणि फलटण या 16 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. 5 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामांचा ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

केवळ 30 ते 40 टक्केच काम पूर्ण

आकुर्डी तळेगाव आणि चिंचवड या रेल्वे स्थानकांचा काम एक वर्ष होऊनही केवळ 30 ते 40 टक्केच झाले आहे. या तीनही रेल्वे स्थानकांवरून दररोज 42 लोकल आणि पाच एक्सप्रेस ये-जा करतात यातून दररोज हजारो ठिकाणी प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या ठिकाणी ठेकेदारांकडून अत्यंत संत गतीने काम सुरू असून चिंचवड स्थानकाचे तर आतापर्यंत केवळ 30 ते 40 टक्केच काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. पुनर्विकास करण्यासाठी स्थानकांवर खड्डे खोदून ठेवल्याने प्रवाशांना नहक त्रासाला सामोरे जावे लागतय.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी सांगितलं की, अमृतभारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकाचे काम सुरू झालं असून काही ठिकाणी काम संपत आली आहेत तर काही ठिकाणी सुरू आहेत. लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येणार आहेत.

योजनेअंतर्गत ही काम केली जाणार

रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण
प्रवेशद्वारावर पोर्चची तरतूद
प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे आणि शेड उभारून अच्छादित करणं
स्टेशनच्या दर्शनी भागात सुधारणा आणि स्टेशन इमारतीची उंची वाढवणे
रॅम्प , लिफ्ट ,एक्सलेटर सह बारा मीटर रुंद मध्यवर्ती फूट ओव्हर ब्रिज तयार करणे

SIP Investment | 100 रुपयांची SIP करूनही व्हाल श्रीमंत; फक्त ‘या’ नियमांचे करा पालन

SIP Investment

SIP Investment | आपल्या भविष्याचा आणि वाढत्या महागाईचा विचार करून गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. आणि या गुंतवणुकीचे महत्त्व आता सगळ्याच नागरिकांना पटलेले आहे. त्यामुळे अनेक लोक हे बँकांच्या एफडीमध्ये पोस्ट तसेच पोस्ट ऑफिसमध्ये त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये देखील गुंतवणूक करत असतात. म्युच्युअल फंडमध्ये (SIP Investment) गुंतवणूक करणे हे अनेकांना जोखमीचे वाटते. परंतु त्यातून परतावा देखील खूप चांगला आहे. आज काल म्युच्युअल फंडचे महत्व देखील अनेकांना पटलेले आहे. आणि अनेक लोक मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत. आणि दिवसेंदिवस ही गुंतवणूक वाढतच आहे. या म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला एक रकमी गुंतवणूक करता येते. तसेच दर महिन्याला मासिक गुंतवणूक देखील करता येते. अनेक लोकांना असे वाटते की, एसआयपीमध्ये (SIP Investment) गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे खूप पैसे असणे गरजेचे असते. परंतु हा समज अत्यंत चुकीचा आहे. तुम्ही अगदी कमीत कमी पैशात देखील गुंतवणूक करू शकता. आणि योग्य पैसा गुंतवून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो करण्याची गरज आहे.

जितक्या लवकर पैसे गुंतवाल तितके जास्त कमवाल | SIP Investment

तुम्हाला जर एसआयपीमध्ये पैसे गुंतवून श्रीमंत व्हायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जितक्या लवकर एसआयपीमध्ये पैसे गुंतवण्यास सुरू कराल, तितके जास्त लवकर तुम्हाला पैसे मिळतील. आणि जास्त पैसे मिळतीलम त्यामुळे जर तुम्ही अजूनही एसआयपी सुरू केली नसेल, तर तुम्ही अजिबात उशीर न करता एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करा.

जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करा

एसआयपीमधून जर तुम्हाला जास्त निधी गोळा करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही जास्त कालावधीसाठी एसआयपी चालू ठेवणे गरजेचे असते. जरी तुमची एसआयपीमध्ये गुंतवलेली रक्कम कमी असली तरीही तुम्ही ती जास्त कालावधीसाठी गुंतवून ठेवणे खूप गरजेचे असते. जास्त गुंतवणूक कराल किंवा चक्रवाढीचा देखील फायदा येतो. त्यामुळे तुमचे पैसे खूप जलद गतीने वाढतील.

एसआयपीमध्ये खंड पडू नये

एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक शिस्त असणे खूप गरजेचे असते. यासाठी तुम्हाला नियमित गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये खंड पडता कामा नये, जर तुमची एसआयपी मध्येच थांबली, तर तुम्हाला त्याच्या परताव्यावर नक्कीच परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे एसआयपी ही सातत्याने सुरू ठेवा .

