Sunday, December 28, 2025
Home Blog Page 409

How To Identify Fake Potatos | बाजारात आलेत बनावट बटाटे; ‘या’ आयडियाचा वापर करून करा खऱ्या बटाट्याची पारख

How To Identify Fake Potatos

How To Identify Fake Potatos | आज-काल दुकानातून कोणतीही गोष्ट विकत घ्यायची, म्हटली तरी त्यातून मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भेसळ केली जाते. दुकानदार अगदी काही नफा मिळवण्यासाठी ते लोकांचे जीवन धोक्यात टाकत असतात. विशेषतः सण आले की या भेसळ करण्याच्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. परंतु आता एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता बटाट्यामध्ये ही भेसळ होत आहे. सध्या बाजारामध्ये काही नकली बटाटे (How To Identify Fake Potatos) विकले जात आहेत. या बटाट्यांमध्ये अनेक रासायनिक पदार्थ मिसळलेले आहेत. आणि ते जास्त भावाने विकले जात आहेत. परंतु आता हे बनावट बटाटे आणि खरे बटाटे यातील फरक कसा ओळखायचा हे आपण जाणून घेणार आहोत.

नुकतेच उत्तर प्रदेशात कुठे बनावट बटाटे (How To Identify Fake Potatos) विकण्याचा प्रकार समोर आलेला आहे. आणि हे बटाटे प्रशासनाने ताब्यात देखील घेतलेले आहेत. या ठिकाणी बटाटा ताजा आणि अगदी चांगला दिसण्यासाठी अनेक प्रकारचे रासायनिक द्रव्य त्यावर फवारली जातात. आणि अनेक लोक हात बटाटा नवीन आहे, असे समजून खरेदी करतात. परंतु त्यांची फसवणूक होते. तसेच आरोग्यासाठी हे बटाटे अत्यंत हानिकारक आहे.

बनावट बटाटे कसे ओळखायचे ? | How To Identify Fake Potatos

खरा बटाटा ओळखण्यासाठी त्याचा वास घेणे खूप गरजेचा असतो. जर तो बटाटा खरा असेल तर त्यातून नैसर्गिक सुगंध येईल परंतु जर तो बटाटा बनावट असेल, तर त्यातून रासायनांचा वास येईल. आणि त्याचा रंग देखील जाईल. तुम्ही तो बटाटा कपड्यावर घासून पहावा, जर त्याच्यावरील रंग गेला तर तो बनावट बटाटा आहे असे समजावे.

तुम्ही बटाटा कापून देखील तपासू शकता. जर तो बटाटा खरा असेल, तर तो आत आणि बाहेर जवळजवळ सारख्याच रंगाचा असतो. परंतु बनावट बटाट्याचा रंग आत वेगळा असतो आणि बाहेर येत असतो. त्यामुळे जर त्या बटाट्याला माती लागली असेल, तर ती माती काढा आणि त्यानंतर तो बटाटा खरा आहे की खोटा आहे तपासा.

तुम्ही बटाटा पाण्यात पिळून देखील पाहू शकता. खरे बटाटे हे पाण्यात बुडतात. परंतु जर बटाटे बनावट असेल, तर ते पाण्यात तरंगू लागतात कारण त्यावर काही रसायने फवारलेली असतात.बत्याही रसायने पाण्यात बुडत नाही. आणि पाण्याच्या वर हे बटाटे राहता. परंतु जर ते बटाटे चांगले आणि ताजे असतील तर ते पाण्यात बुडतात.

त्याचप्रमाणे जे नकली बटाटे असतात. त्याची माती पाण्यात लगेच विरघळते. परंतु खऱ्या बटाट्यावरील मातीही लगेच विरघळत नाही. तसेच त्यावरची सालही खूप पातळ असते आणि ती माती काढल्यानंतरच निघते.

हे असे कृत्रिम बटाटे खाणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात. कारण यामध्ये विविध रंग आणि रसायने असतात. यामुळे तुमच्या मुत्रपिंडाला आणि यकृताला हानी पोचू शकते. तुम्ही जर दीर्घकाळ अशा भाज्या खाल्ल्या तर त्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे कुठलीही भाजी विकत घेतल्यानंतर तिची तपासणी करा. आणि घरी आल्यावर ती भाजी धुतल्याशिवाय वापरण्यास घेऊ नका.

