Sunday, December 28, 2025
Home Blog Page 408

सरकारचा मोठा निर्णय; केवळ 5 टक्के शुल्क भरून करता येणार रेडीरेकनरच्या जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार

Land

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेत जमिनीचे मालक आहेत त्या मालकांसाठी आम्ही अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता जो तुकडेबंदी कायदा होता, त्या कायद्यामध्ये निश्चितता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या आधी तुकडे बंदीचे व्यवहार करण्यासाठी रेडीरेकलर दराच्या 25% इतके पैसे घेण्यात येत होते. परंतु आता विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना दिलासा देणारा हा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार तुकडे बंदीचे व्यवहार नियमित करण्यासाठी आता 25% ऐवजी 5% एवढे शुल्क आकारण्यात आलेले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नक्की दिलासा मिळणार आहे.

सरकारने धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रित करण्याबाबत या कायद्यात बदल केलेला आहे. शेतकऱ्यांना जमिनी खरेदी आणि विक्री करण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. तसेच बेकायदेशीर प्लॉटिंग देखील होत होते. या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी सरकारने हा बदल करून केलेला आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास व्हावा हा या बदला मागील उद्दिष्ट्ये आहे.

सरकारच्या बदललेल्या निर्णया मागचे कारण काय

शेतकऱ्यांना होणारी अडचण

अनेक शेतकऱ्यांकडे छोट्या प्रमाणात जमीन असते. त्यावेळी काही शेतकऱ्यांना ती जमीन विकायची असते. किंवा त्यांच्या मुलांमध्ये ती वाटायची असते. परंतु हे व्यवहार करताना 25% एवढे शुल्क लागत होते. आणि असे व्यवहार करताना हे 25% शुल्क आर्थिकदृष्ट्या त्यांना परवडत नव्हते. म्हणूनच त्यांचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

बेकायदेशीर प्लॉटिंग

आज काल शहराच्या आजूबाजूला आणि ठिकाणी बेकायदेशीर प्लॉटिंग होताना दिसत आहे. यामुळे अनेकांना अडचणी देखील निर्माण होत आहे. या बेकायदेशीर प्लॉटिंगला आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुका अगदी महिन्यावर आलेल्या आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मनात असलेली नाराजगी दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या मनात चांगले स्थान निर्माण करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

आता बँकांमध्ये 5 दिवस होणार काम ? कामाचे वेळापत्रक काय असेल?

5 Days Working

सरकारने डिसेंबर 2024 पर्यंत मान्यता दिल्यास भारतातील बँक कर्मचाऱ्यांना लवकरच पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा लाभ मिळू शकेल.इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटना यांच्यात या विषयावर एक करार झाला आहे, परंतु सरकारकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.

डिसेंबर 2023 मध्ये, IBA आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांना कव्हर करणाऱ्या बँक युनियन्समध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. IBA आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन यांच्यात 8 मार्च 2024 रोजी एका संयुक्त नोटवर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामध्ये पाच दिवसांच्या कामकाजाचा आठवडा आणि शनिवार व रविवारच्या सुट्टीसाठी फ्रेमवर्क तयार करण्यात आले. सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्यास बँक कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवारची सुट्टी मिळेल, त्या बदल्यात त्यांच्या रोजच्या कामाच्या वेळा 40 मिनिटांनी वाढतील.

देशाच्या बहुतांश भागात बँका साधारणपणे सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत काम करतात. तथापि, ते शक्यतो सकाळी 9 वाजता उघडेल आणि संध्याकाळी 5.40 वाजता बंद होईल.काही बँका सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सर्वसामान्यांसाठी खुल्या असतात याची नोंद घ्यावी.या दुरुस्तीचा उद्देश केवळ कर्मचाऱ्यांचे कल्याण वाढवणे नाही तर ते सुनिश्चित करून उत्पादकता सुधारणे देखील आहे.

