Sunday, December 28, 2025
Home Blog Page 410

दिवाळीची सुट्टी बनवा मजेदार ; IRCTC कडून देशांतर्गत आणि परदेशातील टूर पॅकेजेसचे आयोजन

IRCTC tour

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) कडून विशेष टूर आयोजित केल्या जातात. या टूर इतर टूरच्या तुलनेत स्वस्त आणि आरामदायी असतात. आता IRCTC कडून पश्चिम विभागीय मुंबई कार्यालयातून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई टूर पॅकेजच्या दिवाळी विशेष सिरीजचे अनावरण केले आहे. ज्याद्वारे देश आणि प्रदेशात टूर नियोजित केल्या आहेत.

परदेशातील टूर पॅकेज

IRCTC नुसार, आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये श्रीलंका (नोव्हेंबर 5, 2024), बाली (12 नोव्हेंबर, 2024), आणि सिंगापूर आणि मलेशिया (11 नोव्हेंबर, 2024) सारखी ठिकाणे समाविष्ट आहेत. प्रत्येक पॅकेज सर्व-समावेशक आहे, ज्यात परतीच्या उड्डाणे, हस्तांतरण, प्रेक्षणीय स्थळे, जेवण, प्रवेश शुल्क, निवास, व्हिसा/परमिट, टूर गाइड, प्रवास विमा आणि जीएसटी यांचा समावेश आहे.

देशांतर्गत टूर पॅकेज

देशांतर्गत, पॅकेजमध्ये ओडिशा (नोव्हेंबर 5, 2024), व्हायब्रंट सौराष्ट्र (2 नोव्हेंबर, 2024), वाराणसी आणि अयोध्या (10 नोव्हेंबर, 2024), आसाम आणि मेघालय (3 नोव्हेंबर, 2024), केरळ (नोव्हेंबर 24, 2024) यांचा समावेश आहे. सहलींचा समावेश आहे. ), गंगटोक आणि दार्जिलिंग (नोव्हेंबर 10, 2024), आणि कच्छचे रण (15 नोव्हेंबर, 2024). या पॅकेजमध्ये परतीच्या उड्डाणे, हॉटेलमध्ये राहणे, जेवण, प्रेक्षणीय स्थळे, प्रवास विमा आणि जीएसटी यासारख्या सर्व आवश्यक घटकांचा समावेश आहे.

आयआरसीटीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या पॅकेजची किंमत किफायतशीर आहे, हे पॅकेज उत्तम दर्जाचे आदरातिथ्य देतात. अधिक माहितीसाठी www.irctctourism.com या संकेतस्थळाला ला भेट द्या.

केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता?

central gov

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% करण्यात आला आहे. बुधवारी केंद्र सरकारने याबाबतची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राजाच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना पत्र पाठवले आहे.

केंद्र शासनाप्रमाणेच महागाई भत्त्यात वाढ देण्याचं राज्य सरकारचा प्रचलित धोरण आहे. त्यामुळे या निर्णयासंदर्भात विधानसभा निवडणूक आचारसंहितेची कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व सेवानिवृत्तांना केंद्र शासनाप्रमाणे 1 जुलै 2024 पासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ थकबाकी सह देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी विनंती महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना महासंघांचे मुख्य सचिव ग. दि. कुलथे म्हणाले की, मंत्री नसताना राज्याचे मुख्य सचिव निर्णय घेऊ शकतील. याबाबतचे धोरण 2011 मध्ये ठरले आहे. केंद्राकडून ज्या तारखेपासून डीए दिला त्या तारखेपासून दिला जात आहे. त्यामुळे आता निवडणूक आचारसंहितेच्या काळातही हा निर्णय घेण्यात अडचणीत येणार नाही. असा दावा त्यांनी केला.

जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रह

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्य सचिवांना दुसरे पत्र पाठवून राज्य सेवेतील सर्व अधिकऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली आहे.

मतदान ओळखपत्र नाहीये ? वापरू शकता डिजीटल ओळखपत्र ; कसे कराल डाउनलोड ? फॉलो करा सोप्या स्टेप्स

E-Epic कार्ड

राज्यात लोकशाहीचा उत्सव म्हणजेच मतदान सोहळा पार पडणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्यात येत्या २० नोव्हेंबर ला मतदान तर २३ नोव्हेंबर ला मतमोजणी करण्यात येणार आहे. तुमही तुमचे निवडणूक ओळखपत्र काढले आहे ना ? तुम्हालाही मतदान करायचे असेल तर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे फिजिकल आयडी नसेल तर तुम्ही डिजिटल कार्डचा विचार करू शकता. तुम्ही डिजिटल कार्ड कसे मिळवू शकता ? चला जाणून घेऊया…

E-EPIC कार्ड म्हणजे काय?

