Saturday, December 27, 2025
Home Blog Page 412

गोव्यासाठी ट्रिप प्लॅन करताय ? गर्दीची ठिकाणं सोडून एक्सप्लोर करा काही अप्रतिम ठिकाणं

goa

गोवा हे असं ठिकाण आहे जिथे जाण्याचा आणि एन्जॉय करण्याचा अनेकजण प्लॅन बनवत असतात. गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे केवळ देशातच नाही तर परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहेत. कलिंगूट बीच ,अंजुना बीच ,बागा बीच ,पालोलेम बीच, चर्च अशी ठिकाणं प्रसिद्ध असून या ठिकाणी तुम्ही सुद्धा भेटी दिल्या असतील.

मात्र गोव्यात अशीही काही ठिकाणी आहेत जिथे तुम्ही कदाचित गेलाच नसाल पण हे ठिकाण अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय आहे. याच काही ठिकाणांबद्दल आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

चोरला घाट

खरंतर गोवा म्हटलं की समुद्रकिनाऱ्यांचा प्रदेश हेच आपल्यासमोर येते. मात्र गोव्यातील हिल स्टेशन म्हणजे चोरला घाट. जर तुम्हाला सुंदर अशा निसर्गात वेळ घालवायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. तुम्हाला इथं हिरवळ, धबधबे आणि पर्वतरांगांमध्ये मनःशांती जरूर मिळेल. हे ठिकाण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. तुम्हाला इथे गिर्यारोहण आणि ट्रेकिंगची सुद्धा संधी मिळेल. यादरम्यान तुम्हाला धबधबा लसणी टेंप शिखर आणि चोरला घाट पॉईंट यासारख्या सुंदर ठिकाणांना भेटी देता येईल. मात्र यासाठी तुम्हाला तिथे जाण्यासाठीच्या योग्य हवामानाची माहिती घेणे आवश्यक आहे.

दांडेली

दांडेली अभयारण्य हे तुम्हाला ऐकून माहिती असेलच गोव्यापासून जवळपास 102 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण… इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला तीन तास लागू शकतात. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून अंदाजे १५५१ फूट उंचीवर वसलाय सफारी टूर, बोटिंग आणि ट्रेकिंग यासाठी अनेक उपक्रम इथे करायला मिळतात. येथील चांदेवाडी वॉटर रॅपिड्स, कावळा लेणी, सिंथेरी रॉक्स, उलवी लेणी, गणेशगुडी धरण, सायक्स पॉइंट, मौलांगी नदी, क्रोकोडाइल पार्क, सातखंडा धबधबा, दिग्गी, बॅक वॉटर, सातोडी धबधबा, मगोद फॉल्स, जैन कल्लू गुड्डा, शर्ली फॉल्स, पानसोली इ. कॅम्प, टायगर रिझर्व जंगल सफारी अशी ठिकाणे पाहता येतील.

आंबोली

गोव्यापासून जवळच असलेलं हे एक हिल स्टेशन असून गोव्यापासून तीन ते चार तासात तुम्ही इथे जाऊ शकता. हे ठिकाण म्हणजे डोंगरदऱ्यांनी भरलेलं आणि धबधब्यांनी नटलेले ठिकाण… घनदात जंगलांनी वेढलेला हे ठिकाण तितकच निसर्गानं समृद्ध आहे. अनेक प्रकारची झाड आणि प्राणी इथे पाहायला मिळतात. तीनशे फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा हे इथलं वैशिष्ट्य. पावसाळ्यात इथं हेच पाहण्यासाठी लोक गर्दी करत असतात या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही शिरगावकर पॉईंट, कोलशेत पॉईंट आणि नांगरता फॉल्स या ठिकाणांना भेटी घेऊ शकता.

