Sunday, December 28, 2025
Home Blog Page 407

दिवाळीत सर्वसामान्यांना आर्थिक फटका; खाद्यतेल आणि डाळींच्या किमतीत 15 % वाढ

Edible Oil And Pulses

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे. आपल्याकडे कोणताही सण असला की, अनेक गोडधोड पदार्थ होतात. नवनवीन पदार्थ होतात. त्यात दिवाळीत म्हणलं तर काही विचारूच नका. दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात अनेक पदार्थ बनवले जातात. लाडू, चकली, चिवडा, करंज्या, शंकरपाळ्या हे पदार्थ मोठ्या आवडीने बनवले जातात. परंतु यावर्षी गृहिणींचे दिवाळी बनवण्याचे बजेट थोडेसे घालणार आहे. कारण यावर्षी डाळी आणि तेलांच्या दरात मागील महिन्याच्या तुलनेत ज्या महिन्यात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे. आणि ऐन सणासुदीत महागाईची चिंता वाढलेली आहे.

दसरा दिवाळी हे सन लागू पाठ आलेले आहेत आणि सणासुदीच्या काळात आपण नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. त्यामुळे किराणामालांच्या वस्तूंची मागणी देखील वाढते. तसेच केंद्र सरकारने आयात शुल्क 12.5 वरून 32.5% केले आहे. सणाच्या आधी रवा, बेसन, खारीक, खोबरे, शेंगदाणा यांसारख्या विविध प्रकारच्या वस्तूंच्या दरात वाढ झालेली आहेम खाद्यतेल, खोबरे, नारळ, चणाडाळ, बेसन, पोहे यांच्या किमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झालेली आहे. तसेच तेलाचे भाव देखील वाढलेले आहेत. सध्या शेंगदाणा तेलाचे भाव हे प्रति किलो 175 रुपये एवढे आहे. सोयाबीन तेलाचे भाव हे 144 सूर्यफूल तेलाचे 146 रुपये प्रति किलो आहे. तसेच सरकी तेलाचे दर हे 148 रुपये प्रति किलो आहे.

यासोबत डाळींच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. सध्या हरभरा डाळीचे दर हे 110 रुपये प्रति किलो एवढे आहे. मटकीची डाळी 120 रुपये प्रति किलो एवढी आहे. तुरडाळ ही 180 रुपये किलो एवढी आहे. मूग डाळ 130 रुपये किलो मसूर डाळ 100 रुपये किलो, त्यामुळे या सणासुदीत जीवन उपयोगी वस्तूंमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे.

जेष्ठ्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी; आरोग्यविमा करमुक्त होण्याची शक्यता

Senior Citizen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेची जीएसटीच्या दराबाबत मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये जेष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनविमा आरोग्य विमासाठी भरलेला प्रीमियम करमुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक मोठी बातमी आलेली आहे. तुम्ही तर पाच लाखापेक्षा जास्त आरोग्य विमा प्रिमियमवर 18 टक्के जीएसटी लागू राहील. तसेच सध्या टर्म पॉलिसी आणि फॅमिली यांच्यासाठी जीवन विमा टर्म बरोबर 18% जीएसटी आकारला जातो. परंतु आता हा प्रीमियम ५ टक्के पर्यंत कमी करण्याबाबत निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

याबाबत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी मंत्री यांनी सांगितले की, “गटातील प्रत्येक सदस्याला दिलासा द्यायचा आहे. तसेच जेष्ठ्य नागरिकांकडे विशेष लक्ष देणार आहे. आम्ही परिषदेला अहवाल देखील सादर करणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी असू शकत नाही. जीएसटी कौन्सिलने मागे नाही आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियमवरील तेरा सदस्य गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा, गुजरात, मेघालय इत्यादी अनेक राज्यांचा समावेश होता.