गरज आणि जोखीमनुसार योजना निवडा | SIP Investment

एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही लार्ज कॅप, पण साधारणपणे मीड कॅप आणि स्मॉल कॅप फंडापेक्षा जास्त सुरक्षित मानले जाते. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि नंतरच गुंतवणूक करा. अशाप्रकारे जर तुम्ही सगळ्या नियमांचे पालन केले आणि एसआयपीमध्ये गुंतवणूक केली, तर तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणूक करून देखील चांगला परतावा मिळवू शकता.

SIP Pause Or SIP Close | अचानक आर्थिक तंगी असल्यास SIP Pause करावी की बंद करावी? हा आहे योग्य पर्याय

SIP Pause Or SIP Close

SIP Pause Or SIP Close | भविष्याच्या दृष्टीने आत्तापासूनच गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. गुंतवणुकीचे महत्त्व आजकाल सगळ्यांनाच पटलेले आहेत. त्यामुळे अनेकजण त्यांच्या पगारातील काही ना काही रक्कम ही भविष्यासाठी गुंतवून ठेवत असतात. त्यातही अनेक लोक म्युच्युअल फंडद्वारे मासिक एसआयपीमध्ये गुंतवणूक करतात. एसआयपी मधून खूप चांगला परतावा देखील मिळतो. परंतु अनेक वेळा असे होते की, “आपली आर्थिक परिस्थिती कमजोर होते. आणि आपल्याला मासिक एसआयपीचा हप्ता भरणे जमत नाही. अशावेळी अनेक लोक हे एसआयपी बंद (SIP Pause Or SIP Close ) करतात. परंतु अशावेळी नक्की काय करावे? हे आज आपण जाणून घेऊया.

जर तुम्ही महिन्याला एका ठराविक रकमेचे एसआयपी (SIP Pause Or SIP Close) जर तुम्ही महिन्याला एका ठराविक रकमेचे एसआयपी (चालू केली असेल, परंतु अचानक काही मेडिकल कंडिशन आली किंवा दुसरी काही परिस्थिती निर्माण झाली. आणि तुमच्याकडे एसआयपी भरायला पैसे नसतील. तर अशा वेळी नक्की काय करावे? एक तर तुम्ही एसआयपी बंद करून सगळे पैसे काढू शकता, किंवा एसआयपी थांबू शकता. म्हणजे काही काळासाठी एसआयपी पॉज करू शकता. पण या दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्हाला नक्की कशाने फायदा होईल? हे जाणून घेऊया.

चालू केली असेल, परंतु अचानक काही मेडिकल कंडिशन आली किंवा दुसरी काही परिस्थिती निर्माण झाली. आणि तुमच्याकडे एसआयपी भरायला पैसे नसतील. तर अशा वेळी नक्की काय करावे? एक तर तुम्ही एसआयपी बंद करून सगळे पैसे काढू शकता, किंवा एसआयपी थांबू शकता. म्हणजे काही काळासाठी एसआयपी पॉज करू शकता. पण या दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्हाला नक्की कशाने फायदा होईल? हे जाणून घेऊया.

एसआयपी पॉज म्हणजे काय? | SIP Pause Or SIP Close

जर तुमच्याकडे भरण्यासाठी पैसे नसतील, तर तुम्ही यावेळी ही स्कीम पूर्णपणे बंद करण्याऐवजी मध्येच थांबू शकता. पूर्वी ही सुविधा एक ते तीन महिन्यांसाठी होती. परंतु आता फंड हाऊसने ही सहा महिन्यांसाठी वाढवलेली आहे. अशावेळी तुमची मॅनेजमेंट कंपनी एसआयपीला पॉज करण्याची विनंती करतात. तुमची ही रिक्वेस्ट सबमिट झाल्यावर ती कंपनी किती दिवस पॉजची सुविधा देते. हे पहावे लागेल. जर तुमच्या कंपनीने तुमची विनंती मान्य केली, तर ठराविक काळासाठी एसआयपीचा हप्ता आकारला जाणार नाही. परंतु हा पॉज संपल्यानंतर एसआयपीचे हप्ते तुमच्या खात्यातून कट होऊन जातील.