E-EPIC ही EPIC ची सुरक्षित पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF) आवृत्ती आहे जी मोबाईल किंवा संगणकावर डाउनलोड केली जाऊ शकते.

याच्या मदतीने तुम्ही हे कार्ड तुमच्या फोनवर सहज सेव्ह करू शकता किंवा डिजीलॉकरवर PDF म्हणून अपलोड करू शकता. याशिवाय तुम्ही ते प्रिंट करू शकता.

जर तुमच्याकडे वैध EPIC क्रमांक असेल तर तुम्ही तो पास करू शकता. सारांश विभाग 2021 दरम्यान नोंदणीकृत सर्व नवीन मतदार आणि ज्यांचा अर्जाच्या वेळी दिलेला मोबाइल क्रमांक युनिक आहे, त्यांना एसएमएस प्राप्त होईल आणि ते तुम्हाला डाउनलोड करता येईल.

डाउनलोड कसे करायचे?

यासाठी तुम्हाला http://voterportal.eci.gov.in/ किंवा https://nvsp.in/ किंवा व्होटर हेल्पलाइन मोबाइल ॲपवर जावे लागेल. आता तुम्ही आम्ही दिलेल्या स्टेप्स फॉलो कराल.

  • सर्व प्रथम, मतदार पोर्टलवर नोंदणी/लॉग इन करा.
  • आता मेनू नेव्हिगेशनमधून डाउनलोड e-EPIC वर क्लिक करा.
  • EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक प्रविष्ट करा.
  • आता नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP सत्यापित करा.
  • यानंतर डाउनलोड e-EPIC वर क्लिक करा.
  • जर मोबाईल नंबर एरोलमध्ये नोंदणीकृत नसेल तर केवायसी पूर्ण करण्यासाठी ई-केवायसी वर क्लिक करा.
  • फेस लाइव्हनेस व्हेरिफिकेशन पास करा.
  • आता KYC पूर्ण करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा.
  • शेवटी तुमचा e-EPIC डाउनलोड करा.

Mahapareshan Pune Bharti 2024 | महापारेषण पुणे अंतर्गत नोकरीची मोठी संधी; 10 वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज

Mahapareshan Pune Bharti 2024

Mahapareshan Pune Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 68 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 31 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Mahapareshan Pune Bharti 2024

या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत शिका उमेदवारी या पदाच्या 68 रिक्त जागा आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती | Mahapareshan Pune Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी दहावी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा? | Mahapareshan Pune Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 31 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

NCL Pune Bharti 2024 | NCL पुणे अंतर्गत मोठी भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

NCL Pune Bharti 2024

NCL Pune Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांना झालेला आहे. आणि त्यांना चांगली नोकरी देखील मिळालेली आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. तर ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL Pune Bharti 2024 ) पुणे अंतर्गत एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प सहयोगी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाची एक रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करायचे आहेत. त्याचप्रमाणे 24 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव | NCL Pune Bharti 2024

या भरती अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प सहयोगी या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

यात भरती अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प सहयोगी या पदाची 1 रिक्त जागा आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी मुलाखती अंतर्गत तुमची निवड केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भारतीय अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 40 वर्षे पर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती | NCL Pune Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

24 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण पीएचडी पर्यंत पूर्ण झाले असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 42 हजार रुपये एवढे वेतन मिळेल.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 24 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पुणेकरांनो ! वाहतुकीचा ‘हा’ नियम मोडल्यास 6 महिने वाहन होणार जप्त

traffic rule

पुणेकर आणि वाहतूक कोंडी यांचे अतूट समीकरण आहे. पुण्यातील अनेक रस्त्यांवर कार्यालयीन कामकाजाच्या वेळी तर इतकी कोंडी होते की बस्स …! पुण्यातला प्रवास नको रे बाबा…! अशी अवस्था होते. अनेकदा पुणेकर मात्र वाहतूक कोंडी किंवा गर्दी असली तरी लवकर कसे पोहचू ? याच प्रयत्नात असतो. त्यामुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अनेकांचा प्रवास सुरु असतो. मात्र आता पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेने कंबर कसली आहे.