घरातील धान्यांना सोंडे किंवा किडे लागले तर; डब्यात ठेवा ‘या’ घरगुती गोष्टी

Kitchen tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे आणि दिवाळीच्या आधी सगळेजण घरातील साफसफाई करत असतात. तसेच स्वच्छतेसोबत सगळा किराणा देखील भरून ठेवत असतात. कारण दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ केले जातात. यादरम्यान गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य वेगवेगळे पदार्थ डब्यांमध्ये भरून ठेवतात. परंतु या धान्यांना सोंडे लागणे किंवा कीड लागणे ही समस्या सगळ्यांनाच येते. धान्याला जास्त सोंडे लागल्याने अनेक वेळा हे धान्य फेकून द्यावे लागते. परंतु या धान्याला सोंडे किंवा कीड लागू नये. यासाठी घरच्या घरी काही उपाय करता येतील. आज आम्ही तुम्हाला या धान्यांना सोंडे लागू नये, यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

धान्यांमध्ये कडुलिंबाची वाळलेली पाने टाका

डाळी तसेच तांदळाला किडे आणि सोंडे लागू नये, यासाठी तुम्ही तांदूळ आणि डाळीच्या डब्यामध्ये कडुलिंबाची वाढलेली पाने ठेवू शकता. कडुलिंबाच्या पानाच्या वासाने कीटक बाहेर जातात. आणि तुमचे धान्य सुरक्षित राहते. परंतु कडीलिंबाची ही पाने पूर्णपणे वाळलेली असावी, तरच त्याचा फायदा होतो.

काळी मिरी

काळी मिरी ही खडे मसाल्यांतील अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. काळी मिरीला उग्र वास असतो. जर तुम्ही तुमच्या धान्यांच्या डब्यामध्ये काळी मिरी टाकली, तर सोंडे आणि कीटक हे पळून जातील. यासाठी तुम्ही काळी मिरी ही एकाद्या कपड्यांमध्ये बांधून ठेवून धान्याच्या डब्यामध्ये टाकू शकता.

काडेपेटी

काडेपेटी देखील ही कीटक पळून लावण्यासाठी फायदेशीर ठरतात. कारण या काडेपेटीमध्ये सल्फर असते. ज्यामुळे कीटक येत नाही तुम्ही एका कपड्यात बांधून ही काडेपेटी धान्यांच्या डब्यात ठेवली तर सोंडे किंवा किडे निघून जातील.

अशाप्रकारे तुम्ही वरील सगळ्या पर्यायांचा वापर करून घरातील धान्य साठवू शकता. यामुळे तुमचे धान्य खराब देखील होणार नाही. आणि घरच्या उपायांनी सोंडे निघून जातील. यासाठी तुम्हाला कोणताही रासायनिक पावडरचा वापर करण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी या पद्धतीचा वापर करून धान्यातील सोंडे किंवा कीटक पळून लावू शकता.

Mumbai Railway| मुंबईहून सुरु होणार नवी एक्सप्रेस रेल्वे; महाराष्ट्रातील या 9 स्थानकावर थांबणार

Mumbai Railway

Mumbai Railway | आपल्या देशातील बहुतांश नागरिक हे रेल्वेने प्रवास करत असतात. त्यात आता राज्यामध्ये सणांचा उत्सव सुरू आहे. नुकताच दसरा पार पडलेला आहे. आणि दिवाळी तोंडावर आलेली आहे. दिवाळीच्या काळात रेल्वेने (Mumbai Railway ) प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे गर्दी देखील होणार आहे. अनेक लोक हे नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी हे बाहेरगावी जात असतात. आणि दिवाळीच्या वेळी ते त्यांच्या घरी जातात. अशावेळी प्रवास करताना खूप गर्दी असते.

रेल्वे प्रशासन आणि मुंबई पुणे सध्या शहरांमधून काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबईवरून बिहारच्या गया येथे विशेष गाडी चालवणार आहे. मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनल ते गया दरम्यान ही गाडी धावणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रेन महाराष्ट्रातील जवळपास नऊ रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना याचा खूप फायदा होणार आहे. आज आपण ही विशेष ट्रेन कशी असणार आहे. आणि कोण कोणत्या स्थानकावर थांबणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत.

लोकमान्य टिळक टर्मिनल 1 या दरम्यान ही साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही ट्रेन 25 ऑक्टोबर पासून दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी सोडली जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे गया ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही 23 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सोडण्यात येणार आहे ही. ट्रेन गया येथून 7 वाजता सोडली जाणार आहे, तर ती तिसऱ्या दिवशी लोकमान्य टर्मिनस येथे सकाळी 5: 50 मिनिटांना पोहोचणार आहे.

