Saturday, December 27, 2025
Home Blog Page 422

अनुभवता येणार समुद्रातील तटस्थ मुरुड जंजिरा किल्ल्याचं भव्य रूप ; ऑक्टोबर पासून पुन्हा खुला

murud janjira

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले एक प्रमुख पर्यटनस्थळ असून, येथे निसर्गरम्य दृश्ये, ऐतिहासिक वारसा, धार्मिक स्थळे, आणि किल्ले यांचा अनोखा संगम आहे. अनेक पर्यटक पावसाळ्यात अशा ठिकाणांना भेट देताना दिसतात. काही किल्ले जोरदार पडणाऱ्या पावसामुळे बंद ठेवण्यात येतात. शिवकालीन आणि अनेक इतिहासकालीन गोष्टींची साक्ष देणारे किल्ले आजही पर्यटकाना भारावून टाकतात . अशा ठिकाणी पर्यटक भेट देऊन आनंद लुटत असतात . पण बऱ्याच महिन्यापासून मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यास बंद ठेवण्यात आला होता . आता तो पुन्हा खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांची उत्सुकता वाढली आहे.

भक्कम बांधकाम अजूनही कायम

मुरुड जंजिरा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड शहराजवळ अरबी समुद्राच्या मध्यभागी वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला शिवकालीन काळातील एक अजिंक्य किल्ला मानला जातो, कारण आजपर्यंत हा किल्ला कधीही जिंकता आलेला नाही. सिद्दी लोकांनी बांधलेला असून , हा 22 एकरांमध्ये पसरलेला आहे. हा किल्ला समुद्राच्या लाटांमध्ये बुडालेला असूनही त्याचे भक्कम बांधकाम अजूनही कायम आहे. पावसाळ्यामुळे हा किल्ला 26 मे पासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता . आता तो पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

किल्याची वैशिष्ट्ये

या किल्याच्या बांधकामाची वैशिष्ट्ये म्हणजे समुद्राच्या मधोमध उभा असलेल्या या किल्ल्याने नेहमीच शत्रूंपासून संरक्षण केले आहे . मुरुड जंजिरा किल्ल्याला तीन प्रमुख दरवाजे आहेत, त्यापैकी मुख्य दरवाजा समुद्रकिनाऱ्यापासून नजरेस पडत नाही, हे या किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. किल्याच्या आत बऱ्याच जुन्या तोफा, राजवाडे, तलाव आणि पाण्याचे टाके आहेत. हा किल्ला इतिहासाची साक्ष देतो . येथील कळाल बांगडी नावाची तोफ प्रसिद्ध आहे.

देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी

मुरुड जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना राजपुरी गावातून शिडाच्या होडीने प्रवास करावा लागतो. हा किल्ला पाण्यात असल्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी पाहण्यास मिळते. पावसाळ्याच्या काळात या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंद असतो, परंतु इतर काळात हा किल्ला पर्यटकांसाठी खुला असतो आणि जलवाहतूक सुरू असते. हा किल्ला अतिशय लोकप्रिय असून , येथे इतिहासप्रेमी आणि समुद्रकिनाऱ्यावरील किल्याचा आनंद घेणारे आवर्जून भेट देतात. तसेच हा किल्ला मुंबईपासून साधारण 165 किलोमीटर अंतरावर असून , देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. पर्यटनाच्या दृष्टीने हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा असून अलिबागच्या आकर्षणांपैकी एक मानला जातो.

ऑक्टोबर महिन्यापासून पर्यटकांसाठी खुला

मे पासून बंद असलेला किल्ला ऑक्टोबर महिन्यात पुन्हा खुला झाल्याने, पर्यटकांना त्यांच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुम्हाला या काळात एखाद्या किल्ल्याला भेट द्यायची असल्यास मुरुड जंजिरा किल्ला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

पुणेकरांची होणार का वाहतूक कोंडीतून सुटका ? फडणवीसांनी सांगितला प्लॅन

pune traffic

राज्यातील दुसरे महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी रहदारी देखील वाढत असून गाड्यांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या पुण्यामध्ये निर्माण झाली असून पुणेकरांना तासंतास वाहतुकीत घालवावा लागतो आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्लान सांगितला. आज पुण्यात सात नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमादरम्यान बोलताना वाहतूक कोंडी विषयी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की,” पुण्यात वाहतूक खूप वाढली आहे. यामध्ये अधिकारी वाढवायचा निर्णय घेतला आहे. एक अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त देणार आहोत त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपयोग होईल असे ते म्हणाले.