घरातील ‘हा’ पांढरा पदार्थ ठरेल पोटविकारांवर रामबाण उपाय ; जाणून घ्या

health news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या धावपळीच्या जगात अनेक लोकांचे पौष्टिक अन्न खाण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे असंख्य लोक गॅसेसच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत. आहारात जास्त तळलेले किंवा मैदायुक्त पदार्थ खाणं आणि कमी फायबर्स असलेली पदार्थ खाणे यामुळे गॅसेसची समस्या निर्माण होऊ शकते. चुकीच्या जीवनशैलीमुळे गॅसेसचं प्रमाण वाढून पोटदुखी, पोट फुगणं अशा समस्या होऊ शकतात, ज्यामुळे पाईल्ससारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. अशा आजारापासून वाचण्यासाठी तज्ञ् ताक पिण्याचा सल्ला देतात. आता गॅसच्या तसेच पोटदुखीच्या समस्यांना करा रामराम , कारण आज आम्ही तुम्हाला रामबाण उपाय सांगणार आहोत

ताकामध्ये जिरे आणि ओव्याचा समावेश

ताक तयार करण्यासाठी 1 ग्लास प्लेन ताक फेटून पातळ करून घ्या. त्यात 1 चमचा भाजलेले जिरे पावडर आणि अर्धा चमचा भाजलेली ओवा पावडर घाला. चवीसाठी थोड काळ मीठ घालू शकता. तुम्ही हे ताक सकाळी किंवा दुपारी जेवणासोबत पिऊ शकता . ताकामुळे पोटाला गारवा मिळतो, पचन सुधारते , आणि आतडे निरोगी राहण्यास मदत मिळते .

पचन क्रियेला गती मिळते

गॅसेसच्या त्रासावर मात करण्यासाठी तज्ञ् आहारात नियमित ताकाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. साधे ताक पिण्यापेक्षा जिरे किंवा ओवा घालून ताक प्यायल्याने गॅसेसच्या त्रासावर चांगला परिणाम दिसून येतो. तसेच जिरे खाल्याने पोटदुखी कमी होपचन क्रियेला गतीते आणि मिळते, तर ओवामुळे पोटातील गॅस नाहीसा करण्यास मदत होते .

पोटाच्या समस्यांना रामबाण उपाय

ताकातील जिऱ्याचे एंटी इंफ्लेमेटरी हा गुणधर्म असल्यामुळे गॅस, एसिडिटी, आणि इतर पोटाच्या समस्यांना रामबाण उपाय आहे. याशिवाय ओव्यातील थायमॉल योगिक गुणधर्मामुळे गॅसेसचा त्रास कमी करून पचनक्रियेला सुरळीत होते . त्यामुळे जेवण करताना किंवा जेवणानंतर ताकाचे सेवन केल्यामुळे तुम्ही अनेक समस्यांवर मात करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपची कडक ऍक्शन ! ‘या’ करणामुळे 84 लाख अकाउंट्स थेट केले बॅन

whats app account

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मेटा कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅपने भारतात फेक न्यूज आणि अभद्र भाषा वापरणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे. ऑगस्ट महिन्यात 84.58 लाख खात्यांना बॅन केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 1661000 खात्यांवर कोणतीही तक्रार न करता थेट कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई माहिती तंत्रज्ञान कायदा 2021 अंतर्गत करण्यात आली असून , त्यात उल्लंघन करणारे आणि बेकायदेशीर गोष्टीत सहभागी असलेल्या खात्यांचा समावेश आहे.

मशीन लर्निंग आणि डाटा ॲनालिटिक्सचा वापर

व्हॉट्सअ‍ॅपने 84.58 लाख अकाउंट्सवर ऑगस्ट महिन्यात बंदी घातली असून , या निर्णयाचा मुख्य उद्देश प्लॅटफॉर्मवरील सुरक्षितता कायम ठेवणे आणि दुरुपयोग टाळणे हा आहे. व्हॉट्सअ‍ॅपने फेक अकाउंट्स ओळखण्यासाठी मशीन लर्निंग आणि डाटा ॲनालिटिक्सचा वापर केला आहे, ज्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अकाउंट्सवर कारवाई केली जाईल . याशिवाय 16.61 लाख अकाउंट्स कोणत्याही तक्रारीशिवाय बंद करण्यात आले आहेत.