… तर वाहन 6 महिने जप्त

वाहतुकीच्या नियमांबद्दल कडक पावले उचलत उलट दिशेने वाहन चालवणाऱ्या लोकांचे वाहन ६ महिने जप्त करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. ट्रिपल सिट, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि उलट दिशेने येणार्‍या वाहनचालकांविरुद्ध वाहतूक शाखेकडून मोहिम राबविण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसात वाहतूक शाखेने सुमारे २५ हजार वाहनचालकांवर कारवाई केली असल्याचे समोर आले आहे.

याबाबत माहिती देताना पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, पुणे शहर वाहतूक शाखेमध्ये दोन शिफ्टमध्ये ८५० पोलीस अंमलदार कार्यरत असतात. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी बेशिस्त वाहनचालक, रस्त्यांची दुरावस्था, अरुंद रस्ते यामुळे शहरातील सर्वच भागात वाहतूक कोंडी दररोज होताना दिसते. शहरात भरधाव आणि वाहतूकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून दररोज एक ते दोघांना आपल्या प्राणास मुकावे लागते. त्यामध्ये अनेक जण गंभीर तर काही किरकोळ जखमी होत असतात. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले.

वाहतूक शाखेने 1 ते 16 ऑक्टोबर दरम्यान केलेली कारवाई

  • उलट दिशेने जाणारे वाहनचालक – 21 हजार 285
  • ट्रिपल सीट – 2 हजार 872
  • ड्रंक अँड ड्राईव्ह – 570
  • जप्त वाहने – 215

अवजड वाहनांना दिवसा बंदी

शहरात विविध ठिकाणी इमारतीचे बांधकाम, आणि विकास कामे सुरु असून त्यासाठी डंपर, कॉक्रीट मिक्सर अशा अवजड वाहनांची दिवसभर वाहतूक सुरु असते. त्यामुळे अनेकदा अपघात होत असतात, त्यामुळे वर्दळीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? महामंडळाचा राज्य सरकारकडे मोठा प्रस्ताव

ST mahamndal

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्याचे संकेत परिवहन मंडळाने दिले आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदात आणि उत्साहात वर्षातील सर्वात मोठा दिवाळ सण साजरा यावा यासाठी कर्मचाऱ्यांना पगार दिवाळीपूर्वीच करण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवलाय.

एवढेच नाही तर सर्व एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळावी यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील महामंडळाने सरकारकडे केली आहे. तसे पाहायला गेल्यास राज्यात सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवासासाठी एसटीचा वापर अधिक केला जातो दिवाळी सणाच्या निमित्ताने गर्दीच्या हंगामात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे महामंडळाला चांगला महसूलही या काळामध्ये मिळतो त्यासाठी सणासुदीला सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यांना गोड व्हावी यासाठी महामंडळाला हालचाली सुरू केल्यात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला होतो.

यंदा सोमवारी 28 ऑक्टोबरला वसुबारस ते रविवारी 3 नोव्हेंबरला भाऊबीज दरम्यान दिवाळीचा सण साजरा होत आहे. ऑक्टोबर महिन्याचा पगार सात नोव्हेंबर रोजी अपेक्षित आहे. मात्र दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा करण्याचा महामंडळाचा मानस आहे.

निधी मिळवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव

याकरिता राज्य सरकारकडून लवकर निधी मिळवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती आहे. दिवाळी सणानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना 5000 रुपयांची दिवाळी भेट देण्यात येते यंदाही भेट कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी देखील महामंडळांना राज्य सरकारकडे केली आहे. त्यामुळे यंदा दिवाळी आधी पगार मिळणार की दिवाळी सण उसनवारीने साजरा करावा लागणार याकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्यात.

Indian Railway | रेल्वेने तिकीट आरक्षणाचा कालावधी केला कमी; ही तिकिटे होणार रद्द

Indian Railway

Indian Railway | रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आह ती म्हणजे आता रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत ऍडव्हान्स टिकीट बुकिंगचा कालावधी रेल्वेने बदललेला आहे. याआधी भारतीय रेल्वेचे (Indian Railway) रिझर्वेशनसाठी 120 दिवसांचा कालावधी होता. परंतु तो आता निम्मा म्हणजे 60 दिवसांचा करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर रेल्वेचे आधीच तिकीट काढायचे असेल, तर ते प्रवाशाचा 60 दिवस आधी काढता येणार आहे. सुरुवातीला या रिझर्वेशनची मर्यादा 120 दिवस एवढी होती. परंतु आता रेल्वेने एक नवीन निर्णय काढलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2024 पासून होणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला तुमच्या प्रवाशाचा 60 दिवस आधी तिकीट बुक करावे लागणार आहे.

रेल्वे बोर्डाकडून या आगाऊ आरक्षणाबाबतचा परिपत्रक देखील जारी करण्यात आलेला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, 1 नोव्हेंबर 2024 पासून आगाऊ आरक्षणाचा कालावधी हा 120 दिवसांवरून 60 दिवस एवढा करण्यात आलेला आहे. यात प्रवाशांच्या तारखेचा समावेश नसला, तरी कालावधी कमी करण्याचे कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचे देण्यात आलेलं नाही.

त्याचप्रमाणे रेल्वेकडून (Indian Railway) ताज एक्सप्रेस गोमती एक्सप्रेस यांसह काही गाड्यांच्या आरक्षणाच्या कालावधीत मात्र कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. म्हणजेच या गाड्यांच्या आरक्षणाचा कालावधी हा आधीच एवढा होता तेवढाच आहे. सुरुवातीला हा रेल्वेतील प्रवास करताना रिझर्वेशनचा कालावधी हा 60 दिवसांचा होता. परंतु 2015 मध्ये हा निर्णय बदलून रिझर्वेशनचा कालावधी 120 दिवस करण्यात आला होता. परंतु आता 31 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आलेली 120 दिवसांची रिझर्वेशन रद्द करण्यात येणार आहे. तसेच 60 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे बुकिंग देखील रद्द केले जाणार आहे.

Success Story | तरुणाने नोकरी न करता धरली शेतीची वाट; ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून कमावतोय लाखो रुपये

Success Story

Success Story | गेल्या अनेक वर्षापासून शेती या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झालेली आहे. अनेक सुशिक्षित तरुणांनी देखील नोकरीचा ध्यास सोडून आता शेतीची वाट धरलेली आहे. त्यामुळे करिअरच्या दृष्टिकोनातून अनेक लोक शेतीकडे पाहतात आणि शेती देखील एका वेगळ्या पद्धतीने केली जाते. पारंपारिक पिकांची लागवड न करता, आता शेतीमध्ये तरुण वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीचे पिके घ्यायला लागलेली आहे. तसेच तंत्रज्ञानाचा आणि डिजिटलायझेशनचा वापर करून त्यांचे हे प्रयत्न यशस्वी देखील होत आहे. या यशस्वी शेतीकडे पाहून आजकाल अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे. आणि अनेक करून हे शेतीकडे वळत आहेत. आज देखील आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा जाणून घेणार आहे. ज्याने उच्च शिक्षण घेतले, परंतु खूप चांगली शेती देखील केली.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एका गावातील तरुणाने 2022 मध्ये ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हापासूनच त्यांनी ड्रॅगन फ्रुटच्या शेती बद्दलची माहिती मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याने अनेक ठिकाणांना भेटी देखील दिली. त्याने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील शेतीला भेट दिली आणि त्यानंतर ड्रॅगन फ्रुटची शेती करायचे असे त्यांनी ठरवले. त्यानंतर त्याने 25 रुपये प्रतिरोप या दराने ड्रॅगन फ्रुटच्या रोपाची बुकिंग केली आणि त्याने एक एकर क्षेत्रामध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.

त्याने 10 बाय 6 या अंतरावर एक एकर क्षेत्रात ड्रॅगनदृष्टी लागवड केली. अशी लागवड करताना त्यांनी दाणेदार खतांचा वापर केला.ब2023 मध्ये ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन होणे सुरू झाले आणि पहिल्याच वर्ष त्यांनी एका एकरमध्ये 60 क्विंटल उत्पादन घेतले. बाजारात पहिल्याच वर्षी 130 रुपये किलो असा दर मिळाला. चांगला फायदा मिळाला आहे. त्याचा आत्मविश्वास देखील वाढला आणि त्यानंतर त्यांनी साडेचार एकरी क्षेत्रापैकी साडेतीन एकरमध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.

यावेळी मात्र त्यांनी ही लागवड टेनिस पद्धतीने केली या पद्धतीचा वापर करून त्याने एका एकरमध्ये 4000 रोपांची लागवड केली. त्याने दहा बाय सहा या अंतरावर केली होती. तेव्हा एक एकर मध्ये त्याने 2450 ड्रॅगन फ्रुटची रोपे लावली होती. परंतु ते टेलिस पद्धतीचा वापर केल्यामुळे त्याला जास्त रोपे लावण्यात आली. आता तो या ड्रॅगन फ्रुटची यशस्वीरित्या शेती करत आहे आणि वर्षाला लाखो रुपये कमवत आहे. यावर्षी ड्रॅगन फ्रूटला 100 ते 130 रुपये किलोचा दर मिळालेला असून त्याला 170 क्विंटल फळांचे उत्पादन घेतलेले आहे. सगळा खर्च जाऊन त्याचे जवळपास 16 लाख रुपयांचे उत्पन्न झालेले आहे. त्यामुळे हा तरुण आता संपूर्ण तरुणांसाठी एक आदर्श ठरत आहे.

Diwali Muhurat Trading | दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये करा या 5 शेअर्समध्ये गुंतवणूक ; जाणून घ्या मुहूर्त ट्रेडिंगची वेळ आणि तारीख

Diwali Muhurat Trading

Diwali Muhurat Trading | दिवाळी अगदी एक आठवड्यावर आलेली आहे. आणि आता या दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजारात तेजी येणार आहे. दोन आठवड्याच्या आरामानंतर आता शेअर बाजारात आपल्याला चांगलीच तेजी पाहायला मिळणार आहे. दिवाळी पूर्वी बाजार उच्च पातळीवर टिकून राहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आता तुम्ही दिवाळीच्या या मुहूर्तावर काही विशेष खरेदी करून गुंतवणूक करू शकता. यासाठी दिवाळीनिमित्त एक ट्रेडिंग सत्र देखील आयोजित करण्यात आलेले आहेत. शुक्रवारी एक नोव्हेंबर 2012 रोजी संध्याकाळी 6:15 मिनिटे 7: 15 मिनिट या वेळेत एक विशेष दिवाळी मुहूर्त वेडिंगचे सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. या दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही काही शेअर्समध्ये (Diwali Muhurat Trading) गुंतवणूक करू शकता. त्यातून तुम्हाला खूप चांगला नफा होणार आहे. आता आपण जाणून घेऊयात की, असे कोणते शेअर्स आहेत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला फायदा मिळेल.

एचडीएफसी बँक लि | Diwali Muhurat Trading

अनेक गुंतवणूकदार दिवाळी मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये HDFC बँकेचे शेअर्स खरेदी करू शकतात. सोमवारी, एचडीएफसी बँकेचे शेअर्स 2% च्या वाढीसह 1,685.35 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. हा साठा गेल्या एक वर्षापासून शांत आहे पण खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. HDFC बँकेचे मार्केट कॅप 12.87 लाख कोटी रुपये आहे.

टाटा पॉवर कंपनी लि

मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार टाटा पॉवरकडे वळू शकतात. हा मल्टीबॅगर स्टॉक आहे आणि अनेक वर्षांपासून गुंतवणूकदारांना परतावा देत आहे. गेल्या वर्षी, टाटा पॉवरच्या समभागांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना 80% पर्यंत परतावा दिला. सोमवारी टाटा पॉवरचे शेअर्स 459.80 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. कंपनीचे मार्केट कॅप 1.47 लाख कोटी रुपये आहे. काही गुंतवणूकदार हा स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मुहूर्त ट्रेडिंगमध्ये समाविष्ट करू शकतात.

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प लि

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचे शेअर्स अनेक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे. येत्या मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार हा शेअर खरेदी करू शकतात. या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांचे भांडवल दुप्पट केले आहे. IRFC चे मार्केट कॅप 1.99 लाख कोटी रुपये आहे.

ग्रासिम इंडस्ट्रीज लि

मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये खरेदीही दिसून येते. या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना वर्षानुवर्षे चांगला परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात ग्रासिम इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना 40% परतावा दिला आहे. त्याची मार्केट कॅप 1.82 लाख कोटी रुपये आहे.

आयटीसी लिमिटेड | Diwali Muhurat Trading

आयटीसीने गेल्या वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. या वर्षी या शेअरला मुहूर्ताच्या व्यवहारातही चांगले खरेदीदार दिसू शकतात. सोमवारी आयटीसीचे शेअर्स 495.95 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. या कंपनीचे मार्केट कॅप 6.20 लाख कोटी रुपये आहे. हा स्टॉक सातत्यपूर्ण परतावा देणारा स्टॉक आहे आणि बचावात्मक क्षेत्रातील FMCG चा हा स्टॉक देखील मार्केट करेक्शनमध्ये पुढे जातो.