याच कार्यक्रमात पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “आजच आपण सायबर सेंटर सुरू करत आहोत साडेसातशे कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा केला आहे. अनेकदा पैसे जातात येत नाहीत ते म्हणालेत मागच्या काळात आपण गुगल सोबत एक करार केला आहे. त्यात आता एआय उपयोग करायचा. यामुळे पोलिसांचे काम सोपे होणार आहे. ट्रॅफिक साठी याचा उपयोग होणार आहे त्यात सगळं शक्य आहे ड्रोनचाही वापर केला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

देशात नवीन तीन कायदे आणले आहेत. पोलिसांच्या वर जास्त जबाबदारी टाकली आहे 2014 नंतर आपण निर्णय घेतला की टेक्निकल पुरावे गोळा करून गुन्हे सिद्ध करण्यास मदत होत आहे. माझ्या काळात चाळीस हजार पोलीस भरती केली आहे. कमी संख्या होती गुन्हे घडताना दिसत आहेत गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तोवर गुन्हे घडणार. त्यांना शिक्षा होते का त्याची उकल होते का ? लोकांना सेफ वाटतं का ? हे महत्त्वाचं आहे असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

Ola इलेक्ट्रिकची जबरदस्त ऑफर ; केवळ 50 हजारांत स्कूटर घरी घेऊन जाण्याची संधी

OLa

देशात पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, अशा स्थितीत अनेकांचा कौल इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे आहे. तुम्ही देखील इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करू इच्छिता का ? मात्र बजेटची चिंता आहे ? पण काळजी करू नका ओला इलेक्ट्रिकने धमाकेदार ऑफर सहा कमी किमतीत स्कुटर खरेदीची संधी दिली आहे. त्यामुळे या सणासुदीला तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणू शकता.

BOSS 72-hour Rush

ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाइनअपवर आकर्षक सवलतींसह “BOSS 72-hour Rush” सेल सुरू केला आहे. हा सेल Ola चा आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल मानला जातो आहे. याचा कालावधी 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत आहे.या विशेष सेलमध्ये कंपनी आपल्या स्कूटरवर ₹ 25,000 पर्यंत सूट देत आहे.

या मर्यादित वेळेच्या सेलमध्ये ओलाच्या S1 मॉडेल्सवर अनेक फायदे दिले जात आहेत. S1 याशिवाय, ग्राहकांना इतर S1 मॉडेल्सवर ₹ 25,000 पर्यंत सूट दिली जात आहे. फ्लॅगशिप S1 Pro खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ₹5,000 चा एक्स्चेंज बोनस देखील मिळेल, ज्यामुळे ते प्रीमियम स्कूटर मार्केटमध्ये एक स्पर्धात्मक पर्याय बनले आहे.

ग्राहकांसाठी अतिरिक्त फायदे

“BOSS 72 Hour Rush” विक्रीदरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ₹7,000 किमतीची 8 वर्षे/80,000 किमी बॅटरीची वॉरंटी, ₹6,000 किमतीचे मोफत MoveOS+ सॉफ्टवेअर अपग्रेड, यासह काही विशेष फायदे मिळतील. ₹7,000 पर्यंत चार्जिंग क्रेडिट्स समाविष्ट आहेत. हे फायदे संभाव्य खरेदीदारांसाठी ही डील आणखी आकर्षक बनवतात.

Ola च्या S1 स्कूटरची श्रेणी आणि किमती

ओलाच्या S1 स्कूटर रेंजमध्ये ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. S1 Pro आणि S1 Air सारख्या प्रीमियम मॉडेल्सची किंमत अनुक्रमे ₹ 1,34,999 आणि ₹ 1,07,499 आहे. तर , बजेट-फ्रेंडली S1 X सीरीज 2kWh, 3kWh, आणि 4kWh वेरिएंट्स मध्ये उपलब्ध आहेत . ज्याच्या किंमती अनुक्रमे ₹74,999, ₹87,999 आणि ₹1,01,999 आहेत.