IT नियमांतर्गत कारवाई

2021 साली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लागू केलेल्या माहिती तंत्रज्ञान नियमांतर्गत 50 लाखांपेक्षा जास्त यूजर्स असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना मासिक अहवाल सादर करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे . यामध्ये वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि कारवाई यांची माहिती दिली जाते. व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केले आहे की, बेकायदेशीर गोष्टींना कधीही प्रोत्साहन दिले जात नाही, तसेच संशयास्पद कृती आढळल्यास त्यावर तत्काळ कठोर कारवाई केली जाते. दरवर्षी हजारो खात्यांवर अशी कारवाई केली जाते आणि त्यांना कायमस्वरूपी बंद केले जाते.

BSNL ने आणलाय जबरदस्त प्लॅन ! 3 रुपयांच्या खर्चात 300 दिवसांचा रिचार्ज

bsnl prepaid plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या रिचार्ज प्लॅनमुळे अनेक लोक चिंतेत आहेत . त्यातच सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने ग्राहकांसाठी नुकताच 300 दिवसांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हि योजना ग्राहकांसाठी परवडणारी असून , तुम्हाला केवळ 3 रुपये प्रतिदिन इतक्या कमी दरात सेवा मिळतील. या 797 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 दिवसांची व्हॅलिडीटी दिली जाणार आहे. या प्लॅनची खासियत अशी कि , ग्राहकांचे सीम सुमारे 10 महिने म्हणजेच 300 दिवस सुरु राहील .

797 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन

बीएसएनच्या या 797 रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना कमी खर्चात दररोज अनलिमिटेड कॉलिंग, 2GB डेटा , मोफत राष्ट्रीय रोमिंग आणि 100 एसएमएससारख्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत कार्डचा बॅलन्स 60 दिवस राहील . त्यानंतर तुम्ही कोणालाही कॉल करू शकणार नाही . पण याची खास गोष्ट अशी कि, तुमच्या फोनची इनकमिंग सेवा सुरु राहील . मात्र आउटगोइंग कॉल, डेटा आणि एसएमएससाठी तुम्हाला पुन्हा रिचार्ज करावा लागेल.

ग्राहकांच्या वाढत्या खर्चाची बचत

ही योजना खासकरून दुसऱ्या क्रमांकाच्या BSNL सिम वापरणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यांत तुम्ही या योजनेतील कॉलिंग आणि डेटाची पूर्णपणे वापर करू शकता. त्यानंतर, राहिलेले शिल्लक 240 दिवसांत तुम्ही येणारे कॉल रिसीव्ह करू शकता, त्यासाठी पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही. बीएसएनएलची ही योजना बजेटमध्ये मिळत असून , ग्राहकांच्या वाढत्या खर्चाची बचत होईल. विशेष म्हणजे ज्यांना त्यांचे सीम खूप कालावधीसाठी चालू ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.

IPS अधिकारी समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात ? कोणत्या पक्षाकडून लढणार ?

sameer vankhede

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून विधानसभेची चर्चा सुरु असून, अनेक इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच वरिष्ठ आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते महायुतीकडून निवडणूक लढणार असून, आता राजकारणात दबंग अधिकाऱ्याची एन्ट्री होणार आहे. अजून त्यांनी अधिकारी पदाचा राजीमान दिला नसून , लवकरच ते पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करतील.

शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश

समीर वानखेडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करत, मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीकडूनही त्यांना पाठिंबा मिळेल अशी चर्चा सुरु आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, जो केंद्र सरकारच्या गृह विभागाकडून मंजूर झाल्यानंतर राजकारणात प्रवेश करतील . राजीनाम्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू होईल.