Flipkart Big Diwali Sale: खरेदीची जबरदस्त संधी ! iPhone सह ‘हे’ स्मार्टफोन मिळतील स्वस्तात

Flipkart Big Diwali Sale

Flipkart Big Diwali Sale: सप्टेंबर महिन्यापासून, Flipkart, Amazon सारख्या विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या ऑफर्स ग्राहकांसाठी दिसून येत आहेत. जिथे अनेक उत्पादने अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहेत. सेल दरम्यान, स्मार्टफोनवर मोठ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. अलीकडेच, फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल संपला, त्यानंतर लवकरच कंपनीने बिग शॉपिंग उत्सव सेलची घोषणा केली आहे.

ही विक्री 17 ऑक्टोबर रोजी संपली, त्यानंतर आता कंपनीने मोठी सूट जाहीर केली आहे. दिवाळी येत आहे त्यामुळे अनेक ग्राहक घरबसल्या खरेदीला प्राधान्य देतात. त्यामुळे सणाचा फायदा घेत कंपनीने आता फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल आणला आहे. जिथे पुन्हा एकदा स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स पाहायला मिळणार आहेत. चला जाणून घेऊया…

Flipkart Big Diwali Sale कधी सुरू होईल?

फ्लिपकार्टच्या अधिकृत साइटनुसार, हा सेल 21 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. तर Flipkart प्लस सदस्य 20 ऑक्टोबरपासून या सेलचा आनंद घेऊ शकतील. सेलपूर्वी कंपनीने त्या उत्पादनांची माहिती दिली आहे ज्यावर बंपर डिस्काउंट ऑफर दिसणार आहेत. यामध्ये आयफोन आणि इतर अनेक ब्रँडचे स्मार्टफोन सेल पेजवर दिसत आहेत. या व्यतिरिक्त, कंपनीने उत्पादनांच्या इतर श्रेणी देखील छेडल्या आहेत जे विक्रीमध्ये कमी किमतीत उपलब्ध असतील.

iPhone सह हे स्मार्टफोन स्वस्तात मिळतील

  • iPhone 15, iPhone 15 Plus
  • Motorola G85 5G
  • SAMSUNG Galaxy S23 FE
  • vivo V40 5G

Flipkart Big Diwali Sale: टॉप डील्स

हे असे स्मार्टफोन आहेत जे कंपनीने आपल्या वेबसाइटच्या टॉप डील्स पेजवर प्रसिद्ध केले आहेत. ही सर्व उपकरणे त्यांच्या किंमतीच्या श्रेणीतील सर्वात शक्तिशाली फोनपैकी एक आहेत. सेलमध्ये या फोन्सवर सर्वाधिक डिस्काउंट पाहायला मिळणार आहे. , या व्यतिरिक्त, अनेक स्मार्टफोन अगदी स्वस्त किमतीत सेलमध्ये उपलब्ध आहेत. बिग बिलियन डेज सेलप्रमाणेच दिवाळी सेलमध्येही तुम्हाला केवळ 50 ते 55 हजार रुपयांच्या ऑफरसह iPhone 15 खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

त्याच वेळी, SAMSUNG Galaxy S23 FE देखील 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. एवढेच नाही तर सेल दरम्यान कंपनी इतर अनेक गॅजेट्सवर 80% पर्यंत सूट देईल.

पुण्यात हेल्मेटसक्ती ? सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

road safety

विधान भवन इथं रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ नये त्यासाठी संबंधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करावी यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात यावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी दिली आहे. प्रशासनानं दुचाकी स्वरांसाठी हेल्मेट सक्ती करावी असं देखील त्यांनी बजावले आहे.

याबाबत बोलताना न्यायमूर्ती सप्रे यांनी सांगितलं की निष्पाप नागरिकांच्या रस्ते अपघातात बळींची संख्या लक्षात घेता परिवहन विभाग पोलीस विभाग तसेच सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी सकारात्मकतेने काम करावं अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक बसवण्याबरोबरच निस्वार्थ भावनेने काम करावं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता सुरक्षा संबंधी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अपघातातील बळींची संख्या कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत. या बैठकीत दिलेल्या निर्देशांक सर्वसामान्यत यंत्रणांनी गांभीर्यपूर्वक पालन करावे. वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे रस्ता सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांनीही वाहतुकीचे नियम स्वयं स्फूर्तीने पाळणे आवश्यक आहे.