रेल्वे कोणत्या स्थानकावर थांबणार ? | Mumbai Railway

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही ट्रेन महाराष्ट्रातील कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वरदा, नागपूर, गोंदिया या 9 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील लोकांना या रेल्वेचा खूप चांगला फायदा होणार आहे.

SBI Mutual Fund | ‘ही’ आहे SBI ची सर्वोत्तम योजना; महिन्याच्या बचतीवर मिळेल एवढा परतावा

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | आज काल भविष्याचा विचार करून गुंतवणूक करणे, खूप गरजेचे आहे. सध्या मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. यातीलच जर तुम्ही एसबीआय स्मॉल कॅप फंड या योजनेमध्ये गुंतवणूक केली, तर त्यातून तुम्हाला खूप चांगला परतावा मिळू शकतो. अनेक लोक असे आहे ज्यांना एसबीआयच्या (SBI Mutual Fund) योजनेबद्दल काहीच माहित नाही. परंतु ही योजना 2009 साळी चालू झालेली आहे. आणि आजपर्यंत अनेक लोकांनी या योजनेत गुंतवणूक केलेली आहे. आणि त्यांना चांगला परतावा देखील मिळालेला आहे. जर ही योजना चालू झाल्यापासून एखाद्या व्यक्तीने या योजनेत दर महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्या व्यक्तीकडे आज 49. 44 लाख रुपये झाले असते.

त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने एसबीआयच्या (SBI Mutual Fund) या योजनेमध्ये 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर ही रक्कम सध्या 1.37 कोटी रुपये एवढी झाली असती. सध्या एसबीआयच्या स्मॉल कॅप फंड या योजनेची मालमत्ता 20,000 कोटी रुपये एवढी झालेली आहे. ही अत्यंत जुनी योजना आहे आणि आजपर्यंत अनेक लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे स्मॉल देखील.

एसबीआयची (SBI Mutual Fund) ही अत्यंत भन्नाट अशी योजना आहे. या योजनेने एसआयपीमध्ये 22.85% दिलेला आहे त्याचप्रमाणे आर श्रीनिवास यांनी 2013 पासून मुख्य गुंतवणूक अधिकारी व्यवस्थापित केली आहे. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक सामान्य नागरिकांना झालेला आहे. जर तुम्ही देखील तुमच्या भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही एसबीआयच्या भन्नाट योजनेमध्ये नक्कीच गुंतवणूक करू शकता. यातून तुम्हाला भविष्यात जाऊन खूप चांगला परतावा मिळणार आहे. तसेच तुमची गुंतवणूक अत्यंत खात्रीशीर सेफ राहते. आणि इतर योजनांच्या तुलनेत या योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

‘या’ पदार्थांमुळे वाढते कोलेस्ट्रॉलची पातळी? सुरुवातीला दिसतात ही लक्षणे

Cholestreol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. दरवर्षी हृदयविकाराच्या झटक्याने किंवा स्ट्रोकमुळे जवळपास 1.80 कोटी जीव गमावत असतात. जागतिक आरोग्य संघटनेने देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. आज काल हृदयविकाराचा झटका येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाढलेले कोलेस्ट्रॉल. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले की, आपले संतुलन बिघडते. परंतु वाढलेले कोलेस्ट्रॉल नक्की कसे आहे? त्याची सुरुवातीची लक्षणे काय आहेत हे जाणून घेणे खूप गरजेचे असते.

कोलेस्ट्रॉल काय आहे ?

कोलेस्ट्रॉल हे नेहमीच धोकादायक नसते. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल. वाईट कोलेस्ट्रॉल जर वाढले तर त्यामुळे आपल्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.

कोलेस्ट्रॉल वाढल्याने काय होते ?

वाईट कोलेस्ट्रॉल जर आपल्याला वाढले, तर आपल्याला हृदयविकाराचा झटका तसेच पक्षात होऊ शकतो. अनेकवेळा मेंदूचा झटका, स्मृती भंश होणे, जबडा दुखणे, रक्त प्रवाह नीट न होणे, हात आणि पाय सुन्न होणे,छाती दुखणे यांसारख्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते.