त्याचप्रमाणे या मंत्र्यांच्या गटांनी शनिवारीविद्यार्थ्यांच्या बाटल्या, सायकली आणि वह्यांवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा दर पाच टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे. तसेच महागड्या घडाळ्यावरील कर वाढवण्याची देखील सूचना दिलेली आहे. 20 लिटर पेक्षा जास्त क्षमता असलेल्या पाण्याच्या बाटलींवरील जीएसटी हा 18% न वरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करणार आहे. तसेच वह्यांवरील जीएसटी हा 12% म्हणून पाच टक्के करण्यात येत आहे. त्यामुळे आता अनेक गोष्टींवरील जीएसटी कमी होणार आहे. परंतु यात विमा इन्शुरन्सचा ज्येष्ठ नागरिकांना मात्र चांगलाच फायदा होणार आहे.

बँकांना दर शनिवार रविवार मिळणार सुट्टी; या तारखेपासून लागू होणार नवीन नियम

Bank Holliday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण अनेक कंपन्यांमध्ये पाहिले आहे की, कर्मचारी हे आठवड्यातून पाच दिवस काम करतात. आणि शनिवारी रविवारी दोन दिवस सुट्ट्या घेतात. आता हीच मागणी बँकांनी देखील केलेली होती. आठवड्यातील पाच दिवस काम करून दोन दिवस सुट्टी घेण्याची मागणी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मागील आणि दिवसापासून केलेली आहे. परंतु हा बदल लवकरच खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये दिसू शकतो. आणि या दिशेने प्रयत्न देखील चालू आहेत. या मागणीबाबत इंडियन बँक कॉन्फिडरेशन आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात एकमत झालेले आहे.

आतापर्यंत बँकांनाही प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथा शनिवारी सुट्टी दिली होती. उर्वरित दोन शनिवार यांना बँकांमध्ये काम करावे लागत होते. 2015 पासून बँकांनी जर शनिवारी सुट्टी द्यावी अशी मागणी केली होती. आणि परंतु जर सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली, तर इतर पाच दिवस बँकांच्या कामाच्या वेळेतही बदल होणार आहे. सध्या बँकेचे कामकाज हे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करतात. परंतु जर शनिवारी रविवारी सुट्टी देण्याचा नाही नवीन नियम मंजूर झाला, तर बँका सकाळी 9 वाजून 45 वाजता मिनिटांनी उघडतील आणि सायंकाळी 5: 30 वाजता बंद होईल. याचा अर्थ कर्मचारी दिवसातून 45 मिनिटात अतिरिक्त काम करतील.

2015 मध्ये सरकार RBI आणि IBA यांच्यात झालेला करारानुसार महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याचा नियम लागू केला होता. आणि तेव्हापासूनच अनेक संघटनांनी शनिवारी आणि रव्याचे दोन्ही दिवशी सुट्ट्या जाहीर करावे. यासाठी प्रयत्न करत होता. परंतु आता यावर एकमत झालेले असून लवकरच शासनाच्या अंतिम मंजुरीची वाट पाहत आहे. याबाबत या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीस सरकार ठोस निर्णय घेईल अशी माहिती आलेली आहे.

तुम्हालाही आधार कार्डवरील फोटोची लाज वाटते का? अशाप्रकारे करा नवीन फोटो अपडेट

Adhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे असे ओळखपत्र आहे. कोणत्याही सरकारी कामासाठी तसेच वैयक्तिक करण्यासाठी देखील आधार कार्ड खूप गरजेचे आहे. आधार कार्ड हे तुमचे प्रमुख ओळखपत्र आहे. परंतु जर याच आधार कार्डवर तुमची कोणतीही माहिती चुकीची असेल, तर त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आधार कार्डवर तुमचा फोटो, नाव, पत्ता, जन्मतारीख या डिटेल्स खूप महत्त्वाच्या आहे आणि ही माहिती आता अपडेट करणे खूप सोपे झाले आहे. तुम्ही तुम्हाला पाहिजे ती माहिती बदलण्यासाठी तुमच्या जवळील आधार नोंदणी केंद्रावर जाऊन या गोष्टी अपडेट करू.