वाहतूक नियमांचे पालन करा

रस्त्यावर चालवण्यात येणारे वाहन सुस्थितीत असावं वाहन चालकांनी सीट बेल्ट लावावे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये अति वेगाने वाहन चालवू नये . मद्य प्राशन करून वाहन चालू नये. वाहन परवाना तसेच वाहन आणि वाहन चालकांनी सुरक्षा विमा वेळोवेळी नूतरीकरण करावा. रस्ता सुरक्षा उपाययोजनांची माहिती करून घ्यावी त्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना देखील न्यायमूर्ती सप्रे यांनी दिल्या आहेत.

सुरक्षेसाठी हेल्मेट

दुचाकी वाहन चालकांच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाहन चालकांनी स्वतः आणि सोबत असलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणारे हेल्मेट चा वापर करावा. त्यासाठी प्रशासनानं दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट सक्ती करावी. वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करावे. अशा सूचना देखील न्यायमूर्ती सप्रे यांनी दिल्या आहेत.

यावेळी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा लड्डा ऊंटवाल, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण आदी उपस्थित होते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! 2025 च्या सुट्ट्यांची यादी सरकरकडून जाहीर

2025 holiday

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षभराच्या सुट्ट्यांचे नियोजन आधीच करावे लागते. त्यांवर काम आणि सुट्टी यांचा ताळमेळ कर्मचाऱ्यांना घालावा लागतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता आता एक महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 2025 मधील सुट्ट्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रतिबंधित सुट्ट्यांच्या यादीतील कोणत्याही दोन सुट्ट्यांचा लाभ घेण्याची देखील परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारची प्रशासकीय कार्यालये दिल्ली/नवी दिल्लीच्या बाहेर स्थित असतील 12 ऐच्छिक सुट्ट्यांपैकी निवडल्या जाणाऱ्या तीन सुट्यांव्यतिरिक्त खालील सुट्ट्या अनिवार्यपणे पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकार कडून ऐच्छिक सुट्ट्यांकरिता 12 सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर ठरलेल्या सुट्यांची संख्या 14 आहे.

  1. प्रजासत्ताक दिन
  1. स्वातंत्र्य दिन
  2. महात्मा गांधी यांचा जन्मदिवस
  3. बुद्ध पौर्णिमा
    5. ख्रिसमस
    ६. दसरा (विजय दशमी)
  4. दिवाळी (दीपावली)
  5. गुड फ्रायडे
  6. गुरु नानक यांची जयंती
  7. इदुल फितर
  8. इदुल जुहा
  9. महावीर जयंती
  10. मोहरम
  11. पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिवस (ईद -ए-मिलाद)

12 ऐच्छिक सुट्ट्या खालीलप्रमाणे

  1. दसऱ्यासाठी अतिरिक्त दिवस
  1. होळी
  2. जन्माष्टमी (वैष्णवी)
  3. राम नवमी
  4. महा शिवरात्री
  5. गणेश चतुर्थी / विनायक चतुर्थी
  6. मकर संक्रांती
  7. रथयात्रा
  8. ओणम
  9. पोंगल
  10. श्री पंचमी / बसंत पंचमी
  11. विशू/वैशाखी/वैशाखडी/भाग बिहू/मशादी उगदी/
    चैत्र सुकलादी / चेटी चांद / गुढी पाडवा / पहिला नवरात्र आणि नवरात्र / छठ पूजाकरवा चौथ.

दारू सोडवणारे औषध ! एकाच गोळीत दिसेल कमाल, किती आहे किंमत ? जाणून घ्या

alcoholism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दारूमुळे कित्येक लोकांना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला झुंज द्यावी लागते . या जीवघेण्या अल्कोहोलामुळे अनेक कुटूंब उद्धवस्थ झाले असून , दरवर्षी सुमारे 30 लाख जणांचा दारू पिल्यामुळे मृत्यू होत आहे. याच्या सेवनामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे . दारू पिल्यामुळे कोणत्याही गोष्टीचे भान राहत नसून , मला जेवण नको पण दारू द्या अशी स्थिती निर्माण झाली आहे . हे व्यसन सोडण्यासाठी शास्त्रज्ञांनी एका चमत्कार गोळीची निर्मिती केली आहे . ज्यामुळे व्यसनापासून सुटका होण्यास मदत मिळेल . तर चला जाणून घेऊयात या रामबाण गोळीबाबत सविस्तर माहिती .