अंमली पदार्थ विरोधात छापेमारी

हे 2008 च्या बॅचचे आयआरएस (Indian Revenue Service) अधिकारी आहेत. ते 2021 पर्यंत अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) मुंबई विभागाचे माजी संचालक होते. त्यांच्या 15 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी अमली पदार्थ विरोधात मोठ्या प्रमाणात छापेमारी करून 17000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त केले आहे. त्यांनी अनेक प्रसिद्ध प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे, ज्यात बॉलिवूडशी संबंधित अनेक व्यक्तींवर छापे टाकण्यात आले होते.

धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख

समीर वानखेडे यांनी त्यांच्या सेवाकाळात अनेक महत्वाच्या कारवायांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांची राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली तेव्हा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात पकडले होते. या प्रकरणानंतर ते चर्चेत आले होते. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज नेटवर्क उघड करण्यामागेही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. तसेच त्यांनी गायक मिका सिंहला परदेशी चलनासह पकडले होते. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, आणि राम गोपाल वर्मा यांच्या घरीही छापे टाकले होते. त्यामुळे त्यांना एक धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जाते. समीर वानखेडे यांच्या राजकीय प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरणार आहे.

माथेरानची राणी ‘या’ तारखेपासून पुन्हा रुळावर ; जाणून घ्या, वेळापत्रक

matheran train

महाराष्ट्रातील नावाजलेले हिल स्टेशन म्हणून माथेरानची ओळख आहे. उंच डोंगरदऱ्यात वसलेलं माथेरान आजही पर्यटकांची पसंती आहे. माथेरान मधील महत्वाचे आकर्षण म्हणजे माथेरानची राणी… ! माथेरानची ट्रेन. माथेरानची ही ट्रेन पावसाळ्याच्या दिवसात सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद असते. मात्र येत्या १ नोव्हेंबर पासून ही ट्रेन पुन्हा धावणार आहे. त्यामुळे पर्यटकांना पुन्हा एकदा या ट्रेनची सफर करता येणार आहे.

तांत्रिक बाबींमुळं विलंब

पावसाळ्याच्या दिवसात या भागात जास्त पाऊस पडत असल्यामुळे येथे घाट माथ्यावर दरडी कोसळण्याची भीती असते. म्हणूनच पावसाळ्यात ही ट्रेन बंद ठेवली जाते. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येते. मात्र यंदाच्या वर्षी तांत्रिक बाबींमुळं ही सेवा सुरु होण्यास विलंब होत आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या १ नोव्हेंबर पासून माथेरान ट्रेन पुन्हा सुरु होणार आहे.

दिवाळीच्या आणि नाताळाच्या सुट्टीनिमित्त हजारो पर्यटक माथेरानला भेट देत असतात. हा पर्यटन हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत चालतो. त्यामुळे रेल्वेला देखील चांगला महसूल यातून मिळत असतो. दरम्यान, 15 ऑक्टोबरची तारीख उलटून गेल्यानंतरही माथेरानची राणी रुळांवर न आल्याने पर्यटकांसह व्यावसायिकांनाही फटका बसला आहे.

दररोज होणार 8 फेऱ्या

सध्या या गाडीच्या दररोज आठ फेऱ्या आहेत. या गाडीची खास बात म्हणजे या ट्रेनमधून माथेरानचं निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळते. पर्यटन खासकरुन या ट्रेनची सफर करण्यासाठीच येतात. मात्र फेऱ्या मर्यादित असल्याने अनेकदा पर्यटकांचा हिरमोड होतो.