एक कोणत्याही व्यक्तीच्या आधार कार्डवर त्याचे नाव, पत्ता, वय, लिंग, फोन नंबर, ईमेल आयडी यांसारखे माहिती असते. परंतु अनेक वेळा आपल्या आधार कार्ड घेतले की, आपल्याला आपल्या फोटोची लाज वाटते. कारण या फोटो आधार कार्डवरील फोटो लहानपणीचा फोटो असतो. परंतु जर तुम्हाला देखील तुमच्या आधार कार्ड वरील फोटोची लाज वाटत असेल, तर तुम्ही हा फोटो बदलून घेऊ शकता. आधार कार्ड वरील हा फोटो बदलण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट लागत नाही. यासाठी एक छोटीशी प्रक्रिया तुम्हाला पार करावी लागेल. ज्यामुळे तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरील फोटो सहज बदलू शकता.

तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता, वय, लिंग, फोन नंबर, ईमेल आयडी अपडेट करायचा असेल, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे काम करू शकता. परंतु जर तुम्हाला तुमच्या फिंगरप्रिंट किंवा फोटो बदलायचा असेल, तर तुम्ही आधार नोंदणी केंद्रावर जाऊन करू शकता. जिथे तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल. आणि नवीन आधार कार्ड हे 30 ते 90 दिवसाच्या आत तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल. आता फोटो बदलण्यासाठी काय करावे लागते? याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण घालून घेणार आहोत.

आधार कार्डवरील फोटो कसा बदलायचा ?

  • आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी UIDAI यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर माय आधार या विभागात एन्ट्रॉलमेंट अँड अपडेट कॉर्नर वर क्लिक करून हा फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
  • त्यानंतर तुम्ही त्या फॉर्मची प्रिंट घ्या आणि तुमची संपूर्ण माहिती करा आणि तो सबमिट करण्यासाठी जवळच्या आधार केंद्रावर जा.
  • तिथे गेल्यावर संपूर्ण फॉर्म करताना केली जाईल आणि तुमचा तुम्हाला पाहिजे तसा नवीन फोटो क्लिक केला जाईल.
  • त्यानंतर तुम्हाला 100 रुपये एवढी फी द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्या आधार कार्ड वरील फोटो अपडेट केला जाईल.

Jio New Recharge Plan | Jio ने आणला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; 84 दिवसांच्या वैधतेसह मिळणार हे फायदे

Jio New Recharge Plan

Jio New Recharge Plan | रिलायन्स जिओ ही एक लोकप्रिय टेलिफोन कंपनी आहे. त्यांच्यासोबत कितीतरी ग्राहक जोडले गेले आहेत. त्यांच्या ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी जिओ वेगवेगळे रिचार्ज असतात. जिओने जुलै महिन्यामध्ये त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये (Jio New Recharge Plan) मोठ्या प्रमाणात वाढ केली. त्यामुळे कंपनीचे अनेक ग्राहक नाराज झाले होते. परंतु आता त्याच ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी जिओनने अनेक प्लॅन आणले आहेत. जे ग्राहकांना देखील आता आवडत आहेत. आणि अनेक नवीन ग्राहक देखील जिओ सोबत जोडले जात आहेत.

ग्राहकांच्या गरजा तसेच इतर गोष्टी लक्षात घेता जिओने जास्त व्हॅलिडीटी असलेल्या अनेक प्लॅन्स आता लॉन्च केलेले आहेत. जिओने 84 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह एकापेक्षा एक चांगले प्लॅन्स आणले आहेत. जर तुम्ही देखील जिओचे युजर असाल तर 84 दिवसांचा हा प्लॅन अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. आता हा प्लॅन नक्की काय आहे? यातून कोणते फायदे मिळणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

जिओच्या (Jio New Recharge Plan) पोर्टफोलिओ मधली 84 दिवसांचा व्हॅलिडीटी प्लॅन हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 799 रुपये एवढी आहे. तसेच हा प्लॅन तुम्ही 84 दिवसांसाठी वापरू शकता. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड फ्री कॉलिंग आहे तसेच जिओच्या ग्राहकांना जर 100 फ्री एसएमएसची सुविधा देखील यामध्ये दिली जात आहे.

