Friday, December 26, 2025
Home Blog Page 429

How To Check Purity Of Gold | सोन्याची शुद्धता कशी ओळखावी ? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

How To Check Purity Of Gold

How To Check Purity Of Gold | भारतातील स्त्रियांना तसेच पुरुषांना सोन्याचे दागिने खूप आवडतात. अनेक लोक हे केवळ सोन्याचे दागिने घालतात त्याचप्रमाणे अनेक सोन्याच्या वस्तू देखील तयार करून घेतात. भारतामध्ये सोने हा धातू मोठ्या प्रमाणात विकला जातो. परंतु अनेकवेळा या 24 कॅरेट सोन्याच्या नावाखाली फसवणूक होत असतात. अनेकजण शुद्ध सोन्या ऐवजी कमी दर्जाचे सोन्याचे दागिने बनवतात. आणि हॉलमार्क असलेला हा दागिना खऱ्या सोन्यापासून तयार केला जातो असे समजले जाते. परंतु आजकाल बनावट हॉलमार्क असलेले दागिने विकले जाण्याच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आज आपण शुद्ध सोने कसे ओळखावे आणि सोन्याचे दागिने कधी कधी करताना ते कसे तपासावे हे जाणून घेणार आहोत.

ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे बीआयएस संस्थेचे हॉलमार्क असलेले दागिने ओळखण्यात कोणत्याही प्रकारची गडबड होत नाही. असे गृहीत धरले जाते. नियमानुसार सोन्याचे दागिने विकताना बीआयएसने दिलेल्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे असते. 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकण्याचा नियम आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादा ज्वेलरी 20 किंवा 21 कॅरेटचे सोने देत असेल, तर याचा अर्थ तुमच्यासोबत मोठी फसवणूक होत आहे. सोन्यामध्ये 24 कॅरेटचे सोने सर्वाधिक शुद्ध मानले जाते. परंतु 24 कॅरेट सोन्याचे दागिने तयार केले जात नाही. कारण हे सोने अत्यंत मऊ असते. आणि तुटण्यास सोपे असते. परंतु तुम्ही जर 24 कॅरेटचे सोने विकत घेत असाल, तर तुमची फसवणूक होत आहे हे तुम्ही गृहीत धरा.

हॉलमार्कचे चिन्ह कसे ओळखावे? | How To Check Purity Of Gold

सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावरील हॉलमार्कचे चिन्ह तपासणे खूप गरजेचे असते. हे चिन्ह त्रिकोणी आकाराचे असते. तसेच यावर सहा अंकांचा हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. तसेच काही इंग्रजी अक्षरे आणि अंक देखील आढळतात. प्रत्येक दागिन्यांचा हा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर हा वेगळा असतो. कोणत्याही दोन दागिन्यांचा नंबर सारखा असू शकत नाही. तसेच 22 कॅरेट सोन्यावर 916, 18 कॅरेट सोन्यावर 750 तर 14 कॅरेट सोन्यावर 585 हा क्रमांक लिहिलेला असतो. त्यामुळे या अंकांवरून तुम्ही दागिना नक्की किती कॅरेट्स आहे हे ओळखू शकता.

सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?

आज-काल सोन्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. त्यामुळे आता हा सोन्याचा भाव नक्की कसा ठरवला जातो हे आपण जाणून घेणार आहोत. 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट आणि 14 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा वेगवेगळा असतो. 22 कॅरेट दागिन्यांमध्ये 91.66% सोने असते. त्याचप्रमाणे 18% सोन्यामध्ये 75 टक्के सोने असते. तर 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.1% सोने असते. त्यानुसार आता बाजारात काय भाव चालू आहे यानुसार या सोन्याची किंमत ठरवली जाते.