घर घेताना सावध राहा ! मुंबई, ठाण्यासह MMR झोनमधील 314 गृहप्रकल्प दिवाळखोरीत

maharera

घर बघावे बांधून ! अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. सध्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी तर घर घेणे म्हणजे तारेवरची कसरत होऊन बसले आहे असे असताना आता रिअल इस्टेट क्षेत्रातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील प्रमुख शहरातील 314 गृहप्रकल्प दिवाळखोरीत निघाले आहेत.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनरच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार राज्यातल्या 314 महारेरा नोंदणीकृत निवासी प्रकल्पांविरोधात दिवाळखोरीची कार्यवाही सुरू आहे. महारेरा ने केलेल्या तपासणीमध्ये राज्यातल्या 314 प्रकल्प दिवाळीखोरीच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे या प्रकल्पात विरोधात वित्तीय संस्था बँक आणि वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांनी राष्ट्रीय कायदा न्याय अधिकरणाकडे धाव घेतली आहे. या प्रकल्पाच्या विरोध दिवाळखोरीची कारवाई सुरू आहे. हे प्रकल्प कधीही दिवाळीखोर घोषित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पांमध्ये घर खरेदी करताना अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागू शकतो.

कुठे पहाल यादी?

या प्रकल्पांमध्ये सर्वाधिक 236 प्रकल्प मुंबई महानगर क्षेत्रात आहेत. या प्रकल्पापैकी काम सुरू असलेल्या 56 प्रकल्पांमध्ये 34 टक्क्यांच्या पेक्षा जास्त घरांची नोंदणी झाली आहे. तर 194 गृह प्रकल्प हे लास्ट प्रोजेक्ट असून त्यामध्ये 61 टक्क्यांपेक्षा जास्त घर रजिस्ट्रेशन झाली आहेत. 64 प्रकल्प हे पूर्ण झालेले असून त्यातल्या 84% घरांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. ही यादी महारेराच्या वेबसाईटवर जाहीर केली आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर ही यादी एकदा नक्की तपासून पहा अन्यथा फसवणूक होण्याची मोठी शक्यता आहे.

काय सांगते आकडेवारी

उपलब्ध आकडेवारीनुसार मुंबई उपनगरातील 88 पैकी 51, पुण्यातील 52 पैकी 45, तर ठाण्यातील 106 पैकी 52, पालघर मधील 18 पैकी 16 गृह निर्माण प्रकल्प हे दिवाळखोरी प्रक्रिया अंतर्गत नोंदवले गेले आहेत. याशिवाय दिवाळखोरी प्रक्रियेत असलेल्या मुंबईतील नऊ शहरांपैकी दोन सर्वसमावेशक प्रकल्पांमध्ये 68% सदनिका नाशिक मधील तीन समावेशक प्रकल्पांमध्ये 34% आणि रायगड मधील 15 पैकी 13 प्रकल्पांमध्ये 32 टक्के सदनिकांची नोंदणी झाली आहे.

याबाबत माहिती देताना महारेराचे अध्यक्ष मनोज सैनिक यांनी सांगितले की, ” महारेरा घर खरेदीदारांची गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे महारेराला कर्जबाजारी आणि दिवाळीखोर प्रकल्पांची माहिती मिळते. महरेरा ग्राहकांच्या माहितीसाठी ती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करते 314 दिवाळखोर प्रकल्पांची ही यादी त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. गेल्यावेळी ही अशा दिवाळीखोर प्रकल्पांची जिल्हा निहाय यादी एप्रिलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामुळे चांगली मदत मिळाली ही बाब खुद्द अनेकांनी महारेराला सांगितले. त्यामुळे महारेरा वेबसाईटवरील यादी पाहूनच घर खरेदी करण्याचा आवाहन करण्यात येत आहे. अशी प्रतिक्रिया अध्यक्ष मनोज सैनिक यांनी दिली आहे

नवी मुंबई विमानतळावर हवाई दलाच्या IAF C-295 चे ट्रायल लँडिंग ; कधी सुरु होणार विमानतळ ?

navi mumbai airport

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईच्या कनेक्टिव्हिटी मध्ये सुधारणा होणार असून मुंबईतल्या मुख्य विमानतळावरील भार हलका होणार आहे. कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्यामुळे लवकरच हे विमानतळ सुरु होण्याची आशा आहे.