अनेक वेळा लोकांना जॉब गमवावा लागतो मेडिकल इमर्जन्सी येते की, तसेच ईतर कोणत्याही कौटुंबिक कारणामुळे आर्थिक जबाबदारी वाढते. आणि तुम्हाला हप्ता भरणे जमत नाही. अशावेळी तुम्ही एसआयपी काही काळासाठी पॉज करू शकता. परंतु ही परिस्थिती कधी पूर्वीसारखी होईल हे जर तुम्हाला माहित नसेल. तर तुम्ही एसआयपी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय देखील होऊ शकतात. तुम्हाला काही दिवस हप्ते भरण्यासाठी दिलासा देखील मिळतो. परंतु बाजारात जर चांगली तेजी असेल, तर पॉज नंतरही तुम्हाला चांगला परतावा मिळतो. परंतु तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती बघूनच एसआयपी पूर्णपणे बंद करायची की, एसआयपी मध्ये पॉज घ्यायचा हे ठरवू शकता.

Viral Video | दारूच्या नशेत चालकाने चालवली ST; धक्कादायक व्हिडीओ आला समोर

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे क्षणार्धात अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. आपण घरी बसून जगातील कानाकोपऱ्यात काय चाललेले आहे? याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ शकतो. सोशल मीडियावर (Viral Video ) व्हायरल होणारे काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे सखोल ज्ञान देणारे असतात. ज्यामुळे घरी बसलेल्या प्रत्येक माणसालाच फायदा होतो. जगभरात काय चाललेले आहे या गोष्टीची माहिती आपण एका क्लिकवर घेऊ शकतो.

सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ बदलापूरमधील आहे. बदलापूरमध्ये एक एसटी चालक चक्क दारूच्या नशेमध्ये गाडी चालवताना दिसत आहे. प्रवाशांनी भरलेली एसटी तो ड्रायव्हर दारूच्या नशेत चालवत आहे. त्यामुळे आता एसटीत बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे.

सोशल मीडियावर (Viral Video) बदलापूरमधील या एसटी चालकाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. काही प्रवाशांनी याचा व्हिडिओ काढलेला आहे. आणि यामुळेच त्याचा हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. त्या एसटी चालकाने दारू पिलेली आहे आणि दारूच्या नशेत तो गाडी चालवता आहे. अत्यंत जोरात स्पीडने तो गाडी चालवत आहे. तसेच एसटीतील प्रवासी देखील घाबरल्याचे या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

सीएसटी बदलापूर डेपोमधून दुपारी साडेतीन वाजता बदलापूर ते कुडेरान या ठिकाणी निघाली होती. यावेळी एसटीचा ड्रायव्हर दारूच्या नशेत होता.बदलापूरमधून बाहेर पडताच एसटीच्या चालकाने अत्यंत वेगाने एसटी चालवायला सुरुवात केली. प्रवाशांनी देखील त्याला एसटी हळू चालवण्यास सांगितले. परंतु त्याने काहीही ऐकले नाही. उलट प्रवाशांशी तो वाद घालत बसला. एसटीचा वेग इतका जास्त होता की, दोन ते तीन वेळा ही एसटी रस्त्याच्या खाली देखील गेली होती. असे प्रवाशांनी सांगितलेले आहे. त्यावेळी एसटी मधील काही प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे. त्यामुळे हा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. आणि प्रवाशांनी त्या एसटी चालकावर कारवाई करण्याची मागणी देखील केलेली आहे.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि जर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी दारूच्या निषेध गाडी चालवली. तर देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहतो. अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर आलेल्या आहेत.

Aadhaar Updation Centers | आधार कार्ड अपडेट करणे झाले सोप्पे आणि सुलभ; ‘या’ ठिकाणीही मिळणार सुविधा

Aadhaar Updation Centers

Aadhaar Updation Centers | आपले आधार कार्ड हे आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा ओळखीचा पुरावा आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड आहे. अगदी नवजात जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध झालेल्या लोकांपर्यंत सगळ्यांकडे आधार कार्ड आहे. कारण आधार कार्ड हा आपल्या भारतातील ओळखीचा मुख्य पुरावा आहे. परंतु आपल्याला या आधार कार्डमध्ये वेळोवेळी अपडेट करावे लागतात. जर तुम्हाला देखील तुमचे आधार कार्ड अपडेट (Aadhaar Updation Centers) करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. आतापर्यंत आधार कार्ड अपडेट करताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला अत्यंत सुलभ प्रक्रिया मिळणार आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लोक आधार केंद्रावर जाऊन लांबलचक रांगा लावत होते. परंतु आता तसे करण्याची काहीही गरज नाही. यासाठी अत्यंत सोपा पर्याय सरकारने जाहीर केलेला आहे.