या कारणामुळे गुजरातमधील पुरुष साडी नेसून खेळतात गरबा; 200 वर्षांपासून प्रथा चालू

Navratri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवरात्र उत्सव आपल्या भारतातील सगळ्यात मोठा आणि पवित्र सण मानला जातो. या नऊ दिवसांमध्ये दुर्गामाता ही पृथ्वीवर अवतरते असे म्हटले जाते. आणि तिच्या भक्तांच्या इच्छा देखील पूर्ण करत असते. या घटस्थापने निमित्त तसेच नवरात्रात वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. आणि त्यानुसार लोक भक्ती भावाने पूजा करत असतात. परंतु अहमदाबादच्या एका शहरात एक अनोखी प्रथा पाळली जाते. ती म्हणजे साधू माता नी पोल मध्ये दरवर्षी नवरात्रीच्या आठव्या दिवशी 200 वर्षे जुनी प्रथा येथे पाळली जाते. या बोराट समाजातील पुरुष या दिवशी साडी नेसतात. आणि गरबा खेळतात. असे म्हटले जाते की, पूर्वी या समाजाला एक शाप मिळाला होता. आणि त्या शापामुळे ही प्रथा पाळली जाते.

ही परंपरा दोनशे वर्षांपासून चालू झालेली आहे. साधूबेन नावाच्या एका महिलेने बोराट समाजातील पुरुषाकडे मुघल सरदारापासून सुरक्षा मागितली होती. त्यावेळी हा मुगल सरकार या महिलेल्या काहीतरी करण्याच्या विचारात होता. मात्र त्यावेळी समाजातील पुरुष त्या स्त्रीला वाचवू शकले नाही. आणि ती स्त्री तिच्या मुलांपासून दूर गेली. या सगळ्या परिस्थितीमुळे त्या स्त्रीला खूप दुःख झाले आणि तिने पुरुषांना शाप दिला की, त्यांच्या वंशाच्या सती होण्याआधीच मृत्यू होतील. साधू माता नी पोर या ठिकाणी 1000 पेक्षा जास्त लोक राहतात त्यामुळे अष्टमीच्या दिवशी हे संपूर्ण गाव एकत्र येते.

या ठिकाणी खूप जास्त संख्येने पूर्वी जमतात पुरुष साडी नेसून गरब्याच्या तालावर नाचतात. हा एक सांस्कृतिक लोकनृत्याचा प्रकार आहे. साधू माताच्या सन्मानासाठी हा शाप मिटवण्यासाठी एक मंदिर देखील बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी या समाजाचे लोक साडी नेसतात आणि गरबा खेळतात. परंतु त्यांच्यासाठी एक शाप असलेली ही परंपरा पर्यटकांना मात्र खूप जास्त आकर्षित करते आणि पुरुषांचा हा गरबा पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी होते.

ही प्रथा केवळ शाप मिटवण्यासाठीच केली जात नाही, तर येथील लोक देवीची भक्ती भावाने एका अनोख्या पद्धतीने पूजा करतात. ही देवी या समाजाच्या गेले कित्येक वर्षापासून सुरक्षा करते. आणि त्यांना आशीर्वाद देखील देत असते. नवरात्रीच्या दिवसात हे मंदिर एक भक्ती स्थळ बनलेले असते. येथील रंगीत साड्या सजलेले प्रत्येक वयाचे पुरुष सहभागी होतात. आणि त्यांना पाहण्यासाठी लाखो पर्यटकांची गर्दी जमते.

मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आज पासून प्रवाशांसाठी खुली ; कसे आहे वेळापत्रक ?

mumbai metro 3 timetable

मुंबईकरांसाठी आता एक खुशखबर आहे. तुम्हाला जर ऑफिस च्या कामासाठी लोकलचे धक्के खात जावे लागत असेल तर त्यातून तुमची सुटका होणार आहे. कारण मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या कुलाबा ते आरे मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन शनिवारी म्हणजेच दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून त्यांनी या या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला . तर आजपासून (७) ही मेट्रोमार्गिका नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन MMRC यांनी सांगितली आहे.

मुंबई मेट्रोच्या उदघाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत लिहिले की “मुंबईतील मेट्रोचे जाळे विस्तारले आहे, आणि नागरिकांच्या सहज जीवनाला चालना मिळणार आहे! मुंबई मेट्रो लाइन 3 च्या पहिल्या टप्प्यांतर्गत आरे JVLR ते BKC मार्गाचे उद्घाटन केल्याबद्दल मुंबईकरांचे अभिनंदन,” अशी पोस्ट मोदींनी उद्घाटनानंतर केली होती.