भारतीय हवाई दलाच्या C-295 विमानाने नवी मुंबई येथील साइटवर पहिले लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण केले. या चाचणीत सुखोई-३० फायटर जेटचा फ्लायपास्ट होता. आज (11) 12.15 वाजता झालेल्या लँडिंग चाचणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक खासदार आणि विधानसभेचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मार्च 2025 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होण्याची अपेक्षा

अदानी विमानतळ आणि CIDC यांनी संयुक्तपणे बांधलेल्या विमानतळाचा पहिला टप्पा मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. नव्याने पूर्ण झालेल्या 3,700-मीटर धावपट्टीवर विमानाने खाली उतरले, जे विमानतळाच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखले जाते. अधिकाऱ्यांनी कळवले की टर्मिनल इमारतीचे 75% बांधकाम आधीच झाले आहे.

याबाबत माहिती देताना प्रकल्पाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “विमानतळ मार्च 2025 पर्यंत देशांतर्गत उड्डाणांसाठी पूर्णपणे कार्यान्वित व्हायला हवे, पुढील पाच ते सहा महिन्यांत आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे,” असे प्रकल्पाच्या प्रवक्त्याने सांगितले.

असतील अत्याधुनिक सोयीसुविधा

अत्याधुनिक सुविधा, 1,200 हेक्टरमध्ये पसरलेली, चार टर्मिनल आणि दोन धावपट्टी सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेली आहे. एकदा पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर, दरवर्षी 90 दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याची, 350 विमानांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची आणि 2.6 दशलक्ष टन माल हाताळण्याची क्षमता असेल. टर्मिनल 1 च्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रवासी क्षमता 20 दशलक्ष आणि कार्गो हाताळणी क्षमता 0.8 दशलक्ष टन असण्याचा अंदाज आहे.

‘हा’ व्यक्ती असणार रतन टाटा यांचा वारसदार; सांभाळणार टाटा ट्रस्टचे अध्यक्षपद

Tata Trust

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशाचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यानंतर संपूर्ण देश दुःखात बुडालेला होता. अशातच आता रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आलेला आहे. रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. नोएल हे पूर्वीच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि टाटा ट्रस्ट मध्ये विश्वस्त होते. या टाटा समूहाच्या टाटा सन्समध्ये जवळपास 66 टक्के एवढी भागीदारी आहे. आता संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. हे रतन टाटा यांचे बंधू असले, तरी त्यांची कार्यशैली ही रतन टाटा पेक्षा खूप वेगळी आहे. प्रसिद्धीपासून ते नेहमीच दूर राहिले आहे. आता इथून पुढे रतन टाटा यांचा वारसा तेच चालवणार आहे. बुधवारी रतन टाटा यांचे निधन झाले. तसेच गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि त्यानंतर या नवीन अध्यक्षाची निवड करण्यात आलेली आहे.

टाटा आडनाव असलेली व्यक्ती या टाटा समूहाचा अध्यक्ष असावी, अशी असा पारसी समाजाचा आग्रह होता. तर रतन टाटा यांनी मात्र टाटा आडनाव असलेली व्यक्ती या पदावर असेल असे नाही. असे यापूर्वी देखील सांगितलेले होते. नोएल टाटा या अगोदरच टाटा समूहाचे संबंधित कार्यरत होते. त्यामुळे या पदावर त्यांचीच निवड होणार. हे जवळपास निश्चित होते. सध्या टाटा ट्रस्टमध्ये दोन उपाध्यक्ष आहे. यामध्ये टीव्ही एस के वेणू श्रीनिवासम आणि माजी संरक्षण सचिव विजयसिंह यांचा समावेश आहे हे दोघेही 2018 पासून कार्यरत आहे.

टाटा समूहात नवीन व्यक्तीची संचालक पदी निवड झालेली आहे. आणि ही व्यक्ती सर्वानुमते योग्य असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात लग्न केले नाही. त्यामुळे त्यांचा हा कारभार सांभाळण्यासाठी त्यांची मुले किंवा त्यांची पत्नी नसल्याने पर्यायाने त्यांच्या बंधूचीच यासाठी निवड होईल, अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. आणि त्यांचा अपेक्षेप्रमाणे इथून पुढे टाटा समूहाचा डोलारा त्यांचे बंधू नोएल सांभाळणार आहेत.