उच्च कोलेस्टेरॉलची सुरुवातीची लक्षणे

हृदयरोग तज्ञ म्हणतात की उच्च कोलेस्टेरॉलची सर्वात मोठी चिंता ही आहे की त्याची लक्षणे दिसत नाहीत, तथापि, काही लक्षणांवरून हे समजू शकते. काही प्रकरणांमध्ये, खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने उच्च रक्तदाब सारख्या समस्या उद्भवू शकतात, म्हणजे उच्च रक्तदाब. नियमित रक्त तपासणी करून हे तपासता येते.

वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्याची सर्वात मोठी कारणे

  • आहारात सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट जास्त असल्यास कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याचा धोका जास्त असतो.
  • लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाल आणि धूम्रपान यामुळेही कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
  • कौटुंबिक इतिहास, याचा अर्थ कुटुंबातील एखाद्याला उच्च कोलेस्टेरॉलचा धोका असल्यास, तुम्हालाही तो असू शकतो.
  • मधुमेह आणि हायपरथायरॉईडीझम सारखे आजार

    Weather Update | पुढील 2 दिवस मुंबईमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिला येल्लो अलर्ट

    Weather Update

    Weather Update | राज्यातील अनेक ठिकाणी सध्या परतीचा पाऊस चालू झालेला आहे. परंतु अनेक ठिकाणी मात्र कड्क उन्हाचे वातावरण दिसत आहे. मुंबईसारख्या ठिकाणी उन्हाचे तापमान वाढलेले आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून मुंबईमध्ये चांगली तापमान वाढ झालेली आहे. परंतु सध्या मुंबईत देखील ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मुंबईमध्ये पाऊस देखील झालेला आहे. त्यामध्ये नागरिकांना गरमीपासून सुटका मिळालेली आहे. परंतु आता पुढील दोन दिवस मुंबईमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे मुंबईतसेच ठाणे, पालघर या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    ऑक्टोबर महिन्यात मुंबई, कोकण तसेच गोव्याच्या किनारी मुसळधार पाऊस कधी पडत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये आतापर्यंत गोव्यामध्ये तब्बल 110% जास्त पाऊस पडलेला आहे बतसेच संपूर्ण महाराष्ट्र देखील अपेक्षेपेक्षा यावर्षी जास्त पाऊस पडलेला आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे जिल्ह्यात चांगलाच पाऊस पडलेला आहे.

    सध्या परतीचा पाऊस चालू आहे. आज राज्यातील अनेक ठिकाणी हा परतीचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक पिकांना या पावसामुळे फायदा झालेला आहे. परंतु खरीप हंगामातील काही ठिकाणी पिकांचे मात्र यामुळे नुकसान झालेले दिसत आहे. हवामान विभाग पावसाबद्दल अंदाज देतच असतात. त्यांलो दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार, धुळे, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

    त्याचप्रमाणे खास करून मुंबईमध्ये शनिवार, रविवारी मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) बरसणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईला पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यांसारख्या जिल्ह्यांना देखील चांगलाच मारा बसणार आहे. तसेच नाशिक घाट परिसर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर यांसारख्या ठिकाणी देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

    विमा एजंट्स नाराज ! LIC च्या सरेंडर व्हॅल्यूच्या नवीन नियमांच्या विरोधात आंदोलनाची तयारी

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC ( Life Insurance Corporation of India ) हि पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची असणारी कंपनी आहे. या कंपनीला सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून ओळखले जाते. एलआयसी नेहमी आपल्या ग्राहकांसाठी कमी दारात आर्थिक संरक्षण प्रदान करत असते . पण या कंपनीने आपल्या एजंट्सचे कमिशन कमी केल्यामुळे एजंट्समध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तसेच नवीन सरेंडर व्हॅल्यू नियमांमुळे एलआयसीला अनेक पॉलिसींचे नियम बदलावे लागले आहेत. त्यामुळे एजंट्सच्या कमिशनमध्ये बदल करण्यात आले आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणजे इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने एलआयसी शाखांसमोर काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

    सरेंडर व्हॅल्यूचे नवीन नियम

    1 ऑक्टोबर 2024 पासून सरेंडर व्हॅल्यूचे (Surrender Value) नवीन नियम लागू झाला आहे. सरेंडर व्हॅल्यू म्हणजे पॉलिसीधारकाने विमा पॉलिसीची पूर्ण रक्कम घेण्यासाठी पॉलिसी कालावधीच्या संपण्याआधी पॉलिसी रद्द केल्यास विमा कंपनीकडून दिली जाणारी रक्कम. या नियमामध्ये पॉलिसीचा पहिला प्रीमियम भरल्यानंतरही पॉलिसी सरेंडर केल्यास प्रीमियमचा काही भाग ग्राहकांना परत मिळणार आहे. या बदलांमुळे एजंट्सचे कमिशन कमी होणार असल्याने एजंट्समध्ये असंतोष पसरलेला आहे.