33.5 किमी लांबीची भूमिगत मेट्रो लाइन

मुंबई मेट्रो 3, ज्याला कुलाबा-वांद्रे-सीप्झ लाईन म्हणूनही ओळखले जाते, ही 33.5 किमी लांबीची भूमिगत मेट्रो लाइन आहे – यापैकी फक्त 12.44 किमीचा भाग लोकांसाठी खुला केला जाईल. हे ₹32,000 कोटींहून अधिक खर्च करून विकसित केले गेले आहे.

मेट्रो मार्गामध्ये 10 स्थानके

या मेट्रो मार्गामध्ये 10 स्थानके आहेत आरे, मरोळ नाका, CSMIA T1 (टर्मिनल 1), MIDC, SEEPZ, सहार रोड, CSMIA T2 (टर्मिनल 2), विद्यानगरी, धारावी आणि BKC. यातील नऊ स्थानके भूमिगत आहेत, तर आरे स्थानक हे या खंडातील एकमेव दर्जाचे (ग्राउंड) स्टेशन आहे.

85 किमी प्रतितास

एमएमआरसीच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर एकूण ९६ रोजच्या फेऱ्या केल्या जातील. प्रत्येक मेट्रो ट्रेनमध्ये 2,000 प्रवासी बसू शकतात. 35 किमी प्रतितास या सरासरी धावण्याच्या गतीसह, लाईन कमाल 85 किमी प्रतितास वेगाने कार्य करण्यासाठी सेट आहे.

किती असेल भाडे ?

मुंबई मेट्रो लाइन 3 आठवड्याच्या दिवशी सकाळी 6:30 ते रात्री 10:30 पर्यंत आणि आठवड्याच्या शेवटी सकाळी 8:30 ते रात्री 10:30 पर्यंत काम करेल. भाडे ₹10 ते ₹50 पर्यंत असेल. प्रवासी ॲपद्वारे किंवा प्रत्यक्ष काउंटरवर मेट्रोची तिकिटे खरेदी करू शकतात. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड देखील पुढील महिन्यापर्यंत शहरातील सर्व मेट्रो मार्गांवर वैध असेल.

मुंबईकरांचा प्रवास होणार सुकर ; लोकलच्या फेऱ्या वाढणार, आता12 नाही 15 डब्यांची लोकल

mumbai local railway

मुंबई लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. पण मुंबई लोकलचा प्रवास म्हणजे काही सोपं काम नाही. कारण लोकलची गर्दी… नवख्या माणसाला तर लोकलने प्रवास म्हणजे नको रे बाबा ! असे होईल मात्र लोकलच्या प्रवाशांचा प्रवास हा सुखकर व्हावा त्यांना कोणताही अडथळा प्रवास करताना येऊ नये यासाठी प्रशासनाकडून सुद्धा प्रयत्न केले जात आहेत.

मध्य रेल्वेने मागच्या काही दिवसांमध्ये वेळापत्रकांमध्ये बदल केला आहे आणि हा बदल 5 ऑक्टोबर पासून करण्यात आला आहे. आता पश्चिम रेल्वेने देखील नवीन वेळापत्रक तयार केलं असून यानुसार पश्चिम रेल्वेवर 12 फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सध्या सुरू असलेल्या सहा फेऱ्यांना पुढे सुरू ठेवण्यात आल्या आहेत तर 10 लोकलचं अपडेशन करण्यात येणार असून 12 डब्यांच्या ऐवजी आता लोकल 15 डबे जोडले जाणार आहेत. लोकलच्या प्रवाशांसाठी ही बातमी अधिक सुखदायक ठरणार आहे. कारण लोकलची गर्दी पाहता लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी अनेक प्रवाशांकडून केली जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेवर सुरू असणाऱ्या लोकल फेऱ्यांची संख्या सध्या 1394 इतकी आहे. ही संख्या वाढून 1406 पर्यंत होणार आहे. शिवाय विरार ते चर्चगेट अशी फास्ट लोकल नव्याने सुरू करण्यात येणार आहे. तर डहाणू रोड ते विरार पर्यंत दोन स्लो लोकल चालवल्या जाणार आहेत अंधेरी गोरेगाव आणि बोरीवली येथून चर्चगेट साठी एक धीमी लोकल चालवण्यात येणार आहे. तर चर्चगेट ते नालासोपारा पर्यंत फास्ट आणि चर्चगेट ते गोरेगाव अशी दोन स्लो लोकल चालवण्यात येणार आहेत.