गोळीचे फायदे

या गोळीचे नाव Naltrexone असून . या गोळीमुळे दारू तसेच इतर नशेच्या पदार्थांचे सेवन करायला कंट्रोल केले जाते . हे औषध दारू पिण्याच्या एक तास आधी घेतल्यास जास्त दारू पिणारेही कमी दारू पितात. त्यामुळे कायम स्वरूपी दारू सोडण्यास मदत होते . या गोळीच्या सेवनामुळे थेट मेंदूच्या सिग्नल्सना चालना मिळते . ही गोळी शरीरातीत डोपामाइन लेव्हत बॅलन्स कराण्यास मदत करते, ज्यामुळे व्यक्तीची दारू पिण्याची इच्छा होत नाही. ही एक न्यूरोकेमिकल प्रक्रिया असून , ज्यामुळे व्यक्ती दारूशिवाय आनंदी राहू शकतो . त्यामुळे लोकांच्या मानसिकतेवर चांगला परिमाण दिसून येतो.

गोळीची किंमत

या जीव वाचवणाऱ्या गोळीची किंमत जवळजवळ 300 रुपये आहे. हि गोळी दिवसातून एकदा घ्यायची असते . याचा परिमाण तुम्हाला काही आठवड्यातच जाणवेल . पण हि गोळी घेताना सावधानी घेतली पाहिजे , डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी खाल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात . ज्यामुळे आरोग्यास धोकादायक ठरेल . या रामबाण गोळीमुळे तुम्ही तुमचे आणि कुटुंबाचे जीवन वाचवू शकता.

शरद पवारांना दाऊदने सोन्याचा हार घातला; आंबेडकरांच्या आरोपाने खळबळ

political news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून, आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. त्यातच आता भर निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर एक खळबळजनक आरोप केला आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिमला दुबईत भेटले एवढच नव्हे तर त्यावेळी दाऊदने शरद पवारांना सोन्याचा हार घातला असा गंभीर आरोप करत प्रकाश आंबेडकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्याचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आंबेडकरांच्या या आरोपावर काय प्रत्युत्तर देतो ते सुद्धा बघावं लागेल.

प्रकाश आंबेडकरांनी सरकारला विचारले प्रश्न

1988-91 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. पवारांनी या काळात लंडनचा दौरा केला होता . या दौऱ्याची कल्पना सरकारला होती का , सरकारने त्यांना मान्यता दिली होती का , कॅलिफोर्नियात पवारांनी जी बैठक घेतली त्याची माहिती तत्कालिन केंद्र सरकारला होती का तसेच शरद पवार आणि दाऊद इब्राहिमच्या भेटीची माहिती सरकारला होती का असे प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी सरकारला विचारले आहेत.

पवारांवरती जोरदार टीका

पवार लंडनचा दौरा करत असताना . ते प्रथम लंडनला गेले . त्यानंतर ते कॅलिफोर्नियाला गेले. तिथे दोन दिवस थांबले . पुन्हा ते कॅलिफोर्नियामधून लंडनमध्ये आले . लंडनमध्ये दोन दिवस राहिले . तिथून दुबईला गेले आणि दुबईमध्ये त्यांची दाऊद इब्राहीमसोबत एक बैठक झाली . त्यांना तिथे सोन्याचा हार घालण्यात आला असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात आंबेडकरांनी पवारांवरती जोरदार टीका केल्या आहेत . त्यांनी जनतेला मतदान करताना हा सगळा इतिहास जाणूनच मतदान करा , असे सांगितले आहे.

10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; अभ्यासाच्या विषयांची संख्या आणि वेळही वाढणार

Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शालेय विद्यार्थ्यांबाबत एक प्रश्न नेहमीच सगळ्यांना सतावत असतो. तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकार तसेच शाळा प्रयत्न करत असते. आता हे ओझे कमी होण्याऐवजी जास्त वाढणार असल्याचे अंदाज येत आहे. कारण आता दहावी अभ्यासक्रमात मोठ्या बदल होणार आहे. आणि आता विद्यार्थ्यांना 7 ऐवजी 15 विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे शाळांची वेळ देखील वाढण्याची शक्यता असते.