जिओच्या या 84 दिवसांच्या व्हॅलिडीटी प्लॅनमध्ये तुम्हाला तर 1.5 जीबी डेटा वापरता येणार आहे. म्हणजेच संपूर्ण 126 GB डेटा दिलेला आहे. जिओचा हा प्लॅन अनलिमिटेड आहे. तुम्हाला फ्री 5G डेटाचा लाभ मिळणार नाही. जिओच्या ग्राहकांना या इतर प्लॅनप्रमाणे अतिरिक्त फायदे देखील मिळणार आहे. तुम्हाला चित्रपट, वेब सिरीज पाहण्याची आवड असेल, तर तुम्हाला जिओ सिनेमाची फ्री सबस्क्रिप्शन दिले जाते. तसेच जिओ टीव्ही, जिओ क्लाउड यांचा ऍक्सेस देखील दिला जातो. म्हणजेच जिओचा हा 84 दिवसांचा रिचार्ज प्लान तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Diwali Muhurat Trading | BSE ने जाहीर केली दिवाळी ट्रेडिंगची अंतिम तारीख ; जाणून घ्या सविस्तर

Diwali Muhurat Trading

Diwali Muhurat Trading | दिवाळीचा सण तोंडावर आलेला आहे. आणि या दिवाळीमध्ये सगळेच सणाची जोरदार तयारी करत आहे. तसेच शेअर बाजारात देखील एका विशिष्ट कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात तयारी चालू झालेली आहे. याला वार्षिक मुहूर्त ट्रेडिंग सत्र असे म्हणतात. हे वार्षिक मुहूर्त ट्रेडिंग सत्र बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्यावर 1 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. ही ट्रेडिंग एक तासाची असणार आहे. मुहूर्त ट्रेडिंग गुंतवणूकदारांना आर्थिक लाभ होतो तसेच बाजारातील अनेक गोष्टी समजतात.

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? | Diwali Muhurat Trading

‘मुहूर्त’ म्हणजे ग्रहांच्या स्थितींद्वारे निर्धारित केलेल्या शुभ कालावधीचा संदर्भ आहे, ज्याला नशीब आणि यश मिळेल असे मानले जाते. दिवाळी दरम्यान, भारताचा दिव्यांचा सण, स्टॉक एक्सचेंज एक विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित करतात, जे हिंदू कॅलेंडरनुसार नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे. हे सत्र लक्ष्मी पूजन रोजी होते, एक विधी जेथे भक्त आर्थिक समृद्धीसाठी आशीर्वाद मिळविण्यासाठी धनाची देवी लक्ष्मीची पूजा करतात.

मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा भारतभरातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची घटना बनली आहे. हे केवळ आर्थिक व्यवहारापेक्षा अधिक प्रतिनिधित्व करते – बाजारातील सहभागींना या शुभ काळात केलेल्या कृती वर्षभर यश मिळवून देऊ शकतात या विश्वासाने त्यांची गुंतवणूक संरेखित करण्याची ही एक संधी आहे.

मुहूर्त ट्रेडिंग 2024 साठी तारीख आणि वेळ BSE आणि NSE ने अद्याप या वर्षीच्या मुहूर्त ट्रेडिंग सत्राची अचूक वेळ जाहीर केलेली नसली तरी, त्यांनी पुष्टी केली आहे की ते 1 नोव्हेंबर 2024 रोजी दिवाळी आणि लक्ष्मी पूजन सणाच्या बरोबरीने होईल. ऐतिहासिकदृष्ट्या, कार्यक्रम संध्याकाळच्या वेळी एक तासाच्या खिडकीसाठी चालतो, अंतिम वेळा तारखेच्या जवळ घोषित केल्या जातात. BSE वेबसाईटनुसार : “मुहूर्त ट्रेडिंग 1 नोव्हेंबर 2024 रोजी (दिवाळी – लक्ष्मी पूजन) होईल. मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळा नंतर सूचित केल्या जातील.” सामान्यतः, सत्र संपण्याच्या १५ मिनिटांपूर्वी सर्व इंट्राडे पोझिशन्स स्क्वेअर ऑफ केले जातात, त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेवटच्या क्षणातील आश्चर्य टाळण्यासाठी त्यानुसार त्यांच्या व्यवहारांचे नियोजन केले पाहिजे.