कधीपासून लागू होणार नवे वेळापत्रक ?

चर्चगेट ते अंधेरी पर्यंत एक धीमी लोकल आणि विरार ते डहाणू रोड पर्यंत दोन धीम्या लोकल चालवल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक 12 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. लोकलच्या बारा फेऱ्या वाढवल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सध्याचा विचार करता पश्चिम रेल्वे वरील मालाड ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून यासाठी मेजर ब्लॉकच आयोजन करण्यात येणार आहे.

कैलास पर्वतावर आजवर कोणीही का चढाई करू शकला नाही ? जाणून घ्या रहस्यमय कारण

Kailas Parvat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माउंट एवरेस्ट हा आपल्या जगातील सगळ्यात उंच पर्वत आहे. तरी देखील अनेक लोकांनी माउंट एव्हरेस्ट चढण्याचा विक्रम केलेला आहे. परंतु कैलास पर्वत हा माउंट एव्हरेस्ट पेक्षा 2000 मीटरने कमी उंचीचा आहे. तरी देखील आजवर कोणताही व्यक्ती या कैलास पर्वतावर चढाई करू शकलेला नाही. याचे नक्की कारण काय आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत. आजपर्यंत अनेक लोकांनी कैलास पर्वत चढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. कारण या ठिकाणी चढाई करताना नेविगेशन करणे खूप अवघड असते. तसेच दिशा भरकटत जाते. आपला रस्ता चुकतो आणि येथे असलेल्या शक्तींमुळे दिशा निर्देशक बदलत असल्याचा दावा अनेक लोकांनी देखील केलेला आहे.

या सगळ्या कारणामुळे सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यासाठी सगळ्यांसाठी बंदी ठेवण्यात आलेली आहे. कारण अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की, कैलास पर्वत आहे हे एक पवित्र स्थान आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कुणीही चढू नये. बौद्ध भिक्ष, योगी मिलो रेपा अकराव्या शतकात कैलास पर्वतावर चढाई केली होती. या पवित्र आणि रहस्यमय पर्वताला भेट देऊन परत जिवंत येणारा हा जगातील पहिला माणूस होता. असा देखील दावा करण्यात आलेला आहे. परंतु सध्या त्यावर कोणीही चढाई करू शकत.

या पर्वताचा उतारा 65° पेक्षा जास्त आहे. माऊंट एव्हरेस्टवर हा उतर 40 ते 60 अंशापर्यंत आहे. त्यामुळे अनेक मोठ मोठे गिर्यारोहक देखील या कैलास पर्वतावर चढण्यासाठी घाबरतात. या ठिकाणचे हवामान सतत बदलत असते. त्यामुळे हेलिकॉप्टर देखील इकडे तिकडे भरकटतात. चुकीच्या दिशेने वळतात आणि त्यांची दिशाभूल होते. तसेच या ठिकाणी असणाऱ्या हवामानामुळे मानवाची प्रकृती देखील बिघडते. कैलास पर्वत हा त्रिकोणी नसून चौकोनी आकाराचा आहे. त्यामुळे याला पर्वत सृष्टीचे केंद्र असे म्हणतात. त्याचप्रमाणे पुराणांमध्ये कैलास पर्वतावरती सोन्या, माणिक आणि स्पटिका यांचा साठा असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे.