Ratan Tata Documentry | रतन टाटा यांच्या आयुष्यावर येणार चित्रपट; झी स्टुडिओने केली मोठी घोषणा

Ratan Tata Documentry

Ratan Tata Documentry | सध्या संपूर्ण देशभरात दुःखाची लाट कोसळली आहे.कारण काल म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी त्यांचे निधन झालेले आहे. रतन टाटा यांचे जीवन एक प्रेरणादायी होते. त्यांनी समाजकार्य केले. त्यामुळे आता जी इंटरटेनमेंटचे सीईओ रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक चित्रपट काढण्याची घोषणा केलेली आहे. रतन टाटांची कार्य हे भारतातील येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. त्याची दूरदृष्टी कार्य नेतृत्व हे पुढच्या पिढ्यांना समजावे. त्यासाठी हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेतील रतन टाटा यांचे योगदान तसेच तसेच जगाला केलेल्या त्यांनी सकारात्मक प्रभाव या गोष्टींची जाणीव या चित्रपटातून होईल.

झीने या चित्रपटाविषयी माहिती दिलेली आहे. त्यावेळी गोयंका म्हणाली की, “रतन टाटा (Ratan Tata Documentry) यांचे संपूर्ण आयुष्यच उल्लेखनीय होते. त्यांचे काम हे केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे होते. विशेषता यातून तरुणांना खूप जास्त प्रेरणा मिळाली. या उद्देशाने त्यांच्यावर चित्रपट करण्याचा प्रस्ताव आम्ही समोर ठेवलेला आहे” गोपालन म्हणाले की, “टाटा यांची उणीव भारताला भासणार आहेत. टाटाचे सर्व उद्योगांचे कर्मचारी सध्या दुःखात आहे. आम्हाला वाटते की, हा चित्रपट संपूर्ण जगावर सकारात्मक प्रभाव टाकेल. त्यांच्या कथेला जिवंत करण्याचा प्रयत्न आम्ही करू. प्रेक्षकांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

यानंतर चीफ बिझनेस ऑफिसर उमेश बंसल यांनी या चित्रपटाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, “रतन त्यांचा टाटा यांच्या जीवनावरील डॉक्युमेंटरी चित्रपटावर काम करताना आम्हाला सन्मानाने अभिमान वाटत आहे. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा वारसा मोठ्या पडद्यावर दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. असे आम्ही समजतो. या चित्रपटाचे चित्रकरण योग्य ताकतीने करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही.”

त्यानंतर अजि मीडियाचे सीईओ करण अभिषेक सिंग म्हणाले की, “आम्ही टा टा यांच्या कुटुंबापुढे हा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या होकाराच्या आम्ही वाट पाहत आहोत. त्यांच्या कुटुंबीयांनी होकार दिला की, आम्ही या चित्रपटाच्या शूटिंग सुरू करणार आहोत. या चित्रपटातून मिळणारा नफा सामाजिक कारणांसाठी दान करण्याचे आणि गरजूंना मदत करण्याची योजना ही स्टुडिओ आणि आखलेली आहे. तसेच हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी देखील सुरू केलेली आहे. हा चित्रपट देशातील 90 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदेश प्रदर्शित करण्याचा जी स्टुडिओचा प्रयत्न आहे.”

Bharat Forge | भारत फोर्ज बारामतीत उभारणार मेगाप्रकल्प; होणार 1200 रोजगार निर्मिती

Bharat Forge

Bharat Forge | सध्या महाराष्ट्रात अनेक विविध नवीन प्रोजेक्ट होत आहेत. ज्याचा फायदा भविष्यात जाऊन महाराष्ट्रातील सगळ्यात लोकांना होणार आहे. आणि त्यातून रोजगार निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. फोर्जिंग कंपनी ही जगातील एक सर्वात मोठी कंपनी आहे. अशातच आता भारत फोर्स ही कंपनी बारामतीमध्ये 50 एकर जागेवर मेगा साइट उभारली जाणार आहे. कल्याण टेक्नो फोर्जच्या या मेगा साईटच्या प्रकल्पासाठी जवळपास 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. आणि यातून नागरिकांना रोजगार निर्मिती देखील होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या प्रकल्पातून जवळपास 1200 रोजगार निर्मिती होणार आहे.