गुंतवणूकदार नवीन गुंतवणूक सुरू करण्यासाठी, पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी आणि कधीकधी नवीन सेटलमेंट खाती उघडण्यासाठी सत्राचा वापर करतात. जरी मुहूर्त ट्रेडिंगचे सांस्कृतिक आणि प्रतिकात्मक महत्त्व असले तरी, तो केवळ एक औपचारिक कार्यक्रमापेक्षा अधिक आहे – हे सहसा सक्रिय सहभाग, बाजारातील अस्थिरता आणि धोरणात्मक व्यापार निर्णयांद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. मुहूर्त ट्रेडिंग गुंतवणूकदारांना वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करू देते, शेअर बाजार आणि पुढील वर्ष या दोन्ही बाबतीत त्यांचा आशावाद दाखवून देते. आगामी वर्षासाठी आर्थिक आशा आणि व्यवसाय वाढीचे प्रतिबिंब म्हणून या सत्राकडे मोठ्या प्रमाणावर पाहिले जाते. मुहूर्त ट्रेडिंग का महत्वाचे आहे? अनेक कारणांमुळे मुहूर्त ट्रेडिंग भारतीय गुंतवणूकदारांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे:

भारतीय स्टॉक ब्रोकर्स आणि व्यापाऱ्यांसाठी मुहूर्त ट्रेडिंगचे महत्त्व, दिवाळी त्यांच्या आर्थिक नवीन वर्षाची सुरुवात करते. मुहूर्त ट्रेडिंग हा स्टॉक मार्केटमधील नवीन संधी स्वीकारण्याचा एक क्षण मानला जात आहे, या विश्वासाने की या काळात गुंतवणूक केल्याने चांगले भाग्य मिळेल. हा विश्वास अनुभवी गुंतवणूकदार आणि नवागत दोघांनाही मर्यादित ट्रेडिंग विंडो असूनही सक्रियपणे सहभागी होण्यास प्रवृत्त करतो.

Weather Update | राज्यात पावसाचा जोर वाढला; या विभागांना दिला येल्लो अलर्ट

Weather Update

Weather Update | संपूर्ण राज्यात परतीचा पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणेसह राज्यातील विविध ठिकाणी या पावसाने सुरुवात केलेली आहे. अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामानाने विभागाकडून वर्तमान झालेली आहे. हवामान विभाग हे दररोज पावसाबद्दलच्या अंदाज व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी आज म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी कशाप्रकारे हवामाना असणार आहे? हे सांगितलेले आहे. त्यामुळे आज देखील राज्यातील अनेक ठिकाणी आपल्याला पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

आज मुंबई, ठाणे तसेच पालघर यांच्यासह कोकण किनारपट्टीवर देखील पावसाचे हजेरी लागणार आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होणार आहे. हवामान विभागाने मुंबई ठाण्याला आज येलो अलर्ट दिलेला आहे. यासोबत या ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अरबी समुद्र चक्री वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणात मोठे बदल झालेले आहेत. आणि त्यामुळेच वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे.

कोकणात देखील पावसाला सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये संध्याकाळी रोज मेघगर्जेसह पावसाला सुरुवात झालेली आहे बत्यामुळे आज देखील मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यत आहे. तसेच आठवडाभर हे हवामान कायम असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात देखील आठवडाभर पावसाची शक्यता आहे.

या परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. सोयाबीन आणि कापूस या पिकाला पावसाचा चांगला फटका बसलेला आहे. आणि या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यासोबतच भारताचे पीक आता काढणे झालेले आहेत. परंतु सततच्या पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांना भाताचे पीक काढता येत नाही.