कैलास पर्वत ही कोणतीही नैसर्गिक रचना नाही, तर एका अलौकिक शक्तीमुळे तयार झालेला हा पिरॅमिड आहे. याबद्दलची पुरानात देखील माहिती दिलेली आहे. कैलास पर्वता शंभर रहस्यमय पिरॅमिड पासून बनवलेला आहे. असा दावा देखील करण्यात आलेला आहे. हिंदू बौद्ध आणि जैन धर्मियांसाठी कैलास पर्वत हे एक पवित्र स्थान आहे. हिंदूच्या धार्मिक मान्यतेनुसार कैलास पर्वत हा भगवान शिवचे घर आहे. येथे मोक्षप्राप्ती होते. तसेच तिबेटी बौद्ध हे पविलास पर्वताला पृथ्वीवरील बौद्ध विश्व विज्ञानाचे केंद्रबिंदू मानतात. जैन धर्माचे संस्थापक वृषभ यांना येथे आध्यात्मिक जागृती मिळाल्याचा दावा देखील केला जात आहे त्यामुळे कैलास पर्वत हा सगळ्यांसाठी अत्यंत धार्मिक असे स्थळ आहे.

Weather Update | देशात परतीच्या पावसाला सुरुवात; ‘या’ राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

Weather Update

Weather Update | सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच पडलेला आहे. त्यानंतर पावसाने काही दिवस विश्रांती घेतलेली. आणि बहुतांश राज्यांमधून मान्सून परत देखील फिरला आहे. परंतु आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा 5 ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि नंदुरबार जिल्ह्यातून तो पुन्हा परतला देतील आहे. इथे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या परतीच्या पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात परतीचा पाऊस चालू होणार आहे. त्यामुळे जाता जाता पुन्हा एकदा यावर्षीचा पाऊस संपूर्ण राज्यात धुमाकूळ घालणार आहे.

सध्या राज्यामध्ये परतीच्या पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. याबद्दलची माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे 7 ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा देशात परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे 7 ऑक्टोबर पासून ते 11 ऑक्टोबर पर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता कोणत्या दिवशी कुठे पाऊस पडणार आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

7 ऑक्टोबर 2024 | Weather Update

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी चार राज्यांमध्ये मुसळधार त्यातील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये केरळ, तमिळनाडू, कोस्टल कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक यांचा समावेश आहे.

8 ऑक्टोबर 2024

8 ऑक्टोबर 2024 मध्ये देखील जवळपास 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. केरळ, लक्षद्वीप, तमिळनाडू, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयांमध्ये उद्या जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

9 ऑक्टोबर 2024

9 ऑक्टोबर रोजी देखील देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे. लक्षद्वीप, कर्नाटक, केरळ, अरुणाचल प्रदेश, नागालँड, तमिळनाडू, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

10 ऑक्टोबर 2024

10 ऑक्टोबर रोजी अनेक राज्यातील पावसाचा जोर हा कमी होणार आहे. आयएमडीने तरी देखील सहा राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे. यामध्ये लक्षद्वीप, केरळ, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, आसाम आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे.

रिकाम्या पोटी दूध पिणे आरोग्यासाठी आहे हानिकारक; जाणून घ्या सविस्तर

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या शरीराचे आरोग्यासाठी दूध पिणे खूप गरजेचे असते. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच दूध प्यायला हवे. कारण दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीराला खूप चांगले पोषक तत्व मिळतात. त्यामुळे दररोज दूध पिणे खूप गरजेचे आहे. अनेक लोक हे त्यांच्या लहान मुलांना देखील सकाळी नाश्त्याला दूध प्यायला देतात. तसेच रात्री झोपताना देखील दूध पितात. अनेक लोकांना दूध प्यायला आवडत नाही. परंतु दूध आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. त्यामुळे दूध प्यायला सांगतात. परंतु जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी दूध पिले, तर त्याचे तुमच्या शरीरावर नक्की कसे परिणाम होतील. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