Senior Citizen Saving Scheme | उतार वयासाठी आताच करा गुंतवणूक; दर 3 महिन्यांनी मिळतील 1.20 लाख रुपये

Senior Citizen Saving Scheme

Senior Citizen Saving Scheme | आज-काल महागाईचा आणि बदलत्या जीवनशैलीचा विचार करून लोकांनी आपला रिटायरमेंट प्लॅन तयार करणे खूप गरजेचे आहे. आपल्या म्हातारपणासाठी काही निधी जमा करून ठेवणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून उतार वय झाल्यानंतरही आपल्या आयुष्यात इतर गोष्टींसाठी आपल्याला कोणावरही आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहता कामा नये. यासाठी तुम्ही सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये मुलं त्यांच्या आई-वडिलांसाठी देखील खाते उघडू शकतात. तुम्ही आई आणि वडिलांचे वेगवेगळे खाते ओपन करू शकता.

उतार वयात कोणत्याही प्रकारचा आर्थिक प्रश्न उभा राहू नये. यासाठी रेग्युलर इनकम सोर्स असावा, असे अनेकांना वाटते. आणि त्यासाठी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही असे केले, तर उतार वयात तुमच्यासाठी खूप चांगला निधी जमा होईल. ही योजना तीन वर्षासाठी चालू ठेवू शकता. मॅच्युरिटी पिरियड पूर्ण झाल्यावर तुम्हीही रक्कम काढून घेऊ शकता. आणि नवीन अकाउंट तयार करू शकता.

सध्या या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये 8.2% दराने व्याजदर दिले जाते. या योजनेचे पैसे तीन महिन्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. या योजनेत तुम्ही कमीत कमी 1 हजार रुपयांनी जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची देखील रक्कम मिळवून देऊ शकता. या योजनेचा कालावधी तीन वर्षासाठी आहे. तुम्ही जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या सीनियर सिटीजन सेविंग स्कीमचे खाते उघडू शकता.

या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममधून (Senior Citizen Saving Scheme) तुम्हाला चांगला इन्कम सोर्स येईल. म्हणजे उतार वयात दर महिन्याच्या शेवटी तुमच्या हातात एक ठराविक रक्कम येईल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचे बजेट देखील ठरवता येईल. या योजनेमध्ये तुम्हाला टॅक्सची सवलत देखील उपलब्ध आहे. या योजनेच्या सेक्शन एनसीसी या कलम 80c अंतर्गत 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर सूट मिळते.

योजनेमध्ये खातं उघडण्यास पात्र कोण? | Senior Citizen Saving Scheme

  • ज्या व्यक्तीचे वय 60 वर्षे पूर्ण झाले असेल, तो व्यक्ती सीनियर सिटीजन सेविंग स्किमचे खाते उघडण्यास पात्र आहे.
  • या उमेदवारांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी आहे अशा रक्षा कर्मचाऱ्यांना देखील या योजनेमध्ये खाते उघडण्यास मान्यता आहे.
  • 55 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षापेक्षा कमी असलेले रिटायरमेंट कर्मचारी देखील या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात.

Hidden Sign Of Cholesterol | शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले की दिसतात ही लक्षणे; वेळीच घ्या उपचार

Hidden Sign Of Cholesterol

Hidden Sign Of Cholesterol | चांगले आयुष्य जगण्यासाठी आपले आरोग्य देखील तितकेच निरोगी असणे खूप गरजेचे असते. अनेकदा आपल्याला शरीरासंबंधी अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा आपण कॉलेस्ट्रॉल (Hidden Sign Of Cholesterol) हे शब्द ऐकलेले आहेत. साखर, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्याने आपल्याला अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. आजकाल अनेक असतील लोक आहेत, त्यांना लहान वयातही या समस्या उद्भवताना दिसत आहेत. लोकांचे जीवनशैली बदलली आहे. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत व्यायाम देखील ते वेळेवर करत नाही. आणि त्यामुळे या गोष्टींचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत आहे. म्हणूनच मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकाऱ्यांसारख्या समस्या उद्भवत आहे. वयाची तिशी पूर्ण होण्याआधीच तरुण वयात लोकांना कोलेस्ट्रॉल तसेच उच्च रक्तदाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