Elon Musk च्या AI कंपनीत काम करण्याची संधी; दर तासाला मिळणार 5000 रुपये

Elon Musk AI

भारतातल्या प्रत्येक युवकाला चांगल्या नोकरीची आवश्यकता आहे. प्रत्येक सुशिक्षित तरुणाचं स्वप्न असतं की आपल्याला मोठ्या कंपनीत काम करता यावं आणि गलेलठ्ठ पगार असावा. अशा परिस्थितीत तुम्हाला इलॉन मस्कच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली तर काय होईल? होय …! आम्ही खरे सांगतोय इलॉन मस्क हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. X (जुने नाव ट्विटर) ते टेस्ला आणि SpaceX सारख्या अनेक मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे ते मालक आहेत. त्यांच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते. चला जाणून घेऊया नक्की काय आहे ही बातमी …

इलॉन मस्कच्या कंपनीत रिक्त जागा

खरेतर , इलॉन मस्कला त्याच्या एका कंपनीसाठी AI ट्यूटरची आवश्यकता आहे. ॲलन त्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कंपनी xAI साठी AI ट्यूटर शोधत आहे. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, एलोन मस्कच्या या AI कंपनीत काम करणाऱ्या AI ट्युटर्सना भारतीय रुपयांमध्ये प्रति तास ५००० रुपये मिळतील. एलोन मस्कच्या कंपनी xAI ने गेल्या आठवड्यात एआय ट्युटर्सच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI साठी उच्च दर्जाचा डेटा तयार करणे हे या ट्यूटरचे काम असेल, जेणेकरून भाषा प्रक्रिया अल्गोरिदम शिकवता येतील.

‘या’ भाषा येणे आवश्यक

या नोकऱ्यांसाठी, उमेदवारांना यापैकी किमान दोन भाषा माहित असणे आवश्यक आहे, ज्यात कोरियन, व्हिएतनामी, चीनी, जर्मन, रशियन, इटालियन, फ्रेंच, अरबी, इंडोनेशियन, तुर्की, हिंदी, पर्शियन, स्पॅनिश आणि पोर्तुगीज यांचा समावेश आहे.

प्रत्येक तासाला 5,000

जसे आम्ही तुम्हाला वर सांगितले आहे की या कामासाठी, AI शिक्षकांना प्रति तास 35-65 डॉलर्स म्हणजे सुमारे 5000 रुपये दिले जातील आणि या नोकऱ्या दूरस्थ आणि पूर्ण-वेळ असतील.इलॉन मस्कचे उद्दिष्ट xAI चा झपाट्याने विकास करणे आणि विश्वाबद्दलची समज वाढवणे आणि सुधारणे हे आहे. यासाठी, त्याने सोशल मीडिया साइट X वर आपला जनरेटिव्ह एआय प्रोग्राम ग्रोक लॉन्च केला आहे, ज्यामध्ये डेटा प्रशिक्षणासाठी सार्वजनिक ट्विटचा वापर केला जाईल.

तथापि, ही पहिली कंपनी नाही जी इंग्रजी नसलेल्या भाषांसाठी वेगाने डेटा एनोटेटर्सची भरती करत आहे. यापूर्वी, स्केल एआयने बंगाली आणि उर्दू सारख्या भाषांसाठी 60 हून अधिक नोकऱ्यांसाठी जाहिरात देखील केली होती, कारण या भाषांमध्ये इंटरनेटवर कमी लेखी सामग्री आहे.

जास्वंदीच्या रोपाला येतील फुलंच फुलं ; वापरा केवळ ‘या’ 2 गोष्टी

flowering in hibiscus

आपलं सुंदर घर असावं आणि आपल्या घरात छोटासा का होईना सुंदर बगीचा असावा असं सगळ्यांनाच वाटतं मात्र आता जमिनीची कमतरता असल्यामुळे फ्लॅट सिस्टीम घरांमध्ये सुंदर बाग बनवणं शक्य नसलं तरी बाल्कनी मध्ये विविध प्रकारची झाडं लावून तुम्ही तुमच्या बागेची स्वप्न पूर्ण करू शकता. पण अनेकदा घरामध्ये नर्सरी मधून झाडे आणली की ती काही वेळ त्याला फुलं येतात मात्र त्यानंतर मात्र त्याला फुलं येणं बंद होऊन जातं. खास करून जास्वंदीच्या झाडाबाबत हे होतच होतं म्हणूनच आम्ही आजच्या लेखांमध्ये तुम्हाला जास्वंदीच्या झाडासाठी (Garden Tips) एक असा उपाय सांगणार आहोत ज्याच्यामुळे तुमचा जास्त फुलांनी बहरून जाईल चला तर मग जाणून घेऊया…