रिकाम्या पोटी दूध पिण्याचे परिणाम

  • आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने आरोग्याच्या फायद्यापेक्षा जास्त नुकसान होते. दुधात एक साखर असते ज्याला लैक्टोज म्हणतात. हे इन्सुलिन वाढवू शकते.
  • काही लोक ते पचवू शकत नाहीत आणि त्यांना लैक्टोज असहिष्णु म्हणतात. अशा लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास त्वचेला खाज सुटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, जुलाब होणे इत्यादी ऍलर्जी होऊ शकते.
  • रिकाम्या पोटी दूध घेतल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे फुगवणे, गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या समस्या निर्माण होतात.
  • दूध आम्लयुक्त असते, त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काही लोकांना ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. चरबीयुक्त दूध छातीत जळजळ आणि ऍसिडिटी होऊ शकते.
  • सकाळी रिकाम्या पोटी घेतलेले दूध इतर पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणू शकते. दुधात असलेले कॅल्शियम लोहासारख्या पोषक तत्वांचे शोषण रोखते. त्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.
  • सकाळी रिकाम्या पोटी फॅट आणि कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेटयुक्त दूध प्यायल्याने पचनक्रिया मंदावते.
  • फुल फॅट दूध कॅलरीजमध्ये भरपूर असते आणि ते सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन झपाट्याने वाढते.

या लोकांनी मध आणि लिंबू घालून गरम पाणी पिऊ नये; होतात हे तोटे

Lemon And honey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोकांचे जीवनशैली वेगवेगळ्या प्रकारे मेंटेन करत असतात अनेक लोके सकाळी उठल्यावर गरम पाणी पितात गरम पाणी पिल्याने आपले शरीर डिटॉक्स होते आणि वजन कमी करण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपली पचनक्रिया देखील मजबूत होते. त्यामुळे अनेक लोक सकाळी उठल्यावर उपाशी पोटी हर्बल ड्रिंक्स पितात. काही लोक हे सकाळी कोमट पाण्यात मध आणि लिंबू टाकून पितात. सकाळी उपाशी पोटी हे पेय पील्याने पोट साफ होते तसेच वजन देखील कमी होते. परंतु सगळ्यांच्या आरोग्याला हे पेय मॅच होत नाही. त्यामुळे अनेकांना याचा त्रास होतो. त्यामुळे जाणून घेऊया असे कोणते लोक आहेत ज्याच्यासाठी हे पेय घातक ठरते.

मध आणि लिंबू सह गरम पाणी फायदेशीर आहे की हानिकारक?

कोमट पाण्यात (Honey and Lemon Juice Hot Water) लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने चरबी बर्न होते, असे आयुर्वेद तज्ञ सांगतात. यामुळे यकृत पूर्णपणे स्वच्छ होते. हे प्यायल्याने तुम्ही गॅस आणि ॲसिडिटीसारख्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. तथापि, ते सर्वांसाठी फायदेशीर नाही, म्हणून काही लोकांनी ते टाळावे.

मध आणि लिंबू सह गरम पाणी टाळावे

  • सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी गरम पाण्यात मध आणि लिंबू पिणे टाळावे.
  • हायपर ॲसिडिटी आणि पित्त दोषाच्या बाबतीत, एखाद्याने लिंबू आणि मध घालून कोमट पाणी पिणे टाळावे, विशेषतः हे रिकाम्या पोटी करू नये.
  • ज्या लोकांची हाडे कमकुवत आहेत किंवा दात मोकळे आहेत त्यांनी हे पाणी टाळावे
  • तुम्हाला तोंडात अल्सरची समस्या असली तरीही तुम्ही हे पेय टाळावे.

    मध-लिंबू गरम पाणी पिण्यापूर्वी काय करावे

    • पाणी कोमट किंवा कोमट ठेवा आणि जास्त पाणी पिऊ नका.
    • पिण्याआधी मध, लिंबू आणि पाणी मिसळा.
    • खूप गरम पाण्यात मध मिसळणे टाळा.
    • मध गरम करू नका किंवा शिजवू नका.
    • एका वेळी फक्त अर्धा ते एक चमचा मध वापरा.
    • कोमट पाण्यातही लिंबू ठेवा. फक्त अर्ध्या लिंबाचा रस घालण्याचा प्रयत्न करा.