नववी तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना 7 ते 8 विषय होते. परंतु आता आराखड्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यात अजून व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण, अंतर्गत विद्या शाखा विषय बंधनकारक असणार आहेत. तसेच तीन भाषा विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि नव्याने सामील केलेले हे तीन विषय असे दहा विषय असणार आहेत. यासोबत त्यांना स्काऊट गाईड देखील बंधनकारक केलेले आहे.

सरकारने हा नवीन हे नवीन शैक्षणिक धोरण केलेले आहे. यामध्ये भारतीय भाषांचा समावेश सक्तीने केलेला आहे. शाळांकडून याबाबत सूचना आल्यानंतरच हा अभ्यासक्रमाचा निर्णय लागू केला जाणार आहे. तसेच व्यावसायिक शिक्षणामध्ये नववीसाठी विद्यार्थ्यांना शेती, नळ दुरुस्ती, सौंदर्य या व्यवसायांची ओळख करून देण्यात येणार आहे. तर दहावीला बाग, सुतार काम, परिचय यांसारख्या व्यवसायाची माहिती देण्यात आली आहे. कला शिक्षणातून दृश्यकला, नाट्य, संगीत, नृत्य, लोककला हे विषय शिकवण्यात येणार आहेत.

दहावीमध्ये आता तीन भाषांच्या विषयांची सक्ती असणार आहेम यामध्ये दोन भाषा भारतीय असणे गरजेचे आहे. अकरावी बारावी एक ऐवजी दोन दिवसांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यातही एक भाषा भारतीय असणार आहे. तसेच नववी आणि दहावीमध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी विषयांची संख्या देखील वाढवली आहे. पाच ऐवजी आता दहा विषय शिकावे लागणार आहे. त्यामुळे आता शाळेच्या वेळेतही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Ladki Bahin Free Gas Cylinder | लाडक्या बहिणींना फ्रीमध्ये मिळणार ३ गॅस सिलेंडर; असा करा अर्ज

Ladki Bahin Free Gas Cylinder

Ladki Bahin Free Gas Cylinder | राज्य सरकारकडून राज्यातील महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. याचा फायदा अनेक महिलांना झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तसेच या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. अशी माहिती सुत्रांकडून समोर आलेली आहे. राज्य सरकारने याआधी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत देखील चालू केलेली होती. या योजनेच्या माध्यमातूनच महिलांना तीन गॅस सिलेंडर वर्षभरात मोफत मिळणार असल्याची माहिती समोर आली होती. परंतु आता ही मोफत सिलेंडर देण्याची योजना कधीपासून सुरू होणार आहे. कोणत्या मुलीला पात्र असणार आहे? हे जाणून घेऊया. परंतु सर्व महिलांना यासाठी अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून अर्ज करणे गरजेचे आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर (Ladki Bahin Free Gas Cylinder) देणार आहे. ज्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने या योजना आणलेल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन सिलेंडर मोफत मिळण्याची घोषणा सरकारने केलेली आहे.

मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी पात्रता? | Ladki Bahin Free Gas Cylinder

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाही महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • त्या महिलेकडे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची जोडलेल्या सर्व महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • जर तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून फ्री गॅस सिलेंडर मिळाला असेल तर तुम्ही यासाठी देखील अर्ज करू शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ऑक्टोबर महिन्यापासून पैसे येणार आहेत. ज्यांना या योजनेसाठी पैसे मिळाले नाहीत. त्यांना लवकरच पैसे मिळणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन इ केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी पूर्ण केले तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

Diwali 2024 : दिवाळीसाठी तुम्ही वापरलेले पदार्थ भेसळयुक्त नाहीत ना ? अशी करा पारख

diwali faral 2024

Diwali 2024 : येत्या काही दिवसातच दिवाळीचा सण येतोय . त्यामुळे अनेक गृहिणींची बाजार आणि इतर खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. कोणाचा फराळ लवकर तयार होणार , अशी अनोखी स्पर्धा पाहण्यास मिळते. त्या घाई गडबडीत आपण दुकानातून कमी दर्जाच्या माल घेऊन येतो. कमी गुणवत्ता असलेल्या मालात मोठ्या प्रमाणात भेसळ असते. हि भेसळ आरोग्यासाठी हानिकारक असून , या पदार्थाच्या सेवनामुळे भयंकर रोगाला झुंजावे लागते. हे टाळण्यासाठी आज आम्ही तुम्हाला दिवाळीत मालाची खरेदी कशी करावी ,तसेच पदार्थांची पारख कशी करावी हे सांगणार (Diwali 2024) आहोत. यामुळे तुम्ही तुमची दिवाळी आनंदात घालवू शकता.