    देशभरात आंदोलनाची तयारी

    हा नियम एलआयसीने बदलावा यासाठी एजंट फेडरेशनने 30 ऑक्टोबरपर्यंत देशभरात आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. या आंदोलनामुळे एलआयसीवर दबाव येईल आणि त्यांचा निर्णय मागे घेईल असे एजंट फेडरेशनला वाटत आहे. एजेंट फेडरेशन सांगत आहे कि , या निर्णय घेण्यापूर्वी एलआयसीने त्यांच्याशी सत्तामसलत केला नाही . हे नवीन नियम एजेंट किंवा पॉलिसीधारकाच्या हिताचे नाहीत असे त्यांचे मत आहे .

    Xiaomi चा नवीन Redmi A4 5G स्मार्टफोन लाँच ; पहा वैशिष्ट्ये

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात आताच Xiaomi ने नवीन स्मार्टफोन Redmi A4 5G लॉन्च केला आहे. हा फोन नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच हा फोन दमदार प्रोसेसर सोबत लाँच करण्यात आला आहे. हा फोन लोकांच्या खिशाला परवडेल असा आहे. ग्राहकांना या फोनबद्दल आकर्षण वाटावे यासाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमुळे ग्राहकांचे लक्ष वेधण्याचे उद्दिष्ट आहे.

    Redmi A4 5G ची वैशिष्ट्ये

    या फोनच्या डिस्प्ले बदल बोलायचं झालं तर कंपनीने 6.52 इंच HD सोबत 90Hz रिफ्रेश रेट दिला आहे. फोनचे प्रोसेसर Snapdragon 4s Gen 2 चे आहे. ग्राहकांना आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फोनच्या कॅमेऱ्यामुळे अनेक ग्राहक भारावून घेणे आहे. त्याचा कॅमेरा हा 50MP + 2MP चा असून , सेल्फी प्रेमींसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची ऑपरेटिंग सिस्टीम Android 14 वर आधारित असल्याचे दिसून येते . फोनची बॅटरी एवढी शानदार आहे कि , ग्राहकांना कमी वेळेत फास्ट चार्जिंग करता येईल . बॅटरीसाठी 5000mAh ची सोय उपलब्ध करून दिलेली आहे . म्हणजेच फोनला 18W फास्ट चार्जिंग होईल. कंपनीने उत्तम बॅटरी देण्याचा दावा केला आहे. ज्यामुळे तुमचा गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव चांगला होईल.

    बाजारात फोनची किंमत

    कंपनीने अजून फोनची किंमत ठरवलेली नाही . पण हा फोन ग्राहकांना 10000 रुपयांना उपलब्ध होईल असा अंदाज आहे. पुढील काही दिवसात कंपनी लवकरच आपल्या फोनची किंमत जाहीर करणार आहे.

    Diwali 2024 : विविधतेने नटलेल्या भारतात कशी असते राज्याराज्यामधील अनोखी दिवाळी

    Diwali 2024

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकांच्या पसंतीच्या सणांपैकी दिवाळी हा एक महत्वाचा सण आहे. या सणामुळे लोकांच्या घरचे वातावरून प्रसन्न राहते . सर्वत्र दिव्याचा प्रकाश पाहून जणू धर्तीवर देवांचेच आगमन झाले आहे असा अनुनभव मिळतो. या शुभ दिवशी भगवान गणेश आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते . भारत हा विविधतेने नटला असून , प्रत्येक राज्यानुसार , धर्मानुसार आणि परंपरेनुसार हा (Diwali 2024) सण साजरा केला जातो.

    उत्तर भारतात दिवाळी (Diwali 2024)

    उत्तर भारतात दिवाळी सण भगवान राम यांच्या 14 वर्षांच्या वनवासातून अयोध्या नगरीत आल्यानंतर साजरा केला होता . त्यावेळी संपूर्ण भारतीयांनी आपली घरे दिव्यांच्या प्रकाशायने उजवळली होती . तसेच रस्ते आणि गल्लीबोळामध्ये दिव्याचा उजेड दिसत होता . भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. हा काळ कार्तिक महिन्याच्या अमावस्येचा होता, ज्याला वर्षातील सर्वात काळी रात्र असे म्हटले जाते. या रात्रीचा काळोख दिव्यांनी दूर केला जातो .