      HBCSE Bharti 2024 | होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

      HBCSE Bharti 2024

      HBCSE Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे. ती म्हणजे आता होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक बी, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प कार्य सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 5 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केलेली आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. ही मुलाखत 21, 22, 23, 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे bआता या भरतीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

      पदाचे नाव | HBCSE Bharti 2024

      प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक बी, प्रकल्प सहाय्यक प्रकल्प कार्य सहाय्यक

      रिक्त पदसंख्या

      या भरती अंतर्गत 5 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

      नोकरीचे ठिकाण

      या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

      वयोमर्यादा | HBCSE Bharti 2024

      • प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक बी – 28 वर्ष
      • प्रकल्प सहाय्यक – 31 वर्ष
      • प्रकल्प कार्य सहाय्यक – 28 वर्ष

      निवड प्रक्रिया

      या भरतीसाठी तुमची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

      मुलाखतीची तारीख

      21, 22, 23 आणि 25 ऑक्टोबर या दिवशी मुलाखत होणार आहे

      वेतनश्रेणी

      • प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक बी – 62 हजार 200 रुपये
      • प्रकल्प सहाय्यक – 40 हजार रुपये
      • प्रकल्प कार्य सहाय्यक – 31 हजार 500 रुपये

      निवड प्रक्रिया | HBCSE Bharti 2024

      • या भरतीसाठी तुमची मुलाखती द्वारे निवड केली जाईल.
      • 21, 22, 23 आणि 25 तारखेला मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.
      • या मुलाखतीसाठी तुम्ही हजर राहायचे आहे.

      अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

      वेबसाईटवरही दिसणार ब्लू टिक, आता खऱ्या आणि बनावटमधील फरक क्षणार्धात समजणार

      Website

      हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फसवणूक करणाऱ्या वेबसाईटला आळा घालण्यासाठी गूगल एका नव्या फीचरवर काम करत. या फीचरची सध्या चाचणी सुरू असून, आता वेबसाईट्सवर ब्लू चेकमार्क दिसणार आहे. त्यामुळे युजर्सना खरी आणि खोटी वेबसाईट्स कोणत्या आहेत, याची तुलना सहजपणे करता येणार आहे. त्यामुळे खोट्या वेबसाईट्सवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. जेव्हा तुम्ही गुगलवर काही सर्च करता, तेव्हा अनेक वेबसाईट दिसतात. त्यावर अजून कोणतेही ब्लू चेकमार्क नाही. पण लवकरच वेबसाईट डोमेन नावाच्या आधी ब्लू टिक दिसणार आहे. या चेकमार्कमुळे वेबसाईट खरी आहे याची खात्री होईल. या फिचर्सच्या वापरामुळे सुरक्षितता वाढली जाणार आहे.

      विश्वसनीय माहिती मिळणार

      गुगलने सुरुवातीला मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या वेबसाइट्सना ब्लू टिक मार्क देण्यास सुरुवात केली आहे. यासोबत एखाद्यी माहिती सुरक्षित आहे की, नाही हे मॅसेजवर सांगितले जाईल. युजर्सना ब्लू चेक मार्क पाहून समजेल की, त्यांनी जे सर्च केले आहे, त्यात कोणती वेबसाइट खोटी आणि विश्वसनीय हे समजण्यास फायदेशीर ठरेल. ज्या वेबसाईटवरून लोकांना फसवले जाते ते नाहीसे होणार आहे. सध्या ब्लू चेक मार्कसंबंधी अधिक माहिती आलेली नाही. पण गुगलचे हे फिचर्स इंस्टाग्राम, फेसबुक किंवा एक्स सारख्या प्लॅटफॉर्मवरील ब्लू टिक प्रमाणे असणार आहे. या फीचर्समुळे योग्य माहिती मिळवण्यास मदत होणार आहे.

      कोणाला मिळणार ब्लू टिक

      गूगलचे हे नवीन फिचर अजून यूजर्ससाठी उपलब्ध झालेले नाही . एका रिपोर्टनुसार ते सर्वप्रथम मोठ्या कंपनीना वापरण्यासाठी दिले जाईल अशी शक्यता आहे. त्यानंतर इतर यूजर्ससाठी उपलब्ध होईल.