जिरे आणि काळी मिरी यांच्यातील भेसळ (Diwali 2024)

सणासुदीत जास्त फायदा मिळवण्यासाठी दुकानदार अगदी मसाल्यांपासून ते पावडरपर्यंत भेसळ करतात . त्यामुळे गृहिणींनी पदार्थांची शुद्धता तपासणे गरजेचे आहे . बाजारातून जिरे खरेदी करत असताना प्रथम हातात थोडे जिरे घ्या . ते दोन्ही तळहातामध्ये घासा . जर त्या जिराचा रंग हाताला लागत असेल , तर समजून जा कि त्यामध्ये भेसळ केली आहे . काही मिरी हि पपईच्या बियांसारखी दिसतात. त्यामुळे कधी कधी भेसळयुक्त काळी मिरीमध्ये पपईच्या बिया टाकल्या जातात. मिरी तपासण्यासाठी ती पाण्यात टाका. काळी मिरी पाण्यावर तरंगत असेल तर ती पपईची बी असलयाचे समजून येते .

बडीशेप आणि कोथिंबीरमधील भेसळ

बडीशेप आणि कोथिंबीर मार्केटमध्ये मिळते . यावर हिरव्या रंगाचा थर असतो. तो तपासण्यासाठी कोथिंबीरीत आयोडीन (Diwali 2024) मिसळा, रंग काळा झाला तर समजून घ्या की कोथिंबीर बनावट आहे. कोथिंबीर नळाच्या पाण्याने धुवून घेतली आणि रंग निघू लागला तरी त्यातली भेसळ कळून येते. बडीशेपच्या बाबतीत अशीच प्रक्रिया करावी . बडीशेप पाण्यात टाकल्याने थोडा पोपटी रंग जाणे स्वाभाविक आहे. पण जर पाणी हिरवे होत असेल तर त्यामध्ये भेसळ आहे हे समजून जावे .

हिंग तसेच मिरची पावडरीतील भेसळ (Diwali 2024)

हिंगाचा दर्जा तपासण्यासाठी पाण्यात टाका . पाण्याचा रंग दुधाळ झाला तर हिंग खरे आहे किंवा हिंगाचा तुकडा जिभेवर ठेवा. जर हिंग चांगला असेल तर तुम्हाला कडूपणा किंवा तुरटपणा जाणवेल. सर्वात जास्त भेसळ हि लाल मिरची पावडरमध्ये केली जाते . ती (Diwali 2024) तपासण्यासाठी मिरची पावडर पाण्यात टाका, जर रंग पाण्यात विरघळला आणि भुसा तरंगू लागला तर मिरची पावडर बनावट आहे असे समजावे. भेसळ नसलेली मिरची पावडर पाण्यात मिसळून पाण्याला लाल रंग येईल.

तुप आणि दुधातील भेसळ (Diwali 2024)

तुपातील भेसळ तपासण्यासाठी दोन चमचे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि दोन चमचे साखर घेऊन त्यात एक चमचा तूप मिसळा. मिश्रण लाल झाले तर समजून जा की तुपामध्ये भेसळ केली आहे. दुधामध्ये भेसळ केली आहे कि नाही हे ओळखण्यासाठी आपले बोट दुधात घाला आणि ते बाहेर काढा. जर दूध बोटाला चिकटले तर ते दूध शुद्ध आहे. दूध चिकटले नाही तर दुधात भेसळ आहे. यामध्ये पाणी, दूध पावडर आणि रसायनांची भेसळ केली (Diwali 2024) जाते. हे ओळखण्यासाठी तुम्ही या पदधतींचा वापर केल्यास तुम्हाला चांगल्या दर्जाच्या मालाची पारख करता येईल.