या तव्या प्रकल्पातून ॲल्युमिनियम फोर्जिंग, सुटे भाग, स्टील फोर्जिंग, असेंबली आणि सबअसेंबली, इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांसाठी गिअर मॅन्युफॅक्चरिंग तयार होणार आहे. त्यामुळे पुढे जाऊन महाराष्ट्राची प्रगती देखील होईल आणि महाराष्ट्रात रोजगार निर्मिती देखील होणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 50 एकर जागेच्या मागणीला उदय सामान त्यांनी मान्यता दिलेली आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

या भारत फोर्जच्या (Bharat Forge) वतीने जगभरात 12 ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. आता हा नव्याने उभारण्यात आलेला प्रकल्प बारामतीच्या औद्योगिक विकासाला चालना देणार आहे. आणि बारामतीत खूप मोठी रोजगार निर्मिती होणार आहे.

दिल्ली-मुंबई प्रवास केवळ 12 तासांत ; या महिन्यापासून सुरु होणार वाहतूक

delhi -mumbai highway

फरिदाबाद येथील बायपासवर निर्माणाधीन दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. फक्त लोड टेस्टिंगचे काम बाकी आहे. जे या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर ते वाहनचालकांसाठी खुले केले जाईल.

जिल्ह्याच्या हद्दीतील या एक्स्प्रेस वेच्या बांधकामाची अंतिम मुदत सप्टेंबर होती, परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही. त्याची एकूण लांबी 1350 किलोमीटर आहे. त्यामुळे दिल्ली ते मुंबई 12 तासात प्रवास करणे शक्य होणार आहे. 12 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या सोहना-दौसा विभागाचे उद्घाटन केले.

डीएनडी उड्डाणपुलापासून कालिंदी कुंजपर्यंतच्या भागाचे काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे दिल्लीच्या DND फ्लायओव्हरपासून सुरू होत आहे. सेक्टर-62 च्या पुढे द्रुतगती मार्ग, साहुपुरा वळण तयार आहे, वाहतूकही सुरू झाली आहे. आता डीएनडी उड्डाणपुलापासून साहूपुरा वळणापर्यंत एक्स्प्रेस वेचे काम सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालिंदी कुंज ते सेक्टर-62 पर्यंतच्या सेक्शनचे काम पूर्ण झाले आहे. ठिकठिकाणी अंडरपास बांधण्यात आले आहेत. या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते बांधण्यात आले आहेत. ऐतमादपूर आणि बरौलीसमोर उन्नत रस्ता तयार करण्यात आला आहे. सर्व्हिस रोडचे कामही पूर्ण झाले आहे. उजवीकडे व डावीकडे लोखंडी रेलिंग बसविण्यात आले आहे.

एंट्री आणि एक्झिट पॉइंट

सेक्टर-३० ऐतमादपूर, सेक्टर-२८, बुसेलवा कॉलनी, खेडीपुल, बीपीटीपी पुलाजवळ, सेक्टर-२, आयएमटीजवळ सेक्टर-२ हे बायपासवर एंट्री आणि एक्झिट पॉइंट बनले आहेत. या सर्व ठिकाणी अंडरपास बांधण्यात आले आहेत. बांधकाम कंपनीने अंडरपासच्या आजूबाजूला एंट्री आणि एक्झिट पॉइंट बनवले आहेत.

12 लेनचा मार्ग

एक्स्प्रेस वे एकूण 12 लेनचा बनवण्यात आला आहे. मुख्य कॅरेजवे सहा लेनचा आहे तर उजवा आणि डावा सर्व्हिस रोडही प्रत्येकी तीन लेनचा आहे. या सव्र्हिस लेनद्वारे वाहनचालकांना मुख्य वाहतूक मार्गाचा वापर करता येणार आहे.

Dussehra 2024 | दसऱ्याला शस्त्रपूजन का केले जाते ? जाणून घ्या इतिहास आणि यंदाचा शुभमुहूर्त

Dusshera 2024

Dussehra 2024 | आपल्या भारतामध्ये प्रत्येक सण हा मोठ्या उत्सवाने आणि आनंदाने साजरा केला जातो. कारण आपल्या प्रत्येक सणामागे एक इतिहास आणि संस्कृती दडलेली असते. आणि तीच संस्कृती पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी आणि आपला वारसा पुढच्या पिढीच्या हातात देण्यासाठी प्रत्येक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हे नवरात्रीचे सेलिब्रेशन चालू आहे. आणि दसरा (Dussehra 2024) देखील आता येणार आहे. हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्याच्या शुल्क प्रतीपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. आणि दशमीच्या दिवशी दसरा (Dussehra 2024) साजरा केला जातो. म्हणूनच त्याला विजयादशमी असे म्हणतात.