    इतर राज्यमध्ये दिवाळी (Diwali 2024)

    उत्तर भारतात दुर्गापूजेनंतर लोक दसरा साजरा करुन दिवाळीच्या तयारीला लागतात. उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, बिहार या राज्यामध्ये सुद्धा दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते . दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पर्वाच्या दिवशी जुगार खेळण्याची आणि पार्ट्यांचे आयोजन करण्याची प्रथा आहे. या सणानंतर पुढील तीन ते चार दिवस गोवर्धन पूजा, भाऊबीज, चित्रगुप्त पूजा केली जाते . दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी येणार म्हणून दरवाजे उघडे ठेऊन झोपले जाते . या सणामध्ये लोक एकमेकांना भेटी देतात. त्याचसोबत मिठाई देऊन आनंद शेअर करतात .

    काही वेगळ्या प्रथा (Diwali 2024)

    काही ठिकाणी दिवाळीच्या रात्री लोक कच्चा दिवा उलट ठेवतात आणि झोपण्यापूर्वी सर्व काजल लावून झोपतात . मध्यरात्री गरिबीला घराबाहेर हाकलण्यासाठी विशेष पूजा केली जाते , ज्यामुळे घरातील दरिद्रता नष्ट होऊन देवी लक्ष्मी घरात प्रवेश करतील.

    इथली पोरं हुश्शार ! एक असं गाव जिथे आहेत 100 पेक्षा जास्त IAS अधिकारी

    IAS Factory

    भारतात काय नाही ? समृद्ध निसर्ग , विभिन्न संस्कृती , विलोभनीय खाद्य संस्कृती, असं बरच काही सांगता येईल मात्र आजच्या लेखात आम्ही तुम्हाला भारतातल्या एका अशा गावाबद्दल सांगणार आहोत ज्या गावाला “अधिकाऱ्यांचे गाव” म्हंटले जाते. येथे 100 पेक्षा जास्त लोक प्रशासकीय सेवेत काम करतात. चला जाणून घेऊया या अनोख्या गावाची गोष्ट…

    मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेले आदिवासीबहुल पडियाल गाव “अधिकाऱ्यांचे गाव” म्हणून ओळखले जाते. येथील प्रत्येक मुलाला सिव्हिल सेवक, इंजिनियर किंवा डॉक्टर बनायचे असते. या गावाचे वैशिष्टय म्हणजे हे गाव माळवा भागातील या आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम 5,000 आहे आणि येथील 100 हून अधिक लोक भारताच्या विविध भागात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत. गावातील सुमारे ९० टक्के लोकसंख्या भिल्ल जमातीची आहे.

    साक्षरता दर 90 टक्क्यांहून अधिक

    भिल्ल हा एक वांशिक समुदाय आहे जो मध्य प्रदेशातील धार, झाबुआ आणि पश्चिम निमार जिल्ह्यांसह आणि महाराष्ट्रातील धुलिया आणि जळगावसह मध्य भारतीय राज्यांमध्ये राहतो. ते राजस्थानमध्येही आढळतात. मध्य प्रदेश सरकारच्या दाव्यानुसार, पडियाल गावाचा साक्षरता दर 90 टक्क्यांहून अधिक आहे.

    मध्य प्रदेश सरकारच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वीपर्यंत या गावातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या 70 होती, जी 2024 मध्ये 100 च्या पुढे जाईल. यामध्ये कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश, भारतीय पोलीस सेवा अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी, भारतीय अभियांत्रिकी सेवा अधिकारी, डॉक्टर, अभियोजन अधिकारी, वन अधिकारी इत्यादींचा समावेश आहे.

    आतापर्यंत 300 सरकारी अधिकारी

    राज्य सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की या गावात एकूण 300 सरकारी अधिकारी आहेत. या गावातील घरटी एक जण सरकारी अधिकारी आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून येथील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्याची स्पर्धा लागली असल्याचे सांगितले जाते.

    या गावाबाबत माहिती देताना या भागात दीर्घकाळापासून ब्लॉक रिसोर्स सेंटर ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले आणि या विशिष्ट गावातील तरुणांच्या यशोगाथा पाहणारे मनोज दुबे म्हणाले की, गावात शिक्षण देण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. ते म्हणाले की, शालेय मुले वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसह प्रशासकीय सेवा, तांत्रिक किंवा इतर क्षेत्रांसाठी त्यांची तयारी सुरू असते.