पोस्ट इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती शेअर केलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार टपाल विभागाने सार्वजनिक सुविधा लक्षात घेऊन आधार कार्डशी संबंधित सेवा देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या आधार कार्ड अपडेट करू शकता. परंतु याचे शुल्क हे आधार केंद्रावरच द्यावे लागणार आहे.

हो भारत सरकारने पोस्ट बोर्डामार्फत पोस्ट ऑफिसमध्ये आधार नोंदणी आणि अपडेट (Aadhaar Updation Centers) सेवा सुरू केलेली आहे. या पोस्ट ऑफिस आधार केंद्रामध्ये प्रामुख्याने दोन सेवा पुरवल्या जाणार आहेतम याचा नागरिकांना चांगलाच फायदा होणार आहे. आता या सेवा कोणत्या असणार आहेत याची माहिती आपण जाणून घेऊया.

आधार नोंदणी | Aadhaar Updation Centers

तुम्हाला जर आधारसाठी नाव नोंदणी प्रक्रिया करायची असेल, लोकांची बायोमेट्रिक माहिती इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने द्यायचे असतील, तर ते तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला मोफत करता येईल. यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन देखील तुमच्या आधार नोंदणी करू शकता.

आधार अपडेशन

जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट करायचे असेल. जसे की, तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, बायोमेट्रिक अपडेट, बोटांचे ठसे, आयरीस यांसारख्या गोष्टी अपडेट करण्यासाठी तुम्ही जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या गोष्टी अपडेट करू शकता.

Diwali Muhurat Trading: यंदाच्या वर्षीचा दिवाळी ट्रेडिंग मुहूर्त कधी ? जाणून घ्या शुभ मुहूर्त

treading diwali

Diwali Muhurat Trading: : शेअर मार्केट , ट्रेडिंग यांची एक वेगळीच दुनिया आहे. इथे कधी शेअर्स उंचावर जातात तर कधी दणाणून आपटतात. या सगळ्यात गुंतलेला असतो इथला गुंतवणूकदार. भारतात दीपावलीच्या दिवशी ठराविक वेळासाठी मार्केट खुले केलेजाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या मुहूर्तावर संपूर्ण देश शेअर बाजारातील शुभ व्यवहाराची वाट पाहत आहे. असे मानले जाते की ‘मुहूर्त’ किंवा शुभ मुहूर्तावर व्यापार केल्याने (Diwali Muhurat Trading) गुंतवणूकदारांना समृद्धी मिळते.

यंदाच्या वर्षीची तारीख आणि वेळ काय असेल ? याबाबत आता माहिती समोर आली आहे.खरेतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित केलेल्या विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्राची वेळ जाहीर केली आहे.

काय आहे दिवाळी ट्रेडींग मुहूर्त ? (Diwali Muhurat Trading)

NSE आणि BSE 1 नोव्हेंबर रोजी एक तासाचे विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र आयोजित करतील. स्टॉक एक्स्चेंजने वेगवेगळ्या परिपत्रकाद्वारे याची घोषणा केली आहे. परिपत्रकात नमूद केले आहे की व्यापार सत्र शुक्रवार, 1 नोव्हेंबर, 2024 रोजी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत होईल.

विशेष ट्रेडिंग विंडो एक तासासाठी खुली केली जाईल

दिवाळीच्या दिवशी नियमित व्यवहारासाठी शेअर बाजार बंद असेल, पण विशेष ट्रेडिंग विंडो संध्याकाळी एक (Diwali Muhurat Trading) तास खुली असेल. एक्स्चेंजने जाहीर केले की प्री-ओपनिंग सत्र संध्याकाळी 5:45 ते 6:00 पर्यंत असेल. मुहूर्ताचा व्यापार हा पारंपारिक प्रतीकात्मक व्यापार आहे. हा एक शुभ दिवस आहे आणि या दिवशी गुंतवणूकदार भाग्यवान वर्षाच्या शुभेच्छा देऊन काही काळ व्यापार करतात.

गेल्या वर्षीसेन्सेक्स 354 अंकांनी वधारला

गेल्या वर्षी च्या बाबतीत सांगायचे झाले तर 12 नोव्हेंबर रोजी, विशेष दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सत्रात निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये (Diwali Muhurat Trading) चांगली वाढ झाली होती. सायंकाळी 6.15 ते 7:15 पर्यंत मुहूर्त साधत व्यापारासाठी खुला होता. सेन्सेक्स 354.77 अंकांच्या किंवा 0.55 टक्क्यांच्या वाढीसह 65,259.45 वर बंद झाला. निफ्टीही 100.20 अंकांनी वाढून 19,525.55 च्या पातळीवर बंद झाला होता.