परंतु हे आजार होताना आपल्याला सुरुवातीला काही लक्षणे दिसत असतात. ती लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे असते. आणि डॉक्टरांकडून तपासणी केली असेल, त्यातील कोलेस्ट्रॉल ही अगदी सामान्य अशी गोष्ट आहे की, ज्याची लक्षणे सुरुवातीला काहीच दिसत नाही. परंतु पुढे जाऊन याचे खूप मोठ्या आजारात रूपांतर होते. आणि त्यानंतर आपल्याला समजते की, आपल्याला कोलेस्ट्रॉल झालेला आहे. कोलेस्ट्रॉल म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला एक प्रकारचा थर जमा होतो. त्यामुळे रक्ताचे संक्रमण होण्यास अडथळा निर्माण होतो. आणि आपल्या हृदयाला रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा देखील कमी प्रमाणात होतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.

म्हणूनच आपण वेळोवेळी आपल्या आरोग्याची चाचणी करून घेणे खूप गरजेचे असते. त्यामुळे कोलेस्ट्रोल वाढवले वाढले आहे की नाही, हे समजण्यासाठी सुरुवातीला काही नकळत अशी लक्षणे दिसतात. ती ओळखणे खूप गरजेचे आहे. आणि त्यानुसारच तुम्ही उपचार घ्यायला पाहिजे. आता ही लक्षणे नेमकी कोणती आहे की आपण जाणून घेणार आहोत.

कोलेस्ट्रॉल झाल्याचे लक्षणे | Hidden Sign Of Cholesterol

  • डोळ्याच्या बाजूला डाग दिसतात.
  • जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स 28 पेक्षा जास्त येतो.
  • थोडं जरी चाललो तरी आपल्याला दम लागतो आणि धाप लागते.
  • छाती काही वेळाने दुखते आणि आपल्याला अस्वस्थ वाटते.
  • यापैकी जर कोणतीही लक्षणे तुम्हाला दिसत असेल, तर तुम्ही लवकरच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि लवकरच औषध उपचार सुरू करा. तसेच तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत देखील बदल करा. जर सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच आपण ही लक्षणे ओळखून त्यावर उपचार घेतले, तर आपल्याला नक्कीच कोलेस्ट्रॉलवर विजय मिळवता येतो.

पुण्यात दुहेरी उड्डाणपूल व पुढच्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू

pune news

पुण्यातील मेट्रो पुणेकरांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. पुण्यातल्या ट्रॅफिकला कंटाळलेले पुणेकर स्वस्तात आणि वेगवान प्रवास म्हणून मेट्रोचा पर्याय निवडताना दिसत आहेत. अशातच आता मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उदघाटन कधी होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. एवढेच नाही तर कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील पुणे मेट्रोच्या विस्ताराला मंजुरी देण्यात आली असून हडपसर,खराडी आणि नाळ स्टॉप येथील मार्गावर देखील मेट्रोला मंजुरी मिळाली आहे. मेट्रोचा पुढचा टप्पा असलेल्या हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो बाबत एक अपडेट समोर आली आहे. दुहेरी उड्डाणपूल व शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे.

गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी मोजणी

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी आवश्‍यक कात्रज येथील मिळकतींची मोजणी मागील महिन्यात झाली. त्यापाठोपाठ आता गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी जमिनीच्या मोजणीचे कामदेखील पूर्ण झाले आहे. ५२ मिळकतींची मोजणी झाली असून या प्रक्रियेचा सविस्तर भूमापन अहवाल भूमी अभिलेख विभागाकडून महापालिकेला सादर केला जाणार आहे.

दुहेरी उड्डाणपूलसह मेट्रोचे काम सुरु

शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषी महाराज चौकात सध्या दुहेरी उड्डाणपूल व शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. दरम्यान, या रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. मेट्रो, उड्डाणपुलाच्या काम एकीकडे सुरू असतानाच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने विकासआराखड्यात असलेल्या गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणाचेही काम हाती घेतले आहे.