पुराणानुसार या दिवशी श्री राम प्रभूंनी लंकेचा राजा रावणाचा वध केला होता. त्याचप्रमाणे दुर्गा मातेने महिषासुरा या राक्षसाचा देखील वध केला होता. म्हणजेच विजय मिळवला होता. म्हणूनच या दिवशी दसरा (Dussehra 2024) साजरा केला जातो. हा दुसरा संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी श्री रामप्रभू आणि दुर्गा मातेने त्यांच्या शस्त्रांचा वापर करून या वाईट गोष्टींवर विजय मिळवला होता. त्यामुळे असे म्हणतात की, या दिवशी घरातील शस्त्रांची पूजा केली जाते. तसेच आपट्याची पाने देऊन थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेतले जातात. त्याचप्रमाणे या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम देखील केला जातो. सगळ्या वाईट गोष्टींवर मात करून चांगल्या गोष्टी कशा आत्मसात करायच्या. या गोष्टी आपल्याला दसऱ्याच्या निमित्ताने शिकता येतात. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी पुस्तके तसेच आपल्याला ज्ञान देणाऱ्या सगळ्या गोष्टींचे पूजन करून आपल्या ज्ञानामध्ये अशीच वृद्धी व्हावी असे देखील म्हटले जाते. यावर्षी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आलेले आहे. त्यामुळे दसरा (Dussehra 2024) नक्की कधी साजरा करायचा? याबाबत अनेक लोकांमध्ये गोंधळ चालून झालेला आहे. परंतु आता दसरा या वर्षी कधी साजरा केला जातो? आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे? याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

दसऱ्याचा शुभमुहूर्त कोणता ? | Dussehra 2024

हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील दशमी ही 12 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. त्यामुळे यावर्षी 12 ऑक्टोबरला दसरा होणार आहे. सकाळी 10 वाजून 59 मिनिटांपासून ही दशमी सुरू होणार आहे. तर 13 ऑक्टोबर सकाळी 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत ही दशमी असणार आहे. 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजून 30 मिनिटे ते 2 वाजून 49 मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे. तर पूजेचा मुहूर्त हा 1 वाजून 17 मिनिटांपासून ते 3 वाजून 35 मिनिटापर्यंत आहे. या काळात तुम्ही पूजा देखील करू शकता.

दसऱ्याला शस्त्रपूजन का केले जाते?

दसरा (Dussehra 2024) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी अनेक चांगली कामे केली जातात. पूर्वी क्षत्रिय युद्धवर जाण्यापूर्वी दसऱ्याची वाट पाहत होते. कारण या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता. तसेच दुर्गा मातेने देखील महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी जर युद्धाला सुरुवात केली, तर लोकांना विजय नक्कीच मिळतो. असे मानले जाते. त्यामुळे अनेक लोक पूर्वी हे राजे दसऱ्यानंतर युद्ध करायला जात आहे. आणि त्यामुळेच युद्धावर जाण्यापूर्वी या दिवशी लोक त्यांच्या शस्त्रांचे पूजन करत होते. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याची प्रथा पडलेली आहे.

दसऱ्याच्या दिवशी काय करावे ? | Dussehra 2024

दसऱ्याच्या दिवशी विशेषतः श्रीराम प्रभूंची पूजा केली जाते. तसेच घरी राम दरबाराची स्थापना केली जाते. हे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच दसऱ्याच्या दिवशी सुंदर कांड केले जाते आणि रामचरितमानसाचे पठण देखील केले जाते. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी हनुमानजी आणि शनि देवाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे जीवनातील अनेक त्रासांपासून तुम्हाला मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी 7 लवंगा , 7 कापूर आणि 5 तमालपत्र एकत्र जाळून त्याचा घरभर दूर पसरवा. जेणेकरून तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल. तसेच विजयादशमीच्या दिवशी जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावला. आणि त्यातील तीळ टाकले तर ते देखील खूप चांगले असते.