रॉक फॉस्फेट

रॉक फॉस्फेट चा वापर करून तुमच्या झाडाची वाढ चांगली होऊ शकते. रॉक फॉस्फेट हे पाण्यात विरघळतं. याचा वापर कुंडीतल्या मातीत केल्यास फुलांची योग्य वाढ होते. यामध्ये असणारा नायट्रोजन आणि पोटॅशियम झाडाच्या योग्य वाढीसाठी मदत करत. आता ते कसं वापरायचं जाणून घेऊयात… रॉक फॉस्फेट चा वापर करण्यासाठी एक लिटर पाणी घ्या. त्यामध्ये रॉक फॉस्फेट घालून मिक्स करा. तयार पाणी कुंडीतल्या मातीत मिसळा आपण या पाण्याचा वापर महिन्यातून एकदा करू शकतो रफ फॉस्फेटच्या गुणधर्मामुळे झाडांवर नवी फुल येतात.

कांद्याची टरफलं

जर तुमच्याकडे रॉक फॉस्फेट नाहीये तर चिंता अजिबात करू नका कारण कांद्याचा टरफलांचा वापर सुद्धा झाडाला चांगली फुले येण्यासाठी आपण करू शकतो. कांद्याच्या सालीमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर यासारखे अनेक घटक जास्त प्रमाणामध्ये असतात कांद्याच्या सालीचा वापर केल्याने झाडाला बहर येतो. हा उपाय करण्यासाठी कांद्याच्या सालीचे पाणी तयार करा कांद्याच्या सालीचा वापर केल्याने झाड बहरते. दोन ते तीन मग पाणी झाडाच्या कुंडीत तुम्हाला मिसळायांचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मातीमध्ये लिक्विड घालाल तेव्हा माती थोडी कोरडी असणं आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana Suspend : लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली ! निधी सरकारने थांबवला ; योजना तात्पुरती स्थगित

Ladki Bahin Yojana Suspend

Ladki Bahin Yojana Suspend : महायुती सरकारची अतिशय लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’. या योजनेचा लाभ तुम्ही देखील घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. महायुती सरकार कडून वारंवार विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ही योजना बंद होणार नाही असे सांगण्यात येत होते. मात्र ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे डिसेम्बर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana Suspend) खात्यात येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. चला जाणून घेऊया कारण

मिळालेल्या माहितीनुसार तात्पुरत्या स्वरुपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे. तसंच, या योजनेअंतर्गत नवे अर्ज स्वीकारणंही बंद करण्यात आलं आहे. राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana Suspend) पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

‘या’ करणामुळे योजनेमुळे स्थगिती (Ladki Bahin Yojana Suspend)

महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे विभागाकडू या योजनेची माहिती मागवण्यात आली आहे. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला देण्यात आली आहे . परिणामी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार… (Ladki Bahin Yojana Suspend)

दरम्यान निवडणूक जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी महायुती सरकार कडून रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना बंद होणार नसल्याची ग्वाही दिली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, विरोधक म्हणतात आम्ही सत्तेत आलो तर पोलखोल करणार,महायुतीने आणलेल्या सर्व योजना बंद करणार,अशी टीका विरोधक करतात. पण या योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही. हे खुलेआम बोलायला लागले त्यांच्यात जेलसी निर्माण झाले आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यांच्या अशा बोलण्याने लोक त्यांच्या विरोधात जातील आणि लाडकी बहीण योजनेला जर कोणी टच करायला गेलं तर त्याचा कार्यक्रम झाला समजा. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार… (Ladki Bahin Yojana Suspend) आमच्या लाडक्या बहिणी हे ऐकून घेणार नाहीत. असा हल्लाबोल पत्रकार परिषदेच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला होता. मात्र निवडणुका झाल्यानंतर कोणेते सरकार येणार ? ही योजना चालू राहणार की नाही ? योजना चालू राहणार की नाही ? हे येणारा काळच ठरावेल. तूर्तास या योजनेला स्थगिती देण्यात आली आहे.