शिवाजीनगरकडून विद्यापीठाकडे जाताना धोत्रे पथापासून ते महावितरण कार्यालयापर्यंत तसेच विद्यापीठाकडून शिवाजीनगरकडे येताना नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) रिझर्व्ह बॅंकेच्या कृषी महाविद्यालयापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यापुढील रस्ता रुंदीकरणाचे काम विविध तांत्रिक कारणांमुळे अडखळले होते.

कधी सुरु होणार हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो

सध्या शहरात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 3 मार्गाचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गाचे किमान 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबरमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी, शिवाजीनगर-औंध विभागातील सार्वजनिक व शासकीय सुटीच्या दिवशी गर्डर टाकणे व इतर बांधकामांना परवानगी देऊन कामाला गती देण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. पुढील वर्षी पुण्यातील हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो सुरु (Pune Metro) होऊ शकते.

23 स्थानके असतील

पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी माणगाव ते हिंजवडी मार्गे शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग विकसित करत आहे. याचे 99 टक्के भूसंपादन पूर्ण आणि 70 टक्के काम पूर्ण झाल्याने, हा बहुप्रतीक्षित मार्ग एप्रिल 2025 पर्यंत खुला होईल असे दिसते. या मार्गाची एकूण लांबी 23.203 किमी असून, त्यावर 23 स्थानके असतील.

सणासुदीच्या काळात सोलापूर – पुणे मार्गावर धावणार विशेष रेल्वे ; पहा वेळापत्रक

solapur -pune railway

वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या गावी जात असतात. या काळात बस आणि रेल्वेला मोठी गर्दी असते. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात रेल्वेला प्राधान्य दिले जाते. रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता सणासुदीच्या काळात विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे खात्याकडून घेण्यात आला आहे. पुणे ते सोलापूर आणि सोलापूर ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

रेल्वे प्रशासन आगामी काळात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हडपसर ते लातूर दरम्यान विशेष गाडी चालवणार असल्याची माहिती आहे. या गाडीमुळे मराठवाड्यातील जनतेला जलद गतीने पुण्याला पोहोचता येईल. सोबतच ही गाडी सोलापूरकरांसाठी देखील अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

सध्याच्या वेळेनुसार पाहायला गेल्यास सोलापूर ते पुणे असा प्रवास करण्यासाठी खूप कमी रेल्वे गाड्या आहेत. जर सोलापूरकर कुर्डूवाडीला एसटीने गेले तर तिथून लातूर हडपसर(पुणे) दिवाळी विशेष एक्सप्रेसने पुण्याला सहज जाता येणं शक्य होणार आहे. तसेच सोलापूरकरांना या गाडीमुळे कुर्डूवाडी येथून लातूरला जाणं देखील सोयीचे होणार आहे

कसे असेल वेळापत्रक ?

लातूरहून हडपसरला जाणारी विशेष ट्रेन 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर यादरम्यान दर सोमवार, मंगळवार,बुधवार तसेच शुक्रवारी चालवली जाणार आहे. या काळामध्ये लातूर- हडपसर दिवाळी विशेष गाडी लातूर इथून सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी सोडली जाईल आणि कुर्डूवाडीला दुपारी साडेबारा वाजता येईल तर हडपसरला संध्याकाळी तीन चाळीस वाजता पोहोचणार आहे. तर हडपसर ते लातूर ही दिवाळी विशेष गाडी हडपसर इथून सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि ही गाडी कुर्डूवाडीला संध्याकाळी साडेसहा वाजता पोहोचणार आहे. तसेच लातूरला नऊ वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे.

‘या’ ठिकाणी घेणार थांबे

हडपसर ते लातूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष ट्रेनला हरंगुळ, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डूवाडी, जेऊर आणि दौंड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर दिवाळीच्या सणानिमित्त पुणे ते सोलापूर आणि सोलापूर ते पुणे असा प्रवास करणार असाल तर नक्की या विशेष गाडीचा वापर करू शकता.