Sunday, December 28, 2025
Home Blog Page 411

Diwali 2024 | यंदा दिवाळी कधी? 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर?; जाऊन घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

Diwali 2024

Diwali 2024 | दिवाळी तोंडावर आलेली आहे. दिवाळी हा हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. त्यामुळे संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते. दिवाळी ही प्रकाश, आनंद आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. आणि या दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळी हा रोषणाईचा सण आहे. सर्वत्र दिव्यांनी उजळून निघतो. परंतु अनेक लोकांना दिवाळीच्या तारखांमध्ये गोंधळ उडालेला आहे. याबाबत पंडित सुरेश पांडे यांनी दिवाळीच्या नेमका तारखा कोणत्या आहेत? याबद्दल माहिती दिलेली आहे.

दरवर्षी दिवाळी ही कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी होते. यावेळी अमावस्या तिथे शुक्रवारी एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 16 वाजता समाप्त होईल तर अमावस्या येतील गुरुवारी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजून 52 मिनिटांनी सुरू होईल. त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनही सूर्यास्तानंतर आणि चंद्र उगवण्याच्या आधी होते. त्यामुळे पंडित सुरेश पांडे यांच्यामध्ये 31 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळी सणाला सुरुवात होत आहे.

लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त | Diwali 2024

95 नुसार प्रदोष काल 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजून 12 मिनिटे 07:43 पर्यंत असणार आहे. 5 वाजून 12 मिनिटे ते रात्री 10:30 पर्यंत असेल 31 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत गणेशाची तसेच माता लक्ष्मीची तुम्ही पूजा करू शकतात.

लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्याचे महत्त्व

आपल्याकडे धनत्रयोदशीला कुबेर पूजन केले जाते. त्यानंतर दिवाळीत लक्ष्मी आणि गणेशाचे पूजन देखील केली जाते. असे म्हणतात की, लक्ष्मी पूजनाचा रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येत असते. आणि लोकांच्या घरी सुख समृद्धी आणि संपत्तीची वाढ व्हावी. असे आशीर्वाद देत असते. त्यामुळे धनाची देवता असलेल्या लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला धन समृद्धीचा लाभ होतो. तसेच गणपतीची पूजा केल्याने घरातली सिद्धीचा देखील वास होतो. त्यामुळे दिवाळीत लक्ष्मीपूजनाला खास महत्त्व आहे.

Big Boss 18 लवकर गुंडाळणार ? सलमान खान साठी मेकर्सचा मोठा निर्णय ?

big boss 18

रिऍलिटी शो चा बाप समाजाला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’… या शोचा होस्ट अभिनेता सलमान खान आहे. एवढेच नाही तर त्याच्यामुळेच हा शो सुपरहिट असल्याचे मानले जाते. मात्र सध्या सुरु असलेल्या ‘Big Boss 18’ हा शो लवकर गुंडाळला जाण्याची चर्चा आहे. बिग बॉस सुरू होऊन अवघ्या काही वेळातच सलमानच्या जवळचे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. त्याचा थेट परिणाम सलमान खानवर झाला. या मृत्यूची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर सलमानची झोप उडाली आहे आणि त्यामुळे त्याने त्याच्या सर्व मिटिंग रद्द केल्याची माहिती आहे, असा दावाही आता रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्याच वेळी, बिग बॉस 18 देखील लवकरच पॅक अप होऊ शकते असे बोलले जात आहे.

सलमान खान बिग बॉस 18 होस्ट करणार नाही ?

बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा कडक केली आहे. दरम्यान, बिग बॉस 18 च्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. बिग बॉस 18 च्या या वीकेंडचा वार एपिसोड सलमान खान होस्ट करणार नाही. सलमान खानच्या सुरक्षेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. काही काळापूर्वी सलमान खानची सुरक्षा Z वरून Y करण्यात आली आहे. या बातमीने बिग बॉस 18 च्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सलमान खानलाही विनाकारण प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आठवड्यात तो ‘बिग बॉस 18’ च्या ‘विकेंडच्या वार’ मध्येही दिसणार नाही. याचे कारण म्हणजे लॉरेन्स बिश्नोई गँग, ज्या गॅन्ग ने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या सर्व कारणांमुळे सलमान त्याच्या कमिटमेंटशी तडजोड करेल. फराह खान सलमान खानच्या जागी 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी वीकेंड का वार होस्ट करताना दिसण्याची शक्यता आहे.

याआधीही तिने बिग बॉस होस्ट केले आहे. मात्र, या बातमीवर बिग बॉस 18 च्या टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. बाबा सिद्दीकींची हत्या झाली तेव्हा सलमान बिग बॉसच्या सेटवर होता आणि ही बातमी मिळताच तो सेटवरून निघून गेला.

Heart Attack Warning Signs | हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आठवडाभर दिसतात ही लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष

Heart Attack Warning Signs

Heart Attack Warning Signs | आजकाल अनेक लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहेम अनेक लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. आणि त्यांचा मृत्यू होतो. परंतु हृदय विकाराचा झटका हा अगदी लगेच येत नाही, तर त्याची काही लक्षणे असतात. ती आठवडाभर आधीच दिसायला लागतात. परंतु ही लक्षणे अगदी नॉर्मल असतात. त्यामुळे याच लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु त्याचा धोकादायक परिणाम आपल्याला भोगावे लागतो. तज्ञांच्या म्हणण्यानुसार हृदयविकाराच्या झटक्याची काही लक्षणे ही एक दोन महिने आधीच हलक्या स्वरूपात दिसतात. परंतु त्याकडे आपण लक्ष देत नाही. आता आपण जाणून घेऊया की, हृदयविकाराचा झटका येण्याआधी एक आठवडा कोणती लक्षणे दिसतात.

छातीत दुखणे | Heart Attack Warning Signs

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, एखाद्याला छातीत तीव्र वेदना जाणवू शकतात. हे दुखणे देखील दाब किंवा जडपणासारखे वाटू शकते. हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या वेदनांचा परिणाम साधारणपणे डाव्या हातावर होतो, परंतु त्याचा परिणाम दोन्ही बाजूंनी दिसून येतो.

हातामध्ये वेदना

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, खांदे आणि हातांमध्ये वेदना जाणवू शकतात. बर्याच वेळा लोक या वेदनाकडे दुर्लक्ष करतात, जे नंतर गंभीर होऊ शकते. जर तुम्हाला डाव्या हातामध्ये वारंवार तीव्र वेदना होत असतील तर सावध रहा आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हातात विविध ठिकाणी वेदना

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी हाताच्या वेगवेगळ्या भागात वेदना जाणवू शकतात. या दुखण्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण पेनकिलर घेतात पण हे योग्य नाही, अशा परिस्थितीत विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

पाठदुखी

हृदयविकाराचा झटका फक्त खांद्यापर्यंत आणि छातीपर्यंत पसरत नाही, तर तो पाठीतही होऊ शकतो. विनाकारण पाठदुखी होत असेल तर एकदा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या. हे वेळेपूर्वी समस्या उघड करेल.

जबड्यात वेदना | Heart Attack Warning Signs

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जबड्यात वेदना किंवा दाब जाणवू शकतो. बरेच लोक याला फारसे गांभीर्याने घेत नाहीत, जे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत जेव्हाही अशी लक्षणे दिसतात तेव्हा ताबडतोब सतर्क होऊन डॉक्टरांकडे जावे.

वजन कमी करण्यासाठी खा हे प्रोटीनयुक्त पदार्थ; पोटाची चरबी होईल झपाट्याने कमी

Protien foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलत आहे. आणि याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांना वेगवेगळे आजार देखील होत आहेत. परंतु या सगळ्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली समस्या म्हणजे लठ्ठपणा. कामाचा ताण, बैठे जीवनशैली तसेच बाहेरचे खाणे या सगळ्या गोष्टींमुळे अनेक लोकांचे वजन वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न देखील करत आहेत. त्यांनी वेगवेगळे डाएट फॉलो करत आहेत. तसेच अनेक प्रकारचे पदार्थ देखील ते खात नाहीत. परंतु जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर तुम्हाला जास्त प्रोटीन असलेले पदार्थ खाणे खूप गरजेचे असते. त्यामुळेच तुम्ही तुमच्या वजनावर कंट्रोल ठेवू शकता.

तुम्ही जर हाय प्रोटीन असलेले पदार्थ खाल्ले तर तुमची पचनक्रिया देखील सुधारते. तुम्हाला कमी भूक लागते म्हणजेच तुमचे भूक वाढवणारे हार्मोन्स नियंत्रित राहतात. तसेच स्नायूंच्या वाढीसाठी देखील हे चांगले असते. यामुळे तुमची ऊर्जा पातळी वाढते. आता आपण जाणून घेऊया कोणत्या शाकाहारी पदार्थांमध्ये जास्त प्रोटीन असतात. जे तुम्ही खाऊ शकता आणि तुमचे वजन नियंत्रित ठेवू शकता.

अंडी

अंड्याचा पांढरा भाग हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. अंडी अनेक प्रकारे बनवता येतात, ते ऑम्लेट, तळलेले किंवा उकळून खाल्ले जाऊ शकतात.

मासे

सॅल्मन, ट्यूना आणि इतर मासे यांसारख्या माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड आणि प्रथिने भरपूर असतात. याच्या सेवनाने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

डाळी

मूग, हरभरा, मसूर यांसारख्या डाळींमध्ये फायबर आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे भूक कमी होते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

दही

ग्रीक दही हा प्रथिनांचा विशेषतः चांगला स्रोत मानला जातो. हे सॅलड, फ्रूट चाट इत्यादींसोबत खाऊ शकतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

क्विनोआ

क्विनोआ, प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो, तो ग्लूटेन-मुक्त आहे. याच्या सेवनाने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

काजू किंवा बिया

बदाम, अक्रोड किंवा चिया बिया यांसारखी सुकी फळे केवळ प्रथिनेच नव्हे तर निरोगी चरबीचेही चांगले स्रोत मानले जातात. याच्या सेवनाने शरीर निरोगी राहते. याशिवाय वजन कमी करण्यासही मदत होते.

Weather Update | पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्याना दिला येलो अलर्ट

Weather Update

Weather Update | संपूर्ण देशात आता परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झालेला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. परंतु महाराष्ट्रातील आणखी पुढील तीन दिवस मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभाग हे पावसाबद्दलचा अंदाज नेहमीच व्यक्त करत असतात. हवामानाने आज देखील म्हणजे 18 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान कसे असेल? तसेच इथून पुढे तीन दिवस राज्यातील हवामान कसे असेल? याची माहिती दिलेली आहे. महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, कोकण, जालना या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत आहे. तर काही भागात नागरिकांना पावसाचा सामना करावा लागत आहे आणि यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या देखील वाढलेले आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस राहणार आहे. तसेच 23 ऑक्टोबरला मराठवाड्यात देखील पाऊस (Weather Update) पडणार आहे. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत संपूर्ण मान्सून जरी केला असला, तरी 5 नोव्हेंबर पासून राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे.

हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची काळजी घेण्यास देखील सांगितलेली आहे. कारण सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसत आहे. आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

‘बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट हालत होईल’; सलमान खानला पुन्हा बिष्णोई गॅंगकडून धमकी

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खानला देखील अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या प्रकरणातील संपूर्ण तपासणी केल्यानंतर या हत्या प्रकरणात दिसणारी बिष्णोई गॅंगचा देखील हात असू शकतो. अशी शंका व्यक्त केली गेली. आणि त्यामुळेच अभिनेता सलमान खान देखील सतर्क झाला आहे. परंतु सलमान खानला आता आणखी एकदा ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेला एका मेसेजमध्येही धमकी देण्यात आलेली आहे.

ट्राफिक कंट्रोल रूमला एक मेसेज पाठवण्यात आला होता. त्या व्यक्तीने ती लॉरेन्स बिष्णोईची अगदी जवळची व्यक्ती असल्याचे सांगितलेले आहे. आणि त्या व्यक्तीने सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर आता सलमान खान हा बिष्णोई यांच्या निशाण्यावर आलेला आहे. त्यामुळे सलमानने त्याच्या सुरक्षितेत वाढ केली आहे. याआधी देखील सन्मान खानच्या घरावर गोळीबार झाला होता. आणि त्याला अनेकदा जिवे मागण्याच्या धमक्या देखील देण्यात आलेल्या होत्या.

हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअप नंबर वरून हा मेसेज आला होता. या मेसेजमध्ये लॉरेन्स विष्णू गॅंगसोबत गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानचे जे वैर आहे ते संपवण्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली होती. हा मेसेज पाठविणाऱ्या व्यक्तीने असे म्हटले आहे की तो सलमान खान आणि लॉरेन्स यांच्यामध्ये सामंजस्य घडवून आणणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी पैसे मागितले आहे. परंतु जर हे सलमान खानने हे पैसे दिले नाही तर त्याची अवस्था बाबा सिद्दिकी पेक्षा देखील वाईट होईल असे सांगण्यात आलेले आहेत.

ट्राफिक पोलिसांच्या व्हाट्सअपनंबर वरून तो मेसेज आला त्या मेसेजमध्ये असे सांगण्यात आले होते की, “ही धमकी हलक्यात घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल. तर त्याला पाच कोटी रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाही तर सलमान खानची अवस्था बाबासाहेबांचे पेक्षाही वाईट होईल. या धमकीनंतर आता मुंबई पोलिसांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले आहे. आणि हा असा मेसेज पाठविणाऱ्या व्यक्तीचा तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे. आणि सलमान खानच्या सुरक्षिततेतही वाढ करण्यात आलेली आहे.

दिवाळी होईल गोड ! जबरदस्त ऑफर ! OnePlus 11 ची किंमत 20 हजारांनी कमी

one plus

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच ई-कॉमर्स वेबसाइट्सवर ऑफर्सचा पाऊस पडतो. तुम्ही देखील सणानिमित्त नवीन मोबाईल खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. OnePlus 11 वर एक जबरदस्त ऑफर दिली जात आहे. हा स्मार्टफोन तुम्ही सध्या सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता.

वनप्लस फोन त्यांच्या प्रीमियम डिझाइन आणि वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात. यामुळेच वनप्लसने अवघ्या काही वर्षांत बाजारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने आपल्या ग्राहकांसाठी OnePlus 11 5G वर बंपर डिस्काउंट ऑफर आणली आहे. जरी त्याची किंमत 55 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, परंतु आता तुमचे बरेच पैसे वाचणार आहेत.

OnePlus 11 च्या किमतीत मोठी कपात

OnePlus 11 128GB स्मार्टफोन Flipkart वर 56,999 रुपयांच्या किमतीत विकला जातो आहे. पण दिवाळीपूर्वीच्या सेल ऑफरमध्ये कंपनी करोडो ग्राहकांना त्यावर 35% इतकी मोठी सूट देत आहे. या सेल ऑफरनंतर तुम्ही ते फक्त 36,596 रुपयांना खरेदी करून तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. याशिवाय, जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही ते फक्त 1,287 रुपयांच्या मासिक ईएमआयवर देखील खरेदी करू शकता.

OnePlus 11 5G चे फीचर्स

  • OnePlus 11 5G मध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा डिस्प्ले मिळेल ज्यामध्ये AMOLED पॅनल आहे.
  • त्याच्या डिस्प्लेमध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि 800 nits पर्यंत ब्राइटनेस मिळेल.
  • डिस्प्लेच्या संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देण्यात आला आहे.
  • कामगिरीसाठी, OnePlus 11 5G ने तुम्हाला Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर दिला आहे.

बिश्नोईच्या धमक्यानंतर सलमानने खरेदी केली होती बुलेट प्रूफ कार ; SUV ची किंमत पाहून भुवया उंचावतील

salman khan car

भारतात बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान आणि काळवीट प्रकरणाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गॅंगने सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याचा इशारा दिला आहे. खरंतर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांपासून तो धमक्या देत होता. या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या धमक्यांना पाहता सलमान खानने खास बुलेटप्रूफ कार खरेदी केली होती. तुम्हाला या कारचे नाव आणि किंमत माहित आहे का? हा कार ब्रँड भारतात फारसा लोकप्रिय नसला तरी सलमानने या कंपनीकडून खरेदी केलेल्या महागड्या एसयूव्हीची किंमत खूपच जास्त आहे.सलमान खानने एप्रिल 2023 मध्ये मोठी रक्कम भरून ही कार दुबई मधून आणली होती. ही बुलेटप्रूफ SUV आहे, ज्यामध्ये सलमान खान मुंबईत प्रवास करतो. या हायटेक SUV कारचे फीचर्स काय आहेत आणि तिची किंमत काय आहे ? चला जाणून घेऊया …

बुलेटप्रूफ कारचे नाव आणि वैशिष्ट्ये

वाढत्या धमक्यांमुळे सलमान खानने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये Nissan Patrol SUVची ऑर्डर दिली होती. ही त्यांची दुसरी बुलेटप्रूफ कार आहे, याआधी तो टोयोटा लँड क्रूझर प्राडो एसयूव्हीमध्ये प्रवास करत होता. Nissan Patrol SUV सलमान खानने दुबईतून खरेदी केली होती. 5.6-लिटर V8 पेट्रोल इंजिन निसान पेट्रोल एसयूव्ही 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि मानक चार-चाकी ड्राइव्ह सिस्टमसह येते.

काय आहे कारची किंमत ?

सलमान खानची बुलेट प्रूफ Nissan Patrol SUV भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाही, त्यामुळे या मॉडेलची किंमत स्पष्ट नाही. ईटीच्या अहवालानुसार, निसान पेट्रोलची (इम्पोर्टेड) ​​किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. बुलेटप्रूफिंग क्षमतेसह इतर वैशिष्ट्ये जोडल्यानंतर या कारची किंमत आणखी जास्त होते.

यापूर्वीही दिल्या आहेत धमक्या

काळवीट मारल्याप्रकरणी सलमान खानवर खटला सुरू आहे. याप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमकी दिली आहे. सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट असल्याचे लॉरेन्सचे म्हणणे आहे. सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली असून सलमान खान त्यांच्या मुख्य निशाण्यावर आहे.

ITBP Bharti 2024 | 10 वी पास उमेवारांना ITBP मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आज आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत मोठी भरती निघालेली आहे. ही भरती कॉन्स्टेबल या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 545 जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 6 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | ITBP Bharti 2024

या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल या पदाच्या 545 रिक्त जागा आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 21 ते 27 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

अर्ज सुरू होण्याची तारीख

8 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

6 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता | ITBP Bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारा कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर 21,700 ते 69 हजार 100 रुपये एवढे वेतन मिळेल.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 6 नोव्हेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

रेल्वे प्रवाशांकरिता महत्वाची बातमी ! तिकीट बुक करण्याचा नियम बदलला , जाणून घ्या

railway rule

तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही काही महिने अगोदर तिकिटे बुक केलेली असतीलच. भारतीय रेल्वेकडून एक महत्वपूर्ण निर्णय बदलण्यात आला आहे. यापूर्वी 120 दिवस आधी ट्रेनचे सीट बुकिंग करण्याचा अवधी ठरवून देण्यात आला होता. मात्र याच नियमात आता बदल करण्यात आला आहे. ट्रेनमधील तिकीट बुकिंगबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे.

आता ट्रेनमध्ये चार महिने अगोदर तिकीट बुक करण्याचा नियम बदलला आहे. आता तुम्ही फक्त ६० दिवस आधी ट्रेनमध्ये आरक्षण करू शकता. याबाबतची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी जारी केली. त्यानुसार आता आगाऊ आरक्षणाची मुदत कमी करण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत १२० दिवसांची होती, पण आता ती ६० (प्रवासाची तारीख वगळता) झाली आहे.

60 दिवस आधीच आरक्षण करता येणार

भारतीय रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, आता ट्रेनमध्ये 120 नव्हे तर 60 दिवस आधीच आरक्षण करता येणार आहे. भारतीय रेल्वेने ARP म्हणजेच आगाऊ आरक्षण कालावधी 2 महिन्यांपर्यंत कमी केला आहे. भारतीय रेल्वेचे हे नवे नियम १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. या नवीन आदेशाचा परदेशी प्रवाशांच्या आगाऊ आरक्षण कालावधीवर कोणताही परिणाम होणार नाही. यासोबतच ज्या वाहनांची एआरपी आधीच कमी आहे त्यांच्यावर याचा परिणाम होणार नाही. अशा गाड्यांमध्ये गोमती एक्स्प्रेस, ताज एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.