Sunday, December 28, 2025
Home Blog Page 406

BSNL Recharge Plan | BSNL ने आणला स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन; 395 दिवसांच्या वैधतेसह मिळणार हे फायदे

BSNL Recharge Plan

BSNL Recharge Plan | जुलै महिन्यामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया यांसारख्या अनेक लोकप्रिय कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरात वाढ केलेली होती. त्यानंतर त्यांचे ग्राहक नाराज झाले. आणि अनेक ग्राहकांनी सिम पोर्ट देखील केलेले आहे. या कंपन्यांनी त्यांच्या वाढवलेल्या रिचार्जचा फायदा बीएसएनएल या कंपनीला मात्र मोठा प्रमाणात झालेला आहे. बीएसएनएल ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. आणि आज काल बीएसएनएलच्या (BSNL Recharge Plan) युजर्सच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता नवीन आलेल्या या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना खुश करण्यासाठी बीएसएनएल त्यांना चांगली सेवा देण्याचा आणि नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहे.बदेशातील अनेक शहरांमध्ये त्यांची 4G सेवा देखील चालू केलेली आहे. आणि 5G सेवा चालू करण्याच्या ते तयारीत देखील आहेत. त्यांच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत स्वस्त आणि फायद्याचा प्लॅन लॉन्च केलेला आहे.

बीएसएनएलने (BSNL Recharge Plan) लॉन्च केलेल्या या प्लॅनची व्हॅलिडीटी 395 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग डेटा सोबत अनेक फायदे देखील मिळणार आहे. बीएसएनएलचा हा प्लॅन 13 महिन्यांसाठी आहे. याची खासियत म्हणजे या प्लॅनसाठी तुम्हाला दररोज 7 रुपयांपेक्षाही कमी खर्च येईल. हा एक प्रीपेड प्लॅन आहे. या प्रीपेड प्लॅनची किंमत 2399 एवढी आहे. म्हणजेच या प्लॅनसाठी तुम्हाला तर रोज केवळ 6.57 रुपये खर्च करावे लागतातम तसेच या प्लॅनची वैधता 195 दिवसांची आहे.

कोणला लाभ मिळणार ? | BSNL Recharge Plan

या प्रीपेड प्लॅनचा फायदा भारतातील अनेक युजर्सला होणार आहे. यामध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. तसेच तुम्हाला दररोज 2 जीबी हाईट स्पीड इंटरनेट डेटा देखील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे तुमचा डेटा संपल्यावर तुम्हाला 40 KBPS या स्पीडने अनलिमिटेड इंटरनेट वापरता येईल. त्याचप्रमाणे युजरला दररोज 100 एसएमएस देखील फ्री मिळणार आहे. तसेच व्हॅल्यू ॲडेड सर्विसेसचा देखील लाभ मिळणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला हार्डी गेम, अरेना गेम, झिंक म्युझिक, वाव इंटरटेनमेंट, बीएसएनएल ट्यून यांचे सबस्क्रीप्शन देखील फ्री मध्ये मिळणार आहे.

Dead Butt Syndrome | तुम्हीही खूप वेळ एकाच जागी बसत असाल तर सावधान! होऊ शकतो हा सिंड्रोम

Dead Butt Syndrome

Dead Butt Syndrome | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. लोक बैठेकाम करायला लागलेली आहेत. शारीरिक कष्ट कमी व्हावे त्यासाठी लोक प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे आयटीमध्ये असलेले लोक व इतर लोकही ऑफिसमध्ये बसूनच काम करतात. परंतु तुम्ही जर खूप वेळ बसून काम केले एकाच जागेवर असाल, तर यामुळे तुम्हाला काही आजार देखील होऊ शकतात. तुम्ही जर एकाच जागी 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसून राहिला, तर ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे तुमच्या शरीराला अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यातीलच एक म्हणजे डेड बट सिंड्रोम (Dead Butt Syndrome) असा आहे. आता हा आजार नक्की कोणता आहे?आणि यामुळे आपल्या शरीराला कोणते धोके होऊ शकतात? हे जाणून घेऊया.

डेड बट सिंड्रोम | Dead Butt Syndrome

कोरोनाच्या काळापासून घरून काम करण्याची पद्धत वाढली आहे. त्यामुळे लोक आता एकाच ठिकाणी तासनतास बसून काम करतात, त्यांचा संपूर्ण दिवस घरच्या आणि ऑफिसच्या कामात जातो आणि त्यांना शारीरिक हालचाल करायलाही वेळ मिळत नाही. जर तुमची परिस्थिती अशीच असेल तर सावध रहा, तुम्ही लवकरच डेड बट सिंड्रोमचे बळी होऊ शकता.

डेड बट सिंड्रोम म्हणजे काय? | Dead Butt Syndrome

एकाच स्थितीत जास्त वेळ बसल्याने डेड बट सिंड्रोम होऊ शकतो. याला ग्लूटीअल ॲम्नेशिया असेही म्हणतात. यामध्ये अनेकदा नितंब बधीर होतात. हिप आणि त्याच्या सभोवतालचे भाग काही काळ काम करणे थांबवतात. त्यामुळे ग्लूटेन मेडिअस नावाचा आजारही होऊ शकतो. त्यामुळे सामान्य कामे करणेही कठीण झाले आहे. या समस्येमध्ये ग्लुटीयस मेडिअस म्हणजेच हिप बोनमध्ये सूज येते. रक्ताभिसरण थांबल्यामुळे हे घडते.

डेड बट सिंड्रोमची लक्षणे काय आहेत?

  • पाठ, गुडघे आणि घोट्यात तीव्र वेदना
  • हिप ताण
  • नितंबांच्या खालच्या भागात म्हणजे कंबरेत मुंग्या येणे
  • कूल्ह्यांभोवती सुन्नपणा, जळजळ आणि वेदना
  • डेड बट सिंड्रोम टाळण्याचे मार्ग
  • ऑफिसमध्ये जिने वापरा, लिफ्ट नाही.
  • दर 30-45 मिनिटांनी तुमच्या सीटवरून उठत राहा आणि स्ट्रेच करत रहा.
  • आडवा पाय घालून बसणे फायदेशीर ठरू शकते.
  • रोज किमान 30 मिनिटे चाला.

Curry Leaves Water Benefits | रोज सकाळी प्या कढीपत्त्याचे पाणी; अनेक समस्यांवर आहे रामबाण उपाय

Curry Leaves Water Benefits

Curry Leaves Water Benefits | स्वयंपाक घरात जेवण बनवताना आपण त्यात वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करत असतो. आणि त्या गोष्टी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यातील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता हा आपण कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना वापरत असतो. कढिपत्त्यामुळे जेवणाला चव देखील चांगली येते. आणि आपल्या शरीराला देखील खूप फायदा होता. कढीपत्ता (Curry Leaves Water Benefits) हा औषधी गुणधर्मानी समृद्ध आहे. तुम्हीजर रोज कढीपत्त्याचे सेवन केले, तर तुमच्या पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. त्याचप्रमाणे एंटीबॅक्टरियल आणि अँटिफंगल गुणधर्म कमी होतात. त्याचप्रमाणे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी देखील कढीपत्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्ही जर थेट कडीपत्ता खात नसाल तर तुम्ही चटणी करताना किंवा डाळीलाफोडणी देताना कढीपत्ता वापरू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही जर रोज सकाळी कढीपत्त्याचे पाणी पिले, तर आपल्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर मानले जाते. आज आपण जाणून घेऊया कढीपत्त्याचे पाणी (Curry Leaves Water Benefits) पिल्याने काय फायदे होतात. यासाठी तुम्हाला रात्रभर कडीपत्ता भिजत पाण्यात ठेवावा लागेल. आणि सकाळी उठून ते पाणी प्यावे लागेल.

पचनक्रिया निरोगी राहते | Curry Leaves Water Benefits

सकाळी लवकर कढीपत्त्याचे पाणी पिणे पोटासाठी फायदेशीर आहे. ज्या लोकांना बद्धकोष्ठता इत्यादी समस्या आहेत त्यांनी रोज सकाळी कढीपत्त्याचे पाणी प्यावे. यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते आणि अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

हृदयाची काळजी घेते

कढीपत्त्याचे पाणी प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. कढीपत्त्याचे पाणी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते.

त्वचेसाठीही फायदेशीर

अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त कढीपत्ता त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचे पाणी रोज प्यायल्याने त्वचा सुधारते आणि डाग कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास मदत करते

कढीपत्त्याचे पाणी प्यायल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. याच्या सेवनाने चयापचय गतिमान होते, जे अन्न लवकर पचण्यास मदत करते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

साखर नियंत्रित करते | Curry Leaves Water Benefits

कढीपत्त्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

केस मजबूत करते

कढीपत्त्यात लोहासारखे पोषक घटक आढळतात जे केस मजबूत ठेवण्यास मदत करतात. याच्या सेवनाने केस गळण्याची समस्या कमी होते आणि केसांना चमकही येते.

काय आहे मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास??

muhurta trading

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सणामध्ये रांगोळी काढणे, फराळ बनवणे, देवी देवतांची पूजा करणे ही आजवर चालत आलेली संस्कृती आणि परंपरा आहे. दिवाळीमध्ये आणखीन एक परंपरा राबवली जाते ती म्हणजे मुहूर्त ट्रेडिंगची. दिवाळी दिवशी मुहूर्त ट्रेडिंग परंपरेनुसार, नविन गुंतवणूकदार, व्यापारी व्यवहार करण्यात येतात. मुहूर्त ट्रेडिंगमध्येच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात येते. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ संध्याकाळची असते. ही वेळ व्यापाऱ्यांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आपण याच मुहूर्त ट्रेडिंग परंपरेचा इतिहास जाणून घेणार आहोत.

मुहूर्त ट्रेडिंग परंपरेचा इतिहास

तसे पाहायला गेलो तर मुहूर्त ट्रेडिंग परंपरा ही गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे. असे म्हणतात की या परंपरेला राजा विक्रमादित्यच्या काळात सुरुवात करण्यात आली होती. आपल्या राज्याची आर्थिकदृष्ट्या भरभराट व्हावी, गोरगरिबी दूर व्हावी यासाठी विक्रमादित्याने या परंपरेला सुरुवात केली होती. यानंतर या परंपरेचा मान पुढे देखील राखण्यात आला. 1957 ला बाँबे स्टॉक एक्सचेंजने मुहूर्त ट्रेडिंग अधिकृतरीत्या सुरू केली. यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्येही देखील मुहूर्त ट्रेडिंग सुरू झाले. तेव्हापासून ते आजवर ही परंपरा चालत आली आहे. (Diwali Muhurat Trading)

मुहूर्त ट्रेडिंग प्रकार काय आहे?

दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार बंद असतो. परंतु फक्त एका तासासाठी म्हणजेच मुहूर्त ट्रेनिंगमध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. ट्रेडिंगच्या एका तासांमध्ये स्टॉक, डेरिव्हेटिव्हज, कमोडिटी यांच्यासाठी स्टॉटनुसार विभाजन केले जाते. मुहूर्ता ट्रेनिंग पूर्वी पूजा पठण असले देखील करण्यात येते. मुहूर्त ट्रेनिंगमधूनच आर्थिक वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्यात येते. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये पूर्ण वर्षांचा ट्रेंड ठरवला जातो.

weather Update | आजही राज्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार पाऊस; IMD ने दिला येलो अलर्ट

weather Update

weather Update | राज्यामध्ये परतीचा पाऊस सुरू झालेला आहे. काही ठिकाणी ऑक्टोबरच्या उन्हाचा चटका बसत आहे. तर काही ठिकाणी मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर कडाक्याचे ऊन पडते. तर रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. विदर्भात देखील तापमानाचा पारा वाढलेला आहे. परंतु तिथे पाऊस (weather Update) देखील पडत आहे. राज्यात पावसाला पोषक असे वातावरण तयार झाल्यामुळे 21 ऑक्टोबरला देखील वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून या पावसाबद्दल नेहमीच अंदाज व्यक्त केला जातो. अशातच हवामान विभागाने आज म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी काही भागात पावसाचा येल्लो अलर्ट दिलेला आहे.

आज राज्यात पावसाला (weather Update) पोषक असे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी तापमानाचा पारा देखील वाढलेला आहे. विदर्भात उन्हाचा कडाका वाढलेला असून येथील पारा 30° चा वर गेलेला आहे. परभणी, अकोला, वर्धा येथे देखील तापमानात वाढ झालेली आहे. काही ठिकाणी कडाक्याचा उन्हाळा सुरू झालेला आहे. तर काही ठिकाणी अजूनही शेतकऱ्यांना पावसाचा सामना करावा लागत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग या ठिकाणी पाऊस (weather Update) पडणार आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड , धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. त्याचप्रमाणे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गडचिरोली या ठिकाणी पावसाची (weather Update) शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पावसाचा परतीचा प्रवास थोडा लांबला असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांची भाताची पिकं काढण्यासआलेली आहे. परंतु अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडल्याने भाताची पिके काढण्यासाठी उशीर होत आहे. आणि पर्यायाने त्यांचे नुकसान होत आहे.

BJP First List | भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ही 99 नावे आली समोर

BJP First List

BJP First List | विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे जाहीर देखील केलेले आहे. त्याचप्रमाणे 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशातच आता भारतीय जनता पार्टी यांनी केंद्रीय निवडणूक समितीची एक बैठक घेतलेली आहे. ही बैठक माननीय श्री जगत प्रकाशनाड्डा यांच्या अध्यक्षतेखाली 16 ऑक्टोबर 2024 रोजी झालेली आहे. या बैठकीमध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा तसेच इतर अनेक सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका 2024 मध्ये भाजपकडून लढणाऱ्या उमेदवारांची आणि त्यांच्या मतदारसंघाची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आता तीच यादी आपण पाहणार आहोत.

सगळ्यात आधी नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे निवडणूक लढणार आहे. त्याचप्रमाणे कामठी येथून श्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे निवडणूक लढणार आहे. त्याचप्रमाणे शहादा येथून श्री राजेश उदयसिंग पाडवी हे निवडणूक लढणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून विजयकुमार कृष्णराव गावित लढणार आहे. धुळे शहरांमधून अनु अग्रवाल हे लढणार आहे. तसेच सिंदखेडमधून श्री जयकुमार जितेंद्र सिंग रावल हे लढणार आहेत. आता इतर उमेदवारांची आपण यादी जाणून घेऊया.

  • नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस
  • कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
  • शहादा – राजेश पाडवी
  • नंदुरबार- विजयकुमार कृष्णराव गावित
  • धुळे शहर-अनूप अग्रवाल
  • सिंदखेडा- जयकुमार रावल
  • शिरपूर- काशिराव पावरा
  • रावेर – अमोल जावळे
  • भुसावळ- संजय सावकारे
  • जळगाव शहर- सुरेश भोळे (राजू मामा)
  • चाळीसगाव- मंगेश चव्हाण
  • जामनेर- गिरीश महाजन
  • चिखली- श्वेता महाले
  • खामगाव- आकाश फुंडकर
  • जळगाव (जामोद) – संजय कुटे
  • अकोला पूर्व- रणधीर सावरकर
  • धामणगाव रेल्वे- प्रताप अडसद
  • अचलपूर- प्रविण तायडे
  • देवळी- राजेश बकाने
  • हिंगणघाट- समीर कुणावार
  • वर्धा- पंकज भोयर
  • हिंगणा- समीर मेघे
  • नागपूर दक्षिण- मोहन मते
  • नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे
  • तिरोरा- विजय रहांगडाले
  • गोंदिया- विनोद अग्रवाल
  • अमगाव- संजय पुरम
  • आरमोरी- कृष्णा गजबे
  • बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार
  • चिमूर – बंटी भांगडिया
  • वणी- संजीव रेड्डी बोडकुरवार
  • रालेगाव- अशोक उईके
  • यवतमाळ- मदन येरावर
  • किनवट- भीमराव केरम
  • भोकर- श्रीजया चव्हाण
  • नायगाव- राजेश पवार
  • मुखेड- तुषार राठोड
  • हिंगोली- तानाजी मुटकुले
  • जिंतूर – मेघना बोर्डिकर
  • परतूर- बबनराव लोणीकर
  • बदनापूर – नारायण कुचे
  • भोकरदन- संतोष दानवे
  • फुलंब्री- अनुराधा चव्हाण
  • औरंगाबाद पूर्व- अतुल सावे
  • गंगापूर- प्रशांत बंब
  • बगलान- दिलीप बोरसे
  • चांदवड- राहुल अहिर
  • नाशिक पूर्व- राहुल ढिकले
  • नाशिक पश्चिम- सीमा हिरे
  • नालासोपारा- राजन नाईक
  • भिवंडी पश्चिम- महेश चौघुले
  • मुरबाड- किसन कथोरे
  • कल्याण पूर्व- सुलभा गायकवाड
  • डोंबिवली- रविंद्र चव्हाण
  • ठाणे- संजय केळकर
  • ऐरोली- गणेश नाईक
  • बेलापूर- मंदा म्हात्रे
  • दहिसर – मनिषा चौधरी
  • मुलुंड- मिहीर कोटेचा
  • कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
  • चारकोप – योगेश सागर
  • मालाड पश्चिम- विनोद शेलार
  • गोरेगाव- विद्या ठाकूर
  • अंधेरी पश्चिम- अमित साटम
  • विलेपार्ले- पराग अळवणी
  • घाटकोपर पश्चिम- राम कदम
  • वांद्रे पश्चिम- आशिष शेलार
  • सायन कोळीवाडा- कॅप्टन आर तमील सेल्वन
  • वडाळा- कालीदास कोळंबकर
  • मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
  • कुलाबा- राहुल नार्वेकर
  • पनवेल- प्रशांत ठाकूर
  • उरण – महेश बालदी
  • दौंड – राहुल कुल
  • चिंचवड – शंकर जगताप
  • भोसरी – महेश लांडगे
  • शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
  • कोथरुड – चंद्रकांत पाटील
  • पर्वती- माधुरी मिसाळ
  • शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील
  • शेवगाव- मोनिका राजळे
  • राहुरी- शिवाजीराव कर्डिले
  • श्रीगोंदा- प्रतिक्षा पाचपुते
  • कर्जत जामखेड- राम शिंदे
  • केज- नमिता मुदंडा
  • निलंगा- संभाजी निलंगेकर
  • औसा- अभिमन्यू पवार
  • तुळजापूर- राण जगजितसिंह पाटील
  • सोलापूर शहर उत्तर- विजयकुमार देशमुख
  • अक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टी
  • सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख
  • माण- जयकुमार गोरे
  • कराड दक्षिण- अतुल भोसले
  • सातारा- शिवेंद्रराजे भोसले
  • कणकवली- नितेश राणे
  • कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक
  • इचलकरंजी- राहुल आवाडे
  • मीरज- सुरेश खाडे
  • सांगली- सुधीर गाडगीळ

Canara Bank SO Bharti 2024 | कॅनरा बँक अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

Canara Bank SO Bharti 2024

Canara Bank SO Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा तुम्हाला नेहमीच फायदा होत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता कॅनरा बँक (Canara Bank SO Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक विशेष भरती निघालेली आहे. ही भरती विशेषज्ञ अधिकारी या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 6 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 20 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज कराम आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Canara Bank SO Bharti 2024

या भरती अंतर्गत विशेषतज्ञ अधिकारी या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 30 वर्षे असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज कसा करावा ? | Canara Bank SO Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 20 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.

Samsung Galaxy A16 5G लाँच ; शानदार फीचर्ससह 6 वर्षे सिक्युरिटी अपडेट्स

Samsung Galaxy A16 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सॅमसंग या कंपनीने भारतात नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे . त्यांच्या या नवीन माँडेलचे नाव Samsung Galaxy A16 5G असून , हा फोन ग्राहकांना चार रंगात उपलब्ध होणार आहे. तसेच हा फोन Android 14 वर चालत असून , शानदार अपग्रेड्स व सहा वर्षापर्यंत सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात या स्मार्टफोनकडे आकर्षित होत आहेत. SBI आणि Axis क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी या फोनची खरेदी केल्यास त्यांना 1 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

फोनचे फीचर्स

या फोनला 6.7 इंचाचा FHD+ इनफिनिटी U सुपर AMOLED डिस्प्ले असून , ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव मिळणार आहे. याचे रिझोल्यूशन 1080×2340 पिक्सल्स आहे . प्रोसेसर बदल सांगायचं झालं तर , मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 ने सुसज्ज असल्याचे दिसून येते. यामध्ये डेटा ठेवण्यासाठी 8GB रॅम त्याचसोबत 128GB व 256GB स्टोरेजचा पर्यायही ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. स्टोरेजचे अजून एक वैशिष्ट असे कि , एसडी कार्डद्वारे 1.5TB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल . तसेच हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 14 वर चालत असून , त्यावर One UI 6.0 ची लेयर आहे. फोटो काढण्यासाठी यात 50 मेगापिक्सलचा कॅमेरासुद्धा दिला आहे. तसेच 5MP अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी प्रेमींसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. सुरक्षेसाठी फोनला फिंगरप्रिंट सेंसर देखील उपलब्ध करून दिले आहे.

रंग आणि किंमत

फोनला 5000 एमएएचची बॅटरी असून , 25 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे .या फोनचे वजन 192 ग्रॅम आहे . त्याचबरोबर तो IP54 रेटिंगसह येत असून , ज्यामुळे तो धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करू शकतो. हा फोन काळ्या , निळ्या , सोनेरी आणि फिकट हिरव्या रंगात मिळणार आहे. मॉडेल नुसार फोनची किंमत आहे. 8GB+128GB मॉडेलची किंमत 18999 रु तर 8GB+256GB मॉडेलची किंमत 21999 रु एवढी आहे . हा फोन ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने मिळणार आहे . अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर हा फोन मिळू शकतो .

पुण्यातून धावणार तब्बल 4 वंदे भारत ट्रेन ; प्रवास होणार अधिक गतिमान

Pune Vande Bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने गेल्या काही वर्षात ट्रेनच्या सोयींमध्ये कायापालट केला आहे. त्यामुळे अनेकजण जवळच्या आणि लांबच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देत आहेत. दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन ट्रेनची निर्मिती होऊ लागली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट झाला असून , वेळेची बचत झाली आहे. त्यातच पुणेकारणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या संख्येत वाढ होणार असून , हि संख्या फक्त एक किंवा दोन पुरतीच मर्यादित नसून तब्बल चार वंदे भारत ट्रेन धावणार आहेत.

वंदे भारत ट्रेनमुळे प्रवास अधिक गतिमान

पुण्यातील प्रवाशांसाठी वंदे भारत एक्सप्रेसच्या आगमनामुळे प्रवास जलद आणि सोयीस्कर झाला आहे. काही आठवड्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून मान्यता देण्यात आली . त्याचसोबत मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन पुण्याच्या मार्गावरून जात आहे. या तीन ट्रेनमुळे पुण्याचा रेल्वे प्रवास अधिक गतिमान आणि सुरक्षित झाला आहे.

नवीन मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुणे सोलापुर, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या वंदे भारत गाड्यांमुळे पुणेकरांचा रेल्वे प्रवास अधिक गतिमान झाला आहे. आता नवीन मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन चर्चेत असलेल्या मार्गांमध्ये पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, आणि पुणे ते बेळगाव या मार्गांचा समावेश आहे. कोणत्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करायची याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाकडूनच घेतला जातो .पण अजून रेल्वे बोर्डाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही .

Goat Diseases | हिवाळ्यात शेळ्यांना होतात हे धोकादायक आजार, अशाप्रकारे करा उपचार

Goat Diseases

Goat Diseases | काही दिवसातच हिवाळा सुरू होणार आहे. या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये माणसासोबत जनावरांना देखील विविध प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. त्यातही शेळ्यांना हिवाळ्यामध्ये अनेक आजार होण्याची शक्यता असते. हाती आलेल्या एका अहवालानुसार हिवाळ्यामध्ये शेळ्यांना दोन विशिष्ट प्रकारचे आजार होतात जे आजार जीवघेणे देखील ठरू शकतात. त्यामुळे त्या रोगांवर वेळीच नियंत्रण गरजेचे आहे. आणि या आजारामुळे शेळ्यांचा (Goat Diseases) जीव देखील धोक्यात येऊ शकतो. तर हे आजार कोणते आहेत? आणि त्याचा कशाप्रकारे शेळ्यांवर परिणाम होतो हे आपण जाणून घेणार आहोत.

शेळ्यांमध्ये हिवाळी रोग | Goat Diseases

प्लेग रोग: प्लेग नावाचा रोग प्रामुख्याने हिवाळ्याच्या हंगामात शेळ्यांमध्ये झपाट्याने पसरतो. प्लेग रोगाला पीपीआर असेही म्हणतात. हा रोग शेळ्यांमध्ये झपाट्याने पसरतो. हा रोग एका शेळीमध्ये आढळल्यास हळूहळू इतर शेळ्यांमध्येही हा रोग वेगाने पसरतो.

स्मॉलपॉक्स रोग: बहुतेक लोकांना या आजाराबद्दल आणि तो किती प्राणघातक आहे हे आधीच माहित आहे. एकदा हा रोग शेळीमध्ये झाला की तो इतर शेळ्यांमध्ये फार लवकर पसरतो. या रोगामुळे शेळ्यांच्या शरीरावर पुरळ उठते. चेचक विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर, पशुपालकांनी ताबडतोब त्याच्या उपचारांवर काम सुरू केले पाहिजे. पशुवैद्यकाशी संपर्क साधावा.

उपचार पद्धत | Goat Diseases

  • शेळ्यांमध्ये हे दोन रोग आल्यानंतर त्यांना चरायला पाठवू नका.
  • शेळ्यांना वेळोवेळी लसीकरण करून घ्या. या लसी तुम्ही तुमच्या शेळ्यांना सरकारी पशुवैद्यकीय केंद्रातून मोफत मिळवून देऊ शकता.
  • शेळ्यांमध्ये हा रोग आल्यानंतर त्यांना इतर शेळ्या किंवा कळपापासून वेगळे ठेवा.
  • रोगाने त्रस्त असलेल्या शेळ्यांसाठी खास शेडची व्यवस्था करावी. जेणेकरून हा विषाणू